एक विनोदी अनुभव

उपेक्षित's picture
उपेक्षित in जनातलं, मनातलं
2 Apr 2017 - 6:41 pm

खरे तर गेले बरेच दिवस डोक्यात विचार येत होता कि देवाचे अस्तित्व खरच आहे ? खरच या जगात देव हि संकल्पना आहे?
म्हणायला गेलो तर मी थोडा डाव्या विचारांकडे झुकलेलो आहे पण अजूनही मला मी निट समजलो नाहीये.

घाबरू नका मंडळी गेल्या काही दिवसात बर्याच गल्लाभरू चित्रपटात हा विषय अगदी सोयीस्कर रीतीने हाताळून त्याची पद्धतशीरपणे वाट लावण्यात आली आहे. सो मी तुमचे बौद्धिक घेऊन तुम्हाला अजून पकवणार नाहीये.

खरे तर मी माझ्याच वागण्याचे आकलन करायचा प्रयत्न करतोय बघा.

तर झाले असे कि माझी आई काही धार्मिक संस्थांशी जोडली गेली आहे साहजिकच आहे तिला यात रसही आहे आणि आपल्याच वयाच्या मैत्रिणींशी थोडी हितगुज हि होते. तर अशाच एका मंडळातील ३/४ लोक आमच्या घरी संध्याकाळी आले वेळ साधारण ८-८.३० ची मी आणि हि नुकतेच घरी आलो होतो दिवसभराची दगदग आणि घरातील सर्वाना वेळ देता येत नाही हि खंत तर संसारी पुरुष अन बायांना नेहमीच असते.

तर साधारण अशा या विचित्र वेळेला आलेली हि मंडळी सर्व जण (१जण सोडून) वयस्कर गटात मोडत होते. आल्या आल्या त्यांनी आमचा ताबा घेतला आणि मी आणि हि पण काही का-कु न करता आणि आईसाठी म्हणून त्यांच्या शी बोलायला बसलो. त्यातील एक तथाकथित सर्वज्ञ माणसाने कुणालाही बोलायची संधी न देता बोलायला सुरवात केली.

आधी तुला गीता येतेका मग रामरक्षा/ अथर्वशीर्ष/ अशी अजून २/४ माझ्यासाठी अगम्य असलेली नावे तोंडावर मारून मला माझ्या ८ वर्षाच्या पोरासमोर पुरते खजील करून (पोराला अभ्यास झाला का असे मी हल्ली विचारायचे टाळतो कारण पोरग अजूनपण अधून मधून इचारत बाबा रामरक्षा पाठ झाली का म्हणून) मग गाडी भगवंत या भयानक विषयावर वळली.

मग एक सो एक उदाहरण चालू झाली काय तर म्हणे आपल्या शरीरातील रक्ताचा लाल रंग भगवन्तामुळे होते, लहान मुले मोठी भगवंतामुळे होतात त्यात त्याच्या आई-बाबा अथवा बाकी कुणा माणसाचा सहभाग नसतो म्हणे हे आणि असे बरेच काही संतापजनक तो माणूस बोलत होता आणि मी संयमाची पराकाष्ठा करत तोंडावर उसने हसू कम भक्तीभाव दाखवत त्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडलाय हे दाखवायचा प्रयत्न करत होतो.

(माझी बायको आणि माझी माय विस्मयाने पाहत होते - त्या माणसाकडे नाही हो माझ्याकडे कि मी इतकावेळ गप्प कसा कदाचित सासू आणि सुन दोघींनी आनंदाने एकमेकींना नजरेतून टाळी-बिळी दिली असावी अशी मला दात शंका आली माझी अवघडलेली अवस्था पाहून)

असो तर एकदाचा साधारण १ तासाचा आमचा कौटुंबिक वेळ खाऊन आणि पचवून झाल्यावर तो माणूस थांबला. मी खुश झालो म्हंटले चला आता गाडी जाईल आपल्या मार्गाला. पण त्यादिवशी कदाचित त्या बाबाची साडेसाती उच्चीवर असावी म्हणून त्याला दुर्बुद्धी झाली आणि त्याने अतिआत्मविश्वासाने एखादे स्वगत म्हटल्यागत मला विचारले कि

सर्वज्ञ माणूस - बाळ तुला माझे म्हणणे समजले का ? काही शंका आहे का ?
मी – (पोटातील कावळ्यांना कसेबसे शांत करून) नाही काका तुम्ही अगदी बरोबर आहात. (म्हंटले चला सुटलो)
सर्वज्ञ माणूस – बाळा जगात सर्व क्रिया भगवंत करतो, आत्ता कुठेतरी दरोडा पडत असेल/ खून होत असेल तर त्यालाही भगवंत कारणीभूत आहे माणूस नव्हे, आपल्याला 100 कोटी (असेच काहीतरी बरळला तो) योनी नंतर माणूसपण मिळते, त्यामुळे आपण खोटे बोलायचे नाही, राजकारण हे आपल्यासाठी नाही वगेरे वगेरे अजूनच चेकाळला गेला.

*बस्स इथे आपला संयम संपला आणि आपल्यातला बंडखोर कम्युनिस्ट जागा झाला*

मी – काका तुम्ही म्हणता ते 100 कोटी का काय त्या योनी असेल नसेल पण हा जो जन्म मला मिळाला आहे तो मी पूर्ण उपभोगुन घेणार आहे. बघा म्हणजे मी खोटे बोलून बघणार/ मी राजकारण करणार गेला बाजार निदान त्यावर मिसळपाववर  चर्चा तरी करणार (झालेच तर एखादे extra marital अफेयर करून बघणार हे मनातल्या मनात बरका) आहे तो जन्म शेवटचा हे मानून मी जगणार.
सर्वज्ञ माणूस – कावराबावरा होऊन काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो
मी – कसय न काका तुम्ही जे म्हणताय ते खूप आदर्श वागणे झाले आणि मी काही गुड बॉय / नवरा वगेरे नाहीये हो, मी काही श्री रामाचा अवतार नाहीये रादर जगात इतके आदर्शवादी कुणीच वागू शकत नाही.
या सगळ्या गोंधळात आमच्या पिताश्रींचे आगमन झाले घरात.(जे नेहमी या विषयावर आमच्या बाजून असतात, एरवी ते आमच्या नावाने नुसता शंख करतात हा भाग वेगळा पण आम्ही जन्मता: स्थितप्रद्न्य का काय ते आहोत)

सर्वज्ञ माणूस – संतापाने कदाचित रक्तदाब वाढला असावा बाबाचा पण गोडीत – बाळा तुला आत्ता समजत नाहीये तू काय बोलत आहे कारण तुझे विचार वाईट आहेत, हीन आहेत तू भगवंताला नाकारत आहेस. वेळ आली कि तुला समजेल. तुझ्या वागण्याचा त्रास तुझ्या मुलाला होईल वगेरे, वगेरे.

आता सूत्रे आमच्या पिताश्रींनी घेतली आणि त्या माणसाला असा हासाडला असा हासाडला कि गाडी दुसर्या मिनिटाला शेजारच्या घरात प्रवचन द्यायला निघाला.

जाताना मी खडा टाकला (मराठी माणसाला तसाही जाम किडा असतो) काका-काकू या निवांत परत या विषयावर चर्चा करायला आत्ता तुम्ही तयारीने आला होतात मी बेसावध होतो आता पुढल्या येळी मी पण तयारी करतो.

Jokes a part पण आज माणूस चंद्रावरच नव्हे अगदी मंगळावर पोचलाय आणि आपल्यातलाच मोठा समाज पत्रिकेतल्या मंगळाची आपल्याला भीती दाखवत असतो.

पूर्वीचे संत बघा (चमत्काराचा भाग सोडून द्या) अगदी माउलीन पासून, तुकाराम, रामदास स्वामी, चोखामेळा/ गोरा कुंभार ई. पर्यंत सर्व संत एकतेचा, बलोपासनेचा, जातीविरहीततेचा, दिन-दुबळ्यांची सेवा करायचा संदेश देतात. आणि आपण ? आपण त्यांची मंदिरे बांधून हा या जातीचा तो त्या असे वाटण्या करून मोकळे होतो.

*जल्ला मेला आपण आपल्या जाणत्या राजाला*, *त्याच्या माउलीला आणि त्याच्या छाव्याला पण जाती मध्ये बांधून टाकले आहे*
साला आपण सगळी कडे हिंदू-हिंदू म्हणून मिरवतो भेंडी हिंदू ची व्याख्या काय हो सांगा बरे कुणी ...
साला एक हिंदू वैष्णव तर दुसरा शैव तिसरा रावणाची पूजा करतो (दक्षिण भारतात काही भागातील हिंदू आजही रावणाची पूजा करतात असे मी काही मित्रांकडून ऐकले आहे विदा वगेरे काय आपल्याकडे नाय बाबा.) बाकी स्वामी समर्थ/ गोंदवलेकर महाराज/ साईबाबा हे बाबा/ महाराज मंडळी वेगळीच म्हणजे ३३ कोटी dev प्लस हि बाबा/महाराज मंडळी साला हे आहे काय? धर्म आहे कि खेळ ?

मी माझ्यापुरते तरी ठरवले आहे साला धरम- करम गया तेल लेणे पैसा कमावो आन मंग मज्जा नि लाइफ.

अर्रर उशीर झाला चला बाबा शनीला तेल वाहायला जायचे आहे मला (कुणी सांगाव मंडळी खरच देव वगेरे असला तर उगाच रिक्स नकू) चला राम राम मंडळी भेटू पुन्यांदा परत कधीतरी असाच काळा इनोदाचा फार्म घिऊन शान.

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

अत्रे's picture

2 Apr 2017 - 7:20 pm | अत्रे

हॅहॅहॅ :):)

खेडूत's picture

2 Apr 2017 - 9:57 pm | खेडूत

धमाल लिहीलंय.
अजून येऊंद्या.. कशाला उपेक्षित रहाल! :)

Rahul D's picture

2 Apr 2017 - 10:43 pm | Rahul D

पन ईनोद काय गावला नाय...

जानु's picture

3 Apr 2017 - 9:26 am | जानु

तसा मी देव मानतो, कालच सहकुटुंब काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. फारच प्रसन्न वाटले. पण अश्या स्वघोषित पंडितां पासुन खरच दूर राहिले पाहिजे. यांचे अगाध ज्ञान ऐकले की दिल चाहता है चा सैफ अली खान चा चाकू खुपसायचा सीन आठवतो. मेरेकु नय रे बाबा वो उसको मारने को....

जानु's picture

3 Apr 2017 - 9:26 am | जानु

तसा मी देव मानतो, कालच सहकुटुंब काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. फारच प्रसन्न वाटले. पण अश्या स्वघोषित पंडितां पासुन खरच दूर राहिले पाहिजे. यांचे अगाध ज्ञान ऐकले की दिल चाहता है चा सैफ अली खान चा चाकू खुपसायचा सीन आठवतो. मेरेकु नय रे बाबा वो उसको मारने को....

चित्रगुप्त's picture

3 Apr 2017 - 10:07 am | चित्रगुप्त

लेखाचा विषय आणि हाताळणी उत्तम, परंतु ते काका काय काय म्हणाले, तसेच तुमच्या वडिलांनी काय प्रतिवाद केला वगैरे जरा जास्त डीटेलमंदी खुलवून सांगितले असते तर आणखी धमाल झाली असती.
चला, आता या निमित्ताने (आम्ही मुळात 'चित्रगुप्त' हे टोपणनाव ज्या लेखासाठी घेतले होते तो) याच विषयावरील आमचा हा लेख वाचा:
http://www.misalpav.com/node/23698

उपेक्षित's picture

3 Apr 2017 - 12:27 pm | उपेक्षित

@ चित्रगुप्त ते काका बरेच काही बोलत होते आणि त्यावेळी खरच दिवसभरच्या कामाने दमलो असल्या कारणाने त्यांचे बरेच बोलणे डोक्यावरून गेले होते. आणि त्यांचे बरेच बोलणे इथे टाकले तर कदाचित इथे ते कंटाळवाणे ठरेल म्हणून मोजकेच टाकले.

राहता राहिला आमच्या पिताश्रींचा विषय तर त्याचे नंतरचे बोलणे ऐकून त्याचा खूप संताप झाला होता आणि संतापाच्या भारत ते त्यांना काय बोलले ते इथे देणे सुद्धा मला रास्त वाटले नाही म्हणून विषय टाळला तो.

खर तर काही काही मंदिरात जायला मलाही खूप आवडते (जिथला प्रसाद चांगला असतो खासकरून तिथे) शांतपणा, निवांतपणा अथवा एकटेपण पाहिजे असेल तर एखादे आड बाजूचे गर्दी वगेरे नसलेले मंदिर बघायचे मस्त वेळ जातो आणि मुख्य म्हणजे मन शांत होते
आमच्या धायरीत असलेले धारेश्वर मंदिरात बऱ्याचदा असा निवांतपणा मिळतो.

पुंबा's picture

3 Apr 2017 - 11:46 am | पुंबा

भारी लिहिलयंत.

बाळा तुला आत्ता समजत नाहीये तू काय बोलत आहे कारण तुझे विचार वाईट आहेत, हीन आहेत

इस्कॉनवाले असंच बोलतात. वर असा आव आणतात की सार्‍या ब्रम्हांडात यांच्याइतका सात्विक, शांत माणूस नसेल कोणी. माझ्या मते, अश्या लोकांचा पुरता ब्रेनवॉश झालेला असतो, यांना समजावून सांगून, प्रबोधन वगैरे करून काहीही फायदा होत नसतो. यांना टाळणं आणि जवळच्या व्यक्तिंना यांच्या जाळात न अडकू देणं एवढंच आपण करू शकतो.

दुश्यन्त's picture

3 Apr 2017 - 1:47 pm | दुश्यन्त

'तुमचा देवच माझ्या कडून असलं हीन बोलणं वदवून घेतो. त्यानेच मला वाईट विचार दिले आहेत तुम्हाला काय करायचंय ?' अस म्हणायचं.

पैसा's picture

3 Apr 2017 - 11:52 am | पैसा

:))

पाटीलभाऊ's picture

3 Apr 2017 - 12:51 pm | पाटीलभाऊ

मस्त अनुभव...खरंच अशा गोष्टींवर चर्चा करायला मजा येते, निष्कर्ष काहीही निघत नसला तरीही... :D

हाच काय तो आपल्याला कळाणारा परमार्थ, मस्तच लिहिले आहे.
विषय गंभीर पण मर्म विनोदी पद्धतीने लिहिलात, फुल्ल रिस्पेक्ट

येथील पहिले लिखाण असून देखील मला सांभाळून घेऊन उत्साह वाढवल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे...

भम्पक's picture

3 Apr 2017 - 7:29 pm | भम्पक

मलाही एका महाभागाने असे खिंडीत पकडले होते पण त्याला असा हासडला कि xxx ला पाय लावून पळाला बिचारा.मात्र आमच्या आईने मला फार शिव्या घातल्या कि तुला मोठ्या लोकांचा आदर नाही वगैरे. पण मी दात काढत होतो.त्याने असेच राम वगैरे बद्दल सांगायला सुरुवात केली अन मी बॉम्बच टाकला कि रामायण आपल्या देशात घडलेच नाही म्हणून. त्याची वाचाच बसली. त्याला थोडक्यात सांगितले कि माणसा आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडणे म्हणजेच सगळं काही आहे अन या षट्कारावरच तो धाराशायी झाला.

धर्मराजमुटके's picture

4 Apr 2017 - 5:59 pm | धर्मराजमुटके

मस्त विनोदी लिखाण ! पण खरं सांगु, सकाळमधील विनोदी लेख आणि त्याखालील येणार्‍या विनोदी प्रतिक्रिया वाचल्यावर यापेक्षा विनोदी जगात काही असु शकेल यावर विश्वासच बसत नाही बघा !

उदाहरणार्थ हा लेख आणि त्याखालील प्रतिक्रिया वाचा.

पुंबा's picture

4 Apr 2017 - 6:59 pm | पुंबा

हॅहॅहॅ..
कसला हिलॅरियसली फालतू लेख..

पुंबा's picture

4 Apr 2017 - 7:02 pm | पुंबा

असलं दळभद्री अर्टिकल वाचण्यापेक्षा मी ब्लाईंड का नाही झालो..!

उपेक्षित's picture

4 Apr 2017 - 7:39 pm | उपेक्षित

सुरवात चांगली केली होती पठ्ठ्याने पण नंतर IT सेक्टरच्या नावाने बळच काहीही जोडले आहे :)

सौरा भाऊ तुमची प्रतिक्रिया वाचल्यावर मला आधी वाटले कि मलाच टाकली आहे ;)

नाही हो, उपेक्षिताचे अंतरंग आवडलेच आहेत. वरची प्रतिक्रिया त्या आयटीतल्या अर्धवटाच्या लेखावर आहे. काय घाणेरडी भाषा, फालतू सामान्य गोष्टीचं उदात्तीकरण करणं.

जाऊ दे.
'सकाळ' आहे म्हणजे असलंच वाचावं लागणार.. :))

Ranapratap's picture

4 Apr 2017 - 9:20 pm | Ranapratap

तुम्ही देव मानत नाही, ठीक आहे, पण इतरांच्या विचारांची अशी हेटाळणी का करता? प्रत्येक जण आपल्या ठिकाणी योग्य आहे व असतो.

उपेक्षित's picture

6 Apr 2017 - 12:26 pm | उपेक्षित

काय भाई राणाप्रताप सुरवातीलाच मी स्पष्ट टाकलय कि मी स्वतः गोंधळात आहे, पण हो ९०% तरी मी मान्य करतो कि देव नाही पण स्पष्टपणे हेही कबुल करतो कि आयुष्यात काहीवेळा कठीण प्रसंग आले तेव्हा देवात आधार शोधायचा प्रयत्न मात्र केलाय पुर्वी.

आणि हो लेखात त्या माणसाची हेटाळणी नाही केलीये तर त्याचा वृत्तीची केली आहे.

बघा समजतंय का नाय तर द्या सोडून.

य.झ. लेख आहे, छत्रपतिंना मध्ये आणल्याशिवाय करमत नाही xxxxना.

उपेक्षित's picture

6 Apr 2017 - 12:27 pm | उपेक्षित

बाण लागला वाटत :P

सुबोध खरे's picture

7 Apr 2017 - 8:30 pm | सुबोध खरे

एका शब्दात सांगायचं मी नास्तिक/ कम्युनिस्ट आहे.
उगाच तासभर फुकट घालवलात. शेवटी आपल्या पिताश्रीनी त्यांना झाडलेच ना.
मग एक तासानंतर तो माणूस दुखावणार असेल तर सुरुवातीलाच तसे स्पष्ट सांगितले कि झालं.
एम एल एम वाले (पक्षी -- ऍमवे ,ओरियल ) विमा एजंट इ इ ना पण असेच स्पष्ट सांगावे. म्हणजे त्यांचा आणि आपला एक महत्त्वाचा तास तरी फुकट जात नाही.

उपेक्षित's picture

7 Apr 2017 - 9:41 pm | उपेक्षित

कसय डॉक्टर घरी आलेल्या पाहुण्याला आणि तेही वयस्कर इतके तोडून निदान मी तरी नाही बोलू शकत आणि मला काय माहित हा माणूस काय बोलणार होता?
सुरवातीला स्पष्ट केल्याप्रमाणे आईला बरे वाटावे म्हणून त्यांच्या सोबत बसलो.