महिने आणि नक्षत्रांच्या नावांच्या व्युत्पत्ती काय आहेत ?

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
23 Mar 2017 - 1:38 pm
गाभा: 

प्रत्येक महिन्यांची नावे ही त्या त्या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा पौर्णिमेच्या मागे पुढे येणाऱ्या नक्षत्राच्या नावावरून त्या महिन्याचे नाव पडलेले आहे. मराठी विकिपीडियावर
अशी माहिती दिसली.

नक्षत्राचे नाव → महिना
चित्रा → चैत्र
विशाखा → वैशाख
जेष्ठा → जेष्ठ
पूर्वाषाढा → आषाढ
श्रवण → श्रावण
पूर्वाभाद्रपदा → भाद्रपद
अश्विनी → अश्विन
कृतिका → कार्तिक
मृगशीर्ष → मार्गशीर्ष
पुष्य → पौष
मघा → माघ
पूर्व फाल्गुनी → फाल्गुन

२७ नक्षत्रे
अश्विनी • भरणी • कृत्तिका • रोहिणी • मृगशिरा • आर्द्रा • पुनर्वसु • पुष्य • अश्लेषा • मघा • पूर्वाफाल्गुनी • उत्तराफाल्गुनी • हस्त • चित्रा • स्वाती • विशाखा • अनुराधा • ज्येष्ठा • मूल • पूर्वाषाढ़ा • उत्तराषाढा • श्रवण • धनिष्ठा • शतभिषा • पूर्वाभाद्रपद • उत्तराभाद्रपद • रेवती + २८वे अभिजित

तरीही नक्षत्रांना आणि महिन्यानां हिच नावे का निवडली गेली आणि यातील प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती काय असेल याचे कधी कधी कुतूहल वाटते. भारतीय सवंत्सरातील महिन्यांची नावे आणि नक्षत्रांच्या नावांच्या व्युत्पत्ती काय आहेत अथवा असू शकतील ?

प्रतिसादांसाठी आभार

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

23 Mar 2017 - 1:46 pm | गामा पैलवान

माहितगार,

विकिवर वाचलं की २७ नक्षत्रे म्हणजे चंद्राच्या २७ पत्न्या आहेत. त्यामुळे नक्षत्रांची नावं स्त्रीलिंगी आहेत/असावीत. मात्र हीच नावं का मिळाली हे माहित नाही.

आ.न.,
-गा.पै.

मार्कस ऑरेलियस's picture

23 Mar 2017 - 2:21 pm | मार्कस ऑरेलियस

अवांतर :

बाकी स्वःच्या नक्षत्रासारख्या सुंदर अशा २७ बायका असुनही इतरांच्या बायकांवर नजर ठेवणारा चंद्र म्हणजे एकदमच आंबटशौकीन हिरवट डुड असणार ... आणि कदाचित म्हणुनच त्याला लोकसाहित्यात चंदा मामा किंव्वा चांदोबा मामा असे मामा करुन टाकले असावे असे वाटते ;)

चंद्राच्या बाहेरख्यालीपणाची काही कहाणी ऐकिवात नाही बा.

अज्ञानात सूख असते आणि ज्ञानात आनंद असतो ! :)

चंद्राच्या बाहेरख्यालीपणाची काही कहाणी ऐकिवात नाही बा.

चंद्रा ने गुरु पत्नी पळवुन नेउन तिचा भोग घेतल्याची कथा वाचनात आली आहे... बहुतेक बुधाचा जन्म या संबंधातुन झालेला आहे, बाकी जेष्ठ नक्षत्राचे नाव वाचल्यावर मी पाहिलेला व्हिडियो देतो ज्यात याचा उल्लेख आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Fast & Furious 7 - Get Low Extended Version Video

२७ नक्षत्रात किती मिपाकरणी आहेत हे बघून जरा गंमत वाटली.

२८ वे नक्षत्राच्या अन माझ्या नावाचे तर कमीत कमी ७-८ मिपाकर हैत.

माहितगार's picture

25 Mar 2017 - 12:58 pm | माहितगार

या चर्चेत नक्षत्रांपैकी आतापर्यंततरी फक्त अभिजितरावांनीच उपस्थिती दाखवावी हाही विशेष योगायोग :)

पुंबा's picture

23 Mar 2017 - 2:22 pm | पुंबा

अभिजीत हे नक्षत्र इतर नक्षत्रांपेक्षा वेगळे का मानले जाते? विपी च्या मते इतर नक्षत्रांप्रमाणे त्याला ४ पद नसतात म्हणून. कोणी याचा अर्थ समजावून सांगू शकेल काय?

अभिजित हे मृत नक्षत्र आहे।
काही हजार (बहुतेक 12 हजार) वर्षांपूर्वी ते ढळलेले आहे।
आज ते अस्तित्वात नाही।
असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते।
पण तसे असेल, तर आधी त्याचे अस्तित्व होते, हे कसे शोधून काढले असावे बरे!!
लैच प्रगत होती बहुतेक, खगोलविद्या।

गामा पैलवान's picture

25 Mar 2017 - 1:49 pm | गामा पैलवान

damn,

अगदी बरोबर बोललात पहा. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं हेच मत आहे : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/old-science...

आ.न.
-गा.पै.

कुठेतरी वाचलेलं आठवतंय की त्या महिन्याच्या पौर्णिमेला किंवा एकदोन दिवस आगेमागे जे नक्षत्र येईल त्याचं नाव त्या महिन्याला देण्यात आलं आहे.

महिना सुरू होताना (अमावस्येला- शुद्ध प्रतिपदेला) जे नक्षत्र असेल, ते नाव महिन्याला दिले जाते, असे आहे बहुतेक.

सही रे सई's picture

23 Mar 2017 - 8:17 pm | सही रे सई

येथे काही माहिती अभ्यासावी अशी आहे.

https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand8/index.php/8-...

त्यातला या विषयाशी संबंधीत परिच्छेद इथे संदर्भासाठी देते, पुर्ण लेख मुळातून वाचण्यासारखा आहे..

व्युत्पत्ती

: नक्षत्रा या शब्दाच्या अनेक व्युत्पत्त्या सांगितल्या जातात. क्षत्र = बलवान; “न क्षत्राणि” ती नक्षत्रे. यज्ञ केल्यामुळे करणारा विशिष्ट लोकाला जातो; नक्ष् = जाणे यापासून व्युत्पत्ती तैत्तिरीय ब्राह्मणात व निरूक्तात सांगितली आहे. पाणिनी यांनी दिलेली नक्षत्रांचा व्युत्पत्ती ‘न क्षरन्ति’ – जी झडत नाहीत, पडत नाहीत, क्षय अगर नाश पावत नाहीत ती, अशी आहे. नक्षत्रे ही देवांची मंदिरे होत. नक्षत्रे ही पृथ्वीची म्हणजेच पृथ्वीवरील पदार्थांची चित्रे होत, असे उल्लेख वेदांत आहेत. चंद्राच्या उत्पत्तीच्या वेळी जे तुषार म्हणजे अश्रू उडाले ती नक्षत्रे बनली. चंद्राच्या प्रकाशामुळे नक्षत्रे प्रकाशित होतात असे शतपथ ब्राह्मणात सांगितले आहे. वायुपुराणात सूर्यापासून नक्षत्रांची उत्पत्ती झाल्याचे सांगितले आहे. वेदांग ज्योतिषात खगोलशास्त्र दृष्ट्या नक्षत्रांचा विचार केलेला दिसतो. तारका ज्या अर्थी त्या तरल्या त्या तारका असाही कोटिक्रम केलेला आढळतो. नक्षत्रं, ऋक्षं, भं, तारा, तारका, उडु, दाक्षायिण्यः असा अमरकोशात उल्लेख आहे.

संख्या व नावे

: अगदी वैदिक काळापासून भारतीय आर्यांनी नक्षत्रांची नावे निश्चित केली होती. भारतीय नक्षत्रांची नावे, क्रम व तारे यांसंबंधीची माहिती कोष्टक क्र. २ मध्ये दिली आहे. काही विद्वानांच्या मते प्रथम नक्षत्रे २४ असावीत; परंतु पुढे फल्गुनी, आषाढा व भाद्रपदा यांचे पूर्वा व उत्तरा असे दोन दोन विभाग पाडून चंद्राच्या भ्रमणकालास अनुलक्षून संख्या २७ केली गेली. प्रत्येक नक्षत्राचे चार विभाग कल्पिलेले असतात, त्यांना चरण किंवा पाद म्हणतात. जेव्हा या नक्षत्रमालिकेत अभिजित घालण्यात येते तेव्हा पूर्वाषाढाचा शेवटचा एक चरण व श्रवणाचा आरंभीचा एक चरण अशी जागा मुद्दाम करून देण्यात आलेली आढळते (२१ व्या उत्तराषाढा नक्षत्राचा चौथी चरण व २२ व्या श्रवण नक्षत्राचा १/१५ भाग मिळून १९ दंडाइतक्या काळास अभिजित नक्षत्र असाही उल्लेख आढळतो). तैत्तिरीय ब्राह्मणात नक्षत्रांचे दोन विभाग मानले आहेत. ‘कृत्तिका प्रथमम् । विशाखे उत्तमम् । तानि देवनक्षत्राणि । अनुराधा प्रथमम् । अपभरणी उत्तमम् । तानि यमनक्षत्राणि।’ सूर्य देवनक्षत्रांतून जाताना उत्तरायण असते व यमनक्षत्रांतून जाताना तो दक्षिणायनात असतो. यावरून तैत्तिरीय ब्राह्मणाचा काळ विद्वानांनी काढला आहे.

काही नक्षत्रांचा उल्लेख प्राचीन वाङ्‌मयात निरनिराळ्या नावांनी आला आहे. जसे : अश्वयुजौ = अश्विनी; अपभरणी = भरणी; इन्वका = मृग; बाहू = आर्द्रा; तिष्य = पुष्य; आश्रेषा = आश्लेषा = सार्प; अघा = मघा; अर्जुनी = फल्गुनी (दोन्ही); निष्ट्या = स्वाती; राधा = विशाखा; श्रविष्ठा = धनिष्ठा; शतभिषक = शततारका; प्रौष्ठपदा = भाद्रपदा (दोन्ही). नक्षत्रांच्या उल्लेखाच्या वेळी प्राचीन संस्कृत वाङ्‌मयात नक्षत्रांच्या लिंगात व वचनात फरक आढळतो. काही नक्षत्रे पुल्लिंगी तर काही स्त्रीलिंगी तर काही थोडीच नपुंसकलिंगीसुद्धा आहेत. काही एकवचनी, काही द्विवचनी तर काही बहुवचनी असे उल्लेख आहेत. वचनांबाबत असे म्हणता येईल की, एकवचनी नक्षत्रे आहेत त्यांत एकच तारा उदा., आर्द्रा; द्विवचनी उल्लेख आहेत त्यांत दोन तारे असावेत उदा., अश्वयुजौ (अश्विनी) आणि बहुवचनी उल्लेख आहे त्या नक्षत्रांत दोनहून अधिक तारे असावेत उदा., कृत्तिका, मघा. भिन्नलिंगी उल्लेख का आला हे सांगता येत नाही. प्रत्येक नक्षत्रात किती तारे आहेत हे कोष्टकावरून समजते.

नक्षत्रांना नावे कशी पडली असावीत, हे ठरविणे कठीण आहे; परंतु पृथ्वीची म्हणजे पृथ्वीवरील वस्तूंची चित्रे ती नक्षत्रे ही सांगितलेली एक व्युत्पत्ती पाहिली असता आकृतीवरून काही नक्षत्रांना नावे पडली असण्याचा संभव आहे (उदा., मृग, हस्त). इतरही कारणांवरून ती पडली असावीत. पुनर्वसू, चित्रा, रेवती हे अगोदर प्रचारात असलेले शब्द नक्षत्रांना दिले असावेत. पुनर्वसू याचा अर्थ पुनःपुनर्वस्तारौ स्तोतृणामाच्छादयितारौ (देवौ) असा सायणांनी दिला आहे. ‘चित्रामघा’ याचा अर्थ ‘विचित्रधना’ असा आहे. रेवती म्हणजे धनवती असा अर्थ आहे. ही व अशी नावे त्या त्या नक्षत्राचे दर्शनीयत्व, धनदातृत्व इ. प्रत्यक्ष, कल्पित वा अनुभूत गुणांवरून ठेवली असावीत, असे अनुमान निघते.

माहितगार's picture

25 Mar 2017 - 12:52 pm | माहितगार

चांगली माहिती आहे ही, केतकरज्ञानकोशातही काही माहिती (मी अजून वाचायचे आहे) दिसते आहे. माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आभारी आहे.

नक्षत्रविचार - पुरुषोत्तम कुलकर्णी ( नागपुरकडचे प्रकाशन आहे) पुस्तक चांगले आहे.
विश्वकोशातली माहिती चांगली आहे.

माहितगार's picture

25 Mar 2017 - 12:53 pm | माहितगार

बूकगंगावर शोधून बघेन, माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आभार.

नक्षत्रे २७च का? अठ्ठावीसावे आणण्याचा विचार का आला हा विषय नसल्याने लिहित नाही. वरचे पुस्तक आकाशदर्शन अधिक रूपककथा असे फार चांगले आहे. असे प्रामाणिक प्रयत्न फारच थोडे करतात. तारकासमुह - जे आपल्याकडे ज्ञात नव्हते परंतू अरब व्यापारी रात्रीच्या प्रवासासाठी दिशादर्शक म्हणून वापरत त्यांतील ताय्रांची नावे अरबी अथवा खाल्डिअन होती. त्यांच्या काल्पनिक कथाही तिकडे प्रचलित आहेत. ते तारकासमुह व तारे यांना नावे आणि आपल्याकडच्या पौराणिक कथांमध्ये घेण्याचे महान काम बाळशास्त्री जांभेकरांनी केले ते विश्वकोशात दिले आहेच.