(काल्पनिक कथा)
दिल्लीच्या रायसिना भागात केंद्र सरकारच्या सचिवलयांच्या इमारती आहेत. अधिकान्श इमारती पाच ते सात माल्यांच्या आहेत. अग्नि शामक नियमांच्या अनुसार कर्मचार्यांना इमारतीत चढण्या उतरण्यासाठी किमान दोन वेगवेगळ्या पायर्या असल्या पाहिजे. पण जागेची कमतरता असल्याने इमारतीच्या कोपर्यांवर जी मोकळी जागा असते तिथे ही निर्माण झाले असल्याने कर्मचार्यांना उतरण्यासाठी एकच पायरी उपलब्ध असते. इमारतींत अवैध निर्माण असल्याने अधिकान्श इमारतींना अग्नि शामक विभागाचे प्रमाण पत्र नाही. तरीही अग्निपासून असुरक्षित इमारतींत मंत्री ते संत्री हजारो कर्मचारी काम करतात. मी ज्या इमारतीत कामाला जात होतो. ती आयतकार इमारत होती. मध्यल्या मुख्य दरवाज्यातून प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला पायर्या आहेत. प्रथम माल्यावर डाव्या बाजूला माझ्या अधिकार्याचे आणि माझे केबिन ही आहे. या भागात ही सर्वच माळ्यांवर कोपर्यावर अवैध निर्माण असल्याने आम्हाला उतरण्यासाठी एकच पायरी उपलब्ध आहे. मजेदार बाब पाचव्या फ्लोर वर अश्याच अवैध निर्मित भागात आमच्या मंत्र्याचे चेंबर होते.
त्या दिवशी सकाळी पाउणे नऊ वाजले असतील. मधल्या दरवाज्यातून प्रवेश करताच जाणवले काही वेळापूर्वी डाव्या बाजूच्या पायर्यांजवळ आग लागली होती. माझ्या मॅडम अधिकारीने आल्या-आल्या चेंबर मध्ये शिरताच मला बोलावले. पीएस साहब (दिल्लीत शिपाई सोडून सर्वांना साहब म्हणण्याची पद्धत आहे), सकाळी आग लागली होती का? मी उतरलो, यस मॅडम. पीएस साहब, हे सांगा, आपण इथे असताना पुन्हा अशीच आग लागली आणि जोरात पसरली तर आपण कसे बाहेर पडणार? दुसर्या बाजूला तर बाहेर जाण्याचा मार्ग बंद आहे. मी काही बोलणार त्या आधीच ती उतरली, अरे, आपण पहिल्या माल्यावर आहोत. खिडकीतून खाली उडी मारू शकतो. जास्तीसजास्त एखादा पाय तुटेल. पण प्राण वाचतील. मी उतरलो, मॅडम, आपण खिडकीतून उडी मारू शकत नाही. माकडे आत येऊ नये म्हणून या भागात सर्वच इमारतींच्या खिडक्यांना लोखंडाच्या मजबूत जाळ्या लागलेल्या आहेत. तिने मागे वळून खिडकी कडे पहिले आणि अत्यंत मरगळलेल्या आवाजात मला पाहत म्हणाली, मग आपले प्राण कसे वाचतील? खरे तर तिच्या प्रश्नावर मला हसू येत होते तरीही ही चेहरा गंभीर करत म्हणालो, मॅडम, आपण पहिल्या माल्यावर आहोत. आपण पाणी अंगावर शिंपडून तोंडाला हाताने झाकून आगीतून खाली उतरू शकतो. जास्तीसजास्त एखाद मिनिट लागेल. जर आपल्या कपड्यांना आग असे वाटले तर इमारतीतून बाहेर पडताच जमिनीवर लोट मारून घेऊ. बाहेर असलेले लोक आपल्याला वाचवून घेतील. तिने पुन्हा विचारले, असे उतरणे कितपत योग्य. मी उत्तर दिले, बहुतेक 1992-93 मध्ये कृषि मध्ये आग लागली होती त्यात प्राण हानी ही झाली होती. आगीत अधिकान्श लोकांचे प्राण, विषाक्त वायु फुफ्फुसात आत गेल्याने, जातात. आग आणि धूर युक्त विषाक्त वायु नेहमीच वर जाते. त्यामुळे इमारतीत आग लागल्यावर खाली उतरणे जास्त योग्य. वर जाणार्यांची मरण्याची शक्यता जास्त. त्यानंतर काही कर्मचार्यांना आग लागल्यावर काय करायचे याचे प्रशिक्षण दिले होते. मी ही ते घेतले होते. माझ्या या उत्तराने तिचे समाधान झाले. ती म्हणाली, म्हणजे आग लागली तरी आपण जीवंत राहू. पण पाचव्या माल्यावर बसणार्या आपल्या मंत्र्याचे काय होईल. ते अश्या आगीत पाच माले खाली उतरु शकतील का. मी म्हणालो, त्यांना वाचवायला हेलिकॉप्टर येईल. फक्त त्या वेळ पर्यन्त ते जीवंत राहिले पाहिजे. माझ्या या उत्तरावर ती हा! हा!हा! करत जोरात हसली. त्या हसण्याचे गूढ मात्र मला कळले नाही. पण अधिकारी सकाळी प्रसन्न असेल तर त्याच्या खाली काम करणार्या सर्वांचा दिवस ही उत्तम जातो. असो
मोदी सरकार आल्या नंतर सरकारला जाणवले, सचिवालयाच्या अधिकान्श इमारती जुन्या आणि असुरक्षित आहेत या शिवाय जागेची कमतरता ही आहे. सरकारने नवीन सुरक्षित इमारती बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे. संसद भवन सहित अनेक मंत्रालये आज नव्या इमारतीत शिफ्ट ही झाले आहेत. नव्या इमारती आगीपासून जास्त सुरक्षित आहे. निदान पुढील काही वर्ष तरी या इमारतींच्या आत अवैध निर्माण होणार नाही ही अपेक्षा आपण ठेऊ शकतो.
प्रतिक्रिया
1 Feb 2025 - 6:07 am | चित्रगुप्त
मजेदार आठवणी आहेत ('काल्पनिक कथा' असे का लिहीले असावे, असा प्रश्न पडला आहे)
या इमारती कोणत्या काळात बांधल्या गेल्या होता ? त्यावेळी या गोष्टीचा विचार केला गेला नव्हता का ? इमारतींच्या आत 'अवैध निर्माण' म्हणजे नेमके काय काय आहे ?
दिल्लीत मी पंधरा वर्षे 'युसिस' - अमेरिकन सेंटर मधे कार्यरत होतो. दर महिन्यात नियमितपणे एकदा 'फायर ड्रिल' व्हायचे. त्यावेळी अक्षरशः एका मिनिटात संपूर्ण इमारत रिकामी करून बाहेर सुरक्षित ठिकाणी जाऊन उभे रहायचे. 'आलबेल' ची घंटी वाजल्यावर इमारतीत परतायचे. त्यातही 'टेररिस्ट अॅटॅक, आग लागणे, भूकंप असे वेगवेगळे प्रकार होते. त्यासाठी वेगवेगळे सायरन आणि वेगवेगळे निर्देश होते.
त्या पंधरा वर्षाच्या नोकरीत मी अनेक गोष्टी नव्याने शिकलो. अतिशय आनंदाचा तो काळ होता. कधितरी त्यावर लिहीले पाहिजे.
दिल्लीत केंद्र सरकारची दहा वर्षे नोकरी करून युसिस मधे मी आलेलो असल्याने मला या सर्वाचे फार कौतुक वाटायचे. (अलिकडे काही वर्षांपूर्वीच मी काम करत होतो ते भारत सरकारचे संग्रहालय आग लागून अवघ्या दोन तासात संपूर्णपणे जळून भस्मसात झाले आहे)
--- ही खरोखर समाधानाची बाब आहे. १९७७-१९८७ या काळात सरकारी 'दफ्तर' मधला गलथानपणा, भ्रष्टाचार, खाबूगिरी हे सगळे मी अनुभवले आहे.
अश्याच जुन्या आठवणी लिहीत रहा.
5 Feb 2025 - 1:34 am | मुक्त विहारि
इतक्या स्पष्ट पणे लिहू नका...
काही वैचारीक गुलामांना वाईट वाटेल.
10 Feb 2025 - 5:42 pm | विवेकपटाईत
गुलाम कितीही शिक्षित असले तरी ते डोक्याचा वापर करत नाही.
11 Feb 2025 - 1:05 pm | मुक्त विहारि
असे आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात...
25 Mar 2025 - 6:43 am | निनाद
मोदी सरकार आल्यानंतर सरकारला हे लक्षात आले की, सचिवालयातील बहुतेक इमारती जुन्या आणि असुरक्षित आहेत, तसेच जागेची कमतरताही आहे. त्यामुळे सरकारने नवीन आणि सुरक्षित इमारती बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले. सर्वसामान्य लोकांनाही जे दिसत होते ते आधी च्या सरकारात कुणाला का कळले नाही हे मात्र गूढ आहे.
सरकारी कार्यालये आधुनिक झाल्यामुळे लोकांमध्ये सरकार विषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला असावा असे वाटते.
मंत्रालये नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्यामुळे काय सकारात्मक परिणाम आणि फायदे दिसून येत आहेत? सरकारी कामकाज अधिक सुरळीत आणि कार्यक्षम झाले आहे असे वाटते का?