विकासाच्या गोष्टी. .

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
2 Nov 2017 - 2:06 pm

मोखाड्यातलं एकदम दरीतला पाडा ' आमले ' गाव. जंगलात वसलेलं. वाड्याहुन खोडाळ्याकडे जाणार्‍या बाजुला हमरस्ता सोडुन दरीत उतरायचं. इनमिन ६५ कुटुंब. गावाशेजारुन वाहणार्‍या नदीमुळे पावसाळ्यातला चार महिने बाहेरच्या जगाशी संपर्क नाही अशी अवस्था होती, अगदी मागच्या वर्षापर्यंत.
आता नदीवर लोखंडी पुल टाकलाय चालत जाण्यासाठी. गावात अजुनही महावितरण पोहोचलेले नाही.

abc
एका बहुराष्ट्रीय कंपनीने सीएसआर च्या माध्यमातुन राबवलेल्या विकास प्रकल्पांच्या viability Plan आखण्यासाठी ही भेट होती.
सोलार युनिटच्या माध्यमातुन घरगुती वापर आणि पाण्याच्या मोटार बसवल्याय. चेक डॅमने पाणी अडवलयं. दुबार तिबार पिकांना सुरुवात झालीय. मधमाशी पालन, फुलशेतीतुन मोगरा, भाजीपाला असे नगदी पिक जवळ वाडा पर्यंत जातायेत.

backyard poultries, community kitchen gardens असे छोटे छोटे उपक्रम प्रभावी अन् चिरकालीन बदलाचे संकेत दाखवतायेत.
इतकी वर्ष जगाला अज्ञात असलेल्या पाड्यावर आताशी विकासाची नजर गेलीय.
कुणी आजारी पडलं की डोली करुन रस्त्यापर्यंत उचलुन अन् मग पुढे खोडाळा असा प्रवास. महिन्याच्या तिसर्या बुधवारी नर्स ताइ लसिकरणासाठी येते.
शौचालयांची अवस्था मात्र शोचनीय आहे. १२ ह्जार रुपये प्रती शौचालय या हिशोबाने ३० घरात अनुदानाचे शौचालय वापराविना पडुन आहेत. एकाने त्यात शेळ्या बान्धल्यायेत.

वनहक्क वगैरे मात्र अजुन कागदावरचं बरं का . . .

वावरसंस्कृती

प्रतिक्रिया

आताशीच विकास जन्मला म्हणावा. तसे पालघर जिल्हा हगणदारी मुक्त झाला असे जिल्हाधिकारी यांनी जाहिर केल्याचे वाचले.

थोडे अजून लिहिले आणि काही फोटो टाकले असते तर चांगले झाले असते. या गावाची कहाणी वाचकांपुढे आणल्याबद्दल धन्यवाद. या निमित्ताने सरकारचं लक्ष जाईल अशी क्षीण अपेक्षा.

सिरुसेरि's picture

3 Nov 2017 - 3:44 pm | सिरुसेरि

थोडी अजुन माहिती हवी होती . लेख अचानक संपल्यसारखा वाटला .