मोगँबो - ५

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
30 Mar 2020 - 4:47 pm

तिथल्या माणसानेअगोदर मला जवळजवळ हाकलूनच दिले. बराच वेळ थांबल्यावर त्याला माझी दया आली असावी. त्याने आतल्या एका माणसाला विचारले आतल्या माणसाने परळ च्या पोस्ट ऑफिसात विचारा परळचे पोस्ट ऑफिस उद्या सकाळी उघडेल म्हणून सांगीतले.
मी पुन्हा दादर स्टेशनवर आले. त्याच प्लॅटफॉर्मवर रंजन ताईची वाट पहात राहिले.
रंजन ताई जीना उतरत कोणाबरोबर तरी येत होती.

रंजन ताईने मला हात केला. मीही केला. तीच्या सोबत असलेल्या दाट कुरळे केस , असलेल्या त्या काळ्या कुळकुळीत माणसाशी ती कसल्याशा कानडी भाषेत बोलत होती. तो माझ्या कडे बघत मान हलवत होता.
रंजन ताईने मग माझ्याशी ओळख करून दिली. ये कुट्टी आण्णा है. इदर तेरेकु काम दिला सकता है. तेरेकु क्या क्या आता है इसकु बोल. मग मी त्याला मला लिहीता वाचता येतं शिकलेली आहे हे साम्गितले. कसलेही काम करायला तयार आहे म्हणून सांगितले. त्यावर तो अच्चा सीखा तुम तो आपीस मे काम कर सकता है. सुबे आता है. तैय्यार रैना. म्हणून निघून गेला. सकाळपासून पोटात काहीच गेले नव्हते. कसले काम वगैरे विचारायचे भानच नव्हते. रंजन ताईने काहितरी खायला आणले. खाता खाता ती कसले काम करते हे विचारले. त्यावर ती कसनुसे हसली. तोंड दुसरी कडे फिरवून म्हणाली इधर उधर घुमती हुं गुजारा हो जाता है.
दैवाने तीच्यावर अन्याय केलाय त्यामुळे इज्जत की रोटी कमवायची इच्छा असूनही हे असले जगणे वाट्याला आलंय. म्हणत डोळ्यातले पाणी लपवत पुन्हा एकदा हसली. हसताना तीच्या चेहेर्‍यावरचे दाढीचे खुंट गालभर पसरले.
तीला काय वाटले कोण जाणे तीने माझ्या चेहेर्‍यावर हात फिरवले. आणि काहीतरी पुटपुटली. पाव आणि सोबत कसलीशी भाजी खाऊन त्या दिवशीही मी तिथेच झोपले. जाणार तरी कुठे. माझ्याकडे पांघरुणच काय पण कपडेही नव्हते.
दुसर्‍या दिवशी रंजन ताईने मला घालायला एक ड्रेस दिला कुट्टी अण्णा सोबत ऑफिसात जाण्यासाठी. कुट्टी अण्णा ला तीने सांगितले अण्णा ये मेरी छोटी बहन है. इसको ऐसा वैसा काम मत दिलाना.
कुट्टी अण्णाबरोबर कोणत्याशा ऑफिसमधे गेले तेथे साफसफाईसाठी त्याना बाई हवी होती. माझ्या इतके शिकलेली बाई उपयोगाची नव्हती. कुट्टी अण्णा मला दादरस्टेशनचा रस्ता दाखवून निघून गेला. संध्याकाळी प्लॅटफॉर्म वर एक बाई दिसली. ती काल ही प्लॅटफॉर्मवर दिसली होती. भडक मेक अप केलेला . काहीतरी विचीत्र वाटले तीच्या कडे बघून, माझ्या कडे बघत होती. तीच्याकडे पाहिल्यावर हसली. आणि माझ्याकडे आली.
क्या रे इधर क्या करती. ऐसेच रैती हय क्या इदर . तेरेकु काम चाहिये ना तो मै दिलाती हुं ना कुट्टी आण्णा के पास कायकु गयी थी. मै लगाती हुं ना तेरेकु कामपे. इत्ती अच्छा दिखती है जवान है तो कामा भौत मिलेंगे. और इन्शाला बन जाये ना तो बडे बडे लोगां के ह्या बी कामा मिलेंगे. उन्को चाहियेच होती है लडकिया. तेरे जैसी.
मला काही कळेना, ती बाई माझी काहीतरी मदत करणार आहे इतकेच कळाले. तीने मला स्वच्छ चेहेरा धुवून यायला सांगितले. चेहेरा धुवून आल्यावर मला स्वतःजवळची पावडर लावायला दिली. आणि लिपस्टीक ही लावली. इतके झाल्यावर तेथून लांब जाऊन तीने मोबाईल वरुन कुणाला तरी फोन लावला. त्या नंतर माझ्याशी बोलत राहिली. तीने मला काम देणारा तो माणूस आहे त्याला बोलवले आहे . त्याची भेट घालून देते. म्हणाली.
थोड्या वेळाने एक माणूस आला. पान खाऊन दात पूर्ण तांबडेलाल झाले होते. त्याचे डोळे बघून मला भीतीच वाटली. माझ्याकडे अगदी विचीत्र नजरेने पहात तो उभा राहिला. आख्खं अंग लपवून ठेवावं वाटत होत मला.
तो काहितरी बोलणार इतक्यात रंजन ताई येताना दिसली. रंजन ताईला पाहिल्यावर तो माणूस चपापला मै कल आता हुं म्हणत तेथून पटकन निघून गेला.
दुसर्‍या दिवशी रंजन ताई निघून गेल्यावर ती बाईआणि तो माणूस पुन्हा तिथे आले. त्या बाईने मला पुन्हा चेहेरा धुवून पावडर लिपस्टीक लावली. आणि दोघे काहितरी बोलू लागले. त्या बाईने मला तीच्या मागे यायला सांगितले. माझ्या हातात एक पर्स दिली. त्यात पावडरची एक डबी आणि लिपस्टीक ठेवून दिली.ये मेरी तरफसे तुमको मुबारक . अब इसके साथ जावॉ ये दिखा देगा तुमको काम किधर करनेका वो.
मी त्या माणसामागे गेले. स्टेशन बाहेर च्या रस्त्यावरून एका बाजूच्या गल्लीत आम्ही गेलो. तिथे एक कसलीशी जुनाट इमारत होती . एका खोलीचे कुलूप काढून त्याने मला आत यायला सांगीतले. हे कसले ऑफिस मी विचारले. त्यावर तो पुन्हा त्याचे रंगलेले दात दाखवत हसला. आणि म्हणाला ये ओफीस नही. वो ऑफिसवाले इधर आके तुमके ऑफीस मे ले जायेंगे तुम इधर रुको मै तुम्हारे लिये कुछ खाने को लेके आता हु, वो लोग आने तक कुछ खा लेना.

तो दार बंद करुन निघून गेला. नुसते बंद करूनच नव्हे तर बाहेरून कडीपण लावल्याचा आवाज आला. मला भिती वाटायला लागली. लहानपणी कधितरी टीव्हीवर पाहिलेल्या पिक्चरमधली गोष्ट आठवायला लागली पुढे काहितरी भयंकर होणार आहे याची जाणीव झाली. हा माणूस काम द्यायचे नाटक करून आपल्याला फसवतोय. काहितरी करायलाच हवे, त्या खोलीला एक खिडकी होती . ती उघडायचा प्रयत्न केला. पण एकदम ज्याम होती. कधी उघडलीच नसावी. त्या खोलीत एक पलंग त्यावर मळकट चादर आणि एक बाथरूम होते. मला बसायला एक तोडकी मोडकी खुर्ची.
तो माणूस यायच्या आत इथून पळून जायला हवे. खिडकी उघडतच नव्हती इथून बाहेर जायचा काहीतरी मार्ग शोधायलाच हवा.
मी दारापाशीच उभी राहिले..
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

30 Mar 2020 - 7:04 pm | प्रचेतस

खतरा झालाय हा भाग.

विजुभाऊ's picture

1 Apr 2020 - 6:57 am | विजुभाऊ

मागील दुवा लिहायचा राहीला.
मोगँबो ४ http://misalpav.com/node/46304

विजुभाऊ's picture

1 Apr 2020 - 7:42 am | विजुभाऊ

पुढील दुवा मोगँबो ६ http://misalpav.com/node/46323