विहंग तो विहरता झाला...

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जे न देखे रवी...
20 Dec 2008 - 12:15 pm

विहंग तो विहरता झाला...
===========================
.
.
तडफडला फडफडला पक्षी
जीवाकांताने कळवळला..
साद घातली काळाला
ने.. ने.. मजसी वदला..
.
खुरडत खुरडत सरपटला
भाजला.. सोलवटला..
प्राणासहीत निश्चल पडला
वेदनांनी पिळवटला..!
.
मंद मंद धुगधूग जिवात..
जमले कावळे टोचण्या!
घाबरला.. थरथरला.. हालला..!
बळ एकवटून फडफडला..
.
जागच्या जागी फरफटला..
खाल्ल्या दोन-चार गटांगळ्या..!
ठुसठूसत्या पसरून पंखांना
विहंग तो विहरता झाला...
.
.
===========================
स्वाती फडणीस ......................... ०१-०४-०७

कविताप्रकटनप्रतिभा

प्रतिक्रिया

जयेश माधव's picture

20 Dec 2008 - 4:20 pm | जयेश माधव

जयेश माधव

मातीत ते पसरले अतीरम्य प॑ख
केले वरी उदर पा॑डुर निश्कल॑क
या भा.रा.ता॑बे या॑च्या ओळी आठवल्या.
सु॑दर प्रयत्न!!

चतुरंग's picture

20 Dec 2008 - 7:19 pm | चतुरंग

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

ही कविता ना.वा.टिळक ह्यांची आहे (भा.रा.तांब्यांची नव्हे.)

चतुरंग

स्वाती फडणीस's picture

20 Dec 2008 - 6:33 pm | स्वाती फडणीस

:)

साखरांबा's picture

20 Dec 2008 - 6:39 pm | साखरांबा

काय हे भीषण काव्य, वाचून शहारा आला. @)
अयाईईईई, :O
स्वाती, काहीतरी प्रेम कविता वैगरे लिही फर्मास. >:D<
केवळ सुंदर ललनांचा,
साखरांबा

प्राजु's picture

20 Dec 2008 - 10:46 pm | प्राजु

ना.वा टिळकांची कविता आठवली.. "पक्षिणी" ना??
कविता छान..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/