वऱ्हाडी स्मार्ट सून बाई....

दिव्य चक्षु..'s picture
दिव्य चक्षु.. in जनातलं, मनातलं
9 May 2017 - 1:34 pm

विनंती: एकच भाषा असेल तरी दोन प्रांतांमधल्या बोलीभाषेच्या फरकामुळे होणारी गंमत आणि गैरसमज यातून निर्माण झालेला विनोद अशा दृष्टिकोनातूनच या माझ्या पहिल्याच लेखाकडे पहावे

पुण्यातल्या मुलगा अट्टल विदर्भातल्या मुलीच्या प्रेमात पडला, आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले,मुलाच्या घरचे ह्या बातमीने हैराण झाले, अरे पण तू असे कसे करू शकतोस?

मुलाने आपला निर्णय जाहीर केला लग्न करेन तर मालू शी नाहीतर संन्याशी, त्याचे बाबा जोरात ओरडले अरे तू सन्या शी पण लग्न करायला तयार आहेस? , मग मालूशीच लग्न कराचे का म्हणतोस ? मुलगा म्हणजे बाळू वैतागून म्हणाला नाही हो बाबा संन्यासी म्हणजे ते दाढी मिशा वाढवून फिरतात तसे, मुलाच्या आईने माघार घेत लग्नाला परवानगी दिली...

लग्न थाटात पार पडले नवीन सून बाई सासरी निघाल्या, तिच्या आईने कान मंत्र दिला,” बायवो लग्न त तू तुह्या मर्जीन केल पन आपला वऱ्हाडी बाना राखून ठेव गड्या,नायतर होऊन जाशीन पुनेवाली."

पोरीने आईला मिठी मारली आणि सांगितले मी मरून जाईन पण वऱ्हाडीच राहीन तू नको काळजी करू. आईने प्रेमाने निरोप दिला,
मालू सासरी आली.

नवीन सूनबाई .. सासूबाई म्हणाल्या आता मी मोकळी झाले ग बाई... मोकळी झाले? मालू ने कान टवकारले, मनातच म्हणाली.. ह्या बाईच्या मनात का का लपून हाय ते पयले तपासा लागन मंग आपन आपले इचार सांगू तिले नाहीतर तूह काही खर नाही माले..तुले आईचा मंतर याद कराच लागते बाई “वऱ्हाडी रायजो “..ठरल
रात्री उशिरा पर्यंत गप्पाटप्पा मारून सासरची मंडळी सकाळी थोडी उशिराच उठली.. मालू मात्र आधी उठून कसे काय आहेत बाकीचे हे बघायला गेली , सासूबाई पण झोपल्याच होत्या, मालू त्यांच्या कानाशी जाऊन जोरात ओरडली आई चा मांडू का? सासूबाई तडफडतच उठल्या, अग हे काय मांडू? नाही मालू सकाळी सकाळी कानात काय ओरडतेस? मालू म्हणाली, मी का म्हटल का मी ‘पहाटेच” उटले न त मले आता कंटाळा येऊन ऱ्हायला त चा मांडू का बा अस इचारत होते. मन्जे सर्वे लोक आता उठूनच र्‍हायले न.... म्हनून

सासू बाईना काहीच कळेना ही पहाटेच उठली आणि हीला कंटाळा आला आणि म्हणून मांडू का ? काय असत ते ? सासू बाईनी परत विचारले म्हणजे काय करणार आहेस?

मालू म्हणाली आवो आई मी म्हटल का चा मांडू का? तेवढ्यात मुलगा उठला सासू बाई म्हणाल्या अरे बाळू ही काय बोलते ते काही कळत नाही तूच विचार.तशी मालू म्हणाली “आवो मी त पहाटेच उठून बसली मले काही रातभर झोप लागली नाही बा.. मच्चर भाय डसे मंग मी उठूनच गेली” .. बाळू चक्रावला हे काय ही तर रात्रभर जोरजोरात घोरत होती आता तासा पूर्वी माझा डोळा लागला.

तोच मालू ओरडली आवो असे बह्याडावानी कावून पाहून राह्यले... मी म्हटल का चा मांडू का? सासू बाई परत बाळूवर ओरडल्या अरे ती काय बोलते आहे असे किंचाळून ते बघ ना, शुंभा

बाळू भानावर आला अग ती म्हणते आहे कि चहा ठेऊ का, अस होय मग ठेव की त्यात अस किंचाळायच कशाला, आमी असच बोलत असतो मालू म्हणाली, सासुबाईनी हात जोडले, बर आता कोणाला चहा कि कॉफी ते विचारून घे, मालू बाहेर, गेली कोनकोन चा घेनार हाय ते सांगा बर पट पट आन कोनकोन कॉफी घेनार ते बी आताच सांगून द्या मन्जे तशी मले मांडाले, आता मांडू ह्याचा अर्थ घरात कळला होता, प्रत्येकाने आपली फर्माईश पेश केली, लगेच मालू ओरडली दातगीत घासले का गुरल्या करूनच बसून ऱ्हायले. सगळे परत आं....? आता हे काय गुरल्या , बाळू पुढे आला आणि म्हणाला अरे दात घासलेत कि नुसती चूळ भरूनच बसलाय सगळे असे विचारतिये ती.. ओके मालू चहा, कॉफी घेऊन आली घ्या एकदम बढीया बनाया है म्हणाली.चहा घेता घेताच मालू तिच्या टोन मधे म्हणाली नाष्ट्याले काय बनवू ते सांगा न आई?? सासू बाई म्हणाल्या मी करते तू बैस, मालू कसली ऐकतीये परत जोरात म्हणाली , कावोन अशा करता... मी देते न बनवून का बनवू ते सांगा उकरपेंडी बनवू का बढीया, बाळूचे डोळे चमकले, सासूबाई विचारात पडल्या, सासरे पेपरात डोके खुपसून बसले इतर मंडळी सोयीस्कर रित्या आपापल्या कामाला लागली, सासूबाई प्रेमाने म्हणाल्या आज पोहेच कर, मालू परत बोललीच, आवो आलू पोहे, बनवू का? पोपट त आता भेटनार नाही. त सांबार च टाकते, सासरेबुवा वैतागले अरे हे काय चाललय ?पोपट काय, सांबर काय ? सकाळ पासून पोह्यात कोणी खात का? आपले साधे पोहे कर नाहीतर माझी बायको करेल, अन ए बाळ्या तू काय असले पदार्थ करायला परवानगी देणार आहेस? , असले भयानक प्रकार नकोत, उगाच कोणी ऐकल तर आपल्या घरावर प्राणीमित्र संघटना, मोर्चे काढतील, बाळू काही बोलणार तो मालू मध्ये ओरडली, बर.... मी बनवते आलुपोहे पन सांबार त टाकाच लागते ते काही भयानक गीयानक नसते, सासरे मान डोलावून पेपर वाचायला लागले,आणि म्हणाले घाला सांबर,शेळी कोंबडी,आता काय काय पुढ्यात येईल देव जाणे, मालू जोरात हासली तुमी बी बम मजाक करता जी, मले वाटल नवत, सासरे हताशपणे हसले, बाळू खुश क्या बात है सुग्रण बायको..मालूने बटाटे, कोथिंबीर घालून पोहे केले, ते पाहून घरातील मंडळींचा जीव भांड्यात पडला, पोहे खाता खातच मालू सासूबाईना म्हणाली आई आता तुमी आंग धून घ्या न पटकन, अन आवो तुमी काल म्हनत होते ना म्हाल्या कड जातो आन येताना वठ्या कडून कपडे घेतो... त जा बर पटकन फुकट इथ बह्याडा सारख बसून राहू नका, सगळे परत आं..... आता हा कुठ जातोय बाळू म्हणाला जरा सलून मध्ये जाऊन, आणि येताना धोब्याकडून कपडे घेऊन येतो,आता घरातल्या सगळ्यांना प्रश्न पडू लागले ही कोणती भाषा बोलतीये, मराठी आहे असे तर वाटते,

तेवढ्यात मैनाबाई आल्या कामाला, काय सुनबाई मजेत का त्यांनी प्रश्न विचारला, मी त सादरी हावो तुमी? बाहेर उन् चांगलच पडून ऱ्हायला न तुमी कानपट गिनपट बांधून डोक्यावर शेव घेऊन फिराबर नाहीतर झाव लागून तरास होते न ...खूप उन असन त कांदा बी ठेवाव जवळ... झाव नाही लागत, सासूबाई सगळ ऐकत होत्या ही बया काय बोलतेय काही कळत नाही आता डोक्यावर शेव न कांदा घेतल्याने उन लागत नाही, म्हणे नुसती लाज काढणार आहे, मैनाबाई काहीतरी समजल्या सारखी मान हालवून कामाला लागल्या, मालू परत सासूबाईंच्या पुढे गेली तश्या त्याच म्हणाल्या थोड सावकाश बोल ग बाई मी ऐकतीये, मालू म्हणाली आता सैपाकाच पहा लागते न.. का बनवू आता फोड्नीच वरण, भात, पोळ्या अन भाजी कोनती बनवू , सासूबाई म्हणाल्या मी बघते तू थांब, ऐकेल तर ती मालू नाहीच, आवो अस कस म्हनता तुमी मी केल त का झाल ? तुमी करा आराम, बर त सांगा न भाजी कायची बनवा लागते, मी फ्रीज मदी पायल भेद्र, वांगे, अन खिरे पडून हाय, आलू न कांदे गिंदे घालून काही जमवू का, का नुस्त वरण कलसू, अरे देवा.. ही काय बोलतीये एकदा समजल न तर नारळ ठेवीन रे बाबा, सासूबाई नि मनात देवाला नवसच बोलला, काय करायचं ते कर पण जरा जपून. बोलणी मला खावी लागतील, तुझ्या रेसिपीमुळे, आस कस म्हनताजी तुमी.... मी त आमच्या वेटाळात एक नंबर सैपाक बनवो न....मी तवाच हे माह्या प्रेमात पडले, माहया आई न मले सांगितलच होत का जे विद्यार्थी शिकाले येऊन राहते, त्यायची खान्या पेन्याची जबाबदारी घे, एखांदा पटतेच,सासूबाई थक्क होऊन पहात राहिल्या. कर बाई काही पण ...

मालू ने स्वयंपाक केला तिखट तर्रीदार , आवडला सगळ्यांना पण सासरे म्हणाले सुनबाई मला थोडा तिखटाचा त्रास होतो, जरा जपून ,मालू ओरडली आस हाय का मंग पयलेच कावून नाही सांगितल मी तुमच्या साठी गोळा वरण पन ठेवल असत न ....सगळे हताश झाले अग बाई थोड हळू बोल आणि कमी तिखट कर बास..
जेवल्यानंतर सगळे थोडे पडले हे वऱ्हाडी जेवणाची गुंगी चढू लागली होती, दुपारचा चहा झाला,

सासूबाई टीवीवर सिरीयल बघत होत्या, मालू तिच्या टोन मधे म्हणाली, आई तुमी संध्याकाळी घुमता का? काय? त्या घाबरूनच गेल्या आता ही बया काय करायला सांगतेय कोण जाणे. नाही,मंजे मले संध्याकाळी घुमाची सवय हाय ना, म्हनून विचारल, अग बाई हीला संचार बिंचार होतो कि काय संध्याकाळचा? त्या घाबरूनच गेल्या, उठून बाळूच बखोट धरून त्याला फरपटच आतल्या खोलीत घेऊन गेल्या अरे मुर्खा आता हे काय ऐकतीये मी..?बाळू गोंधळला काय झाल?
मालू संध्याकाळी घुमते म्हणे आधी माहित नव्हत का तुला बावळ्या कसा रे तू आता ही रोज संध्याकाळी घुमायला लागली तर कसे होणार ?. बाळूला सगळा गोंधळ लक्षात आला, अग ती घुमायला म्हणजे बाहेर फिरायला जाऊ या का असे विचारत असेल सासूबाई हताशपणे खाली बसल्या बाळू ला म्हणाल्या अरे कुठे वऱ्हाडी मराठी -
पुणेरी मराठी अशी डिक्शनरी मिळते का ते बघ, एकाच दिवसात भितीने जीव अर्धा झाला पुढे अख्खा जन्म आहे रे. ती सुधारतेय का बघ नाहीतर मला बिघडायला...

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

दशानन's picture

9 May 2017 - 1:43 pm | दशानन

हा हा हा!
हसून हसून फुटलो!!!!!
=))

लै भारी... आवडलं.

पद्मावति's picture

9 May 2017 - 2:27 pm | पद्मावति

अहो, काय खतरनाक लिहिलंय हो =))
आणि प्लीज़, प्लीज़ अगदी प्लीज़ हे क्रमश: करा ना. हे अस एका भागात जी अभी भरा नही :) येऊ द्या अजुन.

माहया आई न मले सांगितलच होत का जे विद्यार्थी शिकाले येऊन राहते, त्यायची खान्या पेन्याची जबाबदारी घे, एखांदा पटतेच,

=))

ओढून ताणून केलंय. उगाच वर्‍हाडी कशी हुच्च ते दाखवायला.

चिनार's picture

9 May 2017 - 1:48 pm | चिनार

मस्त जमलंय !!!
लिवा अजून..

सानझरी's picture

9 May 2017 - 2:05 pm | सानझरी

हाहाहा.. झकास लिहीलंय..
आई तुमी संध्याकाळी घुमता का?
बेक्कार हसतेय.. हे सगळे जोक्स प्रत्यक्षात अनुभवलेत.. अजिबात अतिशयोक्ती नाही. . भारी लिहीलंय.. =))

पाटीलभाऊ's picture

9 May 2017 - 2:23 pm | पाटीलभाऊ

हाहाहा...झ्याक लिवलंय

सविता००१'s picture

9 May 2017 - 2:30 pm | सविता००१

फर्मास जमलंय. अगदी असंच होईल. डोळ्यांपुढे आला सगळा प्रसंग. भारी.
हहपुवा.
येउद्या अजून.... :)

मितान's picture

9 May 2017 - 2:39 pm | मितान

=)) =))

कपिलमुनी's picture

9 May 2017 - 2:53 pm | कपिलमुनी

लॉबीमधे मुले उभी असताना अमरावतीकर सर म्हणाले , पोट्टे हो , मधात या !

अभ्या..'s picture

9 May 2017 - 4:07 pm | अभ्या..

च्यामायला.
=))

पैसा's picture

9 May 2017 - 4:25 pm | पैसा

अजून लिहा! =))

एस's picture

9 May 2017 - 4:52 pm | एस

:-)

इरसाल कार्टं's picture

9 May 2017 - 5:07 pm | इरसाल कार्टं

माहया आई न मले सांगितलच होत का जे विद्यार्थी शिकाले येऊन राहते, त्यायची खान्या पेन्याची जबाबदारी घे, एखांदा पटतेच,

कहर :)

मंजूताई's picture

9 May 2017 - 6:53 pm | मंजूताई

सही लिहाले बे!

अमलताश's picture

9 May 2017 - 7:01 pm | अमलताश

अरे तू सन्या शी पण लग्न करायला तयार आहेस? , मग मालूशीच लग्न कराचे का म्हणतोस ?

ईथपासून जे हसलो ते शेवटपर्यंत ... भन्नाट लिहिलंय..

चांदणे संदीप's picture

9 May 2017 - 7:02 pm | चांदणे संदीप

मस्त विनोदी, हहपुवा झाली अगदी. =)) =))

फक्त तेवढं कॉमा-गिमा च बघा नं राव!

Sandy

उगा काहितरीच's picture

9 May 2017 - 7:12 pm | उगा काहितरीच

मस्त !

सचिन काळे's picture

9 May 2017 - 9:13 pm | सचिन काळे

'कॉमेडी एक्स्प्रेस'वाले छान सादर करतील. हसून हसून पुरेवाट होईल.

कौशी's picture

9 May 2017 - 9:14 pm | कौशी

हसुन हसुन दमले...अजुन लिहा.

प्रमोद देर्देकर's picture

9 May 2017 - 9:26 pm | प्रमोद देर्देकर

तुम्ही लिहा हो बिनधास्त. आम्हांला मजा येतेय.
काही लोकांकडे दुर्लक्ष करा.

इशा१२३'s picture

9 May 2017 - 10:19 pm | इशा१२३

ह ह पु वा! लिहा अजुन

इडली डोसा's picture

10 May 2017 - 12:09 am | इडली डोसा

मस्त लिहिलय, आवडली वर्‍हाडी सु.बा.

ट्रेड मार्क's picture

10 May 2017 - 12:43 am | ट्रेड मार्क

हहपुवा झाली. फक्त वर संदीपराव म्हणतात तसं कॉमा गिमा नीट द्या. नाहीतर वाक्याचा पूर्ण अर्थच बदलून जातो.

टवाळ कार्टा's picture

10 May 2017 - 7:05 am | टवाळ कार्टा

खि खि खि ख्या ख्या ख्या

मित्रहो's picture

10 May 2017 - 7:34 am | मित्रहो

मजा आली.
मस्त हसलो, भरपेट

सविता००१'s picture

10 May 2017 - 10:23 am | सविता००१

ही पोस्ट लेखकाच्या नावाशिवाय फिरायला लागली आहे काय अप्पा वर. म्हणजे झाली फेमस.

एकनाथ जाधव's picture

10 May 2017 - 3:54 pm | एकनाथ जाधव

क्रमशः विसरलात का?

देशप्रेमी's picture

10 May 2017 - 8:54 pm | देशप्रेमी

भन्नाट लिहिलंय अगदी...

वरुण मोहिते's picture

11 May 2017 - 12:57 pm | वरुण मोहिते

मस्त लिहिलंय . अजून काही लिहा असं

रविकिरण फडके's picture

11 May 2017 - 2:21 pm | रविकिरण फडके

तो 'सून बाई' असा कृपया लिहू नये. शब्द विनाकारण तोडून लिहिणे ह्यात कुणाला काही गैर वाटेनासे झाले आहे. 'त्याबद्दल' हा शब्द 'त्या बद्दल' असा लिहिला जातो. (आणि भावना पोहोचल्या ना, मग झाले, असा युक्तिवाद केला जातो.) अशी शेकडो उदाहरणे दुर्दैवाने आजकाल पाहावयास लागतात.

असो. राग नसावा ही विनंती. अशा चुका आपण सर्वजण टाळू ही आशा.

स्मिता चौगुले's picture

11 May 2017 - 5:13 pm | स्मिता चौगुले

Lol

सप्तरंगी's picture

11 May 2017 - 5:23 pm | सप्तरंगी

एकदम खुसखुशीत !

महासंग्राम's picture

15 May 2017 - 12:54 pm | महासंग्राम

ओढून ताणून लिहिलेला लेख... पुणेरी मराठीला उच्च दर्शवण्यासाठी वर्हाडी भाषेला हिनपणा देऊन लिहिलेला लेख.

पीशिम्पी's picture

15 May 2017 - 8:53 pm | पीशिम्पी

, मालू तिच्या टोन मधे म्हणाली, आई तुमी संध्याकाळी घुमता का? काय? त्या घाबरूनच गेल्या आता ही बया काय करायला सांगतेय कोण जाणे. नाही,मंजे मले संध्याकाळी घुमाची सवय हाय ना, म्हनून विचारल, अग बाई हीला संचार बिंचार होतो कि काय संध्याकाळचा? त्या घाबरूनच गेल्या, उठून बाळूच बखोट धरून त्याला फरपटच आतल्या खोलीत घेऊन गेल्या अरे मुर्खा आता हे काय ऐकतीये मी..?बाळू गोंधळला काय झाल?
===> आडवा झालो ऑफिसात

खूप मस्त .. भारी ! हसून हसून पुरेवाट झाली ... याचे आणखी भाग देखील आवडतील वाचायला .... हे नाही तर वेगळं काहीतरी .. तुम्ही लिहीत राहा , अप्रतिम लिहिता आहात .

किस्सा छानच रंगवलाय अजून येऊ द्या.

श्वेता२४'s picture

21 May 2018 - 10:41 am | श्वेता२४

काय सुरेख टोन वऱ्हाडी लिहलंय. माझी मैत्रिण असंच बोलायची. तुमची ही कथा वाचताना तीच बोलतेय असं वाटलं. मी यातले विनोद प्रत्यक्षात अनुभवलेत. खरंच अगदी योग्यच लिहीलत. हसून हसून पुरेवाट झाली. लिहीत राहा.

शाली's picture

22 May 2018 - 10:30 am | शाली

हसुन हसुन पुरेवाट!