ग्रोक४

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
12 Jul 2025 - 9:07 am

ग्रोक४
===

बहुचर्चित ग्रोक४ चे नुकतेच अनावरण झाले. मी ग्रोक३ ची सशुल्क सेवा घेत असल्याने आणि मी त्याबाबत समाधानी असल्याने ग्रोक४ काय करणार याची उत्सूकता होतीच.

ग्रोक४ च्या लोकार्पणाचा समारंभ इथे बघायला मिळाला.
https://www.youtube.com/watch?v=MtYsUdfZPMA

या दृक्फितीमध्ये तंत्रसामर्थ्योद्धत महामंडलेश्वर इलॉनशास्त्री मस्क यांचे गर्वसूक्त ऐकून धक्का बसला. सुमारे दीडेक वर्षापूर्वी एका जपानी समूहाने लवकरच ए०आय० पीएचडी दर्जाचे काम करू शकेल असा दावा केला होता.

हा दावा अपेक्षेपेक्षा लवकरच प्रत्यक्षात उतरलेला दिसतो.

अजून मी ग्रोक४ ची ताकद अजमावली नाही, पण सध्याच्या त्रिभाषासूत्राने निर्माण झालेल्या वादळाविषयी मत विचारले तेव्हा त्याने फायदे आणि तोटे या दोन्ही बाजूंवर प्रकाश टाकला.

त्यात मला खालील मुद्दे जास्त गंभीर वाटले-
Potential for Confusion and Developmental Delays: Introducing three languages simultaneously can confuse young children, delaying mastery of their first language or causing issues like mixing vocabularies, pronunciation challenges, or grammar errors. This might extend to other areas, such as gross motor skills or speech problems like stuttering, potentially requiring therapy. In extreme cases, it could lead to limited vocabulary if languages are compartmentalized (e.g., assigned to specific days).

अर्थात असे नुकसान झालेच तर मा०मु० आणि देशाच्या एकात्मतेची चिंता वाहणारे राष्ट्रीय पुडी-सोडक संघटनेचे नेते याबाबत कसलीही जबाबदारी घेणार नाहीत, हे सांगायची गरज नाही.

जाता जाता - माझ्या लहानपणी अमृत आणि विचित्र विश्व अशी दोन रीडर्स डायजेस्ट्च्या धर्तीवर दोन मराठी डायजेस्ट निघत असत. त्यात एक विनोद वाचला होता.

एकदा चीनी श्रेष्ठ का जपानी श्रेष्ठ असा वाद एका राजाच्या पुढे निर्माण झाला होता. त्याने दोन्ही गटांना एका महालात ठेवले आणि एका आठवड्यात महालाच्या एका भिंतीवर आपली कला दाखवावी असा आदेश दिला.

चिनी गटाने आपली सर्व कल्पकता पणाला लावून त्यांच्या भिंतीवर सुंदर रंगीबेरंगी आणि नेत्रदीपक चित्रे काढली. जपानी लोकांनी मात्र त्यांना दिलेली भिंत रात्रंदिवस घासून गुळ्गुळीत आणि आरशासारखी चकचकीत केली. इतकी की त्यात चिनी लोकांनी त्यांच्या कल्पकतेने नटवलेल्या भिंतीचे प्रतिबिम्ब पडले...

राजाने कुणाला श्रेठत्व बहाल केले हे आता आठवत नाही, पण सांगायचा मुद्दा असा की आता ए० आय० आता पी०एच०डी० च्या दर्जा पर्यंत जर पोचला आहेच, तर मा०मु० आणि राष्ट्रीय पुडी-सोडक संघटनेने आता महाराष्ट्रातील पी०एच०डीचा दर्जा देशात कसा अव्वल होईल याची चिंता करणे जास्त उचीत ठरेल...

समाजविचार

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

13 Jul 2025 - 11:32 am | प्रसाद गोडबोले

Red

लेखकाने ग्रोक-४ (Grok-4) बद्दल उत्साह व्यक्त केला असला तरी, त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांची तार्किक सुसंगती आणि आधार तपासला जाऊ शकतो:
'पीएच.डी. पातळी' गाठलेले ग्रोक-४:
* लेखकाचा दावा: लेखकाने "जपानी गटाने" एआय "पीएच.डी. पातळी" गाठेल असे भाकीत केल्याचा उल्लेख केला आहे आणि ग्रोक-४ ने हे साध्य केले असल्याचे सुचवले आहे.
* विश्लेषण: ग्रोक-४ (किंवा जीपीटी-४) सारखे एआय मॉडेल्स अत्यंत प्रगत असले तरी आणि अनेक शैक्षणिक व तर्कसंगत कार्यांमध्ये मानवी पातळीवर किंवा त्याहून अधिक कार्य करू शकत असले तरी, त्याला "पीएच.डी. पातळी" म्हणणे हे एक रूपक आहे, अक्षरशः वैज्ञानिक मूल्यांकन नाही. पीएच.डी. म्हणजे मूळ संशोधन, सखोल ज्ञान, गंभीर विचार आणि नवनवीन समस्या तयार करण्याची व सोडवण्याची क्षमता, जी नमुना ओळख आणि माहिती संश्लेषणापलीकडील असते. सध्याचे एआय मोठ्या प्रमाणात माहितीवर प्रक्रिया करण्यात आणि मानवी-सदृश मजकूर तयार करण्यात उत्कृष्ट आहेत, परंतु त्यांच्या "समजण्याची" आणि "मूळ विचारांची" पद्धत मानवी संज्ञानापेक्षा मूलभूतपणे वेगळी आहे.
* ते अर्थपूर्ण आहे का? प्रभावीपणाची अतिशयोक्तीपूर्ण अभिव्यक्ती म्हणून, होय. एआयमध्ये मानवी डॉक्टरेट क्षमता आहेत असे अक्षरशः विधान म्हणून, नाही. हे वैज्ञानिक अचूकतेपेक्षा जास्त उत्साह दर्शवते.
त्रिभाषा सूत्रावरील ग्रोक-४ चा प्रतिसाद:
* लेखकाची मांडणी: लेखकाने "त्रिभाषा सूत्रा"वरील प्रश्नाला ग्रोक-४ चा प्रतिसाद सादर केला आहे, जो गोंधळ, विकासात्मक विलंब, शब्दसंग्रह मिश्रण आणि उच्चार आव्हानांसारख्या संभाव्य समस्यांवर प्रकाश टाकतो.
* विश्लेषण: ग्रोक-४ चा हा प्रतिसाद मोठ्या भाषेच्या मॉडेलसाठी (large language model) सामान्य आहे, जो सार्वजनिक चर्चा आणि काही संशोधनात आढळणारे सुरुवातीच्या बहुभाषिक शिक्षणाविषयीचे सामान्य युक्तिवाद आणि चिंता यांचा सारांश देतो. काही मुलांना काही आव्हाने येऊ शकतात (विशेषतः जर प्रभावीपणे शिकवले नाही किंवा काही शिकण्यातील फरक असतील), परंतु बहुभाषिकतेवरील (विशेषतः बालपणात) सामान्य वैज्ञानिक सहमती अनेकदा संज्ञानात्मक फायद्यांकडे (उदा. सुधारित समस्या सोडवणे, संज्ञानात्मक लवचिकता, मेटा-भाषिक जागरूकता) निर्देश करते, व्यापक विकासात्मक विलंबांकडे नाही. विशिष्ट गोष्टी शिकवण्याच्या पद्धती, भाषिक वातावरण आणि वैयक्तिक मुलाच्या घटकांवर अवलंबून असतात.
* ते अर्थपूर्ण आहे का? ग्रोक-४ चे उत्तर त्रिभाषा सूत्राच्या संभाव्य विरोधातील युक्तिवादांचा सारांश म्हणून अर्थपूर्ण आहे, परंतु ते बहुभाषिक शिक्षणाच्या फायदे आणि तोट्यांबद्दलचे सर्वसमावेशक किंवा सार्वत्रिकपणे स्वीकारलेले वैज्ञानिक मत दर्शवत नाही. लेखकाने ते प्रगत एआयचे उत्पादन म्हणून सादर केले आहे, ज्यामुळे ते एक गहन सत्य आहे असे सूचित होते, केवळ एक दृष्टिकोन नाही.
चिनी विरुद्ध जपानी कलाकारांचा किस्सा (साधेपणा विरुद्ध विस्तृतता):
* लेखकाचा वापर: लेखकाने एक किस्सा समाविष्ट केला आहे जो सूचित करतो की "साधेपणा आणि परिष्करण विस्तृत निर्मितीइतकेच प्रभावी असू शकते."
* विश्लेषण: हा कला आणि सौंदर्यशास्त्राबद्दलचा एक तात्विक मुद्दा आहे, जो अनेकदा सौंदर्य आणि कार्यक्षमतेचे महत्त्व व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. हा एक वैध आणि सामान्यतः वापरला जाणारा दृष्टांत आहे.
* ते अर्थपूर्ण आहे का? होय, हा एक सुसंगत आणि व्यापकपणे समजून घेतलेला मूल्य आणि प्रभावाबद्दलचा लाक्षणिक मुद्दा आहे. एआयच्या "पीएच.डी. पातळी" किंवा भाषा वादाशी त्याचा संबंध अधिक बाह्य आहे, कदाचित एआयच्या मोहक कार्यक्षमतेचे सूचन करण्यासाठी वापरला गेला आहे.
एआयच्या "पीएच.डी. पातळी" ला महाराष्ट्रातील पीएच.डी. ची गुणवत्ता सुधारण्याशी जोडणे:
* लेखकाचा निष्कर्ष: लेखकाने असा निष्कर्ष काढला आहे की जर एआयने "पीएच.डी. पातळी" गाठली असेल, तर मानवी प्रयत्नांनी महाराष्ट्रातील पीएच.डी. ची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
* विश्लेषण: ही एक काहीशी अचानक आणि थोडी अवास्तव उडी आहे. शिक्षण आणि संशोधनाची (पीएच.डी. सह) गुणवत्ता सुधारणे हे नेहमीच एक योग्य ध्येय असले तरी, प्रगत एआयच्या आगमनाचा अर्थ असा नाही की मानवी पीएच.डी. अप्रचलित आहेत किंवा त्यांचा एकमेव उद्देश एआयशी "जुळवून घेणे" हा आहे. एआय संशोधनामध्ये सुधारणा करण्यासाठी एक साधन असू शकते, परंतु मानवी सर्जनशीलता, गंभीर विचार, नैतिक विचार आणि नवीन समस्या परिभाषित करण्याची क्षमता अजूनही महत्त्वपूर्ण आहे. एआयच्या क्षमतांमुळे मानवी डॉक्टरेट प्रयत्नांचे मूल्य किंवा आवश्यकता कमी होते, ही एक चुकीची व्याख्या आहे.
* ते अर्थपूर्ण आहे का? शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याची भावना चांगली आहे, परंतु एआयच्या "पीएच.डी. पातळी" पासून मानवी पीएच.डी. ला महाराष्ट्रात विशेषतः सुधारण्याची गरज का आहे, याच्या थेट तार्किक संबंधात, ते कमकुवत आहे आणि थेट परिणाम म्हणून "अर्थपूर्ण" नाही. हा एक निष्कर्ष काढणारा विचार अधिक आहे, थेट तार्किक व्युत्पन्न नाही.
थोडक्यात, लेखकाचा एआयवरील उत्साह स्पष्ट आहे. जरी त्याने स्पर्श केलेल्या काही मूलभूत वैज्ञानिक संकल्पना (जसे की प्रदूषणाचा प्रभाव, ज्याबद्दल त्याने मागील लेखात चर्चा केली होती) वैध असल्या तरी, एआयच्या "पीएच.डी. पातळी" बद्दलचे त्याचे अर्थ आणि मानवी शिक्षणावरील त्याचे परिणाम हे कठोरपणे तार्किक किंवा वैज्ञानिकदृष्ट्या अचूक असण्यापेक्षा अधिक लाक्षणिक आणि काल्पनिक आहेत.

युयुत्सु's picture

14 Jul 2025 - 5:39 pm | युयुत्सु

श्री० गोडबोले

तुम्ही व्हिडीओ बघितला तर पी०एच्०डी०ची पातळी म्हणजे काय ते समजायला मदत होईल. तसेच मी सांगितलेला किस्सा जेमिनीला कळला नाही, असे वाटते.

माहितगार's picture

13 Jul 2025 - 12:54 pm | माहितगार

@ युयुत्सु ग्रॉक ग्रॉकच्याच माहितीचे समर्थन करत नाही असे दिसते आहे. असे का होत असावे? मी ग्रॉकला खालील प्रश्न विचारला तुम्ही सुद्धा विचारून पहाल का?

Re examine following Grok claim about teaching more (three) languages at young age i.e. 6 to 10 :Potential for Confusion and Developmental Delays: Introducing three languages simultaneously can confuse young children, delaying mastery of their first language or causing issues like mixing vocabularies, pronunciation challenges, or grammar errors. This might extend to other areas, such as gross motor skills or speech problems like stuttering, potentially requiring therapy. In extreme cases, it could lead to limited vocabulary if languages are compartmentalized (e.g., assigned to specific days).

युयुत्सु's picture

13 Jul 2025 - 2:29 pm | युयुत्सु

श्री० माहितगार

तुम्ही सांगितलेला "अभ्यास" केला ;))

याचे एक "संभाव्य" कारण असे देता येईल-

आपण सांगितलेल्या एका आज्ञेची कार्यवाही करताना अल्गोरिथम काही पुरावे (सहसा अन्य कोशपृष्ठे)सापडतात. त्या पुराव्यामध्ये मूळ प्रश्नाच्या अनुषंगाने शोध घेताना अल्गोरिथम ला जी विधाने योग्य वाटतात, त्या विधानांची मूळ प्रश्नाच्या उत्तरासाठी निवड होते आणि उत्तर तयार केले जाते. तयार झालेले उत्तर परत-परत तपासणे सध्याच्या अल्गोरिथम मध्ये किती खोलवर जाऊन केले जाते हे सध्या तरी मला सांगता येणार नाही.

मी शिकलेल्या मराठीत "मला मदत कर. मी तुला मदत करेन" हा वाक्यप्रयोग योग्य मानला गेला आहे. पण (हिंदीच्या) अत्याचाराने "माझी मदत कर. मी तुझी मदत करेन" याला मी भाषेची समृद्धी मानत नाही. मूळात जी व्यवस्था आहे ती नाकारून नवी वाक्यरचना रूळवणे हेच मला मान्य नाही. मूळातील व्यवस्था जर अपूरी पडत असेल तर नवे शब्द किंवा रचना स्वीकारणे योग्य ठरते. भाषिक ग्रहणक्षमतेतील मर्यादेमुळे "तू कायकू डरता है" "ये दो सौ का आयटम आपको सो को गिरेगा" अशा रचना तयार होतात. याला ही मी भाषेची समृद्धी मानत नाही की यामुळे गोडवा पण वाढत नाही.

यासाठी जे संशोधन झाले आहे त्याची विश्वासार्हता, कक्षा तपासणे आवश्यक आहे. वैद्यकीय आणि भौतिक-रसायनादि मूलभूत शास्त्रांमध्ये हे बर्‍यापैकी तपासले जाते. पण समाजशास्त्रीय संशोधनात "रिगर" हा एक वादग्रस्त मुद्दा राहतो.

असो. सांगायचे तात्पर्य असे की माझ्या वैयक्तिक आकलनानुसार मला ग्रोकचे मूळ उत्तर अजिबात चूकीचे वाटत नाही.

माहितगार's picture

14 Jul 2025 - 4:48 pm | माहितगार

ग्रोक चुकू शकते?

युयुत्सु's picture

14 Jul 2025 - 5:26 pm | युयुत्सु

कोणत्याही प्रेडी़क्टीव्ह मॉडेलची कामगिरीची अचूकता निश्चित करता येते. तेव्हा ग्रोक चुकू शकते? या प्रश्नापेक्षा ग्रोक ची अक्युरसी किती हा प्रश्न विचारणे अधिक योग्य होईल. १००% अ‍ॅक्युरसी कोणत्याच मॉडेलची असू शकत नाही आणि असणे अपेक्षित नाही. डेटा सायन्स मध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे - "ऑल मॉडेल्स आरे रॉन्ग पण सम आर युजफुल".

अभ्या..'s picture

14 Jul 2025 - 5:26 pm | अभ्या..

ग्रोक चुकू शकते?

विचारा की त्यालाच.
.
तो खरे बोलतो की खोटे हे मात्र तुम्ही सांगा.
आणि हो किंवा नाही ते एकाच शब्दात सांगा, दळण नको
(मिपाकरांनी स्पष्ट पणे दुर्लक्ष केले असता, अगदी खरडफळ्यावरच्या प्रश्नाकडे सुध्दा, काय हे एआय चे दळण घालतेत कुणास ठाऊक)

सुबोध खरे's picture

14 Jul 2025 - 10:11 am | सुबोध खरे

ग्रॉक ४ ला एअर इंडिया चे विमान का पडले यावर पी एच डी करता येईल का हो ?

किंवा

संत पंत आणि तंत कवी यांच्या काव्याच्या तौलनिक अभ्यासावर पी एच डी करता येईल का?

युयुत्सु's picture

16 Jul 2025 - 11:37 am | युयुत्सु

ग्रॉक४ चा पी०एच०डी० लेव्हलचा उपयोग पैसे टाकल्यावरच करता येतो.

https://hackernoon.com/grok-4-claims-phdlevel-intelligence-but-at-a-cost

श्री० माहितगार यांना अपेक्षित असलेली उत्तरांची तपासणी Grok 4 Heavy या सर्वात महाग सभासदत्वात मिळते. तेव्हा कृपया ए०आय० ने या चुका केल्या अन त्या चुका केल्या अशी तक्रार कृपया करू नये.

हुच्च इन्स्टिट्यूट मधले हुशार लोक YZ का असतात

यावर ग्रोक ४ वर पी एच डी करता येईल का ?

युयुत्सु's picture

16 Jul 2025 - 12:23 pm | युयुत्सु

आपण स्वतः YZ असलं की इतर पण YZ दिसायला लागतात.

माहितगार's picture

16 Jul 2025 - 3:04 pm | माहितगार

मी तीन एआयना प्रतिसाद लिंक देऊन YZ चा अर्थ विचारून पाहिला. त्यांना नेमका अर्थ सांगता आला नाही ग्रॉकने Yevdha Zalay" (येवढं झालंय) अशी शक्यता वर्तवली!