डंकर्क

पुष्करिणी's picture
पुष्करिणी in जनातलं, मनातलं
6 Jun 2010 - 3:02 am

डंकर्क हून लाखो ब्रिटीश - फ़्रेंच सैनिकांची जर्मनांच्या तावडीतून झालेल्या सहीसलामत सुटकेला काल ( ४ जून ) ७० वर्षं झाली, दुसया महायुदधाच्या घटनाक्रमातील एक अत्यंत महत्वाची घटना.
१९३९ पासून फ़्रेंच आणि ब्रिट्ननं जर्मनीविरूद्ध युद्ध पुकारलं. ब्रिटीश सैन्य फ़्रेंच हद्दीत तळ ठोकून बसलय आणि तिकडे जर्मन सैन्य युद्धाची कसून तयारी करतय अशी अवस्था..
१० मे ला चर्चिल पंतप्रधान झाले आणि जवळजवळ त्याच मुहूर्तावर हॉलंड,लक़्झंबर्ग आणि बेल्जियम वर जर्मनीचा हल्लाबोल झाला. ब्रिटीश सैन्य अर्डेन जंगलाकडं जर्मन सैन्याकडून काहीही विरोध न होता रवाना झालं आणि हाच एक पूर्वनियोजित सापळा होता, इकडे हजारो नाझी रणगाडॆ मित्रराष्ट्रांच्या सैनिकांची वाटच पहात होते. बेत असा की मित्रसैनिकांच्या तुकडयांना वेगवेगळं पाडून नंतर यथेच्छ सावकाश समाचार घेणे.
मध्यंतरीच्या काळात ब्रिटीश हवाइदलाचे पूल, रेल्वेलाइन्स उडवून नाझींची घोडदौड रोखायचे प्रयत्न चालू होते पण यानं जर्मन काही फ़ारसे बधत नव्हते कारण त्यांच्या कारवाइचा अतिप्रचंड वेग. मित्रसैनिकांच्या फ़ळ्या फ़ोडायला सुरूवात झालीच ...

German advance

ब्रिट्नच ७५ % सैन्य फ़्रेंच हद्दीत अड्कून पडलय आणि जर हिटलरची ब्रिटन्वर हल्ला करण्याची योजना सफ़ल झालीच तर लढायला सैन्यच नाही अशी अत्यंत आणीबाणीची परिस्तिथी पंतप्रधान्पद हाती घेतल्यावर पहिल्या आठवड्यांतच चर्चिल समोर आ वासून उभी ठाकली.जर जर्मनीनं फ़्रान्सची बंदरं ताब्यात घेतली तर समुद्रकिनायावरून सैन्याची सुटका करायच्या आपत्कालीन योजनेवर इकडे लंडन मध्ये १४ तारखेपासूनच पर्यायी उपाययोजनांवर तर्क वितर्क चालू झाले, व्हाइस एड्मिरल रामसेंच्या नेतृत्वाखाली ह्या योजनेला आकार द्यायला चालू झाला, अर्थातच वेळ खूप कमी. समुद्रकिनार्‍यावरून सैन्याची सुटका करायची हा एकमेव मार्ग पण समुद्रकिनार्‍याजवळ उथळ पाण्यात युद्धनौका नेणं तेही वरून बॉम्बफेक होत असताना पराकोटीच अशक्य होत. जनतेला सगळ्या वैयक्तिक मालकीच्या नावांची ची माहिती सरकारजमा करायच आवाहन केलं गेलं.

याचदरम्यान जनरल गोर्ट ( फ्रेंच हद्दीतल्या ब्रिटीश फौजेचे कमांडर ) ना फ़्रेंचांनी मोर्चा दक्षिणेकडे वळविण्याची विनंती केली पण ह्यात पूर्ण मित्रसैन्य जर्मन फ़ौजांनी वेढलं जाउन घात होण्याची दाट शक्यता होती आणि म्हणून जनरल गोर्टनी आपल्या सैन्याला २३ मे ला डंकर्क कडे मोर्चा वळ्वायची आज्ञा दिली आणि चर्चिल कडे तत्काळ मदतीची मागणी केली, चर्चिलचा माघार घ्यायला जोरदार विरोध होता पण जनरल गोर्ट् वास्तवाची जाणीव करून देउन निर्णयावर ठाम राहिला ...
पण हा परतीचा प्रवास अत्यंत अवघड होउन बसला, ब्रिटीश वायुदळ जर्मन सैन्याला कूच करायला अवघड जावं म्हणून पूल, रेल्वेलाइन उडवत होते पण आता त्यामुळं मित्रसैनिकांचा मागं येण्याचा मार्ग अजूनच खडतर झाला.
जर्मन वायुदळाची मात्र प्रचंड बॉम्बफेक चालू होती, आणि डंकर्क कडे जाण्याचा मार्ग तासागणिक दुष्कर होत चालला. पण २४ मे ला हिटलरनी नाझींच्या घोडदौडीला लगाम घातला आणि थांबायला सांगितलं( हा एक कलाटणी देणारा क्षण आणि वादाचा मुद्दा ).

या सगळ्या भानगडीत ब्रिटीश संसदेत आपण हिटलरशी बोलणी करून हे सगळ मिटवून घेउ असा सूरही दिसायला लागला, पण चर्चिलन व्हाइस ऎड्मिरल रामसे ना त्यांची योजना कार्यरत करायची प्रवानगी दिली, पुढच्या ३ दिवसांत जनतेच्या मालकीच्या (हौशी, लाइफ बोट्स, मासेमारीच्या नावा ) नावा ताब्यात घेउन त्यावरील अनावश्यक असं सगळं सामान काढून घेतल गेलं ( तितके जास्त सैनिक वाचतील म्हणून), योजना ४५००० सैनिकांची सुट्का समुद्रकिनायावरून छोट्या नावांतून खोल पाण्यात असणाया युद्धनौकेपर्य़ंत करणे अशी; अगदी टॅक्सी सर्व्हिस सारखी. शेकडो नावांची चाचणी घेण्यात आली आणि सुयोग्य अशा ( मच्च्छिमार बोटी, हौशी बोटी इ.) बोटी तयार करण्यात आल्या. पण सैन्यदलानं सामान्य नागरिकांना युद्धभूमीवर कायदेशिर रित्या घेउन जाता येत नाही म्हणून जागच्या जागी बोट्मालकांना नौदलात नोकरी दिली गेली. आंणि २६ मे ला, पंतप्रधानपद हाती घेतल्याच्या १६ व्या दिवशी संध्याकाळी साडेसहाला ऑपरेशन डायनॅमोचा 'आर या पार' असा चर्चिलनं श्रीगणेशा केला, नौदलाच्या नेतृत्वाखाली या छोट्या नावा सैन्याला वाचवायला रवाना झाल्या..

little ships

२ दिवसांत ४५००० जवानांची सुटका असं टार्गेट ठरलं गेल पण खाडीच्या पलीकडे साडेतीन लाखांनी अगोदरच मोर्चा डंकर्क कडे वळवला होता.सैनिकांकडं नकाशे नाहित, काही तुकड्या चुकून उलट्या दिशेकडे निघाल्या..प्रचंड गोंधळाच वातावरण पसरलं. सैनिकांजवळ्ची शस्रास्र्त जागे अभावी आणि जर्मनांच्या कामी येउ नयेत म्हणून परतीपूर्वी निकामी करण्याचे आदेश दिले गेले. दरम्यान जर्मनांनी सगळा बेत ओळ्खला आणि धुवांधार बॉम्ब्फ़ेक चालू झाली..प्रथमदर्शनी ठरवलेला मार्ग ( शॉर्ट्कट )बदलण्यात आला आणि लांबच्या मार्गान मोहिम रवाना करण्यात आली..
अन्नपाण्याविना २-३ दिवस चालून, वरून जर्मन विमानं बॉम्बिंग करतायत अशा अवस्थेत सैनिक या छोट्या बोटींची रांगेत वाट डोळ्यांत जीव आणून पहातायत, अशा वेळी शिस्त पाळली जावी म्हणून रांग मोडणार्‍याला जागीच गोळ्या मारण्याचे आदेश दिले गेले...

On job

queue
जर्मन फौजा घडोघडी पुढं सरकत होत्या, अशात अडीच लाखांवर ब्रिटीश सैनिक्म्ची सुटका झाली. यात बर्‍याच छोट्या नावा,वाट पहाणारे सैनिक जर्मन बाँम्ब ना बळी पडले..व्हाइअस अॅडमिरल रामसेच्या अंदाजानुसार ४ दिवसानंतर छोट्या नावा पाठवण अत्यंत अवघड होत पण फ़्रेंच सैनिकांसाठी आजून १ दिवस मोहिम चालवली आणि एकून जवळ जवळ साडेतीन लाख सैनिक सोडवले गेले. ४ जून ला पहाटे मोहिम संपली आणि सकाळी ९ ला जर्मनांनी डंकर्क ताब्यात घेतलं.
या सगळ्यात जवळजवळ ६५००० सैनिक मारले गेले, बरेच युद्धकैदी झाले, पण जे साडेतीन लाख सुटले त्यांच्या सुटकेत या छोट्या नावांचा सिंहाचा वाटा होता. बर्‍याच नावांनी आणि नाव चालक धारातीर्थी पडले. या सुटकेशिवाय ब्रिटनची ७५% आर्मीच सफाचट झाली होती.

सामान्य नागरिकांनी देशाच्या हाकेला ओ देउन केलेली खरी हिरोगेरी, परिस्थितीवर मात करण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि निर्णयक्षमतेला आजही म्हणूनच डंकर्क स्पिरीट म्हणतात.

* सगळ्यांच्या माहितीचा इतिहास आहे पण माझी 'वन ऑफ द फेवरेट' आहे ही घटना म्हणून लिहितेय..

* संदर्भः डॉक्युमेंट्री : 'बॅटल ऑफ ब्रिटन', 'लिटील शिप्स'
चित्र : आंतरजालावरून साभार,

इतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

6 Jun 2010 - 5:56 am | मुक्तसुनीत

सुरेख लिखाण.
असेच आणखी वाचायला उत्सुक आहे.

शुचि's picture

6 Jun 2010 - 6:22 am | शुचि

वा फारच सुंदर माहीतीपूर्ण लेख. इतिहासातील ही घटना म्हणजे इवल्याशा उंदरानी सिंहाला सोडवण्यासारखच आहे. म्हणजे त्या लहानशा होड्यांचा जीव किती पण त्यांनी किती भरीव आणि मोलाचा वाटा उचलला महायुद्धात : )
असे लेख मिपावर यावे. खूप आवडला. सोप्या शब्दात छान लिहीलाय.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

सहज's picture

6 Jun 2010 - 6:42 am | सहज

अजुन येउ द्या.

धनंजय's picture

7 Jun 2010 - 8:52 pm | धनंजय

अजून येऊ द्या.

अवलिया's picture

9 Jun 2010 - 5:00 pm | अवलिया

अजून येऊ द्या.

--अवलिया

स्वप्निल..'s picture

10 Jun 2010 - 12:54 am | स्वप्निल..

अजुन येऊ द्या .. वाचायला आवडेल

शिल्पा ब's picture

6 Jun 2010 - 7:01 am | शिल्पा ब

खुपच प्रभावी घटना...अशा प्रकारच अजून लिखाण येऊ द्यात.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

अभिषेक पटवर्धन's picture

6 Jun 2010 - 9:26 am | अभिषेक पटवर्धन

डंकर्क ही एक मोठीच घटना होती. विषेश म्हणजे जर्मनीने हे का होउ दीलं याच्याविष्यी बरेच तर्क वितर्क केले जातात. एक श्क्यता अशी की जर्मन आर्मीला सगळं श्रेय घेउ द्यायचं नाही म्हणुन लुफ्तवाफ ने हिटलरच मन धरणी केली. आर्मी पोहोचल्यावर राहीलेल्या त्या छोट्याश्या त्रिकोणात बॉम्बफेक करताना आर्मी चं खुप नुकसान होईल असा एक दावा लुफ्तवाफनी केला.
शिवाय, ब्रिटीश सैनिक एवढ्या संखेने मारले गेले तर ब्रिटनशी युध्ध अपरीहार्य होइल असाही एक तर्क जर्मनीने केला असावा. (हिटलरला स्वताला ब्रिट्नशी युध्ध नको होतं. फ्रान्स काबिज केल्यावरदेखील ब्रिटीशांशी युध्ध्बंदी करयचे प्रयत्न झाले. ब्रिटीश धैर्याचा महामेरु असलेल्या चर्चील या प्रयत्नाना पाने पुसली)
डंकर्क नंतर मायदेशी परतलेल्या आणि खचलेल्या ब्रिटीश फौजेमधे प्राण फुंकणारे चर्चील हेच शेवटी दुसर्या महायुध्धाचे शिल्पकार ठरले.
ब्रिटनच्या डंकर्क कडुन धडा घेण जर्मनीला जमलं नाही. जर्मन ६ वी आर्मी (जी जर्मनीची सगळ्यात मोठी फौज होती आणि जीने पॅरीसमधे एका विजयोन्मादात प्रवेश केला होता) माघार न घेतल्यामझाली रशीयन आघाडीवर संपुर्णपणे नष्ट झाली
शेवटी रुडेंस्डंड आणि मनस्टीनचे टॅक का थांबले याचं उत्तर गुढचं राहीलं. .

मस्त कलंदर's picture

6 Jun 2010 - 9:45 am | मस्त कलंदर

सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख!!!
अजुन येऊद्यात.

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

इन्द्र्राज पवार's picture

6 Jun 2010 - 9:46 am | इन्द्र्राज पवार

सुंदर आणि अभ्यासपूर्ण वर्णन.... हा इतिहास अगदी तोंडपाठ आहेच...पण तुम्ही म्हणता तसेच अजूनही मनात आहेच की, अशी काय घटना घडली असेल "हिटलर चेम्बर्स" मध्ये की, त्याने अचानक शेवटच्या हल्ल्यास जय्यत सज्ज असलेल्या आपल्या जनरल्सना आगेकूच थांबविण्याचे हुकूम दिले. दुसर्‍या महायुद्धातील हा फार मोठा डावपेचाचा भाग होता की, अचानक त्याच्या मनात या तीनसाडेतीन लाख सैनिकाबद्दल कणव निर्माण झाली? या एका विषयावर दोन्ही बाजुकडून उलटसुलट खुलासे पुस्तक रूपानी, चर्चा माध्यमातून पुढे येत असतात. फॉक्स हिस्टरी चॅनेलवर तर "डंकर्क..." यावर दोन तासाची एक डॉक्युमेंटरी आहे. पुष्करिणी यांनी दिलेल्या या माहितीमुळे ती फिल्म आठवली.... फार चांगले वर्णन केले आहे लेखिकेने या डंकर्क स्पिरीटचे !

शेवटी रुडेंस्डंड आणि मनस्टीनचे टॅक का थांबले याचं उत्तर गुढचं राहीलं. .

श्री. पटवर्धन यांच्या प्रतिक्रियेला पुढे नेत आहे....
युद्धशास्त्रसंबंधी इतिहासकारांनी आपापल्या परीने या "गूढा" चे रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे आणि आजही दुसर्‍या महायुध्दावर जिथे जिथे चर्चा चालू असते तिथे "डंकर्क पॉलिसी"चे टेबलवर येणे अपरिहार्य असते. बर्‍याच तज्ज्ञांनी यातील खरा कर्ता-करविता "गोअरिंग" असल्याचे म्हटले आहे ज्याला रुंड्स्टेंड आणि जनरल गुडेरियन हे विषय पोटदुखीचे वाटत होते. त्यावेळी असेही असेल की, हिटलरचा इतर जनरल्सपेक्षा गोअरिंगवर जास्त विश्वास असल्याने त्याच्या शब्दाला त्याने इतरांच्या आग्रहापेक्षा जास्त महत्व दिले. "सैनिक व चिलखत दल दमले असेल..." या सारख्या कल्पनांना हिटलरच्या लेखी जास्त महत्व कधीच नव्हते, कारण त्याला खात्री होती आपल्या सैनिकांच्या क्षमतेची. कदाचित असेही असेल की, त्याला डंकर्कशिवाय अन्य आघाड्यांकडे लक्ष देणे जास्त गरजेचे वाटले असेल.

काहीही असो, "डंकर्क" मधुन सुखरूप परत आलेले सैनिक पाहुन चर्चिलच्या अंगावर ढिगभर मांस चढले.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

बोका-ए-आझम's picture

2 Nov 2015 - 11:13 am | बोका-ए-आझम

डंकर्कच्या वेळी जर्मन सैन्याचं नेतृत्व करणारे सेनाधिकारी हे old Prussian guards म्हणजे थोडक्यात उच्चवर्गातले होते. ' आॅस्ट्रियन काॅर्पोरल ' हिटलरचे आदेश मानणं हा एक त्यांच्या शिस्तीचा भाग असला तरी मनोमन त्यांनी त्याला आपला नेता म्हणून स्वीकारला नव्हता. त्यामुळे जर डंकर्कच्या यशाचं श्रेय त्यांना मिळालं तर अापल्याला ते पुढे डोईजड होतील अशी भीती हिटलरला वाटत होती, म्हणून त्याने विश्वासातल्या गोअरिंगच्या हवाईदलाच्या मदतीने ब्रिटिश लष्कराला अडकवण्याची योजना आखली, जी सुदैवाने फसली.

अप्पा जोगळेकर's picture

6 Jun 2010 - 10:55 am | अप्पा जोगळेकर

छानच आहे लेख.


अचानक त्याच्या मनात या तीनसाडेतीन लाख सैनिकाबद्दल कणव निर्माण झाली?

हे खर वाटत नाही हो. तसच जर का असतं तर नंतर लाखो ज्यूंना तरी त्याने कशाला मारलं असतं ? आणि काही झालं तरी तो एक कर्त्व्यकठोर आणि लश्करी बाण्याचा माणूस होता.

जर्मन आर्मीला सगळं श्रेय घेउ द्यायचं नाही म्हणुन लुफ्तवाफ ने हिटलरच मन धरणी केली.
मागे एकदा आमच्या मराठ्यांच्या इतिहासात पण नाही का दमाजीराव, मल्हारराव आणि विंचूरकरांनी इब्राहिमखानाबाबत अशीच जळाऊ वॄत्ती दाखवली. तसंच काहीसं वाटतय.

इन्द्र्राज पवार's picture

6 Jun 2010 - 8:35 pm | इन्द्र्राज पवार

"...अचानक त्याच्या मनात या तीनसाडेतीन लाख सैनिकाबद्दल कणव निर्माण झाली?
हे खरं वाटत नाही हो.....

होय, हे मलाही (आणि बहुतांशी लोकांना... अर्थात ज्यांचा दुसर्‍या महायुध्दाविषयी अभ्यास आहे...) ते पटत नाही, पण "कणव" हा शब्द एका इंग्रजी संस्थळ चर्चेत एका वरिष्ट अधिकार्‍याने (अर्थात रिटायर्ड मिलिटरी...) वापरला... त्याचे पूर्ण वाक्य >> "I wonder whether it was due to one of those moments of compassion in his mind." यातील 'compassion' चा अर्थ मी "कणव" असा घेतला आहे.

रहस्यभेदाची सुई फिरूनफिरून "गोअरिंग" जवळ येऊन थांबते.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

ज्ञानेश...'s picture

7 Jun 2010 - 3:10 pm | ज्ञानेश...

याबद्दल एक तर्क असाही सांगीतला जातो, की हिटलर हा वंशाभिमानी होता आणि ब्रिटीश लोक आपल्याप्रमाणेच शुद्ध नॉर्डिक वंशाचे असल्याने उगाच आपला वंशर्‍हास करू नये, असे त्याला ऐनवेळी वाटले.
अर्थात, यात कितपत तथ्य आहे हे सांगता येणार नाही.

रामदास's picture

6 Jun 2010 - 11:06 am | रामदास

सुंदर लेख . आणखी येऊ द्या .
द लाँगेस्ट डे आणि फेटल डिसीजन्स यावर पण चार शब्द लिहा.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Jun 2010 - 11:29 am | बिपिन कार्यकर्ते

उत्तम लेख. अजून लिहा आवडत्या घटनांवर.

दुसरं महायुद्ध, हिटलर, चर्चिल, स्टालिन वगैरेंनी शाळकरी वयाचा एक मोठा भाग व्यापला होता. आठवणी जागवल्या तुम्ही.

बिपिन कार्यकर्ते

पुष्करिणी's picture

6 Jun 2010 - 10:45 pm | पुष्करिणी

सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद!

हिटलरनं जर्मन पायदळाच्या डंकर्क कडे होणार्‍या घोडदौडीला अचानक २४ मे ला लगाम घातल्याचे ४-५ अंदाज इतिहास तज्ञ वर्तवतात...अभिषेक पटवर्धन आणि इंद्रराज पवार यांची कारणं ही आहेतच..

* जर्मन वायुदळानं हिटलर ला असा विश्वास दिला की ब्रिटीश पायदळ संपवण आपल्या डाव्या हातचा मळ आहे, असं असताना कशाला पायदळाला उगाच कामी लावा..

* नाझी पायदळ १० मे पासून अव्याहत पणे लढत होतं, त्यांच्या ए़कंदरीत युद्धनीती प्रमाणं रणगाडे आणि पायदळ अतिशय वेगानं कूच करत असे आणि रसद, वैद्यकीय मदत नंतर येत असत्...या ठिकाणी रसदीची रेल्वे ( जी घोड्यांनी ओढली जायची ) ती फारच मागे राहिली आणि रसद टंचाइ सुरू होती, ती पोहोचायला वेळ मिळावा म्हणून...

*पायद्ळ आंणि रणगाड्यांची जास्त गरज दक्षिण फ्रांस मध्ये लागणार होती ( जी पुढची योजना होती ). डंकर्क हा भूभाग सपाट असला तरी ब्रिटीशांनी खणलेले चर आणि कालवे यांच प्रचंड जाळ होतं आणि रण्गाडे फारसे उपयुक्त ठरत नव्हते.

* हिटलर तर्फे हे एक 'गुडविल जेस्चर' होतं आणि त्याला परतफेड म्हणून ब्रिटन कडून शांतीप्रस्तावाची अपेक्षा होती .

* हिटलर आणि जर्मन नेतृत्वाला ब्रिटन असं काहीतरी करून आपल्या सैन्याला वाचवेल असं आजिबात वाटल नाही, त्यांच्यामते सुटकेची सुतरामही शक्यता नाही..शरणागती किंवा मरण याशिवाय अडकलेल्या सैन्यापुढे कोणताही मार्ग नव्हता...अर्थातच शत्रूला कमी लेखण्याची घोडचूक..

७२ तासांनी हिटलरनी हा आदेश मागं घेतला पण तोवर खूप उशीर झाला होता...आणि इथेच चर्चिल बाजी पूर्णपणे पलटवून खर्‍या अर्थांनं बाजीगर ठरला ...
पुष्करिणी

मदनबाण's picture

7 Jun 2010 - 9:51 am | मदनबाण

लेख आवडला... :)

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

निखिल देशपांडे's picture

7 Jun 2010 - 10:51 am | निखिल देशपांडे

सुंदर माहितीपुर्ण लेख
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

मन's picture

7 Jun 2010 - 10:56 am | मन

चित्र दर्शी आणि अचुक(टु द पॉइंट) लिखाण आवडलं.
डंकर्क प्रमाणेच दुसर्‍या महायुद्धाला कलाटणी देणार्‍या महत्वाच्या घटना आठवल्या......
१.रशियन आघाडीवरच्या सुरुवातीच्या अफाट घोडदौडीनंतर अचानक नाझींना बसलेला मार्शल झुकोव्ह चा "गळफास"
२.नाही त्या वेळी "पर्ल हार्बेर" वर हल्ला करायची जपानची खुमखुमी.
आखखा पर्ल हार्बर बर्बाद केल्यावरही तिथलं अतिमूल्यवान इंधन तसच सोडुन देण्याची जपानची चाल.
३.त्यात पुन्हा अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारण्याचं जर्मनीच (दु:)साहस
४."ओकिनावा" ची जीवघेणी लढाइ(ज्यामुळं अणु बाँब वापरण्यास अमेरिका बाध्य झाली.)
५.चिमुकल्या ग्रीसचा कणखर लढा(ज्यामुळं रशियन आघाडीला कुमक पाठवाय्ला जर्मनीला उशीर झाला;आणि सरतेशेवटी त्यांच्या सैन्याचा महासंहार.)
६.नॉर्मंडीचा दोस्त सैन्याचा प्रवेश
७.शेवटपर्यंत रशियाशी थेट युद्ध टळण्याची जपानची गूढ्/अगम्य भूमिका.(जर त्यांनी निर्णायक वेळी १९४१ च्या हिवाळ्यात एक दणका रशियाला दिला अस्ता तर जवळ जवळ आख्ख्य युध्द्याचा निकाल पालटु शकत होता.)

शिवाय "बॅटल ऑफ ब्रिटन" म्हणजे केवल डंकर्क ची घटना नसावी.
त्यानंतरही लंडनवरील बाँबहल्ल्याना ब्रिटिशांनी निडरतेने दिलेले तोंड म्हणजे ब्रिटिश धैर्याची यशोगाथा.

ह्या सगळ्यावरही एक एक लेख टाकत एखादी मालिका जमली, तर फारच बरं होइल.
आपलाच,
मनोबा

पुष्करिणी's picture

7 Jun 2010 - 7:38 pm | पुष्करिणी

तुमचं बरोबर आहे , बॅटल ऑफ ब्रीटन चा हा छोटा भाग आहे..

मी जमेल तसं इतर घटनांवर पण लिहायचा जरूर प्रयत्न करेन!

पुष्करिणी

धमाल मुलगा's picture

7 Jun 2010 - 8:29 pm | धमाल मुलगा

ह्यासोबतच रोमेलला रसद आणि कुमक न पाठवता रशियाच्या तेलसाठ्यांना हस्तगत करण्याची धडपड..असं म्हणलं जातं की, आफ्रिकेत अत्यंत यशस्वी ठरणार्‍या रोमेलला मदत पाठवली असती तर दुसर्‍या महायुध्दाचा चेहरामोहरा बदलला असता.

असो,
पुष्करिणी, प्रचंड छान लेख! खुप आवडला.
तुर्त इतकेच. :)

अवांतरः दुसर्‍या महायुध्दाचा विषय निघालाय..डॉ.दाढे...कुठे आहात तुम्ही? :)

Pain's picture

8 Jun 2010 - 10:26 am | Pain

२.नाही त्या वेळी "पर्ल हार्बेर" वर हल्ला करायची जपानची खुमखुमी.

जपानकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्यांनी जिंकून घेतलेल्या चीनच्या प्रदेशास अमेरिकेची मान्यता नव्हती. त्यांचा तेल आणि इतर गोष्टींचा पुरवठा बन्द केला होता. त्यांच्या राजाच्या मते हे योग्य नव्हते पण आर्मीचा वरचश्मा असलेल्या नेत्रुत्वास युद्ध करण्याचे खुमखुमी होती. या हल्ल्याची जबाबदारी असणार्‍या यामामोटोने स्पष्ट सांगितले होते, की ही लढाई आपण नक्की जिंकू पण युद्ध हरु. अमेरिकेची उत्पादनक्षमता त्यांच्या १० पट असल्याने कुठल्याही दीर्घकालीन चालणार्‍या युद्धात अमेरिका जिंकणार हे निश्चित होते.

आखखा पर्ल हार्बर बर्बाद केल्यावरही तिथलं अतिमूल्यवान इंधन तसच सोडुन देण्याची जपानची चाल.

त्यांना माहित नव्हते..अन्यथा सोडले नसते. खुद्द अमेरिकेचीही अशीच समजूत होती की ते तेल गेले. बदली होउन आलेल्य अ‍ॅडमिरल निमिझकडे सर्व नुकसानाचे रीपोर्टस होते. त्याच्यावर पर्ल हार्बर ची डागडूजी आणि पुढचा संभाव्य हल्ला कुठे होणार (मिडवे बेटे) हे ओळखून त्यासाठी तयारी करण्याची जबाबदारी होती. ते काम करत असताना अचानक त्यांना हे तेलाचे घबाड सापडले.

७.शेवटपर्यंत रशियाशी थेट युद्ध टळण्याची जपानची गूढ्/अगम्य भूमिका.(जर त्यांनी निर्णायक वेळी १९४१ च्या हिवाळ्यात एक दणका रशियाला दिला अस्ता तर जवळ जवळ आख्ख्य युध्द्याचा निकाल पालटु शकत होता.)

अ) चीनसोबत जपानने रशियाचाही काही भाग जिंकला होता पण रशियाने तो परत जिंकून घेतला होत, म्हणजे ते सोपे लक्ष्य नव्हते.
ब) हिवाळा हा सैन्याच्या हालचालीस अत्यंत गैरसोयीचा. जर्मनीचा रशियात पराभव होण्यामागे हे मह्त्वाचे कारण होते.

संदर्भः कमांडर विंटर हे पुस्तक.
रशियाची बिकट परिस्थिती जाणून घ्यायची असल्यास "enemy at the gates" ची पहिली १०-१५ मि. बघ

इन्द्र्राज पवार's picture

11 Jun 2010 - 9:16 am | इन्द्र्राज पवार

"...रशियाची बिकट परिस्थिती जाणून घ्यायची असल्यास "enemy at the gates" ची पहिली १०-१५ मि. बघ....

पहिली १०-१५ मिनिटेच का? संपूर्ण चित्रपटच अत्यंत प्रभावशाली झाला आहे. स्टालिनग्राडचा लढा अशी त्याची पूर्वपिठीका आहे... लाल सैनिक राहू दे, पण साधारण नागरिकानेदेखील आपल्या शहरासाठी कसा लढा दिला ते पाहणे रोचक आहे. रॅचेल वेझला भारतीय प्रेक्षक "मम्मी" मुळे ओळखतो, पण यातील तिची स्थानिक तरूणीची भूमिका लाजवाब आहे. ज्युड लॉ याला मी अगोदर "टॅलेन्टेड मि.रिप्ले" मध्ये पाहिला असल्यानेच सुरुवातीला "इनिमी..." ची डिव्हीडी त्याच्यासाठी घेतली होती, पण एकदा चित्रपट सुरू झाल्यानंतर समजले की, खरा हीरो आहे "स्टालिनग्राड" !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मृत्युन्जय's picture

7 Jun 2010 - 2:42 pm | मृत्युन्जय

एकावेळेस क्षमतेपेक्षा जास्त आघाड्यांवर युद्ध लढला हिट्लर. फाजील आत्मविश्वास आणी अती महत्वाकांक्षा यामुळेच त्याचा घात झाला असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

केशवसुमार's picture

7 Jun 2010 - 4:37 pm | केशवसुमार

मागच्या वर्षी डोव्हर चा किल्ला बघितला.. अतिशय अप्रतिम आहे.. ब्रिटीशांनी तिथे इतिहास अतिशय उत्तम रितीने जपला आहे.. तिथली भुयारी व्यवस्था तर अवर्णनीय आहे.. त्या किल्ल्यात त्या काळातील एक छोटे खानी फिल्म दाखवतात.. ती कन्ट्रोल रूम.. रामसे ची केबीन.. तिच्या खिडकीतून दिसणारा डोव्हर चा समुद्र किनारा .. तो जख्मी लोकांचा दवाखाना..दृकश्राव्य स्वरूपात तो इतिहास तुमच्या पुढे उभा करतात.. सगळे पाहून सुन्न झालो होतो..ते सगळ पुन्हा आठवले..

विकास's picture

7 Jun 2010 - 8:18 pm | विकास

लेख एकदम मस्त आहे.

यात हिटलर असे का वागला, नक्की काय झाले यावरून वर झालेल्या चर्चेतील माहीती पण रोचक आहे.

माझ्या लेखी त्याची काही कारणे असली तरी या प्रसंगातील सगळ्यात महत्वाचे आणि स्फुर्तीदायक काय असेल तर, पुष्करिणीच्या वाक्यातील, "सामान्य नागरिकांनी देशाच्या हाकेला ओ देउन केलेली खरी हिरोगेरी, परिस्थितीवर मात करण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि निर्णयक्षमतेला " डंकर्क स्पिरीट!

एखाद्या देशाचा/स्थल-कालाचा, इतिहास कसा घडतो हे त्या देशातील/काळातील केवळ नेतृत्वावरच नव्हे तर त्या जोडीला असलेल्या तितक्याच असामान्य जनतेवर देखील अवलंबून असते...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

चतुरंग's picture

7 Jun 2010 - 8:59 pm | चतुरंग

असामान्य धैर्य, सामान्य नागरिकांमध्ये असलेलं देशप्रेम आणि पराकोटीची शिस्त ह्या तीन गुणांवर राष्ट्र काय करु शकतं ह्याचं हे उत्कृष्ट उदाहरण ठरावे.

चतुरंग

डॉ.प्रसाद दाढे's picture

8 Jun 2010 - 9:16 am | डॉ.प्रसाद दाढे

लेख आवडला पुष्करिणी! डंकर्कची आठवण झालीच त्याबरोबर
सहा जून १९४४ ऑपरेशन ओव्हरलॉर्डचीही आठवण झाली.
मनोबांनी लिहिलेले सगळेच दुसर्‍या महायुद्धातले टर्निंग पॉईन्ट्स
आहेत. त्यात एल एलेमिनची लढाई, जर्मनीची आर्देन्स मधली
शेवटची चढाई, दोस्तांनी र्‍हाईन ओलांडणे आणि अखेरची
बर्लिनची लढाई हेही महत्वाचे टप्पे आहेत.
चिवटपणा आणि संकटात डगमगून न जाणे हे ब्रिटिशांचे गुण
आहेतच. दुसर्‍या महायुद्धात ते झळाळून उठले नसते तरच नवल.
आफ्टर ऑल इट वॉज देअर फाईनेस्ट अवर!!

वेताळ's picture

8 Jun 2010 - 10:29 am | वेताळ

हिटलरच्या एका चुकीपायी भारताला खुप मोठी किंमत चुकवावी लागली.भारतातील जनता हिटलरला कधी माफ करणार नाही.

वेताळ

Pain's picture

8 Jun 2010 - 10:44 am | Pain

पण या महायुद्धाने इंग्लंड दुबळे झाल्यामुळेच भारतासह इतर अनेक देशांना स्वातन्त्र्य मिळाले ना ? थोडा उशीर झाला एवढेच.

त्यात नेहरु सारखा रंगेल माणुस पंतप्रधान झाला. डंकर्क वर जर हिटलरने ब्रिटिश सैन्याची दाणादाण उडवली असती तर भारताचे पंतप्रधान सुभाषबाबु झाले असते व आजचे वर्तमान वेगळेच असते.
असो,डंकर्क वर वाचलेले ब्रिटिश नशीबवान नक्कीच होते.पण त्याचे कौतुक मला तरी वाटत नाही.
वेताळ

Pain's picture

8 Jun 2010 - 10:56 am | Pain

अस होय. बरोबर. सहमत!

शाम भागवत's picture

15 May 2016 - 8:46 pm | शाम भागवत

@ वेताळ,
निवडणूकीत हिंदूंना एका मताचा अधिकार असेल तर मुस्लिमांना दोन मतांचा अधिकार असला पाहिजे असे सुभाषबाबूंना वाटत असे हे आपणाला माहीत आहे का?

Pain's picture

8 Jun 2010 - 11:09 pm | Pain

शिवाय "बॅटल ऑफ ब्रिटन" म्हणजे केवल डंकर्क ची घटना नसावी.
त्यानंतरही लंडनवरील बाँबहल्ल्याना ब्रिटिशांनी निडरतेने दिलेले तोंड म्हणजे ब्रिटिश धैर्याची यशोगाथा.

चिवटपणा आणि संकटात डगमगून न जाणे हे ब्रिटिशांचे गुण
आहेतच. दुसर्‍या महायुद्धात ते झळाळून उठले नसते तरच नवल.
आफ्टर ऑल इट वॉज देअर फाईनेस्ट अवर!!

असामान्य धैर्य, सामान्य नागरिकांमध्ये असलेलं देशप्रेम आणि पराकोटीची शिस्त ह्या तीन गुणांवर राष्ट्र काय करु शकतं ह्याचं हे उत्कृष्ट उदाहरण ठरावे.
-------------------------------------------------------------------------

संवादाची दिशा चुकते आहे. असे फसू नका.
दुसरे महायुद्ध म्हणजे दांभिक ब्रिटनची अब्रू वेशीवर टांगली गेली ती वेळ.
आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, द. अमेरिका, खंडप्राय भारत आणि इतर अनेक देश ( मनुष्यबळ आणि साधनसंपत्ती) वर्षानुवर्षे दिमतीला असतानादेखील अमेरिका आणि रशियाची ऐन वेळी मदत झाली नसती तर हरण्याची नामुष्की आली असती. ते धैर्य नव्हते, कमरेचे वाचवण्याची केविलवाणी धडपड होती!
हिटलरची कृष्णकृत्ये वगळता कौतुक करण्यासारखे आहे ते जर्मनीचे..त्या नागरिकांचे. पहिल्या महायुद्धातील हानी भरून काढून कोणतीही वसाहत नसताना स्वतःच्या जीवावर इतका पराक्रम गाजवला. एखादा चांगला नेता असता आणि काही चुका टाळल्या असत्या तर जिंकलेही असते.

-------------------------------------------------------------------------

अवांतरः वरती लिहिलेल्या सगळ्या देशांमधे, खंडांमधे सत्ता मिळवण्यासाठी आणि स्वार्थासाठी ब्रिटनने गुलामगिरीत ढकललेली , शेकडो वर्षे छळलेली, संपुर्ण संस्कृती नष्ट करून देशोधडीला लावलेली, ठार मारलेली निरपराध माणसे आणि उण्यापुर्‍या ८ वर्षात (१९३६-१९४४) जर्मनीने मारलेले ज्यु यात जास्त संख्या कोणाची ? जड पारडे कोणाचे? खरे हैवान कोण ?

भारद्वाज's picture

9 Jun 2010 - 9:20 pm | भारद्वाज

पहिल्या महायुद्धातील हानी भरून काढून कोणतीही वसाहत नसताना स्वतःच्या जीवावर इतका पराक्रम गाजवला.

जर्मनीच्या प्रगतीबाबत शाळेच्या इतिहासाचे सर म्हणाले होते की 'दुसरं महायुद्ध केवळ जर्मनी करत होती...दोस्त राष्ट्रे अजुन पहिलंच महायुद्ध केल्यागत करत होती'

जय हिंद जय ब्राझील

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jun 2010 - 11:55 am | llपुण्याचे पेशवेll

पेनरावांशी सहमत आहे. पूर्णतः सहमत आहे. विषेशतः भारतात केल्या गेलेल्या 'बिज्यन' पद्धतीची हत्याकांडे किती क्रूर होती ते वाचल्यावर तर अधिक सहमत व्हावे लागते.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

वेताळ's picture

8 Jun 2010 - 11:02 am | वेताळ

जगातले सगळ्यात हराम म्हणजे हे ब्रिटिश लोक.ते शुर होते,ते वीर होते अशी विशेषणे लावुन त्याचे कौतुक जरा अतीच होते असे वाटते.ब्रिटीश हे जगातले नावाजलेले दरोडेखोर आहेत. बाकी काही नाही.

वेताळ

इन्द्र्राज पवार's picture

8 Jun 2010 - 1:35 pm | इन्द्र्राज पवार

श्री. पेन आणि श्री. वेताळ यांनी "ब्रिटिश" मनोवृत्तीबद्दल जे लिहिले आहे ते अत्यंत योग्य असे निरिक्षण आहे. हिटलर हरला म्हणून तो लगेच "क्रूरकर्मा" कारण ब्रिटिशधार्जिण्या मिडीयाने "ज्यू" सर्वनाशाची चित्रे प्रसृत केली. पण याच ब्रिटिशांनी भारतातील "जालियानवाला बाग" येथे जो काही धिंगाणा घातला होता.... (आणि अशाच प्रकारचा त्यांची सत्ता ज्या ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी)...त्यांच्या चित्रफिती आणि ज्यू विरूध्द हिटलर चित्रफितीमध्ये असे किती अंतर आहे?

शिवाय दुसरी एक बाब.... जर्मनीमध्ये हिटलर सत्तेवर येण्याच्या अगोदरही ज्यू लोकांच्या सामाजिक वर्तनावरून वादंग घडत होते.... आणि ज्या ज्यूंचा ज्याना कळवळा आला त्या खुद्द इंग्लंडने त्या जमातीला हीन दर्जाचीच वागणूक दिली होती. अगदी शेक्सपीअरसारख्या जागतिक पातळीवरील नाटककाराने "मर्चन्ट ऑफ व्हेनिस" मध्ये "शॉयलॉक" हा ज्यू सावकार कशा रितीने रंगवलाय? त्याच्या काळापासुनच्या जवळजवळ ब्रिटिश लेखकांनी आपल्या लिखाणातील "ज्यू" हे पात्र "काळे"च रंगविले आहे. मग तो सर वॉल्टर स्कॉटचा "इसाक" असो वा चार्ल्स डिकन्सचा ऑलिव्हर ट्विस्टमधील "फॅगीन" असो... ज्यू ना ट्रीटमेन्ट देण्याच्या बाबतीत दोन्ही राष्ट्रे (ब्रिटन आणि जर्मनी) एकमेकाशी हस्तांदोलनच करीत होती.

त्याबाबतीत हिटलरल्या दोष देताना त्याच विषयासाठी ब्रिटनला वगळून चालणार नाही.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

"द मर्चंट ऑफ व्हेनिस" हे शेक्सपियरचे नाटक "द ज्यू ऑफ व्हेनिस" या नावानेही ओळखले जात असे, आणि अगोदरच्या काळी या नावाने त्याचे काही प्रयोगही झालेले आहेत, असे कळते. याबद्दल अधिक माहिती देऊ शकाल काय?

त्याच्या काळापासुनच्या जवळजवळ ब्रिटिश लेखकांनी आपल्या लिखाणातील "ज्यू" हे पात्र "काळे"च रंगविले आहे.

फार कशाला, आपल्याकडे मारवाडी-बनिया-शेठची जनमानसातली सर्वसाधारण प्रतिमा याहून वेगळी नेमकी काय आहे?

घाऊक पातळीवर "दुसर्‍या"चा द्वेष करण्याची माणसाची वृत्ती तशी जागतिक असावी. (हे योग्य अर्थातच नाही, पण हे होते.) पण हिटलरने तिचा राष्ट्रीय धोरणाचा पाया म्हणून अवलंब केला आणि त्यावरून कृती घडवून आणली, घाऊक नरसंहार घडवून आणला. फरक तेथे आहे.

जलियांवाला बाग हत्याकांडाचे हे अर्थातच समर्थन नाही.

(बाकी 'काळी प्रतिमा', 'त्या दुसर्‍या' समाजाबद्दलची हीनत्वभावना किंवा तिरस्कार वगैरेंबद्दल बोलायचे झाले तर या भावना उभयपक्षी होत्या, असे तत्कालीन किंवा त्याच्या थोड्या आधीच्या काळातल्या युरोपीय ज्यू लेखकांचे साहित्य थोडेसे जरी वाचले असेल तरी लक्षात यावे. शोलोम अलैखेम या झारशाही रशियातील ज्यू लेखकाने आपल्या विविध लेखनातून केलेले रशियातील ज्यूंच्या जीवनाचे आणि वृत्तीचे वर्णन या दृष्टीने उद्बोधक ठरावे. किमानपक्षी, ते एके काळी वाचून माझी तरी तशी धारणा झाली होती.

हिटलरपूर्व युरोपात ज्यूंना मिळालेल्या वागणुकीचे, त्यांच्यावर वेगळ्या वस्तीत राहण्याकरिता झालेल्या जबरदस्तीचे, हीनत्वाच्या वागणुकीचे आणि एकंदरीतच छळाचे समर्थन करण्याचा हेतू अर्थातच नाही. हिटलरच्या कृतींचेही हे समर्थन नाही. या सगळ्याचे समर्थन होऊच शकत नाही. केवळ "आम्ही-श्रेष्ठ-ते-तुच्छ", "आमचे-नाक-वर" अशा प्रकारच्या भावना उभयपक्षी होत्या, मग ते ज्यू असोत किंवा जेन्टाइल, एवढेच मांडायचे आहे.

दोन विभिन्न समाज एका जागी आले, की त्यांच्यात हेवेदावे, उच्चनीचत्वाच्या भावना, प्रसंगी अगदी टोकाचा द्वेषसुद्धा, हे सर्व होणे हे नैसर्गिक असावे. अर्थात हे सर्व झालेच पाहिजे असे नाही, पण झाल्यास नवल नसावे. आणि अनेकदा होतेही. अशा वेळी परस्परसामंजस्यासाठी प्रयत्न करणे हे दोन्ही समाजांच्या हिताचे हे खरेच, पण हे दर वेळेस तातडीने होऊ शकतेच किंवा होतेच, असे नाही. ही स्थिती आदर्श जरी नसली, तरी जोपर्यंत परिस्थिती याहून अधिक चिघळत नाही, तोपर्यंत दोन्ही समाज त्या ठिकाणी सुखाने नाही तरी किमानपक्षी आपापले अस्तित्व टिकवून राहू शकतात. अशा परिस्थितीत अशा द्वेषभावना योग्य प्रकारे हाताळून त्यांचा मर्यादेबाहेर उद्रेक होऊ न देणे एवढे किमान करता येते, आणि जोपर्यंत ते होत असते तोपर्यंत पुढेमागे कधी परिस्थिती सुधारल्यास सामंजस्यासाठी प्रयत्न होण्याची आशाही बाळगता येते. प्रश्न तेव्हा निर्माण होतो, जेव्हा एक समाज दुसर्‍याचे (किंवा दोन्ही समाज एकमेकांचे) अस्तित्व पद्धतशीरपणे नष्ट करण्याचे प्रयत्न राबवू लागतो (किंवा लागतात). आणि त्यापेक्षाही वाईट म्हणजे अशा प्रयत्नांना जेव्हा प्रतिष्ठा किंवा सरकारमान्यता मिळते तेव्हा, किंवा खुद्द सरकार आपल्या अधिपत्याखालील एखाद्या समाजाचा नायनाट करू लागते तेव्हा.

परंतु जोपर्यंत असे टोकाचे काही होत नाही, तोपर्यंत केवळ द्वेषभावना असणे हे आम असावे. योग्य जरी नसले, तरी विशेषही नसावे.

अतिअवांतर आणि डिस्क्लेमर: शोलोम अलैखेमच्या 'तेव्या द डेअरीमन' या कथेवर 'फिडलर ऑन द रूफ' हा प्रसिद्ध चित्रपट बेतलेला आहे. हा चित्रपट मी पाहिलेला नाही. मात्र ही कथा असलेला एक कथासंग्रह फारा वर्षांपूर्वी वाचलेला आहे. तपशील आता फारसे आठवत नाहीत, आणि तो कथासंग्रह आता माझ्या संग्रहीही नाही. केवळ वीसबावीस वर्षांपूर्वी जे काही वाचले होते त्यावरून ज्या धारणा झालेल्या आठवतात, त्याच्या आधारावर हे सर्व लिहिले आहे. चुका असू शकतात. अभ्यासाचा कोणताही दावा नाही. इतरांची मते याहून पूर्णपणे भिन्न असू शकतात. असोत. ही सर्व माझी मते आहेत. (फॉर व्हॉटेवर दे आर वर्थ.) मांडावीशी वाटली, मांडली. या विषयावर याहून अधिक चर्चा माझ्याशी करून काही पदरी पडणे नाही, आणि यावर याहून अधिक चर्चा माझ्याकडून होणेही नाही. धन्यवाद.)

- पंडित गागाभट्ट.

इन्द्र्राज पवार's picture

11 Jun 2010 - 11:02 am | इन्द्र्राज पवार

"....दोन विभिन्न समाज एका जागी आले, की त्यांच्यात हेवेदावे, उच्चनीचत्वाच्या भावना, प्रसंगी अगदी टोकाचा द्वेषसुद्धा, हे सर्व होणे हे नैसर्गिक असावे. अर्थात हे सर्व झालेच पाहिजे असे नाही, पण झाल्यास नवल नसावे. आणि अनेकदा होतेही. ...."

तुमचा हा मुद्दा घेवून पुढील प्रतिसादात लिहित आहे :

मी जरी वाचलेले असले तरी "माईन काम्फ" चा संदर्भ देत नाही, कारण ते पुस्तक (अर्थातच) एकांगी आहे, पण असे असले तरी केवळ हिटलरच नव्हे तर पहिल्या महायुध्दातील पराभवानंतर आणि व्हर्सायच्या लाजिरवाण्या तहानंतर त्या पिढीतील प्रत्येक जर्मन ज्यू द्वेष्टा बनला होता. त्याला इतिहासातील काही घटना कारणीभूत होत्याच, जशा :
१. १९२० पासून १९३२ च्या युरोपमधील जागतिक मंदीच्या पट्ट्यात ज्यू लोकांनी (सावकारच होते ते...) ऑस्ट्रीया आणि जर्मनीमध्ये मोकाच्या ठिकाणी आपले बस्तान बसविले होते, जे जर्मन युवाला खटकत होते.
२. पराभूत जर्मनीमधील एक मोठा गट "व्हर्साय"चा तह घडवून आणण्यात ज्यू बॅन्कर्स कारणाभूत आहेत असे मानणारा होता.
३. "आर्यन रेस" ही श्रेष्ठ आहे असे ठाम मत असलेला एक जर्मन वर्ग होता, त्यांना ज्यूचे आपल्या देशातील आर्थिक वर्चस्व सलत होते.
४. अर्थात हिटलर ज्यावेळी म्हणत असे की, "जर्मनी मला स्वच्छ करायचा आहे.." त्यावेळी त्याच्या नजरेसमोर केवळ ज्यू च नव्हते, तर कम्युनिस्टही अग्रक्रमात होते तसेच हिंडेनबर्गच्या काळात फोफावलेला उदारमतवादी गट, होमोज, जिप्सी जमात आदी प्रकार होते आणि पुढे सत्तेत आल्यानंतर त्याने हे केलेच, पण हा विषय फार खोल आहे.

तूर्तास इतकेच.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

II विकास II's picture

9 Jun 2010 - 6:41 pm | II विकास II

शिवाय दुसरी एक बाब.... जर्मनीमध्ये हिटलर सत्तेवर येण्याच्या अगोदरही ज्यू लोकांच्या सामाजिक वर्तनावरून वादंग घडत होते.... आणि ज्या ज्यूंचा ज्याना कळवळा आला त्या खुद्द इंग्लंडने त्या जमातीला हीन दर्जाचीच वागणूक दिली होती. अगदी शेक्सपीअरसारख्या जागतिक पातळीवरील नाटककाराने "मर्चन्ट ऑफ व्हेनिस" मध्ये "शॉयलॉक" हा ज्यू सावकार कशा रितीने रंगवलाय? त्याच्या काळापासुनच्या जवळजवळ ब्रिटिश लेखकांनी आपल्या लिखाणातील "ज्यू" हे पात्र "काळे"च रंगविले आहे. मग तो सर वॉल्टर स्कॉटचा "इसाक" असो वा चार्ल्स डिकन्सचा ऑलिव्हर ट्विस्टमधील "फॅगीन" असो... ज्यू ना ट्रीटमेन्ट देण्याच्या बाबतीत दोन्ही राष्ट्रे (ब्रिटन आणि जर्मनी) एकमेकाशी हस्तांदोलनच करीत होती.

== ज्यु लोकांना मध्ययुगात कसे वागवत होते त्याच काही उल्लेख सापडले.

As previously mentioned in reference to the plague's sociocultural impacts, renewed religious fervor and fanaticism bloomed in the wake of the Black Death. Some Christians targeted "various groups such as Jews, friars, foreigners, beggars, pilgrims",[22] lepers[23][24] and Roma, thinking that they were to blame for the crisis. Lepers, and other individuals with skin diseases such as acne or psoriasis, were singled out and exterminated throughout Europe.[citation needed] Anyone with leprosy was believed to show an outward sign of a defect of the soul.[citation needed]

Differences in cultural and lifestyle practices also led to persecution. Because Jews had a religious obligation to be ritually clean they did not use water from public wells and so were suspected of causing the plague by deliberately poisoning the wells. Christian mobs attacked Jewish settlements across Europe; by 1351, sixty major and 150 smaller Jewish communities had been destroyed, and more than 350 separate massacres had occurred.

According to Joseph P. Byrne in his book, The Black Plague, women also faced persecution during the Black Death. Muslim women in Cairo became scapegoats when the plague struck.[25] Byrne writes that in 1438, the sultan of Cairo was informed by his religious lawyers that the arrival of the plague was Allah’s punishment for the sin of fornication and that in accordance with this theory, a law was set in place stating that women were not allowed to make public appearances as they may tempt men into sin. Byrne describes that this law was only lifted when “the wealthy complained that their female servants could not shop for food.”[16]

http://en.wikipedia.org/wiki/Consequences_of_the_Black_Death

Jews are burnt alive.
Jews are burnt alive.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

इन्द्र्राज पवार's picture

11 Jun 2010 - 11:24 pm | इन्द्र्राज पवार

आत्ताच वाचून काढली ही लिंक आणि त्यासमवेतचे साहित्य. फार अभ्यास करावा अशी माहिती आहे. जरूर खोलवर वाचेन. धन्यवाद विकास जी.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

अप्पा जोगळेकर's picture

8 Jun 2010 - 3:29 pm | अप्पा जोगळेकर

जगातले सगळ्यात हराम म्हणजे हे ब्रिटिश लोक.ते शुर होते,ते वीर होते अशी विशेषणे लावुन त्याचे कौतुक जरा अतीच होते असे वाटते.ब्रिटीश हे जगातले नावाजलेले दरोडेखोर आहेत. बाकी काही नाही.

अहो ब्रिटिश लोक नालायक असतील, क्रूर असतील पण त्यांच शौर्य नाकारण्यात काय अर्थ आहे ? वास्को-द-गामा, अल्फोन्सो द अल्बुकर्क,कोलंबस सारखे लुटारु दर्यावर्दी असोत किंवा हिटलर्, चर्चिल सारखे साम्राज्यवादी असोत ते शूर होतेच की.
मी तर म्हणेन की सिंधुबंदी आणि अटकबंदी सारख्या खुळचट प्रथा पाळणार्‍या आमच्या कूपमंडूक पूर्वजांपेक्शा ते कैक पट सरस म्हटले पाहिजेत.

तर भारताचे पंतप्रधान सुभाषबाबु झाले असते व आजचे वर्तमान वेगळेच असते.

ह्याची खात्री काय ?

फॉरवर्ड ब्लोक हा कम्युनिस्ट पक्ष होता हे लक्षात असू द्यावे.

डॉ.प्रसाद दाढे's picture

8 Jun 2010 - 9:03 pm | डॉ.प्रसाद दाढे

ब्रिटिशांनीही भारतावर अत्याचार केलेतच पण ब्रिटिशांच्या राज्यातच
टिळक, गांधी वा सावरकर इ राष्ट्रीय नेत्यांनी चळवळी केल्या, सरकार
विरोधी भाषणे, लेख इ आंदोलने केली. हे सर्व हिटलरच्या राज्यात; गेस्टापो आणि एस्.एस संघटनांच्या दहशतीच्या छायेत केवळ
अशक्य होते. जे कोणी नाझी राजवटीविरूद्ध सूर काढण्याची हिंमत
करेल त्याची रवानगी सरळ कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्येच होत होती. ब्रिटिश
निदान आपल्या नेत्यांशी वाटाघाटी करण्याचे सौजन्यतरी दाखवत होते. जनरल डायरवर ब्रिटिश संसदेत सणकून टीका झाली होती;
निषेध झाला होता (रादर चर्चिल यांनीच केला होता). हिटलर
त्यांच्या जागी असता तर त्याने डायरला आयर्न क्रॉस विथ ओक
लीव्ज बहाल केल्या असत्या.
माझी दिशाभूलही झालेली नाही व मी ब्रिटिशभक्तही नाही. पण
माझ्या मते हिटलरच्या टाचेखाली आलेल्या पोलंड, झेकोस्लोव्हाकिया
पेक्षा ब्रिटिश अंकीत भारतातले सामान्य नागरिकांचे जगणे पुष्कळच
सुसह्य होते. पुढे जाऊन मी असेही म्हणेन की ज्यांचे आजचे स्वकीय
राज्यकर्ते खुनी नराधम आहेत त्यांनी ब्रिटिशांच्या राजवटीबद्दल
काहीच बोलू नये. रॅम्से मॅकडोनाल्ड, अ‍ॅटली, चेम्बर्लेन, चर्चिल, बाल्डविन, लॉईड जॉर्ज हे निदान सुसंस्कृत सभ्य तरी होते, त्यांचे
आपल्या देशावर जीवापाड प्रेम होते..त्यांनी भारताला वा आफ्रिकेला
लुटले पण ते आपल्या राणीचे साम्राज्य श्रीमंत करण्यासाठी. ह्यांची तुलना आपल्या लालूप्रसाद, राबडी, अर्जुनसिंग, शिवराज पाटील, मायावती, छगन भुजबळ, नारायण राणे, रामदास आठवले, रमेश बागवे ह्यांच्याशी करण्याची हिंमतच होत नाही.
चर्चिलने पहिल्या महायुद्धात स्वखुशीने मंत्रीपद सोडून 'माझ्या
देशाला मंत्र्यापेक्षा सैनिकाची जास्त गरज आहे' असे म्हणून सैन्यात
पुनर्प्रवेश केला होता, प्रत्यक्ष रणांगणात दोन हात केले होते. आपल्या कुठल्या नेत्याच्या ** मधे एव्हढा दम आहे? अरे नुसते अंगरक्षकाशिवाय एक तास राहून दाखवा! ह्यांना अतिरेकी नाही, ह्यांनीच पूर्वी मुडदे पाडलेल्यांचे भाऊबंद चेचतील.
चर्चिलच्या देशभक्तीच्या आणि प्रामाणिकपणाच्या पुष्कळ गोष्टी देता येतील पण ही ती जागा नाही.

ब्रीटिश अजिबात साव नव्हते. मलाही त्यांची भलावण करायची नाहीये. पण ज्या गुणांमुळे ते मोठे झाले, एका टिचभर देशाने संपूर्ण जगाला पादाक्रांत करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली त्याला नाकारुन काय होते? त्यांची शिस्त, चिवटपणा, देशप्रेम हे गुण मान्यच करायला हवेत. त्यापासून आपल्याला काही शिकता आले तर बघायला हवे इतकेच.

चतुरंग

Pain's picture

8 Jun 2010 - 11:21 pm | Pain

त्यांचे गुण कोण नाकारतय ? नुसतीच महत्त्वाकांक्षा बाळगली नाही, तर प्रत्यक्ष जग जिंकून दाखवले. सिकंदरालाही जे जमले नाही ते सुर्य मावळत नसे असे राज्य त्यांनी बनविले.

मी म्हणतोय, अशा महाबलाढ्य आणि सामर्थ्यवान, वैभवाच्या ऐन शिखरावर असणार्‍या सत्तेस, चिमुरड्या जर्मनीने केवळ स्वतः च्या जीवावर चीतपट केलेच ना ? मग श्रेष्ठ कोण ?

धनंजय's picture

9 Jun 2010 - 6:47 pm | धनंजय

दुसर्‍या महायुद्धात जर्मनीने ब्रिटन-वगैरेंना चितपट केले नसून "जबरा शह दिला" असे म्हणणे सयुक्तिक ठरेल. (चितपट म्हणजे "अखेरचा विजय", शह म्हणजे "अतिशय धोका, पण सावरता येण्यासारखा". असा काही अर्थ मी घेतलेला आहे.)

दृष्टांत : हल्लीच श्री. चतुरंग यांनी आनंद विरुद्ध टोपालोव्ह बुद्धिबळाच्या सामन्यांचे वर्णन केले आहे. त्यात टोपालोव्हने कित्येकदा आनंदला शह दिला आहे. मात्र शेवटी आनंद विजेता घोषित झाला. टोपालोव्हच्या शहांवरून असे दिसते, की टोपालोव्ह उच्च दर्जाचा खेळाडू आहे, तरी शेवटी आनंद सध्यातरी टोपापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या उपमेने - दुसर्‍या महायुद्धात जर्मनीचे सैन्यबळ-सेनापती उच्च दर्जाचे होते असे डन्कर्कवरून दिसते. पण त्या महायुद्धात तरी शेवटी ब्रिटन जर्मनीपेक्षा श्रेष्ठ ठरले. दृष्टांतात काही खोट असल्यास जरूर सांगा.

Pain's picture

9 Jun 2010 - 10:27 pm | Pain

पण त्या महायुद्धात तरी शेवटी ब्रिटन जर्मनीपेक्षा श्रेष्ठ ठरले. दृष्टांतात काही खोट असल्यास जरूर सांगा.

तुम्ही सगळे मुख्य मुद्दा दुर्लक्षित करत आहात किंवा...असो.

ब्रिटन नव्हे, महाकाय अमेरिका आणि रशिया संयुक्तपणे चिमुकल्या जर्मनीविरुद्ध श्रेष्ठ ठरले.
ते आणि त्यांनी केलेली मदत नसती तर ब्रिटन तगही धरु शकले नसते (एवढ्या सगळ्या वसाहतींमधून वर्षानुवर्षे साधनसंपत्ती आणि मनुष्यबळ हडपूनसुद्धा).

Pain's picture

8 Jun 2010 - 11:14 pm | Pain

तुम्ही आपले फालतु भारतीय नेते कशाला मधे आणताय ?

तुलना ब्रिटीश आणि जर्मन लोकांची चालू आहे. मी शेवटी अवांतरमधे जे लिहिला आहे ते खोडता आले, किंवा अधिक माहिती देता आली तर पहा.

अवांतरः वरती लिहिलेल्या सगळ्या देशांमधे, खंडांमधे सत्ता मिळवण्यासाठी आणि स्वार्थासाठी ब्रिटनने गुलामगिरीत ढकललेली , शेकडो वर्षे छळलेली, संपुर्ण संस्कृती नष्ट करून देशोधडीला लावलेली, ठार मारलेली निरपराध माणसे आणि उण्यापुर्‍या ८ वर्षात (१९३६-१९४४) जर्मनीने मारलेले ज्यु यात जास्त संख्या कोणाची ? जड पारडे कोणाचे? खरे हैवान कोण ?

भारताचे उदाहरणच घ्या ना! ब्रिटिशांनी भारतातल्या कुठल्याही
अमुक एका जातीवर आणि तेही इतके भयानक अत्याचार केलेले
नाहीत. तेच नाझी जर्मनीने पोलंड, झेको आणि हॉलंडसारख्या
देशांत अक्षरशः धुमाकुळ घातला. ओल्हेनडॉर्फ, हायड्रिक, रुडॉल्फ ह्यॉस यासारख्या एसएस अधिकार्‍यांनी स्लाव्ह वंशी, ज्यू,
जिप्सींची लहान बाळे- वृद्धांसह कत्तली केल्या हे भयाण सत्य हिटलरच्या पराक्रमावर फिरलेला मोठा शेणगोळाच आहे.
तुम्हांला ब्रिटिश आणि जर्मनांची तुलना करायची आहे ना, मग आपल्या स्वातंत्र्य लढ्याचेच उदाहरण घ्या.
ब्रिटिश अंकित भारतात पारतंत्र्याविरूद्ध अनेक आंदोलने चालू
होती. कुणी अहिंसेने तर कुणी हिंसेने इंग्रजांना विरोध करत होते.
पण त्याविरोधात जर्मनांच्या तुलनेत इंग्रज सरकार सहिष्णू वर्तणूक
दाखवित होते. रीतसर अटक आणि खटला भरून शिक्षा होत होत्या.
तर कधी काँग्रेस नेत्यांना सरकार चालविण्याची संधीही मिळत होती.
अनेक न्यायाधीश, नोकरशहा, वकील एतद्देशीय होते. त्याचवेळीस
जर्मनीने मात्र अश्याप्रकारची वागणूक पोलिशांना वा स्लाव्ह लोकांना
दिल्याचा उल्लेखही कुठे आढळत नाही. उलट जनावरापेक्षाही हीन
दर्जाची वागणूक त्यांना दिली गेली. कुणी बंड वा जर्मन अधिकार्‍याची हत्या केली तर नाझी कामालीच्या क्रौर्याने ते बंड चिरडीत असत. प्राग शहरात सत्तावीस मे१९४२ ला झालेल्या हायड्रिकच्या खुनानंतर नाझींनी लिडिसे गावातल्या सर्व पुरूषांच्या कत्तली करून गावच्या गाव भस्मसात केले होते. तेच ब्रिटिशांनी रॅन्डचा वध चाफेकरांनी केला म्हणून सगळे पुणे जाळले नाही.
परदेशी विरोधक सोडा हो पण स्वदेशी, अस्सल जर्मन
विरोधकांशी व एकेकाळच्या सहकार्‍यांशी हिटलर कसा वागला हे आपणांस ठाऊक नाही का? 'नाईट ऑफ लॉन्ग नाईव्ह्ज' ह्या नावाने इतिहासात कुख्यात असलेल्या तीस जून १९३४ च्या हत्त्याकांडाची माहिती तुम्हांला असेलच.
ब्रिटिश नालायक होतेच पण जर्मनांपेक्षा बरेच बरे होते हे लक्षात
घेतले पाहिजे.
याविषयावर आणखीही बरेच लिहिता येईल पण विस्तारभयापोटी व
वेळेअभावी थांबायला लागते आहे.

Pain's picture

9 Jun 2010 - 1:46 am | Pain

तुम्ही नमूद केलेले भारतीय लोक (जर्मनीतील ज्यू लोकांप्रमाणे) ब्रिटनमधे राहात नव्हते आणि त्यांचा मूळ ब्रिटीश जनतेला काहीही उपद्रव होत नव्हता..उलट फायदाच होत होता.

तसेच तुम्ही जर्मनीच्या सर्व घटना आणि ब्रिटनची एकच घेउन पक्षपात करत आहात. मी एकूण संख्या/हानी याच्या बेरजेबद्दल बोलत आहे (summation sign). तसे पाहिल्यास ब्रिटीश जर्मनीच्या कितीतरी पट वाइट ठरतात.

मैत्र's picture

9 Jun 2010 - 1:32 pm | मैत्र

सर्वच आक्रमक -- ब्रिटीश, हिटलर, पोर्तुगीज, स्पॅनिश, जपानी हे स्थानिकांशी क्रूरपणे वागले आहेत. त्यात वरखाली काय करायचं.
फक्त ब्रिटीश हे थोडे फार बरे कारण त्यांना वसाहती करायच्या होत्या. शेवटी त्यांचा व्यापार आणि फायदा त्यांना महत्त्वाचा वाटला आणि जगभर साम्राज्य प्रस्थापित करणं.
तसा पहायला गेला तर संपूर्ण मध्ययुगीन इतिहास हा क्रूर घटनांनी भरलेला रक्तरंजित आहे. खुद्द टॉवर ऑफ लंडन मध्ये किती राजे राण्यांचा शिरच्छेद केला गेला याची मोठी यादी आहे.
जे स्कॉटलंड आज ब्रिटनचा भाग आहे त्याची राणी मेरी आणि विलियम वॉलेसला इंग्लिश लोकांनी केवळ क्रूरपणे मारले. अमेरिकेतल्या स्थानिकांना आणि काळ्या लोकांना, गुलामांना ज्या सहजतेने मारून टाकायचे त्याला सुमार नव्हता. फक्त तो गोर्‍यांच्या हद्दीत आला, त्याने रागाने पाहिले असे गुन्हे ठार मारायला पुरेसे होते.
पोर्तुगीज आक्रमकांनी ब्राझील आणि त्याच्या आजू बाजूची संस्कृती / मनुष्य संख्या जवळ जवळ संपुष्टात आणली.

पण तरीही ते सर्वथा वाईट होते असे नाही. त्यांनी आपल्या फायद्यासाठी वसाहतींचा विकासही केला. जमवून घेणार्‍यांशी ते काही प्रमाणात सभ्यपणे वागले.
जर्मन मात्र प्रत्येकच इतर वंशीयांशी भयाण पद्धतीने वागले.
ऑशवित्झ च्या कँप मध्ये केलेले वैद्यकीय प्रयोग हे होलोकास्ट पेक्षाही भयानक होते.
तुलना काय करायची - दगड आणि विटेची ? जर्मन समेशन थोडं कमी पडलं कारण ते जिंकले नाहीत आणि त्यांनी जगावर राज्य केलं नाही. तसं झालं असतं तर काही वंश नामशेष झाले असते कदाचित.

डंकर्क च्या घटनेत असंख्य सामान्य लोकांनी छोट्या बोटींच्या अनेक फेर्‍या करून सैनिकांना परत आणलं आणि यातले बरेच लोक शेवटी जर्मन वायुहल्ल्यत बाँब किंवा गोळ्यांना बळी पडले.
इतके लाख सैनिक परत आणले हा तर सत्य इतिहास आहे आणि असामान्य आहे हे तर नाकारता येणार नाही.

पुष्करिणी उत्तम लेख -- ६ - ६ - १९४४ -- डी डे बद्दल ही लिहा...

Pain's picture

10 Jun 2010 - 1:13 am | Pain

थोडस ? काही पट कमी आहे.

इतके लाख सैनिक परत आणले हा तर सत्य इतिहास आहे आणि असामान्य आहे हे तर नाकारता येणार नाही.

Try to look at the big picture. वास्तविक ते स्वतः ला समजायला हवे, किमान कोणीतरी सांगितल्यावर तरी कळायला हवे.
आपलेच दळण दळायचे असले तर आनंद आहे.

D-Day ची माहिती हवी असल्यास Saving Private Ryan चा पहिला अर्धा तास बघा.

मैत्र's picture

10 Jun 2010 - 10:16 am | मैत्र

वास्तविक ते स्वतः ला समजायला हवे, किमान कोणीतरी सांगितल्यावर तरी कळायला हवे.
आपलेच दळण दळायचे असले तर आनंद आहे.

-- तुमच्याकडून थोड्या चांगल्या शब्दांची अपेक्षा आहे.
आपणही आपलेच दळण दळता आहात.
मत वेगळं आहे म्हणून कोणीतरी सांगितल्यावर समजायला हवे असेल तर इतर चार पाच लोकांनी तुमच्यापेक्षा वेगळे मत प्रदर्शित केले आहे एवढ्या कारणावरून तुम्ही आपलं मत का नाही बदलत ?

इतिहास जेते लिहितात हे खरेच. तेव्हा तो ब्रिटिश बाजूने लिहिला गेला. त्यामूळे ब्रिटीश ते चांगले आणी जर्मन ते वाईट असे नाही हे मान्य. पण ब्रिटीश हे जर्मन आक्रमकांपेक्षा प्रचंड वाईट, क्रूर, वंशवादी इ. म्हणणे हेही टोकाचे. म्हणून म्हटलं की दगड आणि विट -- थोडे मऊ आणी कठीण... डोक्यात घातले की लागायचेच..
माझं तर हेही मत आहे की अमेरिकेत झालेला जीनोसाईड्स हे खरे तर ब्रिटीशांनीच केले. कारण बहुसंख्य अमेरिकन आणि सत्ताधारी अमेरिकन - ज्यांनी स्टेट्स वसवली ते ब्रिटीशच होते...
म्हणून जर्मनी - हिटलर - गेस्टापो यांचं क्रौर्य कमी होत नाही.

Saving Private Ryan च्या सुरुवातीचे नॉर्मंडी लॅंडीग सिनेमा भारतात रिलीज झाला तेव्हाच पाहिले आहे. D-Day -- 6-6-1944 असे एक फोटोंनी भरलेले पुस्तक मिळाले होते काही वर्षांपूर्वी...

पुष्करिणी काही लिहित आहेत तेव्हा त्यांना अजून एक घटना सजेस्ट केली (मराठी ?).

ते जवळ जवळ हिटलर सत्तेत असे पर्यतच होते.त्या आधी किंवा नंतर जर्मनी ने सार्वत्रिक मनुष्यहत्या खुप कमी प्रमाणात केल्या होत्या. हे ब्रिटन बाबत लागु होत नाही.त्याचा जवळ जवळ सर्व इतिहास खुन करणे ,सार्वत्रिक दरोडे घालणे ह्यातच गेला आहे.
वर उल्लेखलेले दर्यावर्दी हे दुर देश शोधण्यासाठी फक्त गलबते घेवुन बाहेर पडले हा दावा हास्यास्पद आहे.त्याच्या सर्व सागरी मोहिमा फक्त दुर देश शोधुन त्यातील संपत्ती लुटुन आपल्या राणीचा झगा भरण्यासाठीच आखल्या गेल्या होत्या.युरोपात हा ट्रेण्ड ब्रिटिशानी सुरु केला.
अशिया हा सांपत्तिक दृष्ट्या पुढारलेला भाग लुटण्यात ब्रिटिशाचा मोठा हात आहे.अफ्रिका सारखा निसर्गाने समृध्द भाग देखिल त्यानीच बरबाद केला.इतर देशाच्या साधनसंपत्तीची वाट ह्याच लोकानी लावली.भारतातील तर अमर्याद संपत्ती ब्रिटिशानी लुटुन नेली.भारतातील स्वयंपुर्ण खेड्याची वाताहात ह्यानीच केली.
कित्येक देशाना त्यानी १०० वर्षे मागे नेले. तसेच त्यानी आपल्या सर्व वसाहती मध्ये आपल्याला सोयिस्कर अशीच शिक्षणपध्दती लागु केली.त्यात जे विचारवंत तयार झाले त्याना ब्रिटिश हे सज्जन व शुर हेच शिकवले गेले. बाकी देश त्यात जर्मनी,रशिया,फ्रान्स,इटली इत्यादी देश म्हणजे खलनायक हे ठसवले गेले. हेच आपण आता पहात आहे.

वेताळ

Pain's picture

10 Jun 2010 - 8:23 pm | Pain

तुमचे बरोबर आहे. पण आता संपादनाची सुविधा नाहीये.

आणि लोक माझा मुद्दाच लक्षात घेत नाहियेत. सगळे जण जर्मन कसे क्रूर होते त्याचे वर्णन करत आहेत जणु काही मी त्यांना सज्जन, पापभीरू म्हणतोय. वैतागलो होतो.

डॉ.प्रसाद दाढे's picture

9 Jun 2010 - 8:36 pm | डॉ.प्रसाद दाढे

मी कुठलाही पक्षपात करीत नसून एकंदरीत सूरावरून तुम्हाला
हिटलर व गेस्टापोच्या क्रौर्याबद्दल चकार शब्दही काढावासा वाटत
नाही हे स्पष्ट होत आहे. ह्यावरून पेनमहाशय जर्मनीचा (उगाचच) कैवार घेत असल्याचे निदान भासत तरी आहे.
तुमच्याकडे ब्रिटिशांनी अंकित केलेल्या देशांतील हत्त्येचा
आकडा व त्याचा विश्वासार्ह स्त्रोत असेल तर सादर करा.
मला इंग्रजांचा पुळका नाही पण जर तुम्ही जर्मनांशी तुलना
करत असाल तर क्रौर्याच्या मानाने ब्रिटिश बरे इतकेच माझे म्हणणे आहे. इंग्रजांनीही कृष्ण-कृत्ये केलेली आहेतच पण जेव्हढा द्वेष आणि त्वेष नाझींना ज्यू व इतर तथाकथित निम्नवंशियांबद्दल होता व त्या द्वेषाचे
रूपांतर योजनाबद्ध कत्तलींमध्ये जसे केले गेले तसे तर ब्रिटिशांनी केलेले
दिसत नाही. तुम्हांला ठाऊक असेल तर सादर करा, आम्हांलाही
माहिती मिळेल. ब्रिटिशांच्या राज्यात टिळक-गांधी जिवंत तरी राहू
शकले, हिटलरच्या राज्यात जन्मसिद्ध हक्कबिक्क मागणार्‍यांना त्वरित
फायरिंग स्क्वॉडपुढे उभे केले असते.
कुठलाही विजेता देश वा आक्रमक जितांशी कश्यापद्धतीने वर्तणूक करतो ह्यावरून त्यांच्या सुसंस्कृतपणाचे व मानसिकतेचे मूल्यमापन
केले जाते. तुम्हांला भारतियांचे उदाहरण नको असले तरी ब्रिटिशांची
भारतीयांप्रती वर्तणूक आणि जर्मनांची पोलिशांप्रती वर्तणूक यांची तुलना
केल्यास ब्रिटिशच बरे ठरतात.
दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे ब्रिटिशांकडे संसदीय लोकशाही होती तर हिटलरची एकाधिकारशाही होती.
त्यामुळेच इंग्रजांची गुलामी ही नाझी गुलामगिरीपेक्षा सुसह्य होती.

तुम्ही नमूद केलेले भारतीय लोक (जर्मनीतील ज्यू लोकांप्रमाणे) ब्रिटनमधे राहात नव्हते आणि त्यांचा मूळ ब्रिटीश जनतेला काहीही उपद्रव होत नव्हता..उलट फायदाच होत होता.

तुम्हांला वरील विधानातून निश्चित काय सांगायचे आहे? जर्मनीतले
ज्यूंनी व त्यातही तान्ह्या बाळांनी हिटलरचे असे काय घोडे मारले
होते वा उपद्रव होता ज्यासाठी त्यांची इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आली? ह्यासगळ्या होलोकॉस्टवर तुमचे काय समर्थन आहे?
जे ज्यू जर्मनीत व युरोपातल्या देशांमध्ये पिढ्यानपिढ्या वास्तव्य
करून होते, ज्यात अनेक बुद्धिमान शास्त्रज्ञांचा (आईनस्टाईन) समावेश होता, अश्या एका समाजाचाच पूर्णपणे नि:पात करण्याचा विडा उचललेल्या हिटलरला विकृत हैवान का नाही म्हणायचे?

मी कुठलाही पक्षपात करीत नसून एकंदरीत सूरावरून तुम्हाला
हिटलर व गेस्टापोच्या क्रौर्याबद्दल चकार शब्दही काढावासा वाटत
नाही हे स्पष्ट होत आहे. ह्यावरून पेनमहाशय जर्मनीचा (उगाचच) कैवार घेत असल्याचे निदान भासत तरी आहे.
तुमच्याकडे ब्रिटिशांनी अंकित केलेल्या देशांतील हत्त्येचा
आकडा व त्याचा विश्वासार्ह स्त्रोत असेल तर सादर करा.

चकार शब्द ? मी संपुर्ण ८ वर्षे मोजलेली आहेत. मी केलेल्या प्रत्येक तुलनेत त्याचा उल्लेख आहे. खरे आरोप करता आले तर पहा.

नाझी लोकानी केलेले अत्याचार हे अगदी अलीकडील असल्याने त्याची साद्यंत माहिती मिळते. ब्रिटीशांची कारकीर्द २००-२५० वर्षापुर्वीच सुरु झाल्याने विस्त्रुत माहिती माझ्याकडे नाही. पण उदाहरणादाखल- त्यांनी सुरु केलेला गुलामांचा व्यापार ( मिसळपाववरच काहि महिन्यांपुर्वी १ लेख आणि फोटो आले होते) त्याचे परिणाम अमेरिकेतील वंशभेद आणि यादवी .


मला इंग्रजांचा पुळका नाही पण जर तुम्ही जर्मनांशी तुलना
करत असाल तर क्रौर्याच्या मानाने ब्रिटिश बरे इतकेच माझे म्हणणे आहे. इंग्रजांनीही कृष्ण-कृत्ये केलेली आहेतच पण जेव्हढा द्वेष आणि त्वेष नाझींना ज्यू व इतर तथाकथित निम्नवंशियांबद्दल होता व त्या द्वेषाचे
रूपांतर योजनाबद्ध कत्तलींमध्ये जसे केले गेले तसे तर ब्रिटिशांनी केलेले
दिसत नाही.

ब्रिटीशांच्या अमलाखालील अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, भारत, चीन आणि आग्नेय आशिया यांचा निव्वळ भौगोलिक विस्तार, लोकसंख्या आणि सारासार विवेक एवढेच पुरेसे आहे.
एका माणसाला क्रौर्याने मारणे < १०० माणसांना पिढीजात गुलामगिरीत ढकलणे

ब्रिटिशांच्या राज्यात टिळक-गांधी जिवंत तरी राहू
शकले, हिटलरच्या राज्यात जन्मसिद्ध हक्कबिक्क मागणार्‍यांना त्वरित
फायरिंग स्क्वॉडपुढे उभे केले असते.

जे जितके त्रासदायक ठरले त्यांना त्या प्रमाणात शिक्षा दिल्या- क्रांतिकारकांना फासावर लटकविले, टिळक-सावरकरांना काळे पाणी (आणि गांधी ? असो. तो वेगळा मुद्दा आहे)

तुम्हांला भारतियांचे उदाहरण नको असले तरी ब्रिटिशांची
भारतीयांप्रती वर्तणूक आणि जर्मनांची पोलिशांप्रती वर्तणूक यांची तुलना
केल्यास ब्रिटिशच बरे ठरतात.

तुम्ही नमूद केलेले भारतीय लोक (जर्मनीतील ज्यू लोकांप्रमाणे) ब्रिटनमधे राहात नव्हते आणि त्यांचा मूळ ब्रिटीश जनतेला काहीही उपद्रव होत नव्हता..उलट फायदाच होत होता.

तुम्हांला वरील विधानातून निश्चित काय सांगायचे आहे?

ज्यू आणि जर्मन लोकांमधे तणाव होता. तरिहीहोलोकास्ट, बालहत्या वाईटच. समर्थन कोण करेल ?
पण ब्रिटीश-->भारतीय आणि जर्मन्-->ज्यू ही तुलनाच चुकिची आहे. ब्रिटीश -->स्कॉट्लंड-वॉलेस ही तुलना योग्य आहे.

आणि तान्ही बाळे जालियनवाला बागेतही मेली.

जे ज्यू जर्मनीत व युरोपातल्या देशांमध्ये पिढ्यानपिढ्या वास्तव्य
करून होते, ज्यात अनेक बुद्धिमान शास्त्रज्ञांचा (आईनस्टाईन) समावेश होता, अश्या एका समाजाचाच पूर्णपणे नि:पात करण्याचा विडा

मग पिढ्यानपिढ्या आफ्रिकेत वास्तव्य करून असणार्‍यांना गुलाम म्हणुन विकले ही समाजसेवा का हो ?

कुठलाही विजेता देश वा आक्रमक जितांशी कश्यापद्धतीने वर्तणूक करतो ह्यावरून त्यांच्या सुसंस्कृतपणाचे व मानसिकतेचे मूल्यमापन
केले जाते

सुसंस्कृत लोक आपणहून कोणावर हल्लाच करणार नाहीत. त्यामुळे तो मुद्दा बाद.

इथे दोघही क्रूर होते. आता प्रश्न एकूण संख्येचा / आकाराचा आहे ज्यात ब्रिटीश जर्मनांच्या काही पट जास्त आहेत.

पुष्करिणी's picture

9 Jun 2010 - 9:02 pm | पुष्करिणी

मी मध्यंतरी पोलंडमधल्या काँसंट्रेशन कॅंप ची टूर केली होती, नंतर निदान २ दिवस तरी झोप लागत नाही..
क्रूरपणाचा कळस म्हणजे काय ते कळत....

एकतर त्यांना जर्मनी ( आणि इतर जिंकलेले देश ) सोडताना अस सांगितल की तुम्हांला वेगळा भाग देतोय आता तिकडे रहा ...त्यामुळे बेवारशी पडलेलं सामान पहाताना बर्‍याच संसारोपयोगी वस्तू दिसतात..
तिकडे मानवी केसांचे ( प्रेतावरील ) गालीचे आहेत,

प्रेतांच्या दातात सोनं-चांदी भरलेल असेल तर ते उपटून गोळा करून जर्मनीला पाठवल जायच..
३-४ महिने अत्याचार करून मारल्यावर जर काही थोडी चरबी प्रेतावर उरली असेलच तर ती साबण तयार करण्याकरता कापून वेगळी करायचे...
अजारी लहान मुलांना आयांनाच इंजेक्शन देउन मारायला लावायचे ...

कधीकधी प्रेतांबरोबर जिवंत ज्यूं ना पण जाळायचे..असं बरच.
आणि हे अखंड चालू होतं ४-५ वर्ष..
मूर्तिमंत क्रूरता इतकच म्हणावस वाटत

(मी ती टूर विसरायचा फार प्रयत्न करतेय)

पुष्करिणी

Pain's picture

10 Jun 2010 - 1:27 am | Pain

तुम्ही संगितलेले ह्रुदयद्रावक आहेच. जर्मन लोक सज्जन अस मी अजिबात म्हणत नाहिये. पण ब्रिटीश त्यांच्या पुढे होते हे बर्‍याच लोकांना माहीत नसते.
मिपावर काहि महिन्यांपुर्वी आलेला लेख पहा: आफ्रिकेतील गुलामांच्या व्यापारात वापरलेल्या कोठीस एकाने भेट देउन फोटो व वर्णन दिले होते. अधिक माहितीसाठी अंकल टॉमची केबिन, एक होता कार्व्हर वगैरे वाचा.
आफ्रिकन लोक आपल्या देशात सुखाने जगत होते. त्यांना गुलाम बनवून व्यापार केल्याने काळे-गोरे भेद, यादवी वगैरे सर्व गोष्टी सुरु झाल्या. ज्यूंना वेगळा देश मिळाला, सापडलेल्या जर्मन अधिकार्‍यांवर खटले भरून शिक्षा झाल्या पण हे तर अजुन चालुच आहे अणि ज्यांच्यामुळे झाला त्या ब्रिटीश नामानिराळे राहिले.

पुष्करिणी's picture

10 Jun 2010 - 1:06 pm | पुष्करिणी

मी ब्रिटीशांना व्यापारी वृत्तीचे म्हणते....
त्यांनी कायम त्यांचा फायदा पाहिला, दुसरं काही नाही. आणि या साठी त्यांनी साम -दाम्-दंड्-भेद या सगळ्या नीती वापरल्या.

ते संत महात्मे नव्हतेच. भारत, आफ्रिका इथे तरी त्यांना पाय रोवू देण्यास स्थानिक लोकांनी कळ्त नकळ्त खूप मद्त केली. त्यामुळे नंतरच्या गुलामगिरीचं पूर्ण खापर त्यांच्यावर फोडता येत नाही.

हिटलरचं उद्दीष्ट जर्मन वंशाच्या लोकांना एकत्र आणणे आणि न आवडणार्‍या / पट्णार्‍यांचा समूळ नायनाट करणे??

वर एका प्रतिसादात वेताळ यांनी म्हटल आहे की मित्रराष्ट्रंची जीत झाली म्हणून आपल्या नशिबी नेहरू आले पंतप्रधान म्हणून...
काही व्यक्तिंना नेहरू न आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे निर्णय्क्षमतेचा अभाव ( माझा नेहरूंवर फार अभ्यास नाही )...मग इथे चर्चिल या गुणासाठी तरी आवडला पाहिजे :)

पुष्करिणी

Pain's picture

11 Jun 2010 - 12:13 am | Pain

मी ब्रिटीशांना व्यापारी वृत्तीचे म्हणते....
त्यांनी कायम त्यांचा फायदा पाहिला, दुसरं काही नाही. आणि या साठी त्यांनी साम -दाम्-दंड्-भेद या सगळ्या नीती वापरल्या.

हिटलरचं उद्दीष्ट जर्मन वंशाच्या लोकांना एकत्र आणणे आणि न आवडणार्‍या / पट्णार्‍यांचा समूळ नायनाट करणे??

उद्दिष्ट काहीही असो,त्याची परिणती स्थानिक लोकांच्या मृत्यू, गुलामगिरी आणि हालअपेष्टा यातच झाली ना. आणि ब्रिटीशांमुळे होरपळलेल्या लोकांची संख्या जर्मनीपेक्षा काही पटीने जास्त आहे.

त्यांना पाय रोवू देण्यास स्थानिक लोकांनी कळ्त नकळ्त खूप मद्त केली. त्यामुळे नंतरच्या गुलामगिरीचं पूर्ण खापर त्यांच्यावर फोडता येत नाही.

स्थानिकांनी आपपल्या चुकिची शिक्षा दसपटीने भोगली, अजुनही भोगत आहेत. पण मुद्द तो नाहीये. ब्रिटीशांनीच सार्‍या जगाला गुलामगिरीत ढकलले, मग ते त्यासाठी दोषी. जर्मनांनी ज्यू लोकांचे शिरकाण केले, त्याबद्दल ते दोषी.

मग इथे चर्चिल या गुणासाठी तरी आवडला पाहिजे
चर्चिलमुळेच ब्रिटन तगले. आणि विरोधाभास असा की त्या पुढच्या निवडणुकीत जनतेने त्याला पाडले. ( भारतासाठी हे चांगलेच कारण तो स्वातंत्र्य द्यावे या मताचा नव्हता.)

पुष्करिणी's picture

11 Jun 2010 - 12:39 pm | पुष्करिणी

ब्रिटीशांनीच सार्‍या जगाला गुलामगिरीत ढकलले, मग ते त्यासाठी दोषी. जर्मनांनी ज्यू लोकांचे शिरकाण केले, त्याबद्दल ते दोषी.

अगदी ११० % बरोबर...

पुष्करिणी

II विकास II's picture

11 Jun 2010 - 11:12 am | II विकास II

हा प्रतिसाद श्री प्रसाद यांना
कुणी अहिंसेने तर कुणी हिंसेने इंग्रजांना विरोध करत होते.
पण त्याविरोधात जर्मनांच्या तुलनेत इंग्रज सरकार सहिष्णू वर्तणूक
दाखवित होते. रीतसर अटक आणि खटला भरून शिक्षा होत होत्या.

== हे विधान फार फार तर अहिंसक मार्गाने विरोध करणार्‍यांच्या बाबतीत थोडेफार बरोबर धरता येईल.
हिंसा वापरणार्‍याची उदाहरणे बटुकेश्वर दत्त, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद म्हणुन घेता येतील. १८५७ - पहीले स्वातंत्र्ययुध्द - सावकरांनी ह्या पुस्तकात इंग्रजांनी कशी सुड म्हणुन गावे च्या गावे जाळुन टाकली ह्याचे पुरावे दिले आहेत.

लाला लजपतराय यांना मारलेल्या जिव्हारी लाठ्या ह्याचे विस्मरण झाले आहे असे वाटते. गांधी प्रणीत मोर्चावर सुध्दा लाठीमार झाल्याची उदाहरणे आहेत.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

प्रियाली's picture

8 Jun 2010 - 9:20 pm | प्रियाली

लेख आवडला.

पुष्करिणी's picture

8 Jun 2010 - 9:28 pm | पुष्करिणी

डॉ. दाढ्यांच्या प्रतिसादात खरं तर सगळे मुद्दे आले आहेतच...

कुठेही वसाहत वसवण्यासाठी स्थानिक लोकांची गरज लागतेच, भले गुलाम म्हणून का होइना. हिटलरच्या बाबतीत ही गोष्ट वंशाभिमानामुळं अवघड होती.

ब्रिटीश इथे आले तेंव्हा देशातील संस्थानिकांच्या आपापसातील हेव्यादाव्यांमुळे इस्ट इंडिया कंपनीच फावल आणि त्यांनी हातची संधी सोडली नाही. हे राष्ट्र्हिताच्या दृष्टीन योग्य पाउल आहे...आपल्यालाही नाही का वाटत १९६५ मध्ये जर लाहोरपर्यंत आपल्या फौजा गेल्या होत्या तर रिकाम्या हाती का आल्या, किंवा नेहरूंनी काश्मिर प्रश्न युनोत का नेला म्हणून?

बाकीच्या वसाहतींच्या तुलनेत ब्रिटीशांच्या धर्म आणि राजकारणात बरीच तफावत होती... हेच आपण स्पॅनिश , पोर्तुगिज, ड्च यांच्याबद्द्ल नाही म्हणू शकत.

त्यांनी लुटालूट केली या बद्द्ल दुमत नाही आणि रागही आहे, पण त्याच्बरोबर जे काही चांगले गुण आहेत ते मान्य करावेच लागतात.

राष्ट्र्भक्ती, अचूकता, प्लॅनिंग, कष्टाळू वृत्ती , ध्येयवाद ह्या सगळ्या गोष्टी जर्मनीकडे ब्रिटीश लोकांपक्षा १० पट अधिक होत्या...पण त्याचा कसा अतिरेक झाला हे माहित्च आहे.

आंदमान बेटांवर सुभाष बाबूंनी जपान्यांच्या मदतीनं १९४५ सालीच तिरंगा फडकावला . तिकडे स्थानिक लोकांवर आणि स्वातंत्र्य चळ्वळीतल्या लोकांवर जपान्यांनी बरेच अत्याचार केले, लोकांच यामुळे अझाद हिंद सेनेबद्द्लच मत बरच वाइट झालं होत. अर्थात सुभाषबाबूंना या बद्द्ल काही माहिती नव्हती असं म्हणतात.

पुष्करिणी

विकास's picture

8 Jun 2010 - 10:08 pm | विकास

डॉ. दाढे, चतुरंग आणि पुष्करिणीच्या वरील प्रतिसादाशी सहमत.

सर्वप्रथम कोणिही परकीय राज्यकर्ता हा चांगला नसतो कारण ते शेवटी पारतंत्र्यच आहे. पण असे घडण्यासारखे जेंव्हा स्वकीय वागतात ते त्याहूनही वाईट असे वाटते...

जालीयनवाला बागेत जे काही ब्रिटीशांनी केले ते अक्षम्य होते पण ते सार्वत्रिक घडले नाही जे ज्यू आणि जिप्सींच्या बाबतीत हिटलरने केले.

हेच आपण स्पॅनिश , पोर्तुगिज, ड्च यांच्याबद्द्ल नाही म्हणू शकत.
ह्याच संदर्भात लिहीणार होतो तेंव्हा हा प्रतिसाद दिसला. दक्षिण अमेरिका, मेक्सिको वगैरे देशात जे या लोकांनी सांस्कृतीक नुकसान करून वाताहात केली तशी ब्रिटीशांनी भारतात तरी केली नाही. बाकी सत्ताधीश ब्रिटीशांबद्दल भरपूर वाईट बोलता येईलच पण ते या संदर्भात नाही.

तिकडे स्थानिक लोकांवर आणि स्वातंत्र्य चळ्वळीतल्या लोकांवर जपान्यांनी बरेच अत्याचार केले, लोकांच यामुळे अझाद हिंद सेनेबद्द्लच मत बरच वाइट झालं होत. अर्थात सुभाषबाबूंना या बद्द्ल काही माहिती नव्हती असं म्हणतात.

हे मी प्रथमच ऐकले. अधिक माहीती असल्यास समजून घेयला आवडेल. मात्र नात्झी जर्मन भारतात आले नाहीत ते बरे झाले.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

II विकास II's picture

8 Jun 2010 - 10:23 pm | II विकास II

>>हे मी प्रथमच ऐकले. अधिक माहीती असल्यास समजून घेयला आवडेल. मात्र नात्झी जर्मन भारतात आले नाहीत ते बरे झाले.

हे मी पण प्रथमच ऐकतो आहे. नेताजी बोस ह्यांनी म्यानमारमधील स्थानिक जनता आणि युध्दकैदी यातुन सैन्य तयार केले होते. सैन्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी सुवर्णतुला केल्याचा धडा शाळेत असताना होता. तो एक दंतकथा नसेल असेल वाटते.

>>मात्र नात्झी जर्मन भारतात आले नाहीत ते बरे झाले.
अगदी अगदी. जर जर्मेनी युध्द जिंकली असती तर किती राष्ट्रे पारतंत्र राहीली असती, देवालाच माहीती. आपण असे आंतरजालावर चर्चा करत असतो का, हाही एक प्रश्न आहे.

दुसर्‍या महायुध्दाचा भारताला फायदा हा झाला की, जर्मनीने इंग्लंड पेकाट मोडल्याने आपल्याने स्वातंत्र मिळण्यास खुप मदत झाली.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

Pain's picture

8 Jun 2010 - 11:32 pm | Pain

अगदी अगदी. जर जर्मेनी युध्द जिंकली असती तर किती राष्ट्रे पारतंत्र राहीली असती, देवालाच माहीती. आपण असे आंतरजालावर चर्चा करत असतो का, हाही एक प्रश्न आहे.

नंतरचे शीतयुद्ध तिरंगी झाले असते.

आणि ती राष्ट्रे मुळात स्वतंत्र कुठे होती ? मुघलकालीन भारताप्रमाणे एका बादशहाचा अंमल संपून दुसर्‍याचा झाला असता एवढेच. पण मुद्दा तो नाहीये.

Pain's picture

8 Jun 2010 - 11:37 pm | Pain

आंदमान बेटांवर सुभाष बाबूंनी जपान्यांच्या मदतीनं १९४५ सालीच तिरंगा फडकावला . तिकडे स्थानिक लोकांवर आणि स्वातंत्र्य चळ्वळीतल्या लोकांवर जपान्यांनी बरेच अत्याचार केले, लोकांच यामुळे अझाद हिंद सेनेबद्द्लच मत बरच वाइट झालं होत. अर्थात सुभाषबाबूंना या बद्द्ल काही माहिती नव्हती असं म्हणतात.

ही माहिती कुठे मिळाली ?

जपान्यांनी चीनच्या जिंकलेल्या भागावर अनन्वित अत्याचार केले, भारताच्या नाही. त्यांचे इतके सैनिक पोचलेच नव्हते.
त्यांनी विमानहल्ला, ब्रिटीश फौजेतले भारतीय कैदी सोडणे, प्रशिक्षण, साधनसामुग्री याप्रकारे मदत केली.

चित्रा's picture

9 Jun 2010 - 3:44 am | चित्रा

पुष्करिणी, लेख उत्तम आणि अभ्यासपूर्ण झाला आहे.
डंकर्कबद्दल मला विशेष काहीच माहिती नव्हती. असेच अजून अनेक लेख येत राहू देत..
मिपावर स्वागत आहे.

पुष्करिणी's picture

9 Jun 2010 - 1:08 pm | पुष्करिणी

वाचलेल्या एका पुस्तकाच नाव आत्ता आठवतय

The Japanese in the Nicobars , लेखक सिमरन सिंग ( बहुतेक ) .

पुष्करिणी

विकास's picture

9 Jun 2010 - 4:35 pm | विकास

पुस्तकाचे नाव दिल्यामुळे गुगलल्यावर विकीचा हा एक प्राथमिक दुवा मिळाला, ज्यात ही माहीती आहे. अजूनही खाली असतील पण ते बघत बसलो नाही. मात्र हा सगळा प्रकार कधी वाचनात न आल्याने नक्कीच माहितीपूर्ण आहे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

स्वाती२'s picture

9 Jun 2010 - 4:10 pm | स्वाती२

माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद!

चिंतातुर जंतू's picture

10 Jun 2010 - 12:37 am | चिंतातुर जंतू

यावरून इअन मक्यूअनच्या 'अटोनमेंट' या कादंबरीची आठवण आली. यात काही कळीचे प्रसंग डंकर्कच्या पार्श्वभूमीवर फ्रान्स व लंडनमध्ये घडतात. डंकर्कमुळे ब्रिटिशांचे धैर्य वाढले असेलही कदाचित, पण पुस्तकातली परतणार्‍या सैनिकांची वर्णनं हृदयद्रावक आहेत.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

दिपक's picture

10 Jun 2010 - 10:42 am | दिपक

बरीच माहिती मिळाली. दुसर्‍या महायुद्धाबद्दल नेहमीच आकर्षण राहिले आहे. मध्यंतरी त्याविषयावरील मिळेल ते चित्रपट शोधुन धडाधड पाहिले होते. दहा भागांची ’बॅण्ड ऑफ द ब्रदर’ ही अप्रतिम मालिकाही पाहीली.

ह्या विषयावर तसेच त्याच काळात झालेल्या ’कॅटीन मानवसंहा्रा’बद्दल अजुन माहिती मिळाली तर वाचण्यास आवडेल.

ह्या लेखासाठी आणि प्रतिसादातील माहितीसाठी धन्यवाद.

चिंतातुर जंतू's picture

10 Jun 2010 - 12:13 pm | चिंतातुर जंतू

तसेच त्याच काळात झालेल्या ’कॅटीन मानवसंहा्रा’बद्दल अजुन माहिती मिळाली तर वाचण्यास आवडेल.

आंद्रे वायदा या विख्यात पोलिश दिग्दर्शकाचा यावर आधारित चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता, तो जरूर पाहावा. पोलंडच्या अभिज्ञ वर्गाची एक सबंध पिढी यात मारली गेली. हत्याकांड जिथे घडले तिथे श्रध्दांजली वाहायला जाणारे पोलंडचे राष्ट्रप्रमुख, सेनाप्रमुख, राष्ट्रीय बँकेचे अध्यक्ष वगैरे नुकतेच विमान अपघातात मरण पावले, हा आणखी एक विलक्षण हृदयद्रावक योगायोग!

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

पुष्करिणी's picture

10 Jun 2010 - 1:10 pm | पुष्करिणी

लिहिणार आहे यावर थोड्या दिवसांत..

पुष्करिणी

इन्द्र्राज पवार's picture

10 Jun 2010 - 11:35 pm | इन्द्र्राज पवार

(सातत्याने प्रवासात असल्याने या अतिशय अभ्यासपूर्ण ध्याग्यावर इच्छा असूनही सविस्तर प्रतिक्रिया देऊ शकलो नव्हतो, ती आता देत आहे.)

सुरुवातीसच हे स्पष्ट करणे गरजेचे आहे कि श्री. पेन, श्री वेताळ आणि त्याच बरोबर श्री. विकास यांच्या लेखन पद्धतीने कित्येकांच्या मनात असा संभ्रम निर्माण झाला की ही मंडळी "हिटलरधार्जीणी" आहेत की काय? मात्र असे मला तरी कुठेही जाणवले नाही, कारण यांनी कुठेही हिटलरला सौम्य रंगाच्या ब्रशात रंगविलेले नाही. हिटलर क्रूरकर्माच होता हे निर्विवाद सत्य आहे, पण म्हणून "विन्स्टन चर्चिल" म्हणजे कुणी पंख छाटलेला देवदूत होता असे समजणे फार भाबडेपणाचे होईल. हिटलर फावड्याला फावडेच म्हणत होता, तर चर्चिल त्याला कृषिकर्मातले अवजार, इतकाच फरक. मात्र दोघेही त्याचा वापर एकाच कारणासाठी करत होते. एकाला झाकावा अन दुसर्‍याला काढावा अशीच दोघांची लायकी.

...आणि आपण "जर्मनी पेक्षा इंग्लंडचे गुलाम झालो हे चांगले झाले" हे म्हणण्यात आपण काय मिळवितो? शेवटी नशिबात गुलामच होणे होते या देशाच्या तर मग ते अहिरावणाचे झालो काय वा महिरावणाचे, दोघेही आम्हाला आपल्या पायाखालीच दाबणार ना? इंग्लंडच्या अगोदर आम्ही मोगलांचे गुलाम होतो, आता उद्या कुणी त्यावर धागा काढला तर असे म्हटले तर चालेल का की, 'बरे झाले आपण चेंगीज खानपेक्षा बाबरचे गुलाम झालो." गुलामी मनोवृत्तीला कुणीही जेता खतपाणीच घालत असतो...आणि शेळीमेंढ्यासारख्या जनतेला धरून आपली होतील ती कामे करून घेणे हाच उद्देश त्याच्याकडे असतो. हिटलरने ज्यूंचा संहार केला तसाच आपलाही केला असता असा एक मुद्दा चर्चेत दिसून येतो. होय ती शक्यता नाकारता येत नाही, पण असेही आहे की कुणी सांगावे त्यातून इथे त्या काळात असे नेते निर्माण झाले असते की ज्यांनी त्या नरसंहाराला तोंड देण्यासाठी या प्रचंड देशातील शक्तीला एकत्रित आणण्यासाठी विविध प्रयत्न केले असते. अर्थात ही जर-तर ची भाषा झाली, त्यामुळे प्रत्यक्षात काय स्थिती होती ते पाहणे क्रमप्राप्त आहे.

युरोपचा इतिहास साक्षीदार आहे की फासिझमच्या आणि नाझी तत्वज्ञानाच्या वाढीला इंग्लंड आणि फ्रांस या "लोकशाहीवादी" राष्ट्रांनीच फार मोठे खतपाणी दिलेले आहे. हिटलर आणि मुसोलिनी यांच्या सुरुवातीच्या आक्रमक आणि अत्याचारी राजकारणाकडे दीर्घकाळ डोळेझाक करण्याचे धोरण इंग्लंड, फ्रांस आणि अमेरिकेने स्वीकारलेले होते. तो भस्मासुर जगाचा ग्रास करील एवढे अक्राळविक्राळ रूप धारण करून उभा राहिला त्यामुळे त्या पापाची जबाबदारी इंग्लंड, फ्रांस आणि अमेरिकेने स्वीकारणे भाग होते. याचा दुसरा अर्थ असा की जे रोज लोकशाहीच्या नावाने जप करतात ते लोकशाहीवादी असतीलच असे नाही. हिटलर आणि मुसोलिनी दोघेही कम्युनिस्ट विरोधात होते, त्यामुळे युरोप मधून क्म्युनिस्टांचे उच्चाटन झाले तर इंग्लंड आणि फ्रांसला आनंदाच्या उकळ्याच फुटणार होत्या ना, त्यामुळे मुसोलिनीने अ‍ॅबिसिनियावर केलेले आक्रमण आणि हिटलरने र्‍हाईनलँडमध्ये घुसविलेल्या सेना इंग्लंड आणि फ्रांसने मिळून रोखण्याचे प्रयत्न केले असते तर सुरुवातीलाच हिटलरच्या महत्वाकांक्षेला लगाम बसला असता (हे वाक्य खुद्द चर्चिलचे आहे, माझे नव्हे...). मात्र हां... इथे हेच चर्चिल महाराज हे त्यावेळी तसे का घडले नाही याचे उत्तर मात्र देत नाही, त्याला कारण असे की युरोपात वाढत्या कम्युनिझमचा नायनाट करण्यासाठी नाझीचा उदय आणि फासिझामचा फैलाव हे हत्यार चांगले आहे असे ह्या आपले साम्राज्य जतन करण्याची इच्छा असणार्‍या चर्चिलसारख्या लोकशाहीवाद्यांना वाटत होते. एक असूर दुसर्‍या असुराचा नाश करत आहे हे यांना टेम्स नदीकाठी मासेमारी करत पाहायला त्यावेळी आवडलेच होते. चर्चील सारख्या धूर्त लोकांच्या पुतना मावशी-प्रेमाचे गोडवे गाण्यापूर्वी हेही लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे की हिटलरनेसुद्धा जर्मनीत निवडणुका लढविल्या होत्या त्यादेखील संसदीय लोकशाहीने जनतेचे प्रश्न सोडविण्यात दाखविलेले अपयश याच मुद्द्यावर. पहिल्या महायुद्धात झालेली आपल्या देशाची मानहानी आणि त्यात ज्यु जमातीविषयी त्याच्या मनात खदखदणारा संताप या दोन बाबी त्याची पाठराखण करणार्‍यांना पुरेशा होत्या.

दुसरा मुद्दा आहे तो ब्रिटिशांनी भारतात खूप सुधारणा केल्या ! म्हणजे काय केले? गोर्‍या साहेबासाठी आणि त्याच्या इंग्लंडमधील पिलावळीसाठी "हिंदुस्तान" ही बारमाही दुभती गाय होती आणि या गायीला हिरवागार चारा २४ तास दिला तरच ती दुध देणार हे त्याच्या धंदेवाईक प्रवृत्तीला नक्कीच माहित होते, म्हणून त्याने आमच्यातीलच गोपालक हाती धरून गाय कायम गुबगुबीत कशी राहील हे पाहिले. ज्यावेळी गायीने दावे सोडून माळावर जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आमच्याच लोकाकडून तिला चाबकाचे फटकारे कसे मारले जातील हेही पाहिलं.

एका विशिष्ट मुद्यावर इथल्या त्यावेळेच्या ३०-४० कोटी लोखाना खुष ठेवायचे... तो मुद्दा म्हणजे 'राणी' ने १८५७ च्या उठावानंतर दिलेले वचन की, हिंदुस्थानातील प्रजेच्या "धार्मिक" बाबीत कंपनी सरकार ढवळाढवळ करणार नाही. झाले, मग या गुलामांना तर दुसरे काय पाहिजे होते? अशी दोन तीन सुवासाची पाने आमच्या तोंडाला पुसली म्हणजे आम्ही मोकळे झालो "भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य ! विबुधामान्य सार्वभौम भूवर !"

असे जर होते तर चर्चिलच काय मग हिटलर जरी इथे आला असता तर काय फरक पडला असता?

डॉ. प्रसाद दाढे यांच्यासाठी. ~~~~ मी आपले अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचले व ते निश्चितच विचारपूर्वक आणि प्रभावशाली आहेत यात संदेह नाही. तरीही त्यातील पुढची एक बाब म्हणजे "डंकर्क" या विषयावर आपण चर्चा करत असताना ज्यावेळी नेत्यांच्या मनोवृत्तीचा प्रश्न आला त्यावेळी कशाला आपल्या देशाच्या चालू तारखेच्या "महान नेत्यांना" या चर्चेत आणला? अहो सर, काय लायकी आहे या क्षुद्र आणि रक्तपिपासू लोकांची की ज्यांची नावे आपल्यासारख्या एका अभ्यासू वृत्तीच्या व्यक्तीने इथे टाईपला घ्यावी? मरू दे त्यांना त्यांच्या कर्माने !! आणि तुमच्याकडे आणि माझ्याकडे, किंवा इथे प्रतिसाद दिलेल्या सर्वश्री पेन, विकास, वेताळ, पुष्कीरिणी आदींच्याकडे असा काय प्रमेय आहे की, सध्याच्या या "गार्बेज"ला जनतेने काढून टाकल्यावर नव्याने येणारे नंदनवनातील संत्री असतील, जी खाताच सारा भारत समाधानाचा ढेकर देईल? बिलकुल आशा बाळगू नका आपल्या मतदाराकडून. ह्या नेत्यांना पक्के ठाऊक आहे की किती नोटा टाकल्या तर कसे मतदार पाळीत उभे राहतात. ४० आणि ५० टक्के मतदानावर इथले सरकार राज्य करते आणि त्यावेळी कितीजण खंत बाळगतात की आपण मतदान केले नाही याची? आणि जे करतात त्यांच्या सारासार बुद्धीबद्दल तर काय बोलायचे. मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानीतून "गोविंदा" सारखा एक उल्लू नट श्री. राम नाईक सारख्या अभ्यासू संसदपटूला पराभूत करून निवडून येतो तेव्हा आपल्यासारख्या वैचारिक लोकांची वाचाच बसते ना? काय तो धर्मेंद्र, काय तो विनोद खन्ना, काय ती "तुलसी", अन काय तो "रावण" !!! हे जर खासदार आपले आजचे तर मग उद्या जॉनी लिवर आणि हिमेश रेशमिया तुम्हाला संसद भवनात वावरताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

Pain's picture

11 Jun 2010 - 12:42 am | Pain

मला ख्.व. ची सुविधा उपलब्ध नसल्याने इथेच प्रतिसाद देत आहे.

आपल्या व्यस्त जीवनक्रमातून वेळ काढुन सविस्तर लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही कोणीच उल्लेख न केलेले नवीन मुद्दे तुम्ही टेबलावर आणलेत.
इतरांप्रमाणे मी हिटलर आणि त्याच्या क्रुरकर्मांची भलामण करतोय/ अनभिज्ञ आहे असा तुमचा गैरसमज झाला नाही हे पाहून बरे वाटले. बाकी इंग्लंडच्या गुलामगिरीची तरफदारी करण्यापर्यंत गेलेले लोक पाहून थक्क झालो.

चिरोटा's picture

11 Jun 2010 - 11:37 am | चिरोटा

असे जर होते तर चर्चिलच काय अग हिटलर जरी इथे आला असता तर काय फरक पडला असता?

हिटलर काय्/चर्चिल काय दुसर्‍या देशांवर आपला हक्क आहे असे म्हणणारे साम्राज्यवादी होते.ब्रिटिशांनी भारताला लुटले हे खरे पण त्यांच्या साम्राज्यवादी धोरणांत माणसांना सरळ ठार मारणे,माणसे नाहिशी करणे,concentration camp वगैरे प्रकार नव्हते.थोडक्यात ब्रिटिशांचा सुसंस्कृत साम्राज्यवादाचा मुखवटा होता.
क्रांतिकारक असोत वा टिळक्,गांधी ,बोस असोत, त्यांच्यावर खटले ब्रिटिश सरकारने रीतसरच त्यांच्या कायद्यानुसार भरले(त्यांना खटला लढण्याचे स्वातंत्र्यही दिले) आणि मगच निकाल दिला्.
हिटलर/जर्मनीने भारतावर राज्य केले असते तर खरोखर असे झाले असते का हा प्रश्न निश्चित उभा राहतो.
P = NP

इन्द्र्राज पवार's picture

11 Jun 2010 - 3:28 pm | इन्द्र्राज पवार

"...थोडक्यात ब्रिटिशांचा सुसंस्कृत साम्राज्यवादाचा मुखवटा होता...."

श्री.भेंडीबाजार.... मला प्रामाणिकपणे वाटत आहे की इथे आपली थोडी गल्लत होत आहे. लक्षात घ्या ~~ हिटलर सत्तेवर आला तो जर्मनीला पूर्ववैभव देण्याच्या घोषणेवर आणि त्याच्या व समर्थकांच्या नजरेत होते "त्याच" देशाचे ज्यू नागरिक, ज्यांच्यामुळे पहिल्या महायुध्दात आपला मानहानीकारक पराभव झाला असे त्यांचे मत होते. त्यामुळे सत्तेवर आल्यावर त्यांचे शिरकाण करणार ही त्याची घोषणा होती. युरोपमध्ये "आर्यन रेस"चे वर्चस्व व कम्युनिझमचा नाश हे त्याचे स्वप्न.

दुसरीकडे ब्रिटाशांची साम्राज्यशाही "सूर्य मावळणार नाही" या तत्वावर चालली होती आणि महत्वाचे म्हणजे त्यांची पहिली नजर ही "व्यापार्‍या" ची असल्याने आपल्याला अंकीत असलेल्या राष्ट्रातून जितकी लूट नेता येते तिला प्राधान्य द्यायचे असे असल्याने हिटलर स्टाईल 'कॉन्सन्ट्रेशन कॅम्प" आदी संकल्पना ते या खंडप्राय देशात लागू करूच शकत नव्हते. हिटलरच्या वेळी एकसंध जर्मनीची लोकसंख्या होती केवळ ७ कोटी व तीमध्ये ज्यू सह अन्य धर्मीय होते दीड कोटीच्या आसपास. याच काळात भारताची महाप्रचंड लोकसंख्या होती तब्बल ४० कोटी. विचार करा...चर्चिल सोडाच, पण हिटलर तरी या देशात तसल्या कॅम्पची शक्यता विचारात घेऊ शकला असता का?

चर्चिलला तर हिंदुस्थानाला इंग्लंडची टांकसाळ समजायचा. ब्रिटीश संसदेत ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य देण्याचा विषय आला, त्यावेळी तो ताडकन उदगारला होता : "ब्रिटिश साम्राज्याचे दिवाळे पुकारावयाला काही मी ब्रिटनचा पंतप्रधान झालो नाही !" ~~ याचाच अर्थ इंग्लंड कायम आमच्याकडे "सोन्याची अंडी देणारी कोंबडी" याच नजरेने पाहत असे, त्यामुळे कशाला असल्या लुटारूंची तरफदारी करायची की त्यांनी इथल्या जनतेला कायद्याने वागवले म्हणून. वागवले असेल तर निव्वळ त्यांच्या पोळीवर इथल्या भटटीतील तूप अनायासे पडत होते म्हणून.

अहो, इतकी लोभी जात आहे ब्रिटिशाची की आज इथून जावून ६०-६५ वर्षे झाली तरी सरकारी पातळीवरून मागणी करूनही (मजूर असो वा हुजूर पक्ष) तिथले सरकार भारताला "कोहीनूर हिरा" अन् "शिवाजीची भवानी तलवार" द्यायला तयार नाही, कारण ते त्याला आपली "लूट" समजतात...

हा त्यांचा सुसंस्कृतपणाचा मुखवटा !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

सुधीर काळे's picture

11 Jun 2010 - 12:37 pm | सुधीर काळे

पुष्करिणीताई,
मी बर्‍याच वर्षांपूर्वी दुसर्‍या महायुद्धावर बरेच वाचले होते, पण आता स्मरणशक्ती दगा देईल अशी भीती वाटते. माझ्या आठवणीप्रमाणे "बॅटल ऑफ ब्रिटन" हे नांव हिटलरने जो इंग्लंडवर बाँबवर्षाव केला (July 10, and lasting until early August 1940) त्या अटीतटीच्या युद्धाला दिलेले होते. त्याच्याशी डंकर्कचा संबंध फक्त डंकर्कनंतर कांहीं महिन्यात ते सुरू झाले इतकाच असावा!
http://info-poland.buffalo.edu/britain/airbattle.html या दुव्यावर माहिती आहे.
"Winds of War" व "War and Remembrance" ही दुसर्‍या महायुद्धावर हर्मन वूक याने लिहिलेली पुस्तकें वाचल्याखेरीज दुसर्‍या महायुद्धाबद्दलचे वाचन अपुरेच राहील असे मला वाटते. "Winds of War" हे युरोपमधील युद्धाबद्दल असून "War and Remembrance" हे पॅसिफिक भागातील युद्धाबद्दल आहे.
हे सगळे लिहायचे कारण कीं त्यात दिलेली एक 'थेअरी' फार पटण्यासारखी आहे. वूक म्हणतात कीं जपानने 'पर्ल हार्बर'वर हल्ला करण्याऐवजी जर व्लाडिवोस्टॉकवर हल्ला केला असता तर रशियाला आपली फौज जर्मन सैन्यापुढून काढून व्लाडिवोस्टॉककडे न्यायला लागली असती व जर्मन सैन्यावरचा भार हलका झाला असता. शिवाय 'पर्ल हार्बर'वर हल्ला केला नसता तर अमेरिकेलाही युद्धात पडायला सबब मिळाली नसती. या दोन गोष्टींमुळे दुसर्‍या महायुद्धात जर्मनीचा पराजय झाला!
ज्यांना दुसर्‍या महायुद्धावरील वाचनात रस आहे त्यांनी ही दोन पुस्तके जरूर वाचावीत.
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/36uoebc
(प्रकरण सातवे)

जागु's picture

11 Jun 2010 - 1:02 pm | जागु

खुपच चांगला लेख आहे.

चिंतातुर जंतू's picture

11 Jun 2010 - 5:43 pm | चिंतातुर जंतू

या धाग्यावरील काही मुद्दे अचानक गार्डिअन या ब्रिटिश वर्तमानपत्रात एका लेखात दिसले. हिटलरमुळे भारताचा कसा फायदा झाला, हे दर्शवणारा एक चित्रपट भारतात बनतो आहे. त्या निमित्त्ताने लेखकाने ब्रिटिश सत्ता, हिटलर आणि त्याचे भारताविषयीचे विचार याविषयी काही म्हटले आहे. उदा:

  • गांधी आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांना गोळ्या घाला, असा सल्ला हिटलरने ब्रिटिशांना दिला होता.
  • 'आम्ही जर भारताचे राज्यकर्ते बनलो, तर लवकरच भारतीयांना आधीचे ब्रिटिश राज्य बरे वाटू लागेल', अशी धमकीही हिटलरने दिली होती.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

मुक्त विहारि's picture

23 May 2015 - 8:02 pm | मुक्त विहारि

ह्या घटनेवर आधारीत एक उत्तम सिनेमा पण निघाला होता....

लिंक देत आहे, गरजूंनी लाभ घ्यावा....

https://www.youtube.com/watch?v=BJGxT0HsO8A

मारवा's picture

2 Nov 2015 - 6:07 am | मारवा

मिपा क्लासिक -७

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Nov 2015 - 8:09 pm | बिपिन कार्यकर्ते

+१