कसे या मनाला कसे जोजवावे?

Primary tabs

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
12 May 2017 - 3:45 am

कसे या मनाला कसे जोजवावे?
जरा दुःखही शांत व्हावे,निजावे!

कुठे भागते आपलेही खरेतर?
सुखांनी सुखांना कितीदा गुणावे!

किनारा कधी सांगतो का कुणाला?
किती सागराने दिले हेलकावे!

कधी ओल जाते कधी ऊल जाते
कळेना कसे या मनाला चिणावे!

तिचे ओठ देतील तपशील नंतर
मुक्याने तिने जर तुला बोलवावे!

विसरणे तसे फार असतेच अवघड
उगां एकमेकां कधी गुणगुणावे!
(असे या मनाला,असे जोजवावे!)

—सत्यजित

कवितागझलgajhalgazalमराठी गझल

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

12 May 2017 - 11:41 am | संजय क्षीरसागर

कधी ऊल जाते म्हणजे काय ?

Jabberwocky's picture

14 May 2017 - 10:31 pm | Jabberwocky

खूप छान कविता करता तुम्ही.....

सत्यजित...'s picture

15 May 2017 - 4:48 am | सत्यजित...

धन्यवाद संजयजी!
ऊल जाणे=भेगाळणे/तडा जाणे

jabberwocky धन्यवाद!

संजय क्षीरसागर's picture

15 May 2017 - 4:19 pm | संजय क्षीरसागर

शब्दप्रयोग छाने . थंडीत आपण अंग `उललं' म्हणतो !