मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पनीर बटर मसाला

कोलबेर · · पाककृती
पनीर बटर मसाला माहितीचा स्त्रोत/ चीफ शेफ : सौ. कोलबेर साहित्य : पनीर ४०० ग्रॅम क्रिम (हाफ ऍंड हाफ) १ टेबल स्पुन लोणी काजु पेस्ट (१०-१५ काजुंची) जिरे १ टी स्पुन तमालपत्र १-२ चवी पुरते मीठ १ चमचा साखर कश्मिरी लाल तिखट पावडर २ मोठे चमचे हळद चिमुटभर १ चमचा गरम मसाला मसाल्यासाठी : दालचिनी १ काडी, मिरे ८-१०, लवंग ५-६ १ मोठ्या कांद्याची पेस्ट टोमेटो प्युरी (३ टोमेटोची) आलं + लसुण + हिरवी मिरची + कोथिंबीर पेस्ट कृती : एका भांड्यात तेल तापवावे. त्यात जिरे टाकुन तडतडल्यावर तमालपत्र आणि कांद्याची पेस्ट घालावी. चांगले परतुन सोनेरी होऊ द्यावे. त्यात टोमेटो प्युरी घालुन परतावे. मिश्रण शिजल्यावर त्यात आलं + लसुण + हिरवी मिरची + कोथिंबीर पेस्ट घालुन पुन्हा परतावे. त्यानंतर काजुजी पेस्ट घालावी. त्यानंतर वर दिलेला मसाला बारीक करुन घालावा. चवीपुरते मीठ, १ चमचा साखर, हळद, कश्मिरी लाल तिखट आणि गरम मसाला घालावे. चांगले हलवावे. जास्त घट्ट वाटल्यास थोडे पाणी टाकावे आणि हळू हळू १ कप क्रिम घालावे आणि सतत मिश्रण ढवळावे. शेवटी पनीर चौकोनी तुकडे कापुन टाकावे आणि एक टेबलस्पुन लोणी घालावे. साधारण ५ मिनिटे वाफ द्यावी वरुन कोथिंबीर भुरभुरावी. पनीर बटर मसाला तयार.

वाचन 15387 प्रतिक्रिया 0