वेडा कुंभार

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
13 Nov 2008 - 7:31 pm

हे प्रकटन सर्व मिपा सद्स्यांच्या मागणीवरुन. हा लेख सर्व सदस्यानी वाचावा अशी प्रामाणिक इच्छा. ह्या वरचे प्रतिसाद आणि चर्चा तुमची मर्जी.
There will be times when people whom you help will turn you into God, Allah,Christ all rolled into one. Be careful of this situation because you are only human being.
हे आमच्या साहेबाचे वाक्य मी कधीच विसरत नाही. आजही नाही. त्या सात वर्षात मी माणुस कमी घाणुस जास्त बाघितले. त्यापैकी एक अनुभव.
आई, वडिल आणि मुलगी समोर खुर्चीवर बसले होते. मुली करिता आले होते. अगदीच लहान मुलगी होती. ११ वर्षाची असावी.
मी: बोला, काय त्रास आहे.
आई: पोटात दुखते आहे मुलीच्या.
मी: वय काय?
आई: कालच दहावा वाढदिवस झाला.
मी: पाळी सुरु झाली का?
आई: नाही हो,अजुन लहान आहे. फॅमिली डॉक्टर म्हणतात कि पोटात कसला तरी गोळा आहे.
मुलगी निरागस दिसत होती. अवयवाची वाढ दिसत नव्हती. संशय यायचे काही कारणच नव्हते. गायनॅक डॉक्टर चे केस पेपर वर नाव घालुन त्यांना बसायला सांगितले. मुलगी खुर्चीवरुन उठली आणि उठ्ण्याची पद्धत बघुन डोक्यात कळ आली. वेड्या कुंभाराची आळ्वणी केली,नको रे बाबा नको-दुसरे काहीतरी असु दे. पटकन डॉक्टरचे नाव बदलले,
आणि असल्या किचकट केसेस च्या स्पेशालिस्ट चे नाव घातले. ह्या डॉक्टरची आणि माझी वेवलेंग्थ चांगली जुळायची. सगळी नजरेची भाषा. त्यामुळे बरेच अनर्थ टळायचे.तपासणी झाली. डॉक्टर बाहेर आला. नजरेनेच ती मुलगी गर्भार असल्याचे सुचविले. तोंडाने १०+ (अडिच महिने) म्हणाला आणि पुढच्या ऑपरेशन साठी निघुन गेला.
आता पोटात गोळा आला माझ्या. आता त्या आईचे सांत्वन करायचे तरी कसे. अगदीच सात्विक दिसत होती आई . शेवटी मनाचा हिय्य्या केला आणि परिस्थिती कळवली.
आईने लगेच हंबरडा फोडला. सर्व हॉस्पिटल स्तब्ध. बाबा लगेच हायपर. कुठे शेण खाल्लेस चे स्टँडर्ड डायलॉग. वर उचललेला हात मी मधेच धरला. तमाशा लगेच थांबवायचे माझ्यावर बंधन होते. ठेवणीतला आवाज काढून हिंसाचार तिथेच थांबवला.
आता हीच केस कुठे दुसरी कडे गेली असती तर हे घर सुमारे २०००० रुपयाला नाडले गेले असते. ७० च्या दशकात ही रक्कम फार मोठी होती. मुलीला एडमिट करुन दुस-या दिवशी गर्भपात करायचे ठरले. तसे एडमिट करायची गरज नव्हती. सकाळी बोलवता आले असते. पण मुलीचा घरी जाउन पडणारा मार मला वाचवायचा होता.
दुस-या दिवशी सगळे निट पार पडले. पेशंट घरी जायची वेळ आली. आता प्रष्न हा होता की हे कोणी केले? कायद्याने हा प्रष्न गर्भपात व्हायच्या आधी विचारायची परवानगी नसे. पण परत हा प्रसंग येउ नये ह्याची काळजी पण घ्यायला हवी होती. आई बाबाना मी समजाउन सांगितले की आपण हे ५ दिवसानंतरच्या विझिट मधे सोडवू.
अशा गुंतागूतीच्या केसेस फक्त माझ्याकरिता राखून ठेवल्या जात. ५ दिवसानंतरची तपासणी झाली. सर्व काही ठीक होते. मी सांगुन सुद्धा ५ दिवस त्या मुलीचा कोण ह्या प्रष्नावरुन खूप छ्ळ झाल्याच्या खूणा मला स्पष्ट दिसत होत्या. पण मुलीने नाव सांगितले नव्हते. ती जबाबदारी माझ्यावर आली. साधारण १ तास वेगवेगळ्या प्रकारानी विचारणा झाल्यावर मुलीने शेवटी नाव का सांगु शकत नाही ते सांगितले. तीला देवावर हाथ ठेवुन आईची शपथ घालण्यात आली होती. नाव फोडलेस तर आई मरेल ची धमकी. भोळा जीव घाबरला आपल्या आईकरिता. आता काय करायचे. मी शक्कल लढवली. चल तू तोंडाने सांगु नकोस. मी नावे घेतो. हो असेल तर पापण्या हलव. तुझी शपथ पण राहिली आणि तुला परत असा त्रास होणार नाही. मुलगी तयार झाली. साधारणपणे ह्या परिस्थितीला कोण जबाबदार असते ते मला बरोबर माहित होते. मी रांगेने नावे घेतली.

१. घरगडी.
२. काका
३. मामा
४. शेजारी मुलगा
५. भावोजी.- आणि मुलीने पापण्या हलवल्या.
ताईला माहिती आहे का? परत पापण्या हलल्या.
ह्या मुलीला आपले काय चुकले ते कधी कळलेच नाही. सुट्टीला ताईच्या सासरी गेली असताना ३ वेळा भावोजीने गुदगुल्या केल्या एवढेच. भावोजी ने सांगितलेले अयकायचे ही सुचना होती ना. आणि मी वेड्या कुंभाराला हात जोडले.
आज ३० वर्षानी सुद्धा हा अनुभव पाठ सोडत नाही. जीव कालवतो. आजही परिस्थिती बदलली आहे असे मला नाही वाटत. झालेच तर वर सांगितलेले नंबर बदलत असतील.
साली आधी घरवाली हे मी विनोदाने सुद्धा म्हणत नाही.
जाता जाता: आईने जावयाला संशय येउ न देता मुंबईला बोलवून घेतले. आणि त्याची अक्षरशः चपलानी पुजा केली. ह्या पूजेला मला आमंत्रण होते. आणि मी साहेबांची परवानगी घेउन गेलो होतो. मला इच्छा असुन सुद्धा हाथ धुवायला मिळाले नाहीत एवढी सांग्रसंगित पुजा झाली.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

13 Nov 2008 - 8:00 pm | छोटा डॉन

प्रभुसरांच्या लेखणीतुन उतरलेले एकेक अनुभव वाचुन सुन्न व्हायला होतं.
आता "ह्या "प्रकाराला कशाची उपमा द्यायची ते कळत नाही, काही चपलख असे सुचत नाहीये सध्या, वाचुन सुन्न झालो हे नक्की ...

त्या मुलगी "ज्या प्रकारातुन" गेली तिचा तिला अर्थ सुद्धा कळाला नसेल.
सर्व क्षणीक मोह, अविचार, अजाणतेपणा, औत्सुक्य ( कदाचित ) ह्याचा परिणाम ...
दोष कुणाला द्यायचा ? त्या अविचारी ( नराधम कम ) भाऊजींना ? आपल्या बहिणीची काळजी न घेऊ शकणार्‍या मोठ्ठ्या बहिणीला ? त्या अजाण, निष्पात जीवाला ? का "भाऊजींनी सांगितलेले ऐकायचे" असे धडे देणार्‍या पालकांना ???

नाही, दोष द्यायचा तो आपल्या समाजव्यवस्थेला ...
त्या मुलीला कमीत कमी एवढे तरी "लैंगिक शिक्षण" नको का तिला कळावे आपल्याला नक्की काय होत आहे ? तिला ह्यातला धोका / गुन्हा / अपराध कळणार कसा ?
अशा परिस्थीतीत लहान उमलत्या वयात "लैंगिक शिक्षण" जर अनिवार्य केले तर त्यात चुक काय ?

साली आधी घरवाली हे मी विनोदाने सुद्धा म्हणत नाही.

लाख मोलाची बात !!!

( अस्वस्थ ) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री's picture

14 Nov 2008 - 3:41 pm | आनंदयात्री

सुन्न झालो.

आपण वेडा कुंभार हे नावही अत्यंत समर्पक दिले आहे, बर्‍याच वेळाने अर्थ ध्यानी आला.

टारझन's picture

13 Nov 2008 - 8:13 pm | टारझन

फक दॅट बास्टर्ड !! द ऍसहोल शाल बी पनिशड विथ अ रेड हॉट रॉड इन हिज .....................
भावना न आवरल्याने आणि मराठीत अजुन ज्वलंत दिसल्या असत्या म्हणून पुन्हा इंग्रजीचा सहारा घेत आहे.
प्रभुसाहेब ,फारच कळवळलोय हो ... खरच ... एखादा उनाड समजु शकलो असतो , पण एक विवाहीत ? शिवाय बायकोची साथ ?
अशावेळी मला इस्लाम धर्माच्या शिक्षा योग्य वाटतात. तुमच्या व्यवसायामुळे तुम्हाला कशाकशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं असेल ...

तुम्ही मिपाचे भिष्म पितामह आहात जे बाणांच्या बेडवर आराम करत आहेत.

मुक्तसुनीत's picture

13 Nov 2008 - 8:13 pm | मुक्तसुनीत

संवेदनशील विषय. सुन्न करणारा अनुभव.

काही प्रश्न.

१. "भावोजींची" केवळ चपलांनी पूजा झाली असेल तर माणूस हातोहात सुटला असे म्हणायला हवे. चपलांनी पूजा हा तर केवळ प्रारंभ असायला हवा. या माणसाला अटक, केस , शिक्षा यापैकी काही झाले की नाही ? अर्थातच माझा प्रश्न "भावोजीं"बद्दलचा नसून , एकूण व्यवस्था कितपत परिणामकारक काम करते आणि सामाजिक परिस्थिती कशी आहे यावर आहे.

२. प्रबोधन आणि कायद्याचा बडगा (डेटेरन्स ) या गोष्टी बरोबरीने चालल्या तर आणि तरच परिस्थितीमधे सुधारणा होणार. प्रबोधन जितके कमी तितकी उगवत्या पिढ्यांमधून असली श्वापदे निर्माण होण्याची शक्यता जास्तजास्त. कायद्याची व्यवस्था परिणामकारक नसेल तर असली श्वापदे गुन्हा करून मोकाट रहाणार.

छोटा डॉन's picture

13 Nov 2008 - 8:31 pm | छोटा डॉन

मुक्तसुनीतरावांचे प्रश्न अतिशय योग्य आणि चपलख ...

अर्थातच माझा प्रश्न "भावोजीं"बद्दलचा नसून , एकूण व्यवस्था कितपत परिणामकारक काम करते आणि सामाजिक परिस्थिती कशी आहे यावर आहे.

अगदी बरोबर , प्रश्न हा "एकट्या व्यक्तीचा" नसुन "समाजाच्या मानसीकतेचा" आहे.
गुन्ह्याची मुळे अथवा एखाद्याला गॄहीत धरण्याची भावना जर सर्वसामायीक असेल तर ह्या मुद्द्याचा विचार करताना "सर्व समाजाचे प्रबोधन" सक्तीने प्रबोधन आवश्यक असा सुर निघाल्यास आश्चर्य वाटु नये.
अशा परिस्थीतीत "सो कॉल्ड अमानवी शिक्षा करणारा तालिबान" हाच कसा योग्य उपाय आहे ही भानवा येते ...

कायद्याची व्यवस्था परिणामकारक नसेल तर असली श्वापदे गुन्हा करून मोकाट रहाणार.

सहमत ....
पण प्रभुसरांने दाखवलेले हे एक "हिमनगाचे वरचे टोक" आहे, खरी वास्तवीक परिस्थीती फार भिषण व भयानक आहे.
मधुन आधुन पेपरामध्ये येतेच ना ते.
सर्व समाजाचेच प्रबोधन आवश्यक !!!!

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

सुमीत भातखंडे's picture

13 Nov 2008 - 8:19 pm | सुमीत भातखंडे

प्रभुसरांच्या लेखणीतुन उतरलेले एकेक अनुभव वाचुन सुन्न व्हायला होतं.
असेच म्हणतो.
shocking experience.

या माणसाला अटक, केस , शिक्षा यापैकी काही झाले की नाही ?
हाच प्रश्न मलाही पडला.
कदाचित झाल्या प्रकाराची जास्त वाच्यता नको म्हणून प्रकरण जास्त वाढवल नसेल.
पण ह्या पेक्षाही कडक शिक्षा त्या माणसाला व्हायला हवी होती.

मुक्तसुनीत's picture

13 Nov 2008 - 8:31 pm | मुक्तसुनीत

कदाचित झाल्या प्रकाराची जास्त वाच्यता नको म्हणून प्रकरण जास्त वाढवल नसेल.

सामाजिक प्रतिष्ठा , तथाकथित अब्रू , बोभाटा , वाच्यता या गोष्टी पोटच्या पोरांच्या निरागसतेपेक्षा आणि सुरक्षिततेपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत काय ?कधी सोडणर आहोत आपण या खोट्या झूली ?

चतुरंग's picture

13 Nov 2008 - 8:46 pm | चतुरंग

आपल्या समाजव्यवस्थेमधे ह्याचं उत्तर आहे! तो काळ १९७० च्या दशकातला आहे हे लक्षात घ्या.
एकतर मुलीची काही चूक नसताना तिचं पुढचं आयुष्य बरबाद होणार - इतकं की तो आधी झालेला अत्याचार परवडला पण पुढचे जिणे नको!
ती लग्नाच्या वयाची झाल्यावर लग्न कोण करणार - बोभाटा करुन सगळ्यांची अब्रू टांगली जाणार - पोटच्या गोळ्याच्या आयुष्याचे धिंडवडे अजून नकोत म्हणून आई-बापाला असा निर्णय घ्यावा लागला असणार. नाहीतर काय त्या जावयाला मारुन टाकावे इतका राग आला नसेल काय त्यांना?
सगळीकडून तोंड दाबून बुक्क्यांचा मार!!

चतुरंग

लिखाळ's picture

13 Nov 2008 - 8:16 pm | लिखाळ

वाचले.
सुन्न झालो. तुमच्या सारख्या लोकांच्या कामाला समाजस्वास्थ्यासाठी किती महत्त्व आहे ते समजले.
तारे वरची कसरत आहे.

असे डोक्याचा इस्कोट करणारे वाचले की स्वतः प्रतिसाद लिहिण्याऐवजी कुणाला तरी 'सहमत' होणे जास्त सोयीचे आहे. लिहायला सुचत नाहिये.
-- लिखाळ.

यशोधरा's picture

13 Nov 2008 - 8:22 pm | यशोधरा

लहानग्या मुलीसाठी जीव कळवळला... किती भयानक आहे हे... :(
तो नालायक माणूस फक्त चपलेच्या मारावरच सुटला का?

विनायक प्रभू's picture

13 Nov 2008 - 8:35 pm | विनायक प्रभू

साहेबानी बरोबर एक सिवील ड्रेस इन्स्पेक्टर दिला होता. गुदगुल्या यंत्राची कायमची व्यवस्था करायची सुचना होती. पण शेवटी बोभाटा झाला असता आणि मुलीच्या पुढच्या आयुष्याचा प्रष्न होता. पण येता येता एक लाथ घातलीच नेम धरुन यंत्रावर त्या इन्स्पेक्टर ने.

चतुरंग's picture

13 Nov 2008 - 8:38 pm | चतुरंग

मुलींवरचे अत्याचार फार लवकर सुरु होतात, वयाच्या ३-४ वर्षापासून पुढे कधीही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले!

विप्रदेवा असे विषाचे किती घोट पचवलेत हो? विषाने फक्त गळाच काय संपूर्ण अंग निळे झाले असेल आतापर्यंत तुमचे!

७५ ते ८० टक्केवेळा अगदी जवळचे नाते जसे काका, मामा, आजोबा, भावोजी, शेजारचे काका, बापाचा मित्र असेच लोक असतात. पूर्ण अनोळखी व्यक्ती सहसा नसतेच. अत्याचार हा असा बलात्काराच्या स्वरुपातच असायला हवा असेही नाही. उमलत्या वयात अंगाला हात लावणे. वडीलकीच्या नात्याने उगीचच जवळ घेऊन कुरवाळणे, सारखे गालगुच्चे/पापे घेणे असल्या प्रकारात सुद्धा मुलांना साधे आणि सहेतुक/कामुक स्पर्श लगेच समजतात. मुलं अस्वस्थ वाटली तर त्यांच्याशी बोला, ती जे काही सांगतील त्यात विश्वास मुलांवर ठेवा - मोठ्यांवर नको!

मुलीला एकटे न सोडणे हा उपाय, अतिशय अवघड पण तिला समज यायच्या वयापर्यंत हे काळजावरचे ओझे बनते हे नक्की. हल्ली तर मुलांनाही एकटे सोडून चालत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे!
(ओळखीचे लोक, मित्र, नातेवाईक, काका, मामा कोणीही नाही - दुर्दैवी आहे पण पुढचे अनर्थ टाळायचे असले तर इलाज नाही!)

मुला-मुलींना अगदी लहानपणीच ३-४ वर्षाचे झाल्यावरच समजावून सांगावे की कोणीही त्यांच्या 'खाजगी' भागांना हात लावलेला खपवून घ्यायचा नाही - अपवाद - काही इजा वगैरे झाली असेल तर आई-बाबा आणि आई-वडीलांच्या किंवा पालकांच्या उपस्थितीत तपासणीसाठी डॉक्टर!

माझ्या ६ वर्षाच्या मुलाला हे सगळे शिकवलेले आहे. आम्ही वॉलमार्ट सारख्या मोठ्या दुकानात खरेदीला जातो तेव्हा एकतर मी त्याच्या बरोबर असतो किंवा ही तरी. एकट्याला सोडता येत नाही. कोणताही आजूबाजूला फिरणारा सभ्य दिसणारा माणूस लांडगा असू शकतो!

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

13 Nov 2008 - 8:54 pm | मुक्तसुनीत

चतुरंग , एकूण एक मुद्दे अचूक.

मला केवळ एका गोष्टीची यात भर घालायची आहे :

७५ ते ८० टक्केवेळा अगदी जवळचे नाते जसे काका, मामा, आजोबा, भावोजी, शेजारचे काका, बापाचा मित्र असेच लोक असतात.

श्री. प्रभू याची साक्ष देऊ शकतील ; पण दुर्दैवाने , या यादीत "बाप" हे नाते सुद्धा येते. होय , अगदी सख्खा बाप ! याबाबतची आकडेवारी कदाचित प्रभू देऊ शकतील ; पण हा वास्तवातला सगळ्यात काळाकुळकुळीत भाग आहे ...

विनायक प्रभू's picture

13 Nov 2008 - 8:57 pm | विनायक प्रभू

अशा केसेस मधे बाप पण असतो. आणि ह्याला कारणीभुत आई असते.

चतुरंग's picture

13 Nov 2008 - 9:00 pm | चतुरंग

स्त्री शक्ती ही काय चीज आहे हे त्या माउलीला जेवढ्या लवकर उमजेल तेवढे ते कुटुंब भाग्यवान!
पुरुषांच्या कोणत्याही बाहेरख्यालीपणाला यत्किंचितही थारा न देता लवकरात लवकर समूळ उखडून टाकणे हाच सर्वोत्तम उपाय असतो.
येन केन प्रकारेण पण उद्देश साध्य केल्याखेरीज सोडायचे नाही!

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

13 Nov 2008 - 9:01 pm | मुक्तसुनीत

आणि ह्याला कारणीभुत आई असते.
हे माझ्यामते सगळ्यात जास्त भीषण आहे. आईच्या हातूनच असले काही घडत असेल किंवा ती आपल्या कर्मामुळे/नाकर्तेपणामुळे अशा प्रसंगाना कारणीभूत ठरत असेल तर.... त्या निष्पाप मुलांचा कुणीही वाली नाही. त्यांचा जन्मच मुळी मग कत्तलीला आणलेल्या शेळ्या/बकर्‍यांप्रमाणे झाला असे म्हणायला हवे.

संजय अभ्यंकर's picture

14 Nov 2008 - 12:55 pm | संजय अभ्यंकर

आर्थर हेलीची Detective कादंबरी वाचली.

बापाने केलेला मुलीचा सत्यानाश फार प्रभावीपणे मांडला आहे.
कादंबरी असलीतरी वास्तवाच्या फार जवळ आहे.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

पण कुंपणानेच शेत खाल्ले तर दुर्दैवी ह्याशिवाय माझ्याकडे शब्द नाहीत!!

जगातला सगळ्यात वाईट प्राणी माणूस आहे ह्या गोष्टीची अशा वेळी खात्री होते हे नक्की!!!

चतुरंग

परिकथेतील राजकुमार's picture

13 Nov 2008 - 8:41 pm | परिकथेतील राजकुमार

लेख तर सुन्न करुन गेलाच पण, 'ताईला माहिती आहे का? परत पापण्या हलल्या.' हे वाक्य तर सुन्नपणा नंतर जी काही अवस्था असेल तिथे घेउन गेले. खरच काय बोलावे कळत नाहि. खुप वर्षापुर्वी कुठेतरी वाचले होते की जनावरापासुन माणसापर्यंत पोचायला आपल्याला अनेक शतके अनेक युगे लागली , पण माणसाचे क्षणात जनावर व्हायची कला मात्र आपण फारच छान आत्मसात केली आहे.

++++ प्रसाद ++++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/

शितल's picture

13 Nov 2008 - 8:46 pm | शितल

बाप रे वाचुन अंगावर काटा आला,
त्या मुलीच्या मनाला काय वेदना झाल्या असतील, अनेक प्रश्न मनात निर्माण होतात.

अनंत छंदी's picture

13 Nov 2008 - 8:57 pm | अनंत छंदी

प्रभूसाहेब
सुन्न करणारा अनुभव आहे. अशा अश्राप मुलींचे भवितव्य, तिच्या पालकांची बदनामी होण्याची शक्यता याचा विचार करून कित्येकदा, नव्हे बहुधा नेहमीच अशा प्रकारातील त्या हरामखोरांना शिक्षा करण्याचे धाडस कोणी करीत नाही. त्या मुलीचे दुर्दैव म्हणायचे दुसरे काय?

प्राजु's picture

13 Nov 2008 - 9:38 pm | प्राजु

काळीज विदिर्ण करणारा अनुभव आहे हा.
काय झालं असेल त्या लहानगीला.?? बापरे!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

13 Nov 2008 - 9:56 pm | रेवती

आई काय, बहीण काय सगळे विचित्रच आहेत.
त्या मुलीच्या आईने जावयाबरोबर आपल्या मोठ्या मुलीलाही चार धपाटे घालायला हवे होते.
रेवती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Nov 2008 - 10:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्या वयात तिला काही कळलंही नसेल पण पुढे काय? पुढे आयुष्यभर न केलेल्या चुकीबद्दल पश्चात्ताप करायला लागण्याएवढी काय वाईट शिक्षा असेल? शारीरिक इजा भरुनही निघेल पण मनाचं काय, आणि त्या कोवळ्या मनाचे मोठेपणी किती हाल झाले असतील.

वरचा मुक्तसुनीत-चतुरंग संवाद आणि विप्रकाकांची उत्तरं वाचून एक विचार आला, आपली पत आपणच जपायची हे स्त्रिया स्वतःच का नाही समजून घेऊ शकत. कधी ताई, कधी आई, कधी आजी, पण दुसरीही आपल्यासारखीच आहे हे का नाही समजून घेत या?

प्रमोद देव's picture

13 Nov 2008 - 10:01 pm | प्रमोद देव

ह्या नाटकात हीच समस्या मांडलेली आहे. आणि ह्यात केवळ मुलीच नाही तर मुलगेही बळी ठरतात..मोठ्यांच्या शारिरिक भुकेचे.

हा प्रश्न कितीही भयानक असला तरी तो सुटणे कधीच शक्य नाहीये कारण शेवटी....कामातुराणां ना भयम्‌ ना लज्जा!
हल्ली त्याची थोडीफार वाच्यता होते पण पूर्वी ती तशी होणेही दुरापास्तच होते.

त्यामुळे लोक सावध होतात, शिकारी जवळचाच कोणी असू शकतो ही कल्पना तरी येते.
गुन्हा घडला तर जवळचा माणूस असल्याने सरसकट कायद्यातल्या शिक्षेचा मार्ग अनुसरणे अवघड असते. अशा वेळी थोडी वाकडी वाट करुन शिक्षा द्याव्या लागतात. वचक रहाणे महत्त्वाचे कारण ही शेवटी माणसाची प्रवृत्ती आहे कधी डोके वर काढेल सांगता येत नाही!

चतुरंग

भाग्यश्री's picture

13 Nov 2008 - 10:24 pm | भाग्यश्री

मलाही हेच नाटक आठवलं. लहान मुलांना दाखवले पाहीजे..

बाकी लेख वाचून सुन्न.. हे असं कसं होऊ शकतं,, ताईची याला साथ असूच कशी शकते हेच कळत नाहीए !
किती आघात झाले असतील तिच्या मनावर.. :(

http://bhagyashreee.blogspot.com/

कपिल काळे's picture

13 Nov 2008 - 10:14 pm | कपिल काळे

<<मी: वय काय?
आई: कालच दहावा वाढदिवस झाला.
मी: पाळी सुरु झाली का?
आई: नाही हो,अजुन लहान आहे. फॅमिली डॉक्टर म्हणतात कि पोटात कसला तरी गोळा आहे.>>

ह्या आईला आपली मुलगी न्हाती झालेली माहित नाही का? की ती सगळं माहित असून फक्त नाटक करत होती.?
किळस येते अश्या माणसांची.

डिंपलचा एक पिक्चर आला होता "जख्मी औरत"
त्यातील इलाजापेक्षाही भयंकर शिक्षा त्या जावईबापूंना व्हायला हवी.

http://kalekapil.blogspot.com/

पांथस्थ's picture

13 Nov 2008 - 10:17 pm | पांथस्थ

सहमत आहे.

विनायक प्रभू's picture

13 Nov 2008 - 10:17 pm | विनायक प्रभू

अहो पाळी यायच्या सुमारालाच गुदगुल्या केल्या की भावोजी ने. पाळी कशी येणार?

भास्कर केन्डे's picture

13 Nov 2008 - 11:07 pm | भास्कर केन्डे

किती किळसवाना प्रसंग होता तो सगळा! माझं (मुलींच्या बापाचं ) काळीज चीर-चीर चिरल्यागत झालं. आपल्या पोटच्या लेकरांना आपणच जपायला हवं. असे प्रसंग वाचले की जीव कासावीस होतो.

अशा प्रसंगात होरपळणार्‍या कुटुंबांच्या मदतीसाठी उभ्या असलेल्या प्रभु साहेबांना साष्टांग दंडवत!

मुक्तसुनित व चतुरंगांसाहित सर्वांचेच प्रतिसाद बोलके आहेत.

प्रभू साहेब, आम्हा सर्वांना सावधान करणारे व मार्गदर्शक असे लेखन करत असल्याबद्दल आभार!

आपल्या आई-वडिलांनी आपण लहान असताना बहिन-भावांसकट आपले संगोपण जर डोळ्यात तेल ठेऊन केले असेल तर आपल्या मुलांच्या संगोपणासाठी ते सर्वात महत्वाचे मार्गदर्शन ठरते असे माझे मत आहे.

आपला,
(खूप चांगले आई-वडिल व नातेवाईक लाभलेला, सुदैवी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

विसोबा खेचर's picture

14 Nov 2008 - 12:05 am | विसोबा खेचर

एखाद्या लहानगीच्या आयुष्यात असा भयानक अनुभव? साला, वाचूनच संताप झाला..

प्रभूसाहेब, असं काही वाचलं की आम्हाला फक्त थोरल्या आबासाहेबांची आठवण येते..!

शिवरायांनी नेमून दिलेली हातपाय तोडण्याची शिक्षाच सर्वात उत्तम..!

जख्मी औरत चित्रपटातली शिक्षाही मस्त आहे... त्या शिक्षेत मूळ मुद्दाच कापून काढलेला असल्यामुळे सग़ळेच प्रश्न मिटतात..

हा बलात्कारच. आणि कायद्यात त्याकरता फाशीच्या शिक्षेची सोय आहे परंतु ती शिक्षा आम्हाला मान्य नाही...

आरोपीचा हातपाय आणि मूळ मुद्दाच उखडणे हाच सर्वोत्तम उपाय.. वर त्याला रस्त्याच्या कडेला येताजाता सर्वांना दिसेल, लहान मुलं दगडं मारतील अश्या पद्धतीने बांधून जिवंत ठेवायचा! मरू द्यायचा नाही!

तात्या.

विनायक प्रभू's picture

14 Nov 2008 - 9:47 am | विनायक प्रभू

मूळ मुद्दा उखडायला कधी मिळाला नाही. पण पर्सनल लेवल वर आत्तापर्यंत चार जायबंदी केले आहेत..

हे पहा या वर्षी युरोपमध्ये हा गुन्हा उघडकीला आला... तुम्ही कितीही कडक शिक्षा द्या, हे लोक सुधरणार नाहीत. न्याय-अन्याय कळण्यापलिकडे यांची बुध्दी गेलेली असते. भयंकर आहे हे सर्व! काय म्हणाल तुम्ही याला?

रेवती's picture

14 Nov 2008 - 5:31 am | रेवती

आणि माणसांच्या चेहर्‍यावर चांगला किंवा वाईट असे शिक्के नसतात. फार भीती वाटते कधीकधी.

रेवती

भाग्यश्री's picture

14 Nov 2008 - 5:51 am | भाग्यश्री

बापरे.. हे काय आहे!!! :(
अशी माणसं का असतात जगात? २-३ वर्षांपूर्वी असाच एक मनोविकृत खुनी माणूस भारतात उत्तरेला सापडला होता..
लहान मुलांना मारून,लिव्हर वगैरे खायचा.. मी लिहू नाही शकते.. ही माणसं अशी वागूच कशी शकतात?
एका कंपनीच्या मुलाखतीमधे याच विषयावर डिबेट झालं होतं.. कॅपिटल पनिशमेंट असावी का? मी अशा लोकांसाठी असावी म्हटले होते.. ही जनावरं (जनावरांचा अपमान!) सुधारण्याच्या पलिकडे गेलेली आहेत!!

http://bhagyashreee.blogspot.com/

मदनबाण's picture

14 Nov 2008 - 5:43 am | मदनबाण

साला एक नंबरचा हैवान आहे ...अशा लोकांना तुडव तुडव तुडवले पाहिजे !!!
बिचार्‍या मुलीला आयुष्य भर या काळ्या आठवणी घेऊन जगावे लागेल..
अरब देशात दिल्या जाणार्‍या शिक्षा या लोकांना दिल्या पाहिजेत !!!

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

अनिल हटेला's picture

14 Nov 2008 - 7:54 am | अनिल हटेला

>>>जनावरापासुन माणसापर्यंत पोचायला आपल्याला अनेक शतके अनेक युगे लागली , पण माणसाचे क्षणात जनावर व्हायची कला मात्र आपण फारच छान आत्मसात केली आहे.

खरये....

>>>शिवरायांनी नेमून दिलेली हातपाय तोडण्याची शिक्षाच सर्वात उत्तम..!

होय !!
पण त्या निष्पाप जीवाच काय ?

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

हर्षद आनंदी's picture

14 Nov 2008 - 8:02 am | हर्षद आनंदी

अश्या भिकार्***ना अत्यंत क्रुर, अमानवी शिक्षा दिलीच पाहिजे, पण जर यात तिच्या बहिणीचाही हात असेल; तर तिला ह्याच्यापेक्षा क्रुर शिक्षा झाली पाहीजे.

सहज's picture

14 Nov 2008 - 8:06 am | सहज

पिडफिलीया ही एक अत्याचार करणार्‍याची विकृती आहे असे समजले तरी जेव्हा आईच भरीस पाडते तेव्हा मती गुंग होते. वाटते की तिच्या लहानपणी देखील असेच आजुबाजुला घडले की काय म्हणुन तिला स्वःताच्या मुलीला/मुलाला ह्यात ढकलायला फारसे वावगे वाटले नाही?
एका अश्या आईने ती पुर्ण नैराश्यात होती म्हणुन असे होउ दिले, ती तिच्या नवर्‍याच्या शब्दाबाहेर जाउ शकत नव्हती. असा मानसोपचारतज्ञाचा निष्कर्ष होता.

अमेरिकेत एका केस मधे एका आईने [ऍड्रीया येट्स]स्वताच्या ५ मुलांना एक एक करुन पाण्याच्या टब मधे बुडवून मारले. त्या प्रकरणात मला तिच्या नवर्‍याचाही मोठा दोष आहे असे वाटते.

एका केस मधे एक वडील त्यांना एकापेक्षा जास्त बायका व जेव्हा त्याच्या मुली मोठ्या झाल्या तेव्हा त्यांना जेव्हा चौथी मुलगी [म्हणजे आधीच्या तीन..] तिच्या शाळेतल्या बाईंकडे "गुदगुल्यांबद्दल" बोलली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. तो वर बरीच वर्षे हे चालू होते.

बर्‍याच केस मधे आई ही पुर्णता मानसीक रुग्ण नसली तरी तिच्या नवर्‍याने तिच्या मनावर पुर्ण पकड घेतली असते. तिला कळत असते हे चुकीचे आहे तरी जोवर हे सगळे उघडकीस येत नाही तो वर काही करु शकत नाही. [लो इ क्यु , लो आय क्यु., डिप्रेशन]

परत अश्या केसेस मधे आई-वडील दोघांना शिक्षा म्हणजे देखील त्या लहान मुलाचे विश्व पुर्णता विस्कडणे. कितीही झाले तरी त्या लहान मुलांना आईचा सहवास हवा असतो. आई हीच त्यांच्या आयुष्याचा आधार असते.

इट इज सिकनिंग. अश्या विकृत माणसांच्या [पुरुषांना] शिक्षेची अंमलबजावणी सौदीमधे आउटसोर्स करावी ह्याला माझे अनुमोदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2008 - 8:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामाजिकी रितीभाती त्यामुळे मुली /स्त्रियांना विविध अडचणी आणि संकटांना सामोरे जावे लागते मात्र अशा प्रवृत्तींना कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे. तसेच मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन केले पाहिजे.

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

14 Nov 2008 - 10:03 am | विनायक प्रभू

कोणा कडे वेळ आहे. अशा गोष्टी अपवादात्मक होतात हा सम़ज.

अवलिया's picture

14 Nov 2008 - 11:35 am | अवलिया

सुन्न झालो अनुभव वाचुन....काय बोलु हेच कळत नाही.

परमेश्वरा ! तुझ्या हाकेला ओ द्यावीशी वाटतेय रे...

नाना

दिपक's picture

14 Nov 2008 - 12:19 pm | दिपक

डोके गरम झाले वाचुन. X( अश्या माणसांना जनतेच्या हवाली केले पाहिजे आणि त्याला जनतेने तुडवताना जगभर टीव्हीवर दाखवायला हवे.

विसुनाना's picture

14 Nov 2008 - 12:49 pm | विसुनाना

विकृती. विकृती.
अनुभव वाचून गुदमरायला झाले.

***

फक्त चपलांचा, लाथाबुक्क्यांचा मार पुरेसा नाही. पुरता ठेचला पाहिजे होता.

***

मदनबाण's picture

14 Nov 2008 - 1:10 pm | मदनबाण

अशा विकृत कृत्यांमधे बृर्‍याच वेळा नात्यातली व्यक्तीच आढळुन येते !! विप्र काका मला आता तुम्हाला एक प्रश्र्न विचारायचा आहे की हा प्रकार भावजी ने केला तेव्हा या कृष्णकृत्यात त्यांच्या बायकोचा ही सहभाग होता का ?मी बर्‍याच वेळी वाचले आहे की स्त्रीचा सुध्दा सहभाग आढळुन येतो!!जर असे असेल तर यावर आपण प्रकाश टाकावा ही विनंती!!

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

विनायक प्रभू's picture

14 Nov 2008 - 1:22 pm | विनायक प्रभू

हो. ताईच्या संमतीने अगदी तिच्यादेखत. ताई गरोदर होती. म्हणुन तीने नव-याची सेवा बहिणीकडून करुन घेतली. हे लेखात लिहायला जमले नाही.

विसुनाना's picture

14 Nov 2008 - 1:49 pm | विसुनाना

ताईही विकृत होती असे दिसते. तिला काय शिक्षा करावी?

मनस्वी's picture

14 Nov 2008 - 1:26 pm | मनस्वी

सुन्न करणारा अनुभव.
मुलीला काळ्या आठवणी घेउन जगायचेही आणि त्या आठवणीला कारणीभूत असलेल्याला पुढच्या भविष्याची चिंता करता, शिक्षा काय बोभाटा पण होउ द्यायचा नाही!

ब्रिटिश's picture

14 Nov 2008 - 2:16 pm | ब्रिटिश

त्या भ** भावज्या न भनीला आदि मोट्या टावरचे गच्चीवर नेऊन ईष पाजाचा न फासावर लटकवाचा, नंतर एके ४७ नी बॉडीची चालनी कराची
मग गच्चीवरून खाली फेकुन द्यायचे न अंगावरुन १०० टरक नेउन चिरडायचे

ह्या सगला झाल्यावर पोलीस कंप्लेन कराची

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

गदिमा लिहितात....

रक्तही जेथे सूड साधते तेथे कसली माया
कोण कुणाची बहीण भाऊ पती पुत्र वा जाया
सान्गायाची नाती सगळी

हेच खरे.

चन्द्रशेखर गोखले's picture

14 Nov 2008 - 6:36 pm | चन्द्रशेखर गोखले

मन सुन्न झाले .उगिच सदर उगिच वाचले असे वाटले. असले वास्तव मन अस्वथ करत.

स्वाती दिनेश's picture

14 Nov 2008 - 7:08 pm | स्वाती दिनेश

भयानक वास्तव वाचून सुन्न झाले,
स्वाती

नारायणी's picture

14 Nov 2008 - 9:12 pm | नारायणी

विप्र,नंतर कधी तुमच त्या मुलिशी बोलणं झालं का? काही खबरबात मिळाली का तिची? आता कशी आहे ती?

रामदास's picture

14 Nov 2008 - 11:36 pm | रामदास

पालकांच्या पोटात जोरात गुद्दा मारलात प्रभू सर.
बेसावध पालक सावध होतील.दिवसेंदिवस परीस्थीती कठीण होत चालली आहे.माझ्या एका कवितेत मला नुकत्याच वयात आलेल्या मुलीच्या आईच्या मनातली घालमेल तुमच्या कानावर घालतो.(तेव्हा तुम्ही मिपावर नव्हता)

जिवण तोंडावर
घट्ट दादरा
बांधून माय म्हणते.
मोठी झाली बाय माझी.
येता जाता अंधारात
माजघराच्या
लपू नको आता.

आणि एक सत्यघटना पण सांगतो.

मराठवाड्यातली एक गोष्ट.एका छोट्या गावात एकच बस रोज यायची. वाहक आणि चालकाची जेवणाची सोय गावातल्या एका विधवेकडे.तिला एक छोटी मुलगी. गावातल्या पुंडाईने घाबरलेल्या त्या बाईनी (केवळ भितीपोटी) मुलीचे लग्न करायचे ठरवले. मुलगी दिसायला थोराड होती पण वयात आलेली नव्हती.आईनी मुलीला लग्नाच्या भरीस पाडून तरुण वाहकाशी लग्न लावून दिले.मुलगी अजाण. लग्न म्हणजे काय हे नाही माहीती.
महीन्याभरानी जावई मुलीला घेऊन परत आला. सासुला लाख शिव्या घातल्या. लग्न करून काय उपयोग झाला. मुलगी तर अजून वयात आलेली नाही, सबब लग्नाचा खर्च परत द्यावा. आता या बाई कडे पैसे कुठले द्यायला. तिनी जावयाला सांगीतलं ही वयात येईपर्यंत तू मला वापर.
दोन वर्षानी मुलगी वयात आली पण आईला जावयाची सवय झालेली.आई आणि मुलीला जवळ जवळ एकाच वेळी दिवस गेले.मुलीला सगळ्या प्रकाराचा अंदाज आला. तिनी आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या पोटातलं बाळ वाचलं पण मुलगी गेली.
त्यानंतर त्या बाईनी आणि जावयानी लग्न केलं .
बाईच्या वाटेला किती दुर्दैवाचे दशावतार येतात ह्याचे हे उदाहरण.
आता प्रभूदेवा सांगा.आईची काय चूक ?
मुलीची काय चूक?
जावयाची काय चूक ?
उत्तर नाही दिलत तर पुढच्या जन्मी पण हेच समुअपदेशनाचं काम करावं लागेल.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Nov 2008 - 3:11 am | बिपिन कार्यकर्ते

काय सांगताय साहेब? हे तर फारच सुन्न करणारं आहे. विप्रंच्या अनुभवापेक्षाही वाईट.

आता प्रभूदेवा सांगा.आईची काय चूक ?
मुलीची काय चूक?
जावयाची काय चूक ?

काहीच कळत नाहिये. मति गुंग झाली आहे.

उत्तर नाही दिलत तर पुढच्या जन्मी पण हेच समुअपदेशनाचं काम करावं लागेल.

तुमची विक्रम वेताळाची जोडी जमली वाटतं? :)

बिपिन कार्यकर्ते

ब्रिटिश's picture

15 Nov 2008 - 2:45 pm | ब्रिटिश

ह्यान चुक जर आसलीच त ती गरीबीची
ती पन आपल्या नजरंतून

बाकी नर मादी म्हंजे जगमान्य नात

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

विनायक प्रभू's picture

15 Nov 2008 - 11:10 am | विनायक प्रभू

कसली नाती
कसली गोती
मी पाहिली ती
फक्त संबंधांची माती

कधी मी वेताळ, तर कधी विक्रमादित्य सुद्धा.

पूजादीप's picture

15 Nov 2008 - 11:34 am | पूजादीप

शिवरायांनी नेमून दिलेली हातपाय तोडण्याची शिक्षाच सर्वात उत्तम..!
मी अगदी मनापासुन सहमत आहे. ती मुलगी बिचारी जन्मभर सोसनार आनि गुन्हेगाराला का सोडायच. त्यालाही जन्मभराची अद्दल घडायला पाहिजे.

मनीषा's picture

15 Nov 2008 - 1:11 pm | मनीषा

मन सुन्न करणारा, नाते संबंधांवरचा विश्वास संपवणारा असाच प्रसंग आहे ..
यात जो गुन्हेगार आणि त्याला साथ देणारे, यांना शिक्षा व्हायलाच हवी .. पण शारीरिक नको तर आयुष्यभर त्याने केलेल्या कृत्याची त्याला खंत वाटेल अशी हवी.
आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे त्या लहान मुलीला धीर देउन तीला समजवायला हवे जे झाले त्याची तीने लाज बाळगण्याची काहीच आवश्यकता नाही .. तो केवळ एक अपघात होता, आणि त्यामुळे तिच्याकडे बघण्याच्या समाजाच्या दृष्टीकोनात काहीच फरक पडत नाही .