अवलिया

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
1 Dec 2008 - 6:47 pm

मास्तर मिपावर सदस्यांचा संताप पहात होते. सर्व प्रकारचा आक्रोश, वेदना, जळजळ बाहेर पडत होती. भगिनी समाज सुद्धा मागे नव्हता. काही चांगल्या सुचना पण पुढे येत होत्या. त्यावर साधक बाधक चर्चा होत होती. मास्तरना एक जाणवले की ह्या सर्व कोलाहलात त्यांचा मित्र अवलिया अभावानेच दिसत होता. गोंधळले मास्तर. त्यांनी अवलियाशी संपर्क केला. अवलियाने सर्व शांतपणे सर्व आरोप सहन केले. नंतर आपले म्हणणे पुढे मांडले. तो म्हणाला,
मास्तर , गांधीजींचे काय चुकले वा काय बरोबर ह्यावर आता मी काय करु शकतो का?
नाही.
५० कोटी दिले ह्यावर मी काय करु शकतो का- नाही
कुठली तरी मस्जिद पडली त्यामुळे दहशतवाद फोफाळला किंवा नाही- त्याचे मी काय करु शकतो- काही नाही.
मुख्यमंत्री वा गृहमंत्री ह्यानी आपली जबाबदारी पार पाडली नाही- ह्यावर मी काही करु शकतो- नाही
टाटाना अशा हल्ल्याची पुर्वसुचना दिली गेली होती त्यावर त्यांनी काहीही केले नाही-मी काय करु शकतो- काही नाही.
ह्या घटनेला बघुन काहीजण बंदूक उचलायची भाषा करु लागले आहेत. कीती खरे किती खोटे - माहीत नाही.
चिदंबरम आल्यानंतर ह्या परिस्थीतीत एकदम फरक पडेल अशा आशेवर बरेच जण आहेत्-त्याला मी काय करु शकतो.-काही नाही
मला एवढेच समजते की जे माझे रक्षण करायला धावले त्यांच्याकडे स्वःतचे रक्षण करण्याकरिता पुरेसी सामग्री नव्हती. सर्व समाजाला ग्रासलेल्या भ्रष्टाचाराचा हा आणखी एक पुरावा. त्याला मी काय करु शकतो? काही नाही.
ह्या सर्व काही नाही ला माझ्याकडे एक उत्तर आहे. आम्ही एक विचाराची मंडळी एकत्र येउन पोलिस महानिरिक्षकांना १०० बुलेट्प्रूफ जाकिटांची भेट देणार आहोत. १२ मॅग्नम गोळ्याना प्रतिकार करणारी. हा नविन पायंडा पाडताना समाजाने घेतलेला पुढाकार ह्या शिवाय कुठल्याही व्यक्तीला प्रसिद्धी मिळणार नाही हे बघितले जाईल. किंवा अशा कृतीने सर्व सिस्टीम बदलणार असा भोळा भाबडा समज पण नाही. पण ही बदलाची सुरुवात नक्की असेल.
मास्तर निरुत्तर झाले.
५ मिनिटे झाल्यावर त्यांनी "मला पण ह्या योजनेत धरा "असा निरोप पाठ्वला.
वाचकांनी वरील प्रकटन कथा म्हणुन वाचावी. कथानायकाचे मिपा सदस्याच्या आय डी शी साम्य ह्यावर आपापले तर्क लढवावेत. सर्व एक कविकल्पना आहे असे गृहित धरायला मास्तरांची हरकत नाही.
जाता जाता: एक गारुडी होता. त्याने आपली टोपली रस्त्यावर ठेवली. लगेच बघे जमा झाले. टोपली चे झाकण काढताच नागोबा बाहेर आले. लूंगी घातलेल्या गारुडयाने नागासमोर बसकण मारली. गारुड्याने आपल्या पूंगीवर "मेरे देश की धरती" चे गाणे वाजवायला सुरु केले. नाग डोलायला लागला. फुस्कारायला लागला. गारुडी खूश. बघ्याना सांगु लागला, "बघा कसा डोलतोय माझ्या तालावर". पण खरी परिस्थीती अशी होती तो नाग फुस्कारत नव्हता तर सुस्कारे सोडत होता. खेदाने मान हलवत होता.गारूड्याच्या महारोग्याच्या झडणार्-या बोटाप्रमाणे आकूंचित होणार्-या पौरुषाकडे बघुन. मनात म्हणत होता " आता मी तर म्हातारा झालो, माझ्याकडे विष सुद्धा नाही. पण माझ्या नविन दमाच्या पिढीच्या महाभयानक विषासमोर हा कसा टिकणार.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

वेताळ's picture

1 Dec 2008 - 6:56 pm | वेताळ

आम्हालाही सहभागी होता येईल काय? असेल तर खरडवही त्यासंबधात लिहा.
वेताळ

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Dec 2008 - 7:00 pm | बिपिन कार्यकर्ते

मास्तर, कडकडीत.

बिपिन कार्यकर्ते

मदनबाण's picture

1 Dec 2008 - 7:07 pm | मदनबाण

मी पण सहभागी होण्यास तयार आहे.

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

रामदास's picture

1 Dec 2008 - 7:08 pm | रामदास

गाढवं जर गूळ हागतील तर वडारी का हो भिका मागतील ?

विनायक प्रभू's picture

1 Dec 2008 - 7:12 pm | विनायक प्रभू

मला कळले नाही. जमल्यास कृपया खुलासा कराल काय?

रामदास's picture

1 Dec 2008 - 7:23 pm | रामदास

माणसाना लाज असती तर ह्या चर्चेचा उपयोग.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Dec 2008 - 7:38 pm | बिपिन कार्यकर्ते

आता हे वाचल्यावर तरी लोक काही करतील अशी अपेक्षा आहे...

बिपिन कार्यकर्ते

यशोधरा's picture

1 Dec 2008 - 7:38 pm | यशोधरा

जरा सविस्तर लिहाल का? ह्या बाबतीत क्रिप्टीक लिहून काही फायदा नाही. सविस्तर लिहिलेत तर माझ्यासारखे लोक सहभागी होऊ शकतात, आपलाही खारीचा वाटा उचलू शकतात.

लिखाळ's picture

1 Dec 2008 - 10:14 pm | लिखाळ

लिखाळाने अवलीयाला विचारले,
(म्हणजे अवलीया या आयडीला नव्हे, अवलीया ही आपली सद्सद विवेकबुद्धी असु शकेल)

लिखाळ : मी काय करु शकतो?
अवलीया : स्वतःचे काम नीट कर.

लिखाळ : नाही पण एकदम इतकी गडबड झाली आहे, भावनेचा उद्रेक झाला आहे.. म्हणून..आता काय करु शकतो मी?
अवलीया : तुझ्या आसपास पाहा तुला दिसेल की अनेक समाजकार्यात तुझी मनुष्यबळ म्हणून गरज आहे. त्यात सहभागी हो. मुंबईतल्या घटनेने एकदम हालून जाऊन पोलिस, सेना, राज्यकर्ते, त्यावरचे उपाय यापर्यंत वैचारिक आणि कृतीची मजल मारणे झेपत नसेल तर हरकत नाही. रोजच्या व्यवहारात अजून चांगला, कणखर, सत्शिल नागरीक बनण्याचा प्रयत्न कर.
लिखाळ : म्हणजे?

अवलीया : समाजाचा घटक म्हणून तू जेव्हढा जागरुक, सचोटीचा असशील तेवढाच समाज 'जागा' झाल्यासारखे होईल.
लिखाळ : हे तर मी लहान पणापासून ऐकत आहे आणि थोडे वागायचा प्रयत्न सुद्धा करत आहे.
अवलीया : तेच महत्वाचे आहे. तुझ्या कडुन प्रदुषण कमी करणे, तुझ्याकडून नियम पाळले जात आहेत याची खात्री असणे, इतरांना त्याबाबत जागरुक करणे हे तू करत राहा. आणि जे लोक काही चांगले करु पाहत आहेत त्यांना शुभेच्छा आणि प्रोत्साहन दे. तुझी क्षमता आज काय आहे ते पाहून तुला सांगतो आहे. त्या पुढचा मार्ग तुझा तुलाच दिसेल.

सत्कर्मयोगे वय घालवावे
सर्वांमुखी मंगल बोलवावे
हे लक्षात ठेव. समाजकार्याची बरीच शिकवण यात दडलेली आहे.

अवलीयाची आणि तुमची (वाचकांची) गाठ पडली तर तो काय म्हणाला ते जरूर सांगा.
-- लिखाळ.

विनायक प्रभू's picture

1 Dec 2008 - 10:16 pm | विनायक प्रभू

चालतय की- असे अवलिया ने म्हटले आहे लिखाळजी

लिखाळ's picture

1 Dec 2008 - 10:26 pm | लिखाळ

अवलीया बोलका आणि स्पष्ट विचारांचा असल्यामुळे आनंद झाला.
-- लिखाळ.

चतुरंग's picture

1 Dec 2008 - 10:53 pm | चतुरंग

विप्र-लिखाळ जोडी आणि त्यातला संवाद आवडला! :)

(खुद के साथ बातां : रंगा, तुला प्रतिसाद द्यायचा असूनही तू जर दिला नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पयावर लोळू लागतील! असा दम बसल्यावर मी लगेच प्रतिक्रिया दिली! )

चतुरंग

लिखाळ's picture

1 Dec 2008 - 11:04 pm | लिखाळ

>... तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पयावर लोळू लागतील!... <
शंभर शकले (काय हा अतिरेक !) की शंभर गुलाबाची फुले?
-- लिखाळभाई एम बी बी एस.

विसोबा खेचर's picture

1 Dec 2008 - 10:19 pm | विसोबा खेचर

जबरा प्रकटन..!

ऋषिकेश's picture

1 Dec 2008 - 10:47 pm | ऋषिकेश

प्रकटन खूप खूप आवडले विप्रकाका!

-(गोंधळलेला) ऋषिकेश

चतुरंग's picture

1 Dec 2008 - 10:49 pm | चतुरंग

ह्या सर्व काही नाही ला माझ्याकडे एक उत्तर आहे. आम्ही एक विचाराची मंडळी एकत्र येउन पोलिस महानिरिक्षकांना १०० बुलेट्प्रूफ जाकिटांची भेट देणार आहोत. १२ मॅग्नम गोळ्याना प्रतिकार करणारी. हा नविन पायंडा पाडताना समाजाने घेतलेला पुढाकार ह्या शिवाय कुठल्याही व्यक्तीला प्रसिद्धी मिळणार नाही हे बघितले जाईल. किंवा अशा कृतीने सर्व सिस्टीम बदलणार असा भोळा भाबडा समज पण नाही. पण ही बदलाची सुरुवात नक्की असेल.

कर्तव्यदक्ष लोकांची समयोचित, योग्य कृती महत्त्वाची! अभिनंदन!!

चतुरंग

विजुभाऊ's picture

2 Dec 2008 - 9:16 am | विजुभाऊ

मी जर सिस्टीम चा भाग असेन आणि सिस्टीम बदलायची असेल तर कधीतरी मला बदलावेच लागणार आहे.मी काय करु शकतो::::सध्या तरी काही नाही.( सिस्टीमचा तो पार्ट बदलला असेल तेंव्हा मी पण बदललेलो असेन)

आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

विनायक प्रभू's picture

2 Dec 2008 - 12:27 pm | विनायक प्रभू

नक्कीच करु शकता, आणि करणार आहात.

राघव's picture

2 Dec 2008 - 1:39 pm | राघव

मस्त! हा मार्ग आवडला प्रतिक्रियेचा. सुंदर!
मुमुक्षु

वाचक's picture

3 Dec 2008 - 3:51 am | वाचक

स्वकमाईतून दुसर्‍याला काहीतरी द्यावे हा विचार स्तुत्यच आहे पण ह्या बाबतची 'व्यावहारिकताही' लक्षात घेतली पाहीजे. पोलिसांना बुलेटप्रुफ जॅकेट्स देणे ही खरे तर सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारने ती पार पाडलीच पाहिजे. त्या दृष्टीने एखाद्या गटाने पैसे जमवुन १०० जॅकेट्स देण्याने फारसा उपयोग होणार नाही. शिवाय त्यातल्या व्यावहारिक बाजू ही पाहिल्या पाहिजेत म्हणजे दर्जा प्रमाणपत्र, योग्य वाटप सुविधा, कुठल्या पोलिसांना ही मिळणार? हे सरकारच्या नियमात बसते की नाही ? (कारण प्रश्न शेवटी सुरक्षिततेचा आहे) इत्यादी बाबी.
आणि ह्या कृतीचा 'दबाव तंत्र' म्हणुनही फारसा उपयोग होणार नाही
त्यापेक्षा जर मृत्यूमुखी (किंवा जखमी) झालेल्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एखादा ट्रस्ट वगैरे करता आला तर (अर्थात हे फक्त एक उदाहरण झाले - इतर अनेक शक्यता आहेत)
ह्या बाबतीत प्रतिकूल मत व्यक्त केल्याबद्दल आधीच क्षमा मागतो पण तुमची तळमळ जाणवली म्हणून एवढे लिहायचे धाडस केले....