आज मी प्रो.पोंक्षना, कृष्णविवर(ब्ल्याक होल)
ह्या विषयावर बोलून थोडी माहिती द्यावी अशी
विनंती केली.
ते म्हणाले,
“ कृष्णविवर,म्हणजेच ज्याला,ब्ल्याक होल म्हणतात ते, आपण पाहू शकत नाही, असं असूनही आपण दावा करतो की ते अस्तित्वात आहे. आपण हा दावा कोणत्या आधारावर करतो?
तो आधार असा आहे की,प्रकाशाचा वेग अपूरा
पडल्याने, प्रकाश शोषला जात असल्याचे आपण पाहू शकतो.तसं नसतं आणि प्रचंड
वेगाने प्रकाश गेला असता तर सर्व प्रकाशमय दिसलं असतं, आणि अंधार दिसला नसता, म्हणजेच कृष्णविवर दिसलं नसतं,ब्ल्याक होल दिसलं नसतं.जिथे काळोख असतो तिथे प्रकाश
नसतो, हे समजण्यासाठी एव्हढी ही साधी बाब आहे.
धर्म आणि जागतिक दृष्टीकोन ह्या दोन गोष्टींवर
विचार करण्याचा प्रयत्न केल्यास,त्या दोन्ही गोष्टी एक कृष्णविवरं आहेत,असं भासतं.असं मला वाटतं.
मला असं वाटतं की,ज्याला काही अर्थ नाही त्यात अर्थ निर्माण करण्यात आपण ओढले जातो.ब्ल्याक होल मधे गेल्यासारखं.आपण
निसर्गामध्ये, कधी कधी स्वतःमध्येही, अर्थ शोधू
पाहतो.आणि असं करत असताना एक वेळ
अशी येते की,अर्थ पाहणं कठीण होतं, जणू
कृष्णविवरांत पाहिल्यासारखं होतं.
मृत्यू म्हणजे काय हे शोधत असतांना, मृत्युनंतर पूढे काय होतं, ह्यात शोध घेण्याचा प्रयत्नात, काहीही उलगडा होत नसल्याने, पूढे फक्त अंधार दिसतो,ब्ल्याक होल दिसतं.
आपण ज्या गोष्टींना स्पर्श करू शकतो, ज्या गोष्टी पाहू शकतो त्यावर आपला विश्वास असतो.
पण जर आपण आंधळे असतो,आपली स्पर्शाची जाणीव हरवली असती तर या वास्तवात असलेल्या गोष्टी, वास्तवात नाहीत असं आपण म्हणू शकलो असतो का?
जे काही अस्तित्वात आहे ते अशावेळी नाही असं म्हणणं कितपत योग्य होईल? पण आपल्याला
उदास होऊन कसं चालेल?निराश होऊन कसं चालेल?
निसर्गाने माणसाला विचारशक्ती दिली असल्याने
त्या शक्तीचा वापर करून,जसजसा प्रकाश कृष्णविवरांत पूढे जात राहिल,तसा त्या विवरातला अंधार कमी होत जाईल, आणि
माणसाची विचारशक्ती प्रगती करून,ब्रम्हांडाचा
उलगडा करत राहिल, असं मला वाटतं.”
प्रो. पोंक्षे पूढे म्हणाले,
“ब्रम्हांड पसरत जात आहे.त्याचा पसरण्याचा अंत कधी होईल ह्याची कल्पना करणं अशक्य
आहे.त्या एका प्रचंड खदखदणाऱ्या जळत्या गोळ्याचा
स्पोट झाला,आणि हे ब्रम्हांड निर्माण झालं. आणि ते पसरत चाललेलं आहे.लाखो सूर्यमाला
निर्माण झाल्या आणि आपली त्यातली एक सूर्यमाला आहे.मनुष्याच्या कल्पनाशक्तीच्या
फार पलीकडे गेलेली ही घटना आहे.आपल्या
जवळ असलेल्या साधन सामग्रीतून, आणि वेळोवेळी नवीन साधनसामग्री निर्माण करून
गेली अनेक वर्षे आपण जमेल तेव्हढा ह्या ब्रम्हांडाचा उलगडा करण्याची पराकाष्ठा करीत
अहो. आणि हे असं करताना एक एकदा अशी
वेळ येते की,बस झालं,हात टेकावेशे वाटतात.
पण परत एखाद्याच्या मेंदूत एखादी सणक येते
आणि नखा एव्हडी भर तो त्यात टाकतो.”
प्रो पोंक्ष्यांचे मी आभार मानले
प्रतिक्रिया
8 May 2024 - 12:28 pm | भागो
तो आधार असा आहे की,प्रकाशाचा वेग अपूरा
पडल्याने, प्रकाश शोषला जात असल्याचे आपण पाहू शकतो.तसं नसतं आणि प्रचंड
वेगाने प्रकाश गेला असता तर सर्व प्रकाशमय दिसलं असतं, आणि अंधार दिसला नसता, म्हणजेच कृष्णविवर दिसलं नसतं,ब्ल्याक होल दिसलं नसतं.जिथे काळोख असतो तिथे प्रकाश
नसतो, हे समजण्यासाठी एव्हढी ही साधी बाब आहे.>>>प्रो पोन्क्षे याना माझे दंडवत पोचते करावे, ही विनंती.
8 May 2024 - 1:50 pm | गवि
मिसळपाववर देखील एक अदृश्य ब्लॅक होल उर्फ कृष्णविवर आहे. ते नीलविवर देखील असू शकेल. ते अदृश्य असले तरी त्याचे अस्तित्व मात्र जाणवते. त्या विवराच्या दिशेने जाऊ लागल्यास अनेक संकेत मिळतात. पण त्याच्या अगदी मुखाशी , किंवा टोकाशी कोणी पोचल्यास मात्र ते शक्तिशाली कृष्णविवर आधी प्रतिसाद, धागे आणि कधी कधी सदस्यआयडी यांना गिळंकृत करते. असे निरीक्षणातून शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे.
;-)
8 May 2024 - 1:53 pm | अमरेंद्र बाहुबली
मी दोनदाव बाहेर आलोय त्या कृष्णविवराच्या :)
8 May 2024 - 7:41 pm | श्रीकृष्ण सामंत
तुलना आवडली.