आम्ही जियो घेतलंय

रावसाहेब म्हणत्यात's picture
रावसाहेब म्हणत्यात in जनातलं, मनातलं
1 Apr 2017 - 9:37 pm

(हे स्क्रिप्ट standup करण्याच्या उद्देशाने लिहिलेलं आहे त्यामुळे वाचताना बरेचशे जोक पट्कन लक्षात येणार नाहीत कदाचित. तरीही).

भारतात मुकेश अंबानीच्या जियोने अक्षरशः वेड लावलंय. बघावं तो “आम्ही जियो घेतलंय आम्ही जियो घेतलंय” करून मिरवत असतो. गम्मत अशी कि जियो घेतलेल्या ९९% लोकांना स्वतःचे जियो नंबर माहित नाहीयत. खरी पंचाईत dual सीम वाल्यांची झालीय. Already दोन सीम सांभाळताना तारांबळ उडायची आता त्यात हे जियो कार्ड घालायचं कुठे. लोकं कानाच्या मागे सीम कार्ड लावायला लागलेत असं ऐकण्यात आलंय. हा काढायचा तो घालायचा, तो काढायचा हा घालायचा. सीम लटकवता येणारे स्पेशल बायकांचे कानातले बाजारात मिळू लागलेत. म्हणजे कानातलं तर कानातलं, सीम ठेवायला जागा नसली कि त्यात अडकवला. एका गुप्त बातमी नुसार हे असले कानातले घ्यायला पुरुषांचीच जास्त झुंबड उडालीय म्हणे.

ह्या समद्यात आमचं गण्या मागं ऱ्हातंय व्हंय. गण्या म्हंजी तुमास्नी म्हाईतंच असल की, हिचं भाऊ ओ. त्यो जेलमधला न्हाई. त्यो मेंटल हॉस्पिटलवाला बी न्हाई. ह्यो गण्या गावाकडला भाऊ हाय. तर ह्यानं जियोचं कार्ड आणलंय घरला काय. आणि लगीच मला विडीयो कॉल लावलाय.

आता नुसतं बोलायचं असेल तर गप्प ऑडियो कॉल का लावत नाहीत कळत नाही? कारण होतं काय कि एकमेकाला बघायच्या प्रामाणिक उद्देशाने विडीयो कॉल सुरु होतो. पण आजूबाजूच्या गोंगाटामुळे समोरचा माणूस हळूहळू फोन असा तोंडापर्येंत घेऊन येतो. आणि एका पोइंटला बोलणारा व्यक्ती, आपला कॅमेरा चालूय हे विसरूनच जातो. आणि आमच्या गण्याच्या बाबतीत झालं काय कि आमच्या सासूबाईंच्याच भाषेत सांगायचं झालं तर गण्या दिसायला रणवीर कपूर सिंग असल्यामुळे फोनवर बोलताना त्याचे पिवळे आणि किडलेले दात यांचं bifurcation अगदी स्पष्ट दिसत होतं. शिवाय नाकाकडे बघितलं कि महाराष्ट्रात सर्दीची लाट भयंकर पसरलीय हेही लक्षात येत होतं. त्यामुळे मला असं बोलावं लागत होतं.

मग आमच्या सासूबाई मागं ऱ्हात्यात व्हंय, त्यांचंबी सुरु झालं. आता गण्यानं जियोचं कार्ड घेतलं ही काय अभिमानानं सांगायची गोष्ट झाली का? पण आमच्या सासूबाई अशा काही थाटात सांगीत व्हत्या जणू काय मुकेश अंबानीच ह्यांच्या घरी युन गण्याला समद्या भारतातलं एकमेव जियोचं कार्ड द्यून गेल्ता. ते ऐकून मलाबी ऱ्हावलं न्हाई म्हणून म्याबी सांगून टाकलं, “अओ सासूबाई जियोचं ते काय कौतुक घ्यून बसलायसा. मुंबईत गल्लीतल्या कुत्र्यांनीबी जियोची कार्डं घ्यून whatsapp ग्रुप्स बनवल्यात”. ते ऐकून गण्याला यकायकी काय झालं कुणाश्ठाऊक ते मला लोटांगण घालाय लागलं. लोटांगण म्हंजी विडीयोत मला आधी कळलं न्हाई. ते धाड्कन जमिनीवर पडलं तवा मला वाटलं ह्याच्या अंगात-बिंगत आलं का काय. पण नंतर म्हटला तवा लक्षात आलं, “दाजी तुम्ही ग्रेटंच हायसा. मी खरंतर कुणास्नी सांगणार नव्हतो. पर तुमास्नी कसं कळलं कि हे कार्ड मी माझ्यापरी न्हाईच घेतल्यालं. ते मी शेवंताकरता घेतलंय ओ”. मी मनात म्हटलं आयला भारी हाय कि आता ह्यालाबी गर्लफ्रेंड मिळाली. मला खरंतर त्या शेवंताबद्दल कळवळा का काय म्हणतात ते वाटत होतं. पण लगीच त्या कळवळ्याचं रुपांतर प्रचंड हास्यात झालं जेव्हा तो हे म्हटला कि शेवंता ही त्याची गर्लफ्रेंड नसून त्याची म्हस व्हती. आमच्या सासूबाईबी यकदम चाट पडल्या आणि त्यांनी इचारलंच, “आत्ता गं बया, शेवंताला जियोचं कार्ड कशापायी?”. तवा गण्या म्हटला, “अगं आये, त्या पारावरच्या म्हादबाचं रेडकू हाय किनई, त्याचं आणि आपल्या शेवंतेचं झंगाट चाललंय. म्हादबाच्या रेड्यासंगं विडीयो कॉल करत न्हाई तोपरीस ही दूधच देत न्हाई. आणि विडीयो लावल्यावर बादली बादली दूध देतीया. नायतर मी कशापायी जियो घेतुय. माझ्याशी वाडीतलं कोण बोलानाराय जियोवर”. मी मनात म्हटलं, “चला ह्यांच्या वाडीतली वाटतात तेवढी खुळी नाहीत”.

(हा संपूर्ण स्क्रिप्ट मधला एक पीस आहे, बाकीचे पण टाकेन हळू हळू).

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

1 Apr 2017 - 10:55 pm | अभ्या..

लैच बोगस.
सगळ्या अनिवाश्याना आपण ज्यादिवशी अमेरिकेला उडालो, टाइम तसाच स्टॉप झाला असे वाटते काहो?
आजकाल असले पांचट ज्योक चला हवा येऊ दया मध्ये पन चालत नाहीत.

रावसाहेब म्हणत्यात's picture

1 Apr 2017 - 11:45 pm | रावसाहेब म्हणत्यात

मी नवीन आहे, त्यामुळे इथे निवासी आणि अनिवासी अशी विभागणी आहे हे माहित नव्हते. पण मी तरी तशा उद्देशाने हे नाही टाकलंय.

रावसाहेब म्हणत्यात's picture

2 Apr 2017 - 2:30 am | रावसाहेब म्हणत्यात

आजकाल असले पांचट ज्योक चला हवा येऊ दया मध्ये पन चालत नाहीत.

अरे वा ! चला हवा येऊ दया चे फॅन दिसता..

अत्रुप्त आत्मा's picture

1 Apr 2017 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा

पांडू मोड अॉन

बरं मग!?

पांडू मोड अॉफ..

जव्हेरगंज's picture

1 Apr 2017 - 11:23 pm | जव्हेरगंज

बाकीचे पण टाकेन हळू हळू >>> म्हणजे खजिना बराच मोठा दिसतोय ;)

कपिलमुनी's picture

2 Apr 2017 - 12:55 am | कपिलमुनी

प्रोत्साहन भत्ता द्या

रावसाहेब म्हणत्यात's picture

2 Apr 2017 - 2:33 am | रावसाहेब म्हणत्यात

हा हा जरूर, constructive प्रतिसाद असेल तर पुढच्यावेळी लिहिताना आत्मसात होईलच.

विनोदी स्किटऐवजी एखादे करुण/ गंभीर लिहून पाहा.

सतिश गावडे's picture

2 Apr 2017 - 11:50 am | सतिश गावडे

अप्रतिम विनोदी लेखन. काळजाला भिडलं. अजून येऊद्या.

गामा पैलवान's picture

2 Apr 2017 - 10:40 pm | गामा पैलवान

राम्ह,

मला वाटलं जियोवरून लाईव्हस्ट्रीमिंग स्वस्त्यात पडेल. म्हणून तुम्ही म्हैशीच्या पाठीला क्यामेराफोन लावून रेड्याच्या शृंगाराचं धावतं वर्णन पाहणार. पण तुम्ही भलत्याच कामासाठी वापरताय. शोभत नाही हो.

आ.न.,
-गा.पै.