१० वी नंतर विज्ञानातले पांरपारिक शिक्षण न घेता १२वीच्या स्तराचे NIOS मधुन Sr. Secondary परिक्षा देणे कितपत व्यवहार्य आहे?

कोदंडधारी_राम's picture
कोदंडधारी_राम in जनातलं, मनातलं
9 Aug 2017 - 9:19 am

पार्श्वभूमी - माझा मोठा मुलगा या वर्षी इ. १० वी ची परिक्षा उत्तीर्ण झाला आहे त्याला ६२ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. त्याच्या बरोबर सर्व क्षेत्रातील पुढील संधी जसे विज्ञान, वाणिज्य व कला इत्यादी क्षेत्रातील पर्याय चर्चा करुन झालेले आहेत. त्याच्या मतानुसार त्याला विज्ञान क्षेत्रात शिक्षण घ्यायचे असल्याने पुण्याच्या ११ वी च्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत नांव नोंदवून चारही पेऱ्यांमधुन अपेक्षित असे चांगले कनिष्ठ महाविद्यालय उपलब्ध झाले नाही. सर्वात शेवटच्या फेरीत शहरातील चांगले महाविद्यालय उपलब्ध झाले पण त्या महाविद्यालयात फक्त द्विलक्षी (Bi-focal) अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने ११ वी स्तरावरील जीवशास्त्र Biology विषय त्यात उपलब्ध नाही आणी मुलाला Biology ही घ्यायचे असल्याने त्याला त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नाही. पंरतु या अखेरच्या म्हणजे ४ थ्या फेरीत सदरचे कनिष्ठ महाविद्यालय हे पहिल्या पसंतीक्रमाचे असल्याने त्यात प्रवेश घ्यावाच लागेल असा नियम आहे.

त्यामुळे जरा वेगळा विचार करुन NIOS National Institute for Open Schooling चे Sr. Secondary या अभ्यासक्रमाचा विचार करीत आहे याला कारणे खालील प्रमाणे आहेत....

१. पारंपारिक शिक्षणात (Traditional College Bound) जास्त करुन महाविद्यालये अभ्यासक्रम ओढून ताणून पुरा करतात त्यात घोकंपट्टीचाच जास्त भर असतो. बहुतांशी महाविद्यालयात फक्त प्रात्यक्षिकांकरीताच उपस्थिती नोंदविली जात असल्याने महाविद्यालये ही प्रात्यक्षिकांपुरतीच मर्यादीत असल्याचे जाणवते.
२. नामांकित क्लासेस याच महाविद्यालयातच प्रवेश ग्या असा आग्रह धरतात - कारण या महाविद्यालयात उपस्थितीची काळजी करण्याचे कारण नसते असे समजते.
३. बहुतांश विद्यार्थी MH-CET, NEET, JEE-Main, JEE Advance यांचे प्रशिक्षण खाजगी क्लासेसच्या माध्यमांतून घेत असल्याने महाविद्यालयांनाही याची कल्पना आहे त्यामुळेच ही महाविद्यालये नियमित शिकवण्याकडे फारसे लक्ष देत नाहित असे बऱ्याच जणांजवळ चर्चा केल्यांनंतर आढळून आले आहे.
४. वरील स्पर्धात्मक परिक्षाच द्यायच्या असतील तर NIOS चे Sr. Secondary चा अब्यासक्रम अत्यंत चांगला आहे व तो स्व-अभ्यासाने (Self Study) यशस्वीरित्या पुर्ण करणे शक्य आहे असे वाटते. त्याने या सर्वाकरीता आवश्यक वेळही विद्यार्थ्याला मिळेल असे वाटते.
५. सदर NIOS मधे ११ वी अशी पातळी नसल्याने पुढील वर्षी सरळ Sr Secondary ला प्रवेश घेऊन २०१९ ची परिक्षा देता येईल.
६. NIOS ची पुस्तके, अभ्यासक्रम व संलग्न माहिती ऑनलाईन उपलब्ध असल्याने स्वअभ्यास करणे अधिक सोपे जाऊ शकते.
७. JEE Main, Neet यांसारख्या परिक्षांमध्ये percentile काढण्याची पध्दत NIOS च्या विद्यार्थ्यांना जास्त फायदेशीर होऊ शकते.
८. सर्वसाधारणपणे पांरपारिक महाविद्यालयातील ११ वी १२ वी च्या शिक्षणाला प्रत्येक वर्षी ३५ ते ४० हजार रुपये खर्च होतो त्याच खर्चात या स्पर्धात्मक परिक्षांसह स्वअध्ययनाकरीता चांगल्या पध्दतीने विनियोग करता येईल.
९. ११ वी, १२ वी चे पांरपारिक महाविद्यालयीन शिक्षण घेऊनही Neet, Jee, MHCet या परिक्षांची वेगळी तयारी करावी लागतेच त्यामुळे या सर्व गोष्टींमुळे शिकणाऱ्यावर अतिरिक्त ताण येऊ शकतो तो या पध्दतीमुळे येणार नाही असे वाटते

वरील माहिती घाई-घाईत लिहिल्याने त्यात विस्कळीतपणा आहे, परंतु विषय कळला असेल असे वाटते.

वरील सगळे मुद्दे वैध व चांगले वाटत असले तरी असे प्रवाहाविरुध्द जाऊन असे करणे कितपत योग्य होईल?

मिपावरील जाणकारांनी फायदे - तोटे यासंबंधी मार्गदर्शन करावे

शिक्षणप्रतिसाद

प्रतिक्रिया

खेडूत's picture

9 Aug 2017 - 10:45 am | खेडूत

रामराम रामभाऊ!
रामुविशि संस्थान हा चांगल पर्याय आहे. त्याचे संस्थळ इथे आहे.
शेवटी स्पर्धा परीक्षा सारखीच असल्याने फरक पडत नाही.
प्रवाहाविरुध्द जाऊन करताय असं वाटलं तरी हजारो विद्यार्थी हे करत आहेत. विशेष करून खेळाडू वगैरेंना सरावाला वेळ पाहिजे असतो ते असेच करतात.
याशिवाय पुढे काय करायचे हे ठरलेय, पण व्यावहारिकदृष्ट्या पदवी पाहिजे, तसेच फी परवडत नाही, नोकरी करून शिकायचे, म्हणूनही अनेक विद्यार्थी हे करतात.
याचा विचार दहावीचा निकाल लागताच करायला हवा होता, पण आताही हरकत नाही. मात्र स्पर्धेत मागे राहू नये म्हणून चांगला खासगी शिकवणी वर्ग आवश्यक आहे, असे वाटते.
.
.

जमल्यास धाग्याचे नाव संम कडून असे बदलून घ्यावे: 'मदत पाहिजे- मुक्त विद्यालयांविषयी'

धाग्याचे नाव बदलून हवे असल्यास तसे सांगा रामभाऊ.

कोदंडधारी_राम's picture

10 Aug 2017 - 7:51 am | कोदंडधारी_राम

धाग्याचे नाव बदलून हवे असल्यास तसे सांगा रामभाऊ.

कृपया वरील प्रमाणे नांव बदला

धन्यवाद...

कोदंडधारी_राम's picture

10 Aug 2017 - 7:50 am | कोदंडधारी_राम

धन्यवाद खेडूतभाऊ,

१०वीची परिक्षा झाल्याझाल्या ज्यामुळे ११ वी, १२वी ला अडचण ठरु शकेल असे वाचनाचा वेग, लिखाणाचा वेग (इंग्रजी, मराठी दोन्ही) अशा गोष्टींवर लक्ष देऊन ते सुधारण्यात आले. तसेच १० वी निकाल हातात आल्यानंतर आमची कुटुंबात चर्चा झाल्यावर ११ वी विज्ञानाची पुस्तकं आणून त्यांचाही (विशेषतः फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी) स्व-अभ्यास सुरु केला आहे.

खाजगी शिकवणी वर्ग निवडताना त्यांना कोणत्या महाविद्यालयात शिकतोय हे आवश्यक असल्याने रामुविशि ला शिकणार आहे हेच त्यांच्या पचनी पडत नाहिये त्यामुळे त्याकरीता ऑनलाईनचा पर्याय निवडलाय.

योग्य नांव सुचविल्याबद्दल धन्यवाद....

प्रीत-मोहर's picture

9 Aug 2017 - 12:00 pm | प्रीत-मोहर

आमचा गोवा बोर्ड १२ वी विज्ञान शाखेत होम स्कूलिंग ला मान्यता देत नाही. कला आणि कॉमर्स शाखेत हे चालतं पण भूगोल , बँकिंग , लॉजिक सारखा practicals असलेला विषय नाही घेता येत.

कोदंडधारी_राम's picture

10 Aug 2017 - 7:54 am | कोदंडधारी_राम

होमस्कुलिंगला कोणतेच पारंपारिक बोर्ड विज्ञान विषयाला परवानगी देत नाहीच. रामुविशि सुध्दा प्रात्यक्षिक ठराविक वेळेत अभ्यासकेंद्रांवर पुर्ण करायला सांगत आहेच. अर्थात ते आवश्यकही आहे.

आपल्या पाल्याच्या पात्रतेवर कोणतीही शंका न घेता हे स्वानुभवावरून सांगतोय.

१०वी ला इतके मार्क्स असतील तर त्याला विज्ञान शाखेचा अभ्यास झेपेल का याचा सुद्धा विचार करावा. मला १० वी ला ८३ टक्के गुण मिळून देखील १२ वी चा अभ्यास अतिशय कठीण गेला होता आणि माझी गाडी कशीबशी ६२% पर्यंत पोचली होती. तरी विज्ञान शाखेच्या अभ्यासाचं ओझं जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.

अतरंगी's picture

9 Aug 2017 - 6:11 pm | अतरंगी

नाही असे काही नाही.

मला दहावीला 64 होते आणि बारावीला 62. त्यामुळे विज्ञान शाखा नको असे नको. बारावी नंतर काय करायचे आहे, त्यासाठी विज्ञान शाखा गरजेची आहे का ते फक्त बघावे असे वाटते.

१० वी त काही मुलांचे गुण भाषा, इतीहास , शुध्दलेखन , इ मुले पण कमी होतात. त्यामुले कल कोणत्या शाखे कडे आहे ते जास्त महत्वाचे आहे.

कोदंडधारी_राम's picture

10 Aug 2017 - 7:59 am | कोदंडधारी_राम

आपल्या पाल्याच्या पात्रतेवर कोणतीही शंका न घेता हे स्वानुभवावरून सांगतोय.

१०वी ला इतके मार्क्स असतील तर त्याला विज्ञान शाखेचा अभ्यास झेपेल का याचा सुद्धा विचार करावा. मला १० वी ला ८३ टक्के गुण मिळून देखील १२ वी चा अभ्यास अतिशय कठीण गेला होता आणि माझी गाडी कशीबशी ६२% पर्यंत पोचली होती. तरी विज्ञान शाखेच्या अभ्यासाचं ओझं जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.

आम्हालाही अशी शंका निकालानंतर आली होती म्हणून सर्व क्षेत्रांबद्दलं विस्तृत चर्चा झाल्यानंतरच विज्ञान क्षेत्राचा निर्णय घेतला व तोही झेपणार की नाही या करीता आधी पुस्तकं आणून त्यातील सुरुवातीचा एक-एक धडा शिकवून त्यावर छोटी चाचणी परिक्षा घेतल्यानंतरच निर्णय घेतलाय. पण पांरपारिक शिक्षण सोडून अशा प्रवाहाबद्दल माहिती नसल्याने मनात शंका होत्या.

आम्हालाही अशी शंका निकालानंतर आली होती म्हणून सर्व क्षेत्रांबद्दलं विस्तृत चर्चा झाल्यानंतरच विज्ञान क्षेत्राचा निर्णय घेतला व तोही झेपणार की नाही या करीता आधी पुस्तकं आणून त्यातील सुरुवातीचा एक-एक धडा शिकवून त्यावर छोटी चाचणी परिक्षा घेतल्यानंतरच निर्णय घेतलाय. पण पांरपारिक शिक्षण सोडून अशा प्रवाहाबद्दल माहिती नसल्याने मनात शंका होत्या.

हे उत्तम केलेत काका..
अशी एक छोटी टेस्ट घेण्याची आयडिया नक्की ओळखीच्या एका दोघांना सुचवेन..

मुलाला जीवशास्त्र का शिकायचे आहे ?
त्याला कोणते कोर्स करायची इच्छा आहे ?