"वॉटसन, डॉक्टरला वॉकिंग स्टिक कोण देईल? अर्थात एखादं हॉस्पिटल, जिथे तो काम करत होता. मग 'सीसीएच' म्हणजे चेरिंग क्रॉस हॉस्पिटल असण्याची शक्यता जास्त आहे."
"बरं तर मग. चेरिंग क्रॉस हॉस्पिटल. आणखी कोणते निष्कर्ष काढता येतील?"
"तुला माझी पद्धत ठाऊक आहे, वॉटसन. वापर!"
"मला सुचणारा एकच निष्कर्ष म्हणजे या माणसाने खेड्यात आपली प्रॅक्टिस सुरू करण्याआधी लंडनमध्ये काही काळ काम केलं असावं."
"बरोबर आहे. आणखी थोडं पुढे जाऊन, हॉस्पिटलने ही काठी भेट देण्याचं कारण म्हणजे डॉक्टरसाहेब लंडनची नोकरी सोडताहेत हे असू शकेल. ही गोष्ट आपल्याला काय सांगते? हा गृहस्थ फार उच्चपदावर नसावा - कारण तो अशी मोठी नोकरी सोडून खेड्यात गेला नसता. म्हणजे नोकरी सोडतेवेळी हा नवशिका डॉक्टर होता - हाऊसमन. आता आपल्यासमोर उभा राहिलाय तिशीच्या आत-बाहेर असणारा एक डॉक्टर. बऱ्यापैकी मित्रमंडळी असलेला, फारशी महत्त्वाकांक्षा नसणारा, थोडा वेंधळा. त्याच्याबरोबर त्याचा लाडका कुत्रा असतो - टेरियरपेक्षा मोठा, पण मास्टिफपेक्षा लहान."
- दि हाऊंड ऑफ बॅस्करव्हिल्स, लेखक: आर्थर कॉनन डॉईल
माणूस सामाजिक प्राणी आहे. त्याला इतर माणसांबरोबर राहायला, वावरायला आवडतं. एकलकोंडेपणा हा स्वभावातला दोष मानला जातो, आणि एकटेपणा ही अप्रिय स्थिती. माणसाच्या समाजातल्या वावरावर समाजातल्या इतरांचे डोळे रोखलेले असतात. एखाद्याच्या वावराचा उपयोग समाजातल्या इतरांनी आपली उद्दिष्टं साध्य करण्यासाठी करून घेतला तर ते गैर समजलं जात नाही, किंबहुना अशा वर्तनाला प्रोत्साहनच दिलं जातं. त्यानेच एकमेकांत देवाणघेवाण असणारा एकसंध समाज तयार होणार असतो. त्यातच सर्वांचं हित असतं.
वर दिलेल्या उताऱ्यात एका विसरून राहिलेल्या वॉकिंग स्टिकवरून शेरलॉक होम्स त्या स्टिकच्या मालकाबद्दल निष्कर्ष काढताना दिसतो. वावरावरून, हावभावावरून मनाच्या पार खोल तळातलं ओळखण्याची उदाहरणं होम्स कॅननमध्ये अन्यही आहेत. (चट्कन आठवलेलं म्हणजे 'दि रेसिडंट पेशंट' या कथेमध्ये वॉटसनच्या डोक्यातले युद्धविषयक विचार होम्स क्षणार्धात सांगतो.)
तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर समाजातला वावर प्रत्यक्ष वावरापुरता मर्यादित न राहता आभासी (virtual) ही झाला. मग मोबाईल तंत्रज्ञानातली क्रांती आणि स्वस्त इंटरनेटमुळे प्रत्यक्ष आणि आभासी वावरातल्या सीमारेषा पुसट होत आहेत. एक साधा प्रयोग करून बघा. गूगलकडे असलेल्या तुमच्या विद्याची प्रत https://takeout.google.com/ येथे मिळेल. त्यातली लोकेशन हिस्ट्रीची जेसन फाईल आणि ही साईट वापरून तुम्ही कुठेकुठे गेला होतात याचा साद्यंत इतिहास अगदी नीटस नकाशावर बघायला मिळेल!
थोडक्यात काय, तर ते बघतायत. बिग ब्रदर इज वॉचिंग यू.
बर्मंग वॉचायचं तर बसा वॉचत. आपण कोणाला घाबरत नाय. कर नाही त्याला डर कशाला, वगैरे.
कर नसला तरी डर असू शकतो हे नुकतंच केंब्रिज ॲनालिटिका आणि फेसबुकच्या कृपेने पहायला मिळालं. हा विषय इतका चावला जातो/गेला आहे, की त्याचे आणखी तपशील देण्यात हशील नाही.
आपल्याच वावराचे बारकावे वापरून आपल्या विचारांवर, आचारांवर प्रभाव टाकला जातोय. हम सब इस रंगमंच की कठपुतलियाँ. किस की डोर कब खींच जाए कोई नहीं कह सकता. ती डोर खींचून कोणी साबण विकतंय, कोणी राजकीय विचार.
पण ... जेवायला बाहेर जायच्याआधी झोमॅटोवर रिव्ह्यू पाहायचे आहेत. ठोस पत्ता हाताशी असूनही मला गूगल मॅप्स वापरायचे आहेत. दाराशी उबर पाहिजे. रेस्टॉरंटात वेटिंग आहे - बसल्याबसल्या दोन पोस्टी लाईक आणि तीन शेअर करायच्यात. "फीलिंग हंग्री विथ अन्या, गन्या अँड थ्री अदर्स" अशी क्याप्शन मारून फोटो शेअर करायचे आहेत. पान खाताना मल्लूॲप्सवर 'मी द्वापारयुगात कोण होतो' ही मौल्यवान माहिती मिळवायचीय.
म्हणजे ... समाजातल्या माझ्या वावराचा विदा मीच गावभर हगून ठेवला आहे.
पण मी ही ॲप्स वापरताना गोपनीयतेच्या शपथेवर दिली होती. फेसबुकवाले आणि ते ॲपवाले म्हणाले की कोणाला विदा देणार नाही...
असं तुम्हाला वाटत असेल, तर आप xxx (भाबडे) है!
सगळी बोंबाबोंब थांबेल, तेव्हा उरेल ते इतकंच : एका कंपनीकडे एक बायप्रॉडक्ट होतं. ते त्यांनी विकलं आणि पैशे केले.
तुम्हाला फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, दगड आणि धोंडे वापरायचे आहेत ना? त्याचे फायदे पाहिजेत ना? मग हे असंच चालणार. आहे हे असं आहे. घ्यायचं तर घ्या. नाहीतर भो...
वाचने
32067
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
Tracking
खल्लास विषय! अन खल्लास लेखनशैली
लेखं उत्तम ! अगदी टेड टॉक ची
In reply to खल्लास विषय! अन खल्लास लेखनशैली by जेम्स वांड
म्हणजे नेमकं काय करायचे?
In reply to लेखं उत्तम ! अगदी टेड टॉक ची by पगला गजोधर
इतकं क्रिप्तिक समजत नाही हो
In reply to म्हणजे नेमकं काय करायचे? by जेम्स वांड
आदू-दादू अरं जल्ला त्ये
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आँखें मिलानेवाले, दिल को चुरानेवाले मुझको भुलाना नही... :- Nazia Hassanसगल्या जगास्नी आपल्या बुट
फायदा नाय आता
In reply to सगल्या जगास्नी आपल्या बुट by कंजूस
आणि तरीही
ऐकलेल्ला अनुभव
In reply to आणि तरीही by सर्वसाक्षी
आणखी काही
In reply to ऐकलेल्ला अनुभव by चौकटराजा
तसेच ओंन लाईन परचेस ही
In reply to आणखी काही by चौकटराजा
ओंन लाईन परचेस ही धोकादायक !
In reply to तसेच ओंन लाईन परचेस ही by पगला गजोधर
विदारक सत्य!
सध्या जो डेटा चोरीचा प्रकार
ह्यात ओला उबर ह्या लोकेशन
In reply to सध्या जो डेटा चोरीचा प्रकार by पिलीयन रायडर
काही मतांशी सहमत, काहींशी
In reply to सध्या जो डेटा चोरीचा प्रकार by पिलीयन रायडर
नाही मी कुणा एकाला उद्देशून
In reply to काही मतांशी सहमत, काहींशी by बिटाकाका
निवडणुकांवर प्रभाव पडेल
In reply to काही मतांशी सहमत, काहींशी by बिटाकाका
:(
म्हणजे ... समाजातल्या माझ्या वावराचा विदा मीच गावभर हगून ठेवला
प्रतिसाद वाचल्यावर आमच्या एका
In reply to म्हणजे ... समाजातल्या माझ्या वावराचा विदा मीच गावभर हगून ठेवला by धर्मराजमुटके
अतिशय उत्तम लेख
सवय....निवडणुका....लोकशाही
In reply to अतिशय उत्तम लेख by नीलकांत
कोणीका निवडणूक जिंको त्याला
"मते देवून आम्हाला जिंकून
In reply to कोणीका निवडणूक जिंको त्याला by कंजूस
याचा अर्थ तुमची इच्छा असो वा
पत्ता गोपनीय ठेवावा ही नैतिक
In reply to याचा अर्थ तुमची इच्छा असो वा by प्रकाश घाटपांडे
पत्ता, फोन क्रमांक, पॅन
In reply to याचा अर्थ तुमची इच्छा असो वा by प्रकाश घाटपांडे
काळजी घेतली नाही तर Enemy of the State सारखी स्थिती होते .
लेख आवडला
लेख आवडला.
उत्कृष्ट लेख.
लेख आवडला.
लेख आवडला.
आनंद मोरेंच्या वॉल वर काल
माझ्या लिमिटेड माहिती अन आकलनानुसार
In reply to आनंद मोरेंच्या वॉल वर काल by पिलीयन रायडर
गंभीर का नाहीये? की मुळात लीक
In reply to माझ्या लिमिटेड माहिती अन आकलनानुसार by जेम्स वांड
गंभीर का नाहीये? की मुळात लीक
In reply to माझ्या लिमिटेड माहिती अन आकलनानुसार by जेम्स वांड
ताई , तथाकथित लिक्स
In reply to गंभीर का नाहीये? की मुळात लीक by पिलीयन रायडर
तुमच्या बायोमॅट्रिक डेटा उर्फ आयरीस स्कॅन अन फिंगर प्रिंट्सना कोणीच ऍक्सेस करू शकत नाही, साक्षात मोदीजी सुद्धा नाही
मग प्रश्न येतो तो डेटा व्हॅलीडेशन होते कसे (ई-केवायसी वगैरे) तेही मी साद्यांत लिहितो फक्त थोडा वेळ द्याल ही विनंती. बायोमेट्रीक डेटाचे फक्त व्हॅलीडेशन रिपोर्ट्स बाहेर येत असतात इतकं तूर्तास सांगतो.वाट बघतुय
In reply to ताई , तथाकथित लिक्स by जेम्स वांड
नंदन निलकेणी तरी आधार बद्दल
In reply to ताई , तथाकथित लिक्स by जेम्स वांड
+१००
In reply to गंभीर का नाहीये? की मुळात लीक by पिलीयन रायडर
आधार मध्ये आपला बायोमेट्रिक
आधार डेटा दोन भागांत असतो:
In reply to आधार मध्ये आपला बायोमेट्रिक by पिलीयन रायडर
धन्यवाद डाॅक्टरसाहेब
In reply to आधार डेटा दोन भागांत असतो: by डॉ सुहास म्हात्रे
सद्या हितसंबंधियांकडून
In reply to आधार डेटा दोन भागांत असतो: by डॉ सुहास म्हात्रे
रेल्वे स्टेशनवर वॉलेट चोरीस गेले असता ..
In reply to सद्या हितसंबंधियांकडून by अभ्या..
म्हात्रे काका
कराच तस.
In reply to म्हात्रे काका by जेम्स वांड
बरं
हे इतक गुंतागुंतीचे असल्याने
In reply to बरं by जेम्स वांड
अजिबात गुंतागुंत नाही
In reply to हे इतक गुंतागुंतीचे असल्याने by शाम भागवत
_/\_
In reply to अजिबात गुंतागुंत नाही by जेम्स वांड
पण मी काय म्हणतो, आधार
In reply to बरं by जेम्स वांड
आपण तर वरती खुल्ला बोललो न आठवले साहेब
In reply to पण मी काय म्हणतो, आधार by तेजस आठवले
थोडं लक्षात आलं, पण मला तरीही
In reply to बरं by जेम्स वांड
रास्त शंका आहे ताई
In reply to थोडं लक्षात आलं, पण मला तरीही by पिलीयन रायडर
अंगठा द्यावाच लागतो
In reply to थोडं लक्षात आलं, पण मला तरीही by पिलीयन रायडर
हो का?? सॉरी, ही माहिती
In reply to अंगठा द्यावाच लागतो by सॅगी
हो आणि ६० वर्ष्यापेक्षा मोठी
In reply to हो का?? सॉरी, ही माहिती by पिलीयन रायडर
हा बहुतांशी सेन्सर चा दोष आहे
In reply to हो आणि ६० वर्ष्यापेक्षा मोठी by पगला गजोधर
क्वेअरी करुन
In reply to हो का?? सॉरी, ही माहिती by पिलीयन रायडर
इन्स्टंट व्हेरिफिकेशन
In reply to हो का?? सॉरी, ही माहिती by पिलीयन रायडर
आपण सिम घेताना अंगठा वगैरे कुठे देतो?
In reply to थोडं लक्षात आलं, पण मला तरीही by पिलीयन रायडर
कोणत्या काळात राहताय?
In reply to थोडं लक्षात आलं, पण मला तरीही by पिलीयन रायडर
आधारचे तीन मुख्य उपयोग केले
+१००
In reply to आधारचे तीन मुख्य उपयोग केले by डॉ सुहास म्हात्रे
प्रचंड सहमत!
In reply to +१०० by सुबोध खरे
माहिती विस्फोटाचा किस्सा ..
हाच का तो किस्सा ?
In reply to माहिती विस्फोटाचा किस्सा .. by चौकटराजा
होय पण
In reply to हाच का तो किस्सा ? by मराठी_माणूस
कॅमेरा बंद ठेवणे
ऑपरेशन .
In reply to कॅमेरा बंद ठेवणे by चित्रगुप्त
उत्तम लेख आणि चर्चा!
खुद्द आधार प्रणालित काम
In reply to उत्तम लेख आणि चर्चा! by लई भारी
अगदी असंच वाटलं!
In reply to खुद्द आधार प्रणालित काम by डॉ सुहास म्हात्रे
ह्याच विषयावरचा हा एक मस्त