मनाच्या बाहेर !

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
11 Apr 2017 - 1:28 pm

अरांच्या मनातल्या मनात !! वर चाललेली चर्चा निर्णयाप्रत येऊ शकत नाही याची दोन कारणं आहेत :

१) अरांच्या धारणेत `मनावेगळं कुणीही नाही' आणि माझ्यामते हे `उघडपणे स्वतःलाच नाकारणं' आहे. जगात फक्त एकाच गोष्टी कुणीही नाकारु शकत नाही ती म्हणजे `मी आहे ' ! सो, अरा इज ट्राइंग इंपॉसिबल.

२) इन अ वे, `मी आहे' हे विधान नाकारता येत नसलं तरी जोपर्यंत व्यक्ती स्वतःप्रत येत नाही तोपर्यंत तिला आपण `मनावेगळे आहोत' हा उलगडा होत नाही.

नाऊ द ट्रबल इज, (१) लॉजिकचा विषय आहे आणि (२) अध्यात्म आहे. या दोन्ही परिमाणांची एकावेळी पूर्तता झाल्याखेरीज `आपण मनापेक्षा वेगळे आणि प्राथमिक आहोत' हा उलगडा असंभव आहे.

अध्यात्मावर मी लिहीणार नाही त्यामुळे लॉजिकवर अरा परास्त झाले तरी मुद्दा रेटतच राहातील. आणि वाचक ध्यानादि प्रणालींनी मनमुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांना लॉजिक पटलं तरी स्वतः मनापेक्षा वेगळे आहोत आणि मन ही शरीरासारखी आणि फक्त मेंदूत स्थित असलेली (आणि त्याबाहेर अस्तित्व नसलेली) `युटिलीटी' आहे हा अनुभव येणार नाही.

सो यातून मार्ग काढण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे माझं सर्व आकलन या लेखात मांडतो. ज्यांना उपयोग होईल त्यांचं भलं, नाही झाला तर माझा नाईलाज आहे.

तरीही हा लेख म्हणजे एका अर्थानं अरांच्या प्रतिसादांना उत्तर आहे. त्यामुळे `मनाशी तादात्म्य' म्हणजे काय हे दर्शवणारी त्यांची विधानं माझ्या प्रतिपादनानंतर हायलाईट केली आहेत.
_______________________

१) `मी नाही' असं म्हणताच येत नाही त्यामुळे `मी आहे' हे विधान कायम सिद्ध आहे. याचा प्रतिवाद अरांनी असा केला आहे :

मूळ समस्या मी-आहे किंवा मी-नाहि अशी नसुन "मी मनाला कंट्रोल करणारा कुणीतरी" अशी मनाची दुभंग अवस्था आहे.

म्हणजे अरा `मी नाही' म्हणू शकत नाहीत पण `मी मनाला कंट्रोल करु शकत नाही' असा स्टँड घेतात आणि त्यांच्या मते `मनाला कंट्रोल करणं हा मानसिक दुभंग' आहे. थोडक्यात, अरा लॉजिकवर परास्त आहेत पण त्यांनी मुद्दा `कंट्रोलर (मी) आणि कंट्रोल्ड (मन)' याकडे वळवला आहे.

सो लेखातला पहिला मुद्दा (१) क्लिअर होतो आणि चर्चा (२) कडे वळते.

माझं असं म्हणणं आहे की मनाशी तादात्म्य (मी म्हणजे मन) हेच मन अनकंट्रोल्ड करतं. आपण आहोत या प्राथमिक गोष्टीचं विस्मरण घडवतं आणि मन आपल्या काह्यात राहाण्याऐवजी आपण मनाच्या काह्यात जातो.

२) व्यक्तीचं मनाशी तादात्म्य हा मनाची दुरावस्था करणारा एकमेव वायरस आहे. तादात्म्य हीच त्या वायरसला सतत मिळणारी उर्जा आहे आणि त्यावरचं त्याचं जगणं अवलंबून आहे.

ते आपण म्हणजे मन आहोत. पायांना चालवायची मर्जी मनाव्यतीरीक्त कुणाला होणं संभवत नाहि. इतर कुणाला तशी मर्जी व्हायची संभावनाच नाहि. असो.

कार बाहेर कारचालक खपला तरी कार कायम राहाते. कारचालक बाहेर असताना कार खपली तरी कारचालक कायम राहातो. तुमची कार आणि कारचालक, असे दोघेही इंडीपेण्डट, स्वयंभू, संपूर्ण वेगळी लाइफसायकल जगणारे आहेत काय ? नसल्यास ते एकाच संस्थेचे घटक आहेत हि उघड बाब तुम्हाला कळणार आहे का? चान्सेस कमि आहेत. ज्याला तुम्ही कार आणि कारचालक म्हणताय ते दोन्हि एकाच मनाचे थ्रेड्स आहे

थोडक्यात, काहीही झालं तरी अरा `कारचा मालक कारपेक्षा वेगळा आहे' ही वस्तुस्थिती मानायलाच तयार नाहीत. याला मनाशी तादात्म्य होणं म्हटलंय. आणि हाच खरा वायरस आहे.

२) हा वायरस किती प्रमाणात सक्रीय झालायं त्यावर व्यक्तीची किती कोंडी होणार ते अवलंबून आहे. शरीराला लागणारा प्राणवायू अविरत चालणारी मेंटल-अ‍ॅक्टीविटीच खेचून घेते, त्यामुळे ही घुसमट होते.

हा डबल ट्रबल आहे, श्वासाचा पुरवठा कमी पडल्यामुळे व्यक्ती भयभीत होते आणि त्यातून मार्ग काढायला पुन्हा मनाचाच आधार घेते... त्यामुळे तादात्म्य पुन्हा सघन होऊन परत श्वासाची घुसमट होते !

उदा. शेतकर्‍याचा श्वास कर्जात अडकतो, त्याचं मन त्याला कर्जाशिवाय काही सुचू देत नाही. ही घुसमट थांबवायला शेतकरी पुन्हा जोरदार मानसिक उहापोह करतो, त्यातून तादात्म्य आणखी सघन होतं, मग पुन्हा कोंडमारा वाढतो. वास्तविकात, कर्ज फेडता आलं नाही तर दिवाळखोरी डिक्लेअर होईल आणि आपण पुन्हा मोलमजुरी किंवा इतर पर्याय शोधून आयुष्यं नव्यानं उभं करु इतकी साधी, आणि फक्त मानसिकता बदलण्याची गोष्ट असते. पण मन सतत इज्जत, बेआबरु, सामाजिक अवहेलना, आपण च्युतिया आहोत हा मनाचा हुकमी डाव, अशा एकेक बाजूनं त्याला पुरता नेस्तनाबूत करतं आणि शेतकरी यातून आपली सुटकाच नाही म्हणून .....आत्महत्त्या करतो !

`आपण अस्तित्वहीन होऊ' हा मनाचा थरारक हुकमी डाव व्यक्तीला कधी दुसर्‍या टोकाला नेतो. मग अशा व्यक्तीला दुसर्‍यांना संपवणं हा स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा एकमेव मार्ग वाटायला लागतो...अशी व्यक्ती मग अभूतपूर्व संहार आणि विनाश घडवते....तीला आपण हिटलर म्हणतो.

जनसामन्यांना हीच भीती कोणतंही साहस करु देत नाही. लोक्स रोजच्या रुटीनलाच जीवनाचा आधार समजत आणि तेच ते आयुष्य जगून निघून जातात.

या वायरस प्रकरणावर अरा म्हणतात :

व्हायरस घुसायच्या काय काय शक्यता आहेत याचे काहि आराखडे अगोदरच मांडले आहेत. त्याव्यतिरीक्त तुम्ही काहि उपपत्ती मांडु शकता का? आणि त्याअनुषंगाने कॉम्प्युटर, व्हायरस आणि ऑपरेटर यांच्या भुमीका विषद करु शकता का? अपेक्षा तिच होती. पण चुका काढण्याच्या नादात मुद्द्याला सॉलीड बगल दिलीत.

आणि मी एक साधा मुद्दा सांगतोयं `मनाशी तादात्म्य हाच वायरस आहे' !

अरांना वाटतंय `वायरस मनात घुसवायला मनावेगळी काही तरी यंत्रणा हवी. आणि जोपर्यंत ती यंत्रणा सिद्ध होत नाही तोपर्यंत मनाचं सैरभर होणं हा वायरस आहे असं मनायला ते तयार नाहीत.

वास्तविकात, आपलं मनाशी तादात्म्यंच मनाला आपल्यावर पॉवर देतं आणि आपण मनापेक्षा वेगळे आहोत हे समजण्याची सगळी शक्यता संपते.

३) ध्यान ही एकमेव प्रक्रिया ते तादात्म्य संपवून व्यक्तीला आपल्या मूळ स्वरुपाप्रत आणू शकते. एकदा ते तादात्म्य संपलं की मन ही युटिलीटी होते. आता अरांना याचा पत्ताच नाही त्यांना वाटतंय की `मी मनापेक्षा वेगळा आहे' हे आकलन आपल्याला न होता मनालाच होतं !

पण एकाद्या गोष्टीचं आकलन, त्याबद्दलचे विचार हे मनात उत्पन्न होतात ना ? कि आकलन, विचार, लॉजीक, उपपत्ती, हे सर्व देखील मनाबाहेर होतं ?

थोडक्यात, अरांना वाटतंय की आपल्या उजव्या हातानं, आपण आपला उजवा हात धरु शकत नाही... हे उजव्या हातालाच समजतं ! आकलन आपल्याला होतं हे त्यांना मंजूरच नाही कारण त्यांच्या लेखी मनावेगळं काहीही नाही.

४) यात आणखी एक प्रचंड अध्यात्मिक लोच्या आहे तो म्हणजे लोकांना `मी' म्हणायची भीती वाटते. `मी' म्हणजे अहंकार असा इतका सार्वत्रिक गैरसमज भारतीय अध्यात्मानं निर्माण करुन ठेवलायं की लोक्स दोनच धारणा धरुन बसलेत (अ) सगळं `तो' म्हणजे परमात्मा घडवतो किंवा (ब) सगळं मनाच्याच अखत्यारित आहे (अरा स्पेशल!).

इथे अध्यात्मिक लेखन बंद करण्याचं ते एकमेव कारण आहे कारण `मी' म्हटलं की लोकांना `अहंकाराशिवाय' दुसरं काही कळणंच अशक्य होतं. वास्तविकात मनानं निर्माण केलेला `मी' म्हणजे `व्यक्तिमत्व' हेच खरं बंधन आहे. आणि अध्यात्म जो `मी आहे' म्हणतंय, ती निर्वैयक्तिक आणि कायम `स्थिती' आहे. आणि ती मन आणि शरीरापेक्षा कायम वेगळी आहे. अर्थात, हा झोल सुद्धा ध्यानाशिवाय सुटणं अशक्य आहे. त्यामुळे अरांना वाटतंय `मी' हे मनाचंच बाय-प्रॉडक्ट आहे.

५) जोपर्यंत मनाशी तादात्म्य आहे तोपर्यंत व्यक्ती कायम भीतीच्या छायेखाली आहे कारण वायरस केव्हा काय परिस्थिती निर्माण करेल सांगता येत नाही.

आय एम डन !

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

छान बासुंदी चाखायला मंळेल म्हणुन डबा उघडावा आणि आंबट वासाचा भपकारा यावा असं झालं लेख वाचुन.

अध्यात्मावर मी लिहीणार नाही त्यामुळे लॉजिकवर अरा परास्त झाले तरी मुद्दा रेटतच राहातील.

थोडक्यात, अरा लॉजिकवर परास्त आहेत पण त्यांनी मुद्दा `कंट्रोलर (मी) आणि कंट्रोल्ड (मन)' याकडे वळवला आहे.

सतत इतरांना परास्त करण्याचाच विचार. कसंही करुन आपल्या मतांविपरीत कुणी काहि मत व्यक्त केलं तर प्रत्युत्तराची सुरुवातच त्याच्या पराभवाच्या नमनानं करायची. आपली साईड सेफ करायची इतकी केवीलवाणी धडपड का म्हणुन ? कसली भिती आहे ? वाचणार्‍याला ठरवु देत ना कोणतं मत ग्राह्य आहे ते. आणि एखाद्याचं मत नाहिच टिकलं लॉजीकवर, तर त्या मतापुरतं सिमीत न राहता सरळ कोणाला परास्त, पराभूत वगैरे टॅग लावायचा कुजकटपणा कशासाठी ?

उर्वरीत अध्यात्मवगैरे बाबतीत बोलण्यात काहि पोईण्ट नाहि. ते चालु द्या. एकच विनंती. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वगैरे प्रश्नांना असं जनरलाईझ करुन त्यांच्या जखमांवर असं मीठ चोळु नका. सगळ्या प्रकारचे नैराश्य हे अल्टीमेटली सायकोलॉजीकल प्रॉब्लेम असतात हा मानसशास्त्राचा कॉमन सिद्धांत आहे. पण ते लोक कसल्या परिस्थितीतुन जाताहेत याची तुम्हाला अजीबात कल्पना नाहि. केवळ आपल्या मतांविरुद्ध मत प्रदर्शीत करणार्‍याला एकदम पराभूत, परास्त वगैरे करायची मनीषा बाळगणार्‍याने असल्या सेन्सेटीव्ह प्रश्नांवर आपले अध्यात्मीक उपाय चालवु नये. असो. आमचं कोण ऐकतय म्हणा. काय वाटेल ते करा.

संजय क्षीरसागर's picture

11 Apr 2017 - 3:23 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही काहीही प्रतिसाद द्या. आय वोंट रिप्लाय.
एकदा आपलं जमत नाही म्हटल्यावर जी चर्चा तिथे होऊ शकली नाही ती इथेही होणार नाही.
एनी वे, या लेखाची प्रेरणा तुमचा लेख आहे, त्याचे आभार लेखात मानायचे राहून गेले. ते प्रतिसादात मानतो.

अर्धवटराव's picture

11 Apr 2017 - 10:42 pm | अर्धवटराव

.

संजय क्षीरसागर's picture

11 Apr 2017 - 3:30 pm | संजय क्षीरसागर

शेतकारी स्वतःला नादार डिक्लेअर करुन कर्जमुक्त होऊ शकत नाही ? का त्यानं आत्महत्त्याच करायला हवी ? म्हणजे तुम्हाला इश्यू भावनिक करुन लोकमाताचा फोकस भलतीकडे वळवायचा असेल तर तुमची मर्जी पण उगीच पेपरात वाचून आणि तुम्ही परदेशात असाल तर उगीच तिकडे बसल्याबसल्या कढ काढण्यात अर्थ नाही.

पिलीयन रायडर's picture

11 Apr 2017 - 7:05 pm | पिलीयन रायडर

भारतातले लोकही इंटरनेट वापरुन इथे लिहीतात.. परदेशी लोकही इंटरनेटवरुनच लिहीतात..

त्याउप्पर कुणीच काही करत नाही. जे स्वतः शेती ह्या क्षेत्रात काम करत आहेत ते सोडुन इतरांना फक्त चर्चांमध्ये रस आहे.. (त्यातही आपलीच मते पटावीत ह्यात.. त्याला चर्चा तरी कसं म्हणावं..!)

पण भारतात बसुन मतांची पिंक टाकली की ती खरी कळकळ.. आणि तीच परदेशातुन टाकली की तिला "कढ काढणे" म्हणायचं...

मस्तच...!

राघवेंद्र's picture

12 Apr 2017 - 12:43 am | राघवेंद्र

+१

अर्धवटराव's picture

12 Apr 2017 - 2:01 am | अर्धवटराव

हि इज 'डन'. रेडीओ फक्त बोलु शकतो, ऐकु शकत नाहि.