एक रुबाई किंवा चारोळी

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
14 Dec 2008 - 11:28 am

मी रचलेल्या ह्या चार ओळी चारोळीमध्ये मोडतील कि रुबाईमध्ये ते माझ्या लक्षात येत नाही.

पापणी लवली तरीही
कळते डोळ्यामधली भाषा
कळते मज ते रुप गोजिरे
पदर असो वा गोषा

चारोळ्याकविता

प्रतिक्रिया

जितुवाघ's picture

14 Dec 2008 - 10:30 pm | जितुवाघ

म्हन्जे काय वाइत नजर म्ह्ननाय्चि

धनंजय's picture

14 Dec 2008 - 10:33 pm | धनंजय

चारोळीमध्ये

अभिरत भिरभि-या's picture

15 Dec 2008 - 3:11 pm | अभिरत भिरभि-या

>> चार ओळी चारोळीमध्ये मोडतील कि रुबाईमध्ये ते माझ्या लक्षात येत नाही.

काहीही असोत या चार ओळी झकास आहेत

(आपला पंखा )
अभिरत

मदनबाण's picture

15 Dec 2008 - 3:13 pm | मदनबाण

हे रुबाई काय असतं राव ??
(अडाणी)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

सुनील's picture

15 Dec 2008 - 3:28 pm | सुनील

चारोळी आणि रुबाई दोन्ही जरी चार ओळींच्याच असल्या तरी त्यात काही भेद आहेत. चारोळीत दुसर्‍या आणि चौथ्या ओळींत यमक साधलेले असते तर, रुबाईत पहिल्या, दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक असते. याखेरिज, रुबाईतील चौथी ओळ ही एकतर पहिल्या तीन ओळींची सार म्हणून यावी किंवा एक धक्कादायक कलाटणी म्हणून यावी अशी अपेक्षा असते.

उमर खय्याम याने मूळ पर्शियनमध्ये लिहिलेल्या रुबायांचे अनेक भाषांत भाषांतरे झालेली आहेत.

वरील ओळी ह्या चारोळी या प्रकारात येतील.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मदनबाण's picture

15 Dec 2008 - 3:31 pm | मदनबाण

सुनीलराव या माहिती बद्दल धन्यु.. :)

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

लिखाळ's picture

15 Dec 2008 - 3:34 pm | लिखाळ

>> रुबाईत पहिल्या, दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक असते. <<
आभाळ झिरपते भरलेल्या माठात
हा निळा माठ बघ भरला आभाळात
आभाळ पलिकडे माठ फुटे हा इकडे
हा वेडा जमवी आभाळाचे तुकडे

रॉय किणिकरांची रुबाई आहे. यमक १ आणि २ ओळीचे, २ आणि ४ ओळीचे दिसते.
त्यांच्या इतरही रुबायांत तसेच दिसते.

या बद्द्ल अधिक जाणून घ्यायला उत्सुक.
-- लिखाळ.

सुनील's picture

15 Dec 2008 - 3:44 pm | सुनील

रॉय किणीकरांचे ठाऊक नाही, तेही थोरच. पण मी उमर खय्यामच्या (इंग्लीशमध्ये भाषांतरीत झालेल्या, मला पर्शियन येत नाही) रुबायांवरून अनुमान काढले होते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लिखाळ's picture

15 Dec 2008 - 3:47 pm | लिखाळ

बर बर.. मला एकदम आठ्वले म्हणून लिहिले. रुबाया-रुबायांत फरक असेलही.
उत्तराबद्दल आभार.
-- लिखाळ.

यमक ओळ १, २ आणि ४ मधे
ह्या नियमाने वरचे लिखाण चारोळीत बसते. चारोळी चांगली झाली आहे.

रुबाई उदा.
वही वारूणी जो थी सागर मथकर निकली अब हाला,
रंभा की संतान जगत में कहलाती 'साकीबाला',
देव अदेव जिसे ले आए, संत महंत मिटा देंगे!
किसमें कितना दम खम, इसको खूब समझती मधुशाला ।।५६।|

भावानुवाद

सागरमंथन करुन निघाली वारुणी बनली मग हाला
रंभेची पुत्रीच म्हणवते ह्या जगती साकीबाला
सुरासुरांनी जिला आणली, नष्ट काय तिज संत करी!
कोण किती आहे बलशाली खरिच जाणते मधुशाला ॥५६॥

चतुरंग

मीनल's picture

17 Dec 2008 - 2:23 am | मीनल

माहिती बद्दल धन्यवाद.

मीनल.

अप्पासाहेब's picture

17 Dec 2008 - 10:10 am | अप्पासाहेब

ही धुंद बेवडी वस्ती भर्भरुन वाहु दे प्याला
ईतक्यात गेली कुठे कळेना ती मस्त बारबाला
चालेले आता कोणीही उर्वशी मेनका रंभा
फुगा दर्पाळ देशी वा असो विदेशी खंबा

लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते

विसोबा खेचर's picture

17 Dec 2008 - 12:50 pm | विसोबा खेचर

छान आहे चारोळी..