शतशब्दकथा स्पर्धा २०१७: हे बंध रेशमाचे
"अरे नुसती मजा. तुला सांगतो. हि अशी...उंssच लाट यायची..."
नातू ‘आ’ वासून ऐकतोय.
“पाण्याची?”
"मग!!! इथल्यासारखं नाही...
शंख, शिंपले, खेकडे, मऊ, मऊ वाळू...
अगदी मुबलक!!"
"बर आता चला हं. वेळ संपत आली, घरी जायचं ना?"
पुढच्या काही क्षणात समोरचा समुद्र आणि पायाखालची वाळू नाहीशी झाली.
...समोर पुन्हा मंगळावरची लाल रेताड भकास जमीन दिसू लागली.
आजोबा आणि नातू अर्थ सिम्युलेटरमधून बाहेर पडले.
अंतराळयानात बसल्यावर हेल्मेटच्या काचेवर आतून वाफ सोडत छोट्यानं आजोबांना विचारलं,
"ग्रँडपा, ग्रॅनी कुटे अशते?"
आजोबा दोन बोटं अंतराळयानाच्या एयरटाइट खिडकीवर ठेऊन दुरदुर जाणाऱ्या एका फिकट निळ्या ठिपक्याकडे बघत होते.
यानाच्या एक्झॅास्टमुळे खिडकीची काच आता धुरकट व्हायला लागली होती...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लय भारी !!!
मस्त
छान.
पंच मिसिंग आहे! बाकी छान!!
सगळे मिपाकर पंच आहेत. मिसिंग
क्या बात. मस्तच.
कल्पना आवडली.
भन्नाट कल्पना..