माझी पहिली क्रिकेट मॅच...

राम दादा's picture
राम दादा in जनातलं, मनातलं
25 Nov 2008 - 6:06 pm

१० वी ला होतो...आपण कधी क्रिकेट खेळत नव्हतो..पण असे ठरले होते की प्रत्येक वर्गातला एक संघ असायला पहिजे..मग काय मला पण नाईलाजाने घेतले..दोन दिवस प्रक्टिस केले...कॅप्टन च्या लय शिवा खालल्या..पण करणार काय्...एक कॅच नाय का एक रन नाय्...पण आपल्याला रावल्याची बॅट लय खास वाटली..त्या बॅटने मी एक फुल सिक्स मारला होता..बॅट हातात बसली होती..
.
प्रॅक्टिस थोडीसी झाली होती...थोडाफार टुकुटुकु खेळु शकत होतो असे दिसत होते..

आणि मग काय मॅच चा दिवस आला.....पहिली बॅटिंग विरोधी टीम ची १० ओव्हर ८४ धावा काढल्या...आणि मी ८४ हजार खाल्ल्या शिवा..साला मी जिथे उभा होतो तिकडेच बॉल हवेत यायचा....एक नाय दोन नाय ६ कॅच सोडले मी..फक्त एकच कॅच पकडला..पण कुनी दाद नाय दिली...सगळे फुल उदास झाले होते...माझ्यावर्..मी अपराध्यासारखा गप होतो..

त्यात एक ओव्हर बॉलिंग पण फकली होती...बाँड्री वर बाँड्री हाणली होती ...२० एक धावा दिल्या...एकंदरित आज मी खुप शिवा खाल्ल्या होत्या..

आता बॅटिंग सुरु झाली...आधीच सगळे प्लयर नाराज होते...त्यात कोणीच एकाग्र नव्हते...पहिल्या ओव्हर मध्ये शाम्या आऊट झाला..टीम मधला सगळ्यात भारी प्लेयर्..सगळी टीम हादरली...५ ओव्हर मध्ये ४७ धावा ७ बळी..हालत खराब..आपण ९ नंबर वर बॅटिंग करायला जाणार होतो..आली वेळ ..छातीत धडधड करत होते..घाबरुन गार ..मी बॅटिंगला उठल्यावर सगळे माझ्याकडे असे बघत होते की आता मॅच आपल्या हातातुन गेली....मी तसाच गेलो पीच वर हातात बॅट आणि समोर फास्टर बॉलर्..बालर फुल स्पीड मध्ये बॉलिंग साठी येतोय्..आणि मी स्ट्राईक वर..बोलर बॉल टाकणार याकडे सगळयाचे लक्ष होते...तेव्हढ्यात मी हात वर केला आणि बॉलर ला थांबवले..
क्रमश:..

क्रीडाअनुभव

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

25 Nov 2008 - 6:11 pm | महेश हतोळकर

क्रमशः बद्दल. बाकी प्रतीसाद मॅच संपल्यावर

जैनाचं कार्ट's picture

25 Nov 2008 - 6:37 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>वाढदिवसाच्या शुभेच्छा!

=))

सही ! हेच म्हनतो !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

कपिल काळे's picture

25 Nov 2008 - 7:26 pm | कपिल काळे

त्याचा वाढदिवस आहे ते कसं काय समजलं बुवा?

खुद के साथ बाता: मिपावर प्रकाशनपूर्व प्रशासकीय अनुमतीची आवश्यकता आहे काय?

http://kalekapil.blogspot.com/

टारझन's picture

25 Nov 2008 - 7:54 pm | टारझन

त्याचा वाढदिवस आहे ते कसं काय समजलं बुवा?

वो एक बडी लंबी कहानी है .... फिर कभी ... (ड्वायलॉग हिंदीत आहे ... क्षमस्व)

तुमचा लेख ................. (क्रमशः)

- टारझन

सुक्या's picture

26 Nov 2008 - 1:16 am | सुक्या

काहीतरी नवीन विषय आहे म्हनुन वाचायला घेतलं मी म्हटलं आता प्रतीसाद लिहुनच टाकतो ..
पहीला शब्द लिहीला अन् . . .
.. क्रमशः
-- बाकी प्रतीसाद पुढच्या भागात. . .
सुक्या (बोंबील)
(क्रमशः चा गेम कसा करावा या विचारात)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

26 Nov 2008 - 10:12 am | घाशीराम कोतवाल १.२

मग लिवता कशाला :?
क्रमशः
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

राम दादा's picture

26 Nov 2008 - 12:45 pm | राम दादा

हा लेख मी कामाची सुट्टी होत असताना लिहला...ट्रेनचा टाईम झाला..मग पुर्ण करु शकलो नाही...म्हणुन क्रमशः आले...त्याबद्द्ल मी सरळ माफी मागतो.....लेख लवकरच पुर्ण करीन..

राम दादा..

अनिल हटेला's picture

26 Nov 2008 - 1:29 pm | अनिल हटेला

सर्वाना अडचणी असतात ,वेळेचा आभाव म्हणा किवा अजुन काही...
पण अस क्रमशः पाह्यले ना की उर अगदी भरून येतो....
कितीही चांगले लिखाण असले तरी वाटतं ,झक मारली आणी हे वाचायला घेतलं ...
त्यामुळे वैयक्तीक रीत्या क्रमश: मंडळीना प्रतीसाद देण च बंद केलये...
बाकी चालू द्यात.....

(क्रमशः वैतागलेला)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..