हा प्रश्न कसा सोडवावा?

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
26 Jul 2017 - 5:34 pm
गाभा: 

सध्या काही मित्रांनी त्यांच्यासाठी वधुसंशोधनाच्या कामात मलाही सामील करुन घेतलंय.बरेचसे मित्र हे ब्राह्मण समाजातील आहेत.त्यानिमित्याने विविध वधुवरसंशोधन संस्थांना भेटी देणं सुरु आहे.बहुतेक मित्र हे पौरोहित्य करणारे किंवा अल्पउत्पन्न गटातील आहेत.शिक्षणही आर्टस किंवा कॉमर्स शाखेतून पदवी,पदव्युत्तर असेच आहे.वयंही साधारण २८ ते ३५-३६ या गटातील आहेत.सगळे दक्षिण महाराष्ट्रातील म्हणजे सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,सिंधुदुर्ग या जिल्ह्यातले आहेत.

वधुवरसंशोधन संस्थांमधील बर्‍याचशा मुली या पुणे,मुंबई,अौरंगाबाद,नाशिक अशा ठिकाणी चांगल्या पोस्टवर,चांगल्या पगारावर नोकर्‍या करणार्‍या आहेत.फार थोड्या मुली या १२ वी किंवा फक्त BA,B.com अशा आहेत.
जी समस्या सध्या सगळीकडे आहे तीच इथेही जाणवली.मुलींच्या अवाजवी अपेक्षा! मुलगी नको मुलगा हवा या हट्टाचे दुष्परिणाम हे आता असे समोर येत आहेत.

मुलगा इंजिनियर किंवा तसंच शिक्षण असणारा,मुंबई किंवा पुणे,बंगळूर अशा मोठ्या शहरात राहणारा,महिना किमान ४० हजारांवर पगार असणारा,स्वत:चा फ्लॅट असणारा हवा.अशा अपेक्षा आहेत या मुलींच्या!

चांगल्या पोस्टवर असणार्‍या,बर्‍यापैकी मिळवणार्‍या मुलींच्या अपेक्षा समजण्यासारख्या आहेत,पण १२ वी किंवा BA असं शिक्षण असणार्‍या जेमतेम पगार मिळवणार्‍या मुलींनादेखील लग्नासाठीचा मुलगा इंजिनियर किंवा तसंच एखादं ग्लॅमरस शिक्षण असणारा किंवा सरकारी नोकरी असणारा हवा आहे.

मुलींची वयं २९,३२,३४ झाली तरीही या अपेक्षा कमी होत नाहीत.
आपल्या जातीत कमी शिकलेल्या मुली मिळत नसतील तर दुसर्‍या जातीतील मुली करुन घ्या, हा ही सल्ला मुलांना देऊन झालाय.पण पौरोहित्य करणार्‍या किंवा छोट्या गावांमधे नोकरी करणार्‍या मुलांना किंबहुना त्यांच्या पालकांना पटणारा,रुचणारा नाही.कदाचित यामुळे त्यांच्या व्यवसायावर किंवा कुटूंबातील अन्य सदस्यांच्या विवाहात अडचणी येऊ शकतात.आंतरजातीय विवाहासाठी खरंतर प्रबोधन करायला लागेल पण सध्या तेवढा वेळ देणं शक्य नाही.कारण आधीच या मुलांची लग्नाची वयं उलटून चाललेत.

मग यावर बरंच डोकं खाजवून काही उपाय सापडले आहेत. ते असे,

१) भारतातल्या अन्य राज्यांमधेही ब्राह्मण समाज आहे.या राज्यांमधे भौगोलिकदृष्ट्या मागासलेले असे काही भाग आहेत.तेथील पालकांना आपल्या मुलींना फार खर्चिक शिक्षण देणं किंवा त्यांच्या विवाहावर फार खर्च करणं शक्य होत नाही.अशा भागातल्या या पालकांशी संपर्क साधून त्यांना अशा आंतरराज्यीय विवाहासाठी राजी करणे.अर्थात भाषा आणि काही प्रमाणात संस्कार वेगळे असणारंच पण हा काही फार मोठा इश्यु नसावा!

२) हल्ली नोकरीच्या निमित्ताने किंवा बदललेल्या जीवनशैलीमुळे रोजचं जीवन हे खुप दगदगीचं झालेलं आहे.बर्‍याचदा प्रसारमाध्यमांतून असं वाचायला,ऐकायला मिळतं की तिशीनंतर मुलींसाठी अपत्यप्राप्ती ही सहजसाध्य नसते.मग काही वेळा खर्चिक डॉक्टरी उपायांनंतर हे साध्य होतं. तर यात कितपत तथ्य आहे? हे जर सरसकट होत असेल,अपत्यप्राप्तीला असा विलंब हमखास होतंच असेल तर यासंबंधी शास्त्रीय माहिती मुलींना देऊन योग्य वयात विवाह करण्यासंबंधी त्यांचं प्रबोधन करावं.मतपरिवर्तन करावं
(यासंबंधी शास्त्रीय माहिती,लिंका इथे कोणी दिल्या तर आभारच!)

३) होणार्‍या नवर्‍याला तिशीच्या आतच गलेलठ्ठ पगार असावा अशी बर्‍याच मुलींची किंबहुना त्यांच्या आईवडीलांची तशी अपेक्षा असते.वाढलेली महागाई हे कारण त्यांच्याकडून पुढे केलं जातं.
आता ही महागाई कुठे भेडसावते?तर काही मुख्य गोष्टींमधे म्हणजे,

* मुलानं घर/फ्लॅट घेतला असेल तर त्याचा हप्ता,

* हल्ली प्रत्येक घरात किमान दुचाकी तरी असतेच त्यासाठी लागणारं पेट्रोल,किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास केल्यास होणारा खर्च.

* घरखर्च.

* होणार्‍या अपत्याच्या इंग्रजी माध्यामातल्या शिक्षणाचा खर्च.(त्यासाठी हल्ली खुप आधीपासून बचत करावी लागते!)

या सगळ्या खर्चांबाबत फक्त मुली त्यांचे पालक आणि एकुणच समाजाचं काही प्रमाणात प्रबोधनाचा प्रयत्न करणे.कारण बर्‍याचदा आपण आंधळेपणाने दुसरा तसं करतो म्हणजे आपणही(ऐपत,क्षमता नसताना) असं असंच केलं पाहिजे या सामाजिक दबावाला बळी पडतो.

४) काही असे कोर्सेस किंवा व्यवसाय ज्यांमधे आर्थिक प्राप्ती चांगली आहे पण त्यांना तितकसं ग्लॅमर नाही.उदा. ITI किंवा पौरोहित्य.
माझे पती ITI आहेत किंवा भटजी आहेत हे सांगण्यात मुलींना कमीपणा वाटतो.

दुर्दैवाने आताशा या ग्लॅमरस शिक्षणालाच जास्त महत्व आलंय.

काहीवेळा ITI झालेल्या व्यक्तीच्या नोकरीची स्थिरता अधिक असू शकते.

हा गैरसमज दूर करुन अशा कोर्सेसना,पौरोहित्याला ग्लॅमर यावं म्हणून प्रयत्न केले पाहिजेत.

५) पती-पत्नी दोघांनी मिळून कष्ट केले,विश्वास ठेवला,लग्नानंतरही सुरुवातीची काही वर्षे दोन्हीकडच्या पालकांनी थोडाफार आर्थिक,मानसिक पाठींबा या जोडप्याला मिळाल्यास पुढील वाटचाल सुसह्य होईल असा विश्वास निर्माण केला पाहिजे.

आता हे सगळे उपाय प्रत्यक्षात आणण्यासाठी काय काय करता येईल? किंवा अजून काही उपाय असतील तर तेही सुचवले जावेत.

आज हा प्रश्न ब्राह्मण समाजात प्रकर्षाने जाणवत असला तरी काही वर्षांनी इतर समाजातही जाणवू लागेल किंवा लागलाही असेल.इथे पुरोहितांना नाकारलं जातंय,इतर समाजात कदाचित शेतकरी मुलगा नाकारला जाईल.

एकंदरीत या प्रश्नाचा काही निकाल लागावा, परिस्थिती बदलण्यास मदत मिळावी यासाठी हा लेखनप्रपंच!

प्रतिक्रिया

भारतातल्या अन्य राज्यांमधेही ब्राह्मण समाज आहे.या राज्यांमधे भौगोलिकदृष्ट्या मागासलेले असे काही भाग आहेत.तेथील पालकांना आपल्या मुलींना फार खर्चिक शिक्षण देणं किंवा त्यांच्या विवाहावर फार खर्च करणं शक्य होत नाही.अशा भागातल्या या पालकांशी संपर्क साधून त्यांना अशा आंतरराज्यीय विवाहासाठी राजी करणे.अर्थात भाषा आणि काही प्रमाणात संस्कार वेगळे असणारंच पण हा काही फार मोठा इश्यु नसावा!

हायला, त्यापेक्षा जातीचा आग्रह सोडलेलं श्रेयस्कर की. संस्कार थोडे वेगळे असतील पण भाषा तरी सेम असेल ना.
का पौरोहित्य करणार्‍यांना इंटरकास्ट मॅरेजचे वावडे आहे की काय? का ब्रह्मतेजात काही फरक पडतो काय?

उपयोजक's picture

26 Jul 2017 - 7:32 pm | उपयोजक

परराज्यातील मुलींना मराठी शिकवणं त्याहीपेक्षा जास्त सोपं आहे.

प्रश्न ब्रह्मतेजाचा नाही पण त्यानंतर त्या पुरोहितांना स्थानिक जनतेकडून जे सोसावं लागेल ते निस्तरायला आपण नसणार ना तिथे!
शिवाय पौरोहित्याचा व्यवसाय हा समाजाच्या आधारावरच चालतो.
बाकीचे पुरोहित या आंतरजातीय विवाह केलेल्या पुरोहिताला असहकार्य करु शकतात. त्यावेळी आपण जाणार आहोत का मदतीला?

अाणि तेज जातं का काय असा प्रश्न असेल तर इथल्या ब्राह्मण
उच्चशिक्षित तरुणींनी पुरोहिताशी लग्न केलं तर त्या तरुणींचं विद्येचं तेज जातं का काय?

माहितगार's picture

26 Jul 2017 - 8:30 pm | माहितगार

केअशु नवी भाषा शिकवण सोप का मुलींना ब्राह्मण करुन घेण सोप ? ब्राह्मण होण्यासाठी मुलींना नेमक काय कराव लागत ? -माहित नसेलतर सध्या मनुस्मृतीची नवी ओळख करुन देणारा मिपा धागा आला आहे तो पाहून घ्यावा ;) म्हणजे दुसर्‍या पुरोहीतांची तोंडे बंद करता येतील- किमान काही पुरोहीतांनी मुलींना -आणि आमच्या मते मुलांनाही- ब्राह्मण करुन घेण्याचाच व्यवसाय चालवला तर उत्पन्नही वाढून संसार चालवण्यास मदत होईल ( तरीही कुणी ब्राह्मण होण्यास तयार होत नाही हे लक्षात आलेच तर धर्म बदलून दुसर्‍या धर्माचे पौरोहीत्य करुन तरी उदर निर्वाह साधता येतील ;) ह.घ्या. )

माहितगार's picture

26 Jul 2017 - 9:21 pm | माहितगार

केअशु नवी भाषा शिकवण सोप का मुलींना ब्राह्मण करुन घेण सोप ? ब्राह्मण होण्यासाठी मुलींना नेमक काय कराव लागत ? -

केअशु, अभ्या, माहितगार आणि इतर मिपाकर कै पण सांगतात असे वाटत असेल तर हे घ्या संदर्भ

मनुस्मृती अध्याय २ चा संदर्भ देऊन आपले आदरणीय मिपाकर मित्र शरद सर सांगतात "स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर तिचा पत्नी म्हणून स्विकार करावा. " शरद सरांच्या धाग्याचा संदर्भ आणि शरद सरांवर विश्वास नाही वाटला तर ट्रांसलीटरल डॉट ऑर्गवरील अनुवाद (३८ व्या क्रमांकावर) जरासा वेगळा पण तरीही रोचक आहे. "अति सुंदर स्त्री आपल्या अपेक्षेने नीच कुलात जरी उत्पन्न झालेली असली तरी तिच्याशी विवाह करावा" ट्रांसलिटरल डॉट ऑर्गचा संदर्भ दुवा, संदर्भ दुवे हा प्रतिअसाद लिहिण्याच्या वेळी जसे दिसले. दोघांनीही मूळ संस्कृत श्लोक उधृत केलेला नाही त्या बद्दल इतरांनी मदत जाणकारांनी करावी

अनुवाद मुळ लेखकांप्रमाणे संदर्भासाठी दिले आहेत, तसे आम्ही कोणत्याही जाती कुळ वंश धर्मास नीच समजत नाही आणि तसे समजणे निषेधार्ह समजतो हे वेगळे सांगणे न लगे. पण एकुण सुंदर भासणारी श्रेष्ठ स्त्री ब्राह्मणाशी विवाहा नंतर ब्राह्मण स्विकार्ह आहे असा मनुस्मृतीचा अर्थ/मार्ग प्रथम दर्शनी दिसतो.

फार वेळा चर्चिला गेलेला विषय आहे. मिपावरील सर्वात जास्त प्रतिक्रिया आलेला एक धागा होता. तो शोधून पहा.

उपयोजक's picture

26 Jul 2017 - 7:15 pm | उपयोजक

पाहिलाय.पण इथं काही उपाय सुचवले आहेत.ते execute करण्यासाठी मदत झाली तर बरं

गॅरी ट्रुमन's picture

26 Jul 2017 - 5:53 pm | गॅरी ट्रुमन

हा गैरसमज दूर करुन अशा कोर्सेसना,पौरोहित्याला ग्लॅमर यावं म्हणून प्रयत्न केले पाहिजेत.

कोणाला कोणत्या गोष्टीचे ग्लॅमर वाटावे हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. इतरांना अमुकएक गोष्ट आवडली पाहिजे किंवा त्याचे ग्लॅमर वाटले पाहिजे यासाठी इतरांनी प्रयत्न करू नयेत असे माझे प्रामाणिक मत आहे. कारण असे प्रयत्न इतरांनी करणे म्हणजे आपल्या मतांमध्ये इतरांनी विनाकारण केलेली लुडबुड आहे असे वाटून जो अपेक्षित परिणाम आहे त्याच्या बरोबर उलटा परिणाम बघायला अनेकदा मिळतो. अनेक कट्टर कर्मकांड करणार्‍यांची मुले त्याच्या बरोबर उलटी होतात यामागे हे एक कारण आहे असे वाटते.

तेव्हा इतरांना काय आवडावे किंवा आवडू नये याचा निर्णय त्यांच्यावरच सोडलेला श्रेयस्कर.

आदूबाळ's picture

26 Jul 2017 - 5:57 pm | आदूबाळ

त्यांना "ग्लॅमर" नसून "स्वीकारार्हता" (अ‍ॅक्सेप्टिबिलिटी) किंवा कलंकमुक्ती (डीस्टिग्माटायझेशन) म्हणायचं असावं.

उपयोजक's picture

26 Jul 2017 - 7:52 pm | उपयोजक

दुर्दैव! पण ग्लॅमर आल्याशिवाय स्विकारार्हता वाढेल असं वाटत नाही.

आंतरजातीय लग्न करणे हा योग्य पर्याय वाटतो. चांगला जीवनसाथी मिळणे अधिक महत्वाचे की जातीच्या खोट्या भ्रामक मृगजळामागे धावत, नैसर्गिक प्रेरणांना बांध घालत जातीतील मुलीची वाट पाहणे हे ज्याचे त्याने ठरवावे.

उपयोजक's picture

26 Jul 2017 - 7:57 pm | उपयोजक

स्वजातीय विवाहात नुकसानच होतं का?
या नैसर्गिक प्रेरणा मुलींनाही असतातच की! पटदिशी अवास्तव अपेक्षा त्यांनाही धोक्याच्याच ठरु शकतात.

नुकसान म्हणत नाही परंतू, फार काळ वाट पाहत बसलं की लग्न होण्याची शक्यताच मावळत जाते. तेव्हा ठरावीक वर्षे जातीत लग्न व्हायची वात पाहिली परंतू होत नाही असे असेल तर आंतरजातीय विवाह हाच चांगला पर्याय वाटतो. तुम्ही म्हणालात ती ग्राहकांचा विश्वास कमी होणे, कार्याला न बोलावणे वगैरे शहरांत होत नसावे असे वाटते(होत असेलही, भटजी कम्युनिटीने बातमी पसरवल्यामुळे). बाकी अवास्तव अपेक्षा कालांतराने बदलतात. मुलींची लग्ने(निदान ब्राह्मणांत) मोठी समस्या राहिएल्ली नाही.

माहितगार's picture

27 Jul 2017 - 5:28 pm | माहितगार

राष्ट्रीय एकात्मतेपेक्षा अधिक धर्म्य काय आहे ? स्वतःचे ज्ञान श्रेष्ठ असल्याचा आत्मविश्वास असेल तर समाज आपोआपच पाठीशी येतो. आणि प्रत्यक्ष अप्रत्क्ष जात पंचायती भरवून बहिष्कृततेची तलवार अंगावर येऊ नये म्हणून कायद्याचेही पुरेसे संरक्षण आहे.

दिवसेंदिवस हीच परिस्थिती बिकट होत चालली आहे. समाजाचे मतपरिवर्तन करण्याचा खटाटोप करणे व्यर्थ.

रेवती's picture

26 Jul 2017 - 6:09 pm | रेवती

अभ्याशी सहमत.
ब्राह्मतेजाचा प्रश्न आवडला. ;)
एसभाऊ, त्या धाग्याची लिंक दिलीत तर पुढील दंगा करायला येथे सुरुवात करता येईल. ;)
एक प्रश्न आहे. मुलींच्या अपेक्षेनुसार पगार ४० हजाराच्या वर हवा म्हणतायत. महागाई हे कारणही पालकांकडून दिले जातेय असे म्हणताय तर......
लहान मोठ्या शहरांमध्ये भाड्याने घर घेणे (किंवा हप्ता), ग्रोसरी, वीजपाण्याची, फोनची बिले, प्रवासखर्च, गरजेपुरता कपडा व भविष्य तरतुदीसाठी महिना ४० ह. लागत नाहीत काय? जर उत्तर हो असेल तर मागणी योग्य समजावी काय? जर उत्तर नाही असेल तर मात्र अवास्तव मागणी म्हणता येऊ शकेल.

उपयोजक's picture

26 Jul 2017 - 7:35 pm | उपयोजक

निदान छोट्या शहरांमधे तरी एवढाल्या पगाराची अपेक्षा अवास्तवच!

मोठी शहरे म्हणजे मेट्रो सिटीज. मुंबई, हैदराबाद, बंगळुरुरु, दिल्ली, चेन्नै वगैरे. लहान शहरे म्हणजे पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपुर वगैरे. वगैरे लिहिलय, लगेच "आमच्या शहराचं नाव आलं नाही" म्हणू नये. मेट्रोमध्ये रहायला चार लोकांच्या कुटुंबाला किती खर्च येतो ते माहित नाही पण पुण्यात किती येतो त्याचा अंदाज बांधू शकीन. थोड्याफार फरकाने बाकीच्या ठिकाणीही असे असावे. अगदी नवे जोडपे रहातेय म्हटले तरी कुंटुंबविकास थोड्याच कालावधित होतो म्हणून दोन लहानगी मुले व आई बाप. गावाकडून येणारा जाणारा असतोच! भयंकर समंजस बायको असल्याने तिने भाडेतत्वाचे घर प्रथम मान्य केले, तेही १ बेडरुमचे, तरी फर्स्ट ह्यांड अनुभवावरून त्याचे भाडे किती येऊ शकेल ते सांगू शकते. दोन बेरुच्या घराला किती भाडे तेही सांगू शकते. एरिया कोणता ते जाऊ देत, सरासरी घेऊ! माणूस दुसर्‍या गावाहून येतोय म्हणजे सहसा नोकरीसाठी येतो. कंपनीला खेटून घर नसले तरी विसेक किमी जाताना + २० किमी येताना हा आकडा धरून चालू. भयंकर गोड स्वभावाची बायको असल्याने "मला गडे कोणतेच वाहन नसले तरी चालेल" असे म्हटल्याने सार्वजनिक वाहतुकीवर सगळी भिस्त आहे. वीजबिल, सेलफोन (लँडलैन नाहीये), पिल्लांच्या साध्या शाळा, किराणा सामान, कपडे, भाजी, दूध अशी असंख्य बिले, त्यात डॉक्टरांचे खर्च धरले नाहीयेत याची कल्पना आहे. भविष्याची तरतूद वगैरे धरून चालले तर ४० हजार रुपये फार महान रक्कम आहे असे वाटत नाही. म्हणजे रक्कम महान आहे पण खर्च आहेतच! आता यात बायकोने नोकरी केली तरी मुलांच्या सांभाळण्याच्या सोयिवर बरेच पैसे खर्च होतात.
पुण्यापेक्षा लहान शहरात अपेक्षा ४० हजार रू पेक्षा कमी असेल असे धरून चालू तरी किती कमी असणे अपेक्षित आहे. तुमच्या बहिणीचे लग्न करून देताना तुम्ही काय अपेक्षा कराल? ते जातीधर्माचं जाऊ दे!

उपयोजक's picture

27 Jul 2017 - 7:56 am | उपयोजक

अपेक्षा कमी ठेवल्या तर या छोट्या शहरांमधे अगदी महिना २० हजार रुपयांमधेही व्यवस्थित जगता येतं!

माझ्या बहिणींची लग्नही या पेक्षा कमी पगार मिळवणार्‍या मुलांबरोबर झाली आहेत. सुरुवातीला आर्थिक स्थिती बेताची होती पण कष्ट घेऊन परिस्थिती बदलण्यात यश मिळवले आहे.

आधीपासूनच सगळं सेटल हवं ही अपेक्षा चुकीची आहे.

रेवती's picture

27 Jul 2017 - 5:46 pm | रेवती

प्रतिसाद आवडला पण लहान शहरांमध्ये घरभाडे एका बेरूसाठी बर्‍या वस्तीत अगदी कमी म्हटले तरी ८ ते १० हजार रुपये आहे. मनुष्याने ट्याक्स भरणे अपेक्षित आहे. सर्व युटिलिटीजची बिले कमीतकमी धरली तरी भविष्य तरतूदीसाठी फारशी रक्कम हातात राहील असे नाही. तरीही माझ्यापेक्षा तुम्हाला यातील जास्त अनुभव आहे म्हणून मान्य करते की ४० हजार रु. मासिक प्राप्ती ही अपेक्षा अवास्तव आहे.

अभिजीत अवलिया's picture

27 Jul 2017 - 6:00 pm | अभिजीत अवलिया

लहान शहरांमध्ये घरभाडे एका बेरूसाठी बर्‍या वस्तीत अगदी कमी म्हटले तरी ८ ते १० हजार रुपये आहे.

नाही. कोल्हापूर, सांगली, कराड, नगर सारख्या शहरात १ बेडरूम फ्लॅट ४ हजारांपर्यंत मिळून जाईल.

८-१० हजार मध्ये पुण्यासारख्या शहरात बऱ्यापैकी वस्तीत देखील भाड्याने फ्लॅट मिळणार नाही. कमीत कमी १२ हजार लागतील.

होय. ते माहितिये तरी किमती खालच्या बाजूला धरून क्याल्क्यूलेशन केले तरी ४० हजार रुपये मासिकप्राप्तिची अपेक्षा मला अवास्तव वाटत नाहीये पण मी पुण्यातून बाहेर पडून दोन दशके झाल्याने त्यांचे म्हणणे मान्य करतिये. भाड्यातील किमतीचा फरक आता पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर या लहान शहरांमध्ये व सातारा, सांगली, कराड, नगर या विकसनशील शहरांमध्ये असा वेगळा करायला हवा.

तेजस आठवले's picture

26 Jul 2017 - 6:19 pm | तेजस आठवले

एकंदरीत या प्रश्नाचा काही निकाल लागावा, परिस्थिती बदलण्यास मदत मिळावी यासाठी हा लेखनप्रपंच!

फारच आशावादी तुम्ही बुवा. मिपावर ह्या धाग्याचा निकाल नक्कीच लागेल. :)

उपयोजक's picture

26 Jul 2017 - 7:44 pm | उपयोजक

मिपावर सर्व प्रकारचे लोक अाहेत.यावर मदत करणारे सुध्दा असतील.वाट पाहुया.

आंतरजातीय विवाह नको का म्हणता?
कुठल्या युगात राहता तुम्ही?
मुली मिळवत्या आहेत!
ठेवल्या अपेक्षा तर चुकलं कुठे?
त्यांच्या कष्टानं मिळवताहेत त्या.

थोडे परंपरावादी विचार मांडले कि हा असा हल्ला गृहित धरावाच लागतो.बर्‍याचदा प्रश्न काय आहे,कोणाबद्दल आहे हे समजून न घेता जुनाट,परंपरावादी असे शिक्के मारले जातात.

माहितगार's picture

26 Jul 2017 - 6:32 pm | माहितगार

वधू-वर परिचय ह्या विषयातील तज्ञ नाही. हा प्रश्न कसा सोडवावा शीर्षकामुळे आलोच आहे. तर चकटफूच्या सूचना पुढच्या प्रतिसादातून देण्याच्या आधी चकटफूचे दोन शब्द मांडतो.

पण त्या आधी निसटत्या बाजू
आंतरजातीय विवाहच नाही तर आंतरधर्मीय विवाह करुन वधूस हिंदू संस्कृतीचे शिक्षण देण्याची हिम्मत नसलेल्या (तथाकथीत पुरोहीत) मुलांशी अगदी ब्राह्मण मुलींनीही का म्हणून विवाहास पात्र समजावे ? म्हणून अभ्याच्या मताशी सहमत आहेच. सोबत उत्पन्नाबाबत शिक्षीत मुलींच्या अपेक्षा थोड्या वरच्या बाजूस असल्यातरी अवाजवी कसे म्हणता येईल. दुसरे असे कि आंतरजातीय नाही आंतरधर्मिय विवाह केले तरी इतर जाती किंवा धर्मातील किंवा परराज्यातील मुलींच्या अपेक्षा कमी का म्हणून असतील किंवा त्यांनी तात्कलीक अडचणींमुळे विवाह मान्य केले तरी आर्थीक अडचणींनंतर घरी वाढीव उत्पन्न आणण्याचा तगादा त्या कशावरुन लावणार नाहीत ?

नया है वह's picture

26 Jul 2017 - 6:40 pm | नया है वह

मुलींच्या अवाजवी अपेक्षा! ? का मुलांचे मागासलेपणं!

जेनी...'s picture

26 Jul 2017 - 7:21 pm | जेनी...

मुलांचे मागासलेपण ...

उपयोजक's picture

26 Jul 2017 - 8:00 pm | उपयोजक

हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

माहितगार's picture

26 Jul 2017 - 6:47 pm | माहितगार

१) ऑनलाईन वेबसाईटवर रजिस्ट्रेशन आणि शोध घेण्यास खर्च मोठा नाही म्हणून पण इथे अधिक सुशिक्षीत व अधिक अपेक्षा असलेल्या मुलींचा राबता असण्याची शक्यता अधिक व यशाची शक्यता कमी पण कुणाच्या ओळखीच्या ओळखीत परदेशातील मुली वगैरे मिळण्याचा योग आल्यास पुरोहीत मंडळींना आमेरीकेतील व्हीसा मिळणे नॉन-पुरोहीत ब्राह्मणांपेक्षा सोपे आहे झाले असल्यास आमेरीकेतील विवाहार्थ ब्राह्मणच जावई हवा आहे पण ट्रंपानी अधिक शि़क्षीत ब्राह्मणांना व्हीसा बंड केल्यामुळे अशा पालकांना ऑनलाईन विवाहोत्सूक पुरोहीत ब्राह्मणांचा विचार नक्कीच करता येईल. :) हाच मुद्दा वधूवर सूचक मंडळात आणि रोहिणी टायप वधूवर सूचक मासिकातून मांडता यावा.

आता जरा गंभीर सल्ले
२) पुढारी लोकमत अशा वृत्तपत्रातून महाराष्ट्र व्यापी छोटी जाहीरात प्रभावी ठरावी. म्हणजे छोट्या गावातील अधिक विवाहोत्सुक मुलींपर्यंत जाहीरात पोहोचून रिस्पॉन्स तपासून पहाता येईल.

३) त्या शिवाय तुमच्या कडे अर्धा डझन इच्छूक वर आहेत म्हणता आहात तर वरील प्रमाणे जाहीरात देतानाच वधू-वर परीचय मेळावाची बातमी अशा वृत्तपत्रातून छापून आणण्याची वृत्तपत्रांना गळ घालण्यास हरकत नसावी. वधू-वर परीचय मेळाव्यात प्रत्यक्ष भेटी नंतर मुलगा आवडला तर मुलींच्या अवाजवी अटी गळून पडण्याची शक्यता अधिक असू शकेल.

पण एनी वे परदेशातील मुली इसिस सारख्यांच्या मागे जाण्या पेक्षा भारतीय पुरोहीतांनी प्रयत्न केल्यास जगातला दहशतवाद कमी होण्यास जरा मदतच होईल :) (ह. घ्या.)

उपयोजक's picture

26 Jul 2017 - 7:20 pm | उपयोजक

धन्यवाद माहितगार!

त्या शिवाय तुमच्या कडे अर्धा डझन इच्छूक वर आहेत म्हणता आहात तर वरील प्रमाणे जाहीरात देतानाच वधू-वर परीचय मेळावाची बातमी अशा वृत्तपत्रातून छापून आणण्याची वृत्तपत्रांना गळ घालण्यास हरकत नसावी. वधू-वर परीचय मेळाव्यात प्रत्यक्ष भेटी नंतर मुलगा आवडला तर मुलींच्या अवाजवी अटी गळून पडण्याची शक्यता अधिक असू शकेल.

एकदम सहमत...

पिलीयन रायडर's picture

27 Jul 2017 - 3:42 am | पिलीयन रायडर

घरातच हे सगळं अनुभवलं असल्याने मुली पटकन मिळत नाहीयेत हे नक्की. माझ्या अनुभवांवरुन ज्या दोन चार गोष्टी समजल्यात त्या अशा

१. पत्रिका - अर्धी निम्मी स्थळं तर इथेच मार खातात. इथे तडजोड शक्य असेल तर लग्नाचे चान्सेस बरेच वाढतील.

२. फोटो - दुर्दैवाने आजही रंग रुपाला अवास्तव महत्व आहे. अरेंज मॅरेज मध्ये तसंही स्वभाव कसाय हे समजुन घेण्याची सिस्टिम नाहीये. त्यामुळे अनेक स्थळं केवळ फोटो पाहुन नाकारली जातात. आयडीयली बोलायचं तर फोटो न बघता किमान १-२ दा तरी बोलणे व्हायला हवे. माझ्या माहितीत एकीने असे केले आहे. शादी.कॉमवर तिने प्रोफाईल पिक ठेवलेलेच नव्हते. ती अत्यंत हुषार आणि देखणी सुद्धा आहे. तिला तिच्या दिसण्यापेक्षा तिच्या शिक्षण आणि स्वभावाकडे पाहुन लग्न करणारा मुलगा हवा होता. तिचे प्रोफाईल पाहुन अनेकांनी तिला अ‍ॅप्रोचही केले. त्यात काहींनी सगळ्यात आधी तिला फोटो मागितला. तिने त्यांना तिथेच नाकारले. केवळ एकाने पार २ महिने तिच्याशी उत्तम गप्पा मारल्या. ह्या मुलाचे अन आपले मत जुळते आहे असे दिसल्यावर मगच तिने फोटो दिला. पण तोवर त्यालाही ती आवडली होतीच. अर्थात ही परिस्थिती फार आयडियल आहे, पण रंग-रुपावरचा भर कमी व्हायला हवाय हे नक्की. जोडी अनुरुप असावी, पण अगदी गोरीच मुलगी हवी किंवा चष्मा नकोच वगैरे अतिरेकी अपेक्षा मुलांनीही ठेवु नयेत.

३. अपेक्षा - शेवटी अरेंज मॅरेज हा बाजारच आहे. जो तो बेस्ट डील मिळवण्याच्या प्रयत्न करतोय. एखाद्या मुलीसमोर जर पुण्यात मोठ्या कंपनीत काम करणारा मुलगा आणि पौरोहित्य करणारा मुलगा असे पर्याय असतील तर ती मुलगी काय निवडेल? पालकांनी सुद्धा जास्तीत जास्त सेटल आणि जबाबदारी शक्य तेवढी कमी असणारा मुलगा का निवडु नये? ह्यात परत दुर्दैव असंय की पौरोहित्य करणारा मुलगा कदाचित जास्त समंजस आणि उत्तम जोडीदार असेल, पण ते कळणार कसं? एक दोन भेटीत सगळेच चांगलेच वागतात.

एक प्रश्न नेहमी येतो की मुली आपल्यापेक्षा कमी पगाराचा मुलगा का स्वीकारत नाहीत. लव्ह मॅरेज मध्ये अनेकदा स्वीकारताना पाहिल्यात. पण अरेंज मॅरेजमध्ये आधीच आपल्या पेक्षा मोठा मुलगा बघण्याची पद्धत आहे. किमान आपल्या एवढा शिकलेला म्हणलं तरी वयाने मोठा मुलगा हा जास्त पगारावरच असणार ना? आणि "मी माझ्याहुन जास्त पगाराची बायको स्वीकारेन" हे तरी मुलं कुठे धडधडीत सांगतात? त्यांनाही ते नकोय.

अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आई वडील. आजही आपला पारंपारिक दृष्टिकोन बदलत नाहीये. मुलांना शिकलेली, सवरलेली, नोकरी करणारी आणि ते सांभाळुन "माझ्या आईवडीलांना सांभाळायला हवंच, शिवाय सण वारही करावे लागतील." ह्या अटींसकट मुलगी हवीये. आई वडीलांचं तर सर्वांनीच करायला हवं. पण ह्यात जेव्हा मुलीच्या आई वडीलांचा प्रश्न येतो तेव्हा एकुलती एक नको, नुसत्या बहिणीच नको, भाऊ हवा असे म्हणुन मुलेही सासु - सासर्‍यांची जबाबदारी टाळायला बघतात. असे कसे चालेल? डोक्यावर शैक्षणिक कर्ज असणारी मुलगी तर फार हाल सोसते. मी एक लग्न त्यापायी मोडलेलं पाहिलंय.

ह्या सर्वांवर मला वाटणारा उपाय म्हणजे मुलांनी सुद्धा स्पष्टपणे - स्वयंपाक येतो - करण्याची तयारी आहेच, माझ्याहुन जास्त पगाराची मुलगी चालेल, लग्नाचा खर्च अर्धा उचलला जाईल, नोकरीत संधी असल्यास बायकोसोबत मुव्ह होण्याची तयारी आहे, सासु - सासर्‍यांची जवाबदारी निसंशय माझीही आहे अशा भुमिका आपणहुन मांडायला हव्यात.

मला खात्री आहे की भरभक्कम पगाराच्या मुलापेक्षाही हे बोलणारा मुलगा कधीही जोडीदार म्हणुन मुली निवडतील. त्यांनाही आपल्या आई वडिलांची काळजी असते. जो मुलगा हे आधीच स्पष्टपणे बोलु शकतो तो नक्कीच जोडीदार म्हणुन उत्तम असेल. जितकं शक्य आहे तितका फोकस स्वभावांवर, विचारांवर ठेवायला हवा. त्याला महत्व दिले गेले पाहिजे.

शेवटी प्रत्येक जण जास्तीत जास्त चांगले स्थळ मिळवायचा प्रयत्न करतो आणि आजही लग्नं रंग-रुप-पैसा-अडका ह्याच गोष्टी पाहुन होतात. स्वभाव वगैरे कळणार कसा हा प्रश्नच आहे. त्यामुळेच बारावी पास मुलगी होता होईतो जास्त पगाराचा मुलगा शोधते. तसं तिने करण्यात काही चुकही नाहीये. कारण समजा ती काळी असेल तर तिचा स्वभाव पाहुन समजुन वगैरे कुणी मुलगा तिला निवडणार नसतो. मुलं सुद्धा रंग-रुपाच्याच शोधात असतात. त्यामुळे अवाजवी अपेक्षा दोन्ही बाजुंनी आहेत. प्रबोधनाला पर्याय नाही.

उपयोजक's picture

27 Jul 2017 - 7:17 am | उपयोजक

खुप खुप आभार पिलियन रायडर!
उपयुक्त प्रतिसाद.नेमकं लिहिलयंत

माझ्या माहितीत एकीने असे केले आहे. शादी.कॉमवर तिने प्रोफाईल पिक ठेवलेलेच नव्हते.

इंटरेस्टिंग केस आहे. त्या मुलीचे पुढे काय झाले? त्याच मुलाशी लग्न जमले का?

पिलीयन रायडर's picture

27 Jul 2017 - 8:07 am | पिलीयन रायडर

हो!!

पिलीयन रायडर's picture

27 Jul 2017 - 8:10 am | पिलीयन रायडर

पण एक महत्वाची गोष्ट.. ती मुलगी परदेशात असते आणि तिकडे मराठी मुलगा शोधत होती. त्यामुळे दोघेही भारताबाहेर वाढलेले आहेत.

आणि मुलगी प्रथितयश संस्थेतुन संपुर्ण स्कॉलरशिप घेऊन डॉक्टर होत आहे. तिचे प्रोफाईल खरंच दण्दणीत होते.

ओळखीतल्या बर्‍याच मुलांच्या बाबतीत सध्या हे पाहिलंय.. त्यावरुन तरी मला वाटतं, मुलींच्या (आणि मुलांच्याही) अवास्तव अपेक्षा हा प्रश्न एखाद्या समाजापुरता, जातीपुरता मर्यादित नाही. फार लिहायला वेळ नाही, म्हणून तुमच्या प्रश्नाबद्दल लिहिते.

तुम्ही जे उपाय सुचवलेत त्यात २-५ इथे फार काही उपयोगी नाहीत. समाजप्रबोधन कधी करणार आणि लोक कधी बदलणार, त्याने तुमच्या मित्रांना आत्ता तरी काही फायदा नाही. उपाय १ बद्दल - भौगोलिकदृष्ट्या मागासलेले भाग दुसर्‍या राज्यातच का शोधायचे समजले नाही. महाराष्ट्रातही छोट्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये मुली शोधता येतीलच.
शिवाय, वर लिहिलेल्या काही गोष्टी -

"मित्र सगळे दक्षिण महाराष्ट्रातील म्हणजे सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,सिंधुदुर्ग या जिल्ह्यातले आहेत. बहुतेक मित्र हे पौरोहित्य करणारे किंवा अल्पउत्पन्न गटातील आहेत. वधुवरसंशोधन संस्थांमधील बर्‍याचशा मुली या पुणे,मुंबई,अौरंगाबाद,नाशिक अशा ठिकाणी चांगल्या पोस्टवर,चांगल्या पगारावर नोकर्‍या करणार्‍या आहेत.फार थोड्या मुली या १२ वी किंवा फक्त BA,B.com अशा आहेत."

मला वाटते बरेच मिसमॅच इथेच आहे. कोणती शहरे चांगली वगैरे वाद सुरु करायचे नाहीत. पण पुणे-नाशिक आणि सांगली, कोल्हापूर या भागांत वातावरणात फार फरक आहे. ही सर्वच शहरे मोठी असली तरी पुणे-नाशिक यासारख्या ठिकाणी चांगल्या पोस्टवर नोकरी करणार्‍या मुली दुसर्‍या शहरात जाणार म्हणजे नोकरी सोडावी लागणार, मग त्या इतर बाबतींत जास्त अपेक्षा साहजिकच ठेवत असणार.

या मुलांची वये उलटून चालली आहेत म्हणत आहात तर मुलींनी कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात वगैरेपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत आलेल्या अनुभवांवरुन कोणत्या आर्थिक, सामाजिक इ.इ. परिस्थितीतली स्थळे जास्त सूटेबल आहेत ती शोधणे हे जास्त महत्त्वाचे आहे. जर संस्थांमध्ये फार स्थळे सापडत नसतील तर लोकांशी बोलूनही स्थळे शोधावीत. भारतात आपल्याला बरेच ओळखीपाळखीतले लोक अमुक अमुक स्थळ सुचवतात ते आवडत नाही, पण खरं तर हा मोठा प्लस पॉइंट आहे. सर्वांनाच काही स्वतःची लग्ने जमवायला जमत नाहीत आणि संस्थांमध्ये, मॅट्रीमोनी साइट्सवर सर्व स्थळे नसतात.

नात्यातल्या काही मुलांची मध्ये लग्नं झाली तेव्हा त्यांनाही अश्या अडचणी आल्यात. मुलगा पुण्यातलाच हवा (नगर, सांगली इ. नको), किंवा निदान पुण्यात स्वतःचा फ्लॅट तरी हवा, शिकलेला हवा (व्यवसाय करणारा पण बी.कॉम. शिकलेला नको), मोठे कुटुंब नको, अश्या बर्‍याच मुलींच्या अपेक्षा होत्या. आणि सध्याचे मुलींचे दर हजारी प्रमाण कमी वगैरे कारणांमुळे या मुलांच्या नातेवाइकांनीही खूप वर्षे वाट न पाहता लवकरच वधूसंशोधन सुरु केले. मुलीचे रंगरुप, आर्थिक परिस्थिती इ. गोष्टींना महत्त्व न देता मुलीचा आणि घरच्यांचा स्वभाव यालाच महत्त्व देऊन कुठे ना कुठे तडजोड करुन लग्न जुळवले. (तडजोड या अर्थी म्हणत आहे की, एकांना वाटत होते की मुलीकडचे खूप पैसेवाले असावेत वगैरे, पण आधी ठरलेल्या एका स्थळात काहीतरी अडचण आल्यावर त्यांनी ती अट सोडून दिली.)

उपयोजक's picture

27 Jul 2017 - 7:41 am | उपयोजक

महाराष्ट्रात बराच शोध घेतलाय.अगदी उस्मानाबाद,बीड,चंद्रपूर,धुळे अशा तुलनेने मागास ठिकाणीही शोधलेत.पण तिथल्या मुलींना तिथला किंवा बाजूच्या जिल्ह्यातला मुलगा हवा किंवा या जिल्ह्यातल्या मुली नोकरीसाठी पुणे,मुंबई,नागपूर गाठतात.त्यामुळे त्यांनाही तिथलाच मुलगा हवा असतो.

कोल्हापूर,सांगली,सातारा,सोलापूर ही शहरेही हळूहळू सुधारत आहेत.लग्न झाल्यानंतर मुलींना इथेही जॉब मिळू शकतो.अगदी पुण्या-मुंबई-नाशिकएवढे पगार नाही मिळणार.पण पुण्या-मुंबईसारखी टोकाची दगदग इकडे नाही.हा फायदा मानावा का?
शिवाय पुण्या-मुंबईतल्या नोकरीच्या अनुभवावर स्वतंत्रपणे एखादा व्यवसाय करु इच्छित असेल तरीही अशा मुलींना सासरच्यांकडून पाठिंबा मिळू शकतो.

उपयोजक's picture

27 Jul 2017 - 7:48 am | उपयोजक

उपाय क्र २ बद्दल मिपावर माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.
इथे वैद्यकिय क्षेत्रातले लोक आहेत.त्यांनी माहिती दिल्यास आभारी राहीन.

५ वा.प्रबोधनाचा मार्ग वापरल्यास निदान यानंतरच्या मुलांनातरी वेळेत वधु मिळेल अशी आशा आहे.

आशावादी रहायला काय हरकत आहे?

रुपी चे निरीक्षण बरोबर आहे. बर्‍याच समाजांमध्ये लग्न जुळण्याच्या व नंतर ते टिकुन राहण्याच्या समस्या दिसतायत. मग आंतरजातीय विवाह तरी कसे जुळणार व टिकणार?
आमचा लेवा पाटिदार समाज त्या मानाने फार छोटा आहे. पण आमच्यातसुध्धा शेतकरी मुलांबरोबर समाजातील मुली लग्नाला तयार होत नाहीत. शहरातील थोड्या पगारावरील तरुण एकवेळ चालतो पण गावाकडील शेतकरी नको असतो. तर जास्त शिकलेल्यांमध्ये अवास्तव अपेक्षांमुळे वयं वाढली तरी लग्न जुळत नाहीत. समाजांचे विविध शहरांत भरणारे वधु-वर मेळावे व त्यांमध्ये जेष्टांनी केलेले समुपदेशन यांनी मला वाटते थोडा तरी सकारात्मक फरक पडावा.

माहितगार's picture

27 Jul 2017 - 11:04 am | माहितगार

आंतरजातीय विवाह तरी कसे जुळणार व टिकणार?

जातींचे अस्तीत्व नाकारण्याची हिम्मत दाखवली की आपोआप जुळून येऊ लागतील. सुशिक्षीतांचे विवाह टिकणे न टिकणे हे त्यांच्या स्वभाव आणि वैचारीकतेवर अवलंबून असणार त्याचा एकजातीय अथवा आंतरजातीय विवाहाशी संबंध असणे गरजेचे नसावे.

माझ्या मते ज्या मुलींची लग्ने होत नाहीत (काही समाजातील रूढींच्या पगड्यामुळे) अशा मुलींचा शोध घेऊन त्यांच्याशी जुळते का हे पहावे. शेवटी काहीहि असले तरी "सम:दु:खी" लोकच कम्पॅटिबल असतात असे मला वाटते. उदा. अनाथ आश्रमात वाढलेल्या मुलींच्या लग्नाच जमायला प्रॉब्लेम येत असतील - तर मग अशा मुलींचा शोध घेऊन त्यातल्या कोणाशी आले जमते आहे का हे त्या मुलांनी बघावे.

पण असे करताना आपण कोणावर उपकार करत आहोत हे दाखवू नये/ अशी भावना मनात ठेऊ नये (ते कसे करावे हे माहित नाही, कोणाला यावर जास्त सांगता आले तर उत्तम)

माहितगार's picture

27 Jul 2017 - 11:01 am | माहितगार

कोणावर उपकार करत आहोत अशी भावना मनात ठेऊ नये

सहमत आहे. पुरो हा शब्द पुरोगामीत्वाचे दर्शक असेल तर, पुरोहीत मंडळींनी विधवा विवाहांचाही आणि सावरकर म्हणतात तसे आंतरजातीय विवाहाचा विचार करुन समाजापुढे आदर्श उभा करण्यात खरे तर पुढाकार घ्यावयास हवा. पुरोगामीत्व साधल्यास धागा लेखिकेला अपेक्षीत ग्लॅमर आपोआप येईल.

सिरुसेरि's picture

27 Jul 2017 - 4:51 pm | सिरुसेरि

अत्रे व डॉ . खरे यांचे प्रतिसाद माहितीपुर्ण . + १०० .

उपयोजक's picture

27 Jul 2017 - 7:30 pm | उपयोजक

लेखिका नाही लेखक आहे मी!

दोन वेगवेगळ्या प्रतिसादात आलेली वाक्य
• आणि सध्याचे मुलींचे दर हजारी प्रमाण कमी वगैरे कारणांमुळे

• ५ वा.प्रबोधनाचा मार्ग वापरल्यास निदान यानंतरच्या मुलांनातरी वेळेत वधु मिळेल अशी आशा आहे.

यावरून पडलेले प्रश्न:

• 20 आठवड्यानंतर गर्भपात करायचा नाही हा कायदा 1971चा.

• सोनोग्राफी मशीन त्यानंतर आल्याने लिंगसापेक्ष गर्भपात 80च्या दशकात चालू झाले. म्हणून स्रीपुरुष गुणोत्तर गंडले.
आत्ता 28 ते 35 वयातल्या मुलांची लग्न होत नाहीत यामागे हे गंडलेले गुणोत्तरदेखील एक कारण आहे असे काहीजणांना वाटते.

• लिंगसापेक्ष गर्भपात करू नका म्हणून समाजजागृती 2000 नंतर चालू झाली. सोनोग्राफी मशीनना ट्रॅकर लावणे, डॉक्टरना शिक्षा करणे वगैरेदेखील गेले काही वर्ष चालुय.
मग आता 0-5, 5-10, 10-15 या वयातील स्त्रीपुरुष गुणोत्तर काय आहे?

• यानंतरच्या मुलांनातरी वेळेत वधु मिळेल अशी आशा योग्य आहे का?

एमी's picture

27 Jul 2017 - 8:49 pm | एमी

http://m.timesofindia.com/india/Sex-ratio-skew-worsens-with-age-Census-2... या बातमीमधून

Among children up to 15 years old, there are 1.8 crore fewer girls than boys — the sex ratio at 914 girls per 1,000 boys remaining the same as a decade ago.

Among infants who are less than a year old, boys outnumber girls by about 9.55 lakh. But by six years, the difference increases to nearly 7 million (69 lakh). This is also described as a sex ratio of about 919 girls per 1,000 boys.

The story doesn't end here. There is an appalling drop in the population of girls after that. The difference in the population of boys and girls aged seven to 15 years rises to nearly 11 million (1.1 crore). That's a sex ratio of 911 for this age group.

सो प्रबोधन वगैरे करून काही फार फरक पडेल असे वाटत नाही....

सुबोध खरे's picture

27 Jul 2017 - 10:42 am | सुबोध खरे

.
वय आणि प्रजननक्षमता यांचा आलेख दिला आहे.
हा फक्त स्त्रीबद्दल आहे. जी मुलगी उशिरा लग्न करते तिचा नवरा सहसा अजूनच जास्त वयस्कर असतो. त्यामुळे दोघांची मिळून प्रजननक्षमता अजून निम्म्याने येते. त्यातून उशिरा लग्न झालेली बरीचशी मुले आणि मुली मधुमेह किंवा लठठपण याचीही शिकार असतात. त्यामुळे प्रजननक्षमता बरीच कमी होते.
करिअरच्या मागे लागल्यामुळे किंवा मते जास्त कणखर (RIGID) झाल्याने मुले आणि मुली सहजपणे तडजोड करीत नाहीत. त्यामुळे लग्नाला आधीच उशीर झालेला असतो. त्यातून अत्यंत धावपळीची आणि तणावपूर्ण जीवनशैली यामुळे "माझ्या वाचनाप्रमाणे" स्त्रीच्या ३० वया नंतर ४० टक्के आणि ३५ वयानंतर ७० टक्के स्त्रियांना मूल होण्यासाठी वंध्यत्वावर उपचार घ्यावे लागतात. याची सांख्यिकी मिळाली कि देईनच.

माहितगार's picture

27 Jul 2017 - 11:07 am | माहितगार

वैद्यकीय हिशेब बरोबर डॉ. साहेब. पण आर्थीक गणितांच्या जुळणीचे काय करणार ? नव्या पिढीत बहुतेकांना विभक्त कुटूंब पद्धती हवी आहे. आणि रहाण्याच्या जागांच्या किमती वाढत्या लोकसंख्ये सोबत मागणी वाढून आभाळाला टेकत आहेत.

सुबोध खरे's picture

27 Jul 2017 - 12:02 pm | सुबोध खरे

माहित गार साहेब
माझे स्वतःचे १ बेडरूमचे घर माझ्या वयाच्या ३८ व्य वर्षी झाले. तो वर मी सरकारी( भाड्याच्या) घरातच राहत होतो कि. आणि आजकाल तर भाडी पूर्वीपेक्षा नक्कीच स्वस्त आहेत. जागेचे भाव आभाळाला भिडले आहेत हि वस्तुस्थिती. पण स्वतःचे घर होईस्तोवर लग्न न करणे हि चूक आहे. पैसे किंवा मालमत्ता हि नंतर कमावता येते पण हातातून निसटून गेलेले वय परत येत नाही बरीच मुली सेट्ल झालेला मुलगाच पाहिजे म्हणून होतकरू तरुणांना नाकारतात आणि मग शेवटी सर्वच बाबतीत तडजोड करण्याची पाळी येते.
आमच्या नातेवाईकांपैकी गडगंज पैसे असलेल्या बापाची एकुलती एक मुलगी. तिने केवळ स्वतःचे घर नाही म्हणून एका सर्वच तर बाबतीत चांगल्या असलेल्या मुलाला नकार दिला.( पत्रिका पासून सर्व गोष्टी जुळत असून मुला- मुलींची पसंती झाली तरीही) हा मुलगा सी ए होता. पुढे त्याने भरपूर पैसे कमावले लग्न करून सुस्थितीत आहे आणि हि मुलगी आता पन्नाशीला आली अविवाहितच आहे.

माहितगार's picture

27 Jul 2017 - 12:18 pm | माहितगार

आणि आजकाल तर भाडी पूर्वीपेक्षा नक्कीच स्वस्त आहेत.

हे माहित नव्हते, अशीच इतरांचीही माहिती आहे का ?

सिए किंवा प्रोफेशनल कोर्स झालेला मुलगा स्वतःचे घर नाही म्हणून नाकारणे सामान्य ज्ञानाचा अभाव दर्शवते किंवा वर वरचे सांगोपांगी कारण असावे. बाकी या धागा लेखात चालू विषय तगडे प्रोफेशनल क्वालीफीकेशन अथवा तगडा जॉब नसलेल्या मुलांबाबत आहे. त्यांच्या दृष्टीनी घरभाड्यांचा आर्थिक हिशेब महत्वाचा असावा आणि विभक्त कुटूंब सांभाळण्याच्या दृष्टीने गणित त्यांच्या साठी किती सहज साध्य असेल हे माहित नाही.

अभिजीत अवलिया's picture

27 Jul 2017 - 5:34 pm | अभिजीत अवलिया

स्वतःचे घर होईस्तोवर लग्न न करणे हि चूक आहे. पैसे किंवा मालमत्ता हि नंतर कमावता येते पण हातातून निसटून गेलेले वय परत येत नाही

सहमत.

पण स्वतःचे घर होईस्तोवर लग्न न करणे हि चूक आहे. पैसे किंवा मालमत्ता हि नंतर कमावता येते पण हातातून निसटून गेलेले वय परत येत नाही

हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय.पण मुलींच्या अवास्तव मागण्या कशा रास्त आहेत हे सांगण्याचा काहीजण प्रयत्न करताहेत.

पण मुलींच्या अवास्तव मागण्या कशा रास्त आहेत हे सांगण्याचा काहीजण प्रयत्न करताहेत.
त्यातील एक मी आहे. ;) पण रास्त उगीच आहे ला आहे करत नाहीये तर हिशोब घालून दाखवतिये. ग्रोसरी, युटिलिटीची बिले यांना कोण काय करणार? आटा, दाल तर उदाहरणे देण्यासाठी प्रसिद्ध आहेतच. ;) हां, आता उगीच सात्राशेसाठ कपडे, दागिने , फर्निचर, मौजमजा यावर नियंत्रण असावे हे मान्य आहे. आवड नसल्याने माझे आपोआप होते पण काही नातेवाईक स्रिया आहेत की कपाटे भरून वाहतायत व पैसे फार खर्च होतात म्हणून काळजीत असतात. ग्रोसरीही वाया जाईल इतकी करू नये वगैरे व्यावहारिक व काटकसरीचे प्रयोग करून सरावाने संसार शिकता येतो. किंबहुना माझे लग्न झाले तेंव्हा संसार हे काटकसरीचे असत. अनेक मिपाबायकांचे संसारही दोन भांडी व एक सतरंजी यांनी सुरु झाले होते/आहेत. त्यामुळे अनेकांना अनुभव आहे. मला प्रश्न हा वैद्यकीय बिले चुकवताना आला. तिथे कोण माफ करणार? असुरक्षितता ही तिथे आली. आजारपणे, पडणे, धडपडणे, अपघात सांगून होत नाहीत. दवाखान्याची येणारी बिले संसारात अस्थिरता निर्माण करतात.
बाळे फटाफट झाली तर ठीक पण काही कारणाने उपचार करावे लागणे, इमर्जन्सी होणे याने जीव जायची वेळ येते, पेशंट व पालकांचा! अशावेळी स्थिरता हवी वाटली तर चूक कोणती? घराचा आकार जाऊ द्या हो, संसार एका खोलीतही होतोच! ती अ‍ॅडजस्टमेंट, नाईलाज असू शकेल पण 'गोल' असू शकत नाही. लहान खोली असू द्या नाहीतर महाल.......आपले घर व त्यात दोन चित्रे भिंतीवर लावणे ही हौस असतेच असते. भावनांवर संसार चालत नसला तरी संसार चालवायला प्रेम हा मोठ्ठा इन्ग्रेडियंट लागतोच!
सगळीकडे एकच तक्रार सध्या आहे की मुले मुली जास्त वयाचे होऊन चाललेत. अशी हौस कोणाला असेल? (ज्यांना लगीन करायचेच नाही त्यांचा प्रश्न इथे नाही). कोणतीतरी भीती ही बागुलबुवा होऊन मानेवर बसलिये खरी. याला दोष द्या, त्याला दोष द्या करत बसण्यापेक्षा मी माझ्या मुलाला काटकसरीचा संसार करून दाखवणे, व कमी पैशात सुरुवातीला संसार करू शकतो हे उदाहरण द्यावे. लोकांच्या मुलींकडे बोट दाखवण्याआधी माझ्या मुलाला काय शिकवत नाहीये याकडे डोळे उघडे ठेवून मी बघणे आवश्यक आहे.

दशानन's picture

27 Jul 2017 - 9:42 pm | दशानन

रेवती ताई सहमत!
आयुष्यात अप डाऊन असतात, अपेक्षा जरूर असाव्यात पण समजूतदारपणा देखील हवा. माझा जेव्हा वाईट काळ सुरू झाला तेव्हा बायकोने घर संभाळले व आज ही ती घर संभाळत आहे व मी माझ्या मुलीला.

सर्व शक्य असते, फक्त इगो मध्ये आला की अडचण होते. मी केर ही काढतो, कपडे ही वाळत घालतो आणि पोरींचे शी पण साफ करतो पण त्या वेळी मी हे बायको वेळेत कामाला जाऊ दे व तिचा कार्यालयीन सम्मान देखील राहावा हा हेतू मनात ठेवून करतो हे देखील सत्य.

सतिश गावडे's picture

27 Jul 2017 - 9:49 pm | सतिश गावडे

डॉक, स्वतःचे घर नसलेल्या मुलाला होकार देणारी मुलगी (आणि तिचे पालक) दुर्मिळ झाले आहेत सध्या.

अगदी आमच्या कोकणातील खेडेगावातील जेमतेम पाचवी सहावी शिकलेल्या मुलींना (आणि त्यांच्या आई वडीलांनाही) मुलगा मुंबईत कामाला असलेला आणि मुंबईत स्वतःची रूम असलेला हवा असतो.

उपयोजक's picture

27 Jul 2017 - 7:34 pm | उपयोजक

मोलाची माहिती दिलीत!

खूप माहितीपूर्ण माहिती.

माझ्या स्वतःच्या मुलीला किंवा पुतण्यांना भाच्यांना मी पंचविशीपर्यंत लग्न करा असाच सल्ला देतो म्हणजे मग त्यानंतर दोन ते तीन वर्षे एकमेकांना समजून घेण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी देता येतात आणि मूल होण्यासाठीही थांबता येते.
मुळातच ३० -३२ ला लग्न झाले आणि मग बराच उशीर झाला वाटून मूल होत नाही म्हणून वर्षभरातच उपचाराला येणाऱ्या अनेक जोडपी मी रोज पाहतो आहे. दवाखान्याच्या जवळच असलेल्या आंतरराष्ट्रीय शाळेच्या के जी मधील बहुसंख्य मुलांच्या आया ३५ आणि ४० च्या मधील आणि खाऊन पिऊन सुखी आणि ( क्वचित कधीतरी दिसले तर) बाप त्याही पेक्षा जास्त वयाचे दिसतात. हि शाळा उच्चभ्रू असल्याने हे उदाहरण उच्चभ्रू वर्गातीलच प्रातिनिधिक म्हणून घेता येईल सर्वसामान्य वर्गातील नव्हे.

मोदक's picture

27 Jul 2017 - 5:30 pm | मोदक

लाखभर रूपये पगार आणि स्वकमाईतून दोन / तीन BHK हे पंचवीशीतच कसे काय जमणार..?

..आणि एक कॅच सांगतो.
घर दोघांच्या पसंतीने घेणे सर्वसंमत आहे किंवा माझ्यामते तसे असले पाहिजे. मग सुरूवातीपासून दोघांच्या संमतीने सजावट, सुखसोयी करता येतात. वेगळ्या एरीयामध्ये घर, वेगळ्या लाईनवरील एरीया वगैरे प्रकार माहिती असतीलच..!

मग असे असताना लग्नाआधी मुलाचे स्वतःचे घर असावे ही अपेक्षा याच गृहितकाला छेद देत नाही का..?

शरद's picture

27 Jul 2017 - 5:52 pm | शरद

माझ्या माहितीप्रमाणे कोकणातील मुलींना कोकणातील स्थळ नको असते. कारण खेडेगाव किंवा तालुका-जिल्हाचे मुख्य गावही त्यांना मागासलेले वाटत असावे. मुंबई-पुणे यानाच पसंती. माझ्या ओळखीच्या एका कुटुंबाची आर्थिक स्थिती उत्तम आहे. प्रशस्त घर, दोन-तीन किफातशीर व्यवसाय, आंब्याच्या बागेचे उत्पन्न १० लाखापेस्षा जास्त, तरी शिकलेल्या पदवीधर मुलांची लग्ने जमत नाहीत. शेवटी कर्नाटकातील ब्राह्मण मुली लग्न करून घरी आणल्या. भाषेचा प्रश्न सहज सुटला. पंजाब मधील मुले आता लग्न जमवावयाला केरळ किंवा गआसाम गाठतात असेही वाचनात आले आहे.
शरद

अभिजीत अवलिया's picture

27 Jul 2017 - 6:07 pm | अभिजीत अवलिया

मुलगी नको मुलगा हवा या हट्टाचे दुष्परिणाम हे आता असे समोर येत आहेत.

केअशु साहेब,
हा मुलींचे प्रमाण कमी असण्याचे दुष्परिणाम आहे असे वाटत नाही. सध्या महागाईचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यामुळे आपली मुलगी आर्थिक दृष्ट्या सुखी संपन्न घरात जावी असे प्रत्येक आई बापाला वाटणारच. त्यात काही चुकीचे नाही. समजा हजार मुलांमागे हजार मुली हे प्रमाण असते तरी देखील जे मुलगे फारशी आर्थिक प्राप्ती करत नाहीत अथवा इंजिनियर किंवा तसंच एखादं ग्लॅमरस शिक्षण किंवा सरकारी नोकरी करत नाहीत त्यांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झालाच असता.

सध्या महागाईचे प्रमाण खूपच वाढले आहे.
धन्यावादच धन्यवाद हे म्हटल्याबद्दल. मागील महिन्यात डीमार्टला खरेदी करण्यासाठी गेले असताना काही रोचक निरिक्षणे व बिलांचे आकडे समोर आले त्यावरून पुणेकर लोकांना किंवा परवाहून आलेल्या बेताच्या परिस्थितीतील लोकांना त्यांच्या गावा शहरावरून नावे ठेवण्याची गरज नाही हे दिसले पण फार डिटेल्स द्यावे लागतील म्हणून थाम्बतिये.

रेवती's picture

27 Jul 2017 - 6:14 pm | रेवती

परवाहून आलेल्या
परगावाहून आलेल्या.

सुबोध खरे's picture

27 Jul 2017 - 6:46 pm | सुबोध खरे

माझा स्वतःचा खर्च मुंबईत (नवरा बायको आणि दोन मुले यांचा) . दरमहा २००० रु सोसायटी भाडे(स्वतःचे घर). रु १५००/- वीज बिल, १५००/-मोबाईल, स्थिर दूरध्वनी आणि इंटरनेट/ वाय फाय सकट १२००/- दरमहा, वाणसामान १०,०००/-, पेट्रोल बिल १०००/- महिना ( घरापासून दवाखाना १ किमी, मुलाचे कॉलेज ७ किमी, मुलीचे १ किमी). टीव्ही केबल बिल ५०० रुपये कपडा लत्ता खर्च साधारण २५००/- (३०,०००/- वर्षाला). इतर किरकोळ खर्च (हॉटेलिंग आठवड्यात एकदा धरून) ५ हजार जरी पकडले तरी महिना २५,०००/- हा ढोबळ खर्च आहे. यात नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा खर्च सहज निघेल. तेंव्हा ३०-३५हजार रुपये उत्पन्न असलेल्या जोडप्याला पुण्यात भाड्याच्या घरात(१२ हजार) खाऊन पिऊन नक्की सुखी राहता येईल. इतर शहरात पाच हजार कमी.
मुलांच्या शिक्षणाचा किंवा चैनीचा यात समावेश नाही हे गृहीत.
काही मोठा खर्च राहिला असेल तर लक्षात आणून देणे.

रेवती's picture

27 Jul 2017 - 7:22 pm | रेवती

धन्यवाद डॉक्टरसाहेब.
धागाकर्त्याने उल्लेखलेली रक्कम ४० ह. रू. प्रतिमाह (हा एक नंबर मानायचा म्हणून मानला आहे).
उत्पन्नावरील कर धरायला हवा, भविष्य तरतूद, वैद्यकीय निधी. या गोष्टी मुले जन्मायच्या आधीपासून लागतात.
मुलांच्या शिक्षणाचा समावेश खर्चात केल्यास खर्चाची रक्क्म वाढते. अगदी जवळच्या साध्या शिशूविहारापासून सुरुवात करायची म्हटले तरी गणित बदलते.

काही मोठा खर्च राहिला असेल तर लक्षात आणून देणे. >>> घराचा हप्ता (EMI) किंवा घरभाडे मिळून खर्च किती येईल. नवीन लग्न झालेल्या जोडप्याचे स्वतःचे पेडऑफ घर असण्याची शक्यता किती? (माझ्या माहितीनुसार आज मुंबईत १ बी.एच.के. ची किंमत १ कोटी धरली तर महिना EMI १ लाख (चुभूदेघे) किंवा भाडे २५-३० हजार असेल.)

बरेचजणांनी चांगले मुद्दे मांडले आहेत परंतू खरी परिस्थिती "मला अस्सा नवरा नक्कोच" ही आहे. शरद यांनी कोकणातले दिलेले उदाहरण हेच सत्य आहे. मुलींना त्या वाढल्या त्याच कोकणात अजिबात राहायचे नाही॥

चौकटराजा's picture

27 Jul 2017 - 7:57 pm | चौकटराजा

माझ्या माहितीत केवळ पत्रिका या विषयावर भर दिल्याने आयुष्यभर अविवाहित रहाण्याची शिक्षा ( व संधी ) आलेले दोन जण आहेत. मी तरी माझ्या मुलीला १. गुण २. रूप ३. पैसा असे प्राधान्य क्रम सारखे सुचवीत असतो व तिला ते पटत चालले आहेत. विभक्त कुटंब पद्धतीचे तोटेही तिला परोपरीने समजावीत आहे.
बाकी मला शहरातच रहायचे आहे , मला परमनंट नोकरीचा दाखला हवा असे हट्ट असणार्‍या मुलीना कालपरत्वे अविवाहित रहाण्याची शिक्षा व संधी मिळेल यात शंकाच नाही.

शेवटी काळ हा कोणा एका साठी आपला प्रवाह बदलीत नाही. काळ आला की जन्म हयात व मरण हा क्रम आलाच. सबब पैसा ,स्थैर्य न पहाता आईवडीलांशी जमवून घ्यावे.लवकरात लवकर लग्न करावे मुले जन्माला घालावीत. असे धोरण आखण्यातच शहाणपण आहे. बाकी आपल्याला शिक्षा व संधी आपली अक्कल व नशीब यांचा संकराने मिळत असतेच.

साधा मुलगा's picture

28 Jul 2017 - 1:31 am | साधा मुलगा

पूर्वी टका आणि मुवि यांचे असे धागे वाचून मजा यायची, पण आता स्वतःच अश्याच परिस्थितीतून जात आहे.
अरेंज करण्यापेक्षा लव marriage केला असता तर चाललं असत असा आता वाटायला लागलाय. आधी नोकरी/career यात settle होऊ मग मुलगी बघू असा त्यामागचा विचार. वर सांगितलेल्या मुलांकडून असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करून सुद्धा मुलगी मिळणे कठीण वाटतं आहे.
यात चांगल्या मुलींची (नुसत्या रूपाने नाही बाकी factors पण गृहीत धरले आहेत) आधीच लग्न झालेली, त्यामुळे थोडा उशीर झाला. पूर्वी फेसबुक वर उगाच फ्रेंड रेक्वेस्त पाठवणे आणि चाट करणे हे cheap आणि despo वाटायचे ( उदा. रोझ with रोझ etc. ;) ), आता ते केल असत तर एखादी चांगली पोरगी तरी पटली असती असं वाटतं.
असो, या पुरोहित वर्गातील मुलांना एवढेच सांगणे आहे कि unless तुम्ही एखाद्या बड्या corporate देवस्थानाचे पुजारी नसाल तर पौरोहित्य हा तुमच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत ठेवू नका, त्या बरोबरीने काही तरी दुसरा एखादा उद्योग धंदा किंवा नोकरी करा, तरच तुमचा टिकाव लागेल.

स्वगत : साधा मुलगा नाव बदलून ट.का. द्वीतिय असे ठेवण्याची वेळ आली आहे.

उत्पन्नाचा दुसरा स्रोतबद्दल सहमत आहे. माझ्या ओळखीतल्या तीन मुलांनी त्यांचे घरचे यशस्वी व्यवसाय असताना बी.कॉम. नंतर डिप्लोमा किंवा LLB केलं. लग्न जमण्यासाठी म्हणून तर ठीक आहेच , पण एकंदरीतच उत्पन्नाचा आणखी एखादा स्रोत असणं सर्वच दृष्टींनी फायद्याचं आहे.

पिलीयन रायडर's picture

28 Jul 2017 - 4:13 am | पिलीयन रायडर

होईल हो लग्न! असं तुम्हाला का वाटतंय हे समजु शकते.
मिपावर खरं लग्नाच्या लहान जाहिराती देता यायला हव्यात.

अवांतर - टक्याचं झालं का लग्न? दिसत नाही आताशा.

सुबोध खरे's picture

28 Jul 2017 - 11:34 am | सुबोध खरे

चांगल्या वधुवर सूचक मंडळात नाव नोंदवा. बऱ्या वाटणाऱ्या स्थळाबरोबर चर्चा करा? चेहरा आवडतो कि नाही हे पहिल्या नजरेतच समजते. ( ज्या मुला किंवा मुलीचा चेहरा पाहिल्यावर पहिल्या नजरेत आवडला नाही तर पुढे जाऊच नका. "रोज" सकाळी उठल्यावर ज्याचा / जिचा चेहरा डोळ्यासमोरसुद्धा नको वाटेल अशा" शी/ अशी"शी आयुष्यभर संसार कसा करणार?
मुलगी होतकरू आहे एवढे पहा आणि स्वभाव जुळतील हे पहा. ( चर्चा केल्यावर थोडं फार लक्षात येतं). मुलगी जुळवून घेणारी आहे एवढं पाहिलं पाहिजे. बाकी पैसा, घर इ. गोष्टी दुय्यम आहेत. त्या कालांतराने येतातच.

अप्पा जोगळेकर's picture

28 Jul 2017 - 1:17 pm | अप्पा जोगळेकर

खरे सर, इथे धागे काढून झैरात करु नका ही सूचना आगाऊ पणे चिकटवतो.

सुबोध खरे's picture

28 Jul 2017 - 9:34 pm | सुबोध खरे

हायला
इथे रुग्णांपासून "खाजवायला" फुरसत नाही आणि मी कशाला वधुवर सूचक मंडळ काढू?
झैरात कसली आणि कशाची करू हो?

ज्या मुला किंवा मुलीचा चेहरा पाहिल्यावर पहिल्या नजरेत आवडला नाही तर पुढे जाऊच नका. "रोज" सकाळी उठल्यावर ज्याचा / जिचा चेहरा डोळ्यासमोरसुद्धा नको वाटेल अशा" शी/ अशी"शी आयुष्यभर संसार कसा करणार? >> दणकून सहमती. फक्त आधी आपले स्वतःचे थोबाड आरशात पाहून घ्यावे म्हणजे झाले :D

सुबोध खरे's picture

29 Jul 2017 - 9:40 pm | सुबोध खरे

ऍमी ताई
वयाच्या २५ व्य वर्षी तुम्ही दिसायला सुंदर नसलात तर ते तुमचे दुर्दैव आहे.
पण २५ व्य वर्षी तुमचा जोडीदार दिसायला सुंदर नसेल तर ती तुमची चूक आहे.
अर्थात सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते हा महत्त्वाचा भाग गृहीत आहेच.
पण ज्या मुलाचा किंवा मुलीचा "चेहरा" दाखवण्याच्या कार्यक्रमातच "टाकाऊ" दिसतो (जेंव्हा चेहरा पासून कपड्या पर्यंत सर्व गोष्टी चमकावलेल्या असतात). तो एखाद्या उदास संध्याकाळी विस्कटलेल्या कपड्यात आणि केसात काय उजेड पडणार आहे.
दाखवण्याच्या कार्यक्रमाला मुलगा किंवा मुलगी "जशी" दिसते त्यापेक्षा तो किंवा ती जास्तीत जास्त १० टक्के सुधारणा करू शकेल. आणि जसे वय वाढत जाईल तशी परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडतच जाईल. हे वयाच्या २५ व्य वर्षी लक्षात घेणे आवश्यक आहे.

पिलीयन रायडर's picture

29 Jul 2017 - 9:53 pm | पिलीयन रायडर

एखादी सो कॉल्ड सुंदर नसलेली ब्यक्ति माझ्याशी जर २ तास गप्पा मारु शकत असेल तर मी तिचा जोडीदार म्हणुन नक्कीच विचार करेन.

जर एखाद्याचं मन आणि बुद्धिमत्ता सोन्यासारखी असेल तर मला सुदैवाने रुपाच्या पलीकडेही जाऊन पहाता येतं. कारण वयाच्या साठीत सौंदर्य महत्वाचं नसेल, पण ज्याच्यात रमुन जाता येईल असं माणूस नक्कीच जवळ असलेलं बरं..

दशानन's picture

29 Jul 2017 - 10:36 pm | दशानन

प्रचंड सहमत!

वरील उदाहरण मीच आहे की ;)

डॉक आणि पिरा दोघांशी असहमत.

एखाद्या स्वतः छान दिसणार्या व्यक्तीने 'माझ्यासोबत शोभेल असाच जोडीदार मला हवा आहे' अशी अट ठेवायला हरकत नाही. पण स्वतः छान दिसत नसताना जोडीदाराने छान दिसलेच पाहिजे ही अपेक्षा पटत नाही आणि 'एखाद्याचं मन आणि बुद्धिमत्ता सोन्यासारखी असेल तर रुपाच्या पलीकडेही जाऊन पहाता आले पाहिजे' हेदेखील पटत नाही.

पिलीयन रायडर's picture

30 Jul 2017 - 5:22 am | पिलीयन रायडर

अर्थातच कुणी कुणाकडुन काय अपेक्षा ठेवावी हे आपण नाही सांगु शकत. प्रचंड श्रीमंत नवरा हवा किंवा अत्यंत सुंदर बायको हवी असं कुणाला वाटत असेल तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि अर्थात त्यात काही चुक नाही.. हार्ट वॉन्ट्स व्हॉट हार्ट वॉन्ट्स..

माझा मुद्दा पहिल्यापासुन एकच आहे, रंग रुपाचा लग्नात फारसा उपयोग नसतो. "नाईस टु हॅव्ह" गोष्ट. पण स्वभाव हा नक्कीच "मस्ट हॅव्ह" आहे. अत्यंत सुंदर पण महामुर्ख माणसाशी संसार होऊ शकत नाही. पण सुंदर"च" जोडीदार हवा"च" अशी काही मानसिकता नसेल तर दिसायला सुंदर नसलेल्या पण ज्याच्याशी स्वभाव जुळताएत अशाशी नक्कीच सुखाचा संसार होऊ शकतो.

माझ्या आयुष्यात असे अनेक लोक आहेत बुवा ज्यांचे दिसणे मी कधी नोटीसच केले नाहीये. अगदी नवराही मित्र म्हणुन पहिल्यांदा भेटला तेव्हाही.

पण अर्थात ज्याची त्याची आवड..

येस! कोण कोणासोबत कशासाठी लग्न सेक्स मुलंबाळं करतंय हा ज्याचात्याचा प्रश्न झाला. हा काही matter of public interest होऊ शकत नाही.

पण तरी त्याच्यावर धागे निघत राहतात, चर्चा होत राहते आणि प्रबोधन वगैरे केलं जातं =))

इथे बरेचजण लवकर लग्न करा सल्ला देतायत. आत्ता एवढ्यातच 25व्या वर्षी लग्न करणार्या आणि 6 महिन्यात घटस्फोट घेतलेल्या दोनजणी भेटल्या.

पहिली निम्नमध्यमवर्गातली, डिप्लोमा केलेली, मेकॅनिकल कंपनीत नोकरी करणारी. 5 वर्ष डेटिंग करून लग्न केलेलं. सासूची अपेक्षा कि हिने अख्खा पगार आपल्या हातात द्यावा. मुलीला मात्र माहेरी थोडे पैसे द्यायचे होते.

दुसरी phd करणारी. ITतल्या मुलाशी पत्रिका वगैर जुळवून अरेंज लग्न. तो शरीरसंबंध ठेवण्यास अक्षम निघाला.

हे आत्ताच्या पिढीतलं. मागच्या पिढीतल्या अशाच दोघी सहज आठवल्या. लग्न - मूल - 7 वर्षांची खाज - शाळेतल्या क्रशसोबत एक रात्र उभा - मग नवर्याकडून लहान मुलांसमोर मारहाण, सेक्स अबूसे वगैरे... दुसरी निम्णवर्गातली, 35 वयात आजी झालेली. तिचं नंदेच्या की बहिणीच्या नवर्यासोबत अफेअर चालुय.

अत्रे's picture

28 Jul 2017 - 7:12 am | अत्रे

5 वर्ष डेटिंग करून लग्न केलेलं. सासूची अपेक्षा कि हिने अख्खा पगार आपल्या हातात द्यावा. मुलीला मात्र माहेरी थोडे पैसे द्यायचे होते.

बोंबला! पाच वर्षात अंदाज नाही आला का मुलांच्या घरच्यांचा?

सुबोध खरे's picture

28 Jul 2017 - 11:17 am | सुबोध खरे

मागच्या पिढीतील हे "अपवाद" वाटतात नियम नाही.
लवकर लग्न केल्याने विचारधारा लवचिक असते आणि जसे वय वाढते तशी मते घट्ट आणि अपरिवर्तनशील होतात आणि अहं (इगो) सुद्धा वाढत जातो. सेक्सची आसक्ती हा एक तरुण वयात नाते जुळवण्यासाठी फार मोठा चालना देणारा स्रोत असतो (ड्राइव्हिंग फॅक्टर). जसे वय वाढते तसा तो पण कमी कमी होत जातो. यामुळे स्त्रीपुरुषांची एकमेकांबद्दल ओढही कमी होत जाते. यावर अचल विचारसरणी आणि फुगलेला इगो तडजोड करण्याच्या आड येतो म्हणून जसे वय वाढत जाते तसतसे लग्न करणे जास्त कठीण होऊन बसते.
मी माझ्या मुलाला सुद्धा २६-२७ वयालाच लग्न करण्यासाठी आतापासूनच हळू हळू त्याच्या नकळत सूचना करीत आहे. २६ २७ च्या मुलाला २४-२५ ची मुलगी मिळणे सहज शक्य होते.

अभिजीत अवलिया's picture

28 Jul 2017 - 11:22 am | अभिजीत अवलिया

तुम्ही नमूद केलेल्या उदाहरणांमध्ये लवकर केलेले लग्न हे घटस्फोटाचे कारण आहे असे मला वाटत नाही.

बोंबला! पाच वर्षात अंदाज नाही आला का मुलांच्या घरच्यांचा? >> नसेल आला. किंवा अंदाज घ्यायचा प्रयत्नच केला नसेल. प्रेम अनुबंध कृतज्ञता वगैरेवर तरून जाऊ वाटले असेल.

===
मागच्या पिढीतील हे "अपवाद" वाटतात नियम नाही. >> मागची पिढी म्हणजे फार म्हातारे नाहीत. सध्या वय 35-40 असलेलं लोकं आहेत.

हो सेक्स हा ड्रायविंग फॅक्टर असू शकतो मान्य. पण कधीकधी त्याच बाबतीत टोकाची मिसमॅच/इंकंपतिबिलिटी असू शकते

===
तुम्ही नमूद केलेल्या उदाहरणांमध्ये लवकर केलेले लग्न हे घटस्फोटाचे कारण आहे असे मला वाटत नाही. >> नसेलही. पण लवकर लग्न केल्याने सगळे ठीक होईल असेदेखील नाही. कदाचित प्रॉब्लेम अजूनच वाढेल कारण एक किंवा दोघेखेरीज अजून मुलं देखील येतील...

===
एनिवे भविष्यात मुलींचे कितीही प्रबोधन केले आणि एकूनेक मुलीने लग्न केले तरी सध्या <१५ असलेल्या १.५ कोटी मुलांना अविवाहित राहवेच लागणार आहे. त्यामुळे 'लग्न-मुल हेच आयुष्याचे इतिकर्तव्य समजू नका. you can live happily single life. there are many other more interesting things todo than raising a kid' हे मुलगा/गी दोघांना सांगायला चालू केले तर बरे होईल. हेमावैम.

एमी's picture

28 Jul 2017 - 12:02 pm | एमी

<१५ असलेल्या १.५ कोटी मुलांना अविवाहित राहवेच लागणार आहे. त्यामुळे 'लग्न-मुल हेच आयुष्याचे इतिकर्तव्य समजू नका. you can live happily single life. there are many other more interesting things todo than raising a kid' हे मुलगा/गी दोघांना सांगायला चालू केले तर बरे होईल. हेमावैम.

प्रतिसाद पूर्ण का दिसत नाहीय :-(

१५पेक्षा कमी वय असलेल्या १.५ कोटी मुलांना अविवाहित राहवेच लागणार आहे. त्यामुळे 'लग्न-मुल हेच आयुष्याचे इतिकर्तव्य समजू नका. you can live happily single life. there are many other more interesting things todo than raising a kid' हे मुलगा/गी दोघांना सांगायला चालू केले तर बरे होईल. हेमावैम.

सुबोध खरे's picture

29 Jul 2017 - 9:48 pm | सुबोध खरे

you can live happily single life.
there are many other more interesting things to do than raising a kid'

या दोन्ही गोष्टी परस्परांपासून अलग आहेत. MUTUALLY EXCLUSIVE.
लग्न करणे हे आपल्याला एक समविचारी आणि भिन्न लिंगी जोडीदार असावा या आंतरिक उर्मीतून येणारी गोष्ट आहे.
एकटेपण हा सर्वानाच झेपेल अशी गोष्ट नाही. कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतलेले माझे काही मित्र आहेत आणि ते आजही आनंदी आहेत.
माझे दोन मित्र आणि त्यांच्या बायकांनी विचारपूर्वक मूल नको म्हणून निर्णय घेतलेला आहे आणि ते त्याबद्दल पूर्ण समाधानी आहेत.
तशीच आपल्याला मूल व्हावे हि पण एक आंतरिक उर्मी आहे पण त्या दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेतच असे नाही.

रानरेडा's picture

28 Jul 2017 - 6:58 pm | रानरेडा

लवकर लग्न आणि घटस्फोट हे बऱ्याचदा बरे ठरते .. माझ्या एका मैत्रिणीचे आणि तीन मित्रांचे दुसरे संसार आंदण सुरु आहेत . तसेच विदेशतीतील ऐक मैत्रीण ( भारतामधून मुंबई मधीं गेलेली) लागोपाठच्या दोन वाईट अनुभवातून बाहेर येऊन आता तिसरयांदा ऐका गोऱ्या माणसाबरोबर गेल्या ६-७ वर्षात लिव्ह इन मध्ये राहत आहे .
तिशीनंतर लग्न झाले कि आवडी निवडी निबर झालेल्या असतात पण अनेकदा नकोस निर्णय घेता येत नाही. आणि आयुष्य नकोशा व्यक्ती बरोबर काढावे लागते ..

लवकर घटस्फोट हे बऱ्याचदा बरे ठरते. >> याला सहमती. मी दिलेल्या पहिल्या दोन मुलींनी अगदी योग्य केलं.

बाकी परतपरत लग्न करणाऱ्यांच्या पेशन्स आणि positive attitudeला सलाम _/\_

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

28 Jul 2017 - 11:30 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

इतर समाजात हे प्रश्न नाहीत असे नाही पण ब्राह्मण समाजात तीव्र आहेत.
माझ्या एका ब्राह्मण मित्राच्या घरी हाच विषय निघाला ,मित्राची आई सांगत होती की मुलींच्या अपेक्षा खूप आहेत,म्हणून लग्न जमत नाही आहे वगैरे.मी सहज आंतरजातीय विवाहाचा विषय काढल्यावर," अरे खालच्या जातीत,तुमच्याकडे हे चालत असेल पण आमच्याकडे सरमिसत चालत नाही वगैरे मलाच सुनावले.असे विचार असतील तर कसे जमायचे ब्राह्मण मुलांचे,!

सुबोध खरे's picture

28 Jul 2017 - 12:22 pm | सुबोध खरे

खालच्या जातीत,तुमच्याकडे हे चालत असेल
तथाकथीत (तुम्हीच लिहिले आहे म्हणून) खालच्या जातीत आंतरजातीय विवाह किती होतात हो?
प्रत्येकाला आपल्या जातीचा "दुराभिमान" फार आहे हि वस्तुस्थिती आहे.

रानरेडा's picture

28 Jul 2017 - 7:36 pm | रानरेडा

माझे एक निरीक्षक आहे कि मुंबई ठाणे रायगड मध्ये असलेल्या बऱ्याच जातीमध्ये मिश्रा विवाह होता किंवा ते प्रेमविवाह असतील तर घरात फारसा विरोध होत नाही ..या जाती म्हणजे कुणबी . भंडारी ,पाचकळशी , कासार , आगरी , कोळी इत्यादी . मी २००३-४ मध्ये शादी , मराठीमट्रिमोनी आणि इतर साईट वरून मुलगी शोधून आंतरजातीय विवाह केला होता आणि अनुभव ठीक ठाक होता .म्हणजे प्रतिसाद बराच चांगला मिळाला होता , म्हणजे त्या काळात तरी आसा विचार करणारे बर्यपैली लोक होते .

अप्पा जोगळेकर's picture

28 Jul 2017 - 11:58 am | अप्पा जोगळेकर

आश्चर्य हे आहे की सगळीकडे मुलीच्या अशा अटी आहेत, त्यांना इतका पगार हवा आहे वगैरे कारणे सांगून मुलगेच का फक्त रडत आहेत.
मुलगा म्हणून तुमच्या स्वतःच्या काही आर्थिक अटी नाहीत का.
माझे लग्न झाले ३ वर्षांपूर्वी तेंव्हा मुलीला अमुक इतका पगार हवाच अशी माझी स्वतःची पण अट होती कारण घराचे डाउन पेमेंट, लोन काढणे वगैरे उपद्व्याप मी एकट्यानेच केले होते. त्यामुळे लग्न झालेल्या मुलीने इएमायची दमडी सुद्धा न देता माझ्याबरोबर फुकट राहावे हे मला मान्यच नव्हते.
ही अट आठवली की आजही बायको टिंगल करते तो भाग वेगळा.

अभ्या..'s picture

28 Jul 2017 - 12:11 pm | अभ्या..

आप्पा काय हे?
खरंच अशी अट घालून लग्न केलात की काय?

अप्पा जोगळेकर's picture

28 Jul 2017 - 1:15 pm | अप्पा जोगळेकर

असेच असते साहेब. 'आम्ही काहीच मागितले नाही, मुलीकडच्यांनी दिले' म्हणून हुंडा घेणारे मिरवतात.
फटकळ पणे कन्स्ट्रेण्ट सांगणार्‍यांना 'काय हे ? अशी अट' म्हणतात. :) चालायचच.

माहितगार's picture

28 Jul 2017 - 2:46 pm | माहितगार

रिझनेबल

त्यामुळे लग्न झालेल्या मुलीने इएमायची दमडी सुद्धा न देता माझ्याबरोबर फुकट राहावे हे मला मान्यच नव्हते. >> अगदी योग्य अप्रोच आहे. आयुष्यभर बापाच्या नवऱ्याच्या मुलाच्या जीवावर उच्च/मध्यमवर्गीय आयुष्य जगणाऱ्या आणि 'भाकर्या बडवण्याला' प्रतिष्ठा मागत फिरणाऱ्या बायका डोक्यात जातात.

सुबोध खरे's picture

28 Jul 2017 - 12:26 pm | सुबोध खरे

अर्रर्रर्र
ऍमी ताई
तुम्ही त्या "होममेकर" वगैरे( आजकाल हाऊस वाइफ म्हटलं तर अंगावर येतात) बायकांची लाजच काढताय हो.

अप्पा जोगळेकर's picture

28 Jul 2017 - 1:08 pm | अप्पा जोगळेकर

हाऊस वाईफ असण्यात किंवा तसे म्हणण्यात चुकीचे काय आहे ?

मी हे फार पूर्वीपासून करतेय. खरंतर याबाबतीत मी अगदी स्वतःला mcp म्हणावनार्यांपेक्षा जास्त harshly बोलत असते. तरी मला स्त्रीवाद्यामधे टाकून देतात लोक :)

===
एनिवे मुलांनो लग्न करायचे असेल तर थोडं गणितबिणित शिकून घ्या आणि नागीण डान्स अजिबात करू नका

http://www.independent.co.uk/news/world/asia/indian-woman-cancel-arrange...

थोडं गणितबिणित शिकून घ्या >>> ती केस तर सरळसरळ फसवणुकीची होती. ते लग्न मोडलं तर त्यात विशेष काय?

उदय's picture

30 Jul 2017 - 10:18 am | उदय

माझे लग्न झाले ३ वर्षांपूर्वी तेंव्हा मुलीला अमुक इतका पगार हवाच अशी माझी स्वतःची पण अट होती कारण घराचे डाउन पेमेंट, लोन काढणे वगैरे उपद्व्याप मी एकट्यानेच केले होते. त्यामुळे लग्न झालेल्या मुलीने इएमायची दमडी सुद्धा न देता माझ्याबरोबर फुकट राहावे हे मला मान्यच नव्हते. ही अट आठवली की आजही बायको टिंगल करते तो भाग वेगळा.

अशी अट होती की अपेक्षा? अपेक्षा काहीही असावी, त्याला ना नाही कारण शेवटी हा बाजार आहे. पण 'अट' ठेवणे जरा विचित्र वाटले. नॉर्मली मुलाचा/मुलीचा पगार हा माहिती वाचून कळतोच. जर पगार कमी वाटला तर स्थळ जुळत नाही/पसंत नाही असे सरळ सांगावे. त्याच्यासाठी मुलाची ही अशी 'अट' आहे, हे सांगायची गरज काय? आणि अशी अट असताना मुलगी लग्नाला तयार झाली हे अजूनच आश्चर्यकारक वाटले. उद्या मुलीने 'अट' ठेवली की मला मुलगा xx किलोपेक्षा कमी वजनाचाच हवा कारण तो बकाबका खूप खाईल, मग कसे वाटेल ही 'अट' ऐकून?

माझे तर मत आहे की लग्नाच्या बाजारात काय पाहिजे त्या अपेक्षा ठेवा, पण मग लग्न जमत नसेल तर त्रागा करू नका. (बसा बोंबलत असे म्हणायचे होते खरंतर, पण उगीच inflammatory वाटेल म्हणून तसे लिहिले नाही. कृपया प्रतिसाद वैयक्तिक समजू नये.)

अत्रे's picture

30 Jul 2017 - 10:47 am | अत्रे

+१

अट आणि अपेक्षा हे शब्द समानार्थी वाटत असले तरी त्यातला फरक समजून घ्यायला पाहिजे.

अपेक्षा म्हणजे दुसरी व्यक्ती ऑलरेडी तसा विचार करणारी असणे आणि अट म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने आपल्यासाठी बदलणे.

नितिन५८८'s picture

28 Jul 2017 - 1:06 pm | नितिन५८८

माझा स्वतःचा अनुभव,
आम्ही दोघे एकाच ऑफिस मध्ये जॉब करतो, (मुलगी अमरावतीची मी पुण्यातला )२ वर्षांपासून relation मध्ये होतो. मुलगी एकटीच भाडे तत्वावर फ्लॅट घेऊन राहत असे. मुलीच्या घरचे अमरावतीला असतात. आम्ही दोघांनी घरी सांगितले माझ्या घरचे लग्नाला तयार होते. मुलीची आई तयार, बहीण तयार, मुलीचे वडील पण तयार झाले. वडील मला भेटण्यासाठी पुण्याला येणार होते पण येण्याआधी मोठ्या भावाला माझा परिचय पत्र दाखवावे असे वाटले म्हणून दाखवले. मोठया भावाचे म्हणणे असे कि तू जर तुझी मुलगी दुसऱ्या जातीच्या मुलाशी करून दिली तर माझ्या मुलींना कसे स्थळ येणार.
मोठया भावाचा नकार, लगेच मुलीच्या पण वडिलांचा नकार, आईचा नकार, बहिणीचा नकार मुलीचा पण नकार (मुलीचे कारण मी वडिलांच्या शब्दाबाहेर नाही जाणार ). दुसऱ्या दिवशी पासून माझा फोन ब्लॉक नंतर फोन नंबर बदलला. फेसबुक, skype सगळीकडे ब्लॉक.
मी मुलीच्या वडिलांना फोन करून कारण विचारले त्यांनी सांगितले
१. मुलगा आमच्या जातीचा नाही
२. आमच्या घरच्यांना पसंत नाही आणि
३. मुलाकडे शेती नाही.

मी व मुलीने तिच्या आवडीचे दागिने घेऊन ठेवले जे लग्नात उपयोगी येणार होते ते तिच्याकडेच ठेवले होते, शिवाय तिच्या बँक अकाउंट मध्ये दर महिना जमेल तसे २०-२५ हजार जमा करत होतो कारण मुलीच्या घरच्यांची परिस्थिती विशेष चांगली नाहीये असे मुली कडून कळले होते. (पैसे का टाकत होतो तर आमच्या लग्नात तिने ते घरी द्यावे म्हणजे लग्नाचा भार तिच्या घरच्यांवर येणार नाही )
लग्नाच्या बाबतीत माझी कोणतीच अट नाही. कसे हि कुठे हि तयार (Court Marriage, देवळात लग्न, मुलीच्या गावाला, पुण्यात ) जसे तिच्या घरचे म्हणतील तसे

आता माझा परिचय: मी open category मधला मुलगी obc, माझा वार्षिक पगार ७ लाख, पुण्यात स्वतःचे घर , २ फ्लॅट औंध मध्ये तसेच ६ दुकाने (गावी). घरी आई (Government Servant), मोठा भाऊ (job in private company) वाहिनी (working).

टीप: मुलीचे लग्न दुसऱ्या मुलाशी झाले आहे, तिने सर्व दागिने आणि पैसे परत केलेत त्या पैश्यातून मी माझी बाली ट्रिप सुद्दा करून आलो.

माहितगार's picture

28 Jul 2017 - 2:53 pm | माहितगार

सॅड, त्या चुलत बहिणीचे लग्न आधी होऊन जाण्याचा आणि तो पर्यंत थांबण्याचा पर्याय मुलीने निवडावयास हवा होता. मुलगा ओपन कॅटेगरीतील आहे तर का चालू नये ? पण समाज विचीत्र असतो. पण हे जातीभेद लवकरात लवकर संपावयास हवे हे खरे.

नितिन५८८'s picture

28 Jul 2017 - 3:06 pm | नितिन५८८

विशेष म्हणजे ज्या मुलाबरोबर तिचे लग्न झाले आहे त्या मुलाला पण हे सर्व ठाऊक आहे.

दागिने आणि पैसे परत केले हे चांगले झाले.

आणि तुम्ही बाली ट्रिप करून आलात हे तर झक्कास झाले :D

रामदास२९'s picture

28 Jul 2017 - 2:07 pm | रामदास२९

माझ्या नातेवाइकान्पैकी एका मुलाच्या बायकोने तर लग्न झाल्यावर विदेशातून सासरच्यान्च्या नकळत पैसे पाठविणे सुरू केले.. त्यावरून त्या वरून त्यान्चे सम्बध बिघडले ..

कोणाचे पैसे? स्वतःचे कि नवर्याचे?

बाकी अशी कित्येक उदा असतात जिथे मुलीचा पूर्ण पगार सासरीच वापरला जातो. स्वतःचा, नवर्याचा, मुलांच्या खर्चात भागीदारी करणे ठीक आहे. पण सासुसासऱ्यांवर का खर्च करायचा तिने?

मित्र सॉफ्टवेअर मध्ये कामाला दरमहा पगार ८०,००० रुपये,
मुलगी BA पास घरीच असते, मुलीचे वडील LIC agent, मुलीची आई घरीच असते.

तर मित्राला मुलगी बघायचा कार्यक्रम झाला, मुलगी पसंत आहे असे कळवले, मुलीच्या आई चा मित्राला फोन कि माझ्या भावाला तुम्हाला भेटायचे आहे. मित्र ठीक आहे बोलला आणी मुलीच्या मामला भेटून आला.
त्यानंतर मुलीच्या आईचा मित्राला पुन्हा फोन.

मुलीची आई: माझ्या भावाला वाटतंय कि तुम्ही काही तरी व्यसन करता.
मित्र: मी कधी तरी बिअर घेतो ते पण ऑफिसचे काही program असेल तर किंवा १५ दिवसातून कधी तरी मित्रांबरोबर.

मुलीची आई: पण तुमच्या आई ने तर असे काही सांगितले नाही
मित्र: आहो कोणती आई सांगेल कि माझ्या मुला मध्ये हा दोष आहे किंवा तो कधी तरी बिअर घेतो म्हणून .

मुलीची आई: ठीक आहे आता पर्यंत जर तुम्ही घेत असाल तर जाऊद्या पण ह्यापुढे तुम्ही कोणतेही व्यसन करणार नाही याची गॅरंटी हवीये.
मित्र: मला थोडा वेळ द्या विचार करायला आणि फोने ठेवून देतो.

ह्या फोन चालू असताना आम्ही सर्व मित्र एका कार मधून प्रवास करत होतो. तेव्हा हे सगळे समजले... त्यावर मी त्याला एक सल्ला दिला कि हो म्हणून सांग कि मी गॅरंटी देतो पण तुम्ही पण मला एक गॅरंटी द्या ती म्हणजे मी एक तर सॉफ्टवेअर क्षेत्रात आहे आणि इथे जॉबची काही गॅरंटी नसते. जर लग्नानंतर माझा जॉब गेला तर तुम्ही मला दरमहा ८०००० रुपये द्यायला हवे ह्याची गॅरंटी द्या.

मित्राने लगेच फोन करून तसे ऐकवले . . . . . . . मुलीची आई शांतच

मग काय शेवटी मित्रानेच नकार दिला.

चौकटराजा's picture

28 Jul 2017 - 5:47 pm | चौकटराजा

खरे तर आमच्या पिढीला मुलींपेक्षा त्यांच्या " वाय झेड " आईवडींलाचा त्रास जास्त होता. दिवसेंदिवस आपले जीवन आपले छंद,मित्रपरिवार ई नी विकसित करण्यापेक्षा मोबाईल , कार, अनेक घरे यानी करायचा खुळचटपणा वाढला आहे. याना फक्त तीन गोष्टीच अपडेट करण्यासाठी मजबूत पैसा हवा आहे. व्यवस्थापन प्रमोशन यांचे बाहेर यांचे वाचन जायला तयार नाही. माझ्याही पिढीतील माझे काही मित्र आजही उपभोगापेक्षा पैशाच्या उत्पादनातच रमले आहेत. आयुष्य मानमरातब, करीयर पैसा यापेक्षा मोठा असलेला एक कॅनव्हास आहे हे माझ्या पिढीतीलही काहीना कळायला तयार नाही तर नव्या पिढीचे काय बोलावे.
मी अशा कोणत्याही खुळचत पणात रमलो नाही याचा मला विलक्षण अभिमान आहे. पैसा उत्तरोत्तर अनेक मार्गानी मिळत जातो हे सत्य आहे पण गेलेले वय पुन्हा येत नाही . माझ्या मुलीने माझ्या उदाहरणावरून आयुष्य कसे जगायचे हे ठरवावे हे मी तिच्या पचनी पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. माझ्या मित्रपरिवारातील
एक मिपाकर काही तडजोडी स्वीकारून सुखाच्या मार्ग आपल्या वैवाहिक जीवनात क्रमित आहे.

लग्न हा एक बाजारच पण आयुष्य हा नाही. या बाजारात आपला शेअर किती ताणून विकण्यापासून दूर ठेवायचा याची अक्कल ज्याला वा जिला आहे तिचे सर्व भले होते. माझ्या मिपाकर मित्राने ती वापरली . अशी सदबुद्धी सर्वाना मिळो. वर डॉ खरे यानी आपला खर्च सांगितला आहे. त्यापेक्षाही कमी खर्चात मस्त मजेने जीवन जगता येते.

ज्याच्या अस्तित्वावर माझा विश्वासच नाही त्या देवाचा मी खरोखरीच आभारी आहे.

अभिजीत अवलिया's picture

28 Jul 2017 - 7:48 pm | अभिजीत अवलिया

सहमत.

मुलगा इंजिनियर, MNC मधे!
मुलगी MSEB त इंजिनियर.

लग्नाला ३ वर्षे झाली.

मुलगा मुंबईत(Accenture)पण बायको कणकवलीत!

शनिवारी किंवा रविवारी एकत्र भेटतात.

"अरे आता मुलाचा/मुलीचा विचार करा"

"एवढ्यात नाही.थोडं पैशांचं गणित जमू दे!"

मुलीचं वय ३१ मुलाचं ३४

मुलाचे वडील स्टेट बँकेत मॅनेजर होते,आई जिल्हापरिषदेतून निवृत्त.हा एकुलता एक.

मोजा किती पैसे घरात येत असतील! अजून कोणतं गणित जमवताहेत देव जाणे!

मुलाचे आईवडील मुलाच्या नव्या संसारामध्ये किती पैसे इनव्हेस्ट करायला तयार आहेत? ;)
एकतर तो त्यांचा पैसा आहे. मुलाचं किंवा मुलीचं लग्न करून देणारेत ना? त्यासाठी खर्च करणारेत ना?
श्ब्द देऊन लग्नानंतर फिरवला तर? कितीतरी उदाहरणे दिसतील की मुलाने, मुलीने, साबासबूने (दोन्हीकडील) शब्द बदलणे, नकार, घरातून बाहेर काढणे टाईप.
कोणीही यातील एखादी किंवा सर्व गोष्टी करू शकतो. याचे इतके अनुभव मागील पिढ्यांनी घेतलेत की आपण मिळवलेला पैसा किंवा निदान नवर्‍याचा पैसा थोडेफार तारून नेईल.

"अरे आता मुलाचा/मुलीचा विचार करा" >>> हीच चूक आहे. आपण कशाला सल्ले द्यायला जायचं आणि भोचकपणा करायचा? त्यांचं-ते बघून घेतील.

धाग्यावर वाचनीय चर्चा झाली आहे.
======================================
नाती आणि हिशेब मिक्स करू नयेत असं माझं मत आहे. कोणत्याही व्यक्तिची कोणत्या एका बिंदूवरची परिस्थिती कितीही पालटू शकते. सहसा नातं परिस्थिंतींशी अतीत असलेलं बरं.
हे सूत्र पाळल्यानं माझं लग्न फार यशस्वी आहे असं मी म्हणेन.
=======================================
लोक पगार क्ष आहे म्हणतात तेव्हा तो टेक होम असतो कि ग्रॉस? त्यात व्हेरिएबल सॅलरी येते का?

अप्पा जोगळेकर's picture

28 Jul 2017 - 11:53 pm | अप्पा जोगळेकर

नाती आणि हिशेब मिक्स करू नयेत असं माझं मत आहे. कोणत्याही व्यक्तिची कोणत्या एका बिंदूवरची परिस्थिती कितीही पालटू शकते.
हे पटले. फक्त नाते तयार होताना थोडा वेळ जावा लागतो. त्याआधी तर सगळे हिशोबच असतात.

उदय's picture

30 Jul 2017 - 10:25 am | उदय

नाती आणि हिशेब मिक्स करू नयेत असं माझं मत आहे. कोणत्याही व्यक्तिची कोणत्या एका बिंदूवरची परिस्थिती कितीही पालटू शकते.
एकदम मस्त. सहमत.

कुमार१'s picture

28 Jul 2017 - 6:56 pm | कुमार१

चांगला धागा.
मुलाची आर्थिक स्थिती उत्तम नाही म्हणून स्थळे नाकारलेल्या अनेक मुलींचे किस्से वर आले आहेत. आता माझ्या माहितीतील एका मुलीच्या त्यागाचा हा अनुभव:

ती उच्चशिक्षित असून तिला चांगल्या पगाराची सुरक्षित नोकरी होती. लग्न करताना तिने तिच्यापेक्षा अधिक कमावणारा मुलगा बघावा अशी तिच्या पालकांची पारंपरिक अपेक्षा. पण घडायचे होते वेगळेच. ती छंद म्हणून संगीत शिकण्यासाठी एका अंध तरुणाकडे जात असे. त्या सहवासात त्यांच्या मैत्रीचे धागे जुळले. ती त्याच्या कलेवर बेहद्द खूश होती तर तो तिच्या सहृदय अंतःकरणावर. कळत नकळत मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. जन्मांध असलेल्या त्या तरुणाला स्वतःच्या आई-वडिलांबद्दल काही माहिती नव्हती. तो अनाथालयात वाढलेला होता. पण जिद्दीने त्याने संगीतात प्रावीण्य मिळवले होते.

एके दिवशी तो तिला म्हणाला, “तू मला खूप प्रेम दिलेस. पण आता लवकरच तुझे पालक तुझे लग्न ठरवतील व आपली ताटातूट होईल. मग माझ्यापाशी उरतील त्या फक्त आपल्या निखळ प्रेमाच्या आठवणी. त्यांच्या आधारावर मी माझे आयुष्य काढेन”. हे ऐकल्यावर तिला गलबलून आले. पूर्ण २४ तास तिने खूप विचार केला आणि एक धाडशी निर्णय घेतला, तो म्हणजे त्याच्याशी लग्न करण्याचा. प्रथम त्यानेही तिला वेड्यात काढले. “आपली भेट हा एक अपघात होता असे समजू, पण माझ्याशी लग्न करून तू तुझ्या सुंदर आयुष्याची माती करू नकोस,” त्याने तिला विनविले.

परंतु, आपल्या निर्णयामुळे तो मनोमन सुखावला आहे आहे हे तिने ताडले. जेव्हा तिने हा निर्णय घरी सांगितला तेव्हा अर्थातच तिला तीव्र विरोध झाला. कुटुंबीयांनी विनवणीपासून ते धमकावणीपर्यंत सर्व प्रकारांनी तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या या मुलीने विरोधाला न जुमानता तिचा निर्णय अमलात आणला. पांढऱ्या काठीच्या आधाराने धडपडणाऱ्या जिद्दी तरुणाला तिने आपलाच भक्कम आधार कायमचा दिला.

त्यागाचे याहून चांगले उदाहरण माझ्यातरी पाहण्यात नाही. धडधाकट, निरोगी, उच्चशिक्षित व कमावत्या या तरुणीने एका अंधाला आपला जीवनसाथी केल्याची घटना माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे. सदर जोडपे हे आमचे कुटुंबं-मित्र आहे. त्याना एक छानशी मुलगी असून ती एक उत्तम गायिका झालेली आहे.

अत्रे's picture

28 Jul 2017 - 7:07 pm | अत्रे

सुंदर. महाबळेश्वर वॅक्स म्युझिअमचे भावेश भाटिया यांची पण गोष्ट काहीशी अशीच आहे.

https://www.youtube.com/watch?v=onS1-fZgLgk

http://www.themetrognome.in/lifestyle/achieve/love-candle-light

चौकटराजा's picture

28 Jul 2017 - 9:28 pm | चौकटराजा

जमल्यास "पानगळीचे झाड " हे पुस्तक जरूर वाचावे. एका मुलीचा विवाह ठरलेला आहे पण त्याचवेळी तिला कुष्ठरोग झाल्याचे समजते. ,मग काय .... विवाह मोडतो. ती मोठ्या धीराने विकाराला सामोरी जाते. बरी होते. व तिच्याच ओफिसातील एक तिला लग्नाची मागणी घालतो अशी काहीशी " सत्यकथा" आहे ती.

रेवती's picture

28 Jul 2017 - 10:07 pm | रेवती

छान वाटतय वाचायला पण आपल्यापैकी कितीजणांना हे जमलं असतं ही विचार करण्याची गोष्ट!
माझ्या सासर्‍यांच्या आतेभावाचाही किस्सा आहे त्यामुळे जवळून पाहण्यातला आहे.
आता ते काका व त्यांच्या पत्नी हयात नाहीत. काका जन्मापासून अधू होते. त्या विकाराला काय म्हणतात हे माहित नाही. विचारायचे धाडस कधी झाले नाही.
बुद्धी मात्र तल्लख! चांगली सरकारी नोकरी होती. काकूंनी काकांच्या हुषारीवर भुलून त्यांच्याशी लग्न केले. पुढे मुले होवून संसार सुखाचा केला. मुलांचे सर्व नीट होईस्तोवर काकूंना ताण असणारच. त्या कधी दाखवत नसत पण असणार असे वाटते. दोन्ही मुलांचे लग्न कार्य झाल्यावर अचानक हृदयविकाराने गेल्या. एक दोन मिनिटात सगळे संपले. पुढे काकांचे त्यांच्या मुलांनी सगळे केले पण वर्षभरात ते गेले.
सगळे व्यवस्थित असताना लग्न कोणीही करेल पण नेहमीपेक्षा थोडा धाडसी, वेगळा निर्णय घेण्यास हरकत नसते.
माझ्या मुलाने असा निर्णय घेतला तर एक पालक म्हणून मी काय करेन, कोणता सल्ला देईन हा विचार करतिये.

उदय's picture

30 Jul 2017 - 10:27 am | उदय

हे उदाहरण अपवाद म्हणूनच बघावे लागेल, प्रातिनिधीक म्हणून नाही.

धर्मराजमुटके's picture

29 Jul 2017 - 10:51 am | धर्मराजमुटके

मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत असे म्हणणार्‍यांसाठी !
आजच्या लोकसत्ता ठाणे चतुरंग पुरवणीत "गावातल्या मुली" हा अरविंद जगताप यांचा लेख वाचावा. मुलींच्या काही समस्या असतील ज्या आपल्या ध्यानात येत नसतील किंवा आपण कदाचित त्याकडे दुर्लक्ष करीत असु तर त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख आहे. चला हवा येऊद्या मधील पोस्टमन काका वाचून दाखवत असलेले 'पत्र' लेखक म्हणजे अरविंद जगताप. या लेखाची फेसबुक लिंक आहे पण ती ओपन होत नाहिये.

लिंक :
कुणी हा लेख वाचला असेल तर आपल्या प्रतिक्रिया जरुर नोंदवा.

त्यांचं या विषयाला साजेसं व्यंगचित्र!अपेक्षा!

उदय's picture

30 Jul 2017 - 10:49 am | उदय

एकदम सुयोग्य. परफेक्ट.

मी धड दहावी पास नाही, त्यात सतत अपयशी व्यवसायामध्ये, जाती धर्माचा जवळचा सोडा लांबाचा पण संबध नाही.
7 वर्षे झाली लग्नाला, प्रेम विवाह होता, नन्तर त्याचे अरेंज मॅरेज मध्ये पण रूपांतर झाले.

तडजोड नाही, समजूतदारपणा असेल दोन्ही कडे तर सर्व उत्तम होते.

समजूतदारपणा असेल दोन्ही कडे तर

व्यक्ति म्हणून तुम्ही समजूतदार आहात, पण त्यापेक्षा भाग्यवान जास्त आहात. आजूबाजूला एकगठ्ठा समजूतदार लोक असणं महत्भाग्याचं लक्षण आहे, एखादा स्वतः समजूतदार असो नैतर नसो. आणि फरक जितके जास्त तितक समजूतदारपणा कमी. त्या काँट्रास्टमधे तुम्ही अजूनच लकी वाटातायत. जियो.

राही's picture

29 Jul 2017 - 11:26 pm | राही

वरती एका प्रतिसादात डॉ. खरे यांनी २५ हजारांत महिन्याचा खर्च बसतो असा अंदाज दिला आहे तो खूपच नीचीच्या बाजूचा (लोअर साइड्}चा वाटतो. कामवाल्या बाया, गाड्या धुणारे लोक यांचा पगार (हे ऑप्शनल)धरलेला दिसत नाही. शिवाय घराची, घरातील वस्तूंची देखभाल/डेप्रीसिएशन तसेच सोसायटीची पंचवार्षिक दुरुस्ती/रंगरंगोटी यासाठी बचत आवश्यक असते. घरात वडीलधारे कोणी असतील तर त्यांची देखभाल, औषधे, शिशुवर्गातील मुलांच्या फिया, त्यांचे शाळेत नेण्या-आणण्याचे खर्च हे सर्व लग्न झाल्यापासून लगेच एका वर्षात जरी सुरू झाले नाहीत तरी नजीकच्या भविष्यकाळात सुरू होणारे असतात. किराणा, वाणसामान, भाजीपाला,फळफळावळ, दूधदुभते, (पनीर, चीझ, बटर वगैरे) गृहोपयोगी वस्तू, (वेगवेगळे साबण, फिनाइल,डेटॉल, झुरळ/डासनाशके वगैरे. ) वरचा खाऊ हे सर्व 'वाणसामान' या शीर्षकाखाली धरले आहे का? वैद्यकीय खर्चातला मोठा भाग वैद्यकीय विम्यातून मिळत असला तरी काही थोडा भाग (हा बराच मोठा असू शकतो,) आपल्याला भरावा लागतो. दंतविमा नसेल तर अकस्मात बर्‍याच खर्चाला सामोरे जावे लागते. यातले काही खर्च अगोदर म्हटल्याप्रमाणे लगेच सुरू होणारे नसले तरी नवीन संसारात काही तातडीने करण्याच्या, निकडीच्या गोष्टी असतात त्यामुळे सुरुवातीचा खर्च वाढतो. उदा विजेचा लपंडाव असलेल्या ठिकाणी इन्वर्टर वगैरे. किंवा सुरुवातीच्या बादल्या, टब, स्वयंपाकाची शेगडी, गॅस सिलेन्डर वगैरे.
मला तरी ४०,००० हा आकडा योग्य वाटतो.

arunjoshi123's picture

31 Jul 2017 - 11:56 am | arunjoshi123

भारतात मिडलक्लास लाइफ जगायला मासिक खर्च किमान ०.७५ ते १.२५ लाख रु प्रतिमाह लागत असावा.
भाडे (किंवा ई एम आय/२) -२५०००
युटिलिटि बिल्स - ४०००
टेलिकॉम बिल्स - २०००
कारचा इ एम आय - ५०००
ऑफिसला प्रवास - २अप अअ‍ॅम्ड डौन *२५ दिवस* १५ किमी * ५ रु प्रति किमि = ४०००
इंशुरन्सेस (/१२२) = २०००
शाळेची फी - ५०००
शालेचा इतर खर्च - २०००
कपडे (१/१२) - २०००
समारंभ - २०००
टूरिझम (१/१२) - २०००
हॉटेलींग - २०००
ग्रॉसरी अँड टॉयलेट्रिज - १००००
फ्रूट्स - २०००
व्हेजिटेबल्स - १५००
पेपर नि पुस्तके - ५००
कामवाली - २०००
गॅझेट्स (१/१२)- २०००
फर्मिचर (१/१२) - १०००
औषधे, इ - २०००
इतर - ५०००
=====================
यात "फार कै म्हणावासा" एकही आयटम नाही. सगळं बेसिक आहे. मंजे दारु, सिगारेट, सिंगापूरची ट्रीप, ड्रायवर, एस यू व्ही, इइ नाही.
==========================
बचत एक्सक्लूडेड
इनवेस्टमेंट एक्सक्लूडेड
या दोन गोष्टि डिसेंट प्रमाणात करायच्या म्हणजे अजून पैसे लागतील.
=====================================================
१० लोवर क्लास माणसांमागे १ मिडलक्लास, १० मिडलक्लासांमागे १ अप्परक्लास, इ इ गृहीत धरलं आहे. क्लास म्हणताना शुद्ध आर्थिक निकष. सामाजिक, शैक्षणिक नाही.
===============================
तर अशा प्रकारच्या मिडलक्लास लोकांना पाहून किमान असं आपलं जीवन असलं पाहिजे अशी इच्छा एकिकडे होणे आणि दुसरीकडे सरासरी उत्पन्न अत्यंत कमी
( तिसरि कडे लग्नावेळेच्या अपेक्षापूर्तीच्या नवस्वातंत्र्यामुळे) अशा केसेस वाढत असाव्यात.

चौकटराजा's picture

31 Jul 2017 - 10:24 pm | चौकटराजा

काही मिपाकर माझ्या घरी येउन गेलेले आहेत. चिवडा पोहे चहा तरी त्याना मिळाला आहे. आम्ही चार आहोत. चिंचवड येथे रहातो. २५००० मधे मस्त भागते.
मुळात मी सुखी आहे असे वाटले पाहिजे. माझ्या ऑफीस मधे एक मुलगी होती. म्हणली " पैसा,,,,, पैसा सगळा महत्वाचा असतो आयुष्यात . बाकी सारं फालतू आहे. दुसर्‍यादिवशी मी तिला " पैशा शिवाय भोगायचे ५१ आनंद " अशी एक यादीच दिली. केवळ स्त्री- पुरूष मर्यादा म्हणून काही " आनंद " त्यातून वगळले होते.
अशी वृत्ती मिळणे फार भाग्याचे असते.

चौकटराजा's picture

31 Jul 2017 - 10:36 pm | चौकटराजा

मी काश्मीर ते कन्याकुमारी जेसलमेर ते पुरी असा रग्ग्गड प्रवास सहकुटंब केला आहे. नुकताच युरोप प्रवासही झाला . १९७० पासून जवल जवळ ३००० सिनेमे पाहिलेत. भरपूर पुस्तकेही वाचली. म्हणजे अगदीच भाकरी चटणी जीवन जगलो नाही. बस .. आता इथे मस्त कसे जगावे असा क्लास काढण्यात अर्थ नाही. प्रणव मुकर्जी एकदा म्हणाले होते. " मी ५० वर्षात बायकोला आपणहून एकही साडी घेतली नाही ... पण पन्नात वर्षात चुकुनही आमचे भांडण झाले नाही. " अशीही जोडपी मी सामन्य लोकात पाहिली आहेत. अर्थात आमचे जोडपे असेच आहे असा मी दावा करीत नाही.

राही यांनी दिलेला प्रतिसाद आवडला.
तो माझ्या मनातील आकड्याशी जुळतोय म्हणून नाही तर त्या त्या गावाशहरातील राहणीमानाशी जुळणारा आहे.
लग्न करताना कदाचित मुलीला माहेरी प्रगतीस वाव मिळाला नसेल तर काही शिकणे, व्यवसाय सुरु करणे यासाठी थोडाफार पैसा लागू शकतो.
संसार हा एकसुरी कधीच नसतो. तो रूप बदलत राहतो, मार्ग शोधत राहतो. मनुष्यप्राणीही एक गोष्ट अचीव्ह केली की दुसरीकडे लक्ष वळवतो. जे चांगल्या अर्थी म्हणायचे आहे. नवरा मुलगा जीवनसाथी शोधत असेल, आनंद शोधत असेल, भविष्याची स्वप्ने पहात असेल तर मुलगीही तेच करत असते. त्यात नवीन घरासाठी रक्क्म जमवणे हे लक्ष्य असणे कॉमन आहे. नवर्‍याच्या आणि आपल्या (किंवा गाव बदलल्यास फक्त नवर्याच्या) आमदनीत प्रगतीस वाव नसून फक्त दोनवेळ जेवण व दोन धड कपडे हे खूप बेसिक विचार आहेत व ते करणाराही एक वर्ग असतोच. तुम्हाला काय हवेय? हा विचार करण्याचा हक्क सर्व मुलामुलींना आहे.

arunjoshi123's picture

31 Jul 2017 - 11:14 am | arunjoshi123

भारतात दरडोई उत्पन्न प्रतिवर्ष १ लाख रु सरासरी आहे. म्हणजे ८००० रु प्रतिमाह. यातही उत्पन्नाचा श्रीमंत आणि गरीब लोकांचा स्क्यूनेस आहे तो ध्यानात घेतला तर सरासरी उत्पन्न अजूनच कमी (आणि प्रचंडच, पण ते असो.) आहे. असं असेल तर ४०००० प्रतिमाहची अपेक्षा कितपत योग्य आहे?
=======================================================
आर्थिक परिस्थिती पित्यापेक्षा उत्तमच असावी असा मुलींचा आग्रह का असतो? मुलांमधे पिता कर्तृत्ववान असेल आणि मुलगा तितका नसेल तर तशा खालावलेल्या स्थितीत जगायला मुले तयार असतात. मुलींना सहसा "स्वतःपेक्षा" तसेच "पित्यापेक्षा" अधिक उत्तम परिस्थितील पती हवा असतो.
==========================================================
आपल्या स्वतःची चालू परिस्थीती म्हणजे पित्याची सेवाकालातील शेवटची वर्षे असतात. कोणाच्या शेवटच्या वर्षांच्या परिस्थितीचे कोणाच्या प्रारंभिच्या स्थितीशी तुलना कशी होऊ शकते.
=======================================================
(हे सर्व तुम्हाला म्हणायचे होते असं नाही. असं काही तुम्ही लिहिलेलं नाहि. पण एक संवाद म्हणून...)

arunjoshi123's picture

31 Jul 2017 - 11:23 am | arunjoshi123

दोन आणि तीन लोकांच्या कुटुंबाला सरासरीपेक्षा उत्तम जीवन जगायला २(वा ३)*८०००*१.४ (४०% ब्लॅक इकॉनॉमी मानू.) अनुक्रमे २२,००० आणि ३४,००० रु लागतात.
म्हणून आरंभिचं उत्पन्न २५००० आणि २-३ वर्षांनी ३५००० होणार असेल तर पर्याप्त असावं.
====================
अर्थातच निवृत्तीवेतन नसणारे अवलंबी पालक इ असतील तर अधिकची अपेक्षा योग्य आहे. शहरी भागात मात्र अजूनच जास्त अपेक्षा हवी. मेट्रोंत अजूनच जास्त. घर नसणाराचं अजूनच जास्त.

arunjoshi123's picture

31 Jul 2017 - 12:41 pm | arunjoshi123

हे पाप आपल्या संस्कृतीला आणि संस्कृतीतील विद्यमान बदलांना एकत्रित दिलं जाऊ शकतं.
लेखातल्या ब्राह्मण मुलाचं काय होतं? उदाहरण पाहू -
देशाची लोकसंख्या - १२५ कोटी
(पहीला निकष मराठी) - उरले १२ कोटी
(दुसरा निकष - स्त्री) - ६ कोटी
(तिसरा निकष - वय - (० ते ४ वर्षे कमी) - ६*५५%( २५ च्या वरचे लोक) * ४/५० (सरासरी ७५ आयु) * २ (कमी वयाचे लोक डबल मानू) = ०.५ कोटी
(चौथा निकष - जात) = ०.५% * २.५% = १ लाख ३२ हजार
(पाचवा निकष - गोत्र), एकच असण्याची २०% शक्यता = १ लाख ५ हजार
(सहावा निकष - कूंडली) = न जुळण्याची ५० % शक्यता = ५२८००
(सातवा निकष - उपजात) न जुळायची २०% शक्यता =४२,०००
मॅचमेकिंग इनेफिसियन्सी (संपर्क, ओळख, मोठा भूभाग, कम्यूनिकेशन गॅप्स, इ ) ९०% ऑप्शन्स गळाले = ४२००
ग्रामीण नको, शेतकरी नको, व्यावसायिक नको = १४००
==================
इथून पुढे आर्थिक स्थिती, सिक्षण, शरीरस्थिती, स्वभाव, घरी कोण कोण आहे, साम्स्कृतिक फरक, आवडिनिवडिंतील फरक, आणि असले बरेच कंसिडरेशन्स येऊन फायल उत्तर १ पेक्षा कमी येतं बर्‍याच केसेमधे
===================
आकडे अस्सेच आहेत, जस्ट बेंचमार्क्स वापरले आहेत. फार सिरियसली घ्यायचे नाहीत.