सलमानचे चेटूक आणि आपली अविवेकी मानसिकता.

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
6 Apr 2018 - 12:07 pm

फेब्रुवारी १९९८ मधील काळवीट मारल्याची घटना . ५ एप्रिल २०१८ मध्ये जोधपुर कोर्टाचा निकाल. सलमान एका खटल्यामध्ये दोषी ठरला. आता परत अपील .. हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट.अजून २० वर्षे सहज जाणार. २० वर्षे गेलेलीच आहेत !

असे हे सलमानखान या न्याय व्यवस्थेवर काय चेटूक करतो आहे कुणास ठाऊक ? एखाद्या सामान्य माणसा विरुद्ध असा खटला इतकी वर्षे चालला असता का?
“Justice delayed is justice denied” वगैरे फक्त पुस्तकात छापायला राखीव ठेवलेली वाक्ये आहेत का ?
या खटल्याशी संबंधित लोकांना या सलमान मुळे मिळणारी प्रसिद्धी हवी हवीशी वाटते म्हणून इतकी वर्षे हा खटला चालू आहे का ?
नक्की कसले चेटूक आहे हे ?
खालचे कोर्ट नंतर हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट असे सगळे या नाटकात कश्यासाठी सहभागी होतात किवा झालेत ?
इतके सगळे दिग्गज या खेळात सहभागी झालेत पण साध्य काय झाले आहे ?
शिकार केल्याबद्दल या सलमानखानला काही पश्चाताप वगैरे झालेला दिसत नाही ! शिकारींचे प्रमाणही काही या हिंदुस्तानांत कमी झालेले दिसत नाही !

कायदे कश्यासाठी करायचे किवा शिक्षा हि कश्यासाठी असते ?
गुन्हे कमी व्हावेत किवा होऊच नयेत आणि गुन्हेगार जरब बसून कमी व्हावेत. तसेच ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांना योग्य शिक्षा होऊन भविष्यात त्यांनी परत तेच किवा कसलेही गुन्हे करू नयेत म्हणूनच ना ?
का अशी अपेक्षाच आता चुकीची झाली आहे !

परवाच झालेला चेंडू कुरतडणे हा क्रिकेट मधील प्रकार . ज्या खेळाडूंनी तो प्रकार केला ..तो आपण जे करतोय ते चुकीचे आहे हे माहित असून केला. त्यांना निलंबित करताच त्यांनी सार्वजनिकरीत्या आपली चूक मान्य केली ..समाजाची माफी मागितली . त्यांना झालेली शिक्षा कमी होती ..अजून व्हायला हवी होती ,,असे तुम्ही म्हणू शकता पण माझा मुद्दा फक्त इतकाच आहे कि त्यांनी चूक मान्य केली ...त्यांना पश्चाताप झाला .
हिंदुस्तानांत कोणत्याच क्षेत्रात हा प्रकार होताना दिसत नाही . ( अगदी तुरळक अपवाद असू शकतील )
आपल्याकडे बहुतेक सर्व आर्थिक घोटाळे करणारे गुन्हेगार ,किवा इतर गुन्ह्यासाठी अटक झालेले गुन्हेगार सुद्धा पोलिस पकडून नेताना ,लोकांच्याकडे हसून पहात हात वर करून फोटो काढून घेतात …

आपली वर्तमानपत्रे ..TV Channels वगैरे सलमानने माफी मागावी ...एखाद्या अभयारण्याचे संवर्धन करावे ( फक्त पैसे देऊन नव्हे !) किवा पशु संग्रहालय दत्तक घ्यावे, काळविटाची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न करावे ….शिकार करणे या प्रवृत्ती विरुद्ध प्रचार करावा….याचा Brand Ambassador व्हावे ,असे सुचवताना दिसत नाहीत ….

खरे तर या सगळ्यांनी सलमान चुकीचा वागला. त्याला पश्चाताप व्हायला हवा .. त्याला शिक्षा व्हायला हवी आणि त्याने प्रायश्चित्त घ्यायला हवे असा सरळ पावित्रा घ्यायला हवा.

पण यांना काळजी कशाची? तर सलमानला वातानुकुलीत नसलेल्या कोठडीत रात्र घालवावी लागेल … त्याचे किती प्रोजेक्ट रखडतील? . Brand Salman चे किती कोटी रुपयांचे नुकसान होईल ??….या आणि अशा अनेक गोष्टींची !

योग्य काय आणि अयोग्य काय हे न समजण्याची ही कसली अविवेकी मानसिकता ?

का योग्य आणि अयोग्य असल्या खुळचट कल्पना धरून बसणे हेच सध्या अविवेकी झाले आहे ? का आजकाल योग्य आणि अयोग्य फक्त नोटांच्या तराजूत तोलले जात आहे ?
चित्र विदारक पण सत्य आहे .

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

6 Apr 2018 - 1:03 pm | गामा पैलवान

जयंत नाईक,

तुम्ही जो प्रश्न विचारलात :

नक्की कसले चेटूक आहे हे ?

त्याचं माझं आकलन सांगतो.

सलमान हा अज्ञशिरोमणी असून त्याचं कथन निरर्थक असतं, हे त्याचे पिताश्री सलीम खानच म्हणून गेलेत (संदर्भ : https://www.firstpost.com/india/salman-khan-tweets-in-support-of-yakub-m...). एखाद्या विषयावर ठोस भूमिका घ्यायची सलमानची वैचारिक क्षमता नाही.

म्हणजेच सलमान हा त्याच्या बोलवित्या धन्याच्या तालावर नाचतो. हा बोलविता धनी कोण आहे ते मी सांगायला नको. सगळ्यांना माहितीये तो दाऊद इब्राहिम आहे. सलमानला झालेली शिक्षा हे दाऊदचं वर्चस्व कमी झाल्याचं लक्षण आहे.

गाडीखाली चिरडून ठार मारल्याच्या प्रकरणांतला पोलीस शिपाई रवींद्र पाटील कसा टाचा घाशीत मेला, ते आठवंत असेल. कारण की तो एकाकी पडला होता. सलमानच्या आजूबाजूला जे बॉलीवूडी माफिया वावरतात त्यांनी त्याचा घास घेतला. मात्र काळविटाच्या प्रसंगात परिस्थिती बदललेली होती. एकतर आख्खा बिश्नोई समाज एकदिलाने उभा होता. साक्षीदारांवर दडपण आणूनही ते खंबीर राहिले. आणि दुसरं म्हणजे मोदी असल्यामुळेच हा खटला सुनावणीला येऊ शकला. अन्यथा तो तसाच पडून राहिला असता.

सत्तेवर आल्यावर मोदींनी सलमानसोबत पतंग वगैरे उडवला. तो दाऊदशी सहकार्य करायच्या भूमिकेतून. पण आज दाऊदची किंमत घसरली आहे. तेव्हा चढवलेले पतंग काटले गेले असं आपण समजूया.

आ.न.,
-गा.पै.

शेवटच्या तीन ओळीच लक्षात ठेवा आणि आपण या चक्कीत सापडणार नाही यासाठी प्रयत्न करा. असे झाले तरच जगण्याची इतिश्री. यालाच सुखी जीवन जगणे म्हणायचे. अन्यथा.........

सोमनाथ खांदवे's picture

6 Apr 2018 - 3:41 pm | सोमनाथ खांदवे

सलमान ला राजस्थान मधील न्यायाधीशानीं हरीण मारले म्हणून फक्त तोंडी पुराव्यावर जेल मध्ये टाकला आणि मुबंई मध्ये माणसे मारली तरी निर्दोष सुटला .एकाच देशात असे वेगवेगळे निकाल कसे लागतात ? मला विषयांतर करायचे नाही , पण मुबंई केस मध्ये सलमान ला निर्दोष सोडणारे न्यायाधीश जोशी साहेब खूप दबावात असणार हे नक्की .

रमेश आठवले's picture

7 Apr 2018 - 12:19 am | रमेश आठवले

नुसत्या तोंडी साक्षीच्या आधारावर सलमानला दोषी ठरवण्यात आले नाही. लुप्त होत असलेल्या प्रजातीचा काळवीट शिकार करून मारला याचा शास्त्रीय पुरावा आहे आणि तो कोर्टात सादर करण्यात आला होता . हैदराबाद स्थित Centre for DNA Fingerprinting and Diagnostics या संस्थेमध्ये त्या काळवीटाच्या चामडी आणि हाडांचा DNA तपासण्यात आला आणि त्यात तो काळवीट Black Buck या दुर्मिळ प्रजातीचा असल्याचे सिद्ध झाले अशी साक्ष तेथील वैज्ञानिक राव यांनी कोर्टात दिली.
राजस्थान मध्ये प्राणी आणि झाडे यांची जीवापाड जपणूक करणारा बिष्णोई समाज आहे. त्या समाजाने या केसचा पाठपुरावा केला म्हणूनच सलमानला शिक्षा होऊ शकली.

जेम्स वांड's picture

6 Apr 2018 - 6:26 pm | जेम्स वांड

सगळे, विधी विषय पारंगत अन किमान पदव्युत्तर शिक्षण घेतलेले महान लोक दिसतात, ते म्हणलेलं बरोबरच असणार, धागा विषयामध्ये संस्कृती वगैरे आहे म्हणजे खल्लास प्रकरण आहे एकंदरीत.

काळवीटाच संपुर्ण आयुष्य पंधरा वर्षाच आहे, मात्र निकाल वीस वर्षांनी लागला. सुरवात हम साथ साथ है ने झाली व आताव शेवट बिस साल बाद ने झाला. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मंत्री असिफ यांनी उधळलेली मुक्ताफळे अशी" सलमान खान मुस्लीम असल्यामुळेच त्याला अशी शिक्षा सुनावण्यात आली ,भारतात मुस्लीम, ख्रिश्चन, यांची कांहीं किंमत केली जात नाही असेच हा निर्णय दाखवतो." ,पण कदाचित ते विसरले असतील की सलमानने दारूच्या नशेत मुंबईत गाडी खाली चिरडलेले सर्व लोक मुस्लिमच होते.

रमेश आठवले's picture

6 Apr 2018 - 11:53 pm | रमेश आठवले

लेख आवडला.
लालू प्रसाद यांचे गवत कांड १९९६ साली सुरु झाले आणि त्याना शिक्षा होऊन कायमचे जेल मध्ये जाण्याला १९ वर्षे लागली. मध्यन्तरी शिक्षा झाली होती पण लगेच जमानत घेऊन, स्वतः:ला निवडणूक लढवता येत नसल्याने , बरीच वर्षे अंगठा छाप पत्नीच्या नावावर बिहार सरकार चालवले. आत्ता आत्ता म्हणजे कालपर्यंत दोन्ही मुलांना नितीश बरोबर सत्तेत आणले होते. असे असताना त्यांना शिक्षा झाल्यावर, त्यांच्या ७० वयाचा विचार करून त्यांना एवढी कठोर शिक्षा द्यायला नको होती, असा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी सारखे वकील आणि काही सिकुलर पत्रकार करीत आहेत. त्यांनी गुन्हा केला तेंव्हा ते ४८ वर्षाचे होते या वस्तुस्तिथी कडे दुर्लक्ष करणाऱ्या ह्याच वकील मंडळींनी खूप फी घेऊन त्यांच्या खटल्याचा निर्णय लाम्बवण्याचा प्रयत्न केला, याचा त्यांना सोयीस्कर विसर पडत आहे.