(धोरण) देवद्वार छंद

चेतन's picture
चेतन in जे न देखे रवी...
10 Nov 2008 - 3:13 pm

अजुन एक प्रयत्न देवद्वार छंदातला (ह. घ्या हे वे न सा)

कडक नियम
शुद्धलेखनाचे
धोरण मिपाचे
ठरतसे ||

मिपाचे मालक
विसोबा खेचर
मारी फाट्यावर
दुढ्ढाचार्या ||

करी अट्टाहास
जर कोण येथे
जावे त्याने तेथे
खुशालच ||

मिपा नाहि तोटा
कधी प्रतिभेचा
कट्टा हा सर्वांचा
वाढतसे ||

छंद उपक्रम
सुंदर वाटता
सांगाति असता
धोंडोपंत ||

कवितेस सोपा
देवद्वार छंद
'चेतन'ही छंद
जोपातसे ||

एक प्रश्नः जोडअक्षर एक गणले जाते की दीड (दीड असेल तर वरची रचना चुकीची आहे)
तज्ञांनि मार्गदर्शन करावे

कवितामौजमजाविरंगुळा