सध्या काही मित्रांनी त्यांच्यासाठी वधुसंशोधनाच्या कामात मलाही सामील करुन घेतलंय.बरेचसे मित्र हे ब्राह्मण समाजातील आहेत.त्यानिमित्याने विविध वधुवरसंशोधन संस्थांना भेटी देणं सुरु आहे.बहुतेक मित्र हे पौरोहित्य करणारे किंवा अल्पउत्पन्न गटातील आहेत.शिक्षणही आर्टस किंवा कॉमर्स शाखेतून पदवी,पदव्युत्तर असेच आहे.वयंही साधारण २८ ते ३५-३६ या गटातील आहेत.सगळे दक्षिण महाराष्ट्रातील म्हणजे सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,सिंधुदुर्ग या जिल्ह्यातले आहेत.
वधुवरसंशोधन संस्थांमधील बर्याचशा मुली या पुणे,मुंबई,अौरंगाबाद,नाशिक अशा ठिकाणी चांगल्या पोस्टवर,चांगल्या पगारावर नोकर्या करणार्या आहेत.फार थोड्या मुली या १२ वी किंवा फक्त BA,B.com अशा आहेत.
जी समस्या सध्या सगळीकडे आहे तीच इथेही जाणवली.मुलींच्या अवाजवी अपेक्षा! मुलगी नको मुलगा हवा या हट्टाचे दुष्परिणाम हे आता असे समोर येत आहेत.
मुलगा इंजिनियर किंवा तसंच शिक्षण असणारा,मुंबई किंवा पुणे,बंगळूर अशा मोठ्या शहरात राहणारा,महिना किमान ४० हजारांवर पगार असणारा,स्वत:चा फ्लॅट असणारा हवा.अशा अपेक्षा आहेत या मुलींच्या!
चांगल्या पोस्टवर असणार्या,बर्यापैकी मिळवणार्या मुलींच्या अपेक्षा समजण्यासारख्या आहेत,पण १२ वी किंवा BA असं शिक्षण असणार्या जेमतेम पगार मिळवणार्या मुलींनादेखील लग्नासाठीचा मुलगा इंजिनियर किंवा तसंच एखादं ग्लॅमरस शिक्षण असणारा किंवा सरकारी नोकरी असणारा हवा आहे.
मुलींची वयं २९,३२,३४ झाली तरीही या अपेक्षा कमी होत नाहीत.
आपल्या जातीत कमी शिकलेल्या मुली मिळत नसतील तर दुसर्या जातीतील मुली करुन घ्या, हा ही सल्ला मुलांना देऊन झालाय.पण पौरोहित्य करणार्या किंवा छोट्या गावांमधे नोकरी करणार्या मुलांना किंबहुना त्यांच्या पालकांना पटणारा,रुचणारा नाही.कदाचित यामुळे त्यांच्या व्यवसायावर किंवा कुटूंबातील अन्य सदस्यांच्या विवाहात अडचणी येऊ शकतात.आंतरजातीय विवाहासाठी खरंतर प्रबोधन करायला लागेल पण सध्या तेवढा वेळ देणं शक्य नाही.कारण आधीच या मुलांची लग्नाची वयं उलटून चाललेत.
मग यावर बरंच डोकं खाजवून काही उपाय सापडले आहेत. ते असे,
१) भारतातल्या अन्य राज्यांमधेही ब्राह्मण समाज आहे.या राज्यांमधे भौगोलिकदृष्ट्या मागासलेले असे काही भाग आहेत.तेथील पालकांना आपल्या मुलींना फार खर्चिक शिक्षण देणं किंवा त्यांच्या विवाहावर फार खर्च करणं शक्य होत नाही.अशा भागातल्या या पालकांशी संपर्क साधून त्यांना अशा आंतरराज्यीय विवाहासाठी राजी करणे.अर्थात भाषा आणि काही प्रमाणात संस्कार वेगळे असणारंच पण हा काही फार मोठा इश्यु नसावा!
२) हल्ली नोकरीच्या निमित्ताने किंवा बदललेल्या जीवनशैलीमुळे रोजचं जीवन हे खुप दगदगीचं झालेलं आहे.बर्याचदा प्रसारमाध्यमांतून असं वाचायला,ऐकायला मिळतं की तिशीनंतर मुलींसाठी अपत्यप्राप्ती ही सहजसाध्य नसते.मग काही वेळा खर्चिक डॉक्टरी उपायांनंतर हे साध्य होतं. तर यात कितपत तथ्य आहे? हे जर सरसकट होत असेल,अपत्यप्राप्तीला असा विलंब हमखास होतंच असेल तर यासंबंधी शास्त्रीय माहिती मुलींना देऊन योग्य वयात विवाह करण्यासंबंधी त्यांचं प्रबोधन करावं.मतपरिवर्तन करावं
(यासंबंधी शास्त्रीय माहिती,लिंका इथे कोणी दिल्या तर आभारच!)
३) होणार्या नवर्याला तिशीच्या आतच गलेलठ्ठ पगार असावा अशी बर्याच मुलींची किंबहुना त्यांच्या आईवडीलांची तशी अपेक्षा असते.वाढलेली महागाई हे कारण त्यांच्याकडून पुढे केलं जातं.
आता ही महागाई कुठे भेडसावते?तर काही मुख्य गोष्टींमधे म्हणजे,
* मुलानं घर/फ्लॅट घेतला असेल तर त्याचा हप्ता,
* हल्ली प्रत्येक घरात किमान दुचाकी तरी असतेच त्यासाठी लागणारं पेट्रोल,किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास केल्यास होणारा खर्च.
* घरखर्च.
* होणार्या अपत्याच्या इंग्रजी माध्यामातल्या शिक्षणाचा खर्च.(त्यासाठी हल्ली खुप आधीपासून बचत करावी लागते!)
या सगळ्या खर्चांबाबत फक्त मुली त्यांचे पालक आणि एकुणच समाजाचं काही प्रमाणात प्रबोधनाचा प्रयत्न करणे.कारण बर्याचदा आपण आंधळेपणाने दुसरा तसं करतो म्हणजे आपणही(ऐपत,क्षमता नसताना) असं असंच केलं पाहिजे या सामाजिक दबावाला बळी पडतो.
४) काही असे कोर्सेस किंवा व्यवसाय ज्यांमधे आर्थिक प्राप्ती चांगली आहे पण त्यांना तितकसं ग्लॅमर नाही.उदा. ITI किंवा पौरोहित्य.
माझे पती ITI आहेत किंवा भटजी आहेत हे सांगण्यात मुलींना कमीपणा वाटतो.
दुर्दैवाने आताशा या ग्लॅमरस शिक्षणालाच जास्त महत्व आलंय.
काहीवेळा ITI झालेल्या व्यक्तीच्या नोकरीची स्थिरता अधिक असू शकते.
हा गैरसमज दूर करुन अशा कोर्सेसना,पौरोहित्याला ग्लॅमर यावं म्हणून प्रयत्न केले पाहिजेत.
५) पती-पत्नी दोघांनी मिळून कष्ट केले,विश्वास ठेवला,लग्नानंतरही सुरुवातीची काही वर्षे दोन्हीकडच्या पालकांनी थोडाफार आर्थिक,मानसिक पाठींबा या जोडप्याला मिळाल्यास पुढील वाटचाल सुसह्य होईल असा विश्वास निर्माण केला पाहिजे.
आता हे सगळे उपाय प्रत्यक्षात आणण्यासाठी काय काय करता येईल? किंवा अजून काही उपाय असतील तर तेही सुचवले जावेत.
आज हा प्रश्न ब्राह्मण समाजात प्रकर्षाने जाणवत असला तरी काही वर्षांनी इतर समाजातही जाणवू लागेल किंवा लागलाही असेल.इथे पुरोहितांना नाकारलं जातंय,इतर समाजात कदाचित शेतकरी मुलगा नाकारला जाईल.
एकंदरीत या प्रश्नाचा काही निकाल लागावा, परिस्थिती बदलण्यास मदत मिळावी यासाठी हा लेखनप्रपंच!
वर्गीकरण
वाचने
41246
प्रतिक्रिया
138
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारतातल्या अन्य राज्यांमधेही
अभ्यासाहेब
In reply to भारतातल्या अन्य राज्यांमधेही by अभ्या..
केअशु नवी भाषा शिकवण सोप का
In reply to अभ्यासाहेब by उपयोजक
केअशु नवी भाषा शिकवण सोप का
In reply to केअशु नवी भाषा शिकवण सोप का by माहितगार
फार वेळा चर्चिला गेलेला विषय
पाहिलाय.
In reply to फार वेळा चर्चिला गेलेला विषय by एस
इतर लोक कसे प्रयत्न करणार?
त्यांना "ग्लॅमर" नसून
In reply to इतर लोक कसे प्रयत्न करणार? by गॅरी ट्रुमन
दुर्दैव!
In reply to त्यांना "ग्लॅमर" नसून by आदूबाळ
आंतरजातीय लग्न करणे हा योग्य
नुकसानच?
In reply to आंतरजातीय लग्न करणे हा योग्य by पुंबा
नुकसान म्हणत नाही परंतू, फार
In reply to नुकसानच? by उपयोजक
सहमत
In reply to नुकसान म्हणत नाही परंतू, फार by पुंबा
दिवसेंदिवस हीच परिस्थिती बिकट
अभ्याशी सहमत.
अवास्तवच!
In reply to अभ्याशी सहमत. by रेवती
मोठी शहरे म्हणजे मेट्रो सिटीज
In reply to अवास्तवच! by उपयोजक
अपेक्षा
In reply to मोठी शहरे म्हणजे मेट्रो सिटीज by रेवती
प्रतिसाद आवडला पण लहान
In reply to अपेक्षा by उपयोजक
लहान शहरांमध्ये घरभाडे एका
In reply to प्रतिसाद आवडला पण लहान by रेवती
होय. ते माहितिये तरी किमती
In reply to लहान शहरांमध्ये घरभाडे एका by अभिजीत अवलिया
एकंदरीत या प्रश्नाचा काही
वाट पाहुया!
In reply to एकंदरीत या प्रश्नाचा काही by तेजस आठवले
निसटत्या बाजू
+११
In reply to निसटत्या बाजू by माहितगार
मुलांचे मागासलेपण ...
In reply to +११ by नया है वह
धागा
In reply to +११ by नया है वह
चकटफूच्या सूचना
धन्यवाद
In reply to चकटफूच्या सूचना by माहितगार
त्या शिवाय तुमच्या कडे अर्धा
In reply to चकटफूच्या सूचना by माहितगार
घरातच हे सगळं अनुभवलं
पिलियन रायडर
In reply to घरातच हे सगळं अनुभवलं by पिलीयन रायडर
माझ्या माहितीत एकीने असे केले
In reply to घरातच हे सगळं अनुभवलं by पिलीयन रायडर
हो!!
In reply to माझ्या माहितीत एकीने असे केले by अत्रे
पण एक महत्वाची गोष्ट.. ती
In reply to माझ्या माहितीत एकीने असे केले by अत्रे
ओळखीतल्या बर्याच मुलांच्या
धन्यवाद रुपी!
In reply to ओळखीतल्या बर्याच मुलांच्या by रुपी
२
In reply to धन्यवाद रुपी! by उपयोजक
थोड्याफार फरकाने बर्याच समाजांत ही समस्या भेडसावतेय ....
आंतरजातीय विवाह तरी कसे
In reply to थोड्याफार फरकाने बर्याच समाजांत ही समस्या भेडसावतेय .... by योगेश लक्ष्मण बोरोले
माझ्या मते ज्या मुलींची लग्ने
कोणावर उपकार करत आहोत अशी
In reply to माझ्या मते ज्या मुलींची लग्ने by अत्रे
अत्रे व खरे
In reply to कोणावर उपकार करत आहोत अशी by माहितगार
लेखक
In reply to कोणावर उपकार करत आहोत अशी by माहितगार
दोन वेगवेगळ्या प्रतिसादात
http://m.timesofindia.com
In reply to दोन वेगवेगळ्या प्रतिसादात by एमी
वय आणि प्रजननक्षमता यांचा
वैद्यकीय हिशेब बरोबर डॉ.
In reply to वय आणि प्रजननक्षमता यांचा by सुबोध खरे
माहित गार साहेब
In reply to वैद्यकीय हिशेब बरोबर डॉ. by माहितगार
आणि आजकाल तर भाडी
In reply to माहित गार साहेब by सुबोध खरे
स्वतःचे घर होईस्तोवर लग्न न
In reply to माहित गार साहेब by सुबोध खरे
परत एकदा धन्यवाद डॉ. साहेब!
In reply to माहित गार साहेब by सुबोध खरे
पण मुलींच्या अवास्तव मागण्या
In reply to परत एकदा धन्यवाद डॉ. साहेब! by उपयोजक
रेवती ताई सहमत!
In reply to पण मुलींच्या अवास्तव मागण्या by रेवती
डॉक, स्वतःचे घर नसलेल्या
In reply to माहित गार साहेब by सुबोध खरे
डॉक्टर साहेब धन्यवाद.
In reply to वय आणि प्रजननक्षमता यांचा by सुबोध खरे
खूप माहितीपूर्ण माहिती.
In reply to वय आणि प्रजननक्षमता यांचा by सुबोध खरे
माझ्या स्वतःच्या मुलीला किंवा
लाखभर रूपये पगार आणि
In reply to माझ्या स्वतःच्या मुलीला किंवा by सुबोध खरे
कोकणातील स्थळे
मुलगी नको मुलगा हवा या
सध्या महागाईचे प्रमाण खूपच
In reply to मुलगी नको मुलगा हवा या by अभिजीत अवलिया
परवाहून आलेल्या
In reply to सध्या महागाईचे प्रमाण खूपच by रेवती
माझा स्वतःचा खर्च मुंबईत
धन्यवाद डॉक्टरसाहेब.
In reply to माझा स्वतःचा खर्च मुंबईत by सुबोध खरे
काही मोठा खर्च राहिला असेल तर
In reply to माझा स्वतःचा खर्च मुंबईत by सुबोध खरे
बरेचजणांनी चांगले मुद्दे
नैसर्गिक न्याय व अक्कल
पूर्वी टका आणि मुवि यांचे असे
उत्पन्नाचा दुसरा स्रोतबद्दल
In reply to पूर्वी टका आणि मुवि यांचे असे by साधा मुलगा
होईल हो लग्न! असं तुम्हाला का
In reply to पूर्वी टका आणि मुवि यांचे असे by साधा मुलगा
चांगल्या वधुवर सूचक मंडळात
In reply to पूर्वी टका आणि मुवि यांचे असे by साधा मुलगा
खरे सर, इथे धागे काढून झैरात
In reply to चांगल्या वधुवर सूचक मंडळात by सुबोध खरे
हायला
In reply to खरे सर, इथे धागे काढून झैरात by अप्पा जोगळेकर
ज्या मुला किंवा मुलीचा चेहरा
In reply to चांगल्या वधुवर सूचक मंडळात by सुबोध खरे
ऍमी ताई
In reply to ज्या मुला किंवा मुलीचा चेहरा by एमी
एखादी सो कॉल्ड सुंदर नसलेली
In reply to ऍमी ताई by सुबोध खरे
प्रचंड सहमत!
In reply to एखादी सो कॉल्ड सुंदर नसलेली by पिलीयन रायडर
डॉक आणि पिरा दोघांशी असहमत.
In reply to ज्या मुला किंवा मुलीचा चेहरा by एमी
अर्थातच कुणी कुणाकडुन काय
In reply to डॉक आणि पिरा दोघांशी असहमत. by एमी
येस! कोण कोणासोबत कशासाठी
In reply to अर्थातच कुणी कुणाकडुन काय by पिलीयन रायडर
इथे बरेचजण लवकर लग्न करा
5 वर्ष डेटिंग करून लग्न
In reply to इथे बरेचजण लवकर लग्न करा by एमी
मागच्या पिढीतील हे "अपवाद"
In reply to इथे बरेचजण लवकर लग्न करा by एमी
तुम्ही नमूद केलेल्या
In reply to इथे बरेचजण लवकर लग्न करा by एमी
बोंबला! पाच वर्षात अंदाज नाही
In reply to इथे बरेचजण लवकर लग्न करा by एमी
(No subject)
In reply to बोंबला! पाच वर्षात अंदाज नाही by एमी
प्रतिसाद पूर्ण का दिसत नाहीय
In reply to (No subject) by एमी
you can live happily single
In reply to प्रतिसाद पूर्ण का दिसत नाहीय by एमी
लवकर लग्न आणि घटस्फोट
In reply to इथे बरेचजण लवकर लग्न करा by एमी
लवकर घटस्फोट हे बऱ्याचदा बरे
In reply to लवकर लग्न आणि घटस्फोट by रानरेडा
इतर समाजात हे प्रश्न नाहीत
खालच्या जातीत,तुमच्याकडे हे
In reply to इतर समाजात हे प्रश्न नाहीत by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
आंतरजातीय विवाह
In reply to खालच्या जातीत,तुमच्याकडे हे by सुबोध खरे
आश्चर्य हे आहे की सगळीकडे
आप्पा काय हे?
In reply to आश्चर्य हे आहे की सगळीकडे by अप्पा जोगळेकर
असेच असते साहेब. 'आम्ही काहीच
In reply to आप्पा काय हे? by अभ्या..
रिझनेबल
In reply to असेच असते साहेब. 'आम्ही काहीच by अप्पा जोगळेकर
त्यामुळे लग्न झालेल्या मुलीने
In reply to आश्चर्य हे आहे की सगळीकडे by अप्पा जोगळेकर
अर्रर्रर्र
In reply to त्यामुळे लग्न झालेल्या मुलीने by एमी
हाऊस वाईफ असण्यात किंवा तसे
In reply to अर्रर्रर्र by सुबोध खरे
मी हे फार पूर्वीपासून करतेय.
In reply to अर्रर्रर्र by सुबोध खरे
थोडं गणितबिणित शिकून घ्या >>>
In reply to मी हे फार पूर्वीपासून करतेय. by एमी
अट की अपेक्षा
In reply to आश्चर्य हे आहे की सगळीकडे by अप्पा जोगळेकर
+१
In reply to अट की अपेक्षा by उदय
माझा स्वतःचा अनुभव,
सॅड, त्या चुलत बहिणीचे लग्न
In reply to माझा स्वतःचा अनुभव, by नितिन५८८
विशेष म्हणजे
In reply to सॅड, त्या चुलत बहिणीचे लग्न by माहितगार
दागिने आणि पैसे परत केले हे
In reply to माझा स्वतःचा अनुभव, by नितिन५८८
माझ्या नातेवाइकान्पैकी एका
कोणाचे पैसे? स्वतःचे कि
In reply to माझ्या नातेवाइकान्पैकी एका by रामदास२९
माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेला किस्सा.
देवा आभारी आहे रे तुझा ....
सहमत.
In reply to देवा आभारी आहे रे तुझा .... by चौकटराजा
अामच्याच एका नातलगांबद्दल!
In reply to देवा आभारी आहे रे तुझा .... by चौकटराजा
मुलाचे आईवडील मुलाच्या नव्या
In reply to अामच्याच एका नातलगांबद्दल! by उपयोजक
"अरे आता मुलाचा/मुलीचा विचार
In reply to अामच्याच एका नातलगांबद्दल! by उपयोजक
धाग्यावर वाचनीय चर्चा झाली
नाती आणि हिशेब मिक्स करू नयेत
In reply to धाग्यावर वाचनीय चर्चा झाली by arunjoshi123
+१
In reply to धाग्यावर वाचनीय चर्चा झाली by arunjoshi123
चांगला धागा.
सुंदर. महाबळेश्वर वॅक्स
In reply to चांगला धागा. by हेमंतकुमार
जमल्यास॑ ...
In reply to चांगला धागा. by हेमंतकुमार
छान वाटतय वाचायला पण
In reply to चांगला धागा. by हेमंतकुमार
अपवाद
In reply to चांगला धागा. by हेमंतकुमार
मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत
आज व्यंगचित्रकार शि.द फडणीस यांचा वाढदिवस!
एकदम सुयोग्य
In reply to आज व्यंगचित्रकार शि.द फडणीस यांचा वाढदिवस! by उपयोजक
मी धड दहावी पास नाही, त्यात
समजूतदारपणा असेल दोन्ही कडे
In reply to मी धड दहावी पास नाही, त्यात by दशानन
वरती एका प्रतिसादात
मिडलक्लास
In reply to वरती एका प्रतिसादात by राही
यस आजही भागते...
In reply to वरती एका प्रतिसादात by राही
आणखी काही...
In reply to यस आजही भागते... by चौकटराजा
राही यांनी दिलेला प्रतिसाद
भारतात दरडोई उत्पन्न
In reply to राही यांनी दिलेला प्रतिसाद by रेवती
दोन आणि तीन लोकांच्या
In reply to भारतात दरडोई उत्पन्न by arunjoshi123
लग्न न जमण्याचं पाप