सल्ला हवा

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
4 Mar 2018 - 7:40 pm

प्रिय मित्रहो (आणि मुलींनो). नेहमी मी मित्रहो, यावर थांबतो पण आज मला सल्ला पाहिजे आहे व सर्व जगाला पुरातन काला॒पासून माहीत आहेच की सल्ला हा बायकांच देतात व बहुतेक वेळी तो योग्यच असतो !
तर काय सांगत होतो, मला आज एक सल्ला हवा आहे. मी येथे भरपूर लिहतो व ( पाककृती सोडून) वाचतोही. काही वेळेला वाटते की लेखकाने लिहलेले चुकीचे आहे. अनेकदा खात्री असते. कमी वेळी खात्री नसते.त्यावेळी मी गप्प बसतो व जाणत्यांनी लिहलेले शोधण्याचा प्रयत्न करतो. Quits. i पण ज्यावेळी माझी ठाम खात्री असते की लिहलेले चूक आहे त्यावेळी काय करावे हा प्रश्न निर्माण होतो. मला तीन मार्ग असतात.
(1) विसरून जाणे. लेखकाला व जगाला शहाणे करावयास पाहिजेच याची गरज नसते.
(2) "वा छान , पण मला असेही वाटते " असे म्हणून आपल्याला पाहिजे ते लिहणे." कविता रसग्रहण "या प्रकारात ते चालते. लेखकाला बोचत नाही व वाचकांना चांगला अर्थ लाभतो.
(3) " साफ चूक; कळत नाही तर कशाला लिहता ? असे ठणकावून ( किंवा उपरोधिक भाषेत ) सांगणे.व मग आपले म्हणणे मांडणे. पन्नास वर्षांपूर्वी मिपा असता तर तुम्हाला पुणेरी ठसका काय ते वाचतांना पुरेवाट झाली असती. पण आज ते शक्य नाही. वयाचा परिणाम ! मग मी व्यनीवर लेखकाला माझे मत कळविण्याचा प्रयत्न करतो. पण काही वेळी तेही शक्य नसते. मग काय करावयाचे ? आणखी एक प्रयत्न म्हणून प्रतिसादात सौम्य प्रश्न विचारून लेखकाला सुधारण्याची संधी देतो. पण जर लेखकाने : उत्तरच दिले नाही वा काहीतरी असंबंधित लिहले तर काय करावयाचे ? विशेषत: लेखक नवीन असेल तर ?
उदाहरणे देता येतील. पण ते मह्त्वाचे नाही. मग काय करावयाचे ?
शरद
(जरासा गोंधळलेला)

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

5 Mar 2018 - 9:15 am | प्रचेतस

आपण एक स्वतंत्र लेख लिहून त्याचे खंडन करावे. :)
(*तुम्हाला एका क्रिप्टिक लेखकाच्या उपनिषदांविषयीच्या गोलमाल विधानांविषयी सल्ला हवा आहे असे गृहित धरतो आहे :) )

मराठी कथालेखक's picture

5 Mar 2018 - 12:51 pm | मराठी कथालेखक

इथे लोक व्यक्त होतात. प्रत्येक वेळी प्रत्येक जण पुर्ण व्यासंगी असेल , अभ्यास करुनच लिहीत असेल असे नाही. तो जे लिहितो ते त्याचे 'वाटणे' आहे, तो ते व्यक्त करतोय. ते अचूक असेल असे नाही...त्याला व्यक्त होवू द्या.. आपणही व्हा.. खास करुन 'जनातलं मनातलं' बद्दल मी हेच म्हणेन.
कुणी अभ्यासपुर्ण लेख काथ्याकूटमध्ये लिहीत असेल (किंवा अभ्यासपुर्ण असल्याचा त्याचा दावा असेल ) तर तुम्ही नक्कीच कठोर समीक्षा करा.

जेम्स वांड's picture

5 Mar 2018 - 12:58 pm | जेम्स वांड

हितं मिपा मालक, मिपा मालकनियुक्त संपादक, मिपा मालकनियुक्त साहित्य संपादक, ह्यांना लेखनाची मापं काढू वाटत नाहीत तर तुम्ही का म्हणे हा गोवर्धन पर्वत उचलताय उगीच्या उगीच?

***प्रतिसादात सौम्य प्रश्न विचारून लेखकाला सुधारण्याची संधी देतो**

तशी आम्हीही देतो काही न विचारता.

किरण नाथ's picture

5 Mar 2018 - 3:44 pm | किरण नाथ

***प्रतिसादात सौम्य प्रश्न विचारून लेखकाला सुधारण्याची संधी देतो**
सौम्यपणे सांगा व न ऐकल्यास सोडून द्या. जो ऐकत नाही त्याला पटवण्यात स्वतःला त्रास करून घेऊ नका.

पैसा's picture

5 Mar 2018 - 4:49 pm | पैसा

इथे फक्त जंगलाचा कायदा चालतो. समोरचा माणूस कानाखाली आवाज काढेल याची शक्यता नसल्याने अतिशय गलिच्छ भाषा वापरता येते. डुकर मंडळींशी जवळ गेल्यास काय होऊ शकते याची कल्पना असली पाहिजे. त्यावरून पुढे त्याच्याशी कुस्ती खेळायची का नुसती काठी मारायची का 'गच्छ सूकर भद्रं ते ' म्हणून सोडून द्यायचे हे आपल्याला असलेला वेळ, खुमखुमी इत्यादींवर अवलंबून असते.

अर्थात हे फक्त नाठाळ लोकांसाठी आहे. जे शांतपणे चर्चा करू शकतात आणि भाषा चांगली वापरतात त्यांच्याबद्दल काही प्रश्नच नाही. मग भले ते विरोधी मत का मांडेनात.

माहितगार's picture

5 Mar 2018 - 5:13 pm | माहितगार

प्रिय मित्रहो (आणि मुलींनो). नेहमी मी मित्रहो, यावर थांबतो पण आज मला सल्ला पाहिजे आहे व सर्व जगाला पुरातन काला॒पासून माहीत आहेच की सल्ला हा बायकांच देतात व बहुतेक वेळी तो योग्यच असतो !

आपल्या उपरोक्त मापाने (वाक्याने) आपण सल्ला द्याल तर बायकी ठराल, आपल्याला या लेखास कुणी सल्ला देईल तो बायकी ठरेल , किंवा आपले आणि इतरांचे सल्ले योग्य नसतील.

आपल्याला सल्ला देऊ इच्छिणार्‍या पुरुषांनी बिचकावे असे उपरोक्त विधानाचे प्रयोजन आहे का ?

पुरुषां विरुद्ध जेंडर डिस्क्रिमीनेशन करणारा मुद्दा क्लिअर होई पर्यंत सल्ला देऊ इच्छित नसलेला आणि या पुर्वीचे काही सल्ले दिले असल्यास वापस घेणारा माहितगार :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2018 - 12:50 am | डॉ सुहास म्हात्रे

याबाबत, मी पाळत असलेले काही नियम खाली देत आहे. ते तुम्हालाही उपयोगी वाटले तर आनंदच होईल :

१. मिपा हे जगभरच्या आभासी (virtual) मराठी मित्रांसाठी, किमान सभ्यता (पक्षी : अधिकृत धोरण) पाळून व्यक्त होण्यासाठी बनवलेले व्यासपिठ आहे, असे म्हणता येईल. तेव्हा, तुम्ही मित्रांच्या घोळक्यात असताना एखाद्या लेखात आहेत तशी विधाने केली गेली तर, तुमची किमान सभ्यता पाळुन जशी प्रतिक्रिया असेल, तसेच इथेही व्यक्त व्हा.

२. जाल हे आभासी माध्यम आहे. त्यामुळे, एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या आयडीवरून तिचे लिंग, वय, ज्ञान, अनुभव, इत्यादी जोखणे चुकीचे ठरू शकते. किंबहुना, जालावरच्या आयडीने तिच्या अश्या प्रकारच्या व्यक्तिगत वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करून आणि केवळ मजकुराकडेच लक्ष देऊन तुमचे मत व्यक्त करायला अलिखित परवानगी दिलेली असते.

३. तुमच्या प्रतिक्रियेवरचा त्या आयडीचा प्रतिसाद पाहून तुम्ही आपल्या नंतरच्या प्रतिसादांतिल मजकूराचे शब्द, रोख, स्पष्टक्तेपणा, इत्यादी जरूर तसे बदलू शकता.

४. दुसर्‍याचा लेख वाचून तुमच्या मनात आलेले मुद्दे, नीट समजावून देण्यासाठी, विस्तारने लिहायला हवे असे वाटले तर, मूळ लेखाचा संदर्भ देऊन किंवा न देताही, तुम्ही एक स्वतंत्र लेख प्रसिद्ध करू शकता.

५. (अ) लेखातले मुद्दे आणि/किंवा (पूर्वानुभवावरून) खुद्द लेखक तुम्हाला दखल घेण्याच्या पात्रतेचा वाटत नसला, आणि/किंवा (आ) पूर्वानुभवावरून, लेखकाचा प्रतिवाद करणे चिखलात कुस्ती करण्यासारखे होईल, अशी खात्री वाटत असेल तर त्या लेखनाला; अनुल्लेखाने किंवा फारतर एका त्रोटक प्रतिसादात त्या कारणाचा त्रोटक उल्लेख करून (उर्फ मिपाभाषेत, इग्नोरास्त्राने), मारणे हा सुद्धा एक परिणामकारक उपाय ठरू शकतो. :)

६. "जगातील सगळ्या विषयाचे किंवा अगदी एखाद्या विशिष्ट विषयाचे "अंतिम" ज्ञान आपल्याला झालेले नाही" आणि "जगातील सगळ्यांचे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली नाही", हे ज्ञान अश्यावेळी मनःशांती उत्तम अवस्थेत ठेवायला फार उपयोगी पडते, असा अनुभव आहे. तरीही, लेखकाने फारच वात आणला असला तर एखाद्या वेळेस चिखलात उतरून कुस्तीचा अनुभव घेणेही मजेशीर ठरू शकते. अन्यथा, अश्या परिस्थितीत, इतरांपैकी कोणी एक/अनेकजण अशी कुस्ती करतातच, असे अनुभव सांगतो. बांधावर बसून अश्या कुस्तीची मजा पाहण्यातही एक वेगळीच खुमारी असते ! =))

मिपासारखे मुक्त संस्थळ जालावरच्या समाजाचे प्रतिबिंब आहे, म्हणून त्यात समाजातिल बरे-वाईट दिसणारच ! त्यामुळे, "तुमची मनःस्थिती जराशीही बिघडावी इतकी नावडत्या आयडींची पात्रता नाही" अशी खूणगाठ मनाशी बांधून, आपल्याला आवडणार्‍या/पटणार्‍या आयडींबरोबरच्या संवादाची मजा उपभोगावी.

Nitin Palkar's picture

6 Mar 2018 - 3:23 pm | Nitin Palkar

'सल्ला हवा आहे' असे शिर्षक वाचून मोठ्या सुर्सुरीने आम्ही हा लेख (किंवा जे काही आहे ते) वाचायला घेतला. कारण कुणालाही सल्ला देण्याची पात्रता आमच्याकडे आहे अशी शोलेतील बसंती प्रमाणे आमची ठाम खात्री आहे. परंतु वाच्नन्ति तुम्हाला सल्ल्याची आवश्यकता नसून कुणीतरी "उगी उगी ...." असे म्हणण्याची गरज आहे असे आम्हांस वाटते. तस्मात अति विचार करून स्वतःच्या मेंदूस शिन करून घेऊ नये हा सल्ला. कळावे क्षोभ नसावा.