जलवंती

Shashibhushan's picture
Shashibhushan in जे न देखे रवी...
22 Sep 2017 - 10:16 pm

“जलवंती” च्या निमित्ताने

साल आता नेमके आठवत नाही. १९९२ किंवा ९३ असेल.
“Titanic” नावाचा नवीन सिनेमा आला होता. पाहिला. त्यात न आवडण्यासारखे काहीच नव्हते.
प्रचंड आवडला. तिची (टायटॅनिक नावाच्या महाकाय बोटीची ) कथा आधीपासूनच माहित होती.
ती आपल्या पहिल्याच सफरीवर कशी निघाली, तिला एक हिमनग कसा घासून गेला आणि ती कशी बुडाली हे सारे एका प्रेम कहाणीत गुंफून मस्त दाखवले आहे.
नंतर जेव्हा VCD DVD वगैरे प्रकार आले तेव्हा या सिनेमाची VCD आवर्जून घेतली, आणि मग या सिनेमाची बरीच पारायणे झाली.
या सर्वातून याच्यावर कविता लिहावी असे वाटले आणि कवितांची मालिकाच तयार होऊ लागली.
ती मालिका म्हणजेच “जलवंती”
एक स्वप्न. आता ही “जलवंती” कशी प्रवास करते याची मलापण उत्सुकता आहे!

कविताप्रेमकाव्य