मिस कॉल

मंगेश पंचाक्षरी's picture
मंगेश पंचाक्षरी in जनातलं, मनातलं
20 Aug 2017 - 8:46 am

©®™ मंगेश पंचाक्षरी, नासिक.
( रविवारी दि 13 ऑगस्ट 2017 रोजी दै सकाळ मध्ये छापून आलेला लेख)

आमच्या सौ ला कोणी 'मोबाईल'वर फोन केला तर मुळात आपला फोन वाजतो आहे हेच त्यांना लवकर समजत नाही. कारण त्या रोज मोबाईलची 'रिंग' बदलत रहातात. मोबाईल ही वस्तू रोज 'वॉलपेपर , रिंगर आणि डीपी' बदलणे एवढ्या साठीच असते अशी सौ ची ठाम समजूत आहे. सौ च्या प्रत्येक पर्सला खूप सारे 'कप्पे' असतात. त्यातल्या कोणत्या तरी 'कप्प्यात' सौ मोबाईल ठेवतात. मोबाईल ठेवण्याचा 'कप्पा' कधीही फिक्स नसतो. त्यामुळं मोबाईल ची 'रिंग' वाजायला लागली की सौ पर्स मधून मोबाईल सोडून इतर सर्व सामान बाहेर काढून मोबाईलचा शोध घेऊ लागतात. एका पर्स मध्ये इतकं समान मावू शकते यावर सौ सह आमचाही विश्वास बसत नसतो. त्यात बऱ्याच वेळा पूर्वी घरभर शोधलेल्या वस्तूचा अचानक 'लाभ' होतो. सौ त्यात 'हरवून' जातात. इकडे मोबाईल ची 'रिंग' वाजतच रहाते. अखेर मोबाईलचं वाजणं आणि थरथरणं बंद होते. आता एवीतेवी रिंग बंद झालीच आहे तर मोबाईल 'शोधून' काय उपयोग असा विचार करून सौ मोबाईल बाहेर न काढताच पुनः सर्व सामान पर्समध्ये भरून ठेवतात. पर्सची चेन बंद केली जाताच पुनः मोबाईल वाजणे सुरू होतं. विशेष म्हणजे 'मोबाईल'चा शोध परत पहिल्या प्रमाणेच सुरू होतो.

बायकांनी लवकर मोबाईल न उचलण्याचे 'मूळ' हे त्यांच्या पारंपरिक पोशाखात आहे. बायका जनरली साडी किंवा पंजाबी ड्रेस या वेशात असतात. या पोशाखाना खिसा नसल्याने मोबाईल पर्स मध्ये ठेवण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. क्वचित काही स्त्रिया जीन्स वापरत असल्या तरी पुरुषांप्रमाणे जीन्स च्या खिशात मोबाईल ठेवण्याची बायकांना सवय नसते. घरात किचन मध्ये पोळ्या वगैरे करताना, घरकाम करताना त्यांना पटकन मोबाईल वापरता येत नाही. आजकाल घराघरांत बरीचशी भांडणे ही केवळ बायको ने वेळेवर मोबाईल 'न' उचलण्याच्या कारणाने होत असतात.

बायकांची मात्र नवऱ्याकडून चटकन 'मोबाईल' उचलण्याची अपेक्षा असते. नवऱ्याने मोबाईल उचलायला उशीर केला की बायको ला नको नको त्या 'शंका' यायला लागतात. नवरेही काही कमी नसतात. त्यांच्या मोबाईल मध्ये सर्वात जास्त 'मिस' कॉल हे 'मिसेस' चेच कॉल असतात. एरवी एखाद्या 'मिस' चा कॉल कोणी पुरुष कशाला 'मिस' करेल?

© मंगेश पंचाक्षरी, नासिक.
इमेल:- mangeshp11@gmail.com

हे ठिकाणसंस्कृती

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

20 Aug 2017 - 10:16 am | ज्योति अळवणी

तुमचे लेख स्त्रियांच्या बाबतीत फार एकांगी आणि बुरसटलेल्या विचारांचे आहेत.

मंगेश पंचाक्षरी's picture

20 Aug 2017 - 11:32 pm | मंगेश पंचाक्षरी

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आपण कृपया बापाचं काळीज, कुलदेवी हे लेख वाचावेत तसेच कला, रनवे,उखाणे हे देखील वाचून बघावेत.

बाजीप्रभू's picture

21 Aug 2017 - 11:36 pm | बाजीप्रभू

सहज कुतूहल म्हणून चेक केलं... तुमचा दै. सकाळ मधील लेख "कुलदेवी" फेसबुकवरील "रवींद्र चिंदरकरची" डिट्टो कॉपी वाटतोय.

त्याची पोस्टिंग डेटहि तुमच्या अगोदरची आहे... तुमचा ६ ऑगस्ट आणि रवींद्रचा १७ जून २०१७. आता तुम्ही त्यांची कि त्याने तुमची मारलीय.... (कॉपी) ते कळायला मार्ग नाहीये.
https://www.facebook.com/groups/1479035239031800/permalink/1884021991866...

बाजीप्रभू's picture

21 Aug 2017 - 11:48 pm | बाजीप्रभू

"विद्या दोशी" यांच्या ब्लॉगवरून कॉपी केलेला आहे.
https://plus.google.com/111517147351199505546/posts/eoLk4Q3eEuD

मोदक's picture

22 Aug 2017 - 12:05 am | मोदक

व्वा.. खोदकाम भारी आहे..

सुबोध खरे's picture

22 Aug 2017 - 9:22 am | सुबोध खरे

हे प्रतिसाद बहुधा "कुलदेवी" ऐवजी या लेखावर आले आहेत असे वाटते.

अभिजीत अवलिया's picture

20 Aug 2017 - 11:26 am | अभिजीत अवलिया

वाईट वाटून घेऊ नका. पण असल्या सुमार लेखांमुळेच सकाळ दर्जाहीन पेपर आहे असे मला वाटते.

मंगेश पंचाक्षरी's picture

20 Aug 2017 - 11:29 pm | मंगेश पंचाक्षरी

त्यात काय वाईट वाटायचं? ज्यांचं कोणी छापत नाही त्यांची अशीच प्रतिक्रिया असते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Aug 2017 - 12:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> 'रिंग' वाजायला लागली की ---- पर्स मधून मोबाईल सोडून इतर सर्व सामान बाहेर काढून मोबाईलचा शोध घेऊ लागतात.

बर्‍याचदा असं पर्सवाल्या स्त्रीयांचं चित्र दिसतं, ही गोष्ट बाकी खरी आहे.

-दिलीप बिरुटे

मंगेश पंचाक्षरी's picture

20 Aug 2017 - 11:13 pm | मंगेश पंचाक्षरी

धन्यवाद!

गवि's picture

20 Aug 2017 - 12:27 pm | गवि

"©" तो खैर समझे.. पर "®™" ...?

अभिजीत अवलिया's picture

20 Aug 2017 - 12:30 pm | अभिजीत अवलिया

Registered Trade Mark?

अर्थ / फुलफॉर्म माहितीये पण लेखाला कॉपीराईट असतो. रजिस्टर्ड ट्रेडमार्कही कसा काय? आणि कोणता? असा प्रश्न पडला.

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Aug 2017 - 1:19 pm | माम्लेदारचा पन्खा

© लेखासाठी आणि ®™ लेखकाच्या नावासाठी . . . .

आठवा बरं . . . कछुआछाप ®™

रानरेडा's picture

21 Aug 2017 - 3:51 pm | रानरेडा

®™ लिहिले म्हणजे तुम्ही काय रजिस्टर केले ? असे स्वतःचे नाव रजिस्टर करता येते का ? मग पंचाक्षरी आडनावाच्या कोणी हि मंगेश नाव ठेवायचे नाही का ?? आणि ठेवले तर कायदेशीर कारवाई कशी करता येईल ?

मंगेश पंचाक्षरी's picture

21 Aug 2017 - 10:46 pm | मंगेश पंचाक्षरी

त्याला ओरिजिनल नाव ठेवण्याची हिंमत लागते आधी, बाकीच्यांनी कशाला नसत्या उचापती कराव्यात?

रानरेडा's picture

21 Aug 2017 - 11:27 pm | रानरेडा

आपले नाव ओरिजिनल कसे ?
जगात आपण पहिलेच मंगेश आहेत का ?नसावे कारण मलाच ७-८ मंगेश माहित आहेत ?
आडनाव पंचाक्षरी हे ओरिजिनल आहे ? म्हणजे तुम्ही असे आडनाव बनवून घेतले ? पण आताच मी फेसबुक वर ३० -४० पंचाक्षरी पहिले .
मग ओरिजिनल काय आहे बुवा ?
आणि यात हिम्मतीचा प्रश्न कोठे आला ? म्हणजे तुमचा जन्म झाला तेव्हा कोणीही हे नाव ठेवायची हिम्मत करू नये असा फतवा / आदेश / दृशांत / GR निघाला होता का ?

रानरेडा's picture

29 Jan 2021 - 3:31 pm | रानरेडा

®™ हे हे लिहिले म्हणजे आपण हे रजिस्टर केले असावे असे दिसते
म्हणजे कायदेशीर रित्या
जर असेल तर मी आपली माफी मागत आहे

पण काही ब्रॅण्डिंग च्या नियमानुसार हे करता येते का ?
आपल्याकडे रजिस्ट्रेशन नम्बर आहे का ?

आणि नसेल तर ®™ वापरले म्हणजेच misrepresentation of facts करून आपली कायदेशीर तक्रार करता येईल का ?
https://ipindiaonline.gov.in/ या संकेतस्थळावर तो शोधता येईल ना?
कोठल्या कलमाखाली फसवणूक होते हे कोणी सांगेल का ?

अनुप ढेरे's picture

22 Aug 2017 - 9:16 am | अनुप ढेरे

C फॉर कॉपिराईट नसेल ते. C पासुन एक शब्द सुचतोय. तो असेल बहुधा.

जेम्स वांड's picture

20 Aug 2017 - 12:30 pm | जेम्स वांड

सकाळच्या कुठल्या आवृत्तीत आला होता म्हणे हा लेख(?) छापून, लिंक द्या ना, किंवा आवृत्ती सांगा शोधून वाचतो कसा :)

मंगेश पंचाक्षरी's picture

20 Aug 2017 - 11:27 pm | मंगेश पंचाक्षरी
धर्मराजमुटके's picture

20 Aug 2017 - 12:31 pm | धर्मराजमुटके

तुमचे हलकेफुलके विनोदी लेख मला आवडतात. एकंदरीत तुमच्या सौ. म्हणजे तुमचे प्रेरणास्थान आहेत. केवळ त्यांच्या अस्तित्त्वामुळेच तुम्हास कित्येक कल्पना सुचतात. सगळ्यांनीच इतका सकारात्मक विचार केला तर आयुष्य किती सुंदर होईल ?

मंगेश पंचाक्षरी's picture

20 Aug 2017 - 11:12 pm | मंगेश पंचाक्षरी

धन्यवाद!

मंगेश पंचाक्षरी's picture

29 Jan 2021 - 10:29 am | मंगेश पंचाक्षरी

धन्यवाद सर

दर्जेदार?वाचकांनी सकाळ वाचू नये.

रेवती's picture

21 Aug 2017 - 3:18 am | रेवती

हीहीही. छान.