विचित्र स्वप्न: स्वप्नात आली ती आणि...

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
2 Jan 2024 - 3:48 pm

(काही सत्य काही कल्पना)

रात्रीचे स्वप्न:

११वी बोर्डाचा रिझल्ट लागला आणि तो पाहण्यासाठी मी शाळेत गेलो. निशा शर्मा नितीनच्या कारला टेकून उभी होती. पंजाबी असली तरी मराठमोळ्या मुली सारखी सडपातळ, सुबक ठेंगणी होती. तिचे मोठे पाणीदार डोळ्यांनी कुणालाही घायाळ करण्यास समर्थ होते. वर्गातील सर्वच मुले तिच्यावर लाईन मारण्याचा प्रयत्न करत असे. पण ती कुणालाही दाद द्यायची नाही. माझे लक्ष कधीच तिच्याकडे गेले नाही. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने प्रेम-बिन सारखे विचार कधीच मनात आले नाही. मला पाहताच तिने हाय केले. मीही तिला "हाय करत विचारले, निशा कशी आहेस, नितीन दिसत नाही, मार्कशीट घ्यायला गेला आहे का". ती उतरली, नितीन, अशोक सुरेंद्र आणि मंजू ही आलेली आहे. मार्कशीट इत्यादी सोमवारी मिळणार आहे. तसा बोर्डच ऑफिस बाहेर लागलेला आहे. मी: "मग ते कुठे आहेत". ती म्हणाली, ऑफिसमध्ये थोडे गप्पा मारत आहे. आता येतीलच. हो एक सांगायचे राहिले, विवेक मी दिल्ली सोडून जात आहे, पण मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. अडखळत ती कसेबसे म्हणाली, विवेक तू मला आवडतो. खरेतर तिचे ते गोड शब्द ऐकून मीही मनात सुखावलो होतो, पण काय बोलावे कळले नाही. एक तर घरची परिस्थिती आणि दुसरे त्यावेळी स्वतःच्या पायावर उभी राहण्याची औकात ही नव्हती. मी काहीच बोललो नाही. फक्त मनाला बेचैन करणारी शांतता .... तेवढ्यात मागून नितीनच्या आवाज आला, विवेक तू पण आला आहेस, काही फायदा नाही. थोड्यावेळ गप्पा मारल्यानंतर मी सर्वांना म्हणालो माझे घर जवळ आहे. घरी जाऊन थोडा चहा नाश्ता घेऊ, काय माहित, पुन्हा आपली कधी भेट होईल की नाही. अशोक, नितीन सोबत कारच्या पुढच्या सीटवर बसला. आम्ही चौघ मंजू निशा अशोक आणि मी कसेबसे एकमेकांना चिकटून मागच्या सीटवर बसलो. सडपातळ असल्याने निशा आणि मी मध्ये होतो. गाडी सुरू झाली. काही वेळाने निशाने माझा हात तिच्या हातात घेतला मी तिच्याकडे बघितले. तिच्या मोठ्या डोळ्यांत साठलेले अश्रू मला स्पष्ट दिसत होते. मी डोळे बंद केले.

साला सो गया क्या, तेरा घर आ गया है. नितीनच्या आवाजाने तंद्रा भंगली. गाडी माझ्या उत्तम नगर येथील घरासमोर थांबलेली होती. मी गाडीतून उतरलो, घरात शिरलो आणि सोफ्यावर पसरलो. समोर बघितले तर आम्हा सर्वांची साठी उलटलेली होती. पण निशा काही दिसली नाही. मी मंजुला विचारले निशा, कुठे राहिली. ती माझ्याकडे पाहत ती म्हणाली तुला माहित नाही. निशा या जगात नाही. मी काहीच बोललो नाही. गप्पा गोष्टी सुरू झाल्या सौ.चहा घेऊन आली. चहाचे कप पहात मंजू म्हणाली भाभीजी से कहो एक कप चाय और लाए, निशा को चाय पीने की इच्छा हो रही है.

मी दचकलो, ताडकन डोळे उघडले. दिल्लीच्या कुडकुडत्या थंडीत ही कपाळावर घाम आलेला होता. अचानक सौ. झोपेत फुटपटलली "इथे काय करते आहे, दूर हो" काय झाले मी विचारले, सौ. ने उशीच्या शेजारी ठेवलेला मोबाईल उचलला, बापरे साडे पाच वाजले. सौ. पटकन उठली. तिने पाण्याची मोटार लावली. आमच्या भागात पाणी सकाळी चार ते सहा साडेसहा पर्यंत येते.

सकाळी चहा पिता-पिता मी तिला झोपेत पुटपुटण्याबाबत विचारले. ती म्हणाली बहुतेक स्वप्न बघितले होते. पण आता आठवत नाही. आज सकाळी पूजा करताना तिने दिव्या सोबत धूपबत्ती ही लावली. देवघरातील धूपेचा सुगंध किमान तासभर घरात दरवळत राहतो. पण आज पूजा झाल्यावर धूपबत्ती घेऊन सौ. घरात सर्वत्र फिरली आणि शेवटी धूपबत्ती बेडरूम मध्ये आणून ठेवली. मी सौ.ला विचारले धूप बेडरूम मध्ये का ठेवली. आधीच खिडक्या दारे बंद आहेत. धूर रूम मध्ये भरून जाईल. ती म्हणाली बेडरूम मध्ये डास जास्त झाले आहेत, म्हणून इथे आणून ठेवली. जानेवारीच्या भयंकर थंडीत डास??? मी फक्त सौ. कडे बघत राहिलो पण काहीच बोलू शकलो नाही.

आज राहवले नाही, मंजुला फोन केला. तिला निशा बाबत विचारले. ती हसत म्हणाली, क्या बात है विवेक, लगता है पुरानी यादें ताजा हो गई है. काश हमें भी कोई ऐसे याद करता. "मंजू फिरकी घेऊ नकोस, सिरीयस बाब आहे". काल रात्री पाहिलेल्या स्वप्नाबाबत मी तिला सांगितले. ती म्हणाली विवेक, निशा जेव्हाही मला भेटायची तुझी विचारपूस करायची. तीन वर्षांपूर्वी शेवटची भेट झाली होती. त्यावेळी मी तिला तुझा नंबर देऊ का विचारले. त्यावर ती म्हणाली, नको. पण असे म्हणत असताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव आणि डोळ्यात साठलेले अश्रू बरेच काही सांगून गेले. बहुतेक ती तुला विसरु शकली नाही. तुला त्रास होऊ नये म्हणून मी कधी ही निशाचा उल्लेख तुझ्यासमोर केला नाही. ... कारोनात ती गेली. ..

आज दुपारी जेवल्यानंतर ही गोष्ट टंकताना मनात विचारांचे काहूर उठले. शाळा सोडून तब्बल ४६ वर्ष झाले. निशा नावाच्या मुलीची मला कधीच आठवण आली नाही. अचानक ती, तिच्या मृत्यूनंतर माझ्या स्वप्नात येते. कदाचित् ती सौ. च्या स्वप्नात ही आली असेल??? तिचा इरादा अर्धवट भंगलेल्या कहाणीची पुन्हा सुरुवात करायची तर नाही ना... आज रात्री मला झोप येणार का? ... ती आपल्या सोबत तर घेऊन नाही ना जाणार.... भिती वाटू लागली आहे. मनात विचार आला, सौ. ला दिलेल्या वचनांचे काय होईल. सौ. असे होऊ देणार नाही. उद्या काय होईल....

कथाआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

2 Jan 2024 - 5:06 pm | मुक्त विहारि

कथा आवडली

balasaheb's picture

5 Jan 2024 - 2:38 pm | balasaheb

खुप मस्त

विवेकपटाईत's picture

3 Jan 2024 - 5:33 pm | विवेकपटाईत

माझ्या वर्ग मित्राची प्रतिक्रिया
विवेक तुझी काल्पनिक कथा छान आहे पण थोडी यथार्थ पण वाटते. पात्राची नावे अगदी आपल्या ११ वी ग्रुप ची आहेत आणि आज पण ते सर्व माझ्या आणि तुझ्या संपर्कात आहेत. निशा फक्त कोणी नव्हती ते नाव बदलीचे वाटते. मी थोडा विचार केला पण करोना मधे आपली कुठली मैत्रीण गेली अजून समजले नाही. असो पण काल्पनिक असली तरी छान कथा आहे. त्यावेळी इतकी प्रेमाची भावना निर्माण होत होती हे मला कधीच नाही समजले कारण प्रेम आकर्षण हा शब्द मला जरा उशिरा समजला असं समजतो की मी आपल्या सर्वांमध्ये या बाबतीत फारच स्लो असेल. सुप्त भावना कधी कधी स्वप्नात येतात आणि बाहेर पडतात आणि मृत व्यक्ती सुध्दा त्यांची प्रेमाची जाणिव स्वप्नात करून जातात हे पण सत्य आहे. छान लिहलेस.

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Jan 2024 - 11:34 am | राजेंद्र मेहेंदळे
कर्नलतपस्वी's picture

4 Jan 2024 - 3:51 pm | कर्नलतपस्वी

पौगंडावस्थेत प्रवेश केल्यावर मुलांच्या शरीरात अनेक बदल होतात. त्याबदलातील एक बदल म्हणजे स्वप्नदोष.

याचा या कथेशी काय संबंध असावा!!!!!?

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Jan 2024 - 4:02 pm | राजेंद्र मेहेंदळे
राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Jan 2024 - 11:34 am | राजेंद्र मेहेंदळे
राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Jan 2024 - 4:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

त्यामुळे प्रतिसादाचा अर्थ बदलला :(

मस्करी करायला गेलो नी तोंडावर पडलो

सरिता बांदेकर's picture

3 Jan 2024 - 6:56 pm | सरिता बांदेकर

छान लिहीले आहे.खरंच असं झालं तर???

प्रचेतस's picture

3 Jan 2024 - 7:21 pm | प्रचेतस

लेखाचे शीर्षक बघून भलतेच काहीतरी वाटले पण लेख खूपच सात्विक निघाला.

गवि's picture

3 Jan 2024 - 11:59 pm | गवि

?? हे ना?? ;-)

https://www.misalpav.com/node/7723

प्रचेतस's picture

4 Jan 2024 - 8:36 am | प्रचेतस

=))
अगदी अगदी

अहिरावण's picture

3 Jan 2024 - 8:26 pm | अहिरावण

हे असं लिहित जा.. २०२४ मधे संघ, मोदी, दासबोध, निरुपण यांना सुट्टी द्या

धर्मराजमुटके's picture

3 Jan 2024 - 8:55 pm | धर्मराजमुटके

क्रुप्या बिनती आहे की २०२४ मधे बोलू द्या. नंतर ५ वर्ष नाही बोलले तरी चालेल :)

विवेकपटाईत's picture

4 Jan 2024 - 8:29 am | विवेकपटाईत

हा! हा! हा! .. मोदीजी तर पुरुषोत्तम अवतार आहेत, मी काय लिहिणार. दासबोध समजणाऱ्या भाषेत नक्की लिहणार.

बाकी हृदयाच्या सर्जरी नंतर माझी एक सहकर्मी नेहमी म्हणायची पटाईत सर,तुम्ही किमान चार मुलींचे हृदय तोडले असतील किंवा चारींनी तुमचे.म्हणून चार नसा बदलाव्या लागल्या. किमान तीन कथा अजून लिहाव्या लागतील.

मुक्त विहारि's picture

6 Jan 2024 - 2:23 pm | मुक्त विहारि

सहमत आहे.

माझे मत तरी, भाजपलाच...

Bhakti's picture

3 Jan 2024 - 8:47 pm | Bhakti

म्हणूनच नातं जुनं असो वा नवं बोलायची संधी मिळाली की बोलायचं,नाहीतर ती नाती स्वप्नं होतात.

विवेकपटाईत's picture

4 Jan 2024 - 8:33 am | विवेकपटाईत

स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नका अवेळी...

तर मोकलाया दाही दिशा ची बरोबरी होऊ शकेल. तिथे माझ्यामते फक्त शुद्ध लेखनाची वाट लागली होती.

विवेकपटाईत's picture

6 Jan 2024 - 1:42 pm | विवेकपटाईत

आम्हीं शुद्ध लेखनाची पर्वा करत नाही.