प्रॉव्हिडन्ड फंड

पॅपिलॉन's picture
पॅपिलॉन in जे न देखे रवी...
26 Dec 2008 - 11:26 am

For oft, when on my couch I lie
In vacant or in pensive mood,
They flash upon that inward eye
Which is the bliss of solitude;
And then my heart with pleasure fills,
And dances with the daffodils.

वर्डस्वर्थच्या डॅफोडिल्स (http://www.poetry-online.org/wordsworth_daffodils.htm) ह्या सुंदर कवितेतील ह्या ओळी वाचून मनात आलेले काही स्वैर विचार -

जगण्याच्या वाटेवर,
दिसतात, येतात आणि भेटतात
अनेक वळणे, प्रसंग आणि माणसे.
सोपी आणि अवघड
गोड आणि कडू
सुष्ट आणि दुष्ट.
हा प्रत्येक कण वेचता वेचता
आपली झोळी भरून जाते!

झोळी नेहमी फाटकी असावी,
म्हणजे गळून जातात -
अवघड वळणे
कडू प्रसंग आणि
दुष्ट माणसे
आणि उरते फक्त सुखद स्मृतींचे संचित.
उरलेल्या वाटचालीकरता -
प्रॉव्हिडन्ड फंडासारखे!

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

मेथांबा's picture

26 Dec 2008 - 12:36 pm | मेथांबा

शीर्षक वाचून वाटले अर्थशास्त्रीय कविता की काय ! चांगला झाला आहे स्वैर अनुवाद.

{तुमचे नाव वाचून बँको हा पण पुढचा भाग आठवला.}

गाद्यांमध्ये रुपयांची बंडले शांतपणे भरून आनंदाने त्यावर झोपणारा,
मेथांबा

पॅपिलॉन's picture

26 Dec 2008 - 3:06 pm | पॅपिलॉन

धन्यवाद.

अर्थशास्त्रीय कविता ?
:O

बँको हा पण पुढचा भाग आठवला

;)

हेन्री शॅरिअर मलाही आवडतो!

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.