मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झोपले हे जग

कवटी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
(अनुवादीत. कवी-जावेद अख्तर) झोपले हे जग , झोपले हे आकाश झोपल्या या सार्‍या इमारती, झोपलाय रस्ता!! रात्र आली तेंव्हा ज्यांची घरे होती ते घरी गेले आणि झोपले. रात्र आली तेंव्हा आमच्यासारखे आवारा परत निघाले आणि रस्त्यातच हरवले. या गल्लीत, त्या गल्लीत, या नगरात, त्या नगरात जायचे तरी कुठे ? जायला पाहिजे पण. काही माझे ऐक, काही तुझे सांग आहेस इतक्या जवळ तर गप्प नको राहुस. मी जवळ ही आहे आणि लांब ही आहे. स्वतंत्रही आहे आणि मजबूरही आहे का प्रेमाचे ऋतू संपून गेले? का हे जग आमच्याविरुध्ध जिंकले? प्रत्तेक क्षण माझे ह्रुदय दु:खात बुडालेले आहे. आयुष्य आता दूर पर्यंत अंधारात आहे. झोपल्या या सार्‍या इमारती, झोपलाय रस्ता!! कवटी

वाचन 1834 प्रतिक्रिया 0