शेअर मार्केट- म्युच्युअल फंड एसआयपी (SIP) बद्दल काही बेसिक प्रश्न

Primary tabs

कुटस्थ's picture
कुटस्थ in काथ्याकूट
13 May 2017 - 4:40 am
गाभा: 

मी सध्या भारतीय शेअर मार्केट मध्ये म्युच्युअल फंड एसआयपी माध्यमातून गुंतवणूक करायचे योजिले आहे.एसआयपी इन्व्हेस्टमेंट per month असेल तेही ऑनलाईन ब्रोकरच्या माध्यमातून. एसआयपी मध्ये प्रथमच गुंतवणूक करत असल्याने काही प्रश्न आहेत ते असे:
१. प्रत्येक महिन्याच्या कोणत्या तारखेला फंड युनिट्स विकत घेतले जातील हे आपल्याला ठरवता येते का? येत असल्यास तारीख बदलता येते का? असल्यास किती वेळा बदलू शकतो?
२. एसआयपी चा कालावधी बदलणे शक्य असते का? म्हणजे मी एसआयपी ५ वर्षासाठी सुरु केली तर नंतर तो कालावधी कमी करता येतो का (जसे कि ३ वर्ष)? त्याचप्रमाणे एसआयपी चा कालावधी वाढवता येतो का? म्हणजे मी एक वर्षाचा एसआयपी सुरु केला आणि ६ महिन्यानंतर वाटले कि कालावधी वाढवून २ वर्ष करावा तर ते शक्य असते का कि नवीन एसआयपी सुरु करावा लागतो?
३. एखाद्या महिन्यात पैसे भरू शकलो नाही तर काय होते? काही penalty असते का?
४. एखाद्या महिन्यात SIP Amount पेक्षा जास्त पैसे भरून SIP फंड मध्येच युनिट्स विकत घेता येतात का?
४. मुदतीपूर्वी युनिट्स विकता येतात का? असल्यास त्यावर exit load पडतो का? आणि short term capital gain असेल तर एसआयपी वर टॅक्स भरावा लागतो का?
५ . SIP आणि Flexi-SIP यात काय फरक आहे? Flexi-SIP मध्ये महिन्याच्या कोणत्याही तारखेला युनिट्स विकत घेण्याची मुभा असते का?

कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

प्रतिक्रिया

अमर विश्वास's picture

13 May 2017 - 10:04 am | अमर विश्वास

SIP च्या माध्यमातून गुंतवणुक सुरु करत आहात हे उत्तम आहे .. मी स्वतः: गेली आठ वर्षे SIP करतो आहे व माझा Equated Yearly Return १५% आहे .. (सध्या मार्केट वर असल्याने १५% पण सर्वसाधारण पणे १२% ते १५% या दरम्यान रिटर्न्स मिळाला आहे ... सध्या FD चे दर ८% आहेत )

आपल्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो :
१. प्रत्येक महिन्याच्या कोणत्या तारखेला फंड युनिट्स विकत घेतले जातील हे आपल्याला ठरवता येते का? येत असल्यास तारीख बदलता येते का? असल्यास किती वेळा बदलू शकतो?
-- आपण महिन्याच्या कोणत्या तारखेला SIP घ्यायची ते ठरवु शकता. ३-४ SIP असतील तर तारखा ५, १०, १५, २५ अशा ठरवू शकता जेणेकरुन महिन्याभरातील चढ उतारावर मात करता येईल. या तारखा बदलता येतात. पण SIP चा वापर हा रोजच्या चढ उतारावर दीर्घ मुदतीच्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून मात करणे हा असल्याने ह्या तारखा बदलून फारसे काही साध्य होणार नाही. याबद्दल शेवटी थोडे लिहितो.

२. एसआयपी चा कालावधी बदलणे शक्य असते का? म्हणजे मी एसआयपी ५ वर्षासाठी सुरु केली तर नंतर तो कालावधी कमी करता येतो का (जसे कि ३ वर्ष)? त्याचप्रमाणे एसआयपी चा कालावधी वाढवता येतो का? म्हणजे मी एक वर्षाचा एसआयपी सुरु केला आणि ६ महिन्यानंतर वाटले कि कालावधी वाढवून २ वर्ष करावा तर ते शक्य असते का कि नवीन एसआयपी सुरु करावा लागतो?
-- SIP चा कालावधी नसतो. तुम्ही SIP करता ते बहुतेक सगळे फंड्स Open Ended असतात. SIP सुरु करताना कालावधी द्यायची गरज नसते. एक महिन्याच्या पूर्वसूचनेने SIP बंद करता येतो. त्यामुळे बिनधास्त SIP सुरु करा

३. एखाद्या महिन्यात पैसे भरू शकलो नाही तर काय होते? काही penalty असते का?
-- SIP हे तुमच्या बँक खात्यातुन auto-debit होत असतात. (हाच पर्याय सर्वोत्तम आहे) एखाद्या महिन्यात खात्यात पुरेसा निधी नसेल तर SIP Debit होत नाही. लागोपाठ २ महिने (किंवा ३ महिने ..नक्की आठवत नाही) असे झाले तर SIP बंद होतो. अर्थात आपण तोपर्यंत गुंतवलेले पैसे तसेच राहतात व ते पाहिजे तेंव्हा काढुन घेता येतात. अर्थात पहिल्या मुद्यात लिहिल्या प्रमाणे SIP चा खरा फायदा Long Term Continuous investment असेल तरच होतो. तेंव्हा असे SIP बंद होणे टाळावे
४. एखाद्या महिन्यात SIP Amount पेक्षा जास्त पैसे भरून SIP फंड मध्येच युनिट्स विकत घेता येतात का?
-- SIP Fund असे काही वेगळे फंड नसतात. नेहमीच्या ओपन एंडेड स्कीम मध्ये SIP हा गुंतवणुकीचा एक मार्ग आहे. त्यामुळे त्याच फंड मध्ये One time investment कधीही करता येते. अर्थात पुन्हा वरचाच मुद्दा ... continuous ..... तेंव्हा एकदम जास्त रक्कम हातात आली तर ती एखाद्या शॉर्ट टर्म फंडात ठेवावी व त्याला संलग्न अशी SIP करावी

५. मुदतीपूर्वी युनिट्स विकता येतात का? असल्यास त्यावर exit load पडतो का? आणि short term capital gain असेल तर एसआयपी वर टॅक्स भरावा लागतो का?
--- आधी लिहिल्याप्रमाणे हे ओपन एंडेड स्कीम असतात .. कधीही पैसे काढता येतात. अर्थात एका वर्षाच्या आत पैसे काढले तर इन्कम टॅक्स भरावा लागतो . एका वर्षानंतर Mutual Funds चे इनकम टॅक्स फ्री आहे. कारण फंडस् चालवणाऱ्या कंपन्या Divident Distributution Tax भरतात

६ . SIP आणि Flexi-SIP यात काय फरक आहे? Flexi-SIP मध्ये महिन्याच्या कोणत्याही तारखेला युनिट्स विकत घेण्याची मुभा असते का?
---- Flexi SIP म्हणजे जेंव्हा मार्केट खाली जाते तेंव्हा तुम्ही जास्त investment करावी अशी अपेक्षा असते. अशा स्कीम्स मधे मार्केट चा P/E रेशो बघतात. जर baseline P/E रेशो जर १०० धरला आणि तुमची SIP ५००० ची असेल तर P/E रेशो ३० झालेलं तर तुम्ही १५००० गुंतवावे ... पण अशा प्रकारच्या स्कीम मध्ये तुमची महिन्याची रक्कम वरखाली होत जाते. त्यामुळे दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीची इच्छा असेल तर Flexi-SIP टाळावे Flexible SIP plans are extremely complicated and there are very few schemes with this option in the market आणि Flexi SIPs may give higher returns but may not build a bigger corpus या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या

आणि जात जाता ..
१. जुनी हिरो होंडा ची ऍड होती .. fill it , shut it , forget it .. हे सूत्र लक्षात ठेवावे. एकदा SIP चालु केल्यावर दर तीन महिन्यांनी (Quarterly) वअवलोकन करावे. रोज फंड व्हाल्यू पाहु नये :)
२. फंड निवडताना काळजी घ्यावी. फंड चे वेगवेगळे प्रकार असतात .. growth oriented, balance इत्यादी. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारातील फंड निवडावेत
३. स्मॉल कॅप फंड शक्यतो टाळा
४. तुम्हाला जी रक्कम किमान ३ वर्षे लागणार नाही तीच SIP मध्ये गुंतवा. महिन्याची SIP amount तेव्हढीच ठेवा जी तुम्ही ३ वर्षे सलग ठेवू शकता. तसेच गुंतवलेली रक्कम किमान ३ वर्षे तरी काढावी लागणार नाही. तरच SIP चा खरा फायदा होईल. मी SIP सुरु केले तेंव्हा फक्त ५००० महिना गुंतवत होतो. नंतर जसे शक्य होईल तशी दरमहा गुंतवणूक वाढवत गेलो
५. शेवटचे .. एकाच फंडात मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा ३-४ फंडात विभागुन करा

ऑल द बेस्ट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2017 - 2:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणत्या दोन फंडात दीर्घ मुदतीसाठी पैसे गुंतवले पाहिजेत आणि किती ? काय सल्ला द्याल.

-दिलीप बिरुटे

कुंदन's picture

13 May 2017 - 2:55 pm | कुंदन

* Mutual fund investments are subject to market risks. Please read the offer document carefully before investing

अमरजी, उपयुक्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2017 - 2:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहिती,

गणोराज's picture

14 May 2017 - 11:46 pm | गणोराज

फारच छान आणि मुद्देसुद माहिती दिलीत. माझ्याही सिप चालु आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2017 - 2:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

म्युचुअल फंडांपासून मिळणार्‍या उत्पन्नावरील आयकराबाबत अधिक माहिती...

(अ) इक्विटी (कमीत कमी ६५% शेअर-बेस्ड) म्युचुअल फंडांपासून मिळणार्‍या उत्पन्नावरील आयकर :

१. लाँग टर्म कॅपिटल गेन (१ वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या गुंतवणूकीवरील उत्पन्न) : ०% कर.

२. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स (१ वर्षापेक्षा कमी मुदतीच्या गुंतवणूकीवरील उत्पन्न) : १५% कर.

(आ) डेट (६५% पेक्षा कमी शेअर-बेस्ड व मुख्यतः सरकारी/कंपनी बाँड्स, गोल्ड, फंड ऑफफंद्ड, इ बेस्ड) म्युचुअल फंडांपासून मिळणार्‍या उत्पन्नावरील आयकर :

१. लाँग टर्म कॅपिटल गेन (३ वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या गुंतवणूकीवरील उत्पन्न) : यासाठी दोनपैकी आपल्याला सोईची/फायद्याची असलेली एक पद्धत करदात्याला वापरता येते :
१.अ) फ्लॅट / इंडेक्सेशनविना : १०% कर.
अथवा
१.आ) इंडेक्सेशन वापरून : २०% कर.

२. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स (३ वर्षापेक्षा कमी मुदतीच्या गुंतवणूकीवरील उत्पन्न) : हे उत्पन्न करदात्याच्या इतर उत्पन्नात मिळवून, त्यानंतर येणार्‍या करपात्र उत्पन्नावर त्याच्या टॅक्स स्लॅबप्रमाणे कराचे % ठरते.

(इ) लाभांशाच्या (डिव्हिडंड) स्वरूपात मिळणारे उत्पन्न :

काही फंड्स वेळोवेळी लाभांश देतात. फंड कंपनी डिव्हिडंड टॅक्स भरून नंतर ते उत्पन्न वितरीत करत असल्याने ग्राहकाच्या हातात येणारे हे उत्पन्न करमाफ असते.

(ई) एसआयपी :

वरील करप्रणालीचा विचार करताना एसआयपीचा प्रत्येक हप्ता वेगळी गुंतवणुक समजून त्याच्या मुदतीप्रमाणे त्यावरील उत्पन्न, शॉर्ट की लाँग टर्म कॅपिटल गेन आहे, हे ठरवावे लागते.

महत्वाचे...

हे वरचे नियम जरा कठीण वाटले तरी घाबरायचे कारण नाही. बहुतेक सर्व फंड्स / ब्रोकर तुम्हाला वित्तवर्ष पुरे झाले की "कॅपिटल गेन स्टेटमेंट" देतात (दिले नाही तर मागून घ्या); त्यात करविवरणासाठी जरूर ती सर्व माहिती व आकडे असतात. त्यावरून, तुम्हाला खात्री असेल तर तुम्ही स्वतः किंवा तुमचा सीए तरी नक्कीच करविवरण भरू शकतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2017 - 2:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

करमुक्त राहण्यासाठी एक महत्वाचा फंडा म्हणजे...

इक्विटी फंडातील गुंतवणुक कमीत कमी एक वर्ष करण्याच्या उद्येशानेच करावी व डेट फंडातील गुंतवणुक कमीत कमी तीन वर्ष करण्याच्या उद्येशानेच करावी.

कुटस्थ's picture

13 May 2017 - 3:23 pm | कुटस्थ

प्रतिसादाबद्दल धन्यवाद सुहासजी. टॅक्सविषयीची शंका दूर झाली !

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2017 - 3:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

एंट्री आणि एक्झिट लोड :

हे एकाच कंपनीच्या दर फंडाला वेगवेगळे असून शकतात. तसेच एक्झिट लोडसाठी ठरवलेली मुदत दर फंडाला वेगवेगळी असते. या मुदती फंड कंपनीच्या वेबसाईटवर आणि ऑफर डॉक्युमेंटमध्ये स्पष्टपणे लिहिलेल्या असतात.

उदय's picture

13 May 2017 - 7:37 pm | उदय

लोड फंड कधीही विकत घेऊ नयेत. त्याने फक्त ऍडव्हायजरला किंवा म्युच्युअल फंड कंपनीला फायदा होतो, गुंतवणूकदारांचे नुकसानच होते.

सुबोध खरे's picture

13 May 2017 - 7:42 pm | सुबोध खरे

एकंदर एंट्री लोड, एक्झिट लोड आणि ऍसेट मॅनेजमेंट चार्जेस बद्दल मला बऱ्याच शंका आणि गोंधळ आहेत. कोणी सुलभ शब्दात त्याचे निराकरण करेल काय? कारण सर्व फंड त्यांचा परतावा मोठ्या अक्षरात आणि जेंव्हा बाजार तेजीत असतो तेंव्हाचा दाखवतात. त्यात वरील शुल्क (चार्जेस) कुणीही सांगत नाही .
मी १००० रुपये दरमहा इक्विटी फंडात टाकतो आहे( वर्षाला बारा हजार रुपये). आणि त्याला १० टक्के परतावा मिळाला असे गृहीत धरल्यास तीन वर्षांनी मला किती पैसे परत मिळतील( CAGR).
ता.क.-- माझी आजतागायत एक रूपयाचीही एस आय पी नाही. (आणि मी अतिशय अडाणी आहे असे समजून चाललात तरी चालेल)

कुटस्थ's picture

14 May 2017 - 1:09 am | कुटस्थ

सुबोधजी, एक्सिट लोड हा साधारणपणे फंड amount ची volatility कमी करण्यासाठी तसेच transaction cost कव्हर करण्यासाठी आकारला जातो. मार्केट मंदीत असताना बऱ्याचदा इन्व्हेस्टर चा फंड विकण्याकडे कल असतो त्यामुळे फंड च्या total asset वर भार पडतो. त्यापासून संरक्षणासाठी तसेच म्युच्युअल फंड मध्ये दीर्घकाळ गुंतवणूक राहावी यासाठी हा लोड आकारण्यात येतो. सर्वसाधारणपणे एक्सिट लोड का विक्रीपश्चात मिळणाऱ्या amount च्या १% असतो व बऱ्याच फंड मध्ये एक्सिट लोड हा केवळ गुंतवणुकीपासून १ वर्षाच्या आत केलेल्या विक्रीवरच लागतो. म्हणजे तुमची म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक १ वर्षापेक्षा जास्त असेल तर हा लोड लागत नाही. परंतु वर सुहासजी यांनी म्हणल्याप्रमाणे हे प्रत्येक फंड वर अवलंबून आहे आणि फंड घेण्यापूर्वीच याची माहिती करून घ्यावी.
बाकी फंड चा जो NAV दररोज प्रकाशित होतो तो इतर सर्व खर्च जसे कि Fund Management चार्जेस वगैरे धरून केलेला असतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2017 - 2:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

शेअर आणि म्युचुअल फंड यासंबंधीच्या सतत (ऑनलाईन) विश्वासू माहितीसाठीसाठी मी
Money Control (http://www.moneycontrol.com) हे संस्थळ वापरतो. या संस्थळावरच्या सोयी सर्वसामान्य पासून ते सखोल अभ्यासू अश्या सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना उपयोगी आहेत.

मुख्य म्हणजे खूप डोकेदुखी न करता महत्वाची माहिती सहजपणे मिळण्याची इच्छा असलेल्यांसाठी हे संस्थळ फार उपयोगी आहे. तेथे मोफत अकाउंट उघडून आपल्या गुंतवणूकीचे तपशील आपण ठेऊ शकतो. संस्थळ मान्यवर आहे आणि अकाउंट पासवर्डने सुरक्षित असतो. तेथिल माझ्या मते फार उपयोगी असलेल्या काही सोयी अश्या :

१. पोर्टफोलिओ : येथे आपण आपल्या गुंतवणूकीचे (शेअर व फंड) तपशील नोंदविल्यास संस्थळ दररोज बदलत्या शेअरच्या (ऑनलाईन) किंमती व दिवसातून एकदा जाहीर होणार्‍या फंडांच्या NAV चे आकडे वापरून आपल्या गुंतवणूकीची सद्याची किंमत सर्वसामान्यांना कळेल अश्या टेबलच्या स्वरूपात दाखवते. दर शेअर व दर फंडाची माहिती स्वतंत्रपणे व त्यांच्या बेरजा आणि एकूण बेरीज (नेट वर्थ) एकाच पानावर पहायला मिळतात.

२. शेअरबाजार : मार्केट्मधल्या प्रत्येक शेअरबद्दलची जुजुबी पासून जितकी खोलवर शक्य आहे तितकी आताची व ऐतिहासिक माहिती मिळते. शेअरपासून मिळणारा ऐतिहासिक परतावा पाहता येतो. शेअर खरेदी-विक्रिचे निर्णय घ्यायला हे फार उपयोगी आहे.

३. म्युचुअल फंड मार्केट : मार्केट्मधल्या प्रत्येक फंडाबद्दलची जुजुबी पासून जितकी खोलवर शक्य आहे तितकी आताची व ऐतिहासिक माहिती मिळते. विशेषत; फंडाने गेल्या १ महिना, ३ महिने, ६ महिने, १ वर्ष, ३ वर्षे आणि ५ वर्षे या मुदतींवर दिलेला % परतावा तपासून पाहता येतो. फंड खरेदी-विक्रिचे निर्णय घ्यायला हे फार उपयोगी आहे.

इतरही बरेच काही आहे. शेअर व फंड गुंतवणूकी रस असलेल्याने चाळून पहावे असे हे संस्थळ नक्की आहे.

अनुप ढेरे's picture

13 May 2017 - 5:50 pm | अनुप ढेरे

वअमर विश्वास यांचा रचा प्रतिसाद उत्तम आहेच. दोनच मुद्दे.

१. जे पैसे तुम्हाला लगेचच्या भविष्यात लागणार नाहीयेत तेच पैसे शेअर बाजारात गुंतवा. किमान ८-१० वर्ष हा कालावधी चांगला आहे शेअर बाजारासाठी. सो जे पैसे काही महिन्यात, पुढल्या वर्षी असे हवे आहेत ते शेअर बाजारात गुंतवू नका. लॉंग टर्म एमसाठीचेच गुंतवा.

२. SIP ही अत्यंत सोपी पद्धता आहे गुंतवणुकीची. सामान्य माणसासाठीच बनवलेली आहे. ती बाय डिझाईन बाजारातल्या अन्प्रेडिक्टेबिलिटीचा प्रभाव कमी करते. FLEXI-SIP वगैरे प्रकार हे एका सोप्या आणि उपयोगी पद्धतीला उगाचच कॉंप्लिकेट करणारी गोष्ट आहे. त्या फंदात पडू नका. साधा SIPच घ्या.

३. कमी कालावधीसाठी गुंतवणुक करायची असेल तर Debt fund ( तीन वर्षाच्या आत काढले तर फायद्यावर १५% कर) किंवा Liquid Fund (एंट्री लोड्/इक्झिट लोड नाही.) हे उत्तम ऑप्शन्स आहेत.

नाखु's picture

13 May 2017 - 6:37 pm | नाखु

लेखमाला होईल असा विषय आहे

अमर विश्वास's picture

13 May 2017 - 7:00 pm | अमर विश्वास

दिलीपजी
सध्या माझी खालील फंडात SIP चालु आहे. बहुतेक फंडात ५ ते ८ वर्षे गुंतवणूक चालु आहे ... equated returns ही दिले आहेत ...

.

डेट फंड विषयी अनुपाजींनी वर माहिती दिलेलीच आहे.
अजुन एक महत्वाची गोष्ट : या सर्व फंडात ग्रोथ आणि डिविडेंट असे ऑपशन्स असतात. त्यातला ग्रोथ ऑपशनच घ्यावा. कॉर्पस जमण्यासाठी हे आवश्यक आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2017 - 6:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मन:पूर्वक आभार !

-दिलीप बिरुटे

अप्पा जोगळेकर's picture

15 May 2017 - 11:42 am | अप्पा जोगळेकर

तुमचा वरचा आणि हा प्रतिसाद दोन्ही पटले. फक्त पेआऊट वाले फंड का घेऊ नयेत हे कळले नाही.
ज्या प्रमाणे कंपन्या समभागांच्या प्रमाणात लाभांश देतात तसेच फंड कंपन्या लाभांश देतात. यामधे लाभांश दिल्यावर एसायपी बंद करणे अपेक्षित नाही. त्यामुळे कॉर्पस जमा होतच राहतो. शिवाय वळते झालेले पैसे अन्यत्र जसे पीपीएफ किंवा एलाय्सीचा हप्ता किंवा अन्य समभाग खरेदी इत्यादी साठी वापरले जाऊ शकतात. हे सोडून पेऑट फंडचा काही तोटा आहे का ?

अमर विश्वास's picture

15 May 2017 - 12:08 pm | अमर विश्वास

अप्पासाहेब
फंड कंपन्यांनी लाभांश दिल्यावर NAV काढतात. त्यामुळे डिवीडेंट पर्यायाची NAV ही ग्रोथ पर्यायापेक्षा कमी असते. त्यामुळे फंडामधील गुंतवणुकीचे मूल्य कमी भरते ...
अर्थात हा पैसा आपल्याला डिवीडेंट रुपाने मिळालेला असतो. पण बरेचदा हा डिवीडेंट बराच कमी (small one time value) असतो. तो आपल्या खात्यात तसाच पडुन राहतो / खर्च होतो
थोडक्यात लाभांश मिळाल्यावर लगेच तो गुंतवला जाईल असे होत नाही.
SIP चे उद्दिष्ट दीर्घ मुदतीत रक्कम (कॉर्पस) जमा करणे हे असेल तर ग्रोथ पर्याय चांगला ठरतो.
अर्थात हे मी fill it , shut it , forget it .. या सूत्रानुसार म्हणतो आहे .

जर आपल्या आर्थिक नियोजनात डिवीडेंट चा वापर करायचा असेल तर ठीक आहे .. अन्यथा ग्रोथ हा पर्याय जास्त फायदेशीर आहे ...

अमरजी, तुमचा फंड पोर्टफोलिओ आणि त्याचे रिटर्न दिल्याबद्दल आभार. तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे गेली ८ वर्षे SIP मध्ये गुंतवणूक करत आहात. वरील चित्रात जे रिटर्न दिले आहेत ते annualized per year रिटर्न आहेत का?
आणखी एक प्रश्न- म्युच्युअल फंड विषयी माहिती काढताना असे आढळले की काही गिल्ट (GILT) फंड ने सुद्धा चांगला रिटर्न दिला आहे (साधारण ८-१०%). गिल्ट फंड आणि डेट (debt) फंड यामध्ये काय फरक आहे? तसेच गिल्ट फंड ला देखील (capital gain साठी) डेट फंडचेच टॅक्स नियम लागू होतात का?

अमर विश्वास's picture

13 May 2017 - 7:55 pm | अमर विश्वास

वर दिलेले रिटर्न्स हे annualized per year आहेत.

GILT फंड्स हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करतात. हे फंड मॅक्रो फॅक्टर्स जसे इंटरेस्ट रेट्स नुसार मोठ्या प्रमाणावर वर खाली होऊ शकतात.
Invest in debt income funds for medium to long term gains and use gilt funds at opportune times... हे सूत्र आहे . या फंडातुन मिळणारे रिटर्न्स टँक्सेबल आहेत. ३ वर्षाच्या आत शॉर्ट टर्म गेन व ३+ वर्षानंतर लॉन्ग टर्म गेन्स. (डेट फंड्स प्रमाणेच )

त्यामुळे सध्या equity based MF हेच सर्वोत्तम पर्याय आहे.

अमर विश्वास's picture

14 May 2017 - 8:40 am | अमर विश्वास

वर डॉक्टर साहेबांनी व दिलीपजींनीं एक प्रश्न विचारला होता ... त्याचे एकत्रित उत्तर :

इव्हेस्टमेन्ट किती करावी व काही वर्षानंतर माझे किती पैसे जमा होऊ शकतात ?
जालावर अनेक SIP Calculator उपलब्ध आहेत (ही लिंक शकता http://www.moneycontrol.com/mf/sipplanner.php )
यानुसार जर आपण दरमहा १०,००० रुपये SIP ने गुंतवले , तर १० वर्षांनी १२% CAGR प्रमाणे आपल्याला २२,१९,३०० रुपये मिळतील
माझा गेल्या ८ चर्षतील अनुभव आहे : इक्विटी बेस्ड स्कीम्स मध्ये CAGR १२% ते १८% या दरम्यान बदलत राहतो. चांगल्या स्कीम चा CAGR १२% च्या वर असणे अपेक्षित आहे. वरील साईट वर सर्व स्कीम्सचे १, ३ ,५ आणि Since inception असे CAGR उपलब्ध आहेत. स्कीम निवडण्यापूर्वी याचा जरूर अभ्यास करावा

किती रक्कम गुंतवावी : याला दोन पर्याय आहेत ... जसे आपण गृहकर्ज घेताना दोन गोष्टी बघतो : आपल्याला किती कर्ज हवे आहे व आपली loan eligibility किती ?

तसेच इथेही ... आपल्याला किती कालावधीनंतर किती निधी हवा आहे ? आठ वर्षांपूर्वी मी ठरवले कि १५ वर्षांनी मला स्वेच्छा निवृत्ती घ्यायची आहे व मला १ कोटी रुपये हवे आहेत. त्यानुसार इन्व्हेस्टमेंट प्लॅन केली... १२% CAGR गृहीत धरला. व SIP ची रक्कम (दरमहा) ठरवली. अर्थात त्यावेळी तेव्हडी रक्कम दरमहा गुंतवणे शक्य नव्हते (Eligibility criteria :) ) नंतर दोन वर्षांनी गृहकर्ज फिटल्यानंतर SIP ची रक्कम वाढवली. आता मार्केट असेच राहिले तर ३-४ वर्षातच स्वेच्छा निवृत्ती घेऊ शकेन ...

थोडक्यात टार्गेट ठरवा व त्यानुसार गुंतवणुक सुरु करा ...

जाताजाता .. डॉक्टरसाहेब SIP सुरु करा ... मी सर्व मित्रांना SIP सुरु करायला लावली आहे. काही महिन्यांपूर्वी माझा भाचा नोकरीला लागला. त्याच्या पहिल्या पगाराची पार्टी घेताना त्याला SIP चा फॉर्म दिला .. एक हजाराची का होईना SIP चालु कर ... काही वर्षांनी हनीमूनला जाशील तेंव्हा उधळता येतील .. त्याला लगेच पटले :)

तळटीप : मी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्ट च्या सल्ल्यानुसार (चर्चा करून.. माझे शंका निरसन झाले की ) गुंतवणूक करतो .. अनेक नव्या गोष्टी समजतात .. कोणाला डिटेल्स हवे असतील तर देऊ शकतो //

सुबोध खरे's picture

14 May 2017 - 10:29 am | सुबोध खरे

अजूनही काही गोष्टी स्पष्ट नाहीत.
ऍसेट मॅनेजमेंट चार्जेस जर २ % असतील तर ते आपल्या नफ्यातून कमी होणारच म्हणजे जर दरवर्षी आपल्या नफ्यातून २ % कमी होणार. दुर्दैवाने म्युच्युअल फंड CAGR दाखवणताना या गोष्टी वगळून दाखवताना आढळतात. यामुळे प्रत्यक्षात १२ % असलेला CAGR हा ९ % च्या खाली आलेला आढळतो. मी केलेल्या मर्यादित अभ्यासात मला असे आढळून आले आहे. यात माझी चूक असेल ती काय आहे ते कोणी दाखवेल काय?
बरेच फंड AMC किती आहेत आणि कसे लावले जातात हे सांगत नाहीत याबद्दल वित्त सल्लागारहि नीट आणि नक्की कसे शुल्क लावले जाते हे सांगत नाहीत.
एक्झिट लोड हे पूर्ण रकमेवर लावले जाते कि फक्त नफ्यावर. एस आय पी वर AMC कसे लावले जातात ते समजत नाही.
कुणी स्पष्टपणे लिहू शकेल काय?
http://www.moneycontrol.com/news/business/mutual-funds-business/-1872847...

अमर विश्वास's picture

14 May 2017 - 2:28 pm | अमर विश्वास

डॉक्टरसाहेब
सर्व म्युच्युअल फंडांना ऍसेट मॅनेजमेंट चार्जेस असतात हे खरे आहे ... सेबीने हे चार्जेस २.५% पर्यंत लिमिट केले आहेत. स्कीमचा NAV काढताना ऍसेट मॅनेजमेंट चार्जेस वजा केलेले असतात. तसेच CAGR हे NAV वरून कॅल्क्युलेट करतात. त्यामुळे CAGR मधुन परत ऍसेट मॅनेजमेंट चार्जेस वजा करण्याची गरज नाही.

मी वर दिलेले रिटर्न्स NAV वर आधारित आहेत व त्यातुन ऍसेट मॅनेजमेंट चार्जेस आधिच वजा केलेले आहेत (किती ते मलाही माहित नाही कारण मी फक्त NAV बघतो / बघु शकतो) पण प्रत्यक्षात NAV कॅल्क्युलेट करताना ऍसेट मॅनेजमेंट चार्जेस किती ते मी चौकशी करून सांगतो. पण इन्व्हेस्टर म्हणुन मलातरी NAV त रस आहे

एक्सिट लोड हे पूर्ण रक्कमेवर लावतात. उदा. जर NAV १०० असेल या एक्सिट लोड १% असेल तर तुम्हाला ९९ रुपये प्रती युनिट ने रक्कम मिळते.
अर्थात बहुतेक इक्विटी बेस्ड स्कीम मध्ये १ वर्षाहून अधिक काळ गुंतवणूक केली तर एक्सिट लोड लागत नाही

अजून काही प्रश्न असतील जर जरूर विचारा .. जमेल तशी उत्तरे द्यायचा प्रयत्न करीन/ माझ्या गुंतवणूक सल्लागाराही विचारीन

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2017 - 2:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. ज्या दिवशी फंड लिक्विडेट केला त्या दिवशीच्या त्याच्या पूर्ण रकमेवर (फंड व्हॅल्यू = NAV * युनिट्स) एक्झिट लोड % लावले जाते. त्यामुळे, एक्झिट लोडची मुदत संपण्याआधी फंडाचे पैसे परत घेण्याची गरज पडू नये असाच फंड घ्यावा.

२. प्रत्येक एस आय पी ही नवीन गुंतवणूक समजली जाते व त्याप्रमाणे लागू असलेले सर्व चार्जेस लावले जातात. पूर्वी फंड मॅनेजर्स हे चार्जेस अवाच्या सवा लावत असत. सुप्रिम कोर्टाच्या नियमाप्रमाणे हल्ली त्यावर २.५% मर्यादा आली आहे. त्यामुळे, सर्वसामान्य गुंतवणूकदाराने चार्जेसची फार काळजी न करता NAV किती % ने वाढते आहे (विशेषतः लाँग टर्मवर) इकडे लक्ष देणे जास्त सोईस्कर आहे.

३. CAGR हा फंड लिक्विडेट न करता पण फंड कंपनीचे सर्व चार्जेस वजा करून, सांगितलेल्या मुदतीत, मिळालेला दरवर्ष परतावा (बुक प्रॉफिट) असतो. (Compound annual growth rate (CAGR) is a business and investing specific term for the geometric progression ratio that provides a constant rate of return over the time period.) हा फंडाच्या मागिल कामगिरीचा पुरावा असतो व त्यावरून भविष्यातल्या कामगिरीचा अंदाज बांधता येतो... पण त्याची गॅरंटी नसते.

४. फंडाचे पैसे परत घेतल्यावर त्यापैकी किती हातात राहतील (ग्राहकाचा निव्वळ परतावा) हे प्रत्येकासाठी वेगळे असू शकते व ते तुम्हाला त्या पैशावर किती आयकर भरावा लागेल यावरून ठरेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2017 - 9:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुख्य म्हणजे, फंड कंपनीच्या चार्जेसमध्ये ग्राहकाला काही करता येत नाही आणि ते सर्व ग्राहकांना समान असतात. त्यामुळे, त्यांच्यावर विचार करून काहीच फायदा नाही. त्याऐवजी...
(अ) फंड कोणत्या मूलभूत गोष्टीवर (शेअर / बाँड / सोने / फंड / इ) अवलंबून आहे;
(आ) कंपनीचा भूतकालातला व्यवहार (पास्ट परफॉर्मन्स) किती फायदेशीर झाला आहे; आणि
(इ) जरा माहितगार ग्राहक असल्यास कंपनीचे सद्याचे विश्वस्त/कार्यकारी मंडळ किती अनुभवी आहे व त्यांचा भूतकालातला या किंवा इतर कंपनीतला व्यवहार (पास्ट परफॉर्मन्स) किती फायदेशीर झाला आहे,
... हे मुद्दे जास्त लागू असतात.

डोके.डी.डी.'s picture

14 May 2017 - 10:59 am | डोके.डी.डी.

2015 ला काही शेयर आणि फंड घेतले होते परंतु 2016 ला होम लोण घेतले आणि आर्थिक नियोजन अभावी शेयर फंड विकले. आता फक्त अक्सिस लॉंग टर्म equity आणि icici लॉंग टर्म eqyity मध्ये 10 हजार bal आहे. Sip बौन्स होऊन बंद पडल्या.
मी त्या वेळी वरील दोन फंड टाटा बॅलन्स फंड sbi फार्मा फंड icici value discavy फंड घेतले होते. सध्या सगळे बंद आहत.
होम लोण 8 lak शिलक आहे 17000 हप्ता आहे.
तरी कृपया सध्या 3000 हजारsip करू शकतो तर कोणते फंड घ्यावेत की होम लोण 8.90 % व्याज दर आहे ते अगोदर फेडावे हे आपण सांगावे ही इच्छा. मी वरील फंड डायरेक्ट घेतले होते.

गॅरी ट्रुमन's picture

14 May 2017 - 12:02 pm | गॅरी ट्रुमन

तरी कृपया सध्या 3000 हजारsip करू शकतो तर कोणते फंड घ्यावेत की होम लोण 8.90 % व्याज दर आहे ते अगोदर फेडावे हे आपण सांगावे ही इच्छा.

बाजारात काही शेकड्यांनी फंड आहेत. आणि या फंडांच्या कामगिरीमध्ये चढउतार होत असतात.फंड मॅनेजर बदलला की नवा फंड मॅनेजर फंडाच्या गुंतवणुकीच्या पध्दतीत थोडेफार बदल करतोच.त्यातूनही फंडाच्या कामगिरीमध्ये बदल होऊ शकतात. तेव्हा नक्की कोणते फंड घ्यावे हे सांगता येणे कठिणच आहे (माझ्यासाठी) पण दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर देतो.

जर होमलोनवर ८.९०% व्याज भरत असाल आणि त्यापेक्षा जास्त परतावा अन्य कुठे मिळत असेल तर होमलोन परत करण्यापेक्षा दुसरी गुंतवणुक केलेली चांगली. असे म्हटले जाते की आपल्याकडे किमान ६ ई.एम.आय भरता येतील इतकी रक्कम तयार असावी. म्हणजे कोणत्याही कारणाने (अन्य खर्च इत्यादी) ई.एम.आय भरणे जड जाणार नाही. या बाबतीत मी थोडा वेगळा विचार केला आहे. दर महिन्याला ई.एम.आय पेक्षा थोडी जास्त असे करत ६-७ ई.एम.आय इतकी जास्त होमलोनची परतफेड आधीच केली आहे. म्हणजे भविष्यात ६-७ महिन्यांपर्यंत ई.एम.आय भरता आले नाहीत तरी अडचण नाही. हे करायचे कारण हे की ६ ई.एम.आय इतकी रक्कम सेव्हिंग्ज खात्यात पडून राहिली तर त्यावर फार तर ४% व्याज मिळेल. मग ४% व्याज घेऊन त्यापेक्षा बरेच जास्त होमलोनवरील व्याज का भरावे?

तेव्हा किमान ६ महिन्यांच्या ई.एम.आय ची तरतूद झाल्यावर मग त्यापेक्षा जास्त परतावा देणार्‍या गुंतवणुकींमध्ये पैसे टाकावेत असे सुचवेन.

डोके.डी.डी.'s picture

14 May 2017 - 2:14 pm | डोके.डी.डी.

तेच तर उत्तर पाहिजे की पर्यायी गुंतवणूक कुठे करावी. आणि कुठले फंड सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहेत.
मी आतापर्यंत 5 ते 6 emi एवढी रक्कम साचली की प्रिपेमेंट केले. व लोन हप्ते 180 वरून 61 वर आणले
धन्यवाद सर

अप्पा जोगळेकर's picture

15 May 2017 - 11:50 am | अप्पा जोगळेकर

पहिली १० वर्षे इएमाय मधला बहुतांश भाग व्याजासाठी खर्च होतो तर नंतरची १० वर्षे बहुतांश भाग मुद्दल देण्यात खर्च होतो. सबब
जर कर्ज नुकतेच काढले असेल आणि हातात तेंव्हापेक्षा अधिक पैसे खेळत असतील तर कर्जाचा हप्ता वाढवणे फायद्याचे ठरु शकेल.
हेच जर ६-७ वर्षे होऊन गेली असतील तर बअ‍ॅकेचा फायदा करुन देण्यापेक्षा अधिकचे पैसे गुन्तवणे केंव्हाही चांगले.

अमर विश्वास's picture

14 May 2017 - 2:32 pm | अमर विश्वास

डीडी
मी वर काही स्कीम्सची नवे दिली आहेत. त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे ..
पण तुमचे अजुन काही निकष असतील तर त्यानुसार स्कीमस सिलेक्ट करावी

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2017 - 2:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

मनी कंट्रोल हे संस्थळ Crisil Rank प्रमाणे Best Funds to Buy अशी फंडांच्या प्रकारांप्रमाणे यादी देते. फंडाची निवड करतान ती उपयोगी ठरू शकेल...

http://www.moneycontrol.com/mutualfundindia/

सावत्या's picture

14 May 2017 - 3:38 pm | सावत्या

मी भारतात असताना इक्विटी ट्रेडिंग साठी शेरखान वापरात असे. मागील ६-7 वर्षात ट्रेडिंग केलेलं नाही. काल शेरखान लॉगिन करताना FATCA (Foreign Account Tax Compliance Act (फटका)) डिकलरेशन अनिवार्य होत. Foreign Account Tax Compliance Act (फटका) फक्त अमेरिकन भारतीयांना लागू आहे का इतर परदेशी भारतीयांना पण? शेरखान वरून SIP घेऊ शकतो पण NRE साठी वेगळे नियम आहेत का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2017 - 8:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

FATCA (Foreign Account Tax Compliance Act) चा अमेरिकेत सद्या किंवा भविष्यातही व्यापार करणार्‍या कंपन्यांवर प्रभाव पडतो. त्यामुळे, भारतात गुंतवणू़क करणार्‍या 'निवासी/अनिवासी भारतिय' आणि 'अमेरिकेतले किंवा इतर कोणत्याही देशातील रहिवासी असलेले भारतिय' व 'अभारतिय नागरिक' या सगळ्यांनाच त्यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते.

अमर विश्वास's picture

14 May 2017 - 5:39 pm | अमर विश्वास

FATKA चा फटका फक्त अमेरिकेन भारतीयांना आहे.
तुम्ही NRE मधून SIP करू शकता .. पण रेडिम्पशन च्या वेळी टॅक्स भरावा लागतो .. त्याचे नियम वेगळे असतात. गुंतवणुकीपूर्वी तुमच्या CA कडून खात्री करुन घ्या

अमरजी, सुबोधजी, डोके.डी.डी, Asset Management Charges जे साधारणपणे Expense Ratio (in %age) च्या स्वरूपात दिले जातात त्याची माहिती तुम्ही वेबसाईट https://www.valueresearchonline.com/funds/ वर मिळवू शकता. वेबसाईट वर search box मध्ये फ़ंड चे नाव शोधून आलेल्या डिटेल्स मध्ये Expense Ratio पण दिलेला आहे. तसेच या वेबसाईट वर काही टॉप फंड्स ची माहिती सुध्दा दिलेली आहे जी पाहून कोणत्या फंड मध्ये गुंतवणूक करायची हे ठरवण्यास मदत होते.

कुंदन's picture

14 May 2017 - 9:35 pm | कुंदन

सर्वात मस्त मार्ग म्हणजे Direct फंडांमध्ये गुंतवणुक करणे , १ % जास्त परतावा मिळु शकेल.

मी https://www.camsonline.com/MyCAMS.aspx वापरतो.
बरेचसे फंड CAMS वाले हाताळतात.

प्रसाद भागवत's picture

14 May 2017 - 9:43 pm | प्रसाद भागवत

हा धागा वाचल्यावरच काही मुद्द्यांवर खुलासा करावा असे वाटत होते मात्र कोणास कसे ठावुक पण घागाकर्ता 'फिलॉसॉफर' वृत्तीचा असावा असे वाटुन ते मी टाळले. मात्र मिपावरील आदरणीय डॉ. दुकली (म्हात्रे आणि खरे) आणि अमर साहेबांनी टिच्चुन बॉलिंग सुरु केलेली पाहुन मीही दोन चार वाईड टाकुन घेतो.

(1) हल्लीच्या नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने काही ऑनलाईन प्लॅट्फोर्मस वापरुन SIPची अपल्याला हवी ती तारीख ठरवता येते..मारे पारंपारिक पद्ध्तीने त्या योजनेत दिलेल्या ४/५ पर्यायांपैकीच तारीख निवडावी लागते.

(2) स्मॉल कॅप फंड शक्यतो टाळा .. हे एकरकमी गुंतवणुकीबद्दल खरे असु शकते.. SIP करिता आकडेवारी पहाता फंडसची ही वर्गवारी (स्मॉल कॅप) टाळ्ण्याची तितकीशी आवश्यकता नसावी. अर्थात फंड काळजीपुर्वकच निवडावा..

(3) डेट फंडातील गुंतवणुक कमीत कमी तीन वर्ष करण्याच्या उद्येशानेच करावी....मी या विधानाशी थोडासा असहमत आहे.. केवळ करमुक्ततेचा मुद्दा म्हणुन हे ठीक असले तरी एवढा कालावधी देवु शकणार्या गुंतवणुक्दाराने डेट फंडापेक्षा किमान बॅलन्स्ड फंड निवडावा.. रहाता राहिला करमुक्ततेचा मुद्दा, डेट फंडाचा डिव्हीडंड पर्याय निवडुन अगदी कमी कलावधीकरताही उत्तम करमुक्त व्यवस्थापन करता येते

(4) लोड फंड कधीही विकत घेऊ नयेत. - विधानाशी असहमत.

(5) डेट फंडस्चा परतावा हा शेवटी रिझर्व्ह बॅकेच्या व्याजदरांशी निगडीत असतो..सध्यातरी त्यात घसरण चालु असल्याने लिक्विड वा अन्य डेट फंडसचे रिटर्न्स कमी कमी होत आहेत. अशावेळी मागील परताव्याच्या आधारे दाखविलेले आकडे हे दिशाभुल करु शकतात. खरेतर अशा फंडसमध्ये SIP करण्यामागचा तर्कच मला समजलेला नाही.

(6) केवळ Diversification हवे या गोडस हट्टाखातर योजनांची संख्या वाढवणे म्हणजे वेगवेगळ्या उडिपी होटेल्स्मध्ये जावुन ईडली खाण्यासारखेच आहे. त्यापेक्षा लार्ज कॅप/मिड कॅप/ सेक्टर वा असेच अन्य काही पर्याय शोधुन खरी विविधता आणावी असे मी सुचवेन

(7)सर्व फंडात ग्रोथ आणि डिविडेंट असे ऑपशन्स असतात. त्यातला ग्रोथ ऑपशनच घ्यावा.... हे विधान तसे पाहिले तर खरे पण सरधोपट आहे आपल्याला पैसे लागण्याची शक्यता व संभाव्य टॅक्सेशन या घटकांचाही विचार करावा.

(8)च्युअल फंड CAGR दाखवणताना या गोष्टी वगळून दाखवताना आढळतात. यामुळे प्रत्यक्षात १२ % असलेला CAGR हा ९ % च्या खाली आलेला आढळतो...असे नसते. दाखविलेला CAGR हा NAV संद्रभात असतो जी सर्व खर्च वाजा जावुनच आलेली असते. त्यामुळे तो आणखी कमी होण्याचा प्रश्न नसतो

(9)एक्झिट लोड हे पूर्ण रकमेवर लावले जाते ,,हो ते पुर्ण रकमेवर लावले जाते, अगदी तोटा झाला असला तरीही !!.
मात्र महत्वाचे म्हणजे हल्ली अनेक आघाडीचे फंडस फोलियोच्या पहिल्या १५% वा तत्सम रिडमशन्सवर अगदी अल्प काळांतही एक्झीट लोड लावत नाहीत.

(10) होम लोन फेडण्याची घाई न करता एखाद्या उत्तम ईक्विटी फंडात SIP करावी असे माझे वैयक्तिक मत आहे. याबद्दल मी येथेच एक लेख की लिहिला आहे ('शेअर बाजार रोटी,कपडा ईक्विटी और मकान ..') अधिक खात्रीकरिता व्हॉटसअप्वर सध्या बाहुबलीज ऑफ वेल्थ' म्हणुन एक यादी फिरते आहे, ती तपासावी.

(11) शेवटचे.. धोका सगळीकडेच आहे अगदी डेट फंडांतही, चांगले वाईट प्रत्येक ठिकाणी असतेच. येथे फ्रॅन्क्लीन टेम्पल्टनच्या डॅट योजनेचा उल्लेख आलाच आहे म्हणुन सांगतो ..या फ्रॅन्क्लीन टेम्पल्टनच्या 06 मोठ्या डेट योजनांत Jindal Steel and Power' या कंपनीचे 1,700 कोटी रुपये किंमतीचे रोखे विकत घेतले गेले होते.ज्यांचा फटका गुंतवणुकदारांना बसला.. बुडीतखाती गेलेल्या Amtek Auto, DLF ..अशाही कंपन्यांचे रोखे काही डेट फोलियोज मध्ये होते हे विसरुन चालणार नाही.

वेबसाईट्स बद्दलही तेच, ह्या साईटस प्राथमिक माहिती उत्तम प्र्कारे देतात व जरुर वापराव्या मात्र त्यातील रेंकिग्ज, ग्रेडिंग हे कित्पत विश्वासार्ह असेल हे तापासुन पहावेच लागते उदा. Morning Star ह्या म्युचुयल फंडास बाबतीत खुप लोकप्रिय असलेल्या साॲॲटने प्रोहित केलेल्या एका मोठ्या समारंभात Mirae Asset Emerging Bluechip Fund ह्या फंडाला सर्वोत्तम Small & Mid Cap Scheme म्हणुन गौरविण्यांत आले..वस्तुस्थिती अशी आहे की या फंडाव्ह्या फोलियोत पहिल्या 10 पैकी 04 स्टॉक्स निफ्टी या निर्देशांकातील म्हणजेच Large Cap आहेत. सध्या बहुतेक Balanced वा MIP योजनांमध्ये 70% हुन अधिक 'ईक्विटी' चा भरणा आहे

सारांश, गुंतवणुक हा अभ्यासाचा विषय आहे.आपल्या सल्लागाराला मिळणार्या कमिशनमधे कशी बचत करावी..एवढ्याच मुद्यावर आपला अभ्यास मर्यादित ठेवु नये. मी एक पुर्णवेळ आर्थिक सल्लागार असल्याने कोणती योजना चांगली याचा थेट सल्ला मी या फोरमवर देणार नाही असेही नोंदवितो

कुटस्थ's picture

14 May 2017 - 10:17 pm | कुटस्थ

प्रसादजी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

>> --> हे नाही समजले. "'फिलॉसॉफर' वृत्तीचा घागाकर्ता" यावर प्रकाश टाकाल का? मी धागा SIP बाबत काही वैयक्तिक आणि genuine प्रश्न होते म्हणून काढला होता. तसेच SIP मध्ये प्रथमच गुंतवणूक करत आहे त्यामुळे सर्वांच्या सूचना, विचार यांचे स्वागतच आहे. सर्वांच्या सूचना नक्कीच विचारात घेईन. खास करून तुमच्यासारख्या विषयातील तज्ञांच्या सूचनांवर नक्कीच विचार करेन. तसेच माझ्यासारख्या अनेकांना असे प्रश्न असतीलच (आणि आहेतच) त्यांनाही ह्या धाग्याचा नक्कीच उपयोग होईल. त्यामुळे कृपया गरज असल्यास यापुढेही खुलासा नक्की करावा ज्यायोगे सर्वांना त्याचा फायदा होईल.
>> --> सहमत.

>---> सहमत. मीसुद्धा असेच फंड निवडत आहे ज्यायोगे पोर्टफोलिओ मध्ये विविधता येईल आणि रिस्क देखील थोडीफार प्रमाणात बॅलन्स होईल.
>>>.---> जमल्यास ही यादी इथे द्याल का? माझ्यासारख्या अनेकांना ज्यांच्यापर्यंत ही यादी पोहोचली नाही त्याचा फायदा होईल.

प्रसाद भागवत's picture

15 May 2017 - 9:54 am | प्रसाद भागवत

हे नाही समजले. "'फिलॉसॉफर' वृत्तीचा घागाकर्ता"... ह्या उल्लेख एका वेगळ्या संद्र्भात होता,जो आपणाशी संबंधित नाही. आपल्या धाग्याच्या प्रामाणिक हेतुबद्दल माझ्या मनांत कसलीही शंका नाही. आपणही गैरसमज करुन घेवु नये. क्षमस्व.

(4) लोड फंड कधीही विकत घेऊ नयेत. - विधानाशी असहमत.
याबद्दल चर्चा करायला आवडेल. लोड फंड हा "गुंतवणूकदाराला" फायद्याचा कधी आणि कसा ठरतो (vs. low cost index fund) हे ऐकायला आवडेल. How will you justify the performance drag due to load, either front end load (class A) or back end load (class B)?

प्रसाद भागवत's picture

15 May 2017 - 9:47 am | प्रसाद भागवत

लोड फंड हा "गुंतवणूकदाराला" फायद्याचा कधी आणि कसा ठरतो (vs. low cost index fund) हे ऐकायला आवडेल....

मला आपल्याकडील गुंतवणुकदारांच्या मानसिकतेची मोठी गंम्मत वाटते. माझ्या अल्पमतीप्रमाणे गुंतवणुक ही करपश्चात मिळणारा परतावा किती या प्रश्नाचे उत्तर मिळवुन करायला हवी मात्र आपल्याकडे भार किती ?? सल्लागाराचे कमिशन किती ?? हेच कळीचे मुद्दे असतात.

जे कोणी स्वतःला या बाबतीत 'जागरुक' समजतात त्यांच्यासाठी खुलासा म्हणजे Load, Comission ह्याच निकषांना महत्व द्यावयाचे असेल तर मग खरा आपण तपासायला हवा असलेला खरा मुद्दा हा त्या योजनेचा Expense Ratio किता हा आहे. असे होवु शकते की बाकी खर्चात कपात करुन एखादी AMC वितरकाला थोडे अधिक कमिशन देईल... याचा अर्थ असा नाही की ती योजना महाग आहे.

इंडेक्स फंड्स आणि पुढे जावुन अगदी Exchange Traded Index Funds घेतले तरीही काही प्रमाणात खर्च असतोच. तो कमी असतो एवढेच. उदा SBI Nifty Index Fund या फंडाचा Expense Ratio हा 0.67 आहे.

पण खर्च कमी म्हणुन योजना उत्तम असे होत नाही.. भारतात ईंडेक्स फंडस तुलनेने अनेक आघाडीच्या योजनांनी दिलेला परतावा मोठ्या फरकाने अधिकट आहे. अधिक खात्रीकरिता व्हॉटसअप्वर सध्या बाहुबलीज ऑफ वेल्थ' म्हणुन एक यादी फिरते आहे, ती तपासावी. त्यात ही तुलना स्पष्ट होते.

हल्ली Entry Load नाही, Exit Load एका वर्षापर्यंतच आहे ( त्यातही आधीच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे अनेक फंड्स फोलियोच्या पहिल्या १५% वा तत्सम रिडमशन्सवर अगदी अल्प काळांतही एक्झीट लोड लावत नाहीत.) असे असताना कदाचित एकदाच भराव्या लागणाऱ्या 1%चा बागुलबुवा करुन ईंडेक्स फांद्च ची निवड करुन आपले नुकसान करुन घ्यावयाचे हे आपणच ठरवावे.

विषय निघालाच आहे म्हणुन आणखी एक असाच मुद्दा... काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स भरणार नाही,,,ही भुमिकाही अशीच आततायीपणाची आहे. भाडवली कर वाचविण्यासाठी 5% दराने व्याज देणारे (तेही करपात्र) बॉड्स घेणे खरोखर व्यवहार्य आहे का ?? याचे उत्तर माझ्यासाठी तरी नाही असेच आहे.

सुबोध खरे's picture

15 May 2017 - 10:12 am | सुबोध खरे

काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स भरणार नाही,,,ही भुमिकाही अशीच आततायीपणाची आहे. भाडवली कर वाचविण्यासाठी 5% दराने व्याज देणारे (तेही करपात्र) बॉड्स घेणे खरोखर व्यवहार्य आहे का ??
अत्युत्तम
माझ्या माहितीतील एका डॉक्टरांनी आपले गुंतवणूकी म्हणून घेतलेले घर ३० लाख रुपयांना विकले. त्यांच्या वित्त सल्लागाराच्या सल्ल्याने त्यात झालेल्या भांडवल वृद्धीवर (१६ लाखावर) २० % कर भरला आणि उरलेले २६ लाख ८० हजार त्यांनी विविध समभाग आणि म्यूच्युअल फंडात गुंतवून साधारण सव्वा चार वर्षात हेच पैसे दुप्पट केले. (२०१० ते २०१४)
तीन लाख वीस हजार रुपये कर भारण्याबद्दल त्यांना बरीच लोकांनी मुर्खात काढले पण डॉक्टरांचा आपल्या वित्त सल्लागारावर पूर्ण विश्वास होता.

एक शंका-- चांगला वित्त सल्लागार कसा गाठायचा?

प्रसाद भागवत's picture

15 May 2017 - 10:31 am | प्रसाद भागवत

चांगला वित्त सल्लागार कसा गाठायचा?

सोपे आहे..
(१)आपण स्वानुभवावरुन चांगला फ्यामिली डॉक्टर कसा गाठायचा?? चांगला वित्त सल्लागार कसा गाठायचा या बाबत MS Word मध्ये एक तपशीलवार टीपण लिहा..
(२) याच MS Word मधेल Find & replace हा पर्याय वापरुन सदरहु Document मधील Family doctor ऐवजी financial Advisor असा बदल करा.. झालं आपल काम झाल

सुबोध खरे's picture

15 May 2017 - 10:50 am | सुबोध खरे

अहो
मीच स्वतः डॉक्टर आहे आणि डिग्री घेतल्यापासून स्वतःवर आणि कुटुंबावर उपचार करीत आलो आहे
आणि अजूनतरी सगळे ठणठणीत आहेत म्हणजे मी बरा डॉक्टर असेन. ))))---

प्रसाद भागवत's picture

15 May 2017 - 11:32 am | प्रसाद भागवत

आपण उत्तम डॉक्टर आहात याची आम्हाला आपल्याला स्वतःबद्दल आहे तेवढीच खात्री आहे. म्हणुन तर म्हणतो की लोकं डॉक्टरची निवड करताना व सल्ला घेताना कसे चुकतात आणि मग कसे पस्तावतात याचा आपल्या गाठी अधिक अनुभव आहे... लोकांचे असे चुकीचे निकष हा कॉमन मुद्दा आहे असे मला सुचवायचे आहे हो..

अमर विश्वास's picture

15 May 2017 - 11:01 am | अमर विश्वास

चांगला सल्लागार कसा गाठायचा ?
रेफरंन्स .. हा सर्वोत्तम उपाय आहे ... त्यामुळे मी माझ्या सर्व मित्रांना माझ्या गुंतवणुक सल्लागाराकडे घेऊन जातो .. अर्थात ही फक्त सुरुवात (ओपनिंग द डोअर) असते.
नंतर प्रत्येकाने गुंतवणुक सल्लागाराशी चर्चा करून आपला निर्णय घयायचा ..

उदय's picture

16 May 2017 - 4:43 am | उदय

एक शंका-- चांगला वित्त सल्लागार कसा गाठायचा?
सोपा उपाय, स्वतःला आरशात बघा कारण तुमच्या पैशाची काळजी तुमच्याइतकी कुणीही घेणार नाही. कदाचित तुम्ही भारतातले डॉ.
बर्नस्टाइन
व्हाल जे आधी न्यूरोसर्जन होते.

सुबोध खरे's picture

16 May 2017 - 9:55 am | सुबोध खरे

इतकी वर्षे "मीच" माझ्या पैशाचा विनियोग करत आलो आहे. कारण दुर्दैवाने मला जे वित्त सल्लागार भेटले ते एकांगी आणि चाकोरीबद्ध विचार करणारे आढळले यात मी CNBC TV १८ च्या शो मध्ये गेलो होतो तेथेही तसेच चाकोरीबद्ध वित्त सल्लागार भेटले.
त्यातून बरेच सल्लागार स्वतः विकत असलेले "विमे किंवा म्यु. फंडात" गुंतवणूक करा असेही सांगताना आढळले.
म्यु फंड हि गुंतवणूक सुद्धा बाजार वर असेल तेंव्हाच जास्त पैसे देते. बाजार गाळात असेल तेंव्हा डिव्हीडंड देणारे म्यु. फंड एक दमडीही डिव्हीडंड देत नाहित. जे वरिष्ठ नागरिक म्युच्युअल फंडाच्या डिव्हीडंड वर अवलंबून होते त्यांची परिस्थिती २००८-ते २०१० मध्ये अतिशय बिकट झालेली मी स्वतः पाहिलेली आहे. अशा वेळेस आपले समभाग किंवा फंड विकायला गेले तर कवडीमोलाने विकावे लागते.
म्यु फंड सुद्धा हा सर्व CAGR इ. केवळ चढत्या बाजारात असताना दाखवतात. बाजार पडलेला असताना त्यांचा NAV पण कमी असतो आणि CAGR पण.
जालावर सुद्धा कोणत्या काळात त्या फंडाचा CAGR किती होता हे समजण्याची सोय नाही. CNBC किंवा MONEYCONTROL यांनी सुद्धा तांत्रिक विश्लेषक ( TECHNICAL ANALYST) यांनी पूर्वी काय सल्ला दिला हे आता दाखवेनासे झाले. माझ्या कडे एकाच समभागा बद्दल (इंडिया सिमेंट) तीन दिवसात तीन वेगवेगळे सल्ले. "ठेवा( कारण कंपनी चांगली आहे) , विका( कंपनी गाळात आहे) आणि विकत घ्या( कंपनी भरघोस नफा करेल) " असे सल्ले दिल्याचे (सुदर्शन सुखानी यांचे) स्क्रीनशॉट आहे
चढत्या बाजारात असताना आपले पैसे काढून घ्या आणि मुदत ठेवीत गुंतवा असे सांगणारे वित्त सल्लागार फारच कमी आहेत. मुदत ठेवीत भांडवल सुरक्षित राहण्याची हमी असते तशी कोणत्याही समभाग किंवा म्युच्युअल फंडात नसते ते सांगायला बरेच वित्त सल्लागार "विसरतात." बुडत्या काळात भांडवल र्हास झालेला पाहणे हि अतिशय कष्टाची बाब आहे. विशेषतः ज्यांनी आयुष्यभर पै पै जमवून वृद्धापकाळासाठी धनसंचय केलेला असतो अशा मध्यमवर्गासाठी.
या सर्व "कमतरता" लक्षात घेऊनच माणसाने आपले वित्त व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

उदय's picture

16 May 2017 - 4:29 am | उदय

मला आपल्याकडील गुंतवणुकदारांच्या मानसिकतेची मोठी गंम्मत वाटते. माझ्या अल्पमतीप्रमाणे गुंतवणुक ही करपश्चात मिळणारा परतावा किती या प्रश्नाचे उत्तर मिळवुन करायला हवी मात्र आपल्याकडे भार किती ?? सल्लागाराचे कमिशन किती ?? हेच कळीचे मुद्दे असतात.
एकदम खरी गोष्ट आहे. In the end, it matters what you keep. त्यामुळे गुंतवणुकीत होणारी वाढ, गुंतवणुकीतला खर्च आणि आयकर हे सर्व बघावे लागते. वृद्धी जास्त आणि खर्च + आयकर कमी केला की नेट फायदा जास्त होतो. त्यामुळे लोड नकोच (जे कमिशनच्या रुपात गुंतवणुकदाराच्या खिशातून जाते), एक्स्पेन्स रेशिओ कमीच हवा. तुम्ही ५% लोड दिले तर १००० रुपयांऐवजी तुमचे ९५० रुपयेच गुंतवले जातात, म्हणजे तुम्ही खड्ड्यातूनच सुरुवात करता. बॅकएण्ड लोडने तुमचा फायदा कमी होतो.
या वर्षीच्या वॉरन बफेच्या रिपोर्टबद्दल हे वाचा. Yes, expenses do matter.

SBI Nifty Index Fund या फंडाचा Expense Ratio हा 0.67 आहे.
दुर्दैवाने हा पण खूप जास्त आहे. मी गुंतवणूक करतो त्याचा 0.04% आहे. पण बहुदा भारतात अजून असे फंड मिळत नाहीत. जेव्हा व्हॅनगार्ड भारतात म्युचुअल फंड सुरू करेल तेव्हा खरोखर भारतातील गुंतवणूकदारांचा खूप फायदा होईल.

विषय निघालाच आहे म्हणुन आणखी एक असाच मुद्दा... काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स भरणार नाही,,,ही भुमिकाही अशीच आततायीपणाची आहे.

टॅक्स मॅनेज्ड म्युचुअल फंड असा एक प्रकार असतो ज्यात शॉर्ट टर्म गेन्स कमी ठेवण्याचा प्रयत्न असतो कारण शॉर्ट टर्म गेन्स हे तुमच्या वार्षिक उत्पन्नात धरले जातात आणि जास्त दराने आयकर भरावा लागतो.

उदय's picture

16 May 2017 - 4:30 am | उदय

मला आपल्याकडील गुंतवणुकदारांच्या मानसिकतेची मोठी गंम्मत वाटते. माझ्या अल्पमतीप्रमाणे गुंतवणुक ही करपश्चात मिळणारा परतावा किती या प्रश्नाचे उत्तर मिळवुन करायला हवी मात्र आपल्याकडे भार किती ?? सल्लागाराचे कमिशन किती ?? हेच कळीचे मुद्दे असतात.
एकदम खरी गोष्ट आहे. In the end, it matters what you keep. त्यामुळे गुंतवणुकीत होणारी वाढ, गुंतवणुकीतला खर्च आणि आयकर हे सर्व बघावे लागते. वृद्धी जास्त आणि खर्च + आयकर कमी केला की नेट फायदा जास्त होतो. त्यामुळे लोड नकोच (जे कमिशनच्या रुपात गुंतवणुकदाराच्या खिशातून जाते), एक्स्पेन्स रेशिओ कमीच हवा. तुम्ही ५% लोड दिले तर १००० रुपयांऐवजी तुमचे ९५० रुपयेच गुंतवले जातात, म्हणजे तुम्ही खड्ड्यातूनच सुरुवात करता. बॅकएण्ड लोडने तुमचा फायदा कमी होतो.
या वर्षीच्या वॉरन बफेच्या रिपोर्टबद्दल हे वाचा. Yes, expenses do matter.

SBI Nifty Index Fund या फंडाचा Expense Ratio हा 0.67 आहे.
दुर्दैवाने हा पण खूप जास्त आहे. मी गुंतवणूक करतो त्याचा 0.04% आहे. पण बहुदा भारतात अजून असे फंड मिळत नाहीत. जेव्हा व्हॅनगार्ड भारतात म्युचुअल फंड सुरू करेल तेव्हा खरोखर भारतातील गुंतवणूकदारांचा खूप फायदा होईल.

विषय निघालाच आहे म्हणुन आणखी एक असाच मुद्दा... काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स भरणार नाही,,,ही भुमिकाही अशीच आततायीपणाची आहे.

टॅक्स मॅनेज्ड म्युचुअल फंड असा एक प्रकार असतो ज्यात शॉर्ट टर्म गेन्स कमी ठेवण्याचा प्रयत्न असतो कारण शॉर्ट टर्म गेन्स हे तुमच्या वार्षिक उत्पन्नात धरले जातात आणि जास्त दराने आयकर भरावा लागतो.

प्रसाद भागवत's picture

16 May 2017 - 9:39 am | प्रसाद भागवत

सर, आम्ही भारतात रहातो.. अमेरितील अर्थसाक्षरतेची तुलना येथे होणे शक्य नाही येथे दसऱ्याच्या दिवशी लुटायचे प्रतिकात्मक सोने घेताना आपट्याऐवजी कांचनाची पान घेणारी जनता आहे..सबब Expense Ratio जास्त असणारच.

बाकीही बरेच फरक आहेत तेंव्हा बफेट साहेबांची ही टिपण्णी, अथवा टॅक्स मॅनेज्ड म्युचुअल फंड, आपली रिक्स प्रोफाईल सांगीतली की फंड सुचविणारे सॉफ्ट्वेअर वगैरे संदर्भ गैरलागु आहेत. भाकरीची तुलना पिझ्झाबरोबर कशाला करायची ?? अर्थात येथे भाकरी निकृष्ट वा हिणकस असे मला सुचवायचे नाही, खरेतर स्थिती उलटीच आहे.

अमर विश्वास's picture

15 May 2017 - 11:07 am | अमर विश्वास

प्रसादजी
स्मॉल कॅप फंड शक्यतो टाळा.. हे मी लिहिले आहे ते या धाग्याच्या संदर्भात..
पहिल्यांदाच SIP मध्ये गुंतवणुक करताना .. ते सुद्धा गुंतवणुक सल्लागाराशिवाय ...
या परिस्थितीत स्मॉल कॅप फंड टाळणे मला तरी श्रेयस्कर वाटते .. कारण रिस्क कमी होते ...

प्रसाद भागवत's picture

15 May 2017 - 11:27 am | प्रसाद भागवत

आपल्या मताचा आदर आहे.. मात्र SIP ह्या पर्यायातच धोका कमी होण्याची रचना असल्याने मी ह्या पर्याया करिता अधिक आक्रमक फंडस निवडावे या मताचा आहे..

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत झालेला तोटा इतर गुंतवणुकीच्या नफ्याच्या विरुद्ध दाखवता येतो का? समभागातील तोटा दाखवता येतो तसा?

" बाहुबलीज ऑफ वेल्थ' म्हणुन एक यादी फिरते आहे, ती तपासावी "---> ही यादी कोणाकडे आली आहे का? असल्यास कृपया धाग्यावर पाठवावी.

प्रसन्न३००१'s picture

15 May 2017 - 10:22 am | प्रसन्न३००१

लिक्विड फंडांसाठी टॅक्स इम्प्लिकेशन्स काय असतात. समजा, मी ठराविक मुदतीने पैसे भरत गेलो आणि त्यातील काही पैसे काढून घेतले तर अशा वेळी मला किती टॅक्स भरावा लागेल?

सुबोध खरे's picture

15 May 2017 - 12:22 pm | सुबोध खरे

एस आय पी सारखाच एस डब्ल्यू पी (SYSTEMATIC WITHDRAWAL PLAN) हा तितकाच महत्त्वाचा.
बऱ्याच वेळेस लोक समभाग किंवा म्यु. फंडात पैसे गुंतवतात आणि बाजार तेजीत असताना ते विकत नाहीत त्यामुळे नंतर आपल्या पैशाची कमी झालेली किंमत पाहणे नशिबी येते. याचा मी स्वतः सुद्धा अनुभव घेतला आहे.
एखादे फळ जेंव्हा पूर्ण पिकले असेल तेंव्हाच तोडणे आणि सेवन करणे फायदेशीर असते अन्यथा त्याची चव अति पिकल्यामुळे उतरते असा सार्वत्रिक अनुभव आहे.
दुर्दैवाने बाजार किती चढेल याचे कुणीच भाकीत करू शकत नाही त्यामुळे बाजार जेंव्हा पडत असतो तेंव्हा जसे समभाग किंवा म्यु. फंडात पैसे गुंतवावेत तसेच बाजार चढत असताना आपले थोडे फार पैसे मोकळे करणे तितकेच आवश्यक आहे. यासाठी SWP पण करा असा सल्ला वित्तीय सल्लागार देतात

प्रसाद भागवत's picture

15 May 2017 - 12:28 pm | प्रसाद भागवत

सहमत,
सर्व फंडात ग्रोथ आणि डिविडेंट असे ऑपशन्स असतात. त्यातला ग्रोथ ऑपशनच घ्यावा.... हे विधान तसे पाहिले तर खरे पण सरधोपट आहे आपल्याला पैसे लागण्याची शक्यता व संभाव्य टॅक्सेशन या घटकांचाही विचार करावा. हे विधान करताना हा मुद्दाही मला लिहायचा होता.

अमर विश्वास's picture

15 May 2017 - 12:49 pm | अमर विश्वास

प्रसाद साहेब
मी फारच सरधोपट माणुस आहे :)

मी वर प्रतिसाद दिला आहे तेच परत लिहितो
फंड कंपन्यांनी लाभांश दिल्यावर NAV काढतात. त्यामुळे डिवीडेंट पर्यायाची NAV ही ग्रोथ पर्यायापेक्षा कमी असते. त्यामुळे फंडामधील गुंतवणुकीचे मूल्य कमी भरते ...
अर्थात हा पैसा आपल्याला डिवीडेंट रुपाने मिळालेला असतो. पण बरेचदा हा डिवीडेंट बराच कमी (small one time value) असतो. तो आपल्या खात्यात तसाच पडुन राहतो / खर्च होतो
थोडक्यात लाभांश मिळाल्यावर लगेच तो गुंतवला जाईल असे होत नाही.
SIP चे उद्दिष्ट दीर्घ मुदतीत रक्कम (कॉर्पस) जमा करणे हे असेल तर ग्रोथ पर्याय चांगला ठरतो.
अर्थात हे मी fill it , shut it , forget it .. या सूत्रानुसार म्हणतो आहे .

जर आपल्या आर्थिक नियोजनात डिवीडेंट चा वापर करायचा असेल तर ठीक आहे .. अन्यथा ग्रोथ हा पर्याय जास्त फायदेशीर आहे ...

डोके.डी.डी.'s picture

16 May 2017 - 8:05 am | डोके.डी.डी.

या धाग्यावर होत असलेल्या चर्चेतून खूप नवीन आणि उपयुक्त माहिती मिळत आहे. आपले आभार
पहिली शंका अक्सिस लॉंग टर्म या ELSS फंडां मध्ये माझी एक sip चालू होती की जी सध्या बंद आहे सध्या यातच नव्याने sip चालू करू का
दुसरी शंका मी शेयर आणि mutual फंडासाठी icici बँकेत ऑल इन वन सेविंग ट्रँडींग डिमॅट खाते उघडले होते . पण आता सेविंग खाते जर बँड केले तर डिमॅट खाते बंद होईल काय
आणि डिमॅट खाते नवीन खोलता येईल का . गरजेचे आहेच का विशेषतः mutual फंडासाठी
बाहुबलीज ऑफ वेल्थ ही यादी असेल तर टाका इथेच.

अनुप ढेरे's picture

16 May 2017 - 9:39 am | अनुप ढेरे

म्युचुअल फंड विकत घ्यायला डिमॅटची गरज नाही. त्या त्या कंपन्यांच्या सायटीवर जाऊन त्यांचे फंड विकत घेता येतात. किंवा
https://www.fundsindia.com/ या साईटवरून देखील घेता येतात.

अमर विश्वास's picture

16 May 2017 - 12:15 pm | अमर विश्वास

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी डीमॅट ची गरज नाही

चिनार's picture

16 May 2017 - 9:59 am | चिनार

SIP बद्दल एक प्रश्न,
एक वर्षानंतर Equity सिप रीडिम केल्यावर इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही. पण हे एक वर्ष कसं मोजलं जाते?
उदा.
१-१-२०१७ ला मी १००० रु. दरमहाची सिप चालू केली तर १-१-२०१८ ला पूर्ण वर्षभराची पुंजी रिडिम केल्यास त्यावर टॅक्स माफ आहे का? की फक्त १-१-२०१७ च्या युनिट्सवर टॅक्स माफ होईल??

प्रसाद भागवत's picture

16 May 2017 - 10:15 am | प्रसाद भागवत

गुंतवणुकीचा प्रत्येक व्यवहार वेगळा मानला जाईल, त्या व्यवहाराच्या तारखेपासुन एक कॅलेडर वर्ष हा कालावधी ग्राह्य घरला जाईल सबब फक्त १-१-२०१७ च्या युनिट्सवर टॅक्स माफ होईल