"वॉटसन, डॉक्टरला वॉकिंग स्टिक कोण देईल? अर्थात एखादं हॉस्पिटल, जिथे तो काम करत होता. मग 'सीसीएच' म्हणजे चेरिंग क्रॉस हॉस्पिटल असण्याची शक्यता जास्त आहे."
"बरं तर मग. चेरिंग क्रॉस हॉस्पिटल. आणखी कोणते निष्कर्ष काढता येतील?"
"तुला माझी पद्धत ठाऊक आहे, वॉटसन. वापर!"
"मला सुचणारा एकच निष्कर्ष म्हणजे या माणसाने खेड्यात आपली प्रॅक्टिस सुरू करण्याआधी लंडनमध्ये काही काळ काम केलं असावं."
"बरोबर आहे. आणखी थोडं पुढे जाऊन, हॉस्पिटलने ही काठी भेट देण्याचं कारण म्हणजे डॉक्टरसाहेब लंडनची नोकरी सोडताहेत हे असू शकेल. ही गोष्ट आपल्याला काय सांगते? हा गृहस्थ फार उच्चपदावर नसावा - कारण तो अशी मोठी नोकरी सोडून खेड्यात गेला नसता. म्हणजे नोकरी सोडतेवेळी हा नवशिका डॉक्टर होता - हाऊसमन. आता आपल्यासमोर उभा राहिलाय तिशीच्या आत-बाहेर असणारा एक डॉक्टर. बऱ्यापैकी मित्रमंडळी असलेला, फारशी महत्त्वाकांक्षा नसणारा, थोडा वेंधळा. त्याच्याबरोबर त्याचा लाडका कुत्रा असतो - टेरियरपेक्षा मोठा, पण मास्टिफपेक्षा लहान."
- दि हाऊंड ऑफ बॅस्करव्हिल्स, लेखक: आर्थर कॉनन डॉईल
माणूस सामाजिक प्राणी आहे. त्याला इतर माणसांबरोबर राहायला, वावरायला आवडतं. एकलकोंडेपणा हा स्वभावातला दोष मानला जातो, आणि एकटेपणा ही अप्रिय स्थिती. माणसाच्या समाजातल्या वावरावर समाजातल्या इतरांचे डोळे रोखलेले असतात. एखाद्याच्या वावराचा उपयोग समाजातल्या इतरांनी आपली उद्दिष्टं साध्य करण्यासाठी करून घेतला तर ते गैर समजलं जात नाही, किंबहुना अशा वर्तनाला प्रोत्साहनच दिलं जातं. त्यानेच एकमेकांत देवाणघेवाण असणारा एकसंध समाज तयार होणार असतो. त्यातच सर्वांचं हित असतं.
वर दिलेल्या उताऱ्यात एका विसरून राहिलेल्या वॉकिंग स्टिकवरून शेरलॉक होम्स त्या स्टिकच्या मालकाबद्दल निष्कर्ष काढताना दिसतो. वावरावरून, हावभावावरून मनाच्या पार खोल तळातलं ओळखण्याची उदाहरणं होम्स कॅननमध्ये अन्यही आहेत. (चट्कन आठवलेलं म्हणजे 'दि रेसिडंट पेशंट' या कथेमध्ये वॉटसनच्या डोक्यातले युद्धविषयक विचार होम्स क्षणार्धात सांगतो.)
तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर समाजातला वावर प्रत्यक्ष वावरापुरता मर्यादित न राहता आभासी (virtual) ही झाला. मग मोबाईल तंत्रज्ञानातली क्रांती आणि स्वस्त इंटरनेटमुळे प्रत्यक्ष आणि आभासी वावरातल्या सीमारेषा पुसट होत आहेत. एक साधा प्रयोग करून बघा. गूगलकडे असलेल्या तुमच्या विद्याची प्रत https://takeout.google.com/ येथे मिळेल. त्यातली लोकेशन हिस्ट्रीची जेसन फाईल आणि ही साईट वापरून तुम्ही कुठेकुठे गेला होतात याचा साद्यंत इतिहास अगदी नीटस नकाशावर बघायला मिळेल!
थोडक्यात काय, तर ते बघतायत. बिग ब्रदर इज वॉचिंग यू.
बर्मंग वॉचायचं तर बसा वॉचत. आपण कोणाला घाबरत नाय. कर नाही त्याला डर कशाला, वगैरे.
कर नसला तरी डर असू शकतो हे नुकतंच केंब्रिज ॲनालिटिका आणि फेसबुकच्या कृपेने पहायला मिळालं. हा विषय इतका चावला जातो/गेला आहे, की त्याचे आणखी तपशील देण्यात हशील नाही.
आपल्याच वावराचे बारकावे वापरून आपल्या विचारांवर, आचारांवर प्रभाव टाकला जातोय. हम सब इस रंगमंच की कठपुतलियाँ. किस की डोर कब खींच जाए कोई नहीं कह सकता. ती डोर खींचून कोणी साबण विकतंय, कोणी राजकीय विचार.
पण ... जेवायला बाहेर जायच्याआधी झोमॅटोवर रिव्ह्यू पाहायचे आहेत. ठोस पत्ता हाताशी असूनही मला गूगल मॅप्स वापरायचे आहेत. दाराशी उबर पाहिजे. रेस्टॉरंटात वेटिंग आहे - बसल्याबसल्या दोन पोस्टी लाईक आणि तीन शेअर करायच्यात. "फीलिंग हंग्री विथ अन्या, गन्या अँड थ्री अदर्स" अशी क्याप्शन मारून फोटो शेअर करायचे आहेत. पान खाताना मल्लूॲप्सवर 'मी द्वापारयुगात कोण होतो' ही मौल्यवान माहिती मिळवायचीय.
म्हणजे ... समाजातल्या माझ्या वावराचा विदा मीच गावभर हगून ठेवला आहे.
पण मी ही ॲप्स वापरताना गोपनीयतेच्या शपथेवर दिली होती. फेसबुकवाले आणि ते ॲपवाले म्हणाले की कोणाला विदा देणार नाही...
असं तुम्हाला वाटत असेल, तर आप xxx (भाबडे) है!
सगळी बोंबाबोंब थांबेल, तेव्हा उरेल ते इतकंच : एका कंपनीकडे एक बायप्रॉडक्ट होतं. ते त्यांनी विकलं आणि पैशे केले.
तुम्हाला फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, दगड आणि धोंडे वापरायचे आहेत ना? त्याचे फायदे पाहिजेत ना? मग हे असंच चालणार. आहे हे असं आहे. घ्यायचं तर घ्या. नाहीतर भो...
प्रतिक्रिया
22 Mar 2018 - 10:37 pm | कपिलमुनी
गुगल आपल्याला किती ट्रॅक करते हे बघायला दुव्यावर क्लिक करा.
22 Mar 2018 - 10:49 pm | जेम्स वांड
मिपावरील काहीकाही मंडळींनी अक्षरशः तुमच्या पायाचं पाणी घ्यावं तीर्थ म्हणून. संयत , संतुलित तरीही विषयाला खोलवर ढवळून काढलेली तरी तजेलदार शैली.
ते जे तुम्ही साबण विकणे, ते राजकीय विचार विकणे म्हणालात न त्याला खुफिया धंद्यात एक नामाभिधान आहे सबव्हर्जन म्हणून, उत्तम गुप्तहेर तोच मानला जातो जो उत्तम सबव्हर्जन साधू शकतो, अन त्याला मास लेव्हलवर करणे शक्य झालंय ते त्याच्या पावडर लाली करून तयार केलेल्या कॉर्पोरेट अंगरखा घातलेल्या रुपड्यामुळे, बीआय, बीओ, बिग डेटा अश्या विविध रुपात तो आपल्यासमोर येत राहतो. थोर लिहिलेत! खूप आवडले
अजून लिहा खूप खूप खूप लिहा.
23 Mar 2018 - 2:43 pm | पगला गजोधर
लेखं उत्तम ! अगदी टेड टॉक ची आठवण आली , एवढा छान दर्जा आहे लेखाचा...
असो
==============================================
मी काय म्हणतो, या माहितीचा आपण असा वापर करू शकतो ...
आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी काय करायचे (ज्या लोकांचा सेल्फ-कॉन्शस जागा होऊन, त्याची त्यांना जाणीव झाली आहे अशी सर्वसामान्य लोक )
त्यांनी आपल्या सेल्फ-कॉन्शस पेर्सोनाला गुप्तहेर मानायचं, व दुसरा पब्लिक-सबव्हर्जन -पेर्सोना, इ युगात बाहेर वापरायचा...
23 Mar 2018 - 3:01 pm | जेम्स वांड
इतकं क्रिप्तिक समजत नाही हो, आपण गुप्तहेरही नाही अन डेटा ऐनालिटिक्स मध्ये पण नाही, सबव्हर्जन वगैरे विकिपीडिया आधारित ज्ञान वाचून परप्रकाशित झालेले आम्ही.
23 Mar 2018 - 3:18 pm | पगला गजोधर
जैसे तुम हो, वैसे दिखनेका नै !
और तुम जैसे दिखने का, उसके माफीक तुम नै रैनेका !
22 Mar 2018 - 11:06 pm | मदनबाण
आदू-दादू अरं जल्ला त्ये ट्रप्म तात्याचा फायदं झालं नव्ह... म्हणुन सगळी चॅवचॅव बघ ! जल्ला त्या ओबामामांनी असचं काय तरी गोळा केल व्हतं बघ...पण त्याच्या टायमाला कोणाला टॅवटॅव करावं वाटलं नाय...
बादवे... त्ये पब्लिक मधी नाय का येड्यावानी पोकेमॉन पोकेमॉन शोधत हिंडत व्हती सगळीकडं, त्यांचा जिपीएस लोकेशन डेटापण असाच गावला का त्या कंपनीला ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आँखें मिलानेवाले, दिल को चुरानेवाले मुझको भुलाना नही... :- Nazia Hassan
23 Mar 2018 - 11:04 am | कंजूस
सगल्या जगास्नी आपल्या बुट,चपला,हाटिलात काय हानलं, कोणती साडी,ड्रेस,मोबाइल घेतला हे दावायचं हाय तर वरडतात कशाला?
आणि झुक्याने त्याच्या यूनिवर्सिटी /कॅालिजाची साइट ह्याक करूनच फेसबुक सुरू केलं ह्ये ठावं नाय का? सोडा की फेसबुक.
6 Apr 2018 - 9:26 am | अनिरुद्ध.वैद्य
झुक्या काय तुमची म्हाईती डीलीट नाय करत!
23 Mar 2018 - 11:27 am | सर्वसाक्षी
लोकांना वाटतं की आधार कार्डामुळे त्यांची माहिती पसरते आहे.
असो. 'ऑन वेकेशन इन प्यारिस विथ फॅमिली' असे चेपुवर वाचुन म्हणे काही चोरांनी त्या व्यक्तिचे घर बिन्बोभाट लुटले होते.
23 Mar 2018 - 7:13 pm | चौकटराजा
सायबर गुन्हा तज्ञ डिकास्टा यानी शुद्ध मराठीत दिलेले एक व्याख्यान ऐकण्याचा योग आला होता. एका सोसायटीत सुरक्षा रक्षकाला वाटस अॅप ग्रूप मध्ये घेतला होता . औट ऑफ इंडीया या स्टेटस वरून , सी सी टी व्ही केमेरे बंद करून सुरक्षा रक्षकानेच घरफोडी घडवून आणल्याची केस त्याना सोडवायला आली होती. त्याची आठवण आली.
23 Mar 2018 - 7:26 pm | चौकटराजा
श्री डिकोस्टा यांचा सल्ला असा की स्मार्ट फोन वरील अॅप्स , जी मेल ची सदस्यता, व फेसबुक हे सर्वात धोकादायक आहेत .तसेच ओंन लाईन परचेस ही धोकादायक !
23 Mar 2018 - 7:44 pm | पगला गजोधर
कॅश ऑन डिलिव्हरी हा ऑप्शन वगळता .... ओंन लाईन परचेस ही धोकादायक !
23 Mar 2018 - 9:10 pm | मराठी_माणूस
ह्या वर अजुन सविस्तर सांगु शकता का ?
23 Mar 2018 - 12:09 pm | बिटाकाका
विदारक सत्य!
==================
पण सत्य असलं तरी जोपर्यंत माझ्या खिशातल्या पैशाला असल्या गोष्टीचा धक्का लागत नाय तोवर मला काय फरक नाय पडत असली आपल्याकडली सर्वसाधारण मध्यमवर्गीय मानसिकता दिसतेय! निवडणूक जिंकतेत व्हय डेटा इस्कटून, जिंका! तसंही निवडणूक जिंकण्यासाठी भारतात काय काय केलं जातंय ते ऐकलं तर त्या विश्लेषण करणाऱ्याला पण फेफरं भरेल!
==================
अहो हे निवडणूक, उत्पादने विकणे वगैरे ठीक आहे, पण दरोडे पडत आहेत ह्या असल्या फुकटचंबू अपडेट्स मुळे तर तेही झेपंना पब्लिकला, काय बोलायचं! सोशल नेटवर्किंग वापरायचं कसं आणि कशासाठी याचा प्रसार होण्याआधीच सोशल नेटवर्किंग घराघरात शिरल्याने बोंब झालीये असे वाटते.
23 Mar 2018 - 12:40 pm | पिलीयन रायडर
सध्या जो डेटा चोरीचा प्रकार चालू आहे, त्यासाठी काही लोक फेसबुकवर चेक इन वगैरे करणाऱ्या लोकांना तत्परतेने शिव्या घालत आहेत, हे पाहून हसूच आलं.
आज काल कुणी जुने नोकियाचे 3310 टाईप फोन वापरत असेल आणि इंटरनेटवर फारसा प्रेझन्स नसेलच तर तो ह्या सगळ्यातून सुटणं शक्य आहे. त्याचा चेपू आणि इन्स्टा इतकच लिमिटेड संबंध नाहीये.
समजा फेसबुकवर लोक नाही बोंबलले किंवा इन्स्टा वर नाही भापले तरी ते ट्रॅक होणार नाहीयेत का? तर तसंही अजिबात नाहीये. तुम्ही स्मार्टफोन वापरता , त्यात किमान का होईना काही apps टाकता, ज्यासाठी आवश्यक त्या परमिशन देता, युट्युब बघता, गुगल मॅप्स वापरता (ही काही आता चंगळ राहिलेली नाही) तेव्हा तुम्ही ट्रॅक होणार आहातच. तो फोन सुरू व्हायला किमान एक मेल आयडी तर द्यावा लागतोच.
ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या कुणाकडून तरी एक वाक्य ऐकलं होतं की तुम्ही कितीही लपायचा प्रयत्न करा, तुम्हाला आयडेंटिफाय करण्याच्या असंख्य पद्धती आहेत.
तर हो, आहे हे असंच आहे. फार तर फार आपण अनावश्यक app न घेणे, फेसबुक वर आप पीछले जनम मे कौन थे टाईप app जेव्हा प्रोफाईलला ऍक्सेस मागतात तेव्हा आपण पूर्वजन्मी कोण होतो हे शोधण्याचा मोह टाळून तो ऍक्सेस न देणे, गुगल मध्ये एक सेटिंग होतं हिस्टरी ऑफ ठेवण्याचं, ते वापरणे वगैरे गोष्टी करू शकतो.
टीव्ही,थिएटर, पेपर, रस्ते ... सगळं काही जाहिरातींनी भरून वहात असताना सोशल मीडिया वर तुमचा वापर जाहिराती आदळायला होणारच. आजकाल वेबसिरीज सुद्धा त्यातून सुटलेल्या नाहीत, सुटू शकतच नाहीत.
आदिमानवासारखं जगणे किंवा आहे ते स्वीकारून त्यातल्या त्यात सेफ जगण्याचा प्रयत्न करणे हेच काय ते शक्य आहे. ह्याहून वेगळं काही करण्या सारखं असेल तर नक्की समजून घ्यायला आवडेल.
23 Mar 2018 - 12:44 pm | पिलीयन रायडर
ह्यात ओला उबर ह्या लोकेशन ऍक्सेस असणाऱ्या apps चा उल्लेख राहिलाच. ह्यांना तर अनेकदा क्रेडिट डेबिट कार्ड्स सुद्धा attached असतात.
23 Mar 2018 - 12:51 pm | बिटाकाका
काही मतांशी सहमत, काहींशी नाही.
================
आपण ट्रॅक होणे (स्टॊक करणे) हा मुद्दा फेसबुकसाठी वापरला जातोय असे नाही, फेसबुक हे सोशल नेटवर्किंग संस्थळ असल्याने तिथे बिहेविरल ट्रेंड्स ट्रॅक करता येत आहेत. डेटा चोरी म्हणजे फार पर्सनल डेटा चोरला असे नाही तर माझ्या (आणि माझ्यासोबत अनेक जणांच्या) वागणुकीतील खाचखळगे ट्रॅक करून समाजाची दिशा ठरवण्यात येत आहे. त्यातही उत्पादने विकणे वगैरे ठीक आहे, पण निवडणुकांवर प्रभाव पडेल असे करणे तेही विनापरवानगी हे जास्त महत्वाचे आहे. या संपूर्ण प्रकरणात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा परवानगीचा आहे.
================
चेकइनचा मुद्दा मीही वर लिहिला आहे आणि त्याचा दुष्परिणामही लिहिलाच आहे. आय होप त्याला तूम्ही शिव्या सदरात टाकलेले नाही.
23 Mar 2018 - 2:27 pm | पिलीयन रायडर
नाही मी कुणा एकाला उद्देशून ते वाक्य लिहिलेले नाही. इन जनरल लोक तेवढाच मर्यादित विचार करत आहेत हा माझा मुद्दा आहे.
तुम्ही फेसबुक वर काही लिहीत नसलात, चेक इन करत नसलात तर तुम्ही कुणाला फॉलो करताय, सर्च करताय, काय वाचताय अशा अनेक गोष्टी ट्रॅक होत असणारच. साधारण त्यावरून अंदाज घेऊनच तुमच्या फीड मध्ये न्यूज, जाहिराती, अपडेट्स येत असणार. तुमचे सर्कल कोणते हे ही ट्रॅक होत आहेच की. पुन्हा त्यात आता चेपू, इन्स्टा, व्हाट्सअप्प सगळं linked आहे. ह्यांना मोबाईल मधल्या कॉन्टॅक्टसचा, फोटोचा ऍक्सेस असतो. मी कधीही असाईन केलेला नसताना माझ्या अनेक कॉन्टॅक्टस ना मेल आयडी आणि फोटो बरोबर असाईन झालाय. त्यांचे वाढदिवस माझ्या कॅलेंडर मध्ये आलेत. अशी माझी माहिती सुद्धा इतरांच्या फोन मध्ये गेली असणारच.
मुद्दा हा आहे की इतक्या प्रमाणात हे आपल्या आयुष्यात घुसलंय की नक्की कोण कधी केव्हा कसा डेटा गोळा करतंय ह्याचा हिशेब ठेवणं अवघड आहे. ह्या सगळ्याचा फायदा आपण घेत आहोत, आणि प्रत्यक्ष न दिसणारी किंमत मोजत आहोत.
निवडणूक कोण जिंकत आहे ह्याने भले मला फरक पडत नाही पण ह्या माध्यमांचा उपयोग जातीवाद, धर्मांधता वाढवायला होत आहे आणि ते मला जास्त घातक वाटतंय.
ह्या पार्श्वभूमीवर फेसबुकवर चेक इन करणाऱ्यांना (किंवा तत्सम पद्धतीने सोशल बटरफ्लाय लोकांना) झोडपण आणि आपण ते करत नाही म्हणून आपण सेफ असं मानणं बालिश आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
6 Apr 2018 - 9:37 am | अनिरुद्ध.वैद्य
अथवा पाडणे, गैर कसे समजावे?
आधीच्या काळी रात्रंदिवस रिक्षांवर कर्णे बसवौन प्रचार करणारे ह्यांचाच हा पर्सनलाईज्ड प्रकार. आधीही अग्रलेख प्रचारसभा यांतुन समाजभान निर्देशीत करता येत होते. आता ते फक्त तुमच्या हातात आलेय, अन तंत्रज्ञानाच्य कृपेमुळे कमालीच्या वाढीव पातळीवर प्रचार करता येतोय.
फेबु - केंब्रीज अॅनॅलॅटिका केसमध्ये फसवणुक अन चोरी झालिये. अॅक्सेस करण्याची परमिशन घेऊन चक्क डेटा चोरी करौन तो दुसर्या सर्व्हरवर ठेवला सीएनी अन मग रशियन गुप्तहेरांना विकला असाही आरोप आहे.
23 Mar 2018 - 12:44 pm | पुंबा
:(
आपण या बड्या धेंडांच्या इतके आहारी गेलो आहोत की आता मागे फिरणे कसे शक्य व्हावे?
३०-३५ वर्षांपुर्वी पाहिलंत तर अशी आपल्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाण्याची, आपण काय करतो, काय विकत घेतो, कशावर श्रद्धा ठेवतो, कुठल्या विचाराशी बांधीलकी ठेवतो हा डेटा चोरीला जाण्याची रिस्क नव्हती हे खरेच. पण मग या तंत्रज्ञानाने ज्ञानाचे किंवा निदान माहितीचे तरी लोकशाहीकरण केले याचे काय? पाहिजे ते चुटकीसरशी मिळणे याला हव्यास म्हणण्यापेक्षा मागे न पडण्यासाठीचा आटापिटा म्हणावा लागतो. पण या नादात किती आणि कोणत्या मार्केट फोर्सेसला आपल्या आयुष्याचे नियंत्रण सोपवतो आहोत हे कसे पडताळायचे? चोरी करणार्यांना कायद्याच्या कक्षेत कसे आणायचे? टेक कंपन्या राष्ट्र या संस्थेपेक्षा मोठ्या ठरल्यानंतर आपले, लोकशाही व्यवस्थेचे भवितव्य कसे असेल हा विचार करता करता डोके भंजाळते. होमो ड्युस हे प्रो. हरारींचे पुस्तक वाचताना प्रकर्षाने वाटले की जगडव्याळ अश्या बदलाचा थांग लावणे तरी आपल्याला शक्य होईल का?
या विषयासंबंधीचा उत्तम लेखः
आणखी डेटा घेणार्यांकडून त्याचा मोबदला घेण्याचे सुचविणारा हा आणखी एक अभिनव लेखः
23 Mar 2018 - 7:08 pm | धर्मराजमुटके
मी ह्या सगळ्याचेच अनुभव घेतला आहे. पण "मी आता शी करायला चाललो आहे किंवा करतो आहे' असं स्टेटस पाहायची या जन्मी इच्छा आहे. म्हणजे जीवन कसे सुफळ होईल.
23 Mar 2018 - 8:55 pm | टवाळ कार्टा
प्रतिसाद वाचल्यावर आमच्या एका व्याकरण-नाझी नवपुणेकर मिपाकर मित्राची आठवण झाली
=))
23 Mar 2018 - 8:11 pm | नीलकांत
लेख अतिशय उत्तम झाला. एका धावत्या टेड टॉकप्रमाणे झाला. ज्यांना या विषयाचा अंदाज आहे. त्यांना लवकर कळेल. मात्र नवीन असणार्यांसाठी विस्तार कमी पडेल.
बाकी गुगल, फेसबुक, ओला, हे सगळे आपल्यावर नजर ठेवून आहे हे उघड सत्य आहे. पण अश्या समाजमाध्यमांच्या वापरामुळे अमेरीका आणि भारतासारख्या मोठ्या देशांच्या निवडणुका प्रभावित करता येत असतील तर हे भयंकर आहे.
मागे प्रिझम उघडकीस आले होते तेव्हाही असाच गजहब झाला होता. पण त्याचे पुढे काही झाले नाही. याचे सुध्दा पुढे काही होईल असे वाटत नाही. कारण ह्या अश्या सवयी लागल्या आहेत की याला अन्य पर्याय असेल असे वाटत नाही. आणि कुणी उभा केला तर त्याचे आर्थिक गणित जुळेल की नाही अशी शक्यता आहे. अर्थात ह्या तंत्रज्ञानाच्या युगात काहीही शक्य आहे. विन्डोजला टक्कर देण्यासाठी मुस्तस्त्रोत उभे राहीलेच. असे काहीसे होईल अशी अपेक्षा आहे. बघुया काय होतेय ते.
23 Mar 2018 - 8:43 pm | जेम्स वांड
एकदम श्वास अडकला नीलकांतजी, खरोखर असे असले तर भयानक आहे हे. असले छद्ममार्ग वापरून जर लोकांची विचारशक्ती वगैरे वळवता येत असली तर , लोकशाहीचा अर्थच उरणार नाही काहीच
23 Mar 2018 - 8:17 pm | कंजूस
कोणीका निवडणूक जिंको त्याला काम करायला लावा.
23 Mar 2018 - 11:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
"एकदा निवडणूकीत मते देवून आम्हाला जिंकून दिलेत ना ? आता ५ वर्षे गप्प बसा, आम्हाला प्रश्न विचारत बसू नका." असा मोलाचा सल्ला "घटनेचा जाणकार आणि सर्वोच्च न्यायालयात मान्यवर वकील असलेल्या" एका भूतपूर्व कायदा व न्याय मंत्र्याने उघडपणे दिला होता, त्याची आठवण आली. :(
इतर एखाद्या विकसित देशात असे विधान केल्याबद्दल त्याला राजिनामा देवून राजकिय सन्यास घ्यावा लागला असता, हे नक्की. इथे तो त्याच्या पक्षाचे सरकार सत्तेवर असेपर्यंत मंत्रीपदावर होता.
24 Mar 2018 - 10:16 am | प्रकाश घाटपांडे
याचा अर्थ तुमची इच्छा असो वा नसो तुम्ही पारदर्शक आहात. सरकारने पारदर्शक असावे पण तुमची अपारदर्शकता शावूत राहिलि पाहिजे.साहजिक आहे कि तुमच्या पारदर्शकते मुळे तुम्ही जर अडचणीत येणार असाल तर तुम्हाला पारदर्शकता नको आहे. तुम्हाला तुमची गोपनीयता जपायची आहे पण इतरांनी पारदर्शक असल्याचा फायदा मात्र तुम्हाला हवा आहे. मला घरपोच सेवा हवी आहे पण माझा पत्त्ता हा गोपनीय राहिला पाहिजे. सेवा देणार्या ने तो फक्त त्याच्या पुरता मर्यादित ठेवायचा आहे. आन तशी हमी त्याने मला द्यायला हवी. अस सगळ ते विचित्र गणीत आहे.
24 Mar 2018 - 10:34 am | बिटाकाका
पत्ता गोपनीय ठेवावा ही नैतिक नाहीतर कायदेशीर अपेक्षा आहे म्हणून ती रास्त आहे असे मला वाटते.
24 Mar 2018 - 1:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
पत्ता, फोन क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक, इत्यादी गोष्टी ज्या कामाकरिता दिल्या आहेत केवळ त्याच कामाकरिता वापराव्या, व्यक्त परवानगी (एक्सप्रेस परमिशन) नसलेल्या इतर कोणत्याही व्यवहारासाठी ही माहिती वापरू नये, असे नीतिमत्ता व कायद्यात गृहित आहे. आर्थिक अथवा इतर फायद्याच्या लोभाने बर्याचदा तिकडे दुर्लक्ष केले जाते. असे व्यवहार त्या गोष्टींच्या मालकाच्या डोळ्याआड होत असल्याने आणि ते पकडण्यासाठीचे उपाय तितकेसे अचूक/परिणामकारक नसल्याने, हा प्रकार निर्बंधपणे चालू आहे.
24 Mar 2018 - 1:48 pm | सिरुसेरि
काळजी घेतली नाही तर Enemy of the State सारखी स्थिती होते .
24 Mar 2018 - 2:27 pm | पैसा
android mobile gps चालू असताना आम्ही देवबाग बद्दल बोलत होतो. Gps मालवण साठी लावलेले असताना अचानक देवबाग साठीचे निर्देश सुरू झाले असे आठवते.
डेटा अनधिकृत रित्या वापरणे हा अक्षम्य गुन्हा आहे पण आपल्याकडे सब चलता हय. काही दिवसापूर्वी आधार डाटा ५०० रुपयात मिळत होता याची आठवण असेलच.
गूगल च्या भोचकपणाला कंटाळून मी विंडोज फोनला चिकटून होते. मात्र आता त्याची development बंद झाली आणि बँकिंग ऍप विंडोज फोनवर चालेनासे झाले त्यामुळे अँड्रॉइडवर जाणे भाग पडले. लिनक्स फोन आला तर मी कितीही पैसे देऊन घ्यायला तयार आहे.
फेसबुक आणि व्हॉट्स ऍप अतिशय उपद्रवी प्रकार आहे मात्र भारतातल्या निवडणुकांवर असल्या अप्रत्यक्ष प्रचाराचा फार परिणाम होईल असे मला वाटत नाही कारण एकतर भारतातल्या निवडणुका धार्मिक, जातीय, आर्थिक मदत, भावनिक ब्लॅकमेल ई.ई.समीकरणांवर जिंकल्या जातात.
आता पाहिले त्यानुसार भारतात १९ कोटी ४० लाख फेसबुक वापरकर्ते आहेत. त्यात काही duplicate फेक खाती असतील. म्हणजे सुमारे १०० कोटी वर भारतीय लोक फेसबुक पासून लांब आहेत. आपण फेसबुक वापरतो म्हणून धोका वाटतो. जे डिजिटल जगात राहत नाहीत त्यांना असा काही धोका असतो हे माहीत असणार नाही.
24 Mar 2018 - 5:31 pm | यशोधरा
लेख आवडला.
25 Mar 2018 - 8:44 pm | अर्धवटराव
जे आहे ते असं आहे.. ह्म्म्म.. खरं आहे. कौटिल्याने हेच केलं. इस्ट इंडीया कंपनीने तेच केलं. माहितीच्या स्फोटाचा वापर करुन चेपु, गुगलोबा तेच करताहेत. भविष्याच्या उदरात काय काय वाढुन ठेवलय कोण जाणे. गाडगेबाबा आपल्या सार्वजनीक कार्याचं अक्खं दप्तर पूर्णपणे ओपन ठेवायचे म्हणतात. ज्याला जे बघायचं आहे ते मूक्तपणे बघा. कदाचीत हिच स्ट्रॅटजी या आभासी जगातल्या राक्षसाला रामबाण उपाय ठरेल.
25 Mar 2018 - 9:03 pm | किसन शिंदे
लेख आवडला.
25 Mar 2018 - 9:27 pm | Nitin Palkar
लेख आवडला, खाजगी माहिती चौर्याबाद्द्ल किंचीतशी माहिती होती पण हे एवढे जगड्व्याळ (बर शब्द सापडला) असेल याची कल्पना नव्हती. छान लिहिले आहे हे पुनश्च एकदा.
25 Mar 2018 - 9:38 pm | पिलीयन रायडर
आनंद मोरेंच्या वॉल वर काल परवा एक पोस्ट शेअर केलेली पाहिली. नमो app वरून आधार चा डेटा कसा लिक होत आहे हे सविस्तर लिहिले आहे. समीर गायकवाड ह्यांनी सुद्धा आधार कार्ड्स कसे लीक होत आहेत हे एकदा लिहिले होते.
सरकार कडे दिलेला हा डेटाच सुरक्षित नाही.
फेसबुकवरची ह्याच संदर्भातली एक पोस्ट सुद्धा व्हॉट्सअप्प वर फिरत आहे.
25 Mar 2018 - 10:59 pm | जेम्स वांड
आधार डेटा लीक वगैरे इतकं काही गंभीर नाहीये, उलट आधार जर बऱ्यापैकी सक्सेसफुली इम्प्लिमेंट झालं तर ज्या स्टेकहोल्डर्सना नुकसान होणार आहे त्यांच्याकडून बराच दूषप्रचार सुरू असतो.
25 Mar 2018 - 11:03 pm | पिलीयन रायडर
25 Mar 2018 - 11:03 pm | पिलीयन रायडर
गंभीर का नाहीये? की मुळात लीक झाले आहे हीच अफवा आहे? नसावी बहुदा कारण अनेक लिंक्स दिल्या होत्या, त्यातल्या दोन मी उघडून पाहिल्या.
मोरेंच्या वॉल वरची पोस्ट ही:-
आंनद मोरे ह्यांच्या वॉल वर त्यांनी श्री. संदीप सावंत ह्यांची पोस्ट share केली आहे.
~~~~~~~
काल ट्विटरवर कॉंग्रेसने #DeleteNamoApp हा हॅशटॅग चालवला होता.
त्याला कारणही तसेच होते.
NCC ने हे एॅप त्यांच्या देशभरातल्या सगळ्या कॅडेट्सना (जवळपास १५ लाख) इंस्टॉल करायला सांगितले आहे.
या एॅप व्यतिरिक्त त्यांना त्यांचे ईमेल अड्रेस आणि फोन नंबरसुद्धा पंतप्रधान कार्यालयासोबत शेअर करायला सांगितले आहेत.
कॉंग्रेसचा आक्षेप याच नमोएॅपच्या परमिशन्सवर आहे.
Contacts, Microphone, Location, Camera इत्यादी परमिशन्स त्या एॅपला का हव्या आहेत हा प्रश्न कॉंग्रेसने विचारला होता.
दुसरीकडे ट्विटरवर Elliot Alderson हा फ्रांसचा एक सिक्युरिटी रिसर्चर (हॅकर्सचेच एक गोंडस नाव) आहे.
काही ठिकाणी त्याने त्याचे खरे नाव रॉबर्ट बाटीस्ट असल्याचे सांगितले आहे. (हे नावही खरे आहे की नाही, त्यालाच माहीत.)
तो सध्या ट्विटरवर आपल्या 'आधार'ची पोलखोल करतोय.
आधारच्या सिक्युरिटीमध्ये काय काय लुपहोल्स आहेत, आधारचा डेटा हॅक करणे किती सोपे आहे वगैरे तो सगळे प्रात्यक्षिकासहीत दाखवून देतोय.
तर झाले असे, की कॉंग्रेसच्या कालच्या #DeleteNamoApp या हॅशटॅगमुळे त्याने त्याचा मोर्चा या अॅपकडे वळवला.
त्याला मिळालेली माहिती, त्याच्याच शब्दात....
When you create a profile in the official Narendra Modi Android app, all your device info (OS, network type, Carrier …) and personal data (email, photo, gender, name, …) are send without your consent to a third-party domain called http://in.wzrkt.com
This domain is classified as a phishing link by the company G-Data.
This website is hosted by @GoDaddy and the whois info are hidden.
After a quick search, this domain belongs to an American company called @CleverTap.
According to their description, “#CleverTap is the next generation app engagement platform. It enables marketers to identify, engage and retain users and provides developers"
त्याने मोदीजींना प्रश्नसुद्धा विचारलाय, "I know privacy is not your thing but any thoughts about sharing the personal data of your users without their consent to a third-party company?"
यानंतर सहजच उत्सुकता म्हणून मी या CleverTap च्या CEO चे ट्विटर हॅंडल चेक केले.
त्यांच्या काही ट्विट्सवरून तर ते मोदीजींचे कट्टर फॅन दिसत आहेत.
योगायोग असू शकेल का हा ?
हा सगळा जो काही प्रकार सुरू आहे, तो बघून बालकवींच्या 'आनंदी आनंद गडे...' कवितेची आठवण झाली. :(
26 Mar 2018 - 7:14 am | जेम्स वांड
हे कुठल्या डेटाचे झालेत हे सांगणे बहुतेकांना जमत नाही, डेमोग्राफीक डेटा उर्फ कार्डवर दिसणारा डेटा हा लीक होऊ शकतो, पण हे लिक्स म्हणजे फार काही मोठे कुभांड आहे असे नाही, ज्याचा डेमोग्राफीक डेटा हवाय त्याचं नाव नीट गूगल केलं तर आधारवरच्या डेमोग्राफीक डेटा इतका किंबहुना जास्तच डेमोग्राफीक डेटा मिळतो
लक्षात घेण्यालायक मुद्दा हा की
तुमच्या बायोमॅट्रिक डेटा उर्फ आयरीस स्कॅन अन फिंगर प्रिंट्सना कोणीच ऍक्सेस करू शकत नाही, साक्षात मोदीजी सुद्धा नाही
मग प्रश्न येतो तो डेटा व्हॅलीडेशन होते कसे (ई-केवायसी वगैरे) तेही मी साद्यांत लिहितो फक्त थोडा वेळ द्याल ही विनंती.
बायोमेट्रीक डेटाचे फक्त व्हॅलीडेशन रिपोर्ट्स बाहेर येत असतात इतकं तूर्तास सांगतो.
26 Mar 2018 - 12:22 pm | उल्तानं
वाट बघतुय
26 Mar 2018 - 12:52 pm | शाम भागवत
नंदन निलकेणी तरी आधार बद्दल चांगल बोलताहेत. आधार ची बायोमेट्रिक माहिती लिक होऊ शकेल अशी काही लूपहोल्स त्यांनी ठेवली असतील? मला वाटते की, ही बायोमेट्रिक सर्व्हरवर नोंदली जाऊ शकतात. पण सर्व्हरवरून बाहेर जाऊ शकत नसावीत. जेव्हा आपला अंगठा स्कॅन केला जातो तेव्हा ती माहिती सर्व्हरकडे जात असणार व सर्व्हरवर असलेल्या माहितीशी ताडली जात असणार व बायोमेट्रिक माहिती जुळती तरच टेक्स्ट मधील माहीती बाहेर पाढवली जात असणार. अर्थात हा माझा तर्क आहे. माझ्याकडे पुरावा काहीही नाही. मात्र ज्याच्याकडे सर्व्हरची जबाबदारी आहे तो काहीही करू शकतो. चोराच्या हातात जमादाराच्या किल्या गेल्या तर .......
तिथे कोणतेही सरकार असले तरी ते काहीही करू शकणार नाही.
26 Mar 2018 - 12:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१००
हेच UIDAI कानीकपाळी ओरडून पहिल्यापासून सांगत आहे. पण, एकदा आपले हितसंबंध संभाळाण्याच्या हेतूने (पक्षी: जुन्या अवैध कारवाया उघड होऊ नये आणि नवीन अवैध कारवाया करता याव्या यासाठी) दुष्प्रचार करायचा असा उद्येश समोर ठेवल्यामुळे असे सगळे सत्य बहिर्या कानावर पडत आहे आणि जनतेची दिशाभूल करणे चालू आहे !
हीच टाईम टेस्टेड प्रणाली, गुजरात दंगल, १५ लाखाच्या गोष्टी, अफजल गुरूची फाशी, इत्यादींबाबत वापरली जाताना दिसते आहे, नाही का ?
26 Mar 2018 - 12:55 pm | पिलीयन रायडर
आधार मध्ये आपला बायोमेट्रिक डेटा सुरक्षित आहे असं नुसतं वाचून एक सेकंद बरं वाटलं! =))
कसा ते लिहा , वाट बघत आहे. :)
26 Mar 2018 - 2:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
आधार डेटा दोन भागांत असतो:
अ) डेमोग्राफिक : उदा: नाव, पत्ता, इत्यादी.
हा डेटा आपण फोन / वीज / गॅस इत्यादी अनेक कंपन्यांना आणि सोशल मेडियावर असंख्य वेळा दिलेला असतो. त्यात गुप्त असे काहीच नसते. ज्यावेळा डेटा लीक/चोरीची बातमी येते तेव्हा तो हाच डेटा असतो आणि तो आधारकडून ऐवजी इतर कंपन्यांकडून दिला गेल्याचीच जास्त शक्यता असते व तसे २०१४ पूर्वीच्या अनेक वर्षांपासून होत आलेले आहे. सद्या हितसंबंधियांकडून आधारच्या नावे शंख करण्याची मोहीम चालू आहे. "आधार व्यवहारात रुळले की आपले जुने अवैध धंदे बाहेर येऊ शकतात आणि नवीन अवैध धंदे करणे मुष्किल होईल" अशी "साधार" भिती यामागे आहे ! :)
आ) बायोमेट्रिक डेटा : उदा: बोटांचे ठसे, आयरिस स्कॅन व चेहेरपट्टी.
हा डेटा आधार सर्वर सोडून बाहेर जात नाही. ओळख पटविण्यासाठी दिलेले बोटांचे ठसे आणि/किंवा आयरिस स्कॅन, आधार कार्ड काढताना जमा केलेल्या डेटाबरोबर ताडून पाहिले जातात व जुळले तर फक्त होकार बाहेर येतो. त्यामुळे हा डेटा बाहेरून चोरणे अशक्य आहे. त्यासाठी, मल्टिलेअर्ड सुरक्षेतील अंतर्गत प्रणालीच्या चाव्या असलेली अनेक माणसे सामील असावी लागतील... असे होणे व्यवहारात अश्यक्यप्राय आहे.
अजून जास्त सुरक्षा हवी असल्यास UIDAI ने ग्राहकाला आपला बायोमेट्रिक डेटा लॉक करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. कुलुपबंद केलेला डेटा, ग्राहक स्वतःच्या उपयोगासाठी (पूर्वी स्वतः दिलेला कोड वापरून) कुलुप उघडून अॅक्सेस करू शकतो आणि १० मिनिटांनी कुलुप परत आपोआप बंद होते. त्यानंतर परत कुलुप उघडेपर्यंत तो ग्राहकासकट कोणालाही वापरता येत नाही. या सोईमुळे ग्राहकाच्या परवानगीशिवाय आधार नंबर/डेटा वापरणे शक्य होत नाही. कुलुप कसे लावावे व वापरावे याची माहिती या दुव्यात सापडेल.
26 Mar 2018 - 4:24 pm | महेश हतोळकर
माझाच एक अनुभव आठवला. आमच्याकडे you Telecom ची जोडणी होती. नाव माझं आणि नंबर भावाचा होता. जोडणी रद्द केल्यावरही बरेच दिवस भावाच्या नंबरवर माझ्या नावाने credit card, personal loan, investment scheme वगैरे फोन यायचे.
आपण त्यांच्याशी थोडं बारकाईने बोललो तर माहिती कुठून बाहेर पडली ते कळू शकतं. आधार कार्ड चोरांची गरज फार क्वचित लागते.
26 Mar 2018 - 9:03 pm | अभ्या..
पॉसिबल आहे,
एका नामांकीत मोबाईल कंपनीचे सिम व्हेरिफाय करणार्या ऑफिसात पाहिलेले दृष्य. रोज जे झेरॉक्स कॉपीज आणि फोटोज यायचे त्याचे दोन तीन सेट बनवले जात. रेगुलरली डॉक्युसोबत ते व्हेरीफाय होत पण इतर दोन तीन सेट वेगळ्या सिमसाठी व्हेरीफाय केले जात. हे सिम डेटा ऑफरला/टेलिमार्केटिंगला/नुसतेच व्हेरीफाय(कारण एका व्हेरिफिकेशनला ५०-६० रुपये मिळत त्यांना, डेली १०० सिम केले तरी खर्च वजा जाता तीन चार कामगारांचा पगार निघे त्यातून) करुन एक्स्ट्रा डोक्युमेंट जाळून टाकले जात.
पण डॉक्युमेंटसंदर्भात एक वेगळाच अनुभव आला नुकताच.
रेल्वे स्टेशनवर वॉलेट चोरीस गेले असता(वॉलेटात सगळे एटीएम्/क्रेडीट्/डेबिट्/आधार्/पॅन/ड्रायव्हिंग लायसन्स आदी एवज होता. रोख रक्कम अल्पशी होती.) रेल्वे पोलीस चौकीत तक्रार घ्यायचीच टाळाटाळ. रोख किती होते आणि सोने वगैरे काही गेले का हेच महत्त्वाचे होते त्यांना. बाकी कार्डस वगैरे तुमचे तुम्ही ब्लॉक करा पटकन असा सल्ला. आधार, पॅन, लायसन्स मिळते हो सॉफ्ट कॉपीवरुन डुप्लिकेट पटकन हा मोलाचा एक्स्ट्रा उपदेश. त्याचा मिस्युज कोणी करेल म्हणले तर "नसते हो तसे काही, तुमच्या पॅनवरुन कुणी लोन नसते काढत, आधारवरुन कुणाला गॅस नसतो मिळत, लायसन्सवरुन गाडी नसते चालवता येत" असे पण सल्ले बाहेरुन मिळाले. सो सर्वच जण ह्या कार्डाविषयी अगदी बिनधास्त आहेत हे पक्के.
मग मला बिचार्याला काय वाटते की कशाला ती कार्डे बिर्डे सगळेच बाळगावीत? फक्त आंगटे किंवा रेटीना (बायोमेट्रिक) हेच आयडेंटीफिकेशन असेल तर स्गळीकडे नुसते तसले बोटे दाबायची किंवा कॅमेर्यात बघायची रीडर/ मशीनरीच ठेवावेत. आक्खा माणूस समोर आयडेंटीफिकेशनला अॅव्हेलेबल असताना कुणी डोक्युमेंट मागूही नये,कुणी देऊही नये किंवा जवळ बाळगूही नये.
27 Mar 2018 - 1:47 pm | चौकटराजा
त्याना रोकड व सोने किती गेले यात रस होता. काहीसे असेच आमच्या बाबतीत झाले. माझा अन्दाज असा की त्याना चोराची माहिती असते. आमचे मोबाईल ही गेले म्हणता पहिला प्रश्न आला " काय किमतीचे होते... ?" मला दाट शंका आहेकी पोलिसांचा विशिष्ट गाळा त्यात असावा.
26 Mar 2018 - 4:24 pm | जेम्स वांड
बाकी राजकारण विषयक मुद्द्यात माझी कॉमेंट नाही पण आधार मुद्द्यावर तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांस मी शतप्रतिशत सहमत.
आधारची डिटेल प्रोसेस वर्णन करणारी कॉमेंट लिहीत होतो पण ती लेखाईतकी मोठी होत होती, सबब तिचेच थोडे संस्करण अन एडिटिंग करून एक वेगळा लेखच पाडावा , आज रात्री किंवा उद्या सकाळी तो पब्लिश करतो
26 Mar 2018 - 4:30 pm | शाम भागवत
कराच तस.
26 Mar 2018 - 4:46 pm | जेम्स वांड
गंमत म्हणजे इलियट ऍल्डरसन हे जे कोणी पात्र आहे ते सिक्युरिटी एक्स्पर्ट नसून एक अँड्रॉइड एप डेव्हलपर आहे , असे तो स्वतः सांगतो! दोहोंत जमीन असमानांचे अंतर आहे.
आता
ऍल्डरसन जे काही करतोय ते नमो एप ते काँग्रेस एप व्हाया आधार एप, अशी ही सगळी एप ऍनलाईज करत सुटलाय, कुठलं एप किती परमिशन घेते काय काय डेटा ऍक्सेस करते अन तो कुठे सेव करते हे तो बरोबर सांगतोय पण
आधारचे एप काढले म्हणजे त्या एप मार्फत सगळाच डेटा बाहेर गेला असे नाही. अन बायोमॅट्रिक डेटाची तर चिंताच नको
एक काल्पनिक सिनेरीयो घ्या, तुम्ही आधार एप डाउनलोड केलेत, केल्यावर तुम्ही त्यावर गरजेच्या परमिशन दिल्या अन तुमचा फोनचा डेटा आपण आजकाल जे युनिकॉर्न सारखे मिथकीय जीव समजतो अश्या एखाद्या हॅकरच्या हाती पडला तर तो काय करू शकेल?
परत लक्षात घ्या, त्याला फोन डेटाला ऍक्सेस मिळालाय, म्हणजे काय तर तो तुमच्या नंबरवर एखादा एसएमएस मिळवून तुमचा आधार डेटा ओटीपीच्या सहाय्याने अनलॉक/लॉक करू शकेल, वाईटात वाईट म्हणजे काय तर तो ओटीपी वापरून तुमच्या आधारवरचे डेमोग्राफीक डिटेल्स बदलू शकेल, ठीक, हे झालं वाईट वाईट दुस्वप्न वाईट, आता हॅकर ने पिलीयन रायडर, रहिवासी कोथरूड, पुणे हे बदलून समजा लेडी रायडर, राहणार हडपसर पुणे, असे बदलले, तर? तर काहीच नाही, पिलीयन रायडर ह्यांचा आधार 'फोर्ज' घेऊन त्या दुसऱ्या लेडी समजा सिमकार्ड घ्यायला गेल्या तर तिथे अंगठा लावावा लागणार, तो कुठून डुप्लिकेट करणार? अजूनतरी मानवी तंत्रज्ञानात सिनेमे सोडून फिंगर प्रिंट डुप्लिकेट करणे साधले नाहीय! म्हणजे इतकी मेहनत करून शेवटी मिळालं काय? तंबोरा, बरं इतकं व्हायच्या आधी, तुमच्या आधारावर नकली ऍड्रेस चढवायला सुद्धा त्यांना लोकल आधार तेव्हा केंद्रात जावेच लागेल. झालेले बदल त्या 'हॅकर' ला तुमच्यापासून लपवायचे असतील तर मोबाईल नंबर बदलायला लागेल, तो बदलायचा म्हणजे एक लास्ट ओटीपी तरी तुमच्या जुन्या नंबरवर यायलाच हवा! तो रिमोट ऍक्सेस ने त्याने पुसून टाकायचा म्हणलं तरी पहिले तो डिलिव्हर व्हायला हवा न तुमच्या मोबाईल मध्ये!. असे सगळे आहे.
26 Mar 2018 - 4:56 pm | शाम भागवत
हे इतक गुंतागुंतीचे असल्याने सामान्य माणसाला कळणे अवघड वाटतेय. त्यामुळेच त्याच्या मनाचा गोंधळ उडवून देणे सोपे जातेय.
26 Mar 2018 - 5:09 pm | जेम्स वांड
मी ही हौशी तंत्रज्ञान प्रेमी आहे व्यावसायिक नाही. नीट चवीचवीने वाचा भागवतजी, सोपेच आहे. मुख्य म्हणजे आधार काही मला महिने पैसे देत नाही पण यूएस सोशल सिक्युरिटी प्रोग्रॅम पेक्षा अंदाजे तिप्पट मोठा कार्यक्रम, एक नवं औद्योगिक देश राबवतो काय, १.१९ अब्ज लोकांना कार्ड्स देतो काय हे माझ्यासाठी महान आहे अन उत्तम आर्किटेक्चर असलेला हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोचवणे मला कर्तव्य वाटलं इतकंच.
26 Mar 2018 - 7:02 pm | शाम भागवत
_/\_
26 Mar 2018 - 6:16 pm | तेजस आठवले
पण मी काय म्हणतो, आधार बनवतानाच आम्ही दिलेले अंगठे आणि डोळ्यांच्या बाहुल्या त्यांनी प्रतिनिर्मिती (क्लोन) केली नसेल कशावरून ?
बघा हं, मी आरोप करतोय की माहिती हॅक झालीय. आता ती झाली नाहीये ह्याचे पुरावे द्या. मी केलेल्या आरोपांसाठी पुरावे द्यायला मी बांधील नसतोच.
तसंपण इतके वर्ष CID बघितल्याने काहीही शक्य आहे असं वाटतं.
26 Mar 2018 - 6:45 pm | जेम्स वांड
मानवी तंत्रज्ञानाला तरी अजून (सिनेमा सोडुन) फिंगर प्रिंट्स अन आयरीस कॉपी करायचं तंत्र अवगत नाहीये. ह्याउपर अधिक बोलणार तरी काय आम्ही? रच्याकने सीआयडी तर काही काही एपिसोड मध्ये अतींद्रिय शक्ती असलेले गुन्हेगार पण धरते, त्यांच्या धरण्याला काही धरबंधच नाही :)
26 Mar 2018 - 6:28 pm | पिलीयन रायडर
थोडं लक्षात आलं, पण मला तरीही एक प्रश्न पडलाय.
आपण सिम घेताना अंगठा वगैरे कुठे देतो? फक्त आधार नंबर (किंवा कार्ड म्हणू) तेवढाच देतो ना. मग माझे आधार कार्ड असे वापरता येईलच ना? बऱ्याच ठिकाणी आपण कार्डच तर देतो.
कार्ड as डॉक्युमेंट म्हणून जिथे वापरले जात आहे, तिथे गैरवापर होऊ शकतो त्याचे काय?
बादवे, बायोमेट्रिक डेटा कधी लागतो आपल्याला व्हेरिफिकेशन साठी?
@ म्हात्रे काका, प्रतिसाद आवडला.
26 Mar 2018 - 7:14 pm | जेम्स वांड
टाईप केलेलें प्रतिसाद गायब होतायत माझे, परत जमलं ते आत्ता लिहितो नाहीतर उद्या सावकाश कॉमेंट करतो
26 Mar 2018 - 7:18 pm | सॅगी
आता नवे सिम कार्ड घेण्यासाठी आधार क्रमांकाबरोबर अंगठा लावावाच लागतो की...
तुमचा अंगठा हाच तुमची सही म्हणुन ग्राह्य धरला जातो.
नुसतं आधार कार्ड काही कामाचे नाही सिम घेण्यासाठी तरी
26 Mar 2018 - 7:25 pm | पिलीयन रायडर
हो का?? सॉरी, ही माहिती नव्हती मला. मग मोबाईल कंपनी कसं व्हेरिफाय करते? कारण डेटा तर सरकार कडे आहे ना.
26 Mar 2018 - 7:35 pm | पगला गजोधर
हो आणि ६० वर्ष्यापेक्षा मोठी लोकं, यांना तर फारच प्रॉब्लेम येतो, त्यांचे फिंगर प्रिंट्स तुलनेने गुळगुळीत झालेले असतात. ते व्यवस्थित सेन्स होत नाही सेन्सरवर ,
माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, एक सिनिअर सिटीझन त्यांना कोणीच नाही (मुलं दूर आहेत व त्यांना सांभाळत नाही) त्यांना सिम घेताना व्हेरिफिकेशन झालं नव्हतं ...
27 Mar 2018 - 7:14 pm | सुबोध खरे
हा बहुतांशी सेन्सर चा दोष आहे. हाताच्या बोटांच्या टोकाला सूज आली जशी काही रोगात/ संधिवातात येते किंवा कर्करोगाची केमोथेरपी घेणाऱ्या रुग्णामध्ये येते तर ठसे अस्पष्ट होऊ शकतात. अत्यंत कष्टाचे काम करत असल्यास तात्पुरते ठसे सपाट होतात पण काही दिवसात ते परत
परंतु चांगल्या सेन्सर मध्ये हा ठसा पकडला (capture)/ नोंदला जाऊ शकतो.
आजमितीस बोटांचे ठसे हे एकमेवाद्वितीय अशी ओळख म्हणून वापरता येतात.
आपल्या माहितीसाठी खालील दुवा वाचून पाहावा.
https://www.scientificamerican.com/article/lose-your-fingerprints/
26 Mar 2018 - 7:42 pm | सॅगी
सिम कार्ड घेतानाच आधार क्रमांकाच्या आधारे आपला पत्ता, फोटो वगैरे माहिती आधार डेटाबेस कडुन घेतली जाते.
त्यानंतर तुमची सही म्हणुन तुमचा अंगठा (किंवा कोणत्याही बोटाचे) फिंगरप्रिंट घेतले जातात, जे आधार सर्वरवरील माहितीबरोबर पडताळले जातात.
फिंगरप्रिंट मॅच झाल्याशिवाय तुमच्या नावे सिम दिले जात नाही.
26 Mar 2018 - 7:51 pm | सॅगी
आणि हे व्हेरिफिकेशन काही सेकंदात पार पडते.
26 Mar 2018 - 8:25 pm | mayu4u
माझ्या जुन्या क्रमांकाला आधार जोडताना अंगठ्याचा ठसा बायोमेट्रिक (जैवमापन?) यंत्रावर घेतलेला. नवीन क्रमांक घेताना पण आधार क्रमांक देऊन त्या जोडीला अंगठ्याचा ठसा द्यावा लागला होता.
28 Mar 2018 - 12:55 am | सतिश म्हेत्रे
सिम घेताना अंगठा द्यावा लागतो. मी दोन सिम अंगठा देवूनच खरेदी केली आहेत.
26 Mar 2018 - 11:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
आधारचे तीन मुख्य उपयोग केले जातातः
१. पत्रव्यवहारासाठी अधिकृत पत्ता देण्यासाठी :
हा बँक, वीज/गॅस कंपनी, इत्यादी मागतात आणि त्यासाठी तुमचे नाव जुळणारा पत्ता पुरेसा असतो. यासाठी आधार कार्डाची फोटोकॉपी पुरेशी असते. या संस्था, अधिक सुरक्षेसाठी मोबाईल क्रमांक ('आधार'चा अप्रत्यक्ष आधार !) आणि इमेल अॅड्रेस मागतात... मल्टीप्राँग्ड आयडेंटिफिकेशन.
२. अचूक व्यक्तीगत ओळख पटवण्यासाठी :
हे केवळ नावाच्या कागदी पुराव्याने पुरेसे अचूकपणे होत नाही. अचूकतेसाठी (उदा: सिम कार्ड देताना फोन कंपनी, इ) नावाबरोबर बायोमेट्रिक डेटा वापरतात. अचूकतेसाठी बायोमेट्रिक UIDAI डेटा मॅचिंग (UIDAI डेटा अॅक्सेस किंवा डेटा कॉपी नाही) कायद्याने जरूर असणार्या कंपन्याना; UIDAI कडे रजिस्ट्रेशन करून त्यांच्या बायोमेट्रिक डेटा मॅचिंग प्रणालीचा उपयोग करण्याची परवानगी काढावी लागते. कंपनीकडे असलेल्या प्रणालीवरून, कंपनीचा अधिकृत अधिकारी, UIDAI मध्ये लॉगइन करून, (अ) आधार क्रमांक आणि (आ) कंपनीच्या बायोमेट्रिक रीडरवर घेतलेले रिडिंग, UIDAI च्या डेटा मॅचिंग प्रणालीकडे पाठवतो. त्या प्रणालीकडून डेटा मॅचिंग झाल्याचा संदेश (डेटा नाही) मिळाल्यावर पुढची कारवाई होते. अर्थातच, अश्या कंपन्यानाही UIDAI मधिल बायोमेट्रिक डेटाला "डायरेक्ट अॅक्सेस" नसतो आणि अश्या कामाला आधार कार्डाची प्रत देण्याचीही गरज नसते (केवळ आधार क्रमांक पुरतो).
याशिवाय, अश्या दर वापराची देखरेख आणि नोंद करण्याची 'किंडरगार्टन स्तराची' व्यवस्था UIDAI ने केली नसेल असे म्हणणे म्हणजे... !
३. आस्तित्वात नसलेल्या माणसाचे व्यक्तिमत्व किंवा आस्तित्वात असलेल्या एका माणसाची एकापेक्षा जास्त व्यक्तिमत्वे (प्रोफाईल्स) तयार करून त्यांचा गैरवापर करू नये यासाठी:
महत्वाच्या व्यवहारांतले गैरव्यवहार टाळण्यासाठी ऑनलाईन बायोमेट्रिक डेटा हा अत्यंत अचूक आणि तातडीने पडताळणा करणे शक्य असलेला उपयोग आहे. भूतकालात गैरव्यवहार केलेल्यांची आणि/किंवा भविष्यात तसे करण्याची इच्छा असणार्यांची हीच नेमकी दुखती रग आहे. हे कारण समजल्यावर, "अमेरिकन किंवा शेंगेन (किंबहुना आजकाल बहुतेक सर्व महत्वाच्या देशांचे) व्हिसा काढताना अनेक तास रांगेत उभे राहून हसतमुखाने बायोमेट्रीक डेटा देवून, नंतर हसतमुखाने मुलाखतीसाठी दुसर्या रांगेत उभे राहणारे हे लोकच" आधारविरोधाच्या रांगेत हिरीरीने घोषणा देत उभे आहेत, याचे आश्चर्य वाटणार नाही ! :) ;)
"एक व्यक्ती एक कार्ड/डॉक्युमेंट/फायदा (उदा: पासपोर्ट/रेशनकार्ड/पॅनकार्ड/सरकारी मदत/सबसिडी/इ)" असा कायदा असणार्या व्यवहारांत, आधार लिंकिंगमुळे जुन्या "चुका (पक्षी: भ्रष्टाचार)" सुधारणे आणि/किंवा नवीन चुका टाळणे सुरु केले आहे. लाखोंच्या संखेने रेशनकार्ड/पॅनकार्ड रद्द झाल्याच्या आणि सरकारी मदत/सबसिडी.इ मध्यस्त/एजंट टाळून योग्य व्यक्तिंच्या बँक अकाऊंटमध्ये तडक जात असल्यामुळे गैरव्यवहार कमी झाल्याच्या बातम्या माध्यमात पाहिल्या असतीलच. यामुळे, अनेकांची पिढीजात भ्रष्ट दुकाने बंद होत आहेत/होत राहतील. सहाजिकच अश्या लोकांनी 'आधार'चा तीव्र द्वेष करणे आणि त्याची प्रतिमा मलिन करण्याचे उद्योग, जीवनमरणाच्या कराराने केले नसते तरच आश्चर्य !
वास्तवामधल्या जगात हे असे होणारच... हे दुर्दैवी आहे पण अपरिहार्य सत्य आहे. मात्र, सरकारने केवळ माध्यमातल्या विरोधाकडेच लक्ष देवून त्याचा उपाय करणे भागणार नाही. हताश झालेल्या विरोधकांकडून, आपले आरोप खरे ठरविण्यासाठी, आधार प्रणालीला धोका पोचविण्याचे व त्या बळावर जितं मया म्हणत 'आधार'ला कमकुवत/निरुपयोगी/धोकादायक ठरविण्याचे अनेक प्रकारचे प्रयत्न होणेही शक्य आहे आणि सरकारने त्यांच्या संबधातही प्रतिबंधात्मक उपाय करणे जरूर आहे... तसे आधीच केले नसल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल.
27 Mar 2018 - 7:16 pm | सुबोध खरे
+१००
6 Apr 2018 - 10:25 am | अनिरुद्ध.वैद्य
.
2 Apr 2018 - 4:38 pm | चौकटराजा
आज माझ्या एक चेपु मित्राने एक किस्सा टाकला आहे. एका पन्नाशी उलटून गेलेले जोडप्याच्या घरी प्रेग्नन्सी सम्बन्धात काही वस्तू विकणारे एक लिफलेट आले. यांचा संताप झाला . कारण आत्ता ऑपारेशन झाले होते .घरात१६ वर्षाची मुलगी होती. यांनी आमच्या कडे हे का पाठवले अशी पाठवणार्या एजन्सी कडे विचारणा केली . त्य्यानी सांगितले तुमची मुलगी गरोदर आहे. आम्ही शोधून काढलेय. कसे तर ती ज्यावेळी मोठ्या मोल मध्ये जाते त्यावेळी ती काय वस्तू पुन्हा पुन्हा हातात घेऊन पहाते यावर चे चित्रण आम्हाला मिळते आम्ही तिच्या चेहऱ्यावरून नाव पत्ता शोधला व आम्हाला वाटले ती गरोदर असावी कारण ती त्या संबंधित वस्तू सारखी हातात घेऊन पहात होती . सदर पिता डॉकटर होता . त्याला ही पत्ता नव्हता पोरीने काय केले पण एजन्सीला माहीत होते . आता बोला कुठे राहिली प्रायव्हसी ?
3 Apr 2018 - 4:13 pm | मराठी_माणूस
हाच का तो किस्सा ?
http://www.aisiakshare.com/node/6570
3 Apr 2018 - 6:36 pm | चौकटराजा
होय पण मी मुळात तो संपादित स्वरूपात वाचला व आठवल तसा लिहिला .
3 Apr 2018 - 5:58 am | चित्रगुप्त
@चौरा: किस्सा मजेदार आणि सावध करणारा आहे.... "आत्ता ऑपारेशन झाले होते" ते कुणाचे हे कळले नाही.
मी माझ्या लॅपटॉप आणि टॅबचा आपल्याकडे सदोदित रोखलेला कॅमेरा जाड्या कागदाचा तुकडा सेलोटेपने लावून बंद करून ठेवलेला आहे. फालतू जाहिराती कमी येतात असा अनुभव आहे, कोण कोण आपल्यावर नजर ठेऊन असते कुणास ठाउक.
3 Apr 2018 - 2:49 pm | चौकटराजा
आई किवा बाबा यातील. प्लानिन्ग चे.
7 Apr 2018 - 12:01 pm | लई भारी
आधार वर चर्चा चालू आहे म्हणून त्या अनुषंगाने ही लिंक देतोय. नेमकी कालच वाचनात आली.
https://www.quora.com/Why-do-people-in-India-hate-the-Aadhaar-card/answer/RaghuVamshee-M?share=2a7c9f7a&srid=ObDh
7 Apr 2018 - 1:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
खुद्द आधार प्रणालित काम करणार्या माणसाचे हे निवेदन माझ्या या प्रतिसादातील मुद्दा क्रमांक ३ सिद्ध करत आहे. धन्यवाद !
7 Apr 2018 - 4:08 pm | लई भारी
आपला प्रतिसाद आज वाचला आणि मग काल वाचलेली लिंक शोधून काढली.
आपल्या प्रतिसादाची लिंक बऱ्याच जणांना पाठवून झालीय :)
7 Apr 2018 - 12:20 pm | मराठी_माणूस
ह्याच विषयावरचा हा एक मस्त लेख
https://www.loksatta.com/lekha-news/april-fool-article-by-mandar-bharde-...