(अनुवादीत. कवी-जावेद अख्तर)
झोपले हे जग , झोपले हे आकाश
झोपल्या या सार्या इमारती, झोपलाय रस्ता!!
रात्र आली तेंव्हा ज्यांची घरे होती
ते घरी गेले आणि झोपले.
रात्र आली तेंव्हा आमच्यासारखे आवारा परत निघाले
आणि रस्त्यातच हरवले.
या गल्लीत, त्या गल्लीत, या नगरात, त्या नगरात
जायचे तरी कुठे ? जायला पाहिजे पण.
काही माझे ऐक, काही तुझे सांग
आहेस इतक्या जवळ तर गप्प नको राहुस.
मी जवळ ही आहे आणि लांब ही आहे.
स्वतंत्रही आहे आणि मजबूरही आहे
का प्रेमाचे ऋतू संपून गेले?
का हे जग आमच्याविरुध्ध जिंकले?
प्रत्तेक क्षण माझे ह्रुदय दु:खात बुडालेले आहे.
आयुष्य आता दूर पर्यंत अंधारात आहे.
झोपल्या या सार्या इमारती, झोपलाय रस्ता!!
कवटी
प्रतिक्रिया
26 Nov 2008 - 5:09 pm | लिखाळ
:) छान अनुवाद !
>मी जवळ ही आहे आणि लांब ही आहे.<
हे वाचताना 'तदेजती तनैजती..तद दूरे..' या उपनिषदातील ऋचेची आठवण झाली. :)
-- (झोपाळू) लिखाळ.
26 Nov 2008 - 6:05 pm | कवटी
श्री लिखाळ,
आपल्याला हा अनुवाद आवडला हे वाचुन बरे वाटले.
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.
कवटी.
http://www.misalpav.com/user/765
26 Nov 2008 - 8:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही ब्वॉ, हा अनुवाद नाही जमला! मी हे गाणं गायला लागले आणि घरवाला उठून पळून गेला हो! ;-)
26 Nov 2008 - 8:22 pm | कवटी
>>नाही ब्वॉ, हा अनुवाद नाही जमला!
शक्य आहे. म्हणतात ना "पसंद अपनी अपनी".
तुमच्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.
कवटी
http://www.misalpav.com/user/765
26 Nov 2008 - 8:19 pm | शितल
>>मी हे गाणं गायला लागले आणि घरवाला उठून पळून गेला हो!
=)) =))
26 Nov 2008 - 8:25 pm | कवटी
शितल,
तुम्हाला ही कविता बरी / वाईट काहीच वाटलेली दिसत नाही.
तरी सुध्धा इथे प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे आभार.
कवटी
http://www.misalpav.com/user/765
26 Nov 2008 - 8:30 pm | शितल
>>>>>तुम्हाला ही कविता बरी / वाईट काहीच वाटलेली दिसत नाही.
तरी सुध्धा इथे प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे आभार.
तशी वाईट ही म्हणता येत नाही आणी आवडली ही म्हणता येत नाही.
म्हणुन काहीच बोलले नाही,
तुम्ही मा़झ्या प्रतिसादाची दखल घेतल्या बद्दल तुमचे धन्यवाद :)