लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ६

Primary tabs

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
18 Apr 2019 - 1:21 am

(भाग १ ते भाग ५ यांमधील लिखाण मुख्यतः "दिल्ली, बहादूरशहा आणि १८५७" या बद्दलचे होते. या मालिकेतील पुढील भाग जरी विषयाशी संबंधित असतील तरी "अवांतर गंमत जंमत" म्हणायला हरकत नाही.)

भाग १: http://www.misalpav.com/node/44368
भाग २ : http://www.misalpav.com/node/44372
भाग ३: http://www.misalpav.com/node/44375
भाग ४: http://www.misalpav.com/node/44381
भाग ५:http://www.misalpav.com/node/44386

माझ्या लहानपणी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला "खुश है जमाना आज पहिली तारीख है" हे गीत न चुकता रेडिओवर लागायचे. त्यावेळी त्याचा संदर्भ आणि त्यादिवशीची वडीलधाऱ्या मंडळींची हसरा चर्या हे सगळे कळण्याचे वय नव्हते. नोकरी करू लागल्यावर आणि एकूणच पगाराच्या दिवशीचा "खुश है जमाना" पाहिल्यावर (आणि अनुभवल्यावर) हे गाणे सगळ्या चाकरमान्यांचे आवडते गीत का असावे हे उमजू लागले. (अजूनही ऐकण्याकरता https://www.youtube.com/watch?v=CJLeU4S2K_o)

याचा दिल्ली, बहादूशहा, गालिब या सगळ्यांशी काय संबंध असे तुम्हाला वाटू लागले असेलच.

सगळ्याच चाकरमान्यांना जर Boss ला खुश करायचे असेल किंवा "पटवायचे" असेल, तर काय काय बोलावे याचा एक आदर्श गृहपाठ ठरावा अशी एक रचना मिर्झा गालिबने त्याच्या काळांत करून ठेवली आहे हे मला जालावर शोधाशोध करतांना कळून आले.

त्याकरता थोडासा पूर्व-इतिहास. काही कारणाने बहादूरशहाच्या दरबारी पगारदारांचा ठरलेला पगार प्रत्येक महिन्याला मिळण्याऐवजी प्रत्येक सहा महिन्याला मिळत असे. मिर्झा गालिब खर्चिक वृत्तीचे असल्याने जे कांही हातांत येईल त्यापलीकडे कसा खर्च करावा हे त्यांना चांगले जमत असे. (त्याकाळांत "credit card" ही सुविधा नसल्याने) नेहमीच कर्जबाजारी असणाऱ्या या असामीला एकदा हिंवाळा सुरू झाल्यावर लोकरी कपडे करून घेणे जमले नाहीं. त्यामुळे होणाऱ्या त्रासातून सुटका मिळवण्याकरता आपल्या Boss ला म्हणजे बहादुरशहा जफरला खुश करून किंवा "पटवून" आपली आमदनी सहा महिन्यांतून एकदा हातांत येण्याऐवजी दर महिन्याला मिळवण्याकरता त्याने ही नमुनेदार रचना बहादुरशहा जफरला सादर केली.

मूळ उर्दूतील लांबलचक रचनेचा इंग्रजीतून शोध घेतल्याने सापडलेल्या दोन वेगवेगळ्या वाटणाऱ्या भागांवर फारसे आणखी संशोधन न करता (थोड्याशा चुकांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न सोडता), आणि मराठींतून पुन्हा अनुवाद करण्याचा खटाटोप न करता, जसे सापडले तसे, फक्त करमणुकीकरता पुढे देत आहे.

एका वेच्यांत सापडलेले गद्य:
"O Emperor, the sky is your throne and the sun your official insignia. I have become famous by virtue of my employment under you and many big people have become my friends. If I do not tell the tale of my sorrows to you, where do I go? I have no desire to wear costly costumes but in this chilling cold, one requires some woolens.

"I sit in the sun during the day and by the fireside at night. I am given my salary after six months. The Muslims perform SHISHMAHI RASM for their dead every six months. But I am alive and my SHISHMAHI takes place twice a year.

I borrow from the money-lender who partakes one third of my salary ....

"I am your employee and still I am naked. I am your man and still I have to borrow.

I am a poet. I can write all kinds of poetry ... But I have not come to you to exhibit my worth as a poet. I have come here with a prayer."

त्याच वेच्यांत सापडलेले पण रोमन लिपीत लिहिलेले पद्य (पुन्हा देवनागरीत लिहिल्याने जास्त चान्गले समजावे) :

BAS KI LETA HUN HAR MAHENAY GARZ,बस कि(ये) लेता हर महिने गर्ज (माझ्या गरजा कशातरी प्रत्येक महिन्यांत पुऱ्या करतो ?)
AUR REHTI HAI SOOD KI TAKRAR और रहती है सूद की तकरार

MERI TANKHWAH MEIN TIHAI KA मेरी तनख्वाह में तिहाई का

HO GAYA HAI SHREEK SAHOOKAR. हो गया है शरीक साहूकार

AAP KA BANDA AUR PHIROON NANGA, आपका बंदा और फ़िरूं नंगा
AAP KA NAUKAR AUR KAROON UDHAR. आपका नौकर और करूं उधार

MERI TANKHWAH KEEJAY MAH-BA-MAH, मेरी तनख्वाह किजीये माह-बा-माह
TO NA HO MUGH KO ZINDAGI DUSHWAR.तो ना हो मुझको जिंदगी दुश्वार

KHATAM KARTA HOON AB DUA PE KALAM खत्म करता हूँ अब दुआ पे कलाम
SHAIRI SE NAHIN MUJHE SAROKAR. शायरी से नहीं मुझे सरोकार

TUM SALAMAT RAHO HAZAR BARAS,तुम सलामत रहो हजार बरस
HAR BARAS KE HON DIN PACHAS HAZAR.हर बरस के हो दिन पचास हजार

आणखी एका वेच्यांत सापडलेले पद्य (आणि त्यातच मिळालेला इंग्रजी अनुवाद):

ऐ शहेनशाह-ए-आसमान औरंग, ऐ जहांदार-ए-आफताब आजार O Emperor! Adorner of the Throne, Sovereign shining like Sun
बार-ए-नौकर भी हो गया सद्द-शुक्र, निसबतें हो गयीं मुशक्खस चार I am your thankful employee, happy to have got to know some people
न कहूं आपसे, तो किस से कहूं, मुद्दा-इ-जरूरी-उल-इजार Whom shall I tell if not to you, what has become necessary to say
कुछ खरिदा नहीं हैं इस साल, कुछ बनाया नहीं हैं इस बार nothing have I bought this year, nothing I got ready
रात को आग और दिन को धूप, भाड में जाएं ऐसें लैल-ओ-नहार Fire in the night, sun in the day, doomed be such days and nights
मेरी तन्ख्वाह जो मुकर्रर है, उसके मिल्नेका है अजब हंजार The salary fixed for me, strange are the ways it is paid
रस्म है मुर्दे की छह माही एक, और छे माही हो साल में दो बार Like the departed are remembered every six months, which happens twice a year
बस के लेता हूँ हर महिने कर्ज, और राहती है सूद की तक्रार I have to borrow every month and have problems paying interest
आपका बंदा और फ़िरूं नंगा, आपका नौकर और खाऊं उधार Your man and I go about naked, your employee and I survive on borrowing
मेरी तनख्वाह किजीये माह-बा-माह, तो ना हो मुझको जिंदगी दुश्वार Pay my salary month by month so life is not difficult for me
तुम सलामत रहो हजार बरस, हर बरस के हो दिन पचास हजार May you live for a thousand year and may each year have fifty thousand days

पुन्हा काहीही सांगावे ना लागता कविराजांचा पगार महिन्या-महिन्याला मिळू लागला.

यावरून जर "boss" ला पटवण्याचे एखादे सूत्र (formula) तयार करायचा असेल तर पुढील क्रमवार गोष्टी लक्षात ठेवायला हव्या

१. पहिल्या छूट जे काही "boss" ला ऐकायला आवडते ते ऐकवून टाका. उदा. अगदी "बॉस तुस्सी ग्रेट हो" किंवा "साहेब तुम्ही मीटिंग मध्ये काय कमालच केलीत" इ.इ. त्यावर थोडी तानबाजी करता आली तर आणखीनच चांगले.
२. "तुमच्यामुळे (च) माझे कसे भले झाले आहे"
३. "तरी पण माझ्या कांही अडचणी आहेतच"
४. "तुमच्या माणसाला अडचणी असतीलच कशा?" (किंवा "तुमच्या खेरीज कोण दूर करेल माझ्या अडचणी" )

वरील गालिब सूत्री (किंवा त्याचसारखा भाव इतर कुठल्याही तत्सम शब्दांत) वापरून पहा आणि आपले अनुभव कळवा.

जाता जाता: "सुजाता" मधील "तुम जियो हजारो साल" या गाण्याचे स्फूर्तिस्थान गालिब तर नसेल ना? (ऐका : https://www.youtube.com/watch?v=2krvkcn_tF8)

ज्यांना ज्यास्तीची माहिती हवी आहे त्यांनी पाहावे:

https://groups.google.com/forum/#!topic/soc.culture.indian/LDAGljarqGA

https://ranasafvi.com/ghalib-s-poem-asking-bahadur-shah-zafar-to-increas...

(क्रमशः)

मांडणीविचार

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

18 Apr 2019 - 10:06 am | कुमार१

रंगतदार झाली आहे !

पैलवान's picture

18 Apr 2019 - 1:49 pm | पैलवान

याला भाटगिरी/लाळघोटेपणा/नक्की काय म्हणावे कळत नाही.
जे काही असेल ते आता पेक्षा त्यावेळी जास्त प्रचलित/सर्वमान्य असावे.