सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग -७

जेपी's picture
जेपी in काथ्याकूट
10 Feb 2017 - 2:07 pm
गाभा: 

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ माझा प्रश्न आहे.

* बांधकाम/इमारत अनधिकृत कधी ठरते ?
१)न्यायालयाच्या गाईड लाईन्स काय आहेत ?
२) ७/१२, ८/अ, एन ए (नॉन अ‍ॅग्रिकल्चर ), बांधकाम परवाना हे सर्व प्रमाणपत्र असल्यावरही बांधकाम/इमारत अनधिकृत ठरवली जाते का ?
**

आपल्या प्रतिसादासाठी आभारी आहे.

प्रतिक्रिया

नविन प्रतिसादासमोर नविन असे लाल लिहून येते नि ते सगळे शोधायला सोप्ये जातात.
=================
काही धाग्यांत २-३ पाने असतात. मग पहिल्या पानावरचे नविन प्रतिसाद कोणते ते लगेच कळते. मात्र दुसर्‍या, तिसर्‍या पानावर लिहिलेले "नविन" निघून जाते. मग अधेमधे कुठेही आलेले नविन प्रतिसाद कोणते हे कळण्यासाठी सगळे प्रतिसाद चेक करत बसावे लागतात.
१. या करिता ऐसीवर १००० प्रतिसाद एकत्र पाहायची जी सोय आहे तशी मिसळपाववर काय आहे?
२. ते दुसर्‍या पानावरचे प्रतिसाद नवे म्हणून मार्क केलेलेच राहतील असे ब्राउज करायची काही पद्धत आहे का?
====================
अगोदरच १००-१२० प्रतिसाद असलेला धागा आठवड्याने उघडायचा, त्यात वेगवेगळ्या पानांवर नवे प्रतिसाद असणार असे तुम्हालाही होत असणार.

मराठी_माणूस's picture

16 Feb 2017 - 2:29 pm | मराठी_माणूस

हा प्रश्न मीही बर्‍याच वेळा विचारला होता , आजतागायत उत्तर मिळाले नाही .

पैसा's picture

18 Feb 2017 - 11:54 am | पैसा

ऐसीवर ही सेटिंग्ज सदस्य आपल्याला हवी तशी बदलू शकतो. मिसळपाव वर सध्या तरी तशी सोय नाही. तुम्ही याबद्दल आपल्या सूचना http://www.misalpav.com/feedback इथून किंवा व्यनि द्वारे सरपंचांपर्यंत पोचवू शकता. कदाचित पुढच्या अपग्रेडमधे ते अशी काही सोय करून देतील.

ते दुसर्‍या पानावरचे प्रतिसाद नवे म्हणून मार्क केलेलेच राहतील असे ब्राउज करायची काही पद्धत आहे का?

नाही. कारण पहिला नवीन प्रतिसाद पाहिला की पुढच्या पानावरचे आधी नवीन असलेले प्रतिसाद 'वाचले' म्हणून मार्क होतात. एक workaround म्हणजे Ctrl + F वापरून जी छोटी खिडकी मिळते त्यात आपल्याला हव्या त्या तारखा टाकून शोधणे. पण हा workaround च आहे.

सध्या तरी याहून सोपा उपाय मला तरी माहित नाही.

arunjoshi123's picture

18 Feb 2017 - 4:47 pm | arunjoshi123

धन्यवाद.
==========
मिसळपाव गाव आहे? सरपंच असायला?

पैसा's picture

18 Feb 2017 - 5:19 pm | पैसा

साईटचे मालक्/सरव्यवस्थापक सरपंच आहेत. संपादक लोक चर्चा करतात त्या दालनाला चावडी असे नाव आहे आणि कोणे एके काळी संपादक मंडळाला बहुतेक पंचायत समिती असे नाव होते.

रॉजरमूर's picture

5 Mar 2017 - 1:49 pm | रॉजरमूर

खूपच इरीटेटींग

काही धाग्यांत २-३ पाने असतात. मग पहिल्या पानावरचे नविन प्रतिसाद कोणते ते लगेच कळते. मात्र दुसर्‍या, तिसर्‍या पानावर लिहिलेले "नविन" निघून जाते. मग अधेमधे कुठेही आलेले नविन प्रतिसाद कोणते हे कळण्यासाठी सगळे प्रतिसाद चेक करत बसावे लागतात.

हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे .
अन तो खूप त्रासदायक आहे .
त्यामुळे अनेकदा १००+ धाग्यांवरचे बरेच प्रतिसाद वाचले जात नाही .
वाचायचे असल्यास परत नव्याने सर्व प्रतिसाद वाचत बसावे लागतात .

बरं हा प्रॉब्लेम आताच नाही सुरुवातीपासून आहे .त्यामुळे पुढच्या अपग्रेड ला तरी तिढा सुटेल का नाही शंका आहे .

ही मिपाची थीम- बीम बदलण्याचा अट्टाहास करून त्यात वेळ घालवण्यापेक्षा फक्त हा प्रॉब्लेम सोडवला असता तरी खूप उपकार झाले असते .याआधी असलेली थीम , मिपाची सर्वोत्कृष्ट थीम होती बदल करायची खरं तर काहीच कारण नव्हते .
आताची ना थीम धड आहे ना होमपेज .अजिबात नाही आवडली . मेनू बार मध्ये ते मोबीयस का काय ते ठेवले पण महत्वाचे असे पाककृती दालनाचे गेट वे दिलेले नाही खरं तर ह्याच विभागाने मिपाकडे यायला अनेकांनी आकर्षित केले होते.पण आता त्यालाच दुय्यम स्थान देण्यात आले आहे.

काही पीडीएफ फाईल ब्रावझर मदे उघडतात, की वेळेस ते सेवच करा असा पॉपप येतो. मला असा पॉपप न येता दरवेळेस ब्रावझर मधेच फाइल उघडायची असेल तर?

इरसाल कार्टं's picture

10 Feb 2017 - 11:37 pm | इरसाल कार्टं

गुगल क्रोम वापरा

arunjoshi123's picture

10 Feb 2017 - 4:35 pm | arunjoshi123

२) ७/१२, ८/अ, एन ए (नॉन अ‍ॅग्रिकल्चर ), बांधकाम परवाना हे सर्व प्रमाणपत्र असल्यावरही बांधकाम/इमारत अनधिकृत ठरवली जाते का ?

१. बांधकाम करण्यापूर्वी http://ficci.in/spdocument/20140/Real-Estate.pdf हे सगळे न पाळले तर होते.
२. बांधकाम करताना http://www.citehr.com/393583-list-applicable-regulation-construction-doc...
हे सगळे कायदे न पाळले तर होतं.

काय करायचं कुणाला माहितीये का?

arunjoshi123's picture

10 Feb 2017 - 4:44 pm | arunjoshi123

मेसेज काय येतो?

हा प्रॉब्लेम अधूनमधून येतो. मी खालील पर्याय वापरतो:

१. मेल जीमेलला फॉर्वर्ड करतो आणि ब्राउझरमधून उघडतो आणि फायली डाऊनलोड करतो.
२. औटलुक वेब अ‍ॅप वापरून ब्राउझरमधून उघडतो आणि फायली डाऊनलोड करतो.
३. ईमेल औटलुकमधून ड्रॅग करून डेस्कटॉपवर चिकटवतो. त्याची *.एमएसजी फाईल होते. ती https://www.encryptomatic.com/viewer/ मधून उघडतो आणि फायली डाऊनलोड करतो.

संजय क्षीरसागर's picture

10 Feb 2017 - 5:45 pm | संजय क्षीरसागर

१. मेल जीमेलला फॉर्वर्ड करतो आणि ब्राउझरमधून उघडतो आणि फायली डाऊनलोड करतो.

हेच बरेच दिवस करतोयं !

२. औटलुक वेब अ‍ॅप वापरून ब्राउझरमधून उघडतो आणि फायली डाऊनलोड करतो.

हे अ‍ॅप डेस्कटॉपसाठी आहे का ? आणि ब्राउझर कोणता?

३. हे जरा काँप्लिकेटेड वाटतंय.

पण एकूणात हा प्रश्न कशामुळे येतो आणि कसा सॉल्व होतो ?

मला आस्थापनीय अग्निभिंतीमुळे (कॉर्पोरेट फायरवॉल) मुळे येतो. अग्निभिंतीला वाटतं की अ‍ॅटॅचमेंट असुरक्षित आहे (म्हणून त्याला पाचर मारली जाते), पण मेलच्या टेक्स्टमध्ये काही असुरक्षित नाही.

२. औटलुक वेब अ‍ॅप वापरून ब्राउझरमधून उघडतो आणि फायली डाऊनलोड करतो.

हे अ‍ॅप डेस्कटॉपसाठी आहे का ? आणि ब्राउझर कोणता?

ऑफिस ३६५ बरोबर आपोआप येतं. ब्राऊझर क्रोम वापरतो.

संजय क्षीरसागर's picture

10 Feb 2017 - 10:55 pm | संजय क्षीरसागर

सध्या तरी जीमेलला फॉरवर्ड करुन डाऊनलोड करणं एवढाच उपाय दिसतोयं .

आभार्स !

इरसाल कार्टं's picture

10 Feb 2017 - 11:41 pm | इरसाल कार्टं

जबराट मराठी..!

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2017 - 11:28 pm | श्रीगुरुजी

सध्या बिनगिअरची सर्वोत्तम दुचाकी स्कूटर कोणती आहे?

संदीप डांगे's picture

10 Feb 2017 - 11:44 pm | संदीप डांगे

ज्युपिटर

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2017 - 2:56 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद! ज्युपिटर व झेस्ट असे एका गॅरेज मेकॅनिकने सुचविले आहे. अ‍ॅक्टिव्हा सुद्धा रेकमेंड केली आहे. अ‍ॅक्सेस, स्विश, ड्यूएट इ. घेऊ नका असा सल्ला दिलेला आहे.

अभ्या..'s picture

14 Feb 2017 - 4:28 pm | अभ्या..

@गुर्जी,
मेक्यानिक कशासाठी रेकमेंड करणार हे ध्यानात आले नै दिसतंय. ;)
मेकॅनिक लोकांचे काही ठराविक फंडे असतात. त्यांच्या सल्ल्याने गाडी घेतली तर अवघड आहे. निदान रेग्युलर वापर्णार्‍या दोन चार लोकांना विचारायचे. झेस्ट न ज्युपिटर चांगलीच आहे नो डाऊट पण नवीन अ‍ॅक्सेस त्यापेक्षा बेटर वाटली.

दादा कोंडके's picture

5 Mar 2017 - 7:40 pm | दादा कोंडके

अ‍ॅक्सेस घेउ नका. माझ्याकडे आहे. पिकअप चांगला या व्यतिरीक्त काहीही चांगलं नाही. प्रत्येक तिसर्‍या महिन्यात सर्विसींग करावी लागते. पंधरा दिवस गाडी बंद असेल तर हमखास गॅरेजला न्यावी लागते.

इरसाल कार्टं's picture

10 Feb 2017 - 11:45 pm | इरसाल कार्टं

होंडा अॅक्टीव्हा... सगळ्यांना आवडते, मी यामाहा फॅसीनो वापरतो, स्टायलीश वाटते.
जास्त क्षमतेची हवी असल्यास एप्रीलीया बघा.

संदीप डांगे's picture

10 Feb 2017 - 11:50 pm | संदीप डांगे

नव्या अ‍ॅक्टिवा जुन्या अ‍ॅक्टिवांइतक्या खास नाहीत.. दहा वर्षे जुनी अ‍ॅक्टिवा एकवेळ घेतली तर चांगली. आताच्या अ‍ॅक्टिवामधे पत्रे+प्लास्टिक याचा दर्जा घसरल्याचे जाणवते.

शिवाय आफ्टरसेल्स सर्विस कशी आहे ह्यावरच कोणत्या कंपनीची टूव्हिलर घ्यावी हे बहुतेककरुन ठरवावं. एका सेगमेंटच्या सगळ्या गाड्या इथून तिथून सारख्याच. दोन-तीन फरक सोडले तर.

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2017 - 2:59 pm | श्रीगुरुजी

फॅसिनो गाडी कशी आहे? अ‍ॅक्टिव्हा १२५ सीसी हा पण एक चांगला पर्याय सुचविण्यात आला आहे.

इरसाल कार्टं's picture

12 Feb 2017 - 7:08 pm | इरसाल कार्टं

आकर्षक आहे, बाकी परफॉर्मन्स देखील चांगला आहे. मी ६ महिन्यांपासून वापरतोय. समाधानी आहे.

अभिजीत अवलिया's picture

15 Feb 2017 - 11:50 am | अभिजीत अवलिया

फॅसिनो व अ‍ॅक्टिव्हा ३जी ह्यात चांगली कुठली? मी अ‍ॅक्टिव्हा ३जी जवळपास फायनल केली होती.

इरसाल कार्टं's picture

16 Feb 2017 - 2:21 pm | इरसाल कार्टं

मी ऍक्टिव्हा चालवली नाही कधी पण ऍक्टिव्हा सगळेच घेतात, फॅसिनो जरा हटके वाटते म्हणून फॅसिनो घेतली.

अभिजीत अवलिया's picture

5 Mar 2017 - 7:57 pm | अभिजीत अवलिया

धन्यवाद. फॅसिनो घेतली. चांगली वाटतेय.

श्रीगुरुजी's picture

17 Feb 2017 - 3:02 pm | श्रीगुरुजी

अ‍ॅक्टिव्हा ३-जी दीड वर्षांपासून वापरतोय. वापरायला चांगली आहे.

नुकतीच फॅसिनो पाहून आलो व टेस्ट राईड सुद्धा घेतली. प्रामाणिकपणे सांगायचं तर फॅसिनो सर्वसाधारणच वाटली. उंचीलाही अ‍ॅक्टिव्हाच्या तुलनेत थोडी कमी उंच आहे. डीलरच्या फसवणुक करण्याच्या प्रवृत्तीमुळे सुद्धा वैताग आला. टेस्ट राईडसाठी जी गाडी ठेवली आहे त्या गाडीच्या स्पीडोमीटरची केबल काढून ठेवली होती. त्यामुळे कितीही चालवली तरी स्पीडोमीटरच्या रिडिंगमध्ये वाढ होत नाही. टेस्ट राईड घेणारा प्रत्येकजण गाडी किमान १ किमी तरी चालवून बघत असेल. परंतु केबल काढल्यामुळे या अंतराची नोंद होतच नाही. हाच पीस कालांतराने कोणाला तरी नवीन पीस म्हणून विकेल कारण त्यावर झिरो रिडिंग आहे. एकूण किंमत किमान ६४ हजारपर्यंत तरी जाईल. ३-जी त्यामानाने थोडीशी स्वस्त आहे.

अ‍ॅक्टिव्हा १२५ सीसी ची किंमत अचाट आहे. नॉर्मल मॉडेल किमान ६९ हजारापर्यंत जाईल व डिस्क ब्रेक वाले मॉडेल किमान ७५ हजारपर्यंत पडेल.

आता हीरो एज बघणार आहे.

एकुलता एक डॉन's picture

12 Feb 2017 - 8:50 am | एकुलता एक डॉन

MPSC मध्ये फक्त ऑब्जेक्टिव्ह अशी एखादी परीक्षा आहे आहे का ?
म्हणजे भरती साठी डिस्क्रिप्टिव्ह द्याची गरज नाही

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Feb 2017 - 10:20 am | कैलासवासी सोन्याबापु

एकुलता एक डॉन साहेब.

एमपीएससी मध्ये आता सगळ्या पदांकरता होणारी भर्ती ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (ऑब्जेकटीव) प्रकारात असते. फक्त सरळसेवा भर्ती सोडून. तिथे तुमच्या शिक्षणावर आधारित असते निवडप्रक्रिया.

स्पर्धापरीक्षा प्रकारात भरल्या जाणाऱ्या पदांची नावे खालील प्रमाणे असतात.

1 उप जिल्हाधिकारी, गट - अ

2 पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट - अ

3 सहाय्यक विक्रीकर आयुक्त ,गट-अ

4 उपिनबंधक, सहकारी संस्था,गट-अ

5 उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ जिल्हापरिषद

6 महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा , गट -अ

7 मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट- अ

8 अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट -अ

9 तहिसलदार, गट - अ

10 सहायक प्रादेशिक पिरवहन अिधकारी, गट -ब

11 महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट -ब

12 कक्ष अधिकारी, गट-ब

13 गटविकास अिधकारी, गट -ब

14 मुख्यािधकारी ,नगरपािलका / नगर पिरषद, गट- ब

15 सहायक निबंधक सहकारी संस्था, गट - ब

16 उप अधीक्षक , भूमी अभिलेख, गट -ब

17 उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट -ब

18 सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट -ब

19 नायब तहिसलदार, गट-ब

_________________________________________________________________________________________________________________________________________

परीक्षेचे ३ टप्पे असतात

१ पूर्वपरीक्षा - २०० गुण

२ मुख्यपरीक्षा - ४०० गुण

३ मुलाखत - १०० गुण
________________________________________________________________________________________________________________________________________

पूर्व परीक्षा (स्वरूप)

पेपर १ (पदवी समकक्ष काठीण्य, वेळ दोन तास, एकूण २०० गुण, माध्यम - मराठी/इंग्रजी, पद्धत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी)

विषय सूची
(1) Current events of state, national and international importance.
(2) History of India (with special reference to Maharashtra) and Indian National Movement.
(3) Maharashtra, India and World Geography - Physical, Social, Economic Geography of Maharashtra, India and
the World.
(4) Maharashtra and India - Polity and Governance - Constitution, Political System, Panchayati Raj,Urban
Governance, Public Policy, Rights issues, etc.
(5) Economic and Social Development - Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social
Sector initiatives, etc.
(6) General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change-that do not require subject
specialisation.
(7) General Science.

पेपर २ (काठीण्य - Topic No.(1) to (5) Degree level, Topic No.(6) class X level, Topic No.(7) X / XII level, वेळ दोन तास, एकूण २०० गुण, माध्यम - मराठी/इंग्रजी, पद्धत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी)

(1) Comprehension
(2) Interpersonal skills including communication skills.
(3) Logical reasoning and analytical ability.
(4) Decision - making and problem - solving.
(5) General mental ability.
(6) Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level), Data
interpretation(Charts, graphs, tables, data sufficiency etc.- Class X level)
(7) Marathi and English Language Comprehension skills (Class X/XII level).

________________________________________________________________________________________________________________________________________

मुख्य परीक्षा

मुख्य परीक्षेत कम्पल्सरी इंग्रजी अन मराठी हे पेपर डीस्क्रिपटीव्ह असतात अन १२वि च्या लेव्हलचे असतात

उरलेले ४ पेपर हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अन पदवी समकक्ष काठीण्याचे असतात.

सिलेबस तुम्हाला आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. __________________________________________________________________________________________________________________________

मुख्य मध्ये पास झाल्यास मुलाखतीला बोलावणे येते. दुसरे म्हणजे मुख्यचा फॉर्म भरतानाच तुम्हाला पदपसंतीक्रम द्यावा लागतो.

तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ___/\___

एकुलता एक डॉन's picture

12 Feb 2017 - 2:07 pm | एकुलता एक डॉन

सर
सगळ्यांमध्ये ऑब्जेक्टिव्ह पण असते आणि डिस्क्रिप्टिव्ह पण
माझे हस्ताक्षर खूप गचाळ आहे आणि सुधारण्या पलीकडे आहे म्हणून फक्त असणारी परीक्षा सुचवा हो

संदीप डांगे's picture

12 Feb 2017 - 2:19 pm | संदीप डांगे

नेटाने प्रयत्न कराल तर फक्त तीन महिन्यात अक्षर सुधारुन वळणदार आणि वेगात लिहिता येते. सुधारण्यापलिकडे आहे असे हस्ताक्षराच्या बाबतीत काहीही नाही तेव्हा तसे मनातून काढून टाका. मनोबल आणि इच्छाशक्ती हवी फक्त.

एकुलता एक डॉन's picture

12 Feb 2017 - 2:26 pm | एकुलता एक डॉन

Gandhi was a mediocre student, but had high ethics and a good command on English, as one of his report cards suggest: “good at English, fair in Arithmetic and weak in Geography; conduct very good, bad handwriting”. His bad handwriting is something he despised as long as he lived.

http://www.youthconnect.in/2014/10/01/21-mind-blowing-facts-about-mahatm...

संदीप डांगे's picture

12 Feb 2017 - 3:10 pm | संदीप डांगे

=)) =)) अहो, काय हे? गांधी काय हस्ताक्षर सुधारण्याचा बेन्चमार्क नाही. काहीतरीच काय?

एकुलता एक डॉन's picture

12 Feb 2017 - 2:07 pm | एकुलता एक डॉन

फक्त ऑब्जेक्टिव्ह असणारी

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Feb 2017 - 7:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

साहेब, मायबाप एमपीएससी ने 'सगळे' मुख्य पेपर ऑब्जेक्टिव्ह केलेत. फक्त main exam चं इंग्रजी अन मराठी वर्णनात्मक आहेत. ते ही बारावीच्या पातळीचे पेपर, जे फक्त 'पास' (१०० पैकी ३५) केले तरी भागते. त्यातही तुम्हाला 'अक्षर खराब आहे' म्हणून पळवाट हवी असेल तर आमचा निरुपाय आहे. अशी कुठलीही परीक्षा नाही असे खेदाने सांगावे वाटते.

एकुलता एक डॉन's picture

12 Feb 2017 - 8:23 pm | एकुलता एक डॉन

गचाळ अक्षराने वाट लागली साहेब
दहावी गणितात १५० होता
मराठी कमी :(
आणि सध्या सॉफ्टवेअर ,लिहिण्याची सवय नाहीच

सध्या सॉफ्टवेअर कंपनीत आहात का..? मग MPSC च्या नक्की कोणत्या परिक्षेची तयारी करत आहात..?

एकुलता एक डॉन's picture

14 Feb 2017 - 11:44 pm | एकुलता एक डॉन

सध्या तर परीक्षा शोधतोय

कंजूस's picture

14 Feb 2017 - 8:37 am | कंजूस

सोन्याबापू छान माहिती.

शेअरइट अॅप ( अथवा तसे) वापरून वाइफाइवर फास्ट शेअरिंग दोन फोनात होते असे म्हणतात. तेव्हा घेणाय्रा/पाठवणाय्रा फोनचा इंटरनेट डेटा वापरला जातो का?
( प्युअर वाइफाइ चालते का ब्लुटुथसारखे?)

मराठी कथालेखक's picture

14 Feb 2017 - 11:54 am | मराठी कथालेखक

फोनचा डेटा वापरला जात नाही. ब्लू टुथ पेक्षा डेटा ट्रान्स्फर चा वेग खूप जास्त असतो.

तिरकीट's picture

14 Feb 2017 - 5:20 pm | तिरकीट

शेअरइट वापरताना फोनचा इंटरनेट डेटा बंद ठेवा.

ज्याचा इंटरनेट डेटा चालू असेल तो दुसर्याबरोबर शेअर होतो.

संदीप डांगे's picture

14 Feb 2017 - 6:25 pm | संदीप डांगे

शेअरैट वापरतांना माझ्या फोनचा मोबाइलडेटा आपोआप बंद होतो. शेअरिंग पूर्ण झाले की परत सुरु होतो. असे सर्वच फोनमधे बाय-डीफाल्ट नसते काय?

तिरकीट's picture

14 Feb 2017 - 8:39 pm | तिरकीट

सेटींग बदलावे लागते...

जैल्हिक (जिल्ह्यांची) अस्मिता नावाचा प्रकार असतो का?
तुमच्या (मूळ?) जिल्ह्याचे लोक विशेष चांगले, प्रेमळ, नितीमान, कष्टाळू, विश्वासपात्र इ इ असतात असं काही तुमचं मत आहे का?
जिल्ह्याच्या कोण्या विशिष्ट बाबीचा तुम्हाला विशेष अभिमान आहे का?
अशी अस्मिता असणं योग्य वाटतं का?

सुबोध खरे's picture

20 Feb 2017 - 9:45 am | सुबोध खरे

हा काय प्रश्न झाला?
पुणे हा एकमेव जिल्हा असेल ज्याबद्दल तेथील प्रत्येकाला अस्मिता जाज्वल्य अभिमान इ सर्व असतंच.
आणि पुणेकरांच्या एकंदर वैशिष्ट्यांविषयि लिहिणे याबद्दल स्वतंत्र धागाच नव्हे तर स्वतंत्र "मिसळपाव" काढावे लागेल

पैसा's picture

21 Feb 2017 - 9:54 am | पैसा

निगेटिव्ह अस्मिता पण असते हो! आमच्या रत्नांग्रीतले लोक शक्य तेवढे आरामप्रिय (आळशी, कामचोर), स्पष्टवक्ते (भांडखोर, कटकटे) इत्यादि इत्यादि असल्याने जगात सर्वश्रेष्ठ आहेत अशी माझी तरी अस्मिता आहे ब्वा.

आता गोव्यातली त्यातही फोंड्याची अस्मिता पण माझ्या मनात जागा मिळवून आहे. मी ड्युअल का स्प्लिट पर्सनॅलिटी याचा निर्णय तूर्तात करू शकले नाहीये. पण जैल्हिक का, तालुकीय किंवा गावीय किंवा गल्लीय अस्मिता असायला सुद्धा काय हरकत आहे! आंतरजालावर टाईमपास चांगला होतो त्यामुळे.

जालीय अस्मिता राहिली ! नेहमी पुढे पुढे असते मेली =))

सदाहरित धागा गुगलल्यास याआधी कमीतकमी ६ भाग झाले होते असे दिसते. रँडम ऑर्डरने काही लिंका

www.misalpav.com/node/34076
www.misalpav.com/node/38815 लेटेस्ट
www.misalpav.com/node/35967
www.misalpav.com/node/37892
www.misalpav.com/node/35297
www.misalpav.com/node/31624

अजोंच्या सिरीजचे तीनेक भाग झाले असतील. अश्या प्रकारच्या प्रश्नांसाठी माबोवर 'माहिती हवी आहे' असा ग्रुप आहे तर ऐसीवर मछोमोप्रआवि अशी धागामालिका. मिपावरदेखील काहीतरी स्टँडर्ड नाव आणि प्रत्येक धाग्याच्या गाभ्यात आधीच्या भागाची लिंक + मालिकेचा उद्देश दिल्यास बरे पडेल.

श्रीगुरुजी's picture

21 Feb 2017 - 3:14 pm | श्रीगुरुजी

टीसीएस च्या संचालक मंडळाने समभाग बायबॅकला मान्यता दिली आहे. भागधारकांच्या संमतीनंतर टीसीएस लोकांकडे असलेले काही समभात रू. २८५० प्रति समभाग या भावाने स्वतःच विकत घेणार आहे. याक्षणी टीसीएस च्या एका समभागाची किंमत रू. २४६८ प्रति समभाग इतकी आहे व मागील ५२ आठवड्यातील सर्चोच्च भाव रू. २७४४ इतका आहे. म्हणजे आपल्याकडील समभाग परत कंपनीला विकून टाकणे चांगलेच फायद्याचे आहे.

माझ्या काही शंका -

१) एखादी कंपनी आपले समभाग बायबॅक करण्यामागे काय कारणे असतात?

२) या योजनेत आपल्याकडील सर्व समभाग विकता येतात का त्यातील काही ठराविक टक्के समभागच विकता येतात?

३) या योजनेद्वारे कंपनीला परत विकत दिलेल्या समभागांमुळे जो भांडवली नफा होतो (अल्पकालीन किंवा दीर्घकालीन) तो करपात्र असतो का करमुक्त असतो?

४) एखादी कंपनी आपले समभाग बायबॅक करणार असेल तर कंपनीची आर्थिक स्थिती उत्तम आहे किंवा फारशी चांगली नाही असा निष्कर्ष काढता येतो का?

आदूबाळ's picture

21 Feb 2017 - 4:08 pm | आदूबाळ

१) एखादी कंपनी आपले समभाग बायबॅक करण्यामागे काय कारणे असतात?

कंपनीच्या स्थितीप्रमाणे वेगवेगळी कारणं असू शकतात. उदा० प्रायव्हेट / क्लोजली हेल्ड पब्लिक कंपनी बायबॅक करण्याची कारणं म्हणजे भागधारकांच्या शेअरहोल्डिंगची टक्केवारी बदलणे. टीसीएससारखी लिस्टेड कंपनी बायबॅक करते तेव्हा भविष्यातला डिव्हिडंड कमी करणे (पर्यायाने उरलेल्या शेअरहोल्डर्सना जास्त डिव्हिडंड देणे), ईपीएस (अर्निंग्ज पर शेअर) सुधारणे (पर्यायाने शेअरची किंमत वाढवणे) अशी विविध कारणं असू शकतात.

टीसीएसच्या बाबतीत काहीतरी एम-अ‍ॅण्ड-ए अ‍ॅक्टिव्हिटी होणार अशी शंका मला बरेच दिवसांपासून आहे. (टीसीएस कोणतीतरी मोठीशी कंपनी विकत घेईल किंवा जायंट कंपनीला विकली जाईल किंवा टीसीएस आणी अजून एक मोठी कंपनी एकत्र येतील.) त्याचा प्रीकर्सर म्हणून या बायबॅक केला असण्याची शक्यता आहे. (हे अर्थात स्पेक्युलेशन आहे...)

२) या योजनेत आपल्याकडील सर्व समभाग विकता येतात का त्यातील काही ठराविक टक्के समभागच विकता येतात?

ते टीसीएसच्या 'स्कीम'वर अवलंबून आहे.

३) या योजनेद्वारे कंपनीला परत विकत दिलेल्या समभागांमुळे जो भांडवली नफा होतो (अल्पकालीन किंवा दीर्घकालीन) तो करपात्र असतो का करमुक्त असतो?

बायबॅक करताना शेअरहोल्डर सिक्युरिटीज ट्रान्झॅक्षन टॅक्स (एसटीटी) भरेल. असा एसटीटी भरला असेल तर दीर्घकालीन भांडवली नफा टॅक्स फ्री असेल, तर अल्पकालीन करपात्र असेल.

४) एखादी कंपनी आपले समभाग बायबॅक करणार असेल तर कंपनीची आर्थिक स्थिती उत्तम आहे किंवा फारशी चांगली नाही असा निष्कर्ष काढता येतो का?

बायबॅक झाला म्हणजे कंपनीकडे ते शेअर्स विकत घ्यायला कॅशही आहे आणि 'संचित नफा' (फ्री रिझर्व्हज) ही आहेत. पण फक्त बायबॅक या घटनेवरून असा काही निष्कर्ष काढू नये असं माझं वैयक्तिक मत.

मराठी कथालेखक's picture

21 Feb 2017 - 4:31 pm | मराठी कथालेखक

(टीसीएस कोणतीतरी मोठीशी कंपनी विकत घेईल किंवा जायंट कंपनीला विकली जाईल किंवा टीसीएस आणी अजून एक मोठी कंपनी एकत्र येतील.)

बहूधा टाटा टेक्नॉलॉजिज ही कंपनी टीसीएस मध्ये मर्ज होईल

श्रीगुरुजी's picture

21 Feb 2017 - 5:08 pm | श्रीगुरुजी

उत्तम माहिती. धन्यवाद!

तुषार काळभोर's picture

2 Mar 2017 - 7:51 am | तुषार काळभोर

पुण्यात चांगले चेत्तीनाड चिकन कुठे मिळेल?
बजेट अंदाजे ५०० पर हेड

संदीप डांगे's picture

4 Mar 2017 - 8:43 pm | संदीप डांगे

मराठी नाटकाबद्दल माहिती हवी आहे.
दोन अंकी, दोन पात्री (एक स्त्री व एका पुरुष) असलेलं कोणतंही चांगलं नाटक माहित आहे काय कोणाला?
नाटकाची ऑनलाइन पीडीएफ मिळाली तर उत्तमच!
ऐतिहासिक, विनोदी, गंभीर कशाही जॉनर चे चालेल!

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2017 - 2:44 pm | श्रीगुरुजी

माझ्या पसंतीक्रमानुसार -

१) समुद्र (चिन्मय मांडलेकर आणि स्पृहा जोशी)

२) साठेचं काय करायचं? (निखिल रत्नपारखी आणि अमृता सुभाष)

३) यू टर्न (गिरीश ओक आणि इला भाटे)

संदीप डांगे's picture

5 Mar 2017 - 2:47 pm | संदीप डांगे

खूप खूप धन्यवाद!

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2017 - 5:26 pm | श्रीगुरुजी

अजून २ माहिती आहेत.

४) आरोप (ले. सुरेश खरे) - हे दोनपात्री रहस्यमय नाटक ८० च्या दशकात गाजले होते. जयराम हर्डीकर या नाटकात होता.

५) ९० च्या दशकातील या नाटकात विक्रम गोखले व एक अभिनेत्री होती. नाटकाचे नाव आठवत नाही.

एकुलता एक डॉन's picture

10 Mar 2017 - 4:56 pm | एकुलता एक डॉन

मुंबई मध्ये cst जवळ काल कॉइनबॉक्स / std बूथ शोधात होतो ,कोणी सांगू शकेल जवळपास ?

एकुलता एक डॉन's picture

18 Mar 2017 - 3:23 am | एकुलता एक डॉन

हिंजवडी हुन रात्री बस सेवा असेल का ?

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2017 - 8:42 am | श्रीगुरुजी

Check http://www.metrozip.in for night bus service from Hinjawadi.

एकुलता एक डॉन's picture

18 Mar 2017 - 12:51 pm | एकुलता एक डॉन

धन्यवाद
पण त्या डांगे चौक च्या पुढे नाहीयेत

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2017 - 9:09 pm | श्रीगुरुजी

चांगला रूम एअर कंडीशनर हवा आहे. चांगली कंपनी, ब्रँड, किंमत, इतर माहिती इ. सांगावे.

संदीप डांगे's picture

1 Apr 2017 - 9:45 pm | संदीप डांगे

गरज आणी बजेट?

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2017 - 11:03 pm | श्रीगुरुजी

- अंदाजे २२० स्क्वेअर फूट खोली
- बजेट ३०-४० हजार

खरडी डिलीट करतायेत नाहीत का :-(

पिलीयन रायडर's picture

22 Aug 2017 - 6:57 am | पिलीयन रायडर

मी नुकतंच आयफोन वरुन सॅमसंगवर शिफ्ट झाले. आधी मिपावर आलं की मोबाईलवरुनही डायरेक्ट मराठी टाईप होत होतं होणताही कीबोर्ड नसताना. पण सॅमसंग मधुन मात्र आता इंग्रजीतुन टाइप होतं. असं का होतं? मिपावरच्या पर्यायातुन भाषा मराठीच निवडली आहे.

लिपीकार विषयी ऐकलं म्हणुन तो डालो करायला गेले तर ते म्हणतं की हा कीबोर्ड क्रेडिट कार्ड नंबर वगैरे ही माहिती सुद्धा जमा करेल. हे पुर्वी सुद्धा एकदा वाचले होते दुसर्‍या किबोर्ड विषयी.

आता कसे करावे?

बरेचजण गुगल इंडिक डाउनलोड करतात. त्यातून मराठी निवडली की झाले काम.
किबोर्ड english/english-मराठी/देवनागरी-मराठी टॅागल होतो झटपट.
बाकी android चा काहीच भरोसा नसतो कुठे काय चेरतील. (विंडोज भारी काम होतं पण कशाला बंद केलं)

पिलीयन रायडर's picture

22 Aug 2017 - 6:22 pm | पिलीयन रायडर

अशीच वोर्निंग इंडिक ला सुद्धा आली, तरी केला डालो!

धन्यवाद काका!

या वर्षी किती अंक, स्पर्धाचा प्लॅन आहे साहित्य सम्पादकांचा?

किंडलवरची पुस्तकं वाचून दाखवणार कोणतं ऍप आहे का?

एकुलता एक डॉन's picture

8 Nov 2019 - 9:59 am | एकुलता एक डॉन

मला हापिसा मध्ये चहा खूप प्याची सवय आहे पण मॅनेंजर भोचक ,टेबलावर चहाचा डाग जरी पडला तरी येऊन बारकाईने निरखून जातो , बर दरवेळी पॅन्टरी मधून फडका आणून साफ करणे बरे दिसत नाही ,काय करावे ?

अनिकेत वैद्य's picture

8 Nov 2019 - 10:40 am | अनिकेत वैद्य

डेस्क ड्रॉवर मध्ये पेपर नॅपकिन आणून ठेवा. चहाचा कप शक्यतो पेपर नॅपकिन वर ठेवा. किंवा डेस्क खराब झाल्यास लगेच पेपर नॅपकिन ने स्वच्छ करता येईल.

अनिकेत वैद्य's picture

8 Nov 2019 - 10:40 am | अनिकेत वैद्य

डेस्क ड्रॉवर मध्ये पेपर नॅपकिन आणून ठेवा. चहाचा कप शक्यतो पेपर नॅपकिन वर ठेवा. किंवा डेस्क खराब झाल्यास लगेच पेपर नॅपकिन ने स्वच्छ करता येईल.