एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ

धनंजय's picture
धनंजय in काथ्याकूट
3 Dec 2008 - 7:24 am
गाभा: 

येथे श्री कलंत्री यांनी चालू केलेल्या गांधीवादी लेखमालेच्या अनुषंगाने मी हा प्रतिसाद (वेगळे चर्चासत्र म्हणून) देत आहे.

श्री. कलंत्री यांनी सुचवलेली कार्यवाही मला पटलेली नाही, पण मी येथे पूर्णपणे त्यांच्या समर्थनार्थ लिहिणार आहे.

या संकेतस्थळावर श्रद्धेच्या महतीबद्दल गप्पा मारणार्‍यांनी एका अश्रद्ध माणसाकडून हे ऐकून घ्यावे - श्री कलंत्री यांची श्रद्धा धाडसी आहे, आणि नि:शस्त्र लोकांना गोळ्या घालणार्‍या श्रद्धावानांसारखी भ्याड नाही.

श्री. कलंत्री यांना "तुम्ही अतिरेक्यांचे मतपरिवर्तन करायला जा" म्हणणारे लोक स्वतः काय करू इच्छितात? त्यांनी स्वतः वर्दी चढवलेली आहे? त्यांना स्वतःला उभारायचे आहे कुठले प्रति-लष्कर-ए-तैयबा आणि जायचे आहे होड्या घेऊन पाकिस्तानात त्या अतिरेक्यांना मारायला? छे - नव्हे, भारताच्या लष्कराच्या खांद्यावरून बंदुका झाडताना बहुधा त्यांची निशाणी त्यांच्या नावडत्या पक्षाचे भारतातले सरकार आहे.

श्री. कलंत्री यांनी माणुसकीबद्दल श्रद्धा दाखवली आहे. "श्रद्धा-श्रद्धा" स्तोम माजवणार्‍यांनी त्यांना समजून तरी घ्यावे. मला त्यांचा कार्यक्रम पटला नाही तरी माणुसकी दिसते. मला हा "वेताळाचा हट्ट" वाटत नाही. अतिरेक्यांपेक्षाही "नि:शब्द करणारा" वार वाटत नाही.

श्री. कलंत्री माझ्यासारखे इंटर्नेटवरून टोपणनावाच्या मागे सुरक्षित नाहीत. (माझी पूर्ण ओळख पुष्कळांना आहे, ही बाब अलाहिदा.) मिसळपावाच्या अनेक सदस्यांना ते भेटलेले आहेत. त्यांच्या शिव्या प्रत्यक्ष झेलण्याची, मिसळपावाच्या सदस्यांपैकी "नडगी-फोड" तरुणांकडून धक्काबुक्की सहन करण्याची शक्यता ते जाणतात. (एवढे असून कट्टा भरवण्यात, अन्य सदस्यांना सामोरे जाण्यास ते पुढाकार घेत आहेत.)

या प्रकारचे नैतिक धैर्य माझ्यात नाही. पण ज्या माणसात तसे धैर्य आहे, त्याच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. अशी माणसे स्वतंत्रपणे वावरू शकावीत हे मिसळपावाचे सौभाग्य आहे. यासाठी भारत स्वतंत्र आहे - अनुशासनपर्वात बांधलेला नाही.

एकनाथांची अशी कथा आहे, की एकदा गोदावरीच्या घाटावरती स्नान केल्यानंतर कोण्या मुसलमानाने त्यांच्यावर थुंकले. एकनाथांनी पुन्हा स्नान केले, पुन्हा तो पाजी माणूस अंगावर थुंकला - असे शंभर वेळा झाले. शेवटी तो माणूस शरमून म्हणाला - माझे चुकले. तर एकनाथ म्हणाले, "छे, छे, तुझ्यामुळे माझी शंभर गोदास्नाने झालीत."

माझा सल्ला मागितला असता, तर वागणे एकनाथांपेक्षा वेगळे असावे. अशा परिस्थितीत माझे वागणे वेगळे असेलच. पण म्हणून एकनाथांना मी कमी लेखू लागलो, तर थू माझ्यावर. एकनाथांचे कुठलेही साहित्य "अतिरेकाइतके थंड करणारे" मानू लागलो, एकनाथांना "विक्रमाचा वेताळ" मानू लागलो तर ती माझ्या लहान बुद्धीची मला कोणी जाणीव करून द्यावी.

श्री. कलंत्री हे बहुधा स्वत:ला एकनाथ मानत नाहीत. पण यांची माणूसकी, त्यांची विचारशक्ती कायम राहावी; त्यांच्या विचारांना विरोध करताना, त्यांच्या विचारात सत्याचे काही बीज असू शकेल ही मला जाणीव राहावी; म्हणून मी त्यांचे समर्थन करत आहे.

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

3 Dec 2008 - 7:30 am | प्रियाली

कलंत्री यांचे लेख वर वर वाचले. (व्यग्रतेमुळे आणि मिपावर वाढलेल्या प्रचंड ट्रॅफिकमुळे काहीही धड वाचता येत नाही) त्यांच्या पहिल्याच लेखात गांधीवादाने हा प्रश्न सुटणार नाही हे मी सांगितले होते. त्यांच्या प्रत्येक लेखावर आलेले प्रतिसाद आणि त्यातील भाषा पाहता आणि तरीही कलंत्री यांनी तीन लेख टाकण्याचे केलेले धाडस पाहता मला त्यांचे अतिशय कौतुक वाटते.

कलंत्री यांचे प्रयत्न भले फोल ठरतील, या वेळी ते उपयोगी नसतील तरीही त्यांचे प्रयत्न प्रामाणिक वाटले.

गेल्या चार दिवसात माझ्यासकट ज्या सर्वांनी बोंबाबोंब केली त्यांच्यापेक्षाही कलंत्री यांच्या भावना सच्च्या वाटल्या.

श्री. कलंत्री हे बहुधा स्वत:ला एकनाथ मानत नाहीत. पण यांची माणूसकी, त्यांची विचारशक्ती कायम राहावी; त्यांच्या विचारांना विरोध करताना, त्यांच्या विचारात सत्याचे काही बीज असू शकेल ही मला जाणीव राहावी; म्हणून मी त्यांचे समर्थन करत आहे.

+१

विसोबा खेचर's picture

3 Dec 2008 - 8:09 am | विसोबा खेचर

कलंत्री यांचे प्रयत्न भले फोल ठरतील, या वेळी ते उपयोगी नसतील तरीही त्यांचे प्रयत्न प्रामाणिक वाटले.

हेच म्हणतो..! त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कधीही शंका नव्हती आणि नाही. मागेही कुठल्याश्या प्रतिसादात मी हेच म्हटले होते.

प्रश्न आहे तो गांधीवादाची जी एक जबरदस्त नशा त्यांना चढली आहे त्याचा! गांधीवादात प्रामुख्याने येतो तो अहिंसावाद. आणि नुकत्याच घडून गेलेल्या मुंबईतील दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर गांधीवादाचे आणि पर्यायाने अहिंसावादाचे गोडवे गाणारे लेख लिहिणे म्हणजे साळसकर, करकरे, मेजर उन्नीकृष्णन यांच्यासारख्यांच्या बलिदानाची ती एक क्रूर चेष्टा आहे असे मी समजतो. सध्या शब्दात बोलायचे झाले तर ह्या लेखमालेने त्यांचे बलिदान अक्षरश: चुत्त्यात काढले आहे!

धनंजयच्या प्रस्तुत लेखात कलंत्रींचे कौतुक आणि प्रामाणिकपणा हे दोन मुद्दे आहेत. वर म्हटल्याप्रमाणे त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल किंवा कट्टा करून मिपातर्फे काही एक काम हाती घेण्याबद्दल त्यांच्याबदल नक्कीच आदर आहे परंतु मिपावर ही जी त्यांनी लेखमाला चालवली आहे तीबद्दल मला व्यक्तिश: शरम वाटते!

गीता, आध्यात्म ह्या जश्या न पेलणार्‍या गोळ्या, तशीच गांधीवाद हीदेखील एक न पेलणारी भांगेची गोळी! उद्या रस्त्यातून जातांना जर कुणी माझ्या आईबहिणीवर अश्लील शेरा मारला तर मी गप्प बसायचे की फाडकन त्याच्या एक कानशीलात मारून माझ्या आईबहिणाच सन्मान जपायचा याचं एकदा कुणीही अहिंसावाद्यानी उत्तर द्यावं म्हणजे मग मी गांधीवादाबद्दल पुढे बोलायला तयार आहे!

असो,

तात्या.

धम्मकलाडू's picture

3 Dec 2008 - 12:12 pm | धम्मकलाडू

प्रश्न आहे तो गांधीवादाची जी एक जबरदस्त नशा त्यांना चढली आहे त्याचा! गांधीवादात प्रामुख्याने येतो तो अहिंसावाद. आणि नुकत्याच घडून गेलेल्या मुंबईतील दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर गांधीवादाचे आणि पर्यायाने अहिंसावादाचे गोडवे गाणारे लेख लिहिणे म्हणजे साळसकर, करकरे, मेजर उन्नीकृष्णन यांच्यासारख्यांच्या बलिदानाची ती एक क्रूर चेष्टा आहे असे मी समजतो. सध्या शब्दात बोलायचे झाले तर ह्या लेखमालेने त्यांचे बलिदान अक्षरश: चुत्त्यात काढले आहे!

धनंजयच्या प्रस्तुत लेखात कलंत्रींचे कौतुक आणि प्रामाणिकपणा हे दोन मुद्दे आहेत. वर म्हटल्याप्रमाणे त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल किंवा कट्टा करून मिपातर्फे काही एक काम हाती घेण्याबद्दल त्यांच्याबदल नक्कीच आदर आहे परंतु मिपावर ही जी त्यांनी लेखमाला चालवली आहे तीबद्दल मला व्यक्तिश: शरम वाटते!

गीता, आध्यात्म ह्या जश्या न पेलणार्‍या गोळ्या, तशीच गांधीवाद हीदेखील एक न पेलणारी भांगेची गोळी! उद्या रस्त्यातून जातांना जर कुणी माझ्या आईबहिणीवर अश्लील शेरा मारला तर मी गप्प बसायचे की फाडकन त्याच्या एक कानशीलात मारून माझ्या आईबहिणाच सन्मान जपायचा याचं एकदा कुणीही अहिंसावाद्यानी उत्तर द्यावं म्हणजे मग मी गांधीवादाबद्दल पुढे बोलायला तयार आहे!

आदरणीय तात्या अभ्यंकरांचा गांधीवादाचा अभ्यास किती आहे हे या प्रतिसादातून अगदी ठळकपणे दिसते आहे!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आजानुकर्ण's picture

3 Dec 2008 - 7:32 am | आजानुकर्ण

मीदेखील त्यांचे समर्थन करत आहे. त्यांच्या पहिल्या दोन लेखातील व शेवटच्या लेखातील काही मते पटलेली नसली तरी त्यांचे अनेक मार्ग हे शांततामय सहजीवनाचा पुरस्कार करणारे आहेत.

कोलबेर's picture

3 Dec 2008 - 7:43 am | कोलबेर

आपल्याच मनातील विचार आपल्यापेक्षाही कितीतरी प्रभावीपणे मांडताना धनंजय दिसतात. त्याचाच पुन्हा एकवार प्रत्यय आला.

या प्रकारचे नैतिक धैर्य माझ्यात नाही. पण ज्या माणसात तसे धैर्य आहे, त्याच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. अशी माणसे स्वतंत्रपणे वावरू शकावीत हे मिसळपावाचे सौभाग्य आहे. यासाठी भारत स्वतंत्र आहे - अनुशासनपर्वात बांधलेला नाही.

अगदी असेच म्हणतो..या प्रकारचे नैतिक धैर्य माझ्यातही नाही. पण ज्या माणसात तसे धैर्य आहे, त्याच्याविषयी माझ्या मनात आदर आहे

अमित.कुलकर्णी's picture

3 Dec 2008 - 8:57 am | अमित.कुलकर्णी

>आपल्याच मनातील विचार आपल्यापेक्षाही कितीतरी प्रभावीपणे मांडताना धनंजय दिसतात. त्याचाच पुन्हा एकवार प्रत्यय आला.

लेखातील शब्दा-शब्दाशी सहमत आहे.

-अमित

नंदन's picture

3 Dec 2008 - 7:51 am | नंदन

धनंजय, तुमच्या लेखामागच्या भूमिकेशी सहमत आहे. प्रतिकूल प्रतिसाद येणार हे ठाऊक असतानाही त्यांनी आपले मुद्दे येथे मांडले हे नैतिक धैर्याचे द्योतक आहे. त्यांच्या विचारांशी जरी मी सहमत नसलो, तरी तुम्ही म्हणता तसे - "पण ज्या माणसात तसे धैर्य आहे, त्याच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. अशी माणसे स्वतंत्रपणे वावरू शकावीत हे मिसळपावाचे सौभाग्य आहे. यासाठी भारत स्वतंत्र आहे - अनुशासनपर्वात बांधलेला नाही." - हा 'ऍग्री टू डिसऍग्री विदाऊट बिईंग डिसऍग्रीएबल' चा दृष्टिकोन अनुकरणीय आहे.

"त्यांच्या शिव्या प्रत्यक्ष झेलण्याची, मिसळपावाच्या सदस्यांपैकी "नडगी-फोड" तरुणांकडून धक्काबुक्की सहन करण्याची शक्यता ते जाणतात."
- लेखातले हे वाक्य मात्र मला खटकले. तुमचा लिहिण्यामागचा उद्देश जरी तसा नसला तरी त्याचा वैयक्तिक पातळीवर आरोप म्हणून अर्थ काढता येईल, हे एक आणि सदर सभासद अशा धक्काबुक्कीच्या पातळीवर उतरतील असे मला वाटत नाही, हे दुसरे कारण.

हे एक विधान वगळले, तर तुम्ही मांडलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि मी त्यांच्यांशी सहमत आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आनंदयात्री's picture

4 Dec 2008 - 10:01 am | आनंदयात्री

"त्यांच्या शिव्या प्रत्यक्ष झेलण्याची, मिसळपावाच्या सदस्यांपैकी "नडगी-फोड" तरुणांकडून धक्काबुक्की सहन करण्याची शक्यता ते जाणतात."
- लेखातले हे वाक्य मात्र मला खटकले. तुमचा लिहिण्यामागचा उद्देश जरी तसा नसला तरी त्याचा वैयक्तिक पातळीवर आरोप म्हणून अर्थ काढता येईल, हे एक आणि सदर सभासद अशा धक्काबुक्कीच्या पातळीवर उतरतील असे मला वाटत नाही, हे दुसरे कारण.

धनंजय यांचे लेख प्रतिक्रिया अभ्यासपुर्ण वाचनिय असतात हा आजवरचा अनुभव आहे. आज या त्यांच्या वरच्या वाक्याशी तीव्र असहमती दर्शवतो. मला यात एक हिंदु म्हणुन एक मोठा विरोधाभास दिसतो, तो असा की, ज्या समाजात वर उल्लेखलेली नडगी फोड वृत्ती मोठ्या प्रमाणार आढळते आणी जे हजारो वर्षापासुन इतर हजारो संस्कृतींबरोबरच्या पण संबंधातुनही पृव्ह होत आले आहे त्यांच्याशी सलोखा वाढवायचा (सामाजिक) आंधळेपणाने पुरस्कार करायचा आणी जशास तसे उत्तर देण्याच्या मानसिकतेचा "नडगी-फोड" असा अवहेलनात्मक उल्लेख करुन खच्चीकरण करायचे.

धमाल मुलगा's picture

4 Dec 2008 - 2:07 pm | धमाल मुलगा

श्री कलंत्री हे अनुभवाने मोठे आहेतच, वाद नाही त्यात. सोबत ज्या चिकाटीने आणि मोठ्या विश्वासाने ते गांधीवादी विचारांचे मुद्दे माडताना दिसतात, तेही कौतुकास्पद आहे.

श्री.धनंजय ह्यांचे प्रकटनदेखील नेहमीप्रमाणेच आडपडदा न ठेवता, मोकळेढाकळे आणि प्रामाणिक.
धनंजयराव, आवडलं हे आपल्याला.

परंतु, वर नंदन आणि आनंदयात्री म्हणतात त्याच्याशी पुर्ण सहमत!

मिसळपावाच्या सदस्यांपैकी "नडगी-फोड" तरुणांकडून धक्काबुक्की सहन करण्याची शक्यता ते जाणतात.
ह्यावर मी असं म्हणेन की, दुर्दैवाने आपण मिसळपाव इथल्या तरुण सदस्यांबद्दल थोडेसे गैरसमज मनात धरून आहात अशी एक पुसटशी शंका चाटून गेली.

श्री.कलंत्रींसारख्या अभ्यासू, जेष्ठ व्यक्तिमत्वाबद्द्ल "नडगी-फोड" तरुण सदस्यांनाही आदर नक्कीच वाटतो.
शिवाय हा "नडगी-फोड"पणा येता-जाता जो कोणि दिसेल त्यावर वापरला जात नाही ह्याची मला खात्री वाटते.

माझा सल्ला मागितला असता, तर वागणे एकनाथांपेक्षा वेगळे असावे. अशा परिस्थितीत माझे वागणे वेगळे असेलच. पण म्हणून एकनाथांना मी कमी लेखू लागलो, तर थू माझ्यावर.

++१ अगदी अगदी!
अर्थात, एकनाथांच्या वेळची माणसंही बरीच लाज बाळगुन होती, आजच्या काळात मात्र संत एकनाथ त्या थुंकीनं लडबडले असते इतकी निलाजरे आणि निर्ढावलेले झाले आहे आजचे लोक.

असो,
ह्या निमित्ताने एकच सांगु इच्छितो, "नडगी-फोड" तरुण हे हौसेनं नडगीफोड होत नाहीत, तर तत्कालीन परिस्थिती त्यांचं सळसळ्णारं रक्त आणखी खवळवते...ह्यामध्ये चांगल्या-वाईटाची जाण ९९% "नडगी-फोड" तरुण नक्कीच ठेवतात, आणि जिथे फोडायच्या तिथे नडग्या फोडायला नक्कीच मागेपुढे पहात नाहीत, पण ज्या नड्ग्या वंदण्याच्या लायकीच्या आहेत, त्या नक्कीच योग्य त्या प्रकारे वागवल्या जातील. :)

आपलाच,
-(भावी नडगीफोड कॉर्पोरेटर) ध मा ल.

प्राजु's picture

3 Dec 2008 - 8:16 am | प्राजु

आताच कलंत्री सरांच्या या प्रामाणिक आणि संयमी लेखनाबद्दल मी त्यांच्या लेखाखाली प्रतिसाद दिला आणि इथे तुम्ही हा वेगळाच धागाच काढलेला दिसला..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

3 Dec 2008 - 8:23 am | सहज

ह्या चर्चा प्रस्तावाची गरज , प्रयोजन मला तरी वाटत नाही.

इथे कोणीही कलंत्री यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणली नाही आहे. हा जरुर कलंत्री यांना अनुचित, असभ्य प्रतिसाद आले असतील. संपादकांनी विशेष लक्ष द्यावे ही विनंती व कलंत्री यांना वाईट वाटले असेल तर त्यांची माफी मागतो पण "कलंत्री यांच्या उपाययोजने दहशतवाद २५ वर्षात मिटेल" हा कौल घेतला तर बहुमताने पराभव होईल ही अटकळ.

विचार करा आयसीयु मधे कोणी ऍडमीट आहे व एक सभ्य गुरुजी तिथे येतात काय व अहो चला घरी, तुम्ही शेळीचे दुध घ्या [काय आजवर चहा घेत होता], हा काढा घ्या, लंघन करा, हवापालटाला थंड जागी जा तुम्ही कसे ठणठणीत रहाल बघा इ इ उपाय मोठ्यामोठ्याने सांगत बसले तर त्या गुरुजींना इतर बघायला आलेले लोक काय म्हणतील तुम्हीच विचार करा.

अहो प्रसंग काय, लोक उपाययोजनेवर चर्चा करत आहेत व इथे कलंत्री महान, प्रामाणीक, धैर्यवान, अमुक अन तमुक आहेत हा त्यांचा नागरी सत्कार कशाला? चर्चाप्रस्ताव पटला नाही.

एकलव्य's picture

3 Dec 2008 - 8:28 am | एकलव्य

असो...

कलंत्रींनी त्यांचे विचार मांडणे योग्य आहे तसेच इतरांनीही आपला तीव्र संताप त्यांना दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये व्यक्त करणेही योग्यच आहे.

धनंजय - कलंत्रीप्रेमापेक्षाही त्यांना आलेल्या काही प्रतिक्रियांवरचा राग आपल्या लेखात अधिक वाटला. त्या अंगाने मात्र हा लेख असेल तर कदाचित त्याची गरज असेलही पण शीर्षक मात्र वेगळे हवे.

- एकलव्य

विसोबा खेचर's picture

3 Dec 2008 - 8:44 am | विसोबा खेचर

अहो प्रसंग काय, लोक उपाययोजनेवर चर्चा करत आहेत व इथे कलंत्री महान, प्रामाणीक, धैर्यवान, अमुक अन तमुक आहेत हा त्यांचा नागरी सत्कार कशाला? चर्चाप्रस्ताव पटला नाही.

मलाही पटला नाही! साला, 'हा धन्याशेठ जिनियस आहे परंतु तेवढाच वेडझवाही आहे' असं मी उगाच नाही म्हणत! अचानक त्याला हा जो पु़ळका आला आहे त्यावरून तरी हे खरंच वाटतं! :)

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2008 - 8:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ काही राहिलेले मुद्दे जिनियस धनंजय मांडतो आहे असेच वाटले, परंतू प्रत्यक्षात कलंत्री यांच्यावर झालेल्या टीकेच्या समर्थनार्थ हा चर्चा प्रस्ताव वाटला .कलंत्री यांच्या विचारांच्या प्रेमाबद्दल आम्ही मागेच कौतुक केलं आहे, त्याबद्दल कोणाला शंका घ्यायचे कारण नाही

पण...प्रसंग काय, लोक उपाययोजनेवर चर्चा करत आहेत व इथे कलंत्री महान, प्रामाणीक, धैर्यवान, अमुक अन तमुक आहेत हा त्यांचा नागरी सत्कार कशाला? चर्चाप्रस्ताव पटला नाही.

सहमत आहे !!!

-दिलीप बिरुटे

विकास's picture

3 Dec 2008 - 9:09 am | विकास

इथे गांधीवादाच्या उपयोगापेक्षा कलंत्रीवादावरच जास्त चर्चा आहे.

बाकी सहजरावांशी सहमत.

मुंबई प्रकरणानंतर्च्या प्रत्येक चर्चेत कोणीतरी एकाबाजूने असते आणि कोणीतरी विरोधात. म्हणले तर दोघेही प्रामाणिक आहेत. पण मग प्रत्येकासाठी असे समर्थनार्थ लेख लिहण्याची गरज का भासत नाही आणि येथे का भासते?

शिवाय कलंत्रींशी आमचे वैयक्तिक काहीच वैर नाही आणि जे या लेखातील विचाराच्या विरोधात आहेत ते काही त्यांचा व्यक्तिगत अपमान करत आहेत असे मला वाटत नाही, मी तर नक्की नाही. (वेताळपंचविशी हे ह.घ्या. पद्धतीने म्हणले होतेच, शिवाय हट्ट हा वेताळ नाही तर विक्रमादीत्य सोडत नसतो :-) हे लक्षात घ्यावे. केवळ अजून लेखमाला चालूच आहे म्हणून गमतीत म्हणले होते).

शिवाय कलंत्रींना आमचे काही गैर वाटले तर आहे की त्यांचा गांधीवाद आमचे मतपरीवर्तन करायला आणि ते त्यांच्या चांगल्या प्रतिसादात कायमच प्रतिबिंबित होत आले आहे.

विकेड बनी's picture

3 Dec 2008 - 4:41 pm | विकेड बनी

शिवाय कलंत्रींशी आमचे वैयक्तिक काहीच वैर नाही आणि जे या लेखातील विचाराच्या विरोधात आहेत ते काही त्यांचा व्यक्तिगत अपमान करत आहेत असे मला वाटत नाही, मी तर नक्की नाही. (वेताळपंचविशी हे ह.घ्या. पद्धतीने म्हणले होतेच, शिवाय हट्ट हा वेताळ नाही तर विक्रमादीत्य सोडत नसतो हे लक्षात घ्यावे. केवळ अजून लेखमाला चालूच आहे म्हणून गमतीत म्हणले होते).

आबा पाटीलः बडे शहरोंमें ऐसे हादसे होते ही रहते है - ह. घ्या.

विलास देशमुख: रितेश मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून आला होता. - ह. घ्या.

अ-च्युत्यानंद - हे मेजरचे घर नसते तर इथे कुत्रेही फिरकले नसते - ह. घ्या.

बघा या लोकांना किती गरज आहे, ह. घ्या. या राजकारणी शब्दांची. शिकण्यासारखे खूप आहे.

आमचा प्रतिसादही ह. घ्या.

विकास's picture

3 Dec 2008 - 6:31 pm | विकास

बघा या लोकांना किती गरज आहे, ह. घ्या. या राजकारणी शब्दांची. शिकण्यासारखे खूप आहे. आमचा प्रतिसादही ह. घ्या.

आपला प्रतिसाद आपण म्हणता तसा ह.घे.


माझ्या मुळ प्रतिसादाचा जो धनंजयने संदर्भ दिला आहे त्यात मी जे काही म्हणले आहे ते मी येथे लिहीले होते.

त्यातील खालील वाक्य वाचा:

ह.घ्या. आणि हो यातील विक्रम आणि वेताळ आलटून पालटून दोन्ही बाजू आहेत (लेख लिहीणारे आणि माझ्यासकट प्रतिसाद देणारे :-)

त्यात पुढे जे ह.घ्या. विधान नव्हते त्याला मात्र अजून उत्तर मिळालेले नाही... :-(

बाकी या यादीतील बर्‍याच गोष्टी निर्मला देशपांडे करत असत. त्याला का बरे फळे आली नाहीत याचा विचार करतोय....

विसोबा खेचर's picture

3 Dec 2008 - 8:33 am | विसोबा खेचर

छे - नव्हे, भारताच्या लष्कराच्या खांद्यावरून बंदुका झाडताना बहुधा त्यांची निशाणी त्यांच्या नावडत्या पक्षाचे भारतातले सरकार आहे.

मी व्यक्तिश: याच्याशी असहमत आहे. आज माझ्यासारख्या कित्येक सामान्य माणसांना लष्कराचे कौतुक वाटत आहे आणि म्हणूनच लष्कराच्या गौरवाकरता आज आम माणूस लिहीत आहे, बोलत आहे. भारतातल्या सरकारवर निशाणी साधायला त्याला लष्कराच्या खांद्याची गरज नाही. सरकारवर आम्ही तशीही अनेकदा अगदी डायरेक्ट निशाणी साधतो..!

अतिरेक्यांपेक्षाही "नि:शब्द करणारा" वार वाटत नाही.

मला वाटला!

मागे कुठल्याश्या एका प्रतिसादात सर्वसाक्षीनेच कलंत्रींना लिहिले होते की 'अहिंसावादाबद्दल आणि गांधीवादाबद्दल इथे मिपावर बोलताय ते ठीक आहे परंतु कुणा शहिदाच्या घरी जाऊन बोलू नका नाहीतर त्यांना उध्वस्त झाल्यासारखे वाटेल!'

हे पटते! अतिरेक्यांइतकाच कलंत्रींचा हा अहिंसावादाचा अन् गांधीवादाचा मार त्या कुटुंबियांना घायाळ करेल!

एकनाथांची अशी कथा आहे, की एकदा गोदावरीच्या घाटावरती स्नान केल्यानंतर कोण्या मुसलमानाने त्यांच्यावर थुंकले. एकनाथांनी पुन्हा स्नान केले, पुन्हा तो पाजी माणूस अंगावर थुंकला - असे शंभर वेळा झाले. शेवटी तो माणूस शरमून म्हणाला - माझे चुकले. तर एकनाथ म्हणाले, "छे, छे, तुझ्यामुळे माझी शंभर गोदास्नाने झालीत."

एकनाथांबद्दल आदर आहे पण मी तिथे असतो तर पहिल्या थुंकीतच त्या थुंकणार्‍या भोसडीच्याला धरून कानफटला असता. साला, उद्या एक थुंकतो म्हटल्यावर दुसरा येऊन थुंकायला लागायचा!

छ्या!

आज या देशाला गांधींपेक्षा, आम्हाला स्वाभिमान शिकवणार्‍या, आत्मसन्मान शिकवणार्‍या, स्त्रीची अब्रू लुटणार्‍या रांझ्याच्या पाटलाला समजून (!) न घेता त्याचे हातपाय तोडणार्‍या शिवरायांची किती नितांत आवश्यकता आहे हे समजते..!

तात्या.

राघव's picture

3 Dec 2008 - 10:44 am | राघव

कलंत्रींवर वैयक्तीक टीका करण्याची माझीही भूमिका नव्हती, नसेल. ते ज्येष्ठ आहेत. अनादराचा हेतू कसा असणार?तुमच्याशी सहमत आहे. कलंत्रींचे धैर्य अन् संयम गांधीवादाला साजेसाच आहे, शंकाच नाही.
पण माणसाची मनोवृत्ती पालटण्याची अन् त्याला सुधारण्याची ही वेळ नव्हे असे मला म्हणायचे होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माणूस सुधरूही शकेल पण त्यास किती वेळ लागेल याचा काही विचार?
तशा तर अनेक उपचारपद्धती अहेत. पण आपल्याजवळ किती वेळ आहे याचे तारतम्य बाळगूनच उपचार घेत असतो. हार्टअटॅक येऊ नये यासाठी उपाय करणे चांगले पण आत्ता आला तर त्यासाठी आपण दुसरी उपचारपद्धती वापरतोच. हेच फक्त मला म्हणायचे होते.
मुमुक्षु

इनोबा म्हणे's picture

3 Dec 2008 - 4:20 pm | इनोबा म्हणे

मिसळपावाच्या सदस्यांपैकी "नडगी-फोड" तरुणांकडून धक्काबुक्की सहन करण्याची शक्यता ते जाणतात.
हे लिहीण्यामागचे प्रयोजन काय? कलंत्रींशी कुणी अशा अरेरावी भाषेत बोलले असल्याचे माझ्या वाचनात तरी आले नाही. 'धक्काबुक्की करा' असे तर सुचवायचे नाही ना आपल्याला?

(नडगीफोड क्र. २)-इनोबा
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

टारझन's picture

3 Dec 2008 - 4:42 pm | टारझन

हे लिहीण्यामागचे प्रयोजन काय? कलंत्रींशी कुणी अशा अरेरावी भाषेत बोलले असल्याचे माझ्या वाचनात तरी आले नाही. 'धक्काबुक्की करा' असे तर सुचवायचे नाही ना आपल्याला?

असेच म्हणतो ... सगळ्यात आधी हे चर्चासत्र का काढलं ? काढलं तर काढलं... कलंत्रींना समर्थन .. बाकींना टोमणे का ?
आधी नव्हतं वाटत पण आता कलंत्री (आणि त्यामाधे धनंजय साहेब) यांचा चर्चेत रहायची गोडी असावी.

भराभर प्रतिसाद खेचणारे धागे काढल्याबद्दल कलंत्री आणि धनंजय साहेबांचे अभिणंदण

( फक्त नडणार्‍यांच्या (वयं पाहून ) नडग्या फोडणारा)
-टारझन

चतुरंग's picture

3 Dec 2008 - 6:21 pm | चतुरंग

गांधीवादाचे समर्थन तू करतो आहेस. कलंत्रींनी त्यांच्या तिसर्‍या लेखात जे २० कलमी कार्यक्रम मांडले त्यावर माझी - "अतिरेक्यांपेक्षाही "नि:शब्द करणारा" वार " अशी प्रतिक्रिया आहे.
त्यांनी त्यांचे विचार निर्भीडपणे मांडलेत त्यांच्या नितीधैर्याचे मलाही कौतुक वाटते. प्रवाहाविरुद्ध जाणारा विचार मांडणे हे सोपे नाही. ते एकप्रकारे गांधींच्या विचारांचा उपयोग त्यांच्या आयुष्यात करुन पहात आहेत! मी त्यांची चेष्टा कुठल्याच धाग्यात केली नाहीये फक्त प्रतिवादाचे मुद्दे मांडलेत.
आत्ताच्या परिस्थितीत त्यांनी दिलेला फक्त गांधीवादच पुरेसा नाहीये हे मला सांगायचे आहे. त्यांनी सांगितलेली तत्त्वे चूक नाहीत. हिंसेने हिंसा वाढते हे सत्यच आहे. पण इथे दोन पातळ्यांवर प्रयत्न हवे आहेत आणि दोन्ही प्रयत्नांचा हेतू एकच असला तरी दिशा परस्पर्विरोधी वाटतील इतक्या वेगळ्या आहेत.
उपाय एक - पाकिस्तानातल्या अतिरेकी छावण्या काढून टाकायला त्यांना कोणत्याही प्रकारे मजबूर करणे मग ते अमेरिकेमार्फत 'हात पिरगाळून' (आर्म ट्विस्टिंग) असेल किंवा भारताने स्वतः हल्ला करुन ते तळ उडवणे असेल काहीतरी एक पण त्याला आत्ता काही तिसरा पर्याय आहे असे मला वाटत नाही (असला तर जरुर सांगा - मी समजून घ्यायला तयार आहे). इथे २५ वर्षे वगैरे आपण थांबू शकणार नाही. कारण आधीचे पाकिस्तानचे प्रतिसाद निराशाजनकच आहेत.

दुसरे देशांतर्गत हिंदू-मुस्लिम सलोखा, सामंजस्य हे टिकून रहाण्याच्या दृष्टीने कलंत्री ह्यांनी सांगितलेले उपाय हे अवलंबता येतील. तेही वातावरण निवळल्यानंतर. त्याच बरोबर सुरक्षाव्यवस्था मजबूत करणे सैन्याची क्षमता वाढवणे, पोलिसांची क्षमता वाढवणे असेही प्रतिबंधात्मक उपाय करावे लागतीलच.

पुन्हा एकदा सांगतो एका हातात ए.के.४७ आणि दुसर्‍या हातात गुलाबाचे फूल असे असले तरच आज तुमच्या शांततेच्या शब्दांना किंमत आहे, हे दुर्दैवाने सत्य आहे. पुढच्या वाटचालीत परिस्थिती काबूत आहे असे झाले तर आणखीन शांततेने मैत्रीचा हात पुन्हा पुढे करताही येईल तो मार्ग बंद नसावा/नाही.

चतुरंग

धन्यवाद चतुरंग!

ह्या सत्याचा उल्लेख केल्याबद्दल.
१.क्षमा ही शुरालाच शोभून दिसते.
२.दुबळ्याने केलेल्या क्षमेला काय किंमत आहे?

दुर्दैवाने अहिंसावादी दुसर्‍यावाक्याला जास्त महत्त्व देतात आणि आपण "शूर" आहोत हे गृहीत धरतात.
प्रत्यक्षात ज्याला तुम्ही क्षमा करणारा आहात त्याला तुम्ही "शुर" वाटायला हवेत. आणि त्यासाठी तुम्हाला शस्त्र हे उचलावच लागणार.

रिंगमास्टरला एकदा तरी चाबूक मारावाच लागतो म्हणजे पुढच्यावेळी तो नुसता उगारला तरी काम भागतं

आम्ही काय केले आहे? कलंत्रीसाहेबानी गांधीगिरी केली त्याची आम्ही ना तारिफ केली ना जहाल भाषा वापरली. फकस्त ईरोध केला. त्यात काय चुकल का?
वेताळ

कलंत्री's picture

3 Dec 2008 - 6:45 pm | कलंत्री

यातील अनेक वैयक्तिक मुद्द्याचा मी विचारही केला नव्हता. श्री धनंजय आणि सर्वच प्रतिसादी आणि वाचकाचे आभार.

मराठी लोकांची विधायक आणि रचनात्मक काम करण्याची परंपरा आहे. त्यासाठीच गांधींनी वर्ध्याजवळच्या सेवाग्रामाची निवड केली होती. गांधी आपल्या महाराष्ट्राबद्दल नेहमीच कौतुकाचे उद्गार काढीत असत. (महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे.).

गांधींनी उघडपणे ना. गोपाल कृष्ण गोखले यांचा आपले राजकिय गुरु असा उल्लेख केला होता.

जेंव्हा जेंव्हा राष्ट्रावर संकट येते तेंव्हा महाराष्ट्र धावुन जातो असेही म्हटले जातेच.

आपण सर्व परिपक्व आहोतच आणि अतिरेक्यावरच्या समस्येचे औषध / समाधान आपण सर्व नक्कीच काढु. ( कदाचित ते माझ्या चर्चेतून असेल अथवा क्लिंटन याच्या अग्रलेखातून असेल.)

मिपावरचे अनेक जण तरुण आहेत आणि त्यांना माझ्यालेखाबद्दल तीव्र नापसंती असली तरी कोणीही मर्यादेचे उल्लंघन केलेले नाही असे मी नमुद करु इच्छितो.

आपले वैयक्तिक प्रेम आहेच, लोभ आहे, तो वाद विवाद आणि संवादातून वृद्धिंगत व्हावा.

फक्त माझी सर्वांना एक शिफारस आहे, कोणत्याही विषयाचा पूर्ण अभ्यास करा, त्याबाबतची सर्व पुस्तके वाचा.

पुनश्च आभार.

द्वारकानाथ कलंत्री

टारझन's picture

3 Dec 2008 - 7:06 pm | टारझन

फक्त माझी सर्वांना एक शिफारस आहे, कोणत्याही विषयाचा पूर्ण अभ्यास करा, त्याबाबतची सर्व पुस्तके वाचा.

माझी फक्त गांधीवाद्यांनी एकच शिफारस आहे , आपण कोणत्याही परिस्थितीचा (मागचा आणि पुढचा, तसेच निकालाचा) विचार करावा ... आणि त्यावर आपले मुद्दे नक्की (१००% नाही निदान ५०% तरी) आपल्याला हवा तो निकाल देतील का हे पहावे. पुस्तके वाचून काहीही होत नाही.

इंजिनियरींगच्या पुस्तकांत जे जे वाचलेलं ते आता व्यवहारिक करियर मधे *ट कामाला येत नाही.

- टारझन

चित्रा's picture

3 Dec 2008 - 11:24 pm | चित्रा

हा प्रतिसाद धनंजय तसेच कलंत्री यांच्याही लेखाला आहे. एकत्रच लिहील्याबद्दल क्षमस्व.

कलंत्रींचे लेख वाचले. मला ते सध्याच्या परिस्थितीत विशेष पटले असे नाही, पण आदर मी कोणाच्याही मताचा करीन तेवढा करते आहे असे वाटते. अर्थात आपले मत लिहील्यास टिंगल-टवाळी होणे/ तिरपे-तिरपे प्रतिसाद येणे, याची अशा माध्यमात लिहीणार्‍या सर्वांनीच तयारी ठेवावी (स्वानुभव!).

सध्या नुकतेच घडून गेलेल्या घटनांनी इतका धुरळा उडला आहे. अशा घटनांनी भावना तीव्र होणे हे मला तरी नवीन नाही आणि मला वाटते अनेकांच्या त्या झाल्या. नुसता भावनांचा उद्रेक होणे यात व्यक्तिशः मला विचारले तर मला गैर काही वाटत नाही - तो पूर्वपदाला येण्याचा एक मार्ग असू शकतो. अर्थात अशा भावनांच्या आहारी जाऊन कोणी कोणाला धरून मारायला लागले तर मात्र काही वेगळे आहे. पण वस्तीत राहणार्‍या मुसलमानांवर कोणी भावनेने भडकलेले आततायी हिंदू चालून गेले तर रक्षण करण्याची जबाबदारी मिपावरील बहुसंख्य लोक स्विकारतील अशी माझी श्रद्धा आहे. ती हवे तर माणुसकीवरची श्रद्धा म्हणायची तर म्हणा, मिपाकरांवरची श्रद्धा आहे असे म्हणा. कलंत्री यांना मिपावर झालेला विरोध हा ही वेळ समझोत्याची वाटत नसल्याने आणि/किंवा त्यांनी सांगितलेला उपाय हा लांब पल्ल्याचा वाटल्याने होत आहे असे मला वाटते. यात त्यांचा व्यक्तिशः अपमान करण्याचा हेतू नसावा.

शिवाय हा समझोता भारतीय मुसलमानांशी नसून बाहेरील म्हणजे पाकिस्तानशी करावा, असा विचार कलंत्री यांच्या तिसर्‍या लेखात दिसला. पाकिस्तान्यांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यापेक्षा घरातील मुस्लिम बांधवांशी तसे संबंध तयार करणे महत्त्वाचे आहे असे माझे कलंत्री यांच्याहून वेगळे मत आहे. त्याचा उल्लेख हा मला कलंत्री यांच्या तिसर्‍या लेखात दिसला नाही.

बाकी कलंत्रींनी सांगितलेले उपाय नवे नाहीत, अनेक भारतीय लोक लहान मोठ्या प्रमाणांवर हे करीत आहेत. फक्त ते करीत असताना अशी अपेक्षा असते की एका बाजूला चांगले दाखवण्यासाठी दुसरी बाजू वाईट आहे असे दाखवण्याची गरज नसल्याने तेवढे एक धोरण पाळावे. अशाच प्रयत्नांचा भाग म्हणून पाकिस्तान आणि भारतामध्ये समझोता एक्स्प्रेस चालू होतीच.

सर्किट's picture

3 Dec 2008 - 11:26 pm | सर्किट (not verified)

पाकिस्तान्यांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यापेक्षा घरातील मुस्लिम बांधवांशी तसे संबंध तयार करणे महत्त्वाचे आहे असे माझे कलंत्री यांच्याहून वेगळे मत आहे.

माझेही मत तसेच आहे.

-- सर्किट

आजानुकर्ण's picture

4 Dec 2008 - 1:26 am | आजानुकर्ण

मीदेखील अनेक प्रतिसादांतून हेच सुचवले आहे.

पक्या's picture

4 Dec 2008 - 12:29 am | पक्या

ह्या चर्चा प्रस्तावाची खरेच काही गरज नव्हती अशी प्रतिक्रिया देणार्‍यांच्या मताशी सहमत.

'हम बेईमानी का धंदा बहुत इमानदारीसे करते है' असा डायलॉग कुठल्याशा हिंदी सिनेमात ऐकला होता. आता असल्या इमानदारीचे कुणीतरी कौतुक करेल काय?

कलंत्री यांचे लेख लिहीतानाचे प्रयत्न प्रामाणिक असले तरी सध्याच्या काळात हे विचार चुकीचे वाटत आहेत. त्यांमुळे त्या प्रामाणिकपणाचे समर्थन करणे पण चुकीचे आहे.

विसोबा खेचर's picture

4 Dec 2008 - 12:34 am | विसोबा खेचर

'हम बेईमानी का धंदा बहुत इमानदारीसे करते है' असा डायलॉग कुठल्याशा हिंदी सिनेमात ऐकला होता.

"देख अब्दुल, अपना धंदा है बेईमानीका लेकीन करना पडता है ईमानदारीसे..!"

हे ते मूळ वाक्य.. परिंदा चित्रपटात नाना पाटेकरच्या तोंडी आहे! समीर खक्करला उद्देशून हा संवाद आहे..

आपला,
तात्या नेने!

पक्या's picture

4 Dec 2008 - 12:41 am | पक्या

>>"देख अब्दुल, अपना धंदा है बेईमानीका लेकीन करना पडता है ईमानदारीसे..!"
हे ते मूळ वाक्य.. परिंदा चित्रपटात नाना पाटेकरच्या तोंडी आहे! समीर खक्करला उद्देशून हा संवाद आहे..

हा डायलॉग परिंदातील आहे ते बरोबर आहे, तात्या. पण मी वरील प्रतिसादात लिहीलेला डायलॉग पण एका मधल्या काळातील हिंदी सिनेमातील आहे...बहुतेक शत्रूघन सिन्हाचा 'कालिचरण'.

धनंजय's picture

4 Dec 2008 - 2:26 am | धनंजय

बहुतेक प्रतिसादकर्त्यांनी योग्य वाचले - "एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ"; "एका गांधीवादाच्या" नव्हे.

यातील फरक चर्चेच्या दुसर्‍या वाक्यात खूपच स्पष्ट असावा.

पैकी चतुरंग यांनी, चित्रा यांनी, अन्य विचारी लोकांनी इथे लिहिलेले प्रतिसाद तिथे लिहिले असते, तर हा चर्चाप्रस्ताव मी बहुधा टाकला नसता.

आणीबाणीची वेळ आणि स्थान महत्त्वाचे असते, हे खरेच आहे. ज्या ठिकाणी गोळ्यांचा भडिमार चालू आहे, तिथे शिस्तबद्ध लष्करी कारवाईपेक्षा वेगळ्या कुठल्याच गप्पा केल्यास दुष्परिणाम होतात. (मग गप्पा गांधीवादाच्या असोत की गृहमंत्र्याच्या पोषाकाबद्दल आपल्याला चीड वाटते, त्या गप्पा.)

पण आणीबाणीच्या स्थानाची, आणि काळाची मर्यादा शक्य तितकी सीमित असावी.

आपल्यापैकी बहुतेकांना वाटते, की "मी अमुक-तमुक सांगितलेच होते, तसे केले असते तर हे घडले नसते". प्रत्येकालाच आपण चांगले सरसेनापती आहोत, "लोक आपले ऐकत नाहीत, हा लोकांचा अडेलतट्टूपणा" असा प्रचंड आत्मविश्वास असतो. "आता आणीबाणीची वेळ आहे, माझे ऐका, सर्वजण गप्प बसा!" संजय/इंदिरांनाही असाच आत्मविश्वास होता, पण त्यांची धोरणे माझ्या मते चुकलेली होती.

काश्मीरात भारतीय सैन्याने ताबारेषेच्या पलीकडे जाऊन अतिरेक्यांचा पाठलाग करावा (म्हणजे आता करत नाहीत), असे आपले काही मित्र आपल्याला सांगतात. भारतीय लष्कर डावपेचास योग्य असा पाठलाग हल्लीच असे करत नाही हे तुम्हाला कोणी सांगितले? मी पलिकडे कारवाई केलेल्या कप्तानाशी बोललेलो आहे. पण हे धोरण भारताने जगजाहीर करावे, असे तुम्हाला वाटते का? "आपण असे करत नाही" असे जगाला सांगून (म्हणजे स्वतःच्या लोकांनाही) मग त्या कारवाया करण्यात मुत्सद्देगिरी आहे. (मी त्या कप्तानाशी अशी भेट झाली आहे, असे सांगणे म्हणजे गौप्यस्फोट नाही. भारत लष्करी तंत्रास योग्य अशा कारवाया करत आहे, हे सर्वच विचारी लोकांना ठाऊक आहे. अफगाणिस्तानातून भारत पाकिस्तानाला शह देत आहे, [हे ठीकच करत आहे], हे जगाभरातल्या वर्तमानपत्रांना माहीत आहे, पण "नेभळट-भारत-संताप"वादी लोकांना ठाऊक नाही.)

१९४७ मध्ये काश्मीर [जेहलम नदीचे] खोरे व्यापून मग भारताने युद्धबंदी घोषित केली. सिंधुनदी खोर्‍यातल्या गिलगित पर्यंत पोचल्याशिवाय म्हणे युद्धबंदी घोषित करायला नको होती. इथे आपण सगळे लष्करी डावपेचात तरबेज आहेत. कारण आपण मर्द मराठे असल्याकारणाने डोंगराळ प्रदेशातील युद्धात लष्कराच्या तुकड्या कशा हलवायच्या हे आपल्याला ठाऊक असते. त्या काळातल्या मूख सरसेनापतींनी मला विचारले नाही, असे कित्येकांचे मत दिसते. काश्मीरच्या खोर्‍यातून गिलगितकडे जायला रस्ता कुठे आहे? १९४७मध्ये हल्लीच द्विभाजित झालेल्या सैन्यापाशी रस्ता नसलेल्या प्रदेशात रसद पुरवायची साधनसामुग्री कितपत होती? जगाभरातली शाहाणी सैन्ये जमेल तेवढे सर्व विजय घेतात, आणि मगच "मोठ्या मनाने आम्ही वाटाघाटी करणार आहोत" असा आव आणतात. यात मुत्सद्दीपणा असतो. (शिवाजीराजांनीही सोयीनुसार युद्धे केलीत, सोयीनुसार तह केलेत.) पण छे! आम्ही चुटकी वाजवू आणि म्हणू, जितक्या सहज काश्मीर घेतले तितक्याच सहज गिलगित घेऊ. आम्ही पुण्यात बसलेले सेनापती रस्ता/रसद या असल्या फडतूस तपशीलांकडे लक्ष देत नाही.

आपल्यापाशी उत्तरे आहेत, बाकीच्यांनी गप्प बसावे, हा आत्मविश्वास दुरभिमानी असू शकतो, आणि घातकीही असू शकतो. आणीबाणीच्या स्थानात अर्थातच शिपायाने इन्स्पेक्टरचे, जवानाने कप्तानाचे प्रश्न न विचारता ऐकायचे असते. पण त्या ठिकाणाबाहेर लोकांमध्ये कोण कप्तान आहे, आणि कोण जवान आहे? सर्व प्रामाणिक लोकांचे म्हणणे ऐकले तर बरे असते.

येथे भारताच्या लष्करी कारवाया माहीत नसून जर कोणी म्हणत असेल, की भारताने लष्करी कारवाया कराव्यात - ते माझ्या मते प्रामाणिक मत आहे.

आपल्यापैकी चांगले विस्तृत वाचन असलेल्या कोणी, भारत लष्करी कारवाया करत आहे हे जाणूनही, "भारत लष्करी कारवाया करत नाही" अशी चिथावणी देत असल्यास, ते माझ्या मते अप्रामाणिक आहे.

[अशा लष्करी कारवायांना, टॅक्टिकली/स्ट्रॅटेजिकली विचार करून, आपल्या जवानांची कमीतकमी जीवहानी होईल, त्या प्रमाणात माझे समर्थन आहे. मिसळपावावरील प्रतिसादकर्त्यांना दिलासा मिळावा म्हणून या कारवायांची बित्तंबातमी रोजच्या वर्तमानपत्रात कळवण्याच्या मी विरोधात आहे. हे धोरण जागतिक बातम्यांमध्ये दररोज खुपावे, यात भारताचा तोटा आहे.]

भारतीय कारवायांचे प्रमाण आतापेक्षा कितपत अधिक असावे? किती जवानांचा मृत्यू होऊ शकेल इतपत धोकादायक कारवाया भारताने कराव्यात, हे सर्व विचार करण्या योग्य मुद्दे आहेत.

अशा वेगवेगळ्या प्रामाणिक मतांमध्ये एक श्री. कलंत्री यांचे मत आहे. चतुरंग यांनी वरील प्रतिसादात, चित्रा यांनी वरील प्रतिसादात त्या मताचा सकारात्मक विचार केला आहे. त्यांच्या कार्यक्रमातील काही भाग भारताच्या अंतर्गत कार्यान्वित करण्यासारखा आहे. त्यांच्या नैतिक विचारसरणीला समाजात जो काही पाठिंबा मिळू शकतो, त्याचा उपयोग झाला तर बरेच आहे. त्यांच्या सांगण्यावरून भारतीय लष्करातील जवान उद्या बंदुकीऐवजी गुलाब वागवू लागतील, म्हणून चिडणे, हे थोड्या विचाराअंती हास्यास्पद आहे. गांधींनी तरी "सैन्याला गुलाब द्या" असा हट्ट केला होता का? भारतीय सैन्याने काश्मीर खोरे घेतले ते गांधींच्या हयातीतच. त्यांच्या नैतिक धोरणातून शहीद जवानांचा अपमान होतो, असे मानणे म्हणजे मुद्दामून ओढूनताणून त्यांचा अपमान करून घेणे आहे.

भारतीय लष्कर आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या आड कारवाया करत असताना, त्या कारवाया अधिक वाढवाव्यात असे सरकारला उद्युक्त करणारे थोडे मतदार असतील, तर पोस्टातून गुलाबाची फुले पाठवणारे काही मतदार असतील. सर्व पद्धतींचा उपयोग करण्यास काय हरकत आहे? गाजर आणि दांडूची उपमा सर्वांनाच माहीत आहे. गाजर दिसावे, पण दांडू फक्त बोचावा - सर्वांना दिसताना भारत साळसूद आणि शांतताप्रियच दिसावा, असे माझे मत आहे.

इथले अनेक प्रतिसादकर्ते "दांडू डोळ्यात कसा भरावा" असा एकांगी विचार करत आहेत. श्री. कलंत्री "गाजर डोळ्यांत कसे भरावे" असा एकांगी विचार करत आहेत. श्री कलंत्री एकांगी आहेत, म्हणून काय ते भारताचे पंतप्रधान आहेत? "हान तिच्या आयला" म्हणणारे तरी पंतप्रधान आहेत का? नव्हे, अनेक मतदारांच्या वैविध्यपूर्ण धोरणातून हेही-आणि-तेही असे धोरण तयार होऊ शकते. मानापमान वाटून घेण्यापेक्षा प्रामाणिक लोकांना कार्य करण्यास वाव द्यावा. ते काम करतात, म्हणून अन्य कुठले कार्य बंद पडत नाही. कोणाचे प्रामाणिक काम कोणाच्याही आड येत नाही, असा संवाद व्हावा. त्यांना पाकिस्तानात नव्हे, भेंडीबाजारात जाण्यास मी मनापासून समर्थन देत आहे. (ते संरक्षणमंत्री होण्यास विरोध करीन. पण असे कित्येक लोक आहेत.)

अमित.कुलकर्णी's picture

4 Dec 2008 - 3:09 am | अमित.कुलकर्णी

अतिशय स्पष्ट, संतुलित, अभ्यासपूर्ण लेख आणि प्रतिसाद!

-अमित

सुनील's picture

4 Dec 2008 - 2:25 pm | सुनील

१००% सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

4 Dec 2008 - 7:07 pm | विसोबा खेचर

त्यांच्या सांगण्यावरून भारतीय लष्करातील जवान उद्या बंदुकीऐवजी गुलाब वागवू लागतील, म्हणून चिडणे, हे थोड्या विचाराअंती हास्यास्पद आहे.

पण मु़ळात ते ज्या वादाचा पुरस्कार/समर्थन वारंवार करताहेत त्या वादानुसार जवानांनी बंदुकांऐवजी गुलाबच हाती घ्यावेत असाच अर्थ निघतो. नुकत्याच घडलेल्या मुबईवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नेळभटवादाचा पुरस्कार करणारी लेखमाला अट्टाहसाने लिहिणे हे आपल्याला हास्यास्पद वाटत नाही का? वर शिवाय आपण त्यांचे नसते कवतिक करणारे धागे सुरू करताय??

आज काही पोलिस, काही जवान शहीद झालेले असताना हाती बंदुका घेऊ नका, अहिंसातत्व अंगिकारा असले लेख लिहून गांधीवादाच्या वांझोट्या गप्पा मारणे हे त्या शहीदांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे नाही का? त्यांचा अपमान करणारे नाही का? पण धन्याशेठ, कदाचित असे आपल्यालाही वाटत नसावे, नाहीतर आपण 'पाहा, एवढा विरोध होतोय तरी माणूस मागे हटत नाही, गांधीवादावर लिहितोच आहे हो! वा!" असे फुकाचे कवतिक करणारा धागा टाकला नसतात! काय तर म्हणे एखादा माणूस चहुकडून विरोध होत असताना युद्धकाळातील आपले वांझोट्या विचारांचे लेखन सुरूच ठेवतो आहे म्हणून कौतुक! छ्या..!

गांधींनी तरी "सैन्याला गुलाब द्या" असा हट्ट केला होता का?

कसा करतील? कारण मुळात सैन्य म्हणजे आवश्यक तेथे हिंसा आली, शत्रूला गोळी घालून ठार मारणे आले, आणि गांधीच्या अहिंसावादात मुळात ह्या गोष्टी बसतच नाहीत! सबब, आपला वरील प्रश्न गैरलागू आहे!

धन्याशेठ, एकंदरीत असे वाटते आहे की आपणही काहितरी शाब्दिक बुडबुडे रचत आहात! च्यामारी, कलंत्रींचा पु़ळका आला आणि म्हणून हा धागा टाकला असे सरळ कबूल करा की! उगाच काय तरी शब्दावर शब्द रचून काही तात्विक, भयंकर वगैरे चर्चा करताहात? :)

तात्या.

आजानुकर्ण's picture

5 Dec 2008 - 1:37 am | आजानुकर्ण

सुरेख आणि अभ्यासू प्रतिसाद

यशोधरा's picture

4 Dec 2008 - 5:45 pm | यशोधरा

धनंजय, चांगला लेख आणि संतुलित प्रतिसाद.

श्री. कलंत्री यांनी मांडलेला गांधीवाद या काळात, घडणार्‍या घटना पाहता केवळ अशक्य आहे हे माझे व्यक्तिगत मत आहे. एवढेच नव्हे तर असा गांधीवाद जोपासणे आणि त्याला काही सकारात्मक प्रतिसाद मिळू शकेल अश्या अपेक्षा ठेवणे वा विश्वास ठेवणे म्हणजे स्वतः स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे आहे असे मला वाटते. खटासी व्हावे खट, हेच आत्ता व्हायला हवे, पण म्हणून काही सदस्यांनी प्रतिसाद देताना जी भाषा वापरली वा ज्या प्रकारे प्रतिसाद दिले तेही अत्यंत चुकीचेच.

भास्कर केन्डे's picture

5 Dec 2008 - 1:22 am | भास्कर केन्डे

श्री. द्वारकानाथ यांचा व माझा मनोगतकाळापासून स्नेह आहे. त्यांची गांधीवादाविषयीची चिकाटी पाहून मी अनेक वेळा थक्क झालेलो आहे. त्यांच्या विचारांना विरोध असला तरी त्यांचा वैयक्तिक स्नेह निर्माण झाला आहे हे नक्की.

पण मला एक शंका आहे... ही शंका म्हणजे कदाचित त्यांच्यावर अन्यायही असू शकतो. व त्याबद्दल मी त्यांची अगोदरच क्षमा मागतो. द्वारकानाथजींना प्रशस्तीपत्र देऊन मोकळे होणार्‍यांना प्रश्नच आहे म्हणा ना... द्वारकानाथजींना कोणी त्यांच्या दैनंदिन आयुष्यात पाहिले आहे काय? त्यांच्या शाब्दिक गांधीवादाला कुणी जवळून अनुभवले आहे काय?

माझा असा विश्वास आहे की आजच्या जगात तेही आपल्या एखाद्या शहरातल्या जीवनात गांधीवाद व संपूर्ण अहिंसा जोपासने अशक्य आहे. बोलणे व लिहिने शक्य आहे पण वागणे? मी कित्येक गांधीवादी पाहिले आहेत. दुर्दैवाने त्यांचा जवळून अनुभव घेतल्यावर त्यांच्या शब्दांत व वागण्यात तफावत आढळली आहे. एक साधा अनुभव येथे लिहिला आहे. बोलणे व वागणे यातली तफावत काय ते या उदाहरणातून कळेल असे वाटते.

जर द्वारकानाथजी खरेच वागण्यातसुद्धा गांधीवादी असतील तर त्यांना सांष्टांग दंडवत. पण नसतील तर त्यात काही नवल नाही. जवळपास सगळेच गांधीवादी केवळ पुस्तकात असतात.

आपला,
(गांधीवादाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर न माननारा) भास्कर
आम्ही येथे वसतो.

अमित.कुलकर्णी's picture

5 Dec 2008 - 8:05 am | अमित.कुलकर्णी

बोलण्यात व वागण्यात तफावत असण्याचे आणखी एक उदाहरण :
माझ्या अतिशय चांगल्या परिचयाचे एक स्वयंसेवक आहेत (खरे तर आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक). एकदा पुण्यात बस स्टॉपवर ते तिथल्या प्रवाशांना शिस्त लावत होते. सगळ्यांना रांगेत उभे केले. थोड्या वेळाने बस आली - आत पाय ठेवायलाही जागा नव्हती. हे बघून रांग मोडून पळत बसमधे सर्वात पहिल्यांदा घुसणारे महाशय म्हणजे हे शिस्तप्रिय स्वयंसेवकच होते. आता त्यांच्या समर्थनासाठी कोणी लेख लिहिला तर फक्त अनुकूल प्रतिसादच येतील असे नाही- हे सांगण्यासाठी हा प्रपंच. याच महाशयांचे शाळेतले प्रकार तर अनेक आहेत.

"बोलण्यात व वागण्यात तफावत" याची शेकडो उदाहरणे राजकीय नेत्यांच्या बाबतीत सर्व पक्षातून रोज दिसतात. ज्यांचा नावडता पक्ष सत्तेत आहे ती मंडळी वेळोवेळी तत्परतेने उदाहरणे / कौल / चर्चाप्रस्ताव टाकत असतातच.
उदा.- माझ्याकडून १-२ (सध्या आमच्या नावडत्या पक्षाचे सरकार सत्तेत नसल्याने भूतकाळातील) उदाहरणे
१. "दुकानांचे बोर्ड मराठीतच हवेत" - आंदोलन नंतर मागे घेतले
२. "बजाओ पुंगी हटाओ लुंगी" - आंदोलन नंतर मागे घेतले
३. "मुंबई बाँबस्फोटात सहभागी असलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट लागू देणार नाही" - आंदोलन नंतर मागे घेतले

आणखी बर्‍याच स्फोटक घोषणांची उदाहरणे देता येतील.

डिस्क्लेमर - आमच्या नावडत्या पक्षाचे सरकार आज सत्तेत नाही म्हणजे सत्तेत असलेला पक्ष आमचा आवडता आहे असा अर्थ कृपया लावू नये!

असो,
-(गांधीवादाला भारतातल्या प्रत्येक समस्येचे मूळ न मानणारा) अमित

मुंबई बाँबस्फोटात सहभागी असलेल्या आणि टाडा लागलेल्या या अभिनेत्याला कोणी बरं सोडवलं?

कलंत्री's picture

5 Dec 2008 - 9:37 pm | कलंत्री

भास्करराव,

आपला स्नेह जुनाच आहे.

माझ्याबद्दल. अनेक विकांराचा वेढा पडलेला आहेच. उदा. काम, मोह, मद, मत्सर, लोभ आणि मोह आहेच. त्याबद्दल आसक्तिही आहे. ते कमी पडत असतील तर रजोगुण आपला प्रभाव दाखवित असतोच. रजोगुण वाढला की हे करु का ते करु असे होत जाते.

आपली प्रत्यक्ष भेट झाली नाही पण झाली तर तुम्ही वरील गुणानी भरलेल्या अस्थिचर्मेयंत्राला तुम्ही पाहाल अशी आठवण लक्षात ठेवा, विनाकारण भ्रमनिरास होणार नाही.

द्वारकानाथ

वर आनंदयात्री, धमाल यांनी याबाबत खेद व्यक्त केलेला आहे. इनोबा म्हणे आणि टारझन यांनी संताप व्यक्त केला आहे.

आनंदयात्री यांनी "खच्चीकरण केलेले आहे", असा निष्कर्ष काढलेला आहे. पण तो प्रामाणिक असावा, म्हणून उत्तर देत आहे. यातले "ह.घ्या" उत्तर म्हणजे टारझन आणि इनोबा म्हणे यांचे प्रतिसाद वाचून "खच्चीकरण झालेले नाही" याची खात्री असू द्या.

आता गंभीर उत्तर -

आनंदयात्री म्हणतात :
> जे हजारो वर्षापासुन इतर हजारो संस्कृतींबरोबरच्या पण संबंधातुनही पृव्ह होत आले आहे ...
वगैरे. हा मुद्दा माझ्या चर्चेत त्यांनी कशाला उपस्थित केला ते कळत नाही. पण प्रामाणिकपणे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. असे मानूया की काही तरुणांना कुठल्यातरी ऐतिहासिक विषयाबद्दल शल्य आहे, आणि त्यांचे रक्त खवळले आहे. हे नैसर्गिक आहे, तर आता पुढे काय. एखादी सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी बळजबरी करणे समजा आवश्यक आहे...

इथे एक मुद्द्याला ओझरता स्पर्श केला पाहिजे - वैयक्तिक बाबतीत बळजबरी आणि धोरणाच्या बाबतीत बळजबरी, या दोहोंत काही मूलभूत फरक असतो. वैयक्तिक भांडणांत (म्हणजे गुंडाने बहिणीला त्रास दिला - बंधुराजाची आणि गुंडाची जुंपली; अधिक उदात्त विचार म्हणजे गुंडाने दुसर्‍या कोणाच्या बहिणीला छेडले, आणि तरी तात्या त्या गुंडाला धारेवर घेतील [असे वाटते]) "बळी तो कान पिळी", "स्वतःच्या आब्रूचे/मालमत्तेचे/जिवाचे रक्षण" वगैरे न्यायाने मारामारी होईल. ती मारामारी करणार्‍यांची खाजगी जबाबदारी आणि खाजगी मामला आहे. या बाबतीत वैयक्तिक "आत्मसंरक्षण" मान्य करून समाजाने (म्हणजे कायद्याने) अशा बाबतीत हिंसा करण्याचे पुष्कळ स्वातंत्र्य दिले आहे.

पण धोरणात्मक हिंसेच्या बाबत मात्र स्थापित राज्यांमध्ये (उदाहरणार्थ : भारतामध्ये) हिंसेचे स्वातंत्र्य शासन व्यक्तींकडून काढून स्वतःकडे घेते.

(धोरणात्मक हिंसा म्हणजे काय - धारावीतल्या अमुक गल्लीत गुंड फार बोकाळलेत म्हणून पूर्ण गल्लीला जरब दाखवणे - खुद्द गुंड नसलेल्या माणसाला धाक दाखवून गुंडाचा पत्ता काढून घेणे, वगैरे - हा धाकदपटशा वैयक्तिक नाही, धोरणात्मक आहे. त्याची गरज असू शकेल असे म्हटले जाते, पण ती हिंसा करायचा मक्ता शासनाच्या यंत्रणेने घेतला आहे. अर्थात एखादा गुंड जो धाकदपटशा करतो तो बेकायदेशीर आहे.)

अराजक-नसलेल्या-राज्यांमध्ये फक्त शिस्तबद्ध हिंसा करणे कायदेशीर असते. तडफदार सळसळणारे रक्त असलेल्या तरुणांना विशेष वाव दिला जाता. पण स्थापित राज्ये अशा शिस्तबद्ध हिंसेचा विशेष अधिकार दिलेल्या लोकांना वर्दी घालायला लावतात. याचे मुख्य प्रकार आहेत पोलीस आणि लष्कर. असे करण्यात प्रशिक्षणाच्या दृष्टीने काही फायदे असतात. अशा प्रकारे सळसळणार्‍या रक्ताच्या तरुणाला धोरणात्मक हिंसा करायची असेल तर अराजक-नसलेल्या-राज्यांत वाव आहे. (सरसकट खच्चीकरण नाही.)

वैयक्तिक हिंसा करण्यासही वाव आहे. कोणी माझे घर जाळायला येत आहे, त्याला बळजबरीने थांबवणे ग्राह्य आहे. पण अमुक गल्लीत कोणीतरी (व्यक्ती ठाऊक नाही) माझे घर जाळायचा कट रचतो आहे, हे निश्चित ठाऊक असले, तरीही त्या गल्लीला प्रतिबंधक स्वरूपात जाळण्याची "धोरणात्मक हिंसा" करण्याचा हक्क शासन माझ्याकडून काढून घेते. किंवा त्या गल्लीतून सर्व लोकांना घालवून टाकायचा हक्क शासन माझ्याकडून काढून घेते. गल्लीत मूग गिळून बसलेल्या कारस्थानी माणसाच्या नातेवाइकांना मारहाण करून, कारस्थानी माणसाला हुडकून काढण्याचा हक्क शासन माझ्याकडून काढून घेते. ते काम विशेष प्रशिक्षण दिलेल्या वर्दी घातलेल्या पोलिसांनाच करता येते.

शासनाने (घटनेच्या द्वारे) घेतलेला एकाधिकार आपण का मानावा? सैद्धांतिक दृष्ट्या हे आवश्यक नाही. व्हिक्टोरिया राणीच्या घोषणापत्रकाद्वारे ब्रिटिश सरकारने असाच काही एकाधिकार स्वतःपाशी घेतला होता. त्यांचीच वर्दी घालणार्‍यांना धोरणात्मक हिंसेचा अधिकार होता. तो एकाधिकार न मानणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल आपण आजकाल चांगले बोलतो. त्यामुळे ज्या लोकांना राष्ट्रघटना (व्हिक्टोरियाच्या घोषणेसारखी) धुडकावून लावायची आहे, त्यांनी शासनाचा एकाधिकार अमान्य करण्यास नैतिक जागा आहे. अशा लोकांनी प्रति-पोलिसदल, किंवा प्रति-लष्कर निर्माण केले, भारताची घटनाधिष्ठित शासन उलथवले, तर कदाचित पन्नास-शंभर वर्षांनी त्यांच्याबद्दल लोकांचे चांगले मत असू शकेल. भारताचे हल्लीची राज्यव्यवस्था, राज्यघटना उलथू नये असे माझे मत आहे. हल्लीच्या अराजक-नसलेल्या स्थितीत मला माझा फायदा दिसतो. अशा कुठल्या प्रतिलष्कराविरुद्ध भारतीय घटनेच्या बाजूने लढणार्‍या लष्कराच्या/पोलिसांच्या गृहयुद्धात मी घटनेच्या बाजूने साथ देईन. (अर्थातच घटना अनुमती देईल त्या मार्गाने साथ देईन.)

माझ्या मित्रमंडळींपैकी ज्या तरुणांचे रक्त सळसळते आहे, त्यांना धोरणात्मक हिंसेत भाग घ्यायचा आहे, त्यांना मी पोलिसात किंवा भारतीय लष्करात भरती होण्यास उद्युक्त करेन. जे वर्दी घालायला तयार नाहीत, त्यांनी सळसळणार्‍या रक्तातला जोम दुसर्‍या कुठल्या प्रकारे वापरावा. येथे ऋषिकेश, अदिती वगैरे अशा प्रकारच्या चर्चा करत आहेत. पण तडफदार आणि कल्पक तरुणांना कितीक मार्ग सुचू शकतील. (आणि वैयक्तिक भांडणांत, आणि आपल्या बहिणीशी चाळे करणार्‍या गुंडाशी ते कसे वागतात, त्याचा मी राष्ट्राच्या घटनेशी, हिंसेच्या एकाधिकाराशी काहीही संबंध लावत नाही.) याला "खच्चीकरण" म्हणू नये, असे माझे आनंदयात्री यांना म्हणणे आहे.

धमाल म्हणतात की मिसळपावावरचे तरुण कसेही बोललेत तरी जाणत्या वयस्कर व्यक्तीला मान दाखवतील. त्यांच्याबद्दल (म्हणजे मिसळपावावरील तरुणांबद्दलच म्हणा) माझ्या मनातला मान द्विगुणित झाला आहे.

तात्या म्हणतात, की मी शब्दाचे बुडबुडे उडवत आहे. बहुधा त्यांना असे म्हणायचे आहे, की माझी मते वादमात्र आहेत, प्रामाणिक नव्हेत. तसे नव्हे.

भास्कर केन्डे उदाहरण देतात की अनेक गांधीवादी लोक तत्त्वाला सच्चे नसतात. अमित.कुलकर्णी उत्तर देतात की दुसर्‍या विचारसरणीचे लोकही तत्त्वाला सच्चे नसतात. मी वेगळे उत्तर देतो. राठ तत्त्वाला थोडी मुरड घालून जमेल तितके कुठलेही तत्त्व सांभाळले तर इतके काही वाईट नाही. काश्मीरात दीर्घकाळ कारवाई करत असलेल्या एखाद्या अधिकार्‍याशी तुमची वैयक्तिक ओळख असेल, तर बघा. त्यांच्याशी संवाद साधा. तिथे जाण्याआधी सडेतोड कारवाई करण्याबाबत तत्त्व काय होते? कार्यसिद्धी करण्यासाठी काय मुरड घालावी लागली? याबद्दल माहितीपूर्ण संवाद झाला, तर चांगले. गोवामुक्ती सत्याग्रहांतील काही गांधीवादी वृद्ध अजून जिवंत आहेत. प्रत्यक्ष परिस्थितीत तत्त्वाला काय मुरड घालावी लागली? याबद्दल संवाद झाला तर चांगले. (या दोन्ही प्रकारचे संवाद माझे झाले आहेत. मोठे विचारप्रवर्तक असतात.)

जाताजाता आणखी एक प्रश्न पडतो - लष्करात अधिकारी वर्गात इतके कमी मराठी लोक का दिसतात? माझे सर्व जवळ-दूरचे नातेवाईक झाडून एक सैन्याधिकारी, आणि एक नौदलाधिकारी आहे. अधिकार्‍यांची प्रशाला (एन डी ए) खडकवासल्यात आहे. आपल्या सळसळणार्‍या रक्ताला शिस्तबद्ध प्रशिक्षण देण्याचा मराठी तरुणांनी विचार करावा. मराठी जातींची नावे असलेल्या ज्या रेजिमेंट आहेत, त्यातले शिपाई सर्व त्या त्या जातीलले मराठी लोकच असतात.

माझे लांबलचक प्रतिसाद पुरे झालेत. मला जे सांगायचे होते, ते बहुतेक सांगून झाले आहे.

आनंदयात्री's picture

5 Dec 2008 - 9:34 am | आनंदयात्री

>>माझे लांबलचक प्रतिसाद पुरे झालेत. मला जे सांगायचे होते, ते बहुतेक सांगून झाले आहे.

असेच म्हणतो ... सहमत !! टंकाळा नाय येत कारे सज्जन माणसा ? (छानशी कविता टाक बघु एखादी !!)

आता गंभीर प्रतिसादः जवळपास सर्वच मते पटली, मोकळा वेळ मिळाला अन ज्ञानार्जनाची खाज सुटली की खरडवहीत किंवा व्यनीने चर्चा करेन :D

नितिन थत्ते's picture

6 May 2011 - 6:01 pm | नितिन थत्ते

.