डॉ वि ह सरांना आठवताना... भाग १

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
19 Nov 2021 - 11:30 pm

9

1

डॉ विश्वनाथ हरी कुलकर्णी हे कैलासवासी झाल्याची माहिती ग्रहांकित च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. दिवाळी अंक बाजारात जाऊन विकत घेऊन वाचणारे कमी होत आहेत. त्यातलाच मी एक. ज्योतिष तंत्र आणि मंत्रच्या दिवाळी अंकात मुखपृष्ठ कथा करायला रमल तज्ज्ञ चंद्रकांत दादा शेवाळे यांनी विनंती केली होती. 'श्रृंगेरीचे विद्याशंकर मंदिर परिसर' कथा प्रसिद्ध झाली म्हणून तो आणि ग्रहांकितचा दिवाळी अंक कॉम्पिमेंटरी म्हणून पोस्टाने मला मिळाले, तेंव्हा मला डॉ वि ह सर वयाच्या ८८व्या वर्षी २५ सप्टेंबर २०२१ रोजी गेल्याचे समजले.
मग त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या...
सन १९९८ चे साल होते मी तेंव्हा नगर रस्त्यावरील ९ बीआरडी (बेस रिपेअर डेपो) मधे पोस्टींगवर सीनियर अकौंट्स ऑफिसर म्हणून रुजू होतो.
'बाहेरून कोणाचा तरी फोन आला आहे. ते तुम्हाला भेटू इच्छितात. जोडून द्यायला तुम्ही हो म्हणालात तर लावून देतो'. हवाईदलातील खाक्यानुसार टेलिफोन एक्सचेंजकडून विचारणेला जसे उत्तर येईल तसे हो किंवा नाही ठरते. मी हो म्हणालो, 'मी, डॉ वि ह कुलकर्णी बोलत आहे. आपल्याकडून काही मदत हवी आहे. फार फार निराशा झाली आहे. कोणी माझ्या कामाला विचारात घेऊन माझ्या पत्रांना साधे पोचपत्र पाठवत नाहीत... तेही मिलिटरीच्या कार्यालयातून... तुम्ही माझ्या ओळखीच्यापैकी हवाईदलातील आहात. म्हणून तुम्हाला भेटायला आलो तर चालेल का हे विचारायला फोन केला आहे.
माझ्या डोळ्यासमोर खणखणीत आवाजात बोलणारे व्यक्तिमत्त्व उभे राहिले. हवाईदलातील एयर फोर्स स्कूलचे प्रिन्सिपॉल म्हणून ते रोस्ट्रंपवरून अ‍ॅन्युवल गॅदरींगचे उद्घाटन भाषण करत होते. निमंत्रित वरिष्ठ हवाईदलातील अधिकारी म्हणून मीही त्या फंक्शनला हजर होतो. नंतरच्या चहापानाच्या वेळी आम्ही जुजबी गोष्टी बोललो. ही माझी पहिलीच वेळ होती भेटीची.
ते नंतर रिटायर झाले. मी ही हलवारा विमानतळावर पोस्टींगला गेलो. बरीच वर्षे गेली. मीही रिटायर झाल्यावर पुण्यात सेटल झालो.
या दरम्यानच्या काळात मला नाडी ग्रंथांबद्दल आकर्षण निर्माण झाले. 'नाडी भविष्य थोतांड आहे' असे सिद्ध करण्यासाठी चंग बांधून मागे लागलो. नंतर मात्र मत परिवर्तन घडून ताडपट्ट्यातील लेखनातील बारकावे शोधायला सुरुवात केली. प्राचीनकाळापासून आपल्याला रामायण, महाभारत, भागवत ग्रंथाच्या माध्यमातून वाचनात येणाऱ्या अगस्त्य, वसिष्ठ, विश्वामित्र, काकभृशंडी, व्यास, महर्षींच्या नावाने तमिळ भाषेत ताडपट्टीच्या माध्यमातून सध्याच्या मानवतेला उपयोगी लेखन केले आहे. हे उमजले. त्या सर्वांबद्दल कृतज्ञता वाटायला लागली.
फोनवर डॉ वि ह कुलकर्णी बोलत होते. 'मी डाऊझिंग करतो हे तुम्हाला माहीत आहे. सध्याच्या परिस्थितीत काश्मिर आणि अन्य भागात बॉम्ब स्फोट घडवून आणले जात आहेत. सुरक्षाव्यवस्था वैतागून गेली आहे. जमिनीच्या खाली पुरलेले बॉम्ब स्फोट होऊन कुठूनही नागरिक व सुरक्षा दलाच्या जवानांना ठार केले जाते. यावर उपाय म्हणून मॅप डाऊझिंगकलेचा उपयोग होऊ शकतो. दुसर्‍या महायुद्धात डाऊझिंग करून जमिनीखालून पुरलेले बॉम्ब, पाय कचाट्यात धरणारे सापळे यांच्या शोधासाठी वापर केला जात होता. हे सांगणारा लेख मी वाचला. मिलिटरीच्या वेगवेगळ्या कार्यालयात पत्रे पाठवून मला देखिल मॅप डाऊझिंगकरून शोधायला संधी द्यावी म्हणून मागे लागलो होतो. पण कोणीही उत्तर देखील दिले नाही.
मला त्यांच्या सुरातून निराशा जाणवली.

४

मलाही कटू अनुभव आले होते. मी तर एकदा नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन एक निवेदन सादर केले होते. मात्र ते वाचून मलाच फैलावर घेतले गेले. 'तू स्वतःला अकौंट्स ब्रांचचा म्हणवतोस. तुला रूल पोझिशन माहिती नाही? एयर फोर्स ऑर्डर वाच' म्हणून ते चोपडे माझ्यासमोर फेकून सुंदर कटलरीमधून आलेल्या चहाची चव घालवली होती.
'सर या ऑर्डर्स आपण बनवलेल्या आहेत. त्यामुळे त्यात बदल होऊ शकतो'. माझ्या बोलण्याचा काहीही प्रभाव न पडून मी चहा अर्धवट सोडून परतलो होतो. नंतर मी म्हणत होतो तसे विचार चीफ ऑफ एयर स्टाफनी मांडले तेव्हा तेच अकौंट्स ब्रांचचे वरिष्ठ अधिकारी, त्यांना म्हणाले, 'बट सर, एयर फोर्स ऑर्डर परवानगी देत नाही तसे करायला'
'देन, चेंज द ऑर्डर' म्हणून चीफनी ऑर्डर दिली! तसे बदल घडून आले...
हे नंतर त्या ऑफिसमधे काम करणाऱ्या माझ्या मित्राने सांगितले होते. असो.
'वि ह सर, अहो तुमच्या पत्राला वाचायला आहे कोणाला वेळ? अशी पत्रे टोपलीची शान वाढवतात'. शिवाय डाऊझिंग वगैरे ऑकल्ट सायन्स म्हणून मानतात. अशा गोष्टी खाजगीत करायला चालतात. पण ते खरे मानून करत बसायला शक्य नाही.'
'खरे आहे आपले म्हणणे, म्हणून मी काही प्रयोग करून मग ठरवले जावे असे सुचवले होते.'
'सर सांगा काय करता येईल' ? म्हणून त्यांची निराशा कमी व्हावी म्हणून सुचवून पाहिले.
'आता तुम्ही पण असे म्हटल्यावर प्रश्नच संपला.' ते म्हणाले.
माझ्या समोर पडलेल्या फाईल्स, पेमेंटसाठी थांबून राहिलेले पाहून मी संभाषण आवरते घेतले. मी नंतर संपर्क करतो म्हणून इतर कामात गढलो. घरी आल्यावर, 'डाऊझिंगचा उपयोग करता आला तर किती छान होईल' असे वाटत वि ह सरांना संपर्क केला.
'सर मी सुचवू का? तुम्ही आणि मी आपण काही प्रयोग करून पाहूयात का'?
'काय करायचे ते बोला मी तयार आहे'. ते म्हणाले.
'तुम्ही म्हणता तसे आपण मॅप डाऊझिंग करून पाहूया'.
'विमानांना वाहतूकीला सोईचे म्हणून आमचे परेड ग्राऊंड सीमेंट ब्लॉक चौकोनाचे बनलेले असतात. तिथे मी एक वस्तू ठेवतो. ती वस्तू कुठे ठेवली आहे ते तुम्ही तुमच्या घरून डाऊझिंग करून सांगायचे. पाहूया किती बरोबर येते.'
'हो चालेल ना! मी तयार आहे. मी असे करतो की एक चौरस तक्ता कागदावर तयार करतो. त्याला उभ्या एक्स अ‍ॅक्सेस वर १,२,३,४ नंबर देऊ व आडव्या वाय एक्सेस वर A, B, C, D असे ग्रिड तयार होईल. त्या कागदावर मी डाऊझिंग करून तुम्ही ठेवलेल्या वस्तू कुठे आहेत ते सांगेन की बी २ मधे ती वस्तू आहे किंवा डी १ मधे दुसरी आहे असे डाऊझिंग सांगतेय. मग आपण ते तपासून किती बरोबर आले याची नोंद करून रेकॉर्ड तयार करू शकतो.

११

मला विह सरांच्या कल्पकतेची दाद द्यावी असे वाटले. ऑफिसात काम करणाऱ्या एका चुटपुटीत सार्जंटला स्कूटरवरून माझ्या मागे ये म्हणून मी ऑर्डर केली.
तो आणि मी टारमॅकवर गेलो. तिथल्या १५ फूटचौकोनाचे, ४ बाय ४ सीमेंटच्या ब्लॉकच्या सीमा मी सार्जंटला दाखवून ठरवून दिल्या.
'सर, मैं पूछूं के किस लिए कर रहे है?'
या लोकांना डाऊझिंग ते काय सांगितले तर माझ्यामागे चेष्टेचा विषय करतील म्हणून ते गुह्य ठेवून म्हटले की जो बोला वैसे कर. तू तुझी स्कूटर या पैकी एका चौकोनात ठेवायची. समज तू या सी ३ मधे लाव. मी परत जातो. तू इथेच थांब. मी परत येतो. मग पुन्हा एकदा स्कूटरची जागा बदलून ठेवूया.
'जी हां सर...'
मी ऑफिसात येऊन फोन वरून मॅप रीडींग करून सांगा म्हणून म्हटले. माझे ऑफिस नगर रोडवर. तिथून आत परेड ग्राऊंड २ किमी अंतरावर. वि ह सर राहायला रास्ता पेठेत. अपोलो टॉकीजच्या जवळ. आमच्यात नकाशा वर कमीत कमी ९ ते१० किमी आकाश अंतर आहे. म्हणून त्यांना सार्जंटची स्कूटर नेमकी कुठे ठेवली आहे हे समजणे अशक्य होते. नव्हे तशी समजू नये अशी आम्हास अपेक्षा होती.

३

फोनवर विह म्हणाले, 'तुम्हाला फोन करून कळवतो. सध्या माझ्यासमोर काही लोक समस्या सोडविण्यासाठी कन्सलटेशन करायला आलेत ते झाले की डाऊझिंग करून कळवतो.'
' मला बाहेरून फोन येईल तो मला लगेच लावून द्या' असे मी टेलिफोन एक्सचेंजला सांगून वाट बघत ऑफिसच्या कामात गढलो.
फोनची बेल वाजली. 'मी वि ह कुलकर्णी बोलतोय' असे नेहमीचे बोल ऐकून ते पुढे म्हणाले, डाऊझिंग सांगतेय की ती वस्तू सी ३ च्या जवळपास आहे. ती मोठी आहे. पण माणूस नाही. असे पेंडूलम फिरत सांगतो. आता सांगा कोणती वस्तू आहे? डाऊझिंग म्हणतेय ते बरोबर आहे का?'
'सर, ती वस्तू म्हणजे स्कूटर आहे. ती सी ३ पाशी होती. हा प्रयोग यशस्वी झाला आहे असे मला वाटते. आता आपण ती स्कूटर जागा बदलून पाहू काय उत्तर येते ते'.
तोवर त्या सार्जंटची स्वारी सॅल्युट मारून समोर आली.
' सर, टारमैकपर गर्मी से हालत बुरी हुई, पसीने छूट गये, वॉरंट ऑफिसरने दिया काम बाकी था. इसलिये वापिस आये हैं...! '
'अच्छा अच्छा, तुम काम पर जाओ' म्हणून मी त्याची बदली केली.
यावेळी मी माझी स्कूटर एका दुसर्‍या चौरसात लावली. तिकडून डॉ वि ह कुलकर्णी यांनी डाऊझिंग मधील दिलेले उत्तर बरोबर आहे असे लक्षात आले. नंतर मात्र अशा प्रकारे प्रयोग करून त्याची नोंद घ्यायला झाले नाही. माझी पोस्टींग झाली. ते दादरच्या घरात व्यस्त झाले.
ते मॅप डाऊझिंग तसेच राहिले...
पण तसे ते संपणार नव्हते... पुढच्या भागाची वाट पहा.

५

१०

मांडणीआस्वाद

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

20 Nov 2021 - 12:01 am | चित्रगुप्त

हा लेख वाचून बरेच वर्षांपूर्वी मी केलेले लंबकाच्या सहाय्याने भविष्यात डोकावण्याचे प्रयोग आठवले.

छान वाटले वाचून...
काही किस्से लिहावेत...
लंबक भविष्य कथनातून घोटाळे निर्माण व्हायची शक्यता असते...
परवानगीशिवाय आत येऊ नये असे तंबी वजा लिहिलेली पाटी लंबक कथनकारांना उपयोगी पडते. आतल्या खोलीत सलवार, साडीतील एकटे ग्राहक असेल तर आपली पत्नी दर ५ मिनिटांनी प्यायला पाण्याचे ग्लास का आणते याचे उत्तर कदाचित लंबकाला देखील पेचात पाडते...

मुक्त विहारि's picture

20 Nov 2021 - 1:35 pm | मुक्त विहारि

"आतल्या खोलीत सलवार, साडीतील एकटे ग्राहक असेल तर आपली पत्नी दर ५ मिनिटांनी प्यायला पाण्याचे ग्लास का आणते याचे उत्तर कदाचित लंबकाला देखील पेचात पाडते..."

------

घर घर की कहानी

मुक्त विहारि's picture

20 Nov 2021 - 1:33 pm | मुक्त विहारि

वाचत आहे

उत्कंठा ताणली गेली आहे

मुक्त विहारि's picture

20 Nov 2021 - 1:47 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

मी केलेल्या प्रयोगांवर १० सप्टेंबर २०११ या दिवशी मिपावर 'एक वजनदार धागा' प्रकाशित केला होता. जिज्ञासूंनी अवश्य बघावा.
https://www.misalpav.com/node/19105