कल्पकतेची ऐशीतैशी

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
9 Apr 2025 - 9:28 am

कल्पकतेची ऐशीतैशी
===========

सहसा कोणतीही नवजात कंपनी काही कल्पक उत्पादनाचे व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न करते. उत्पादन बाजार पेठेकडून स्वीकारले गेले तर कंपनी व्यवसाय चालू ठेवते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काही भारतीय नवजात कंपन्यांवर अकलेचे तारे तोडले आहेत, ते अतिशय संतापजनक आहेत. त्याला संबंधितांकडून प्रतिसाद मिळत आहेच, पण या सर्वाच्या मुळाच्या असलेल्या प्रश्नांचा गांभिर्याने विचार करायची गरज निर्माण झाली.

आपल्याकडे कल्पकतेचा विकास करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसताना, लोकांनी यंव करावे आणि त्यंव करावे म्हणून उंटावरून शेळ्या हाकणार्‍या राजकीय नेत्यांची कमी नाही.

आपले खरे दुखणे कशात आहे, याचा जर थंड डोक्याने शोध घ्यायचा प्रयत्न केला तर जे सत्य गवसते त्यामुळे रक्त उकळायला लागते.

काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. तेव्हा मी फोटोग्राफी करत असे. माझ्या फोटोग्राफीची नजर विकसित होण्यासाठी मी जगभर फोटोग्राफीमध्ये काय चालते याचा अभ्यास करत असे.

तर सांगत काय होतो, की मी माझ्या आजीला तिच्या शेवटच्या दिवसात भेटायला नाशिकला गेलो होतो. माझ्या आजीचा मुक्काम माझ्या मावशीकडे होता. जाताना मी माझा कॅमेरा बरोबर नेला होता. आजीला नमस्कार करून निघताना फोटो काढण्यासाठी कॅमेरा बाहेर काढला, तेव्हा माझ्या दोन बथ्थड डोक्याच्या मावशांनी आजीचा फोटो काढण्यास आक्षेप घेतला आणि मला अक्कल शिकवायला सुरुवातीला केली की "आजारी माणसांचे फोटो काढत नसतात!"

या दोन मावशांनी आयुष्यात कॅमेरा हातात धरणं सोडा पण आयुष्यात कसलाही पराक्रम केलेला नाही, पण फोटो कशाचे काढावेत आणि नाहीत याबद्दल मात्र त्यांची ठाम मते होती. आणि मी त्यांचे ऐकले पाहिजे हा त्यांचा चमत्कारिक आग्रह मात्र अनाकलनीय होता.

भारतात कल्पकता रूजणं शक्य नाही याची कारणे वरील (प्रातिनिधिक) प्रसंगात द्डलेली आहेत. समाजातले अडाणी आणि निर्बुद्ध लोक (विशेषत: संस्कृतीरक्षक) जेव्हा कला, सर्जनशीलता यांची व्याख्या करायला लागतात तेव्हा त्या समाजात कल्पकता कधीच विकसित नाही.

आज ए०आय० अवतरल्यानंतर ट्रंप,पुतीन आणि पोप यासारख्या सारख्या जागतिक नेत्यांची यथेच्छ टिंगलटवाळी ए०आय० ने तयार केलेल्या चित्राद्वारे चालू आहे. पण यामुळे एकही जण कोर्टकचेर्‍यांची वारी करताना दिसत नाही. पण फक्त भारतात विडंबन हा गुन्हा ठरू शकतो. कुठेतरी असे वाचले आहे की ख्रिश्चन धर्म सर्वात टिंगलटवाळी झालेला धर्म आहे.

कल्पकता दहशतीखाली विकसित होत नाही.

मग मला प्रश्न पडतो की कमी दुर्गंधीयुक्त शेण देणार्‍या गाईंवर संशोधन होणे ही आजची गरज आहे का?

मांडणीविचार

प्रतिक्रिया

आग्या१९९०'s picture

14 Apr 2025 - 12:21 pm | आग्या१९९०

तेच तेच प्रतिसाद प्रत्येक लेखात आणणे हे हि वैचारिक बद्धकोष्ठाचेच लक्षण आहे.
तुमच्या प्रतिसादांवरून तुम्ही त्याचे पालन करण्यात कुठलीही कसर ठेवत नाहीत हे जाणवते.

सुबोध खरे's picture

14 Apr 2025 - 11:46 am | सुबोध खरे

मुद्दा कल्पकते बद्दलचा आहे.

मुद्द्याचा कात्रज करण्याचा हेतू अश्लाघ्य आहे.

नाविक जीपीएस प्रणालीला किरकोळ म्हणण्यासाठी आपल्या बुद्धीची कीव करावी का हा प्रश्न आहे.

नीट पणे वाचून पहा त्याची गरज भारताला का झाली ते

श्रीगुरुजी's picture

14 Apr 2025 - 12:24 pm | श्रीगुरुजी

बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं कि तेच तेच विचार डोक्यात फिरत राहतात

बाडिस.

धागाकर्ता शेणाची टोपली कल्पकतेच्या फडक्याखाली झाकून घेऊन आला. परंतु टोपलीतल्या शेणाने स्वत:चेच तोंड माखले गेल्यानंतर "मी आता परत येथे लिहिणार नाही" असे सांगून पळ काढला. परंतु पुन्हा एकदा एक नवीन शेणाची टोपली घेऊन परत आला आणि पुन्हा एकदा शेणाने तोंड माखून घेतले. परंतु तरीही अक्कल आली नाही.

सनातन भारतीय संस्कृतीत १४ विद्या आणि ६४ कलांना सन्मानाचे स्थान आहे. देवदेवतांच्या सगुण रूपाला डमरू, बासरी, वीणा, मोरपीस या शिवाय पूर्णत्व येत नाही. प्रार्थनास्थळे देखील स्थापत्यशास्त्रातील बेजोड कलाकृतीच आहेत.

अन्नब्रह्म ते नादब्रह्म अशा संकल्पना नवीन नाहीत- एखादी उत्तम जमलेली पाककृती ते जमून आलेली मैफिल अशा नानाविध कलात्मक अविष्कारातून आणि आस्वादातून ब्रह्मानंदाची अंशत: का असेना अनुभूती येऊ शकते याचा सहर्ष स्वीकार मूळ संस्कृतीतच आहे. असो.