प्रीती तुझ्यावरी पण...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
13 Jan 2018 - 1:04 pm

प्रीती तुझ्यावरी पण,समजे मलाच नाही.
या अनाकलनाचा,मी काय अर्थ घ्यावा?

शब्दात सांगताना,उरते मनात काही.
या गूढ शांततेचा,मी काय अर्थ घ्यावा?

एका किनारी तूही ,दुसय्रास स्पर्श माझा.
मधल्या प्रवाहितेचा,मी काय अर्थ घ्यावा?

मोडून एक काठ,वळते नदी जराशी.
मग शांत त्या तळाशी,कोठून सूर द्यावा?

जमले मनावरी हे, शेवाळ दाट सारे.
गहिरे कसे म्हणू मी?निसटंताचं अर्थ व्हावा!

आता मनावरूनी, सोडून देतं सारे.
दिसली फुले जरी ही,निरं-माल्य अर्थ व्हावा!

सोडून काय देऊ? सारेच क्षणभराचे.
हे रोजचेच आहे, साधाच अर्थ घ्यावा.

थांबवू कशास मग मी? या नित्य काव्यगतीला?
या लख्ख वर्तमानी,आता विराम घ्यावा.
=============================
अतृप्त..

शांतरसकवितागझल

प्रतिक्रिया

या कवितेचा काय अर्थ घ्यावा?

कविता आवडली.

वाहव्वा अत्रुप्तजी आत्मा...!!!
काय सुंदर कविता केलीत तुम्ही. कविता वाचता वाचता शेवटच्या ओळींपाशी येतोवर मन अगदी हेलावून गेलं होतं. खरंच अगदी टची कविता.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jan 2018 - 4:56 pm | अत्रुप्त आत्मा

वाहव्वा प्र चेट्सजी अगोबा,
काय सुंदर प्रतीपादन केलत तुम्ही. वाचता वाचता शेवटच्या ओळींपाशी येतोवर मन अगदी हेला(का)वून गेलं होतं. खरंच अगदी टच टचीत प्रतीसाद! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/angry-tongue-sticking-out-smiley-emoticon.gif

अभ्या..'s picture

14 Jan 2018 - 12:00 pm | अभ्या..

गुर्जेश, फुल्ल विडंबनाचा मसाला असलेली बुंदी पाडलिया तुम्ही.
आता बघाच, थोडे दिवस वाट, उगवेल विडंबनाची पहाट.

वेशीवरचा म्हसोबा's picture

14 Jan 2018 - 1:28 pm | वेशीवरचा म्हसोबा

कवितेच्या नावावरुनच कळते, ही जरा "वेगळ्या" धाटणीची कविता आहे.

पैसा's picture

14 Jan 2018 - 3:03 pm | पैसा

विराम कशाला घेताय? उलट तुमचे तांब्याधारी शिष्य हल्ली नाराज आहेत!

माहितगार's picture

14 Jan 2018 - 5:30 pm | माहितगार

अतृत्प आत्मा एकदाचा व्यक्त झाला :) (@अतृ कविता आवडली हेवेसानल) त्यांना स्वतःस विराम घ्यायचा त्यांच्या ओळीवरून आणि त्यांच्या आंतरजालीय स्वभावा वरून वाटत नाही चुभू दे घे.

शेवटच्या फुलांच्या निर्माल्याच्या शब्द कुणासाठी किती टची असू शकतो ते ओंजळ फुलांनी भरलीयना म्हणणार्‍या स्पृहा जोशींना कुणी तरी कळवावयास हवे . असो या निमीत्ताने स्पृहा जोशींची अलिकडे युट्यूबर ऐकलेली एक कविता.

आतत्यांच्या ओळीवरून आणि स्वभावा वरून वा
अतृत्प आत्मा एकदाचा व्यक्त झाला :) त्यांना स्वतःस विराम घ्यायचा असे

माहितगार's picture

14 Jan 2018 - 5:32 pm | माहितगार

* युट्यूब लिंकेखालील ओळी अनवधानाने तशाच राहील्या , क्षमस्व.

मुक्त विहारि's picture

14 Jan 2018 - 5:50 pm | मुक्त विहारि

गुरुजींचे साहित्य प्रकाशित होवून अख्खा एक दिवस गेला पण अद्यापही "स्पा"चा प्रतिसाद नाही...

पुर्वीचे मिपा राहिले नाही....

तृप्ति २३'s picture

15 Jan 2018 - 11:59 pm | तृप्ति २३

कविता आवडली.
Marathi Kavita Aathavan

राघव's picture

16 Jan 2018 - 12:13 pm | राघव

सोडून काय देऊ? सारेच क्षणभराचे.
हे रोजचेच आहे, साधाच अर्थ घ्यावा.

हे खास आवडले! :-)

या रचनेवरून बर्‍याच आधी लिहिलेला एक शेर आठवला..

तसवीर नजरोंमें हों.. पर काग़ज पर न आए..
लब्ज़ ज़हनमें हों.. पर ज़ुबांपर न आए..
तड़प दिलमें हों.. पर किसीकी समझ़में न आए..
... शायद प्यार की राहपर पहला कदम है!!

राघव

सस्नेह's picture

16 Jan 2018 - 1:27 pm | सस्नेह

दिल गार्डन गार्डन कविता..!

थांबवू कशास मग मी? या नित्य काव्यगतीला?

कोणतीच गती किंवा आवेग थांबवू नये, हे आम्ही पामरांनी सक्षात कवी 'कलश' यांना सांगावे काय ???

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jan 2018 - 3:51 pm | अत्रुप्त आत्मा

दुत्त दु त्त! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

सस्नेह's picture

16 Jan 2018 - 4:17 pm | सस्नेह

=))

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Jan 2018 - 12:47 pm | ज्ञानोबाचे पैजार

कवितेचे शिर्षक आणि लेखकाचे नाव वाचून...

प्रीती तुझ्यावरी पण,डोळा दुसरीवरी.
तिसरीस भेटण्याचा,मी काय अर्थ घ्यावा?

किंवा...

प्रीती तुझ्यावरी पण, जिलबीची चव भारी,
तांब्या विसळण्याचा, मी काय अर्थ घ्यावा?

अशी काहीशी असेल या अपेक्षेने आलो होतो

पण इकडे बुवांना इश्काची इंगळी डसलेली दिसली

लगेरहो...

पैजारबुवा,

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jan 2018 - 1:21 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/hysterical-laughter-smiley-emoticon.gif

गुर्जींनी अत्रुप्त, अता असं न लिहीता काव्य केलं? अरेरे, आमच्यावेळी असं नव्हतं!

नेहमीपेक्षा हटके असल्याने अर्थातच दहापैकी दहा होते, शुद्धलेखनाच्या चुका केलंनीत म्हणून साडेनऊ.

नाखु's picture

17 Jan 2018 - 6:28 pm | नाखु

गृहस्थाश्रमात रंगल्या चांगल्या पुरावा म्हणून ही कविता वाखू ठेवत आहे.

अनवट वाटेवरील कविता वाचक चुकार नाखु

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jan 2018 - 8:16 am | अत्रुप्त आत्मा

सर्वांसी धन्यवादम् !

व्वा गुर्जी, कविता आवडली.
ही कविता 'तिच्या' दृष्टीकोनातून पाहण्याचा माझा एक प्रयत्न....

प्रीती तुझी मला रे कधी ना कळून आली,
तव गूढ शांततेचा अंदाज मज न यावा ।
निःशब्द तू ही मी ही, अबोल भाव सारे,
अव्यक्त प्रीतीचा ह्या, धागा कसा जुळावा?
कालांतरे अबोल जरी प्रीत ना निमाली,
जीवनप्रवास वाटा का भिन्न भिन्न व्हाव्या?
या लख्ख वर्तमानी, संपे विराम आता,
मी कार्यमग्न तरीही, आठव तुझाच यावा ।