Night Out...!

प. शी.'s picture
प. शी. in जनातलं, मनातलं
23 Sep 2017 - 11:43 pm

विक्रमच्या पापण्यांची हालचाल झाली. पुसटशी चमक त्याला दिसत होती. रस्त्यावर काचेचा चुरा पडला होता. त्याची bike रस्त्याच्या कडेला तशीच पडून होती. तो भानावर आला. डोक्याला हात लावत रस्त्यावरच बसुन होता. त्याच्या कपाळावर जखम झाली होती. त्याच कपाळ, भुवया, कान सर्व काही रक्ताने माखल होत. हाता-पायालाही बरचस खरचटल होत. गुढग्या जवळ खरचटल्यामुळे jeans फाटली होती. शर्ट रक्त आणि मातीन माखला होता. तो हळुहळु ऊभा राहीला. त्याची नजर सुमनवर पडली. सुमन रक्ता-मातीच्या चिखलात तशीच निपचीत पडून होती. तिचा एक पाय Activa च्या खाली अडकला होता. तिचे रक्ताने भरलेले केस तिच्या चेहर्यावर चिटकून होते. माश्या तिच्या चेहर्या भोवती फिरत होत्या. विक्रम लगबगीन तिच्या जवळ गेला आणि तिच्या पायावरून Activa बाजुला सारली. तो खाली बसला आणि तिच डोक आपल्या मांडीवर ठेवल. तो तिच्या चेहर्या वरची केस सावरू लागला. तिच शरिर गार पडल होत. विक्रम तिच्या चेहर्याला कुरवाळत तिच्याकडे एकटक पाहत बसला होता. त्याच्या चेहर्यावर विचीत्र असे स्मीत हास्य होते. तो तिच्या डोक्यावर हळुवार थापा मारीत आकाशात चंद्राकडे पाहत बसला होता. सर्वत्र शांतता पसरलेली होती. रातकिडयांचा आणि दुरवर कुत्र्यांचा भुंकण्याचा आणि रडण्याचा आवाज त्या शांततेत भंग पाडत होता. रस्त्यावरच्या दिव्याचा तांबुस प्रकाश त्यांच्यावर पडत होता. विक्रम बराच वेळ तिच्या डोक्यावर थापत तिच्या कडे एकटक पाहत बसला होता. अचानक तो थांबला आणि तिला कुरवाळत बोलु लागला, “सुमन... तुझ्या coffee ची वेळ झाली... चल उठ लवकर ऊभी रहा” अस म्हणत त्याने तिच डोक खाली ठेवल. त्याने त्याची खाली पडलेली bike main stand ला लावली. त्याने तिला ऊभे केले. तिचा एक हात आपल्या खांद्यावर घेत तिला bike पर्यंत घेउन आला. “चल बस पटकन... आपल्याला अजुन sunset पन पहायचा आहे”. त्याने तिला bike वर बसवले आणि तिच्या दुपट्याने तिला स्व:ता भोवती बांधले.
विक्रम bike चालवत होता. सुमनच डोक त्याच्या खांदयावर होत. रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशात तिच्या चेहर्यावरची जखम दिसुन येत होती. तिचे डोळे बंद होते. तिच्या रक्ताने विक्रमचा शर्ट पार भिजला होता. विक्रम तसाच गाणी गुंगूणत bike चालवत होता. एका coffee shop जवळ त्याने bike थांबली. अचानक त्याला ग्लानी आली त्याचा तोल गेला आणि तो तिच्या सकट खाडकन खाली पडला...

घोरपडे ने एका जोडप्याला नाक्यावर आडवल होत. “काय Romeo , रातच्याला कूट प्रेम दावत हिंडताय?” आपल्या रानड्या आवाजान तो विचारपूस करत होता तोच त्याच्या walkie talkie वर message आला. “पाटील, या दोगांच्या घरला जरा फोन लावा... यांच्या बापासनी बी कळु द्या... पोर रातच्याला कूट night out मारताय ते... “ घोरपडे तोंडातला बार बोटाने बाहेर फेकत jeep जवळ गेला. “हा बोला... हं... हं... कूट? हं... पोचतो... “ walkie talkie बंद करत “ओ पाटील आर किती वेळ... गाडीचा नंबर घ्या आन सोडा त्यांना... आन ए Romeo… परत जर रातच्याला दिसलाना सरळ आत टाकीन... चला घरला निघा आता”. तो मुलगा लगबगीन गाडी सुरू करू लागला. “काय सर कश्याला सोडल? काहीतरी तोडीपानी झाली असती.” “पाटील, तुम्ही गाडी काढा... सुस रोडला accident झाला... Activa सापडली आहे... “

क्रमश:...

कथासाहित्यिकलेख

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

24 Sep 2017 - 11:42 am | पद्मावति

रोचक. पु.भाप्र.

प. शी.'s picture

24 Sep 2017 - 12:25 pm | प. शी.

धन्यवाद... माझ्या लेखनावर प्रथम प्रतिक्रीया... पुढील भाग लवकरच प्रकाशीत होईल...
काही पुर्वअनुमान लावला असेल तर सुचवा. मी प्रयत्न करेल तुम्हास चुकीच ठरवण्याचा...

प. शी.

दुर्गविहारी's picture

24 Sep 2017 - 11:52 am | दुर्गविहारी

आँ ? नवीन भयकथा कि काय ?पु.भा.प्र.

प. शी.'s picture

24 Sep 2017 - 12:30 pm | प. शी.

धन्यवाद...

काही पुर्वानुमान लावला असेल तर सुचवा... तुम्हास चुकीच ठरवण्याचा प्रयत्न असेल...

पुढील भाग लवकरच...

प. शी.

पगला गजोधर's picture

27 Sep 2017 - 1:59 pm | पगला गजोधर

काही पुर्वानुमान लावला असेल तर सुचवा...

विक्रम आणि सुमन पहाटे सुसरोडच्या पॉइंटला भेटायचे ठरवतात, कारण बर्याच वर्ष्यांच्या ताटातुटीनंतर, MS करून विक्रम भारतात परतलेला असतो.
कॉलेजच्या दिवसातील, एकत्र CCD च्या टेबलावर मस्त वाफाळता कापचिनो घेण्याचा अनुभव त्यांना परत अनुभवासा वाटतो.
रस्त्याच्या दोन्ही टोकांना दोघे समोरासमोर आल्यावर,
ला ला ला ...... ला ला ..
ला ला ..ला ...... ला ला ..
ला....... ला लाला ला
करत गळाभेट घेण्यासाठी आसूसलेले असल्याने त्याला आपण बाईक चालवतोय व तिला आपण ऍक्टिवावर आहोत याचे भान राहत नाही.
दोघेही सुस्साट वेगाने गाडी दामटवतात .... आणि समोरासमोर टक्कर होते.....

प. शी.'s picture

27 Sep 2017 - 11:31 pm | प. शी.

छान... पण हे विनोदी नाही...

चांदणे संदीप's picture

26 Sep 2017 - 1:44 pm | चांदणे संदीप

विंटरेस्टींग!!

सुमनांची ऍक्टिव्हा आणि विक्रमची बाईक... एवढाच काय तो संदर्भ विचारात घेण्याजोगा वाटला.... बाकी... पुभाप्र!

Sandy

किसन शिंदे's picture

26 Sep 2017 - 2:19 pm | किसन शिंदे

आकाशात चंद्राकडे पाहत बसला होता. सर्वत्र शांतता पसरलेली होती. रातकिडयांचा आणि दुरवर कुत्र्यांचा भुंकण्याचा आणि रडण्याचा आवाज त्या शांततेत भंग पाडत होता. रस्त्यावरच्या दिव्याचा तांबुस प्रकाश त्यांच्यावर पडत होता.

हे लैच्च टिपिकल वाटले. थोडा प्रयत्न केलात तर यापेक्षा चांगलं लिहू शकाल असं वाटतं.

"चंद्र आकाशाकडे पाहत भुंकत होता, सर्वत्र रस्ता पसरलेला होता, कुत्री आणि रातकिडे तांबूस केसांचा भांग पाडत होते, दिव्यांच्या रडण्याने रस्त्यावर प्रकाश पडत होता."
.
असे चालेल का किसनमालक?

अरे बापरे! हसून हसून जी खोकल्याची उबळ लागलीये काय सांगू! =))

Nitin Palkar's picture

26 Sep 2017 - 8:27 pm | Nitin Palkar

सॉलिड अभ्याशेठ. लै ब्येस. कला आहे तुमच्या अंगात.

मार्मिक गोडसे's picture

26 Sep 2017 - 8:56 pm | मार्मिक गोडसे

रात्रीच्या अंधारात माश्यांचे चेहऱ्या भोवती फिरणे हे जरा अनैसर्गिक वाटते.

पैसा's picture

26 Sep 2017 - 10:22 pm | पैसा

वाचत आहे

नविन गडी आहे... काही वाटल तर मनसोक्त सांगा. पुढिल भागात सुधारण्याचा प्रयत्न असेल.

प. शी.

विनिता००२'s picture

27 Sep 2017 - 1:12 pm | विनिता००२

तिच्या दुपट्याने >> मला वाटलं, सुमन त्याची लहान मुलगी की काय??
परत वर जाऊन वाचल्यावर कळलं, ती तरुणी आहे.

कपिलमुनी's picture

27 Sep 2017 - 1:44 pm | कपिलमुनी

भूतकथा आहे अस वाटतय

संजय पाटिल's picture

28 Sep 2017 - 6:10 pm | संजय पाटिल

पूढील भागाची प्रतिक्षा..

त्याला वाटतय की मेलीय पण तो ते मान्य करत नाहीये.
आणि खर म्हंजे तोच मेलाय त्याचा जीव तीच्यात अडकलाय
म्हणुन तो तीला घेऊन जायला आलाय

नावातकायआहे's picture

29 Sep 2017 - 12:30 pm | नावातकायआहे

पु.भाप्र.