गावाकडच्या गोष्टी 1

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
11 Feb 2020 - 10:35 pm

गावाकडल्या गोष्टी 1

लहानपणी म्हणजे तिसरी चौथीत असताना पतंग नव्हती उडवता येत.पण कटलेल्या पतंगी पकडण्याचा आणी मांजा गोळा करण्याचा भयंकर सोस होता.

एखादी पतंग पकडली की मी तीचा मांजा वितावर आठ्या घालुन घरी आणायचा .आणी काकाच्या आसारीला तो गुंडाळायचा.माझ्या काकाला पतंग उडवायचा नाद होता.पण त्याच्या आसारीला असलेला सगळा मांजा मीच आणलेला असायचा.त्याबदल्यात निलकमल थिएटरात बच्चनचे सिनेमे बघायला मिळायाचे.काकाची वट होती तीथे.दर शुक्रवारी मला न्यायचा .

एकदा घराच्या वर्हंड्यावर असलेल्या पत्र्यावर उतरुन जांभळात अडकलेली पतंग सोडायच्या प्रयत्नात गंजलेला पत्रा फाटुन दहा फुटावरुन वर्हांड्यात ढुंगणावर आपटलेलं आठवतय .

गंजलेला पत्रा बरगड्यांना घासलेल्या आणी शर्ट फाटलेल्या अवस्थेत आम्ही दारासमोर फतकल घालुन आजोबांच्या शिव्या खाल्ल्या होत्या.आणी तसंच डॉक्टर कडे जाउन धनुर्वाताचं इंजक्शन भोसकुन घेतलं होतं.

मांज्याचे गुंते सोडवता सोडवता आयुष्यातले गुंते कधी सोडवायला शिकलो समजलंच नाही.

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

कंजूस's picture

12 Feb 2020 - 9:58 am | कंजूस

माझा धाकटा भाऊ पतंग छान उडवायचा, मी पतंग बनवायचो.
पूर्वी केबलचे जाळे, गच्चीतल्या अंटेना आणि ओवरहेड वायर्स मुंबईत नव्हते. पतंग अडकायचे नाहीत.