खिडकी पलीकडचं जग भाग 2

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
15 Mar 2017 - 8:59 pm

भाग १ : http://www.misalpav.com/node/39159

भाग २

खूप दिवसांनंतर त्या दिवशी बाबा घरी आले ते एकदम उत्साहात. त्यांनी गौरीसाठी नवीन ड्रॉइंग बोर्ड आणला होता. अड्जस्टेबल होता तो. गौरीच्या सोयीप्रमाणे ती तो पलंगावर उभा किंवा आडवा ठेऊ शकणार होती. पण तो बघुनही गौरी शांतच होती. रात्री जेवायची वेळ झाली होती. आई-बाबा अलीकडे तिच्या बेड जवळच जेवायला बसायचे. त्याप्रमाणे तिघे जावायला बसले. त्यावेळी मात्र बाबांनी एक मोठी बातमी दिली.

"बेटा... मी माझी बदली करून घेतली आहे. आपण नाशिकला जातो आहोत." बाबांनी गौरीच्या मूडचा अंदाज घेत तिला सांगितले. हे एकताच मात्र गौरीचा चेहेरा बदलला. "खरच बाबा? खूप बर होईल हो. इथे न मला सारख असहाय्य आणि एकट वाटत हो." गौरी अगदी मनापासून म्हणाली आणि खूप दिवसानी गौरीच्या चेहेऱ्यावर हसू फुटलं. तिला हसताना बघून गौरीच्या आईचे डोळे भरून आले. तिने गौरीला जवळ घेतल.

नाशिकच घर खरच खूप सुंदर होत. पण गावाच्या एका बाजूला. शेवटच घर होते ते. जरी हे घर शेवटच होत तरी आजूबाजूला भरपूर वस्ती होती. इथे येताना गौरीने बघितल होत की जवळच एक शाळा होती. वस्तीच्या सुरवातीलाच एक लहानसा बाजार देखील होता.

हे घर म्हणजे एक इटुकली बंगली होती ती. फ़क्त मैदाना फ्लोर. 2 बेड रूम्स, हॉल, स्वयंपाक घर. एक लहानशी समान साठवण्याची खोली. बस.. मोठ्या मोठ्या खिड़क्या होत्या. पुढे एक मोठासा वरंडा होता आणि छानस आवार होत, पण मागे वेगळ अस आवार मात्र नव्हतं. मास्टर बैडरूम घराच्या मागिल अंगाला होती. गौरीने स्वतःसाठी मास्टर बेड रूम निवडली. कारण खिड़कीला अगदी लागुनच मोठ्ठ मैदाना होत. संध्याकाळी त्या मैदानावर मुल खेळायला येत असतील असा विचार करून गौरीने स्वतःसाठी मास्टर बेड रूम मागून घेतली होती. संध्याकाळचा वेळ चांगला जाईल असा तिने विचार केला होता. तिची खोली अगदी तिच्या सोयीप्रमाणे तिने लावून घेतली. तिची कॉट मोठ्या खिड़कीच्या शेजारी ठेवली गेली. तिचा हात पोहोचेल असा तिचा नविन ड्रॉइंग बोर्ड ठेवला होता.

गौरीला आणि तिच्या आई-बाबांना तिथे रहायला लागून आठ दिवस झाले होते. खिडकी समोरचं मोठ्ठ मैदाना आणि मोठ्या मोठ्या झाडांची मस्त सावली असूनही गौरीला तिथे कोणी खेळायला आलेल दिसत नव्हत. त्यामुळे आता गौरी थोड़ी हिरमुसली होती. कारण नवीन जागा असल्याने तिची कोणाशी ओळख झाली नव्हती. त्यात गौरी आपणहून कुठेही बाहेर पडू शकत नव्हती. त्यामुळे तिला त्या मैदानाचा खूपच दिलासा वाटला होता सुरवातीला. मात्र त्या मैदानामध्ये कधीच कोणीही खेळायला येत नाही हे पाहून तिला फारच वाईट वाटायला लागल होत. तिने आईला सांगून आजू-बाजूला चौकशी करायला लावली की त्या मैदानावर कोणी खेळायला का येत नाही. एक दोघांनी सांगितल की तस काही कारण नाही तिथे न जाण्याच... पण त्या बाजूला गेल की मुलं अस्वस्थ होतात असा इथल्या लोकांचा समज आहे म्हणून तिथे जाण्याच सगळे टाळतात आणि मुलांना सक्त ताकीद आहे की तिथे अजिबात जायचं नाही. हे समजल्यावर मात्र गौरी अजूनच हिरमुसली.

असेच एक-दोन दिवस गेले. त्यादिवशी गौरीचा मूड तसा चांगला होता. त्यामुळे ती तिच्या चित्रकलेचा जामाजीमा उघडून चित्र काढत बसली होती. संध्याकाळचे पाच वाजले होते. पण तसा छान उजेड होता. गौरीच्या वडिलांना यायला अजून वेळ होता. घरातल्या काही वस्तू संपल्या होत्या म्हणून त्या आणायला गौरीची आई तिला सांगून कोप-यावरच्या वाण्याकडे गेली होती. आणि अचानक गौरीला त्या मैदानाच्या बाजूने ब-याच मुलांचा आवाज ऐकायला आला. तिने आश्चर्याने त्या दिशेने नजर वळवली.

त्याबाजूला बघताच गौरीचे डोळे विस्फारले गेले. कारण अगदी अचानक ते मैदाना जीवंत झाल होत. तिथे खूपशी मूलं वेगवेगळे खेळ खेळताना दिसत होती. काही मोठी माणसे एका बाजूला रांगेने लावलेल्या बाकड्यांवर बसून गप्पा मारत होती. अगदी जिवंत झाल होत ते मैदाना. जणू काही जमिनीतून उगवले होते ते सर्वजण. गौरी मंत्रमुग्ध होऊन तो जीवंत नजारा बघत होती. हळू-हळू अंधार पडायला लागला; मूलं एक-एक करून घरी जायला लागली. मोठी माणस देखील उठून जायला निघालेली गौरीला दिसली. बहुतेक तास-दिड तास गौरीची तन्द्रि लागली होती, अस तिला वाटल.

तेवढ्यात गौरीच्या आईने तिला हाक मारली. "गौरी.. सॉरी ह बेटा... थोडा उशीर झाला यायला. शेजारच्या मावशी भेटल्या त्यांच्याशी बोलत होते. कंटाळली नाहीस न?"

आईच्या हाकेने गौरीने वळून दाराकडे बघितले. आई हसत आत येत होती. "अग आई अज्जिब्बात कंटाळले नाही. अग, इथे ये. गम्मत बघ. आज मैदानावर अचानक जत्रा भरली आहे बघ." गौरीचा आवाज एकदम आनंदी होता.

तिची आई आश्चर्याने आणि उत्सुकतेने पुढे आली. तिने आणि गौरीने वळून एकत्रच मैदानाच्या दिशेने बघितले. आणि...... तिथे तेच ते मैदाना होते... भरपूर झाडांची सावली असलेले पण तरीही शांत आणि रिकामे!

गौरीचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले.

"अग आई... आत्ता... तू हाक मारेपर्यंत माझी नजर त्या मैदानावरच खिळलेली होती. अग काही सेकंदांपूर्वी इथे खूपशी मूलं खेळत होती. मोठी माणस तिथे त्या बाजूला असलेल्या बाकड्यांवर बसली होती." गौरीच्या आवाजात आश्चर्य आणि अविश्वास होता. आपल्याला भास झाला की काय असा विचार तिच्या मनाला चाटून गेला.

"पण बेटा... आत्ता तरी तिथे अस काहीच दिसत नाही मला. अग तुला भास् झाला असेल. मी फ़क्त अर्ध्या तासासाठी गेले होते ग. तू म्हणजे ना.. तुला झोप लागली असेल आणि स्वप्न पड़ल असेल..." आईने तिच्याच मनातला विचार बोलून दाखवला. त्यामुळे गौरी थोडी शांत झाली.

"अ........हम....असेलही....." ती थोड़ी गोंधळून गेली होती. एकीकडे तिला वाटत होत की तो भास नाही तर खरच आपण त्या मैदानावर खूपशी मुलं आणि मोठी माणस बघितली. आणि त्याचवेळी ते क्षणात रिकामं झालेलं मैदाना बघून आपल्यला भासच झाला असावा अस वाटत होत. या विचारांच्या गोंधळामुळे गौरीचा चेहेरा अगदी उतरून गेला. तिचा उतरलेला चेहेरा बघून तिच्या आईला देखील वाईट वाटल. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिची आई म्हणाली,"बर ग बेटा... जर तू आज तिथे इतकी मूलं बघितली आहेस तर मग ती मूलं उद्या पण येणारच न? मग उद्या बघू आपण. चल तुझी व्ययामाची वेळ झाली." गौरीने देखील मनातला उदासपणा बाजूला ठेवत आईच्या मदतीने व्यायाम करायला सुरवात केली.

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

छान चालू आहे. लवकर येऊ द्या पुढचा भाग.