यमदूत

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
30 Jun 2019 - 9:08 am

हाय -कुणीतरी त्याला म्हणाले

त्याने मागे वळून पाहिले

पौराणिक सिरियल्स मध्ये घालतात तसे कपडे घालून तो उभा होता

आपण कोण आयमीन ओळखलं नाही आपल्याला

मी यमदूत आपल्याला घ्यायला आलो आहे

हे ऐकताच त्याला घाम फुटला

मला वेळ दे बायका मुलांना शेवटचं भेटू देत

ते शक्य नाही -मला अनुमती देण्याचा अधिकार नाही

पण लक्षात घे तु नेहमी ज्या खुर्चीवर बसतोस तिथे बसला कि तू तात्काळ गतप्राण होशील

समजा मी बसलोच नाही खुर्चीवर तर ?

तर तुला एक जीवदान मिळेल

समजा मी पळून गेलो तर ?

तसा विचार पण करू नकोस -ते अशक्य आहे

तो अंतर्धान पावला

जनरल स्टोर मध्ये माल देणे पैसे मोजणे त्याने चालू ठेवली

तेव्हढ्यात दुकानात ३ टपोरीं टाईप माणसे आली

गल्ले मे कितना रोकड है ?सूरी च पात गेल्यावर टेकवत तो म्हणाला

मालूम नाही गिनना पाडेगा

गिनो और रोकडा इधर दो -गडबड कि तो गला काट दूंगा

पैसा गिनानेको टाइम लागेगा -तब तक भाई आप खुर्चीपे बैठो

ठीक है मेरे दो साथीदार दिल्या पक्या बाहर है उनको बुलाओ

त्याने तसे केले

भाई खुर्चीवर बसला अन तात्काळ गतप्राण झाला

अरे भाईको क्या हुवा ? दिल्या पक्या ओरडले

कूच नाही भाई को चक्कर आ गायिली है -उन्हे दवाखानने ले जाओ तो म्हणाला

ते रिक्षात बसून गेले

त्याने हुश्श्य करत श्वास सोडला

संकट टळले होते

आपल्या अक्कल हुशारीे वर तो खुश होता

*

नातवा सुना मुलांनी त्याचा एकसष्ठी चा कार्यक्रम दणक्यात साजरा करावयाचे ठरवले होते

सायंकाळी कार्यक्रम होता --सारे नातेवाईक मित्र मंडळी अभिष्ट चिंतना साठी येणार होता

दुपारी जेवण झाले अन त्या अंमळ डुलकी लागली

स्वप्नात तो आला होता

ओळखले का ?

तू ??

हो मी -आज तुझी आठवण झाली म्हटले भेटावे --

नको रे आज माझ्या घरी कार्यक्रम आहे -तुझी अमंगल छाया त्यावर नको -कुठला शहाणा माणूस तुला वेल कम करेल ?? तुझे अभद्र रूप भयावह वाटते -तू निघून जा -कर तोंड काळे

अरे तुझे अभिष्ट चिंतन करावयास आलो होतो पण माझ्या बद्दल ज्या भावना तुझ्या मनात आहे ते पाहून काढता पाय घेत आहे -आता तू बोलावलेस तरी येणार नाही

अभिष्ट चिंतना बद्दल धन्यवाद -पण आता तू निघ व परत येऊ

तथास्तु म्हणत तो गेला

तो खाडकन जागा झाला -अंग घामानं डबडबलेलं होत

आपण ठीक आहे हे पाहिल्यावर त्याला हायसे वाटले

स्वप्न होते तर ते ..म्हणत स्वताशे हसला

-

कार्यक्रम सम्पला

रात्रीचे दहा वाजायला आले होते

आजोबा कार्यक्रम मस्त झाला तुम्ही दमला असाल ना

हो ना दगदग सहन नाही होत -तुन्ही पण दमला असाल ना

आजोबा तुम्ही आता विश्रांती घ्या

हो मी जातो तुम्ही बसा गप्पा मारत बरेच दिवसांनी एकत्र जमला आहात

दाराकडे जात असताना तो धाडकन पडला

काय झाले बघण्या साठी सारे उठले

तो जमिनीवर निपचित पडला होता

त्वरेने त्याला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले

दुस-या दिवशी डॉकटर म्हणाले

यांना अर्धांग वायू चा स्ट्रोक आला आहे

त्याच्या दोनही बाजू निकामी झाल्या आहेत

आता बेड रिडन अवस्था

-

तो आपल्या खोलीत भकास पणे पडला होता विचार करत

हलता येत नव्हते -मुश्किलीने कूस बदलदात येत असे मल मूत्र विसर्जन सारे अंथरुणात

एक मावशी ठेवली होती सेवेला

*

आता तो ८२ वर्षांचा झाला होता

खोलीचा नर्क झाला होता

मुले सुना सारे कंटाळले होते

घरात फिनेल चा उग्र दर्प कायम दरवळत असे

आजारा पडल्या पासून तो कायम देवाची करुणा भाकीत असे

२० वर्षे झाली पण देवास दया आली नाही

*

त्या रात्री तो आला -अरे काय तुझी अवस्था -बघवत नाही हाडाचा सापळा झाला आहेस नुसता --घाबरू नकोस मी आलो आहे तुला न्यायला-कायमचा ह्या त्रासातून सोडवायला

अरे मित्रा मी रोज तुला बोलावत होतो -पण तु आाला नाहीस २० वर्ष मी यातना सहन करत आहे

तो हसला

मला खूप यावेसे वाटत होते -पण तूच म्हणाला होतास मला वेल कम करणार नाही

म्हणून नाही आलो अपमान करून घ्यायला

तो काहीच बोलला नाही डोळ्यातून अश्रू ओघळत होते

दूताने फास आवळला -प्राण पाखरू कुंडीतून उडून गेले

*

सकाळी सोसायटीत बातमी पसरली

सुटला एकदाचा हे सारे जण म्हणत होते

*

मृत्यू किती मजेदार गोष्ट आहे

काहींना ती हवी असते

काहींना नको असते

पण मृत्यू हवे नको च्या पलीकडे असतो

वेळ झाली कि तो येतो व आपले काम चोख बजावतो

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

Rajesh188's picture

30 Jun 2019 - 9:55 am | Rajesh188

मृत्यू हा शाप नसून मानवाला मिळालेले वरदान आहे.

प्रसाद_१९८२'s picture

30 Jun 2019 - 10:15 am | प्रसाद_१९८२

छान कथा.

अवश्य स्वीकार करावा.

खिलजि's picture

3 Jul 2019 - 4:48 pm | खिलजि

अक्कू काका , काय लिवलंय माहिती है ... एकदम मस्त .. मृत्यूला कसे आणि का सामोरे जावे , याचे एक सुंदर उदाहरण दिलेले आहे .. छान , आवडलं