जातस त जाय

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
13 Mar 2018 - 8:02 am

जातस त जाय,
येति रावून बी
नसे काई उपाय

नेजो
पाच पोते तांदूर
पन्नास पायल्या तूर
जाता जाता हेडून घेजो
मोहावरचा मोवतूर
दूध देवाचा बंद करन
आता तुयी गाय
जातस त जाय

करजो
सकारी एक फोन
दिसबुडता आठोन
हर मैन्याले पाठवजो
रुपये हजार-दोन
तुयी वाट पायतीन
घरवाले सप्पाय
जातस त जाय

सांगजो
पोराले आपल्या झाडीच्या गोठी
बाघ कोटी ना बावनथडी कोटी
आला कई त दाखवून डाकजो
अमराईतले सेंदऱ्या, गोल्या, घोटी
निस्यान सोडून तं जाते
वल्या खपनीमदी पाय
जातस त जाय

- संकेत,
१० मार्च, २०१८, पुणे
-------------------------------------------
हेडून म्हणजे काढून
मोवतूर म्हणजे मधाचे पोळे
देवाचा म्हणजे द्यायचे
सप्पाय म्हणजे सगळे
बाघ आणि बावनथडी या नद्या आहेत.
कोटी=कुठे
निस्यान =निशाण
खपन म्हणजे चिखल, पाय रुततात असा थोडा घन असलेला चिखल. आमच्याकडे किचड हा चिखलाचा वेगळा प्रकार.

कविताझाडीबोली

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

13 Mar 2018 - 10:47 am | श्वेता२४

आपला मूळ घर सोडून नोकरीसाठी शहरात राहणाऱ्या सगळ्यांनाच ही कविता भावूक करेल.

पद्मावति's picture

13 Mar 2018 - 3:05 pm | पद्मावति

खुप सुरेख.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Mar 2018 - 3:42 pm | अत्रुप्त आत्मा

स्वामीज्जी की महान रचनांएं!

आर्या१२३'s picture

13 Mar 2018 - 4:09 pm | आर्या१२३

नि:शब्द!! सुरेख कविता!

सांगजो, करजो.... अहिराणीच वाटली.

तुषार काळभोर's picture

14 Mar 2018 - 7:38 am | तुषार काळभोर

मिपावर काही नावं अशी आहेत, की नाव वाचून धागा उघडावा आणि नेहमीच भारी वाटतं.

चांदणे संदीप's picture

14 Mar 2018 - 7:56 am | चांदणे संदीप

स्वामीजी कीपीटप!

Sandy

अर्थ दिल्याबद्दल धन्यवाद, बरीचशी कळली, वाचायला गोड वाटली.

शिव कन्या's picture

15 Mar 2018 - 9:10 pm | शिव कन्या

काय गोडवा! आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2018 - 9:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

आवडली भावपूर्ण कविता !

नाखु's picture

17 Mar 2018 - 11:13 pm | नाखु

ठिकाणी

पैसा's picture

23 Mar 2018 - 3:28 pm | पैसा

सुंदर, अर्थपूर्ण कविता!

प्राची अश्विनी's picture

23 Mar 2018 - 3:48 pm | प्राची अश्विनी

सुंदर.

रातराणी's picture

11 Apr 2018 - 1:04 am | रातराणी

सुरेख कविता! भाषा आणि भावना दोन्हीतला गोडवा आवडला!!