भुट्टे का इंन्दोरी कीस

केडी's picture
केडी in पाककृती
31 Aug 2017 - 6:01 pm

IndoreKees-1

साहित्य
२ मक्याची कणसे [मी अमेरिकन स्वीट कॉर्न वापरली, पण मिळाली तर देशी वापरा]
२ हिरव्या मिरच्या
१ वाटी दूध
हिंग, जिरं आणि मोहरी, फोडणी साठी
१ चमचा धने पावडर
१/२ चमचा जिरेवण पावडर [नसल्यास, थोडा गरम मसाला आणि चाट मसाला एकत्र करून]
१ चमचा हळद
१ चमचा लाल तिखट [मी काश्मिरी लाल मिरची पावडर वापरली, का ते खाली लिहिलंय]
१ चमचा साखर
मीठ चवीनुसार
२ मोठे चमचे तेल (चालत असल्यास तूप)
सजावटी साठी बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेले खोबरे, लिंबाची फोड, बेदाणे (ऐच्छिक, मी नाही वापरले)

कृती
खरं तर आपण फोडणी देऊन मक्याचा किस करतोच, पण ह्या इंदोरी पद्धतीत, दूध घालून मक्का शिजवतात असं वाचलं, म्हणून मग करून बघितली. हा भुट्टे का कीस इंदोर ला स्ट्रीट फूड म्हणून बराच प्रसिद्ध आहे. हा मक्याचा किस तसा अगदी पिवळा धम्मक असतो, पण मला थोडं प्लेटिंग आणि प्रेझेंटेशन आपल्या भारताच्या तिरंग्या च्या रंगसंगतीवर करायचे होते, म्हणून मग काश्मिरी लाल मिरची पावडर घालून, तो केशरी रंगाचा करायचा प्रयत्न केला. मिरच्या आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी/जास्त करू शकता.

कणसं किसून घ्या. त्याचा साधारण २ वाटी किस निघेल. एका नॉन स्टिक भांड्यात तेल/तूप तापवून, हिंग मोहिरी आणि जिऱ्याची फोडणी करा. फोडणीत हिरव्या मिरच्या घालून त्या थोडा वेळ परतून, मग त्यात मक्याचा कीस घालून हे मिश्रण मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे परतून घ्या. ह्यात धने पावडर, हळद आणि तिखट घालून मिश्रण पुन्हा परतून घ्या. भांड्यावर झाकण ठेऊन मंद आचेवर साधारण १० ते १५ मिनिटे हे शिजू द्या. अधून मधून परतत राहा.

   Step-1   Step-2

   Step-3   Step-4

आता पातेल्यात दूध घालून मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्या. हे दूध घातलेले मिश्रण मंद आचेवर चांगले २० ते ३० मिनिटे झाकण ठेऊन शिजू द्या. अधून मधून मिश्रण हलवत राहा. मिश्रणाचा गोळा होत आला कि गॅस बंद करून, झाकण काढून हे मिश्रण गार करून घ्या.

   Step-5   Step-6

मिश्रण गार झाल्यावर, ते हातानं कुस्करून, रवाळ करून घ्या. गार करून असे केल्याने कीस छान दाणेदार आणि सुटा होतो. पुन्हा भांडे मंद गॅस वर चढवून, ह्यात साखर, चवीनुसार मीठ घालून झाकण ठेऊन कीस अजून ५ ते १० मिनिटे वाफवून घ्या. अधून मधून पाण्याचा हबका मारा, म्हणजे तो खालून लागणार नाही, आणि छान मऊ राहील. शेवटी वरून थोडीशी जिरेवण पावडर पेरून गॅस बंद करून टाका.

   Step-7   Step-8

खायला घेताना, वरून, कोथिंबीर, किसलेले सुक्के खोबरे (ओले सुद्धा चालेल), आणि लिंबू पिळून खायला घ्या. हवे असल्यास बेदाणे सुद्धा घालू शकता.

IndoreKees-2

प्रतिक्रिया

माझीही शॅम्पेन's picture

31 Aug 2017 - 6:08 pm | माझीही शॅम्पेन

दिसायला मस्त दिसतोय - तुम्ही म्हणजे ग्रेट शेफ आहातच

पण एक सांगतो .. मी इंदोरला सराफात खालेल्ला होता पण चवीला तितकासा चांगला लागत नाही कदाचित मी खूप काही अपेक्षा करून घेतला असेल

आता हा कुठे खायला मिळेल :)

केडी's picture

31 Aug 2017 - 8:51 pm | केडी

आता हा कुठे खायला मिळेल :)

केल्याने होतं आहे रे....आधी केलेची पाहिजे।
:-)

करून बघा, सोप्पी आहे पाकृ....

विशुमित's picture

31 Aug 2017 - 6:12 pm | विशुमित

फोटो वंटास आलेत.

बनवायची पद्धत सोपी वाटतीय. बघू जमतेय का करायला.

केडी's picture

31 Aug 2017 - 8:48 pm | केडी

करून बघा, आणि सांगा किंवा फोटो टाका.

गम्मत-जम्मत's picture

31 Aug 2017 - 7:19 pm | गम्मत-जम्मत

छान दिसत आहे. इथे बाजारात भरपूर कणसे येत आहेत, बहुतेक season असावा. मक्या चा किस करते बर्याच वेळा, या पद्धतीने जास्त स्वादिष्ट लागेल खरं.

अभिदेश's picture

31 Aug 2017 - 8:17 pm | अभिदेश

वापरूनच हा चांगला लागतो , आणि दूध ना घालता.

बरं, असा करून बघितलंय का पूर्वी?

अभिदेश's picture

31 Aug 2017 - 8:45 pm | अभिदेश

नाही आवडला. स्वीट कॉर्न मध्ये मजा नाय . देशीच चांगली , उलट थोडी जुन असली तर अजून जास्त चांगला लागतो.

ट्राय करून बघणेत येईल.

डॉ श्रीहास's picture

31 Aug 2017 - 8:48 pm | डॉ श्रीहास

तुम्ही मला एका दिवसात काय काय खाऊ घालू शकता ?

हा हा हा .... तुमच्या तिरंगी मक्याला सलाम ;))

या तर खर डॉक, मग करू, आणि एकच भेट का, फार लांब नाहीये, अधून मधून येत जा...
:-)

जेम्स वांड's picture

31 Aug 2017 - 9:18 pm | जेम्स वांड

कीस बनवून देसी करी फ्लेवर्ड कॉर्न ग्रीट्स असं डिशचं नाव सांगून आवतन देतो चार दोन फिरंग्यांना...
:D:D:D

केडी's picture

31 Aug 2017 - 9:29 pm | केडी

मस्त आयडिया होनेका ये! :D

पैसा's picture

31 Aug 2017 - 9:31 pm | पैसा

मस्तय!

ते तेवढं "किस" बदला! :D

:-)) तरी राहिलाच काही ठिकाणी किस ..... :-)
वाचकांनी किस च्या ऐवजी कीस असे वाचावे!
:-))

इशा१२३'s picture

31 Aug 2017 - 11:06 pm | इशा१२३

मस्त आवडता पदार्थ!इंदोरि सराफ्यात अनेकदा खाल्लाय. द्रोणात दिलेला गरमागरम भुट्टे का कीस खमंग लागायचा.आता घरिच करावा लागतो.

मुक्याचा किस ( द्विरुक्ती झाली वाटतं ).. स्वारी मक्याचा कीस हा आवडता पदार्थ.

उकडून आणि भाजून दोन्ही प्रकारे, कीसून त्यात तिखट, मीठ, लिंबू आणि चाम टाकून स्वाहा करायला आवडते.

हीपाकृआआहेवेसांनलगे

रेवती's picture

1 Sep 2017 - 6:53 am | रेवती

मक्याचा कीस आवडला. फोटू आकर्षक आलाय.

सविता००१'s picture

1 Sep 2017 - 9:18 am | सविता००१

केदार, मस्त आहे रे . तुझ्या रेसिपीज चे फोटो फार भारी असतात. शिकव की मला.. :(

ह्या पद्धतीने अजून नाही केला. मी यात कांदा बारील चिरून आणि थोडी आलं लसूण पेस्ट पण घालते फोडणीत. मग त्याला थोडी चव येते. नाहीतर नुसताच गुलामात लागतो अस वाटतं.
पण आता असाही करेन नक्की.

तू तुझा मोबाईल बदल किंवा साध्या डिजिटल कॅमेरा ने फोटो काढ....आणि मी सुद्धा शिकतोय, इथून तिथून बघून, वाचून आपला प्रयत्न करतोय.. :-)

हा असा मक्याचा कीस करून बघ, दुधामुळे एक वेगळा रिच फ्लेवर येतो, पोरांना आवडला हा प्रकार ...

झेन's picture

1 Sep 2017 - 3:25 pm | झेन

अफलातून असतात, प्रयोग करावासा वाटतो पण माझा कंटाळा जास्त पॉवरफुल असतो.
तूमच्या प्रत्येक रेसिपीच्या प्रेझेंटेशन आणि फोटोग्राफी करता __/\__

केडी's picture

1 Sep 2017 - 5:36 pm | केडी

तुमच्या प्रोत्साहना बद्दल मनापासून आभार!

झेन's picture

1 Sep 2017 - 3:27 pm | झेन

अफलातून असतात, प्रयोग करावासा वाटतो पण माझा कंटाळा जास्त पॉवरफुल असतो.
तूमच्या प्रत्येक रेसिपीच्या प्रेझेंटेशन आणि फोटोग्राफी करता __/\__

सप्तरंगी's picture

1 Sep 2017 - 7:06 pm | सप्तरंगी

सुंदर फोटो

मनिमौ's picture

1 Sep 2017 - 11:41 pm | मनिमौ

पदार्थ आहे. देशी कणसांचा कीस जास्त चवदार लागतो. बाकी पाकृ जबरदस्त हेवेसांनलगे

देशी कणसांचा कीस जास्त चवदार लागतो

प्रश्नच नाही, नक्कीच, पण हल्ली देशी कणसे मिळणे जवळ जवळ दुरापास्त झाले आहे ...कोवळी देशी कणसे कधीही उत्तम लागतील ह्यात....

रुपी's picture

2 Sep 2017 - 1:43 am | रुपी

सुंदर फोटो!

माझा फार आवडता पदार्थ, पण मी थोडेसेच दूढ अगदी शेवटी घालते. आता या पद्धतीने करुन बघेन.