पनीर बटर मसाला

कोलबेर's picture
कोलबेर in पाककृती
3 Jan 2009 - 10:19 am

पनीर बटर मसाला

माहितीचा स्त्रोत/ चीफ शेफ : सौ. कोलबेर

साहित्य :

पनीर ४०० ग्रॅम
क्रिम (हाफ ऍंड हाफ)
१ टेबल स्पुन लोणी
काजु पेस्ट (१०-१५ काजुंची)
जिरे १ टी स्पुन
तमालपत्र १-२
चवी पुरते मीठ
१ चमचा साखर
कश्मिरी लाल तिखट पावडर २ मोठे चमचे
हळद चिमुटभर
१ चमचा गरम मसाला
मसाल्यासाठी : दालचिनी १ काडी, मिरे ८-१०, लवंग ५-६
१ मोठ्या कांद्याची पेस्ट
टोमेटो प्युरी (३ टोमेटोची)
आलं + लसुण + हिरवी मिरची + कोथिंबीर पेस्ट

कृती :

एका भांड्यात तेल तापवावे. त्यात जिरे टाकुन तडतडल्यावर तमालपत्र आणि कांद्याची पेस्ट घालावी. चांगले परतुन सोनेरी होऊ द्यावे. त्यात टोमेटो प्युरी घालुन परतावे. मिश्रण शिजल्यावर त्यात आलं + लसुण + हिरवी मिरची + कोथिंबीर पेस्ट घालुन पुन्हा परतावे. त्यानंतर काजुजी पेस्ट घालावी. त्यानंतर वर दिलेला मसाला बारीक करुन घालावा. चवीपुरते मीठ, १ चमचा साखर, हळद, कश्मिरी लाल तिखट आणि गरम मसाला घालावे. चांगले हलवावे. जास्त घट्ट वाटल्यास थोडे पाणी टाकावे आणि हळू हळू १ कप क्रिम घालावे आणि सतत मिश्रण ढवळावे. शेवटी पनीर चौकोनी तुकडे कापुन टाकावे आणि एक टेबलस्पुन लोणी घालावे. साधारण ५ मिनिटे वाफ द्यावी वरुन कोथिंबीर भुरभुरावी. पनीर बटर मसाला तयार.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

3 Jan 2009 - 10:29 am | मदनबाण

मी पाकृ वाचायच्या आधीच फोटो पाहुनच भुकेला झालो आहे...
पनीर चा कुठलाही पदार्थ हा माझा लय विक पॉइंट हाय...
कोलबेरराव आणि को.काकु यांना या जबरदस्त पाकृ बध्दल धन्यवाद... :)

(पनीर प्रेमी)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

सुनील's picture

3 Jan 2009 - 10:30 am | सुनील

फर्मास फोटो आणि पाकृ.

स्वगत - माझ्या नववर्षाच्या संकल्पाचे कसे होणार, ह्या अशा पाकृ येऊ लागल्या तर?

(डाएटेच्छु) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

3 Jan 2009 - 10:49 am | सहज

अरे यार असे तुम्ही लोकांनी पनीर डिश, केक टाकल्यावर डायट की ऐशी की तैशी होणार रे :-(

बाकी फोटु खल्लास आहे.

अवलिया's picture

3 Jan 2009 - 10:52 am | अवलिया

डायट की ऐशी की तैशी होणार?

अहो झालीच .... :)

बाकी फोटु खल्लास आहे.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

कोलबेर's picture

3 Jan 2009 - 10:51 am | कोलबेर

स्वगत - माझ्या नववर्षाच्या संकल्पाचे कसे होणार, ह्या अशा पाकृ येऊ लागल्या तर?

फॅट फ्री दुधापासुन देखिल उत्तम पनीर बनते. एकदा करुन पहाच! तुमचा संकल्पही राहील आणि ही डिशही चाखायला मिळेल :)

सुनील's picture

3 Jan 2009 - 10:52 am | सुनील

एका दगडात दोन पक्षी? करून बघावेच लागेल!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रभाकर पेठकर's picture

5 Jan 2009 - 3:13 pm | प्रभाकर पेठकर

फॅट फ्री दुधापासुन देखिल उत्तम पनीर बनते.

त्या पेक्षा टोफू (बीन कर्ड) वापरून पाहावे. नो फॅट.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

चतुरंग's picture

5 Jan 2009 - 3:28 pm | चतुरंग

बर्‍याचवेळा लुचकट लागते पनीर इतके लुसलुशीत आणि खुसखुशीत नाही, त्यामुळे मला टोफू फारसा पसंत नाही.

चतुरंग

प्राजु's picture

5 Jan 2009 - 8:58 pm | प्राजु

एकदा आणून पाहिला टोफू... पण..! बास! - (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

7 Jan 2009 - 5:37 pm | प्रभाकर पेठकर

टोफूत दोन प्रकार मिळतात. एक सॉफ्ट टोफू दूसरा हार्ड टोफू.
अर्थात, आवडत नसेल तर प्रश्नच मिटला.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

आजानुकर्ण's picture

9 Jan 2009 - 2:11 am | आजानुकर्ण

सुपरफर्म टोफू हा पनीरसारखाच असतो. पनीरपेक्षा चवही बरी वाटते. पनीरला येणारा दुधी वास मला फारसा पसंत नाही. त्यामुळे टोफू जरा बरे.

आपला
(टोफूप्रेमी) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

3 Jan 2009 - 10:45 am | विसोबा खेचर

फोटू पाहून वारलो..!

कोलबेरा, तू उत्तम बलवाचार्यही आहेस हे माहीत नव्हतं! येऊ द्यात अजूनही अश्याच दिलबहार, सदाबहार पाकृ..

आपला,
(पनीरप्रेमी) तात्या.

कोलबेर's picture

3 Jan 2009 - 10:48 am | कोलबेर

कोलबेरा, तू उत्तम बलवाचार्यही आहेस हे माहीत नव्हतं! येऊ द्यात अजूनही अश्याच दिलबहार, सदाबहार पाकृ..

धन्यवाद तात्या! तसे आम्हीही बल्लवाचार्य आहोतच :) पण ह्या पाककृतीचे श्रेय सौ.कोलबेर यांचे आहे.

विसोबा खेचर's picture

3 Jan 2009 - 11:03 am | विसोबा खेचर

पण ह्या पाककृतीचे श्रेय सौ.कोलबेर यांचे आहे.

काकूंना धन्यवाद सांगा..

बाय द वे, दुसरा धक्का. तुझंही लग्न झालेलं आहे हेही मला माहीत नव्हतं. मी आपला तुला कुणीतरी अमेरीकेत उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थीच समजत होतो! असो. :)

कोलबेरकाकूंनाही मिपाच्या मेंबर करून घ्या प्लीज..

तात्या.

ऋषिकेश's picture

5 Jan 2009 - 3:06 pm | ऋषिकेश

मी आपला तुला कुणीतरी अमेरीकेत उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थीच समजत होतो! असो

मी पण! :)
बाकी बाऊल, पदार्थ, फोटो सगळं एकदम झक्कास! कोलबेर काकु/वहिनींचे अभिनंदन :)
रामदासकाका म्हणतात त्याप्रमाणे तोंडाला लाळेरं लाऊनच मिपा उघडायला लागणार बहुतेक

-ऋषिकेश

मृगनयनी's picture

3 Jan 2009 - 11:33 am | मृगनयनी

धन्यवाद कोलबेर जी..
आणि सौ कोलबेर जी..
:)
अजून येउ देत..

वेताळ's picture

3 Jan 2009 - 11:53 am | वेताळ

पनीर आपला पण आवडता पदार्थ आहे. पनीरटिक्का मसाला पण कसा करावा ह्याचे मार्गदर्शन कोलबेर साहेब तुम्ही एकदा करावे.
वरील पाकृ लवकरच करणार आहोत.
वेताळ

चतुरंग's picture

3 Jan 2009 - 8:43 pm | चतुरंग

तोंडाला पाणी सुटले. लवकरच करुन बघायला हवे.
कोलबेरराव चीफ शेफ सौ.कोलबेरना धन्यवाद सांगा!

चतुरंग

प्राजु's picture

3 Jan 2009 - 8:50 pm | प्राजु

काय सांगू आता याबद्दल..
काकूंना धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

3 Jan 2009 - 10:56 pm | शितल

पाककृती आणि फोटो एकदम मस्त. :)

चित्रा's picture

3 Jan 2009 - 11:38 pm | चित्रा

पनीर बटर मसाला सुरेख दिसतो आहे. ही कृती चिकन घालूनही छान होईल असे वाटते.
धन्यवाद!

नंदन's picture

4 Jan 2009 - 6:54 am | नंदन

सहमत आहे. पाककृती मस्त आहे. पनीरप्रमाणेच चिकन आणि मिश्र भाज्यांनीही बनवता येऊ शकेलसे वाटते.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

कोलबेर's picture

4 Jan 2009 - 10:03 pm | कोलबेर

चिकन घालुनही साधारण अशीच पाककृती मस्त लागते. शिजवताना त्यात थोडे दही घालावे.

सुनील's picture

5 Jan 2009 - 3:22 pm | सुनील

चिकनची तर बनेलच पण जे शाकाहारी आहेत आणि पनीरमुळे वजन वाढेल असे वाटतेय, त्यांनी टोफू घालून पहावा. पौष्टीक आणि रुचकर.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लिखाळ's picture

4 Jan 2009 - 1:06 am | लिखाळ

वा ! पाकृ छान आहे. फोटो मस्तच आहे.
हिरवे सुंदर पानाच्या आकाराचे काचेचे पात्र आणि त्यात केशरी रंगाचा पदार्थ फारच मोहक.

फॅट फ्री दुधाचे पनीर होते? मला वाटले होते की पनीर म्हणजेच दुधातली वेगळी झालेली फॅट्स असतात.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.

कोलबेर's picture

4 Jan 2009 - 1:19 am | कोलबेर

फॅट फ्री दुधाचे पनीर होते? मला वाटले होते की पनीर म्हणजेच दुधातली वेगळी झालेली फॅट्स असतात.

मलाही असेच वाटायचे. पण प्रत्यक्षात करुन बघीतले आहे खूप मस्त होते.
दुध = स्निग्धांश + प्रथिने (प्रोटीन) + पाणी. त्यातला स्निग्धांश काढुन टाकला तरी उरलेल्या दुधातील पाणी वेगळे करुन प्रथिनयुक्त पौष्टीक आणि चविष्ट पनीर बनते.

लवंगी's picture

4 Jan 2009 - 1:23 am | लवंगी

झकास झाली आहे डीश एकदम

लिखाळ's picture

5 Jan 2009 - 8:41 pm | लिखाळ

अच्छा ! एकदा करुन पाहिले पाहिजे फॅट फ्रीचे पनीर.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी

धनंजय's picture

4 Jan 2009 - 2:16 am | धनंजय

सुगरणीने (आणि छायाचित्रकाराने) कमालच केली आहे.

शाल्मली's picture

4 Jan 2009 - 3:21 am | शाल्मली

कोलबेरराव,
तुमच्या सौ ना खूप धन्यवाद.. आणि तुम्ही इथे दिल्याबद्दल तुम्हालाही.
फोटोही झकास.
करुन बघीन आणि कळवेनच..
--शाल्मली.

मीनल's picture

4 Jan 2009 - 4:09 am | मीनल

या मिपावर इतके ग्रेट लोक आहेत. त्यापेक्षा त्यांच्या ग्रेटर रेसिपीज.
मी महा आळःशी!
पण या फोटोंमुळे हे लोक ना करायला लावतात त्या डिशेश !

घरचे सर्व जण मिपाला वारंवार धन्यवाद देतात.

मीनल.

विसोबा खेचर's picture

4 Jan 2009 - 9:10 am | विसोबा खेचर

घरचे सर्व जण मिपाला वारंवार धन्यवाद देतात.

मिपाकरांची आपुलकी अन् अण्णा, बाबूजी, कुसुमाग्रज व भाईकाका यांची पुण्याई! दुसरं काय?! :)

रेवती's picture

4 Jan 2009 - 6:26 am | रेवती

प. ब. म. करून बघावाच लागणार. रंग छान आलाय. आणि इतका सुंदर सर्व्हींग बोल कुठे मिळाला?
आपल्या सौ. ना धन्यवाद.
रेवती

कोलबेर's picture

4 Jan 2009 - 10:02 pm | कोलबेर

पानाच्या आकाराचा हा बोल टारगेट मध्ये मिळाला.

रेवती's picture

4 Jan 2009 - 11:11 pm | रेवती

अच्छा. मी बघते आता टारगेटमधे.:)

रेवती

कोलबेर's picture

4 Jan 2009 - 10:06 pm | कोलबेर

मंडळी प्रोत्साहना बद्दल अनेक आभार.

- श्री व सौ कोलबेर

आगामी आकर्षण : चटपटीत तवा फ्राय कोळंबी सिकेपी स्टाइल :)

आजानुकर्ण's picture

4 Jan 2009 - 10:19 pm | आजानुकर्ण

फारच सुरेख पाककृती. :)

आपला
(बल्ले बल्ले) आजानुकर्णसिंग

सुक्या's picture

5 Jan 2009 - 1:44 am | सुक्या

कोलबेर साहेब. .
धन्यवाद. पनीर हा माझा वीक प्वाईंट. पुढच्या रेसिपी ची वाट पाहतो आहे.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

हर्षद बर्वे's picture

7 Jan 2009 - 5:30 pm | हर्षद बर्वे

फोटो बघूनच जागच्याजागी सांडलो....
आता हे खाउन बघितल्याशिवाय मन तृप्त नाही व्हायचे.....

हर्षद बर्वे(एच.बी.)

विसोबा खेचर's picture

7 Jan 2009 - 5:50 pm | विसोबा खेचर

जागच्याजागी सांडलो....

हे क्रियापद प्रचंड आवडले! :)

असो, अवांतराबद्दल क्षमा..

तात्या.

रेवती's picture

8 Jan 2009 - 6:58 pm | रेवती

आज केलाय प. ब. म.
छानच झालाय. रंग खूप लाल आला नाहीये.
बहुतेक लाल तिखटाचा रंग फारसा लाल नसल्यामुळे असेल.
माझ्याकडे काश्मिरी मिरच्यांचे तिखट नाही.
चव छानच आलीये.
धन्यवाद!

रेवती

रेणुका's picture

9 Jan 2009 - 1:13 am | रेणुका

रेवती ताई धन्यवाद.
कश्मिरी लाल तिखट नसल्यास २-३ थेंब खायचा लाल रंग टाकावा.
रेणुका (सौ. कोलबेर)