गाळुनि घाम
करी रात्रनदीन काम
कधी कुलव पाभर
कधी सोबत नांगर
खेळ जीवनाचा त्यानं
असा मातीत मांडला.
मागतो दान दैव
त्याच्याशी भांडला.
धरनी आईच्या कुशीत परितो
सा-या स्रुष्टिच धन
भल्या आभळा एवढ
गड्याच मोकळ मन
बरसती नभ पडतात धारा
धरनी आईच्या कुशीला मग फूटे पाण्याचा पाझर
पेरितो रान सार
मग पुन्हा मुखी पांडूरंगाचा गजर
फुलून येत रान त्याच
जसा मोराचा पिसारा
आता खुलुन आल सपान त्याच
त्याच्या दुखाला थोडा इसरा
फूले त्याच रान
दारी सावकार उभा
७/१२ च्या उता-यावर वाढलेला
पिढयान पिढयानचा तो बोजा .
लड़की लेक त्याची मैना
हाती घेउन गोफन उभी ती पिकात
ओठी गाण्यांची लकेर
पाखरांचा थवा उडे रे तिच्या धाकात
तीच सोळाव सरल...
घोर बापाच्या जिवाला
गिळन्या काळजाचा घास,
मेला सावकार तो धावला.
तेच पड़कं घर
मोडकं त्यांच दार
अन गळकं छप्पर,
दारी उभी सुनी गुरांची दावन .
बळी राजा गाडून मातीत
इथे हसतो रावन
सावकार बैंक
दारी लेकीच लगीन
संग पोराची पढाई
एकटाच देतोय दारिद्र्याशी लढाई .
साखारिचे भाव इथे गगनाला भिडे
भाव द्यायला उसाला सदा सरकार रडे.
कापसाच सोन पिकत मळ्यातरे ज्याच्या
दोन वारं नवं कापड नाही सरणावर त्याच्या
रात्रं दीन राबतो हां मळ्यातरं त्याच्या
दलाल खातात मलाई
फाशीचा फंदा पड़े गळ्यात रे ह्याच्या
करितो काम गाळीतो घाम
पुढा-यांच्या सदा मोठाल्या उड्या
बलिराजा गाडला मातीत
परी मंत्र्याना इथे नव्या को-या गाड्या .
फ़क्त पॅकेज जाहिर
फुक्या मदतीच्या घोषणा
कोण निजतो उपाशी कुणाची भागते तृष्णा ?
वीटे जिव त्याचा
त्यान बाभळीला टांगला
आत्महत्तेचा प्रश्न केवल
संसदेच्या चर्चा सत्रात रंगला
बळी राजाच कवडी मोलापरी जिन
परी प्रेताला मिलतो लाख मोलाचारे भाव
प्रतिक्रिया
26 Nov 2008 - 10:24 am | मनस्वी
ग्रीष्म, कविता आवडली.