तुझ्या कप्पाळीचे बिंब
भासे मध्यान्हीचा भानू
लल्लाटीच्या लाटा बघुनी
'उन्हाळी', लागते गं जानू
नाही गंधार कोमलं,
करपले मन नुस्ताच विषाद
नाच नाचता नाचता
आता धपापतो ऊर
जुनेरले नाते आपुले
आता कुठवरं पाळू
वयमान पाऊणशे अवघे,
आता तरी नको छळू
प्रारब्धाचा खेळं
विळ्या भोपळ्याचे नाते
दिनरात अशी साथ
कधी सरेल जन्मठेपेचा काळं?
प्रतिक्रिया
7 Mar 2024 - 6:36 pm | राजेंद्र मेहेंदळे
लल्लाटीच्या लाटा बघुनी
'उन्हाळी', लागते गं जानू---हाहाहा
"जुनेरले" शब्दाने धुमाकूळ घातलाय जणु
9 Mar 2024 - 2:00 pm | प्राची अश्विनी
:):)
22 Mar 2024 - 5:48 pm | कुमार१
उत्तम.