बापू..

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
11 Dec 2008 - 9:03 am

तुमच्या देशी श्वासही आता दुष्कर बापू.
आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ?

काट्यांतुनही गुलाब वेचा, तुम्ही म्हणता
व्यक्ती नाही, वृत्ती ठेचा, तुम्ही म्हणता
पण ते नाहीत मानव केवळ फत्तर बापू..!

तुम्हास केवळ नोटेवरती स्मरती सारे.
तुमची नावे घेऊन राडे करती सारे.
नाही तुम्ही, नशीब हे बलवत्तर बापू..!
आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ?

नव्या युगी या कसे चालतील जुने दाखले.
अहिंसक आम्ही आहो दुर्बल जगा वाटले.
मुजोर झाले मुजाहिदीन अन लष्कर बापू..!
आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ?

अस्तित्वाचे अग्नीकुंड आहुती मागते.
क्रांती आणि स्वातंत्र्यास्तव रक्त लागते.
कुठवर पुरेल गांधीगिरीचे अत्तर बापू ?
आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ?

प्राणही गेला तरी अता बेहत्तर बापू.
आम्हीच आता शोधू आमचे उत्तर बापू.

-- अभिजीत दाते

कविताप्रकटनविचार

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

11 Dec 2008 - 9:16 am | चतुरंग

मस्त रे अभिजिता एकदम सहज काव्य! जमेश!!

चतुरंग

विकास's picture

11 Dec 2008 - 9:24 am | विकास

नेत्यांची या देशभक्ती मी कशी मापू ?
आहेत नुसते साले सगळे खिसेकापू !

विसोबा खेचर's picture

11 Dec 2008 - 9:28 am | विसोबा खेचर

अतिशय सुंदर कविता...!

भडकमकर मास्तर's picture

11 Dec 2008 - 9:28 am | भडकमकर मास्तर

मुजोर झाले मुजाहिदीन अन लष्कर बापू..!

मुजोर लष्कर ?
कोणत्या देशातले ?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विकास's picture

11 Dec 2008 - 9:32 am | विकास

मुजोर लष्कर ?

लष्करे तोयबाला "लष्कर" असे म्हणतात.

राघव's picture

11 Dec 2008 - 10:14 am | राघव

लय भारी! चालु देत!!
मुमुक्षु

मुक्तसुनीत's picture

11 Dec 2008 - 10:22 am | मुक्तसुनीत

कुठल्याही विचारसरणीप्रमाणे , गांधींचा मार्ग हा सुद्धा सार्वकालिक आणि त्रिकालाबाधित असा असणे अशक्य आहे. त्यान्नी आपल्या देशाला "दे दी हमे आझादी " ही जितकी अतिशयोक्ति आहे तितकेच " आहे का या प्रश्नाला उत्तर तुमच्याकडे ?" असे म्हणणेसुद्धा काहीसे भोळसट वाटते.

विसोबा खेचर's picture

11 Dec 2008 - 11:23 am | विसोबा खेचर

अहो मुक्तराव,

पण एक निखळ काव्य म्हणून आनंद घ्यायला काय हरकत आहे? आपण तर सिरियस झालात!

असो,

आपला,
मोहनदास अभ्यंकर.

मुक्तसुनीत's picture

11 Dec 2008 - 11:25 am | मुक्तसुनीत

असे नेहमी होत नाही. नवीन सभासदांचे , त्यांच्या लिखाणाचे स्वागतही करायला हवे होते आणि मग आमचे जे काय मत ते सांगायला हवे होते. आमचे अंमळ चुकलेच.

मदनबाण's picture

11 Dec 2008 - 11:44 am | मदनबाण

अभिजीत मस्तच रे !!!

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -